चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पाहिला अरेरे!!! किती भन्गार असावी स्टोरी..राजकुमार राव कडुन ही अपेक्षा नव्हती ,अगदीच बी ग्रेड मुव्ही.

अर्चना पुरनसिंगला तर ओळखलेच नाही. टोस्टरचा चित्रपटातला वापर हे प्रकरण अगदीच लेचेपेचे. त्यावर कथा म्हणजे पायाच नसलेली इमारत.

मीही राजकुमार राव नाव बघुन पाहिला.

माझ्यासाठी राजकुमार राव हा काही शाहरुख नाही जे त्याचे नाव बघून पिक्चर बघावा पण तरी या आधी काही वेळा फसलो आहे आणि अनुभवातून शहाणा झालो आहे. त्याने या आधी देखील अशा पाट्या टाकल्या आहेत. म्हणून टोस्टर पंधरा मिनिटे बघून वेळीच थांबलो. अर्चना पुरनसिंग दिसली नाही त्या पंधरा मिनिटात. किंवा दिसलीही असेल, पण वर कोणीतरी म्हटले तसे शायद मै ही पहचान नही सका झाले असेल. फराह खानचा आश्रम सीन मात्र पाहिला. पुढे अनु मलिक सुद्धा दिसायचा या भीतीने तेव्हाच थांबलो.

बाई दवे,
बघायला सुरुवात करायच्या आधी AI मित्राकडून खालची माहिती काढली होती.

<<<< राजकुमार राव अभिनीत 'टोस्टर' (२०२६) हा नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला एक सामान्य कॉमेडी-थ्रिलर आहे, ज्याचे वर्णन अनेकदा चांगला अभिनय असलेला आणि वेळ घालवण्याचा एक ठीकठाक मार्ग म्हणून केले जाते. ट्रेलरमध्ये दिसतो तितका हा चित्रपट विनोदी नाही, पण कलाकारांसाठी तो बघू शकता. >>>>

पण टोस्टर चित्रपटामुळे विनोदाचा खालावलेला दर्जा आणि ओरिजनल कल्पनांचा अभाव जाणवला. त्या पार्श्वभूमीवर भूतबंगला आणखी बरा वाटला.

राव काम चांगलंच करतो, सिनेमा कितीही बंडल असला तरी. पण यात त्याला नवीन काहीच करायला वाव नाही. ज्या प्रकारचा त्याचा रोल आहे ते करण्यात त्याचा हातखंडा आहे. पण सिनेमाच इतका फुटका आहे त्याला तो किती सावरणार? अर्चना पुरणसिंगचे तर भयंकर विचित्र पात्र आहे. पाहवत नव्हते तिच्याकडे.

टोस्टर मीही पाहिला थोडा वेळ, भूत- भूत खेळत होते तोवर. पण तेवढ्यातही ब्रेड जळाली. आमच्या घरात एक पिलर आहे, तो बरोबर टिव्ही आणि डायनिंग टेबलच्या मधे येतो आणि टिव्ही अर्धाच दिसतो. मी पिठलं -भाकरी खात होते, त्यामुळे मला अर्धवट दिसले आणि उठून पहाण्याइतकी पर्वा वाटली नाही. कुणाला तरी भूत होऊन घाबरवत होता हे कळाले. मला राजकुमार राव आवडायचा पण "लूप लपेटा" पासून त्याचा कंटाळा आला, आता तर अजून जास्त आला. त्याचा कार्तिक आर्यन होऊ नये म्हणून नवस बोलावा लागणार आहे. ह्यासोबतच मला ड्रीम गर्ल २ आणि थामा पासून आयुष्मानची सुद्धा काळजी वाटायला लागली आहे. हे दोघे माझे "बॉयज नेक्स्ट डोअर करण- अर्जुन" होते. दृष्ट लागली दुसरं काय! ह्या सगळ्याला कंटाळून "मटका किंग" सुरू केली, संपत आली.

भूत बंगाल आवडला. खरे म्हणजे सुरुवातीच्या कॉमेडी पेक्षा नंतर केलेला horror पार्ट जास्ती आवडला. कॉमेडी पार्ट मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल धमाल आणतात. वामिका गब्बी चक्क इरिटेटिंग वाटली नाही आणि तिचा ट्विस्ट आवडला.

टोस्टर बघतच नाही मग. उगीच कशाला वेळ वाया घालवू Lol

त्यापेक्षा ओरिजनल शाहरुखचा दिल तो पागल है परत बघतो.

दिल तो पागल है हल्लीच बघितला - केवळ गाण्यांसाठी. नाहीतर पडद्यावर जो आचरटपणा सुरु असतो तो पाहात राहणे स्वतःलाच शिक्षा करण्यासारखे आहे. आणि मी तेव्हा थेटरात पाहिलेला…

असं कसं पुरणमाशी (पुरणात माशी पडल्यासारखे वाटते) के दिन व्हॅलेंटाईन डे आला की आपण रॅंडम ड्रेसिंग रूममध्ये कपडे ट्राय करत असताना बाहेरून जो छपरी शिट्टी वाजवत जाईल तोच आपल्या दिलाचा दिलबर असतो. एवढं अचाट तर कुडमुड्या ज्योतिषी पण सांगणार नाही जेवढं चोप्रा सांगतात.

त्यापेक्षा ओरिजनल शाहरुखचा दिल तो पागल है परत बघतो.
>>>>

मी शाहरुखचे काही नव्वदीतील पिक्चर साधारण दर तीनचार वर्षांनी एकदा बघतो त्यापैकी हा एक आहे. स्पेशली हा तर स्लो पॉइजन आहे. म्हणजे याला त्याच्या इतर चित्रपटांसारखी रिपीट व्हॅल्यू तर आहेच. पण हा हळूहळू जास्त आवडू लागतो. इतका साधासरळ चित्रपट का आवडतो हे कोडे कधीच उलगडत नाही. आणि खरी मजा यातच आहे Happy
हल्ली असली निर्मळ लव्हस्टोरी जणू हरवलीच आहे. किंबहुना असे चित्रपट ठरवून बनवता येणे अशक्य आहे. काहीतरी जादूनेच घडतात.

'पुरणमासी के दिन व्हॅलेंटाईन'चे लॉजिक 'बाये हाथ की उंगली की नस दिल तक जाती हैं'च्या तोडीचं आहे. आम्हाला उगाचच वाटायचं की नसा-बिसा नर्व्हस सिस्टीमचा भाग आहेत म्हणून.

त्यातून ती माधुरी शाहरुखची मोठी वहिनी वाटते.

टेक्निकली सगळ्याच नसा ( रक्तवाहिन्या) दिलापर्यंत जातात कारण दिल पम्पून रक्तपुरवठा करतं. मेंदू पासून मात्र ही दिलं दूर आहेत. Lol

दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या मध्ये भिंत बिंत काही असायला हवे असे मला वाटायचे. पण इथे हा गिटार खाजवतोय आणि ती
समोर सुफि लोकांसारखे हातवारे करत बसलीय , आपापल्या क्लासात किंवा जागेत असे मी समजतेय. आणि मध्ये फक्त लांबलचक हॉल… इतकी वर्षे ह्या दोन बिल्डिंगितल्या लोकांनी एकमेकांकडे पाहणे कसे टाळले असेल हाच विचार मी तो सिन पाहताना करत होते.

<<< खरे म्हणजे सुरुवातीच्या कॉमेडी पेक्षा नंतर केलेला horror पार्ट जास्ती आवडला.
>>>
प्रेडेक्टबल होते पण ते फार.
त्यापेक्षा मला सुरुवातीचा अंधारातील जंगलाचा सीन आवडला. तेव्हाची प्रकाशयोजना छान होती. पुरेसे स्पष्ट दिसत होते तरीही रिअल अंधार वाटत होता.
उत्तरार्धात देखील अध्येमध्ये कॉमेडी वाढवायला हवी होती. स्पेशली मिथिला पालकरच्या लग्नावेळी तिची सासुरवाडी जमली असताना स्कोप होता हॉरर कॉमेडीचा.

<<<< वामिका गब्बी चक्क इरिटेटिंग वाटली नाही आणि तिचा ट्विस्ट आवडला.
>>>>
मी तिला फक्त राजकुमार रावच्याच एका चित्रपटात पाहिले होते. त्यात इरीटेटींग वगैरे वाटली नव्हती.
पण तिच्याच ट्विस्ट वर आम्ही घरी पोहोचेपर्यंत तिचे सगळे सीन आठवून आठवून भांडत होतो. स्पॉयलरमुळे तूर्तास बोलायला नको. पण तिच्या एका संवादात याचा अंदाज आलेलाच. भांडत होतो ते तिचा चित्रपटातील कुठला कुठला सीन त्या ट्विस्टला लागू होता त्यावरून..

तरी बरे वाटले कोणीतरी भूत बंगला बघितलेले आहे इथे. माझ्या कुठल्याच ओळखीच्याने अजून पाहिला नाही. त्यामुळे बोलायचे कोणाशी प्रश्न पडतो. ओटीटी वर लोकांनी बघितल्यावर आपण बघून इतका जुना झाला असतो की मूड गेलेला असतो Proud

नसा म्हणजे nerves ना? रक्तवाहिन्या वेगळ्या ना? जाऊ दे झोप येतेय.

इतकी वर्षे ह्या दोन बिल्डिंगितल्या लोकांनी एकमेकांकडे पाहणे कसे टाळले असेल
>>>>>>>>>>

हे आमच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडले आहे.
पोस्ट लिहायला घेतली होती पण जाणवले हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे Happy

सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छती सारखं कुठलंही रक्त इव्हेंच्युअली हृद्याला जाऊन मिळणार ना!
लिही आता Happy . तुझा लेख खूप दिवसांत नाही आला. Proud
भूत बंगलाला आम्ही काल जाणार होतो पण मीच फार उत्साह दाखवला नाही. आता जाऊ म्हटलं तर "का? माबोवर लोकांनी सांगितलं असेल!" असे टोमणे ऐकावे लागतील.

>>> नसा म्हणजे nerves ना? रक्तवाहिन्या वेगळ्या ना?
नस हे (रक्त किंवा इतर) कोणत्याही नलिकेला म्हणत असावेत असं वाटतं. (पटकन 'नसबंदी' शब्दच आठवला, त्यावरून).
चेतातंतू/मज्जातंतू म्हणजे nerves बहुधा.

हिंदी आणि मराठीत निराळ्या अर्थांनी हे शब्द वापरले जात असतील तर काही कल्पना नाही.

(काळीज/कलेजा म्हणजे हृदय नसून लिव्हर हे कळल्यावर जो धक्का बसला होता, त्यानंतर मी हे काळजाला लावून घ्यायचं सोडलंय. Proud )

टोस्टर बकवास होता.
काहीच्या काही ओढाताण करून बनवलाय असे वाटले.

सान्याचे
कटहल आणि paglait आवडलेले.
इथे फार वाव नव्हता.

जुने शाहरुखचे बघायचे असतील तर तो द शाहरुख खान होण्याच्या आधीचे चित्रपट आवडतील.

मला बादशाह आवडलेला.
2 महिन्यामागे युट्युबवर परत पाहिला.
किंचित मॅड कॉमेडी आहे.

>> त्यानंतर मी हे काळजाला लावून घ्यायचं सोडलंय. >> Lol
काळिज म्हटलं की सशाचं काळीज आठवतं. काय ती गोष्ट होती, काळीज काढून देईन का काय! कलिका खलास झाला, म्हणजे लिव्हर बोंबललं. Lol बरोबरच आहे अर्थात तिची मदिरेशी तुलना असणार यात. सायंटिफिक सिन्टॅक्टिकली करेक्ट!

नस हा अशुद्ध रक्तवाहिनीलाच शब्द वापरलेला ऐकले आहे. त्यामुळे हृदयाकडे जाईल हे टेक्निकली ही बरोबर झाले.
ये नस कही नही जाती, असा ये सडक कही नही जाती व्हेरिएशन जोक करता येईलच. Lol

हे घ्या. नसनससे वाकीफ व्हा. Happy https://www.shabdkosh.com/dictionary/english-marathi/veins/veins-meaning...
नस- शीर - रक्तवाहिनी.

नीला - रोहिणी पण काही तरी आहेत अमित. शुद्धाशुद्ध विभाजन. रक्तवाहिनी हे जनरीक.

त्यानंतर मी हे काळजाला लावून घ्यायचं सोडलंय. >> >>> Lol ब्लोटिंग व्हायचं.
सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छती>>> Lol लिहिते, लिहिते. लेखनाने मला लोकांना आयुष्यातून उठवायचेय. Proud

चेतातंतू/मज्जातंतू म्हणजे nerves बहुधा. >>> मीही तेच समजते. चेतातंतूचे जाळे/ मज्जासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टिम. माणूस म्हणजे जिवंत इलेक्ट्रोड आहे. ते त्यामुळेच.

नीला - रोहिणी पण काही तरी आहेत अमित. शुद्धाशुद्ध विभाजन. रक्तवाहिनी हे जनरीक. >>> म्हणजे एक प्रकारे "व्हेन डायग्रॅमच" Happy रक्तवाहिनी हा ओव्हरलॅपिंग भाग. उरलेले दोन म्हणजे रोहिणी आणि नीला Happy

कितीही बावळटपणा केला तरी उगीच खूप डोके लावून बनवलेल्या सध्याच्या बोर पिक्चर पेक्षा मला ते दिल तो पागल है, बादशाह वगैरे जुने पिक्चरच आवडतात असे आता वाटायला लागले आहे. ते निदान एंटरटेनिंग तरी होते. आताचे पिक्चर उगीच seriousness चा आव आणतात आणि मूळ एंटरटेनमेंट व्हॅल्यु कमी करून घेतात.

अमित>> भूत बंगला बघ. भारी करमणूक आहे. Lol

नसा म्हटले की मला स्वदेस मध्ये कावेरी आम्मा शारूखला तुम्हारा नशा कैसे चल रहा है असे विचारते ते आठवले Happy

Pages