चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. एपेक्स पहावा की नाही अशा विचारात होतो. आता कदाचित बघेन. धन्यवाद अंजली.

कथा चांगला आहे. पण मला तो sad वाटतो. त्यापेक्षा चष्मेबद्दूर आवडता आहे.
कथा मध्य बरीच पुण्यातली लोकं extra म्हणून आहेत.

धन्यवाद दक्षिणा. कथामध्ये चाळीही पुण्यातल्या आहेत, म्हणून असेल. चष्मेबद्दूर बघितला नाहीये.
मौसम बघितला, संजीव कुमार, शर्मिला टागोरचे दोन रोल, आई आणि मुलगी. लहान सैफ अली खान पण आहे कुठल्या गर्दीतल्या सीनमध्ये. गाणी अप्रतिम. चित्रपट त्यावेळी असेल तसा, बाळबोध.

जिलेबी बघितला. मराठीत एव्हढी एक्शन बघून भारी वाटलं. बच्चन फिका पडला स्वप्नील जोशीपुढे.
काय खून पडतात फटाफट. सौरव आणि गौरव कसले सेम टू सेम दिसतात.

मौसम मी अलीकडेच परत बघितला. आधी केव्हातरी दूरदर्शन बघितला होता, प्लॉट लक्षात होता. प्राईमवर दिसला. संजीव कपूर गावी गेल्यावर का परत येत नाही आठवत नव्हतं, त्रिशूल सारखं कारण असेल असं वाटत होतं. आणि मला शेवटी शर्मिला संजीव कपूर कार थांबवतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव आठवले.
बाकी अभिनय, सीन्स आठवत नव्हते तिचा बाप ओम शिवपुरी आहे हे आठवत नव्हते. मग परत पूर्ण बघितला, इट वॉज वर्थ इट.
शर्मिलाचा अभिनय मस्त, संजीव कपूरचाही.

मौसमची गाणी खूप आवडतात.

अर्धवट आठवतोय, tv वर बघितलेला. चांगली स्टोरी होती. शेवट आवडलेला पण गाणी जास्त लक्षात आहेत.

काल Devil wears Prada २ पाहिला. छान आणि (fashion industry वर आधारीत असल्याने ) नेत्रसुखद पिक्चर आहे. साधी स्टोरी आहे पण लीड actors च्या अभिनयामुळे पिक्चर उत्तम जमून आला आहे. मेरिल स्ट्रिप चे काम नेहमीप्रमाणेच कमाल आहे. ज्या सहजतेने ती वावरते आणि टोमणे मारत राहते ते बघण्यासारखं आहे. Background score सुद्धा चांगला आहे. बऱ्याच दिवसांनी एक चांगला ड्रामा थिएटरला जाऊन बघितल्याचं समाधान मिळालं.

आता पहिलाही बघायला हवा परत रिकॅप करायला. अ‍ॅन हॅथवे आणि एमिली ब्लंट, दोघींची करीयर्स यातूनच लाँच झाली असावीत. त्यांचे त्याआधीचे गाजलेले रोल्स होते का लक्षात नाही.

पहिला मलाही पाहायचा आहे आता परत. Although, तो माहिती नसेल तर खूप नुकसान होणार नाही पण काही गोष्टींचे संदर्भ कळायला कदाचित अवघड जाईल.

अ‍ॅन हॅथवे आणि एमिली ब्लंट यात अजून जास्त छान वाटल्या. त्यांचे कपडे अगदी अचूक निवडले आहेत. अ‍ॅनच्या हसण्यात जुही चावला डोकावते अधूनमधून Wink

मला ही पहिला बघायचा आहे आधी. हा राहिल, पण शिवाजी इथे गुरुवार पर्यंतच दिसतोय त्यामुळे आधी तो जमला तर बघुन घेऊ. अर्थात हिंदीतच आहे, पण तुका म्हणे त्यातल्या त्यात..

मौसम आणि बाळबोध? बाळांनी पाळण्यात बालक पालक पाहिला होता का? - म्हणजे?
बाळबोध म्हणजे अगदीच predictable म्हणायचं होतं मला. संजीव कुमार तिला लग्नाचं वचन देऊन परत येणार नाही, तिची मुलगी त्याला अनपेक्षितरित्या सापडणार, मग हा तिचं भलं करणार वगैरे.

चष्मेबद्दूर बघितला मी. मला कथा जास्त आवडला. चष्मे मध्ये बराच वेळ काही घडतंच नाही. तिन्ही मित्र भकाभक सिगारेट ओढत असतात. मिस चमको प्रकरण पण खूप ताणलंय. शेवटी कुठूनसे काहीही आगापिच्छा नसलेले दोन खलनायक येतात आणि चित्रपट सगळे टिकमार्क पूर्ण करत संपतो (एकदाचा).

Biker - Netflix (तेलुगू - हिंदी डबड)
भारी पिक्चर आहे.
स्पोर्ट्स मूवी मध्ये असते ते ड्रामा इमोशन swag Passion सगळे आहे.

बाप कोच. मुलगा चॅम्पियन. बायको पोरासाठी डेंजर नको म्हणून रेस सोडतो. पण बापासाठी परत येतो आणि जिंकतो. असा टिपिकल प्लॉट आहे. तरी पण पिक्चर भारी आहे.

नो नॉनसेन्स स्क्रिप्ट. हिरो सुद्धा मस्त माचो आहे, वाटतो चॅम्पियन बाईकर. पण बेस्ट पार्ट म्हणजे बाईक रेसिंग एकदम जबरदस्त आणि ओरिजनल आहे. त्यामुळे हॉलिवूड तोडीचा स्पोर्ट्स मूवी वाटतो.

प्रोजेक्ट हेल मेरी पाहिला आज. थेटरमधेच बघायला हवा. मधे मधे संथ वाटतो तरी आवडला. २:४६ मिनिटांचा आहे, मला प्रिव्ह्यू वगैरे सहित साडेतीन तास बसल्यासारखे वाटले. मायकल बघू का हा करत हा पाहिला.

रायन गॉसलिंगचे काम मस्त झाले आहे. अभिनय हिरो सारखा न करता चुकत चुकत शिकणाऱ्या आत्मविश्वास कमी असलेल्या lone wolf म्हणू अशा प्रकारे केलेला आहे. कथेचा परिचय - हा एक मॉलिक्युलर बायालॉजिस्ट आहे, जो आता शाळेत शिकवतो कारण त्याला खऱ्या जगापासून, वास्तवापासून दूर जायचं असतं. याला जगात मायेचं असं कुणीही नाही पण हा मात्र हसरा- प्रेमळ शिक्षक आहे. याच्या संशोधनाचा पेपर वाचून ( जीव, मायक्रोब्स तयार व्हायला पाणी आवश्यक आहेच असं नाही) ह्याची निवड प्रोजेक्ट हेल मेरीसाठी होते.

पृथ्वीचा नाश- सूर्याचा नाश होत असल्याने जवळ आलेला असतो. अक्षरशः सूर्याला थंड करणारे जीव अवकाशातून आदळत असतात. पृथ्वीचे आयुष्य जेमतेम तीस वर्षे राहिलेले असते. त्यात ह्याची निवड ह्या मिशनसाठी होते, ज्यात आधी हे जीव शुक्रावर जाऊन reproduce होत असल्याचे आढळते. शुक्रच का निवडला मधे बुध होता तरी- ह्यावरही संशोधन होते. स्पेसशिप प्रकाशाच्या वेगाने तेरा वर्षांत(?) ह्याचा छडा लावण्यासाठी पाठवली जाते, ज्यात हा फक्त जिवंत राहतो. गंमत म्हणजे हा मुळात ॲस्ट्रॉनॉट नाही.

याच प्रवासात दुसरा असाच आपल्या ग्रहाला वाचवण्यासाठी व दुर्दैवाने एकटाच बचावलेला एलियन याला भेटतो. मग हे कसे गप्पा मारतात, कशी मैत्री करतात व आपापल्या ग्रहाला वाचवण्यासाठी लागणाऱ्या ह्या सूर्याला थंड करणाऱ्या Astrophase ला खाणारा predator bacteria, microbes अज्ञात ग्रहावर दोघे मिळून मासे पकडल्यासारखे फिश करून काढतात व ह्या सगळ्यात काय, काय विघ्नं येतात हे बघण्यासारखे आहे. मला ह्या make believe एड्रियन नावाच्या ग्रहावरचं वातावरण आपल्या ध्रुवीय प्रकाशासारखं (Aurora ) देखणं वाटलं.
Project-Hail-Mary-planet.jpg
#Amazon MGM studios

अंतराळातील दृष्यं खूप वेधक आहेत. रॉकी नावाचा एलियन ( कारण तो दगडावर दगडं ठेवल्यासारखा दिसतो, व खेकड्यासारखा चालतो) व ग्रेसची मैत्री होते तेव्हा तासनतास अवकाश आणि ह्यांचेच संवाद आणि trouble shooting प्रकारच्या गप्पा आहेत. सिनेमा खूप सखोल आहे, तरीही लिनिअर पटकथा आहे. संवाद रंजक आहेत. मूळ पुस्तकात ग्रेस अनेक वेळा अपयशी झालेला दाखवला आहे, त्यामानाने चित्रपटात अर्थात कमी वेळ तसे तपशील आहेत. एकदा बघण्यासारखा नक्की आहे. एंगेजिंग आहे. पार्श्वसंगीत खूप आवडलं. खूप नाटकी, अतिरंजित वाटला नाही. साधा सरळ आहे.

छान लिहीले आहेस अस्मिता. बराच चर्चेत आहे हा पिक्चर असे दिसते.

नेफिवर "ग्रीन बुक" पाहिला. त्याला ऑस्कर मिळाले तेव्हा खूप चर्चेत होता. ऑस्कर मुळे हा खूप गंभीर ग्रिम असेल असे मला वाटायचे. प्रत्यक्षात एकदम हलकाफुलका आहे. व्हिगो मॉर्टनसन ("टोनी") आणि माहर्शाला अली ("डॉ शर्ली") दोघांची कामे मस्त आहेत. पिक्चर खूप एंगेज करतो.

टोनी च्या रोल मधे नंतरच्या भागात मॅट ल ब्लांक ("जोई") अगदी फिट्ट बसला असता (आणि सुरूवातीचा टोनी हा सोप्रॅनो सिरीज किंवा मार्टिन स्कॉर्सेसीच्या पिक्चर्स मधला वाटतो). तो शर्लीबरोबर प्रवासाला निघाल्यावर त्याचे वागणे बोलणे पाहून आपण जोईच बघत आहोत असे वाटते. हा रोल कॉमिक असा लिहीलेला नाही पण काही भाग मजेदार असल्यामुळे तसे वाटते.

कथा १९६०ज मधली आहे आणि प्रत्यक्षातील व्यक्तीवर/घटनांवर आधारित आहे. न्यू यॉर्क मधे राहणार्‍या, आणि काळ्या लोकांबद्दल तिरस्कार असणार्‍या इटालियन अशिक्षित टोनीला काम नसल्याने एका डॉ शर्लीचा ड्रायव्हर/बटलर म्हणून त्याचे काम स्वीकारावे लागणे, प्रत्यक्षात शर्ली याच्यापेक्षा अत्यंत सुसंकृत, शिकलेला पियानो प्लेयर निघणे, डीप साउथ मधला जिम क्रो काळातील रेसिझम, सेग्रेगेशन, अनेक ठिकाणी याला सहज प्रवेश मिळणे पण शर्लीला न मिळणे, काही ठिकाणी एक इटालियन म्हणून यालाही तुच्छ लेखणे जाणे, हा पुरेसा गोरा नाही, तर तो पुरेसा काळा नाही असे चित्र निर्माण होणे - वगैरे भाग मस्त जमले आहे. टोनी सुरूवातीला जसा दाखवला आहे त्यामानाने त्याच्यात नंतर होणारा बदल अगदी अ‍ॅब्रप्ट वाटतो. आणि काही सीन ऑस्करकरता आवश्यक असलेले तत्कालीन चेकमार्क वाटतात. पण तेवढा भाग सोडला तर पिक्चर मस्त आहे.

बघा. रेको आहे माझ्याकडून.

ग्रीन बुक छान आहे सिनेमा.
मला त्यात डॉन शर्ली टोनीला बायकोला रोमँटिक पत्र लिहायला मदत करतो ते भाग खूप आवडतो.

दक्षिणा - डिज्ने वर आहे आमच्याकडे. भारतातही तसेच असेल कदाचित. Happy
ग्रीन बुक - आवडेल बहुतेक. पाहून बघते. Happy

Greenland १ व २ मला आवडले. Gerard Butler चे बहुतेक सिनेमे मला आवडतात. HBO Max and Amazon Prime वर आहेत. त्याच पठडीतला Elevation पण आवडला.

Pages