Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नानबा हे पेड लोक आहेत तुम्ही
नानबा आशुचॅम्प हे पेड लोक आहेत तुम्ही उगाच त्यांच्याशी वाद घालताय. त्यांचे मतपरिवर्तन हे ज्यावेळेस त्यांना दिसेल कि आपल्याला पैसे देणारे सत्तेत नाही राहणार त्याक्षणी ते मत बदलतील.
मी मॉडिफाय केलं आशुचॅम्प..
मी मॉडिफाय केलं आशुचॅम्प.. आशय आणि भावना त्याच आहेत. भावनांचे डिटेलिंग कमी केले.. बदलायला घेतलं तेव्हा तुमची पोस्ट आली नव्हती - रीपोस्ट करे पर्यंत आली (सॉरी - मूळ पोस्ट सेव्ड नाहीये, त्यामुळे जाऊदे.)
नाही ना पेड लोकं कमी धोकादायक
नाही ना पेड लोकं कमी धोकादायक आहेत
त्यांना पैशाशी मतलब आहे
माझ्या ओळखीत अनेक जण आहेत, काही नात्यात ही, सगळी काका मामा वयोगटातील मंडळी, त्यांना मनापासुन वाटतंय की हे आंदोलन म्हणजे देशद्रोह होता, संसद उडवून देणार होते, स्फोटके पुरवली गेली होती, नेपाळ सारखे इथे जाळून टाकणार होते त्यामुळे पोलिसांनी केलं ते बरोबर होतं आणि हे वाटणारे आणि त्यावर ठाम असणारे आणि काही सांगायला गेलं तर तुम्हीच कसे नालायक आहात देशात राहायला असे सुनावले जात आहे
अक्षरशः हतबल व्हावे अशी परिस्थिती आहे
त्यांचे मतपरिवर्तन हे
त्यांचे मतपरिवर्तन हे ज्यावेळेस त्यांना दिसेल कि आपल्याला पैसे देणारे सत्तेत नाही राहणार त्याक्षणी ते मत बदलतील. >> असे झाले असते तरी चालले असते.
मला माझ्या सोसायटीमध्ये काही लोक ज्यांनी स्वतःला तनमनधन ह्याने वाहून घेतले आहे असे दिसतात.
त्यांना खरच वाटतं की शेतकरीआंदोलक्न, विद्द्यार्थी आंदोलन,पर्यावरन्ण वादी, कामगार आंदोलन पैसे घेऊन काम करताहेत.
फक्त एकच फरक ह्या वेळेस जाणवला... सोसायटी गृ प वर लॉबी असल्या सारखी आहे. विरोधात कोणीच काही बोलत नाही.. ह्यावेळेस मात्र माझ्या पोस्ट नंतर अनेक जण बोलले, बोलताहेत.
ही बेहकलेली १०% सामान्य, पण समुहात एकत्र आलेली माणसं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार आपली मते तयार करणारी बाकीची ४०% जनता दिसली की फार मानसिक त्रास होतो.
ही माणसं वाईट नाहियेत मुळात, रोजच्या आयुष्यात, पण साचा घडवाल तशी घडतील अशा कॅटेगरी मधली आहेत, त्यामुळे डॅन्जरस होताहेत.
These are the tools.. आणि ह्यात काही बुद्धिमान वाटणारी लोकंही आहेत, तेव्हा आश्चर्य वाटतं.. That's how cults work though!
दुर्दैवाने याना काही करू शकत
दुर्दैवाने याना काही करू शकत नाही. एकतर त्यांना आपण चुकलोय हे मान्य करणे अवघड जातंय किंवा ब्रेनवॉशिंग च्या तुरुंगात ते इतके अडकलेत कि त्याच्या बाहेर येऊ शकत नाही. हे लोक राजकीय नेत्यांचे आयडियल अनुयायी आहेत. सगळ्यात जास्त शोषण त्यांचेच होते. आजन्म देखील ते या तुरुंगातून सुटू शकत नाही.
बरेच बुमर/मिलेनियल लॉस्ट कॉज
बरेच बुमर/मिलेनियल लॉस्ट कॉज आहेत. एक चांगले आहे कि जेंझी यांच्या तावडीत सापडणार नाही. नाहीतर गेले काही वर्षे त्यांनी पद्धतशीर प्रयत्न चालवले होते जेंझी नादाला लावायचे. उत्तर भारतात काही प्रमाणात यशस्वी पण झालेत.
जेंझी या अंकल लोकांना वठणीवर
जेंझी या अंकल लोकांना वठणीवर आणतील तरच!, आणि भारतासारख्या अवाढव्य देशात ते फार फार कठिण आहे. आपली पिढी कामातुन पार गेलेली आहे
राहता राहिलं समूळ उच्चाटन, काही तरी जबरदस्त फटाका फुटला तर... हे अगेन भगवान भरोसे झालं... पण अशाच आंदोलनातून पुढे बदल घडतात असा जागतिक इतिहास आहे. त्यामुळे शुभेच्छा!
एकदा बोलणी करायला हवी होती.
एकदा बोलणी करायला हवी होती. चर्चा करून हा विषय एवढा चिघळला नसता. काय त्या पोरांना विनाकारण मारलं. व्हिडिओ बघून वाईट वाटलं काही तर बघवत पण नाहीत. अजून पण वेळ गेली नाही. चर्चा केली तर विषय निकालात निघेल पण सरकार ते करणार नाही. विनाकारण कॉम्प्लीकेशन वाढवतात.
जेनझी अजून तरी नाहीये म्हणजे
जेनझी अजून तरी नाहीये म्हणजे माझ्या परिघात तरी
मुलाशी आणि त्याच्या मित्रांशी बोलल्यावर अस जाणवलं की त्यांना भाजप आकर्षक वाटतो पण ते सरसकटीकरण करत सगळ्याला पाठिंबा देत नाहीत
राहुल गांधी कोणालाच नको आहे
केजरीवाल ममता तर अगदी बाद
पण म्हणून कट्टर भाजप समर्थन करत नाहीत
चुकीला चूक म्हणण्याचे धाडस दाखवतात
नीट आंदोलन देखील अनेकजण डोळसपणे बघत होते
वाहवत जाऊन दिपके हाच आमचा नेता असे कोणी म्हणाले नाहीत
पण आंदोलनाला पाठिंबा होता, सरकारने जबाबदारी घ्यायला हवी
मुळात मला अपेक्षा नव्हती की हे सगळे राजकारण किंवा आजूबाजूला काय घडत आहे त्याबाबत इतके सजग असतील
मला वाटलेलं की ते त्यांच्या जगात अनिमे आणि गेम्स मध्ये मश्गुल असतील
पण अनेकांना बरीच माहिती होती
मला हे चित्र सुखावह वाटले
कंसराज, मी येथे तुम्हाला
कंसराज, मी येथे तुम्हाला answerable नाही.
=====
राहुल गांधींना ताब्यात घेतले. राहुल गांधी ह्या आंदोलनात खरे तर पडत नव्हते. मात्र आंदोलनाचे कालचे मोठे स्वरूप पाहून ते आज हे आंदोलन काँग्रेसच्या ताब्यात घ्यायला आले असे काही तज्ञ टीव्हीवर म्हणत आहेत.
=====
येथील सहानुभूतीपर भावनांशी मी सहमत आहे. मात्र येथे एकच बाजू रेटली जात आहे. ह्या बाहेर एक दुनिया आहे आणि ती बरीच मोठी व त्यात बरेच काही वेगळे दाखवले, सांगितले जात आहे ह्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे.
दाखवले, सांगितले जात आहे
दाखवले, सांगितले जात आहे (म्हणून ?) ह्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे.
>>>>
देर यू गो!
ह्या बाहेर एक दुनिया आहे आणि
ह्या बाहेर एक दुनिया आहे आणि ती बरीच मोठी व त्यात बरेच काही वेगळे दाखवले, सांगितले जात आहे ह्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे.>>> म्हणजे गोदी मिडिया.
छान पोस्ट आल्या
छान पोस्ट आल्या
सर्व मतांशी सहमत
पण चित्र हळूहळू बदलत आहे.
लोकांचे सोशल मिडिया स्टेटस पाहून ते समजत आहे.
माझ्या ओळखीत अनेक जण आहेत,
माझ्या ओळखीत अनेक जण आहेत, काही नात्यात ही, सगळी काका मामा वयोगटातील मंडळी, त्यांना मनापासुन वाटतंय की हे आंदोलन म्हणजे देशद्रोह होता, संसद उडवून देणार होते, स्फोटके पुरवली गेली होती, नेपाळ सारखे इथे जाळून टाकणार होते त्यामुळे पोलिसांनी केलं ते बरोबर होतं आणि हे वाटणारे आणि त्यावर ठाम असणारे आणि काही सांगायला गेलं तर तुम्हीच कसे नालायक आहात देशात राहायला असे सुनावले जात आहे
अक्षरशः हतबल व्हावे अशी परिस्थिती आहे>>>+१००००
,काँग्रेसने अनेक राज्यात ह्या
,काँग्रेसने अनेक राज्यात ह्या नीट च्या गोंधळाविरोधात आंदोलन केले आहे. विद्यार्थ्यावर केलेला हल्ला आणि अत्याचार पाहून राहुल गांधी जर पंतप्रधानांना जाब विचारायला गेले तर ते आंदोलन ताब्यात घ्यायला गेले ?? टिव्ही वरील एक्सपर्ट ही भाजपचे पित्तू असतात हे आतापर्यंत बघत आलेलो आहे.
आंदोलन वगैरे ठिक आहे,
आंदोलन वगैरे ठिक आहे, त्यामागचं कारण हि वाजवी आहे. पण यामागचे कर्तेसवर्ते कोण आहेत, त्यांचा हिडन अजेंडा काय आहे याचा विचार करण्याचा कोणि प्रयत्न केलाय का? मला तरी यात केजरीवाल पॅटर्न दिसतोय. वाईट याचं वाटतंय कि या सर्कसमधे बिचारी तरुण पिढी वापरली जातेय.. मार खातेय, आणि त्याची भणक ना त्यांना लागतेय ना त्यांच्या पालकांना...
अले बापले आमाला माहितीच
अले बापले आमाला माहितीच नाहीले! आपण ना त्या सगळ्या दुत्त लोकांचा घल उन्हात बांधू! पहिले घल लाहुल चे मग केजली चे!
या मोर्चाला संसदेत जाऊ
या मोर्चाला संसदेत जाऊ द्यायला हवं होतं का?
यावर एकही उत्तर नाही.
मुळात नीट बद्दल सरकारने अजून काय करायला हवं होतं यावर उत्तर नाही.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा होता हे मान्य.
पण त्यानं प्रश्न कसा सुटणार होता याबद्दल उत्तर नाही.
cjp च्या जाहीरनाम्यातील भयानक त्रुटी बद्दल एकाचेही काही मत नाही.
मोर्चा एकदा बेफाम झाला कि त्याला अक्कल नसते हे ज्यांनी कधी बघितले आहे अनुभवले आहे त्यांना हे पटेल
पण एकदा मोदीविरोधाचा वसा घेतला कि त्यांच्या दृष्टीने मोदींची बाजू घेणारा प्रत्येक माणूस अंध भक्तच कसा होतो हे मायबोलीवर याच cult कडे पहिले कि समजून येते.
मला भाजपचा पेड वर्कर म्हणून झाले, इतरही सर्व शेलकी विशेषणे लावून झाली, शिव्या देऊन झाल्या, पण मूळ प्रश्नांची उत्तरे एकानेही दिलेली नाहीत. कारण त्यांच्या कडे याची उत्तरे नाहीत.
मला यातून चार पैसे मिळवायची मुळीच इच्छा नाही. माझा वैद्यकीय व्यवसाय उत्तम चालला आहे आणि माझ्याकडे आयुष्याला पुरेल यापेक्षा जास्त पैसे संचयित आहे. तेंव्हा पेड ट्रॉल करण्याची मला मुळीच आवश्यकता नाही.
मी स्वतः दोन वेळेस नीट ची (समकक्ष) परीक्षा दिली होती त्यामुळे एक वर्ष आपली स्थिती काय होती हे हि लिहिलेले आहे.
पण एकदा मोदी विरोधाचा वसा घेतला कि सारासार विचार सोडूनच द्यायचे असेच असते का?
असे असेल तर चालू द्या.
मी येथे लिहितो ते अशा मोदी विरोधी कल्ट साठी नाहीच.
बऱ्याच लोकांनी मला खाजगीत सांगितले कि सर तुम्ही त्यांचे मनावर घेऊ नका तम्ही जे दुवे पाठवलेले आहेत त्यातून आम्हाला काही माहिती मिळते. अशा काही लोकांसाठी मी लिहितो. शिव्या द्या नाही तर ओव्या म्हणा.
इथेच लिहून ठेवतो. काही दुवे हवे तर जोडा. दिपके आप च्या आय टी सेल मध्ये काम करत असे. फेब्रुवारी मध्ये पंजाबच्या निवडणूका आहेत. केजरीवाल आणि कंपनी उतरलेली आहेच. तेंव्हा आता या आंदोलनात पंजाबचे शेतकरी राकेश टिकैत आणि कंपनी उतरले नाहीत तरच आश्चर्य वाटेल
गेल्या काही वर्षात झालेले
गेल्या काही वर्षात झालेले एकही आंदोलन सांगा ज्यावर हिडन अजेंडा असल्याचा आरोप करण्यात आलेला नाही
एक तरी
खरे काकांकडून माहिती घेणाऱ्या
खरे काकांकडून माहिती घेणाऱ्या लोकांना जाहीर आवाहन:
नका घेऊ. त्यांना किती त्रास द्याल तुम्ही. खरे काका मी देऊ का त्यांना माहिती?
नीट बद्दल सरकारने अजून काय
नीट बद्दल सरकारने अजून काय करायला हवं होतं यावर उत्तर नाही.
पण त्यानं प्रश्न कसा सुटणार होता याबद्दल उत्तर नाही.>>>
काका तुम्ही वाचत नाहीत ना म्हणून असे उघडे पडता किंवा तोंडावर
काकांचे खासगीत बरेच उद्योग
काकांचे खासगीत बरेच उद्योग चालतात असं दिसतंय

गुप्तचर वाले त्यांना माहिती देतात खासगीत
बरेच लोकं खासगीत सांगतात
तरुण हातातून जाऊ लागल्यावर
तरुण हातातून जाऊ लागल्यावर निसटण्यार्या वाळूला घट्ट पकडण्याचे नेहेमीचे ष्डयंत्र आहे हे.
तरुण निसटणे वर्मी लागणारे आहे, कारण अर्थात सोपं आहे.
आणि यांना खाजगीत सांगितलं लिहा!!! हे लिहितात!!!! नका लिहू सांगितलं तर बंद करणारेत? नाही ना!! मग ओका की गरळ बिन्धास. माझ्या जावयाचा पुतण्या, आणि सासर्यांचे शेजारी प्रकार हल्ली बंद केलेत त्याबद्दल धन्यवाद. तसेच जे वाटतं ते ताठ मानेने लिहा, ओकायची ती गरळ ओका. हा मानभावी प्रकार कशाला हवाय?
चालू द्या तुमचं CATHARSIS.
चालू द्या तुमचं CATHARSIS.
कंसराज, मी येथे तुम्हाला
कंसराज, मी येथे तुम्हाला answerable नाही.>> काही हरकत नाही.
काका चिडले की इंग्रजीत फुटतात
काका चिडले की इंग्रजीत फुटतात
तेही मराठी संकेतस्थळावर
सगळेच काका असले कसे
हरकत नाही. चालू द्या तुमचं
हरकत नाही. चालू द्या तुमचं म्हणून गरळ ओकणे... आपलं कॅथार्सिस ... इथला बंद करणार असरील तर इंग्रजी करू की सहन! काय?
त्यांच्या नेहेमीच्या 'शिमगा' पोस्टच्या आधी मी 'गरळ' म्हटल्यावर आता त्यांना विंग्रजी कॅथार्सिस म्हणणं भाग आहे. समजुन घ्या!
काही लोक funding कुठून येते
काही लोक funding कुठून येते आहे हे विचारत आहेत त्यांच्या साठी
" काल एका विध्यार्थ्यांला विचारले तुम्हाला फ़ंडीग कुठून मिळते? तो म्हणाला मी रेल्वे ने आलो त्याचे 700 रुपये चीन ने पाठवले, स्टेशन वरून बस ने इथे आलो त्याचे 40 रुपये पाकिस्तानने दिले. जाण्यासाठी अमेरिका अन इराण कडे अर्ज केले आहेत. कारण आपल्या कडे पंतप्रधान यांना 6000 कोटी चे विमान वगैरे साठी पैसे खर्च झाल्याने त्यांच्या कडे मागणे मला योग्य वाटले नाही.
जेन झेड हुशार आहे याचे एक उदाहरण."
सुबोध खरे, प्लीज तुम्ही
सुबोध खरे, प्लीज तुम्ही साण्गता का तुम्हाला खेदही नाही वाटला की ह्या लेवल ला इतक्या प्रमाणात पेपर फुटी होतेय. आपल्या सरकार ने ह्यावर काम करावे असे वाटते का? जर सरकारने काम केले नाही असे वाटले तर सामान्य माणूस म्हणून आंदोलन करण्याचा /चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे का?
आंदोलक छुपे हेतू घेऊन आलेत असे गृहीत धरुयात.
मग तुम्ही आतल्या गटातून ही सिस्टीम कशी सुधारता आहात?
तुम्ही सरकारला आणि आमच्या सारख्या जनतेला हे कसे हाताळावे हे सांगताहत का? सांगाल का?
अरे! अंकल लोक हे खरं मानून
अरे! अंकल लोक हे खरं मानून पुढे पाठवतील. वरचा मजला त्यांना नाही.
हल्लीच एका चर्चेत अनेक सुशिक्षित लोकांना भारतात आता ३० - ४० -५० टक्के मुसलमान लोक आहेत हे खरंच वाटू लागल्याचं जाणवलं. पांढरपेशे, शिकले सवरलेले उच्च आर्थिक परिस्थितीतील लोक आहेत. पण अक्कल म्हणून नाही. कशावरही विश्वास ठेवतात.
Pages