Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दाढीवाला सध्या एकमेव
दाढीवाला सध्या एकमेव ड्रुलवर्दी म्हणजे "रणविर सिन्ग" उर्फ हमझा ! उफ्फ ! काय दिसलाय, काय वावरलाय.
आदित्य रॉय कपूर जेव्हा 200
आदित्य रॉय कपूर जेव्हा 200 डेज सोबर अभिनय करत असतो तेव्हा दाढीत हॅंडसम दिसतो. हमझा तर सध्या नॅशनल क्रश आहे.
काही हिरो दाढीत डॅशिंग आणि
काही हिरो दाढीत डॅशिंग आणि किलर दिसतात तर काही क्लीन शेव चिकने वाटतात.
बघणाऱ्यांना सुद्धा त्यांची स्वतःची चॉईस असते.
मला पर्सनली दाढी शोभणारे हिरो आवडतात. कारण ती पुरुषांनाच असते. तो पुरुषांचा दागिना आहे. त्यामुळे स्टबल दाढी का असेना पण असावी..
बाकी बरेचदा कळकट लूक कॅरेक्टरचे असते. ते यावे म्हणून कशीही दाढी ठेवली जाते. दाढीमुळे कळकट लूक येतो असे नसते.
काही हिरो दाढीत डॅशिंग आणि
Duplicate
अरे वा! काय भारी विषय काढला
अरे वा! काय भारी विषय काढला आहे.
हल्लीच्या हिरॉइन्स ओळखू येत नाहीत. आधीच्या हिरॉइन्स बोटावरून पण ओळखू यायच्या.
नुसती खळी दिसली तरी शर्मिला टागोर ओळखता यायची.
सांभाळा, चुकून शाखाला
सांभाळा, चुकून शाखाला शर्मिला टागोर सनजून बसाल!
(No subject)
आधीच्या हिरॉइन्स बोटावरून पण
आधीच्या हिरॉइन्स बोटावरून पण ओळखू यायच्या.
>>>>
आम्ही सुद्धा ऋतिक रोशनला बोटांवरून ओळखतो
हिरॉईनचा खळी आणि गडीमाणसाची
हिरॉईनची खळी आणि गडीमाणसाची खळी वेगवेगळ्या असतात. ओळखता येते. आता प्रॅक्टिस नाही राहिली नाही तर ओळखून दाखवलं असतं. खळीच नाही काही पण दिसलं तरी.
नख सुद्धा दिसलं तरी कळायचं.
नेपो किड्स च्या कपकेक साच्या
नेपो किड्स च्या कपकेक साच्या बद्दल सहमत. आलिया उजवी असल्याबाबत पण खूप अनुमोदन. शिवाय तिने सर्जरी केलेली नाही. गुणी नेपो किड आहे ती. दिसायला सामान्य आहे.
रणबीर कपूर, शाहीद क., ह्रिथिक वगैरे पण..
आम्ही टोस्टर पाहीला आणि
आम्ही टोस्टर पहाण्याचा प्रयत्न केला, आणि भंगार्/चाइल्डिश मुव्ही म्हणुन पाच मिनिटात बंद केला.
----------
काल इंडिअन स्वीटस & स्पाईसेस पाहीला. मनीषा कोयराला छान दिसलीये. काम मस्त आहे. तिची मुलगी झालेल्या अभिनेत्रीचे काम चांगले आहे. स्टोरी फालतू वाटली. फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स.
दाढी वाढवल्याने आपण चांगले
दाढी वाढवल्याने आपण चांगले दिसतो असा गैरसमज कोणी करून दिलेला आहे ते समजेल का?
>>
मुळात चेहरा लहान असेल तर दाढी वाढवून मोठा / लंबुळका भासवता येतो. चेहऱ्याला कट्स नसले तर ते दाढीला देता येतात.
म्हणून दाढी...
विराट कोहलीने.
विराट कोहलीने.
मस्त गप्पा.
मस्त गप्पा.
भूतबंगला बघेन आता, टिपी वाटतोय.
विराट कोहलीने. >> सही जवाब
विराट कोहलीने.
>>
सही जवाब
काही बायकांना पण असते दाढी.
काही बायकांना पण असते दाढी. बघितलंय.
दुसरा लीड आदित्य गौरव चांगले
दुसरा लीड आदित्य गौरव चांगले काम करतो. त्याला व्हाइट टायगर आणि आणखी कोणत्यातरी पिक्चर मधे पाहिला आहे. >> सुपरबॉईज ऑफ मालेगाव ह्या नितांत सुंदर सिनेमामधे आहे.
हो त्यातच! धन्यवाद असामी.
हो त्यातच! धन्यवाद असामी.
मटका किंग पाहिला
मटका किंग पाहिला
आवडला.
सई ताम्हणकर गृहिणीच्या भूमिकेत तितकी नाही आवडली.
कपडेपट आवडला.
भरत जाधव, जिमी लिव्हर यांच्या छोट्या भूमिका आवडल्या.
गिरीश कुलकर्णी तर ओळखू येत नाही.
सैराट टीम मधील दोन चार जण दिसले -
गल्ली चुकली, मटका किंग पाहिली म्हणा.
आलिया उडता पंजाब मधे पण
आलिया उडता पंजाब मधे पण चांगली वाटली होती.
मला तर ती फार आवडते. सध्याच्या हिरोइन्स मधे तिचे वेगळेपण उठून दिसते.
किती चांगले चांगले व वेगवेगळे रोल केले तिने.
चेहऱ्याला कट्स नसले तर ते
चेहऱ्याला कट्स नसले तर ते दाढीला देता येतात.>>> म्हणजे?
Thrash अगदी trash आहे. म्हणजे
Thrash अगदी trash आहे. म्हणजे पिसे काढायला खूप जास्त आहे मटेरियल
पण कैच्या कै टाकाऊ आहे. एखाद्याला शिक्षा म्हणून under paris आणि trash एका मागून एक बघायला लावायचे.
Sarah's Oil प्राईमवर आलाय.
Sarah's Oil प्राईमवर आलाय. अजुन २०-२५ मिनिटेच पाहुन झालाय. पण फार आवडला आहे.
काल कथा बघितला, प्राईमवर, सई
काल कथा बघितला, प्राईमवर, सई परांजपेचा. मस्त आहे, चाळ, सगळी मराठी पात्र आणि मराठी कलाकार. बाळ कर्वे, नसीर आणि देखणा फारुख शेख, जासवंदीचे फुल डोक्यात माळणारी दीप्ती नवल. अरुण जोगळेकर (कोणत्या भूमिकेत ते नाही कळले मला), विनी परांजपे आणि गौतम जोगळेकर असे सगळे एका घरातले लोक आहेत.
आलियाने सर्जरी केली नाही?
आलियाने सर्जरी केली नाही?
तीने नकीच लिक्वीड फिलर्स केले आहेत. डोळ्यावरची स्किन स्ट्रेटन ऑउट केली आहे त्यामुळे ते कमी सुजमार आअणि ड्रूपी दिसतात.
तिचा पहिला मूवी पहा आणि आता पहा.
ती नेने सुद्धा भयानक फिलर्स विचित्र वाटते.
या क्षेत्राततल्या लोकानी
या क्षेत्राततल्या लोकानी ब्युटी एन्हासनिग ट्रिटमेन्ट घेण्यात काहि गैर नाहि फक्त करायला गेलो एक आणी झाल भलतच अस काहिवेळेस होवुन मग एकदम विचित्र चेहरे होवुन जातात.
>>>>>फक्त करायला गेलो एक आणी
>>>>>फक्त करायला गेलो एक आणी झाल भलतच
होय बरेच असे व्हिक्टिम्स आहेत.
ती नेने सुद्धा भयानक फिलर्स
ती नेने सुद्धा भयानक फिलर्स विचित्र वाटते. - कोण ती श्रीराम नेनेची बायको का
भाग्यश्री अरुण जोगळेकर
भाग्यश्री अरुण जोगळेकर संध्याचे वडील झालेत कथा सिनेमात.
नेटफ्लिक्सवर Apex नावाचा
नेटफ्लिक्सवर Apex नावाचा survival-thriller बघितला. अ मे झिं ग आहे.
चार्लिझ थेरॉन इज मेन कॅरेक्टर! ती एक उत्तम रॉक क्लायंबर असते. पण नॉर्वेमध्ये एका टँडेम रॉक क्लायम्बिंगदरम्यानच्या अपघातात बॉयफ्रेंड टॉमीला गमावते.
तो गेल्यावर परत काही महिन्यांनी ती ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागात कयाकिंग साठी जाते. तिथे तिला बेन नावाचा धोकादायक आणि विकृत प्रवृत्तीचा माणूस भेटतो, तो तिचा जीवघेणा पाठलाग सुरू करतो Hunt or be hunted टाईप्स.
त्याच्यापासून वाचायला तिला जंगल, नदी आणि घळ्यांमधून (कॅनयन्स) पळत असताना बर्याच संकटांचा सामना करावा लागतो. शेवटी ती धैर्य, चातुर्य आणि mental strength च्या जोरावर बेनला हरवते आणि स्वतःचा जीव वाचवते.
पाठलाग जरा मधे बोर झाला मला आणि काही केल्या कोणालाच काही होत नाही टाईप वाटला. शेवटही थोडा अचाट वाटलाय पण चालून गेलंय तेवढं.
लोकेशन्स अफाट आहेत. भयंकर सुंदर दिसलेत काही काही सीन्स.
Pages