Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुचर्चित The Love Hypothesis
बहुचर्चित The Love Hypothesis पाहिला.
मी पुस्तक वाचलं नाहीये , त्यामुळे काहीच अपेक्षा नव्हत्या.
एक पीएचडी स्टुडंट ऑलिव आणि तिच्या युनिवर्सीटीतला एक खडूस डॉ. रीसर्च सायंटीस्ट डॉ एडम एकमेकांना date करतायत , असे चित्र अपघाताने उभ राहतं. दोघही आपापल्या फायद्यासाठी ही अफवा खरी करण्यासाठी fake dating चा मार्ग अवलंबायचं ठरवतात. आपण शेकडो चित्रपट अगोदरच पाहिले असल्याने शेवट काय होणार आपल्याला माहिती आहे.
या प्रवासात ऑलिवचा मित्र परिवार आहे. विजोड जोडी कशी काय एकत्र आली याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सुरुवातीला रूक्ष वाटणारा एडम हळूहळू खुलतो. खोट्या नात्याततला अवघडलेपणा हळूहळू कमी होतो.
काय आवडल --
).
Casting . एडम आणि ऑलिव , they both look awesome together.
ऑलिवची मैत्रीण Anh . आयुष्यात एडम मिळो न मिळो एक Anh जरूर असावी सोबत.
Tom Bateman चा एडम absolute loveable. (Behind her eyes मध्ये तो ok वाटला होता . ) त्याचा आवाज आणि British accent , just add X factor to everything.(The Duke from The Gentlemen is still at top rank on both factors
काही सीन्स आणि डायलॉग्ज खुदकन हसवणारे आहेत. जेव्हा जेव्हा माल्कम आणि एडम समोरासमोर येतात.
काही सीन्स आणि डायलॉग्ज एकदम oooowww करणारे आहेत.
काय खटकलं ---
ही movie ऐवजी सीरीज हवी होती. आणखी मजा आली असती. फारच गुंडाळल्यासारखी झालीए. सगळी कथा फारच उथळ वाटते. (थिल्लर नाही ,फार वरवरची)
जेरेमी-ऑलिव-आन चं relation , एडमचा अगोदरचा खडूसपणा आणि नंतर बदलणारा स्वभाव , दोघांची fake dating साठी कारणं , women in science वाला मुद्दा , शेवटचा टॉम आणि एडम चा सीन --ठोस पटत नाहीत. Establish होत नाही.
एकंदरीत , perfect weekend rom-com आहे. आणि Dr Carlson ने आता green flag men चे standards आणखी उंचावून ठेवलेत.
दामादचर्चित असता तर माहिती
दामादचर्चित असता तर माहिती असता.
गणेशोत्सवाचा सौजन्य सप्ताह
मंद इंटरनेट मुळे दोनदा पडली.
गणेशोत्सवाचा सौजन्य सप्ताह
गणेशोत्सवाचा सौजन्य सप्ताह संपला आता काही तरी चावट पाहून उथळपणाचे उट्टे काढावे म्हणून आवर्जून "लस्ट स्टोरीज" सुरू केले तर आपलेच उट्टे निघते. अतिशय कंटाळवाण्या, काहीच दम नसलेल्या कथा आहेत. शेवटची थोडी राहिली आहे अजून. पण एकंदरीत बंडल असल्याचा अंदाज आला.
एकही गोष्ट आवडली नाही, सेक्शुअलॅटीतही वैविध्य नाही. या आधी ते तरी दिसलेलं. बाज विनोदी म्हणावा तर विनोदही दर्जेदार नाही. पहिली मन लावून पाहिली, कुठे कुठे हसू आले. पण ते काही चांगले नव्हतेच. राधिका आपटेचे वजन वाढलेय बहुतेक, म्हणून मला ती आकर्षक वाटली एकदम. त्यात अभिषेक बॅनर्जी पण जिमला जाऊन जाऊन "मुश्तंडा सदृश" दिसला आहे, आधी किरकोळ होता. हे दोन बदल लक्षात आले. विजय वर्मा संपूर्ण वेळ कन्फ्युज दिसतो. कोंकणा सेनचा अभिनय आणि तिची व राधिकाची मैत्रीण म्हणून केमिस्ट्री आवडली. पण कथेत काहीच नाही. दोघींना सेक्स लाईफ नसतं म्हणून नवरा "स्वापायला" जातात असं काही आहे. ते करेनात का काही, पण काहीच हाती लागत नाही. नवऱ्यांना माहितीच नाही, मग त्यांना आकर्षित करायचे आहे. येथे आपलाच नवरा आकर्षित होत नाहीये, त्यात मैत्रिणीची "जबाबदारी" कशाला घ्यायची. याने काय साध्य होणार आहे!
दुसरी कथाही विशेष नाही. दोन जुळे भाऊ आणि एक नेल आर्टिस्ट. ड्रग डिलींग. ती दोघांशीही करत असते, भेदभाव नाही. ही पण मला आवडली नाही. बरं इंटीमेट सीन्स दाखवायचे आहेत तर एवढं हल्ली कुठेही पाहायला मिळते. लस्ट स्टोरीज मधे स्टोरीज तर नाहीतच, लस्टही ॲव्हरेज आहे. सरळ पॉर्नच पाहील एखादा. मी नाही.
तिसऱ्या गोष्टीत राधिका मदन आणि अली फजल आहेत. ही तर सगळ्यात कंटाळवाणी आहे. ते सेपरेट होत आहेत पण थोडा एकांत सापडला की एकमेकांवर तुटून पडतात. मंद लिफ्ट बंद पाडून तेथे करतात. ते झाले रे झाले की भांडणं उकरून काढतात. ही फार बोअर वाटली , लक्षच उडाले येथे. एंगेजिंग नाही, ओरिजनल नाही. काहीच आवडलं नाही मला.
येथे आपलाच नवरा आकर्षित होत
येथे आपलाच नवरा आकर्षित होत नाहीये, त्यात मैत्रिणीची "जबाबदारी" कशाला घ्यायची.
लस्ट स्टोरीज मधे स्टोरीज तर नाहीतच, लस्टही ॲव्हरेज आहे. >>>
उतारा म्हणून लस्ट स्टोरीज २ मधलं 'आज फिर तुम पे' गाणं बघ. फक्त नंतर डोळे आणि मेंदू धुण्यासाठी गंगाजल आणून ठेव घरात.
लिरिक्स आवडल्या म्हणून मी गाणं लावलं आणि याचं ओरिजनल ('दयावान'मधलं गाणं) बालगीत वाटायला लागलं मला.
अगदी! फारच बोर आहे लस्ट
अगदी! फारच बोर आहे लस्ट स्टोरीज.
मायबोलीवर भर गणेशोत्सवात असं काही लिहायला मिळेल हाच काय तो एक बारिक धक्का. 
मला सगळ्यात मजा कशात आली तर पहिल्या स्टोरीत कोंकना आणि राधिका केएलपीडी केएलपीडी करत असतात आणि त्याच दिवशी कविनची प्रवेशिका आली आणि मला ते मायबोलीवर लिहायला मिळालं.
फक्त नंतर डोळे आणि मेंदू
फक्त नंतर डोळे आणि मेंदू धुण्यासाठी गंगाजल आणून ठेव घरात.
तरीही हे सगळे विनोद साधारण होते फक्त आपल्याला टाईमिंग मुळे हसू येते त्यातला प्रकार.
>>>>
तेथेच मी हसले फक्त, केएलपीडीला.
अगदी! फारच बोर आहे लस्ट
अगदी! फारच बोर आहे लस्ट स्टोरीज.>> + १००
मायबोलीवर भर गणेशोत्सवात असं
मायबोलीवर भर गणेशोत्सवात असं काही लिहायला मिळेल हाच काय तो एक बारिक धक्का. Happy>>
कविनच्या शशकाने माझ्या प्रौढ
कविनच्या शशकाने माझ्या प्रौढ मनावर परिणाम झाला. बालमनाच्या उलट धक्का.
मलाही वाटलं होतं मेघदूत वर इरॉटिक शशक लिहावे पण तसे विचार डोक्यात आलेच नाहीत. हे अशे पिक्चर बघून तर शक्यच नाही. धड रोमान्स नाही, धड प्रणय नाही. सॅपिओसेक्शुॲलिटी म्हणतात तेही आढळलं नाही.
येथे आपलाच नवरा आकर्षित होत
येथे आपलाच नवरा आकर्षित होत नाहीये, त्यात मैत्रिणीची "जबाबदारी" कशाला घ्यायची >>>>
आकर्षित करायचा प्रयत्न म्हणजे काय? तर सेन्सॉर दाखवू देईल इतके अंगप्रदर्शन अचानक करत वातावरण तापवणे वगैरे करीना-सैफ-कुर्बान थिअरी?
Lust stories महा बोअर अनुभव.
Lust stories महा बोअर अनुभव.
Something hot / Lust ❌
कोमट पाणी / पचपच ✅ No pep
एकही लस्ट स्टोरी पाहिले नाही.
एकही लस्ट स्टोरी पाहिले नाही.
रोमँटिक कॉमेडी हवी तर काकांचा रोमान्स पहावा नाहीतर
जॉनी ची पापं. ( इथली अक्षरे काळीच आहेत).
राज, यात शेवटी एक वेटर आला
राज, यात शेवटी एक वेटर आला आणि कोंकनाकडे पाहात "बाहोंमे चले आ" टाईप काका- सदृश हातवारे करू लागला होता. तेव्हा "काका मला वाचवा" सुद्धा आठवले. अर्थात असे वागल्यामुळे त्याला काही "मिळालेलं" दिसलं नाही. उगाच नोलनसारखा संदिग्ध शेवट केला आहे त्याचा. म्हणजे झाले का नाही कळत नाही वर फुकाचे हातवारे. तुम्ही एटीजचे हातवारे करून कुणाला मोहात पाडायला बघत असाल तर तुम्हाला तर कुणी डोळाही मारणार नाही. काळाप्रमाणे राहावं.
फा, अंगप्रदर्शन नाही. विनाअंग सिड्यूस सारखं काहीतरी. या मध्यमवर्गीय- मध्यमवयीन कांदिवलीच्या बायका आहेत, ज्यांचे नवरे अंटार्क्टिकातल्या पोलर बेअर इतके थंड आहेत. यांची स्वप्नं कोरियन सेक्स लाईफची आहेत. त्यापायी हा द्राविडी प्राणायाम. एवढं लिहिण्यासारखे काहीच नाही, मला स्वैपाकाचा कंटाळा आला आहे म्हणून.
काका मला वाचवा >>
काका मला वाचवा >>
पोट सुटलेल्या काकाचा रोमान्स आवर्जून बघत जा. कपिल शर्मा फिका पडतो.
विनाअंग सिड्यूस >>>
विनाअंग सिड्यूस >>>
या मध्यमवर्गीय- मध्यमवयीन कांदिवलीच्या बायका आहेत, ज्यांचे नवरे अंटार्क्टिकातल्या पोलर बेअर इतके थंड आहेत. यांची स्वप्नं कोरियन सेक्स लाईफची आहेत >>>>
काका रोमान्स म्हंटल्यावर जे २-३ पिक्चर्स डोक्यात आले त्यात मकसद होताच. त्याचा तो चौरंगी टीशर्ट म्हणजे कॉस्च्युमवाल्याला एक चार रंगांचा शर्ट दे सांगून काय डिझाइन हवे तर तुम्हाला पाहिजे तसे रंग द्या सांगितले असावे. रंगांच्या मापाने तो टी शर्ट पॅण्टच्या रंगाशी एक चतुर्थांश मॅच होतो. पण पोटाच्या घेराच्या मापाने एक तृतीयांश मॅच होतो.
समोर काका नाचतोय म्हंटल्यावर श्रीदेवीला दहा गियर कमी करून नाचावे लागत आहे. खूप रनिंग बिटविन द विकेट्स चालू आहे पण एका बाजूला कोहली तर दुसर्या बाजूला इंझमाम असेल तर ते कसे होईल तसे वाटते.
लस्ट स्टोरी ३ ... एकदम बकवास!
मोदक अस्मिताला लस्ट स्टोरी ३ साठी ... एकदम बकवास!
पहिली गोष्ट बघितली. राधिका आपटे, कोंकना सेन, विजय वर्मा, अभिषेक बॅनर्जीची. झेपलीच नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर जोडप्यात सेक्शुअली काहीतरी नावीन्य हवं म्हणून कोंकना वाईफ स्वॅप करण्याबद्दल राधिकाला सुचवते. या दोघी मैत्रिणी असतात, एका ट्रीपला जायच्या बहाण्याने ती ठरवते की एकमेकींच्या नवर्याशी सलगी करायची आणि काम साधायचं. पण जेव्हा अॅक्चुअली राधिका आणि कोंकनाचा नवरा रुममधे सापडतात तेव्हा ती एकदम जेलस बि*** होऊन जाते आणि बहुतेक कळत नाही काय करायचं मग दारू पिऊन तिसर्यासोबतच हँगआउट करायला लागते.
दुसरी स्टोरी पण ठीक आहे.
नंतरच्या दोन महाबोर झाल्या. पळवतही नाही बघू शकले. टोटल स्किप!
हनुमान अंश सिनेमा एकदम आवडला. थिएटरमधे जाऊन पाहिला. नीम करोली बाबांबद्दल नाव सोडून काहीच माहित नव्हतं. कलाकारही सगळे नवे आहेत. त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी, चमत्कार वगैरे लॉजिकच्या फंदात न पडता एक सुरस कथा म्हणुन सिनेमा पाहिला आणि आवडला. सध्या ते पार्वती गाणं फार ट्रेंडींग झालंय. गाणी वेगळी आहेत, छान वाटली १-२ ऐकायला.
एकही लस्ट स्टोरी पाहिले नाही.
एकही लस्ट स्टोरी पाहिले नाही. >> +1
कशाला त्या वरण भात स्टोर्या बघायच्या
एक चार रंगांचा शर्ट दे सांगून
एक चार रंगांचा शर्ट दे सांगून काय डिझाइन हवे तर तुम्हाला पाहिजे तसे रंग द्या >>
समोर काका नाचतोय म्हंटल्यावर श्रीदेवीला दहा गियर कमी करून नाचावे लागत आहे. खूप रनिंग बिटविन द विकेट्स चालू आहे पण एका बाजूला कोहली तर दुसर्या बाजूला इंझमाम असेल तर ते कसे होईल तसे वाटते.>>>
टोटल सहमत. विशेषतः हे खालचे गाणे पाहिले तर एकदमच फरक जाणवतो.
https://www.youtube.com/watch?v=3jnYWqv6Lm0
मला लस्ट स्टोरीज ३ मधली दुसरी
मला लस्ट स्टोरीज ३ मधली दुसरी ( किरण राव) नेल आर्टिस्ट - ड्रग पेडलर आणि चौथी विशाल भारद्वाज - सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी स्टोरीज आवडल्या.
पहिली गंडली आहे. तिसरी कंटाळवाणी आहे.
स्त्रियांच्या अतृप्त कामेच्छा हा पहिल्या आणि चौथीचा विषय आहे. आधीच्या चित्रपटांतही होता ना हा?
चौथीत मुली boys किंवा men talk चं फिमेल व्हर्शन करताना दाखवल्यात. मी असं म्हणतोय कारण असे टॉक मुला - बाप्यांमध्येच दाखवतात आणि होतात असा सर्वसाधारण समज आहे.
चौथीतला शेवटचा ट्विस्ट आवडला.
पण ती पुस्तकं देवनागरीत का?
तसंच तोंडात कायम पानाचा वा तंबाखूचा तोबरा भरलेलं पात्र बॅन करायला हवं.
मी याबद्दल वेबसिरीज धाग्यावर लिहिलं होतं. ते इथे आणायचं राहिलं.
फा
फा
अंजली, हनिमून अंश आणि हनुमान अंश एकाच पोस्टीत आले.
हनुमान अंश बद्दल कुतूहल वाटवून घ्यायचा प्रयत्न केला होता पण माहिती नाही बघेन की नाही. नीम करोली बाबांवर वाचलं आहे स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकात. तो एकोणिसाव्या वर्षी घरदार सोडून जेव्हा भारतात आला होता, यांच्याच आश्रमात राहिला होता. ह्यांच्या विचारांनी प्रभावित झाला होता. रामदास यांच्या पुस्तकात आणि तुकड्यातुकड्यांत सुद्धा वाचलं आहे. ज्युलिया रॉबर्ट्सच्या मुलाखतीत वगैरे. पण मला फार खोलात माहिती नाही. ते कधी निसर्गदत्त महाराजांसारखे वाटतात तर कधी रमण महर्षींसारखे. तरीही समहाऊ मला त्यांची विशेष माहिती नाही. पिक्चर काही तरी वेगळाच निघायचा अशीही शंका आहे.
अंजली, हनिमून अंश आणि हनुमान
अंजली, हनिमून अंश आणि हनुमान अंश एकाच पोस्टीत आले> हो ना
डायवर्स रेंज ऑफ माबो अँड माबोकर्स
कोंकनाकडे पाहात "बाहोंमे चले
कोंकनाकडे पाहात "बाहोंमे चले आ" टाईप काका- सदृश हातवारे करू लागला होता. तेव्हा "काका मला वाचवा" सुद्धा आठवले >>>

सरळ पॉर्नच पाहील एखादा. मी
सरळ पॉर्नच पाहील एखादा. मी नाही. >> पहिले वाक्य वाचून अस्मिता इथे त्याचा रिव्ह्यू लिहिल का अशी शंका आली होती पण पुढच्या वाक्याने लस्ट स्टोरी ३ चाच अनुभव दिला
हलव्याचे स्वप्न दाखवून गाजर
फा You never disappoint !
फा
You never disappoint !
अस्मिता, हनुमान आणी हनीमून !
हे दोन वायले वायले कॉम्प्लीमेंट्स आहेत !
'बंदिवान मी ' च्या धर्तीवर अस्मिताने एखाद्या पॉर्न चा रिव्हू लिहायला घेतला तर, ता भितीनेच धडकी बसली !
विकु, मी होते ती. त्याची आणि
विकु, मी होते ती.
त्याची आणि माझी शैली सारखी वाटते कधीकधी. हातातलं काम टाकून आले हे लिहायला. 
जितेंद्रचा दिलदार बघतोय. असले
जितेंद्रचा दिलदार बघतोय. असले पिक्चर बघायला मजा येते.
सारीका सारखी दिसणारी हिरॉईन कोण आहे त्यात? बर्याच वेळेला दिसलीये. पण बहुतेक वेळा हिरोची बहीण किंवा लुटण्यासारखी वस्तू लुटताना दाखवलीये. यात जितेंद्र बरोबर टाका भिडलेला आहे. जितेंद्र ऑल इंडीया रेडीओ वरून प्यार का इजहार करतो. तेव्हां ती कॉलेजमधे मैत्रिणींसोबत असते. पिक्चरमधल्या कॉलेजच्या मुली या कुणाच्या तरी लफड्यात भलताच इंटरेस्ट घेत असतात आणि पलंगावर अस्स्ताव्यस्त पडून "कौन है वो बता बता" म्हणत टाईमपास करत असतात. असं दुसरीच्या प्रेमकहाणीत इंटरेस्ट घेत राहिल्या तर यांच्या पिक्चरमधे हिरो कुठून येणार?
हल्लीच्या मुली म्हणत म्हणत तेच आजही चालू आहे पडद्यावर. मुख्य हिरॉईनच्या मैत्रिणींचं वाईट वाटतं. बाकी राजेश खन्नाचं "गरमी है" पुन्हा एकदा बघून घेतलं.
सूर्यमालेत सूर्य जागेवर असतो, पृथ्वीच त्याच्या भोवती फिरते. भूमितीत शिकवल्या प्रमाणे केंद्राचा वेग हा परीघावरच्या क्ष बिंदूपेक्षा कमी असतो. अगदी तसं श्रीदेवी काकाला फेर्या मारतेय, काका जागीच गोल फिरून नृत्याचा आभास निर्माण करतो. दोघांचे हात मागे खेचून एकमेकांना शिवण्याच्या कार्यक्रमात श्रीदेवीचे हात काकाच्या ढेरीपर्यंत आले आहेत. काका फ्रोजन शोल्डर असल्याप्रमाणे हातचं राखून मागे वाकतोय.
खूप दिवस झाले,
खूप दिवस झाले,
फारेण्ड, श्रद्धा किंवा इतर बरेच जण पूर्वी जसे धमाल ते नर्मविनोदी परीक्षणं लिहीत तसे वाचून. येऊद्या.
सध्या एआयच्या फिल्म्स बघण्यात वेळ जातो. दुसर्या शतकात पोहोचला डिलिव्हरी बॉय, सोळाव्या शतकात पोहोचली मेक अप आर्टिस्ट इ.
बटवारा लिस्ट मधे होता, पण कधी
बटवारा लिस्ट मधे होता, पण कधी आला गेला कळलंच नाही.
काही जण आमच्यामुळे फ्लॉप झाला असा दावा करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=2AKWnhRVflw
Pages