Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओडीसीच्या संगीतात फक्त त्या
ओडीसीच्या संगीतात फक्त त्या काळाच्याच / किंवा तसल्याच जुन्या वाद्यांचा उपयोग केला आहे असे वाचले. त्यावरून आपल्या इकडच्या लोकांची फारच कीव आली विशेषत: शिवपट करणाऱ्या लोकांची..मध्येच राजेssssssssssss असा एक विचित्र सुफियाना मरायला टेकल्यागात आलाप वगैरे असतो आणि कसलेतरी विजोड संगीत अव्याहत निनादत असते कधी कधी वाटते बास करा की दोन प्रसंग तर निदान सोडा बिना संगीताचे येडझ*नो.
दोनेक लिटर कोक पेप्सी
दोनेक लिटर कोक पेप्सी मारल्यामुळे >> घरून कार्ल्याचा रस घेऊन जावे. अधून मधून सिप मारत बघावा पिक्चर. अंधारात प्रॉब्लेम असेल तर गणेशोत्सवात मोकळ्ञा मैदानात बघावा.
.
ट्रॉय पाहतोय.
यातल्या युद्धापेक्षा जे नाट्य भरलेलं आहे ते भयंकर अपीलिंग आहे. उगीचच मारामार्या नंतर कंटाळा आणतात, तसे इथे होत नाही. युद्ध झाले असेल तर असेच असे वाटते. यात ओडिसी(यस) चे काम करणारा अभिनेता गेम ऑफ थॉर्न्स मधे पण आहे. यात खूप तरूण आहे.
इलियडचे संक्षिप्त पुस्तक कॉन्टिनेन्टल मधून आणले होते. पण ते इलियडवरचं तीन चार जणांचं भाष्य निघालं. भयंकर कंटाळवाणं होतं ते. अधून मधून काही छोटी पुस्तकं वाचनात आलेली. एकात अकिलीसची तुलना हनुमानाशी केली होती. ट्रॉय हे लंका. अॅगामेम्नमच्या भावाची बायको पॅरिस पळवून नेतो त्यासाठी मग अॅगामेग्मम ट्रॉयवर हल्ला करतो. तो ग्रीस मधल्या विविध राज्यांचं सैन्यं गोळा करतो. जगातल्या प्रमुख संस्कृतींमधे ही कथा वेगवेगळ्या रूपात प्रचलित आहे. प्रत्येक कथेत पुढे बदल झाले आहेत.
इथे हेलन स्वतःहून पळून जाते. रामायणात सीतेला कपटाने पळवले जाते. आदिवासींच्या कथेत वेगळी कथा आहे. थोडक्यात हे जागतिक महाकाव्य आहे.
इंग्रजी सिनेमाच्या मानाने जवळपास अडीच ते तीन तासाचा सिनेमा हा मोठाच आहे. पण बनलाच असा आहे कि माझ्यासारखा सलग सिनेमा न पाहू शकणारा दीड तासभरखिळून राहिला.
ट्रॉयच्या तटबंदीवरून आणि त्यांचे युद्धाचे सीन्स यावरून बाहुबली बेतला आहे असे वाटते. भारतात ग्रीकांप्रमाणे चपट्या ढाली नसणार. आपल्याकडे कासवाच्या पाठीच्या ढाली असत. बाहुबलीच्या सेटसना ट्रॉय पेक्षा जास्त गुण द्यावे लागतील.
यातले सुरूवातीचे स्पार्टाच्या महालात पॅरिस वर हेलनकडे जात असतानाचे जिने आणि त्याच्या भिंती फायबरला सिमेंट फासून दगडाचा आभास निर्माण केल्यासारख्या वाटतात. नितीन देसाई यांच्या नेपथ्यात सुद्धा काळ्या फायबरच्या तटबंदी खटकत. दुसरे दृश्य अपोलो च्या मंदीरातले. इथेही काळ्या रंगातले दगड क्रुत्रिम वाटतात. पण ट्रॉय चा सेट खराखुरा वाटतो.
नाट्य आणि संवाद जान आणतात. तोच प्लसपॉईण्ट वाटतो.
पॅरिस पळून येतो. त्याला हेलनच्या नजरेला नजर मिळवता येत नाही. तो सतत पश्चात्ताप व्यक्त करत असतो. आपल्या भ्याडपणाला दूषणे देत असतो. तेव्हां ती त्याची समजूत काढताना म्हणते कि "तू एका महान योद्ध्याला आव्हान दिलंस, हे सुद्धा शौर्यच आहे" इथपर्यंत ती समजावते.
पण नंतर ती जे बोलते त्याला दाद द्यावी लागेल..
"ती म्हणते तो फक्त जिंकण्यासाठी जगत होता. मला हिरो नकोय, आय वॉन्ट माय मॅन"
पुरूषाच्या गळ्यात पराक्रम आणि स्त्रीच्या गळ्यात त्या पराक्रमावर भाळणे एव्हढेच रंगवलेल्या आपल्या साहीत्याला हे छेद देणारं आहे.
नग्नता नसती तरी चालले असते. काहीच काम नाही तिचं. मुलांसोबत पाहता आला असता. अॅकिलिस ब्रॅड पिट आहे. या नावाचा एक टेनिस खेळाडू आवडता आहे. पीटर ओटुल ट्रॉयचा राजा वाटत नाही. हेक्टरची बायको राणी वाटत नाही. तिकडची आशा पारेख वाटते.
सुरूवातीच्या अॅगामेम्नमच्या विजयानंतर अनेक नर्तकी येतात तिथे बॉलीवूडवाल्यांनी एखादे आयटेम साँग घातले असते.
मै आयी हूं पायलॉस ट्रॉय लुटने..
हा आजपर्यंत पाहिला नाही याचं एकच कारण कंटाळा आणि आळस. त्या लोकांचं काही बघण्याचं जिवावर येतं म्हणून.
गोल्ड मिस केलं.
Pages