Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टोस्टरची निर्माती पत्रलेखा
टोस्टरची निर्माती पत्रलेखा राजकुमार राव आहे. पैसा जास्त झाला असेल.
हल्ली असली निर्मळ लव्हस्टोरी
हल्ली असली निर्मळ लव्हस्टोरी जणू हरवलीच आहे. किंबहुना असे चित्रपट ठरवून बनवता येणे अशक्य आहे >>> +१
तरी बरे वाटले कोणीतरी भूत बंगला बघितलेले आहे इथे >>> बस काय ऋ? केवढी चर्चा केली आपण परवा!
अस्मिता : सगळ्याच पोस्ट्स
'पुरणमासी के दिन व्हॅलेंटाईन'चे लॉजिक 'बाये हाथ की उंगली की नस दिल तक जाती हैं'च्या तोडीचं आहे >>> अगदी अगदी!
तोपर्यंत लोक फक्त शास्त्र असतं ते असं म्हणून अंगठ्या घालत होते
खरं सायन्स केवळ काजोलला माहिती होतं 
रमड
रमड
वर मी एका पोस्टीत राजकुमार रावचा "लूप लपेटा" लिहिलेय, ते "भूल चूक माफ" होते. तो तापसी पन्नूचा वेगळा पिक्चर आहे. त्यातही टाईम लूप आहे.
मी दोन्ही पाहिले नाहीत.
मी दोन्ही पाहिले नाहीत. त्यामुळे तुझी भूल चूक माफ केली मी
<<< बस काय ऋ? केवढी चर्चा
<<< बस काय ऋ? केवढी चर्चा केली आपण परवा! Proud >> हो पण ती दोघातच केलेली chat होती. त्यात मजा नाही. आपण एखादा नवीन पिक्चर बघून आलो आहोत हे चार चौघांनी मिळून न बघितलेल्या चारचौघांसमोर बोलून त्यांची उत्सुकता वाढवण्यात मजा आहे
@ भूल चूक माफ.. हाच तर तो भूत बंगलामधील वामी गाबिकाचा चित्रपट जो टोस्टर मधील राजकुमार राव सोबत होता म्हणून मी वर उल्लेख केला होता. पण नाव आठवत नव्हते. तुमच्या कशी लक्षात राहतात अशा येतजात राहणाऱ्या आणि येताजाता बघायच्या चित्रपटांची नावे..
टोस्टर बघितला.
टोस्टर बघितला.
ओढून ताणून विनोद.
वध २ बघितला.
आता वध १ आधीच पाहिल्यामुळे, वध २ कोणी केला ते आधीच ओळखले, पण ते लपवले कसे त्यासाठी शेवटपर्यंत पहावा लागला.
दो दिवाने श(स)हर में... शेवटपर्यंत पाहू शकलो नाही.
मृच्छकटिकम् मधला शकार असाच स, श, ष चा चुकीचा उच्चार करायचा बहुतेक.
आता जाऊ म्हटलं तर "का? माबोवर
आता जाऊ म्हटलं तर "का? माबोवर लोकांनी सांगितलं असेल!" असे टोमणे ऐकावे लागतील. >>> हे भारीये!
माझा मुलगा मायबोलीला 'मराठी रेडिट' म्हणतो.
किती मस्त लिहिता सगळे जण. मला
किती मस्त लिहिता सगळे जण. मला तर बाबा सगळे पिक्चर आवडतात. ते एव्हढे मेहनतीने बनवतात ते आपल्यासाठीच. जेवणाला आणि पिक्चरला नावे ठेवू नयेत.
अरे वा. खाली पोहोचताच शाहरूख खान चा विषय आला. कसला भारी आहे तो. त्याला पाहिलं कि दिलीपकुमारची आठवण येते.
रंगपंचमीला नया दौरच्या गाण्यातल्या पानी लेने के बहाने आजा या कडव्यात तो कळशी वर फेकून झेलत त्याची प्रॅक्टिस करायला गेलो तर ती डोक्यात पडली होती. पडद्यावर किती सहज केलंय असं वाटतं.
का? माबोवर लोकांनी सांगितलं
का? माबोवर लोकांनी सांगितलं असेल! >>>> आमच्याकडे लेकीचे टोमणे असायचे. पण पुण्यातल्या गटगमध्ये ते पेंटिंग आणि मुख्य म्हणजे चिंचेच्या गोळ्या मिळाल्यावर माबोकरांविषयी मत बदलले.
आता जाऊ म्हटलं तर "का? माबोवर
आता जाऊ म्हटलं तर "का? माबोवर लोकांनी सांगितलं असेल!" असे टोमणे ऐकावे लागतील. >>>>>>>>> हे माबो टोमणे मी रोजच ऐकतो. आणि हे मला आजन्म ऐकावे लागणार आहे. याची सवय करून घेतली आहे.
अरे वा. खाली पोहोचताच शाहरूख
अरे वा. खाली पोहोचताच शाहरूख खान चा विषय आला. कसला भारी आहे तो. त्याला पाहिलं कि दिलीपकुमारची आठवण येते.
>>>>>>
अरे वाह शाहरुखचे चाहते तुमच्या पिढीत सुद्धा आहेत हे बघून भारी वाटले.
मायबोलीवर सर्वाधिक चर्चा होणारी सेलिब्रिटी तोच आहे. तरी हा धागा चित्रपटांचाच आहे. तो क्रिकेट, राजकारण, समाजकारण, चालू घडामोडी असा ईत्र तित्र सर्वत्र पसरला आहे
मला ड्रीम गर्ल २ आणि थामा
मला ड्रीम गर्ल २ आणि थामा पासून आयुष्मानची सुद्धा काळजी वाटायला लागली आहे. हे दोघे माझे "बॉयज नेक्स्ट डोअर करण- अर्जुन" होते>>> डिट्टो
राजकुमार & आयुषमान ह्यांचे नाव पाहून फिल्म बघायला जायचे निर्धोक. पण आता तसे राहिले नाही..
टोस्टर कलाकारांमुळे मी ही बघणार होते.. रद्द करते आता
आशु आज्जीबात नको बघू अत्यंत
आशु आज्जीबात नको बघू अत्यंत वाईट आहे.
मुलांनो, तुम्ही इन्सानियत
मुलांनो, तुम्ही इन्सानियत पाहिला का?
मी बघतोय. एक नंबर पिक्चर आहे. स्टार्टिगलाच फाईट आहे. ते पण अमिताभ बच्चनची. व्हीलन देश विकत असतो. त्याला गर्व झालेला असतो. तो म्हणतो कि कानून के हात मुझतक पोहोचू शकत नाही. इतक्यात. अमिताभ बच्चन खालून हवेत पलटी मारून उडत येतो आणि त्याच्या हाताला हात टच करतो. कसला भारी सीन.
तो सगळ्यांना हाणून व्हिलनला त्याच्या आई वडलांची नावं सांगतो. त्यांना व्हिलनने मारलं. ते का मारलं हे तो विचारत असतो.
बुनियाद चार हिरो अमिताभ बच्चनचा बाप असतो. अमिताभ बाळ असतो. मांडीवर घेतलेलं असतं. बारसं चालू असतं मोठा मंडप बडे बडे पाहुणे. आपलं लग्न सुद्धा फिकं पडेल. हा व्हिलन तिथं उभा असतो. इतक्यात डाकू येतात. बाळ हिसकावून पळू लागतात. व्हिलन अडवण्याचं नाटक करतो आणि डाकूला डोळा मारतो. त्याचाच हात असतो.
बुनियाद चा हिरो पुढं येतो तर डाकू तलवारीचा वार करतो. तो हातात धरून बुनियाद सगळ्यांची धुलाई करतो.
इतक्यात बाळ उडून रस्त्यावर पडतं. पण ते लगेच उठून पळून जात. डाकूंच्या तावडीतून सुटत.
इथपर्यंत बघितला आहे. बुनियातने बाळाचे नाव अमर ठेवले होते. म्हणून अमिताभ इन्स्पेक्टर अमर.
तो हरवला होता तर मोठा कसा झालाय याची उत्सुकता आहे. सनी देओल पण येणार आहे पुढे.
मुलांनो, तुम्ही इन्सानियत
मुलांनो, तुम्ही इन्सानियत पाहिला का? >> हो, फुल टाईमपास आहे.
नूतनने "मुझे दिख रहा है के मैं तेरी लाश के सामने ढोल बजा बजा कर नाच रही हूं" असे म्हटल्यावर अनुपम खेर तत्परतेने नूतनच्या गळ्यात ढोल बांधून तिला जबरदस्तीने ढोल वाजवत नाचायला लावतो, मगरीने खाल्ले तरच प्रेम चोप्रा मरु शकत असतो, याईयाईयाईयाईया राक्षस (हे प्रकरण याची देही याची डोळा अनुभवण्याची चीज आहे) अशा गंमती जंमतींनी भरलेला आहे सिनेमा.
येऊ द्या तुमचा रिव्ह्यू.
मदन हुंकारेंची पण पिसं काढण्याची एक वेगळी स्टाईल डेव्हलप होण्याचा वाव दिसतोय.
टोस्टर महाबकवास आहे खरंच!
टोस्टर महाबकवास आहे खरंच!
जितेंद्र जोशी सारखा टॅलेंटेड अॅक्टर असल्या माठ रोल मधे दिसला की डोकंच फिरतं. तसं काहीच आवडण्यासारखं नाहीये यात.
सिनेमा राजकुमार राव च्या बायकोने बनवलाय बहुतेक!
इन्सानियत के दुष्मन असा पण
इन्सानियत के दुष्मन असा पण चित्रपट आहे असे आठवत होते म्हणुन गुगल केले तर दिसले -
आधी इन्सानियत के दुष्मन होते (१९८७)
मग इन्सानियत के देवता आले (१९९३)
तेव्हा कुठे इन्सानियत आली (१९९४)
हॉरर बघणार होते
हॉरर बघणार होते
पण कशाला उगाच म्हणून १९९७ चा विरासत बघून आले
गाणी ऐकलेली होती पूर्वी
पण picture आता पाहिला
आधी इन्सानियत के दुष्मन होते
आधी इन्सानियत के दुष्मन होते (१९८७)

मग इन्सानियत के देवता आले (१९९३)
तेव्हा कुठे इन्सानियत आली (१९९४)
<<<<<<
वेगळा बाफ काढा इंसानियत साठी!
याईयाईयाईयाईया राक्षस
<<<<< फक्त एवढ्यामुळे आज माबोकरांकडून डझनावारी व्ह्यूज वाढले असतील इंसानियत साठी.
राजकुमार & आयुषमान ह्यांचे
राजकुमार & आयुषमान ह्यांचे नाव पाहून फिल्म बघायला जायचे निर्धोक. पण आता तसे राहिले नाही.. >> अनुमोदन आशु२९.
इतक्यात बाळ उडून रस्त्यावर पडतं. पण ते लगेच उठून पळून जात. >>
पाहिलेला आहे इन्सानियत पण
आधी इन्सानियत के दुष्मन होते (१९८७)
मग इन्सानियत के देवता आले (१९९३)
तेव्हा कुठे इन्सानियत आली (१९९४) >>>> मानव
मानव
मानव

इन्सानियत के दुष्मन शोधायला हवा
आधी इन्सानियत के दुष्मन होते
आधी इन्सानियत के दुष्मन होते (१९८७)
मग इन्सानियत के देवता आले (१९९३)
तेव्हा कुठे इन्सानियत आली (१९९४) >>>> मानव
पायस
मानव
मानव
ओन्ली इंसानियात (१९५५)
ओन्ली इंसानियात (१९५५) कुणाला आठवला कसा नाही. ह्यात झिप्पी नावाच्या माकडाची भूमिका फार गाजलेली.
हो पायसजी, चांगला पिक्चर
हो पायसजी, चांगला पिक्चर आहे. तो राक्षस आवडला.
मानव जी, पीसं काढणं म्हणजे काय हे आधी समजलंच नाही. आता लक्षात आलं.
पिक्चर मनापासून बघतोय. समोर आलेलं जेवण आणि पिक्चर यांना कधीच नावं ठेवू नयेत, पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणून संसार करावा या तत्वावर आयुष्य काढल्याने सुखी समाधानी. आहे. देव आनंद, राज कपूरच्या पिक्चरवर पोसलेली पिढी आमची. त्याच वेळी राजकुमार, राजेश खन्नाही आले होते. नंतर अमिताभ बच्चन आला तेव्हां हा कोण नवीन म्हणून अढीच होती. पण याने आम्हाला आमच्या जुन्या दैवतांमधे त्याचा समावेश करायला भाग पाडलं.
मानव
मानव
मानव
मानव
Life is Beautiful भारतात
Life is Beautiful भारतात अमेझॉन प्राईमवर अव्हेलेबल आहे. पाहिला नसेल तर चुकवू नका.
Pages