Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> खरंतर, सगळ्यांनी भाजप ला मत देवून सातत्याने निवडून आणायला हवे.

कारण तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही. नोकऱ्यांचीही गरज नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पेपर विकत घेतील, शिक्षण आणि नोकऱ्या मिळवतील. बाकीच्यांना ५ किलो धान्य.

आता ८० कोटी प्रजेला दिल जात आहे. पुढे १५० कोटी प्रजेला पण देता येईल.

=====

तुम्हा सगळ्यांच्या team efforts चे खरोखर कौतुक वाटते. एक नम्रपणे लिहितो, एक उपरोध अवलंबतो, एक त्रागा करतो, एक जोरदार हसण्याच्या स्मायली देऊन प्रतिसादाला निरर्थक ठरवण्याचा प्रयत्न करतो, एक अनुल्लेख करतो, एक ड्यु आयडी घेऊन लिहितो, एक काहीही माहीत नसूनही धागाच काढून बसतो, एक सकाळी आठ ते दुपारी दोन अशी ड्युटी करतो, एक मध्यरात्रीसाठी राखीव ठेवला जातो, एक मत भाजपला देतो पण येथे टिकून राहायचे म्हणून विरोधक होतो, एक वैयक्तिक आकस ठेवून लिहितो, एक सोळाव्या सदस्यनामाने व भयाने तिसऱ्याच वाहत्या पानावर भडकून लिहितो.

तुम्हाला आवडत्या पक्षाला मत द्यावेत. मग सगळे ठीक होईल. गेली काही वर्षे बरेचसे भारतीय हेच करत आहेत.

मोदीजी आंदोलक संसदेच्या गेटवर पोचले हे ऐकून मागच्या दाराने शिताफीने निसटले. जाताना काय होईल ते बघू झुरळं मागे हटवा असा आदेश देऊन गेले. मास्टर स्ट्रोक.

फाविदडि, हे उघड मान्य करणारेच लोक आहेत हल्ली. नीती, प्रतिमा, कायदा यांना गुंडाळुन ठकासी ठक इ. वाचले नाहीत का? जे आजही सरकारचे समर्थन करतात त्यांना नेसुचे डोक्याला बांधुन नागडे हिंडायला काही प्रत्यवाय असेल असं वाटतं का काय!
हल्ली मात्र जे तितके कट्टर न्हवते त्यांनी हे अती होतंय हे मान्य करायला सुरुवात केली आहे हाच मला दिसणारा एक किरण आहे.

सोनम वांगचुक - ओके आहेत

अभिजीत दिपके - ओके आहेत

NEET परीक्षा - पुन्हा घेतली व निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रात कोणी कुदळे नावाची विद्यार्थिनी पहिली आली.

आंदोलनात - NEET चा पेपर फुटल्यामुळे वैयक्तिक नुकसान झालेले आंदोलनात कोणीही आढळलेच नाही, असे दोनशेवर बातम्या / व्हिडिओ वगैरे बघून कळले.

आंदोलन - अल्ला का नाम रहेगा, भारत के तुकडे होंगे, मोदी हा मोकळा सोडलेला सांड आहे (दिपकेचे वडील), मोदी को पिटेंगे ही विधाने, घोषणा आहेत.

न्यायाधीश ह्यांना झुरळ कसे काय म्हणू शकतात, पेपरफुटी होऊ नये म्हणून काय करायला हवे, ह्याबाबत आंदोलनात काहीही नाही.

बेफिकीर तुम्ही

जाऊ द्या.. या घोटाळ्यात आत्महत्या करून बळी पडलेल्या गुजरातच्या एका मुलाचे वडील होते, नाशिकच्या एका विद्यार्थ्याचा भाऊ होता. त्या वडिलांचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला आहे, बघा.. अथवा nka बघू. तुमच्या विचारात काही फरक पडेल असे वाटत नाही. सुधीर चौधरीच्या बातम्या बघत रहा.. ते बरे पडेल तुम्हाला.

तुम्हाला आवडत्या पक्षाला मत द्यावेत. मग सगळे ठीक होईल. गेली काही वर्षे बरेचसे भारतीय हेच करत आहेत.>>>
हेच लिहायचं होत तर रडायचं कशाला भाजप हटाव आंदोलन झालं म्हणून. आंदोलकांना जे वाटतंय ते करत आहेत.

हल्ली मात्र जे तितके कट्टर न्हवते त्यांनी हे अती होतंय हे मान्य करायला सुरुवात केली आहे हाच मला दिसणारा एक किरण आहे.>>> सोडा ती आशा, या कुंपणावर बसलेल्यांपैकी बहुतांश आधिच 'गझवा ए हिंद' च्या भयगंडाने पछाडलेली जमात आहे....फक्त एक प्रोपगंडा सिनेमा प्रदर्शित होण्याचा उशीर ते पुन्हा तिच भुमिका उगाळणार...उंदरांच्या भितीने अख्या घराला चूड घालण्या व्यतिरिक्त त्यांच्या हातून काही एक घडणार नाही हे लिहून ठेवा.

अल्पना दुसरी पोस्ट सुद्धा छान.

पक्षापलीकडे विचार करणारे युवा हेच भविष्य आहेत देशाचे. भले ते संख्येने कमी असतील आणि त्यामुळे वॉटबँक म्हणून यांचे मूल्य फार नसेल. पण ते जे काही काम करतील ते नैतिकतेची चाड बाळगून करतील आणि देश पुढे नेतील. आपण फक्त अश्यांना सपोर्ट करत एकटे पडू द्यायचे नाहीये.

NEET परीक्षा - पुन्हा घेतली व निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रात कोणी कुदळे नावाची विद्यार्थिनी पहिली आली.>>>

NEET परीक्षा पुन्हा घेतली म्हणून खूप अभिमानाने लिहिल तुम्ही. पुन्हा घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटला नाही म्हणून खूप आनंद ही झाला असेल तुम्हाला. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या result मध्ये घोळ घातलाय त्याच काय. त्या विद्यार्थ्यांना आता कोर्टात जाव लागणार. ह्या मनस्तापाला nta आणि ती nta निर्माण करणारे सरकार जबाबदार नाही तर कोण जबाबदार आहे.

हे सगळे कॉक्रोच असल्याने त्यांची डोकी फोडली काहीतर नक्कीच मरतील. बीजेपी ला हटवायला आले होते. गंमत वाटली का?

फेक सिक्युरिटी ही मांडणी खूपच सोयीस्कर झाली, आपलीच पोरे होती, आवेगात होती, दुखावलेली होती, हाय हॅन्डेड अप्रोच नसता ठेवला तर बरे झाले असते एकंदरीत, पण ऑथोरिटेटिव सरकार कडून खास अपेक्षा पण नाहीत एकंदरीत.

बाकी, आता एक प्रश्न, सिक्युरिटी फेक असल्याचा (बऱ्यापैकी) जावई शोध कसा लागला ? थोडे स्पष्टच बोलायचे झाले तर ही अतिशयच जास्त सत्योत्तरी मांडणी वाटली.

हे सगळे कॉक्रोच असल्याने त्यांची डोकी फोडली काहीतर नक्कीच मरतील. बीजेपी ला हटवायला आले होते. गंमत वाटली का?

अय खुदा मेरे दुश्मन से मैं खुद निपट लुंगा
तू मुझे मेरे दोस्तो से बचा

- मिर्झा मोदी (गली कासम जान, बल्लीमारां, चांदनी चौक, पुरानी दिल्ली)

https://www.instagram.com/reel/DbBh8khsgTG/?igsh=MXJnM2VmbG9zNWR0Yg==

https://www.instagram.com/reel/DbBJwC6se25/?igsh=MWVzNHd3azBqcWUweg==

कित्येक मुलींना सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. शॉकिंग आहे. किंवा हे आंदोलन चिरडताना नॉर्मल असावे आणि मीच कधी आजवर असले काही फॉलो केले नसावे त्यामुळे मला नवे आणि इतके विचलित करणारे वाटत असावे.

आंदोलक संसदेच्या गेट वर पोचल्यावर पोलिसानी पहिल्या काही मिनिटात तुफान लाठीमार केला. लाठ्या पायावर माराव्या असा प्रोटोकॉल असताना त्यांनी पहिल्या काही मिनिटात ५० तर जणांची डोकी फोडली. त्यामुळे सगळे घाबरून पळू लागले. चेंगराचेंगरीत अजून काही दबले. त्यानंतर आंदोलक मागे हटले. तसे नसते हटवले तर संसद धोक्यात आली असती. सेशन असल्याने सर्व खासदार आत होते. मोदीजी मोठ्या शिताफीने आधीच मागच्या दाराने निघून गेले. पाच मिनिटात आंदोलनाचा निकाल लावला. याचा २०२९ च्या इलेक्शन वर परिणाम होईल तो पाहू. तोपर्यंत नवीन मुद्दा येईन. पोरासोराना वाटत होते की आंदोलन करू क्यूट क्यूट होईल सगळे. त्याना इतका ट्रॉमा दिलाय की परत येणार नाही. बरेच देश सोडून बाहेर सेटल होतील. फक्त इथे उरतील ज्याना हिंदुत्व मान्य आहे.

अल्पना, तुझा मुलगा प्रत्यक्ष तेथे गेला आणि पालक म्हणून तू पण त्याला अडवले नाही... खूप ग्रेट आहेस तू. अन्यथा शिवाजी शेजारच्या घरी असावा ही मनोवृत्ती असते.

आकाश बॅनर्जी चे video चांगले आहेत. त्याने रिअल टाइम माहिती दिली आहे कालच्या video त.

सतत मुलांच्या समोसे खाणे बोलणाऱ्यांबद्दल... मुलांनी उपोषण कर्त्यांच्या जवळ खाणं चुकीचं होतं... पण ती मुलं तेव्हा उपोषण करणारी नव्हती.. त्यांना तिथे तूप मेतकूट भात मिळणार नव्हता.... त्यांच्या एका कार्यकर्त्याने म्हंटल्याप्रमाणे, त्यांना आंदोलनाचा अनुभव नाहीय... त्यांच्याकडून चुका होऊ शकतात.. पण प्रयत्न प्रामाणिक आहेत त्यांचे.

परीक्षा पुन्हा घेतली... पण मुलांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल काय? आर्थिक नुकसानीबद्दल काय?(फी नाही भरावी लागली तरी त्यांचे त्या काळातील bar ch प्लॅन्स रद्द करावे लागले असतील...). जे सरकारी रिसोर्सेस वाया गेले त्याबद्दल काय...? कुणीच जबाबदार नाही?

मुख्य ही मुलं त्यांना योग्य वाटतं त्या करण्याकरता घराबाहेर पडलीत. लाठ्या झेलताहेत... आदर आहे त्यांच्याबद्दल.

पहिल्या काही मिनिटात ५० तर जणांची डोकी फोडली. त्यामुळे सगळे घाबरून पळू लागले. चेंगराचेंगरीत अजून काही दबले. त्यानंतर आंदोलक मागे हटले. >>

आता आंदोलनात सहभागी व्हायचं तर पुढील परिणामांना सामोरं जायची पण तयारी पाहिजे. सगळंच गुडी गुडी कसं काय मिळणार?

सगळंच गुडी गुडी कसं काय मिळणार? >> ते रामजनम भूमीच्या वेळी ठोकले होते तेही योग्यच म्हणायचे

कालच्या भयानक हल्ल्यानंतर मोदीजी आज देखील संसदेत येऊन काही झाले नाही अश्या अविर्भावात आपले काम करायची हिंमत दाखवतायेत. दाद दिली पाहिजे. माझ्या ओळखीतले बरेच भाजप समर्थक आज अस्वस्थ आहेत त्याना आवाहन आहे की मोदीजींवर विश्वास ठेवावा. लोकांशी आज वाद घालू नये लोक हे सगळे विसरतील महिन्याभरात. यामागचे खरे कारण जेंव्हा समोर येईल तेंव्हा तुम्ही मैदानात उतारा.

सिरीयसली!!!?
रामजन्मभूमी आणि आताचे आंदोलन ह्यांची तुलना होतेय???

कालच्या भयानक हल्ल्यानंतर मोदीजी आज देखील संसदेत येऊन काही झाले नाही अश्या अविर्भावात आपले काम करायची हिंमत दाखवतायेत. दाद दिली पाहिजे. >> ते मुंबई पावसाळी स्पिरीट का काय म्हणतात... ते दाखवत असतील..
बाकी निसर्गावर कंट्रोल नसला तरी जिसकी लाठी उसकी भैस!

परीक्षा पुन्हा घेतली... पण मुलांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल काय? आर्थिक नुकसानीबद्दल काय?(फी नाही भरावी लागली तरी त्यांचे त्या काळातील bar ch प्लॅन्स रद्द करावे लागले असतील...). जे सरकारी रिसोर्सेस वाया गेले त्याबद्दल काय...? कुणीच जबाबदार नाही?>>>> +1111
आणि ह्यावेळी ज्यांना चान्गला rank आहे त्यांना मागच्या वेळेस चान्गला rank असेलच असं नाही आणि vice versa. म्हणुन प्रत्येक attempt हा पोरांसाठी important असतो. नीट chee परीक्षा परत घेतल्याने प्रॉब्लेम सुटला नाही. काही मुलांनी त्यांचा one n only चान्स गमावला आहे.

अवांतर : बेफिकीर तुमच्या मते
निर्भया आंदोलनामध्ये बलात्कार अनुभवलेले कोणीच नव्हते म्हणून ते आंदोलन फेक /देशविरोधी /फार्स वगैरे वगैरे अशीच मत होती का?
कि तिथे वेगळी फुटपट्टी

>>> की तिथे वेगळी फुटपट्टी

हा विचार तुम्हाला सुचू शकतो ह्याचाच अर्थ तुमचा अनुल्लेख होणे आवश्यक आहे

विचार सुचलाय तुम्हाला आणि मला सुचलाय की काय असे दाखवताय

कालच्या भयानक हल्ल्यानंतर मोदीजी आज देखील संसदेत येऊन काही झाले नाही अश्या अविर्भावात आपले काम करायची हिंमत दाखवतायेत. >> ह्याला सर्वमान्य भाषेत निर्लज्ज किंवा कोडगा असे म्हणतात. कदाचित पुढे जाऊन त्याला मोदीपणा असा प्रतिशब्द तयार होऊ शकतो. रोम जळल असताना फिडल वाजवणारा नीरो आपण काही पहिला नाही, ती संधी आता मिळते आहे.

https://www.instagram.com/reel/DbCsNAXRelr/?l=1

विजेता दहियाला काय झालं आहे ? हा म्हणतोय (बर्गर खात) की बर्गर खाण्याचा इतका इश्यू का करता आहात ? एका माणसाला भूक लागली आहे बर्गर खायची ईच्छा झाली आहे तो बर्गर खाणार, मला का इतकं अकाउंटेबल धरता आहात ? मी काय तुम्हाला बोलवलं आहे का तुम्ही मला आंदोलनासाठी निवडून दिलं आहे ? का आंदोलन करतोय म्हणजे काय मी नोकरी करतोय का काय ?

नक्की काय सुरू आहे ?

सीजेपी आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर का फडकवले असेल ?

>>>>

जेम्स ते धुरंधर च्या ४ थ्या भागात दाखवणार आहे. दिपके हा सीआयए चा हस्तक आहे आणि ओबामा त्याच्या आडून भारतात सत्तांतर घडवून आणायचा प्रयत्न करतोय.

>>>>>

ह्याला सर्वमान्य भाषेत निर्लज्ज किंवा कोडगा असे म्हणतात. कदाचित पुढे जाऊन त्याला मोदीपणा असा प्रतिशब्द तयार होऊ शकतो.

>>>>>>>

मोदीजीना किती यातना झाल्या काल. ते म्हणाले मला मुलांमुलींची डोकी फुटताना पाहवणार नाही. तुम्ही मी.गेल्यावर काय करायचे ते करा. रात्रभर झोप.नाही त्या माणसाला. तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी बापाच काळीज लागते.

Pages