Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयाम ला इथे सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद लिहायला आले आहे फक्त. आज दिवसभरात बऱ्याच ठिकाणी सरकारचे आणि पोलिसांचे narrative वाचायला मिळालं.काही ठिकाणी मी उत्तरं सुद्धा लिहिली. आता अजून उत्तरं लिहायची bandwidth राहिली नाहीये.
लेक आणि त्याच्या मित्राने त्यांचे अनुभव इन्स्टाग्रामवर लिहिले होते. ते जमल्यास शेअर करेन. ही मुलं काय विचार करतात आणि त्यांनी काल काय अनुभवलं हे कळेल.
बाकी काल त्या दोघांनी दाखवलं नसलं तरी ते घाबरले होते खूप. आता कदाचित परत जायचं नाही म्हणेल तो असं मला वाटलं होतं. पण १-२ दिवसात परत एकदा तरी हॉटेलवर जायच्या आधी जावून येईन म्हणाला आहे.

<<< लेक आणि त्याच्या मित्राने त्यांचे अनुभव इन्स्टाग्रामवर लिहिले होते. ते जमल्यास शेअर करेन.>>>

प्रतीक्षेत

ट्रस्ट मी ब्रो!
मी माझ्या एका जुन्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुप वर बघतो. जे कट्टर भाजप समर्थक आहे त्यांना देशाचा विकास आणि देशातील समस्या यांचे काही पडले नाहीये.
त्यांच्या डोक्यात एकच फिट आहे की भाजप नसल्यास हिंदू खतरे मे आहे.

मागच्या आठवड्यात विरार वसई नालासोपारा येथे पावसाने वाट लावली होती. लाईट गेली होती, पाणी कट झाले होते, त्यांचे इंटरनेट सुद्धा बंद होते आणि अशात प्रत्येकाच्या घरी दारी रस्त्यावर गुडघाभर पाणी होते.
त्याचे व्हिडिओ मी त्या ग्रुपवर शेअर केले तर एक जण म्हणाला की काँग्रेस सरकार असते तर वसई-नालासोपारा हे पाकिस्तानमध्ये असते. म्हणजे मुसलमानांची दादागिरी वाढली असती आणि तिथे हिंदू खतरे मे असते. आणि हे तो खरेच यावर विश्वास असल्यासारखा म्हणाला. त्यावर इतर भाजप समर्थकांचे लाईक आले. मुसलमानांच्या राज्यात राहण्यापेक्षा असे गटारात राहणे परवडले हा त्यांचा मुद्दा होता. खरेच हे लोक अशक्य आहेत.

आज सकाळी या आंदोलनानिमित्त सुद्धा म्हणत होते की पुन्हा काँग्रेस सरकार आले तर हिंदूंना रस्त्यावर सण सुद्धा साजरे करता येणार नाही.
त्यांना म्हटले अरे मुर्खांनो लहानपणापासून आपण काँग्रेसच्या राज्यात सगळे सण रस्त्यावरच साजरे करत लहानाचे मोठे झालो आहोत. त्यात तुम्ही सगळे लालबाग परळ दादरची मुले आहात जिथे गणपती नवरात्र हंडी दिवाळी सगळे रस्त्यावर उतरूनच साजरे केले आहेत. काय उगाच बोलायचे म्हणून काहीही बोलत आहात का.. अशक्य ब्रेनवॉश झाला आहे उच्चशिक्षित लोकांचा देखील तिथे सर्वसामान्यांचे काय बोलावे.

सांगायचा मुद्दा हा की इथे जे भाजप समर्थक असतील त्यांना हिंदू खत्रे मे येऊ नये म्हणून भाजप हवे आहे का हे चेक करा. आणि तसे असेल तर कृपया डोके आपटू नका. कारण त्यांना देशाच्या इतर समस्यांबद्दल काही म्हणजे काहीही पडले नसेल. ट्रस्ट मी ब्रो.. ट्रस्ट मी!

पण यामागचे कर्तेसवर्ते कोण आहेत, त्यांचा हिडन अजेंडा काय आहे याचा विचार करण्याचा कोणि प्रयत्न केलाय का? >> राज, तुम्ही अमेरिकेत असलात तर धावत भारतात या आणि खरे ना सोबत घेउन अजित दोवलला थोबडवा. त्याला हे माहित असायला नको का ?? की फक्त धुरंधर मालिकेत चमकोगिरी करणार ??

१००० वा प्रतिसाद

भाजपचा मतदार म्हणून हे खेदाने नमूद करावे लागते की, सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून अधिक संवेदनशील आणि जबाबदार भूमिका अपेक्षित होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या जबाबदारीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला गेला असता, तर आजची परिस्थिती कदाचित टाळता आली असती. लोकशाहीत वेळेवर घेतलेले निर्णय आणि उत्तरदायित्व यांमुळेच जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो.

आक्रोश

न्याय मागणाऱ्या हातांवर येथे, लाठ्यांचा मारा झाला
फुटली डोकी, सांडले रक्त, अश्रूधुरात श्वास कोंडला

खंत याची नाही की जुलमी सत्तेची बळजोरी राहणार
पण दुःख याचे की आपण अजूनही हे सहन करणार

आपलेच लोकं जेव्हा रक्ताळलेल्या लाठ्यांचे समर्थन करतात
तेव्हा काळजाला माझ्या, निखाऱ्यांचे चटके बसतात

दिपके, वांगचुकचे राजकारण, घटकाभर बाजूला ठेवू या,
पण रक्ताळलेली ती कोवळी पोरं, डोळे उघडून जरा पाहू या!

असा कसा विवेक तुमचा, या सत्तेच्या पायी गहाण पडला?
की स्वतःच्या लेकरांना मरताना पाहूनही, पाझर नाही फुटला?

हा आक्रोश आज रस्त्यावर आहे, उद्या तुमच्या घरापर्यंत येईल,
लक्षात ठेवा, ही शांतता एक दिवस, मोठा अनर्थ घडवून जाईल!

>>>>

मला काही वाटलं ते कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय, ओबडढोबड झालीये तेवढी समजून घ्या

छान लिहिले आहेत आशू चॅम्प

आजचे एक वायरल स्टेटस.

लड़ो!
लड़ नहीं सकते, तो बोलो!
बोल नहीं सकते, तो लिखो!
लिख नहीं सकते, तो साथ दो!
साथ नहीं दे सकते, तो उनका मनोबल मत तोड़ो जो लड़ रहे हैं,
क्योंकि वे तुम्हारे हिस्से की लड़ाई लड़ रहे हैं।

- खुदीराम बोस

वा!
दोनही कविता काळजाला भिडणाऱ्या आहेत.
आशुचँप आणि सर धन्यवाद!

Screenshot_20260722-065300.png

हे आहेत श्री सौरभ भारद्वाज, माजी आरोग्यमंत्री दिल्ली आणि ग्रेटर कैलाशचे माजी आमदार, आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते.

त्यांचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे (ट्विट अजूनही त्यांच्या टाईम लाईन /वॉल वर उपलब्ध आहे)
Screenshot_20260722-065224.png

आता आमच्यासारखे जे लोक आंदोलनाला समर्थन देतायत , पोरांसाठी जीव तुटतो, माबोकरांचे अनुभव पण कळतात, एकंदरीत जनमत आंदोलनाच्या बाजूने असताना हे प्रस्थापित विरोधी इकोसिस्टिम मधले नेतृत्व असे का वागत सुटले आहे ?

बरं सौरभ भारद्वाज सेकंड टियर नेतृत्व होते मानले तरी. आतिशी मार्लेना तर माजी मुख्यमंत्री होत्या आम आदमी पार्टी तर्फे त्यांचे म्हणणे खालीलप्रमाणे
Screenshot_20260722-070423.pngScreenshot_20260722-070447.png

पोरांच्या आंदोलनाला डिस्क्रेडिट करायची कामे आयटी सेल अन् भक्त करत होते त्यात नवल ते काय असणार ? पण इथे तर समर्थन देण्यावरून आपापसात भिडले आहेत !

मग आता आंदोलन नेमके कोणाच्या मालकीचे होते आणि कोण ते हिसकावून घेतोय ह्यावर चर्चा होऊन भक्त मंडळींचे क्लेम legitimate होणार का ?

सुबोध खरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणी थेट उत्तर देणार नाही.

माझा एक प्रश्न, मोर्चा संसदे कडे जातं असेल तर पोलीस नक्कीच बघ्याची भुमीका घेणार नाहीत. मोर्चा थांबवायचा म्हटलं तर लाठीमार होणारच. मोर्चेकरी पण पोलिसांना मारत असल्याच्या रील्स आहेत.

भाजप सरकारने सुरवातीला आंदोलनाकडे कानाडोळा केला त्याचेच परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. अत्ता चर्चा करणे हेच योग्य आहे.
असं वाटतंय भाजप सरकार राजीनामा काय घेणार नाही, पेपर फुटीमध्ये मंत्र्याचाच थेट हात असेल तर घायलाच पाहिजे. आत्महत्या केलेल्यांच्या वारसाना एक कोटी ची मागणीही योग्य नाही.
आहे ती सिस्टिम कशी फूल प्रूफ बनवता येईल याबाबत काही सूचना झुरूळाकडून घेऊन त्या आमलात आणायला पाहिजे.

अशक्य ब्रेनवॉश झाला आहे उच्चशिक्षित लोकांचा देखील तिथे सर्वसामान्यांचे काय बोलावे.>>+१००

मी गेल्या बारा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. पक्षाने दिलेले अनेक आदेश मी डोळे झाकून पाळत आलेलो आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यक्रम मी पक्षाच्या बॅनरखाली घेतले आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून मी पक्षासाठी स्वत्व अर्पण केलं आहे. आपण चौकशी करू शकता. एवढी वर्षे एकाही निवडणूकीसाठी तिकिट मिळण्याची मी अपेक्षा ठेवली नाही. सतत अविरतपणे मी पक्षासाठी झोकून दिलं.

माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे ह्यावर्षी बारावीला होता. नीट पेपर फुटल्यानंतर त्याने खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीत एमबीबीएस डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचा आदर्श सुदर्शनसमोर होता. नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटाएकटा राहू लागला. अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलं सांभाळून घेतलं. पण पेपरफुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला. आता पुण्यातील चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तो उपचार घेत आहे. ह्या सगळ्याचा फॅमिलीवर परिणाम झाला. कुटुंबाचंच मानसिक स्वास्थ्य ढासळलं.

सांगण्याचा मुद्दा हा, काल झालेल्या आंदोलनात सुदर्शनची बहीण देवयानी उपस्थित होती. तिच्या दोन मैत्रिणींसोबत वैद्यकीय प्रथमोपचारपेटी सोबत घेऊन ती आंदोलनस्थळी गेली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसला आहे. स्वतः देवयानीचा पूर्ण चेहरा सुजला आहे. अश्रूधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळे. तिला डाव्या डोळ्यात इन्फेक्शन होऊन दिसणं बंद झालं आहे. ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली. पण हे सुदर्शनला कळू दिलं नाही. त्याला नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलं आहे. त्याला सोशल मीडिया, मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवलं आहे.

माझ्या पक्षाने 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता. मी काय तोंड घेऊन माझ्या पुतण्यापुतणीसमोर जाऊ शकतो? भाजपचा शहरप्रमुख स्वतःला अभिमानाने म्हणवून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देत आहे. मन व्यथित झालं आहे.

माझ्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

ऍड. गोविंद बाळासाहेब घोरपडे
राहुरी, अहिल्यानगर.
face book पोस्ट वरून

ही अशीच अवस्था आज नाही तर उद्या भाजप च्या समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची होणार आहे कारण हे सरकार सामान्यांची कदर करत नाही.

नरेंद्र मोदी यांनी हिंमत दाखवली असती तर विरोधकांना आंदोलनाचे क्रेडिट घ्यायची संधी मिळाली नसती पण ते बसलेत मौन धारण करून बिळात जाऊन. अजूनही वेळ गेली नाही धर्मेंद्र चा बळी देऊन ही आग विझवू शकतात. ओरिसाचे खासदार विरोधात जातील अशी भीती असेल तर इडी ने शिवसेना एनसीपी आणि टीएमसी चे खासदार सपोर्ट मध्ये येतात तर याना पण कंट्रोल मध्ये ठेवू शकतात. आणि इतका ही समजदार पणा आणि रिस्क घ्यायची हिम्मत नसेल तर खुर्ची खाली करावी. अन्यथा शिक्षण अर्थव्यवस्था सामाजिक सलोखा निवडणूक यंत्रणा नष्ट केलाच आहे. देश जाळण्याचे पाप पण डोक्यावर घ्यावे. वर जाऊन रामाला काय तोंड दाखवणार?

धर्मेंद्र प्राधानांचा चा बळी देऊन पळपुटे पणा तर अजिबात करू नये. नाहीतर प्रधान जाऊन दुसरा कोणीतरी येईल. त्यापेक्षा चर्चा करून भविष्यात असले प्रकार कसे होणार नाहीत याची उपाययोजना करायला पाहिजे.

रात्रीचे चांदणे भाजप मध्ये एकही लायक व्यक्ती नाहीये असा वाटत असेल तर धर्मेंद्र ला काढून मोदी यांनी शिक्षण खाते स्वतःकडे घ्यावे आणि उपाययोजना करावी. कसले प्रेम आहे हे धर्मेंद्र चे?

वर जाऊन रामाला काय तोंड दाखवणार?...... .. रामाचे जाऊ दे. स्वतः ची स्वतःला लाज कशी वाटत नाही?
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्यावेळी प्रकर्षाने वाटले होते की त्यांना ह्यापासून रोखण्यात यावे. कारण शासनामध्ये संवेदनाहीन माणसे आहेत, त्यांच्यासाठी यांनी जीव गमावू नये. दुसऱ्या दिवशी लोकसत्तेचा अग्रलेखही अशाच प्रकारचा वाचला.

काल मुंबईमध्ये एका मोर्च्यात औरंगजेबाचा फोटो फिरवला जात होता म्हणून एक व्हिडिओ वायरल होत आहे.

मला खात्री होती की हे खोटे असणार.

आधी मला वाटलेले की कोणीतरी भाजप समर्थकच आंदोलन बदनाम करायला त्यात औरंगजेब फोटो घेऊन शिरला असेल आणि त्याच्या साथीदाराने व्हिडिओ काढला असेल.

पण सत्य त्याहून चमत्कारिक निघाले.

IMG_20260722_082256.jpg

मी तर म्हणतो अश्या बातम्या आता कानावर आल्या की त्यावर डोळे झाकून अविश्वास दाखवा आणि फोकस जाऊ देऊ नका.

प्रत्यक्ष पेपर फुटणे यासाठी काय चालू आहे याचा लेखाजोखा सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला

Series Of Major Reforms Implemented To Secure NEET Exam": NTA To Supreme Court.

https://www.ndtv.com/education/series-of-major-reforms-implemented-to-se... May 29, 2026 14:44 IST

Detailing the reforms introduced after the 2024 controversy, the NTA said recommendations related to question paper security, transportation, candidate verification, frisking, and digital monitoring have now been "institutionalised".
The National Testing Agency (NTA) today informed the Supreme Court that a series of major reforms have been implemented to strengthen the integrity, transparency, and security of the NEET examination process following controversies over alleged irregularities in the past two years.

In an affidavit filed before the top court, the NTA detailed the timeline related to the formation and functioning of the High-Powered Committee constituted pursuant to the Supreme Court's directions.

The agency also informed the court that among all major examinations conducted by it, only NEET-UG 2026 continued in Pen and Paper Test (PPT) mode, primarily in accordance with the scheme of the Ministry of Health and Family Welfare and the National Medical Commission (NMC).

All other major NTA examinations are already being conducted in Computer-Based Test (CBT) mode," the affidavit stated.
The agency further told the court that the High-Powered Committee has specifically recommended transitioning NEET-UG from PPT to CBT mode, along with the introduction of multi-session and multi-stage testing

According to the NTA, the transition will be implemented from the next examination cycle in consultation with the concerned ministry.

The affidavit was filed in the Supreme Court in connection with petitions concerning alleged irregularities in NEET examinations and examination reforms.

पण आंदोलन जीवींचे पोट कसे चालणार?

Confusion भाग दोन -

Screenshot_20260722-094523.pngScreenshot_20260722-094540.png

दत्तक पोरासोबत येणाऱ्या संपत्तीवर भांडल्यागत चालू आहे !

Recommendations of K Radhakrishnan Panel on India’s National Entrance Exams December 23rd, 2024

https://indianexpress.com/article/opinion/editorials/express-view-on-exa...

The article discusses the problems in India’s national entrance exams, including paper leaks and delays. It highlights K Radhakrishnan panel’s recommendations to improve transparency, security, and efficiency, such as reducing the NTA’s role, improving infrastructure, and using digital systems to ensure fairness for all candidates. Recommendations of K Radhakrishnan Panel on India’s National Entrance Exams.

What are the problems in India’s national entrance exams?
Frequent Paper Leaks: In the last five years, 41 paper leaks across 15 states affected 1.4 crore candidates.
Postponements and Cancellations: In 2024, NEET and UGC-NET faced delays due to compromised integrity.
Delays in Results: CUET results were delayed for the third consecutive year, causing challenges for students.
Overburdened NTA: The NTA conducted 244 exams since 2018, with candidates increasing from 67 lakh (2019-202
Technological Glitches: Poor user interfaces and inadequate support systems, like CUET’s glitches, highlighted infrastructure gaps.
For detailed information on National Testing Agency (NTA) read this article here

What recommendations did K Radhakrishnan’s panel propose?
Reducing NTA’s Role:
The panel suggested that the National Testing Agency (NTA) should only conduct entrance exams, not recruitment tests.
Since 2018, the NTA has conducted 244 exams, with the number of registered candidates doubling from 67 lakh (2019-2021) to 122 lakh (2022-2023).
Improving Exam Security:
The panel recommended a tiered collaboration between the Centre and states, similar to election management, for securing exams.
It proposed adopting a “digi-exam” system inspired by DigiYatra for biometric candidate verification.
Modernizing Exam Methods:
A shift to computer-adaptive testing was suggested, where questions match the ability of candidates.
Why is a digital overhaul necessary, and what challenges exist?
Need for Digital Infrastructure: The panel stressed creating robust security systems and accessible digital platforms. Examples like CUET glitches show that tech-driven reforms need careful planning.
Ensuring Equity: It emphasized making the systems user-friendly to avoid creating inequalities. Every candidate should be able to navigate the processes without stress or confusion.

राधाकृष्णन यांच्या समितीच्य या शिफारशींवर काय कार्यवाही केली आहे ते सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रावर टाकलेले वर दिलेल्या दुव्यात आहे.

जिज्ञासू लोकांनी वाचून पाहावे.

पण आंदोलन जीवींचे पोट कसे चालणार?>>>

धन्य आहे हा माणूस, याच्याइतका निर्लज्ज कोडगा आणि असंवेदनशील माणूस बघण्यात नाही
एक वाक्य काय निघत नाही याच्या श्रीमुखातून की इतकी अमानुष मारहाण केली ते योग्य नव्हते
नुसती पाठराखन करायची
मानसिक गुलामी नसा नसात भरली आहे

खरे ला कॉपी पेस्ट करून मराठी संकेतस्थळावर इंग्रजी मजकूर टाकू नये हे कोणी शिकवलेलं दिसत नाही

इतकी लोकांना माहिती देण्याची खाज असेल तर ते मराठीत भाषांतर कर आणि दे आणि खाजगीत जे लोक तुझी दाढी कुरवाळत येतात त्यांना पाठव

Pages