Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्तानेही तेच केलं , ती
प्राजक्तानेही तेच केलं , ती तर करणला भेटलीही नाही >>>>>> हो. तो हात पकडण्याचा व्हिडिओ बिबॉनेच एडिट केला अस म्हणाली ती. अस काही नव्हत, ती फक्त त्याच्या हातावर चापट मारत होती म्हणे
प्राजक्ताने सुद्दा लावालावी केली. विशालने राकेशबद्दल बोललेल्या पर्सनल गोष्टी त्यालाच सान्गितल्या.
कंटेस्टंटप्रमाणे नियम बदलतात. >>>>>> अगदी अगदी ती राखी सगळयान्ना धक्काबुक्की करतेय इतके दिवस, तिला काढत नाही, टिकून राहिलीय आजपर्यन्त
आतापर्यंत जे जे बिग बॉस च्या घरातून बाहेर पडलेत ते सगळे बाहेर जाऊन काही बाही बकलेत. (बरळलेत) पण प्रभू फार छान बोलला आहे. की मी इतके दिवस टिकलो, मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले मी समाधानी आहे. बिग बॉस
आता अजून इतर काही video मध्ये वाईट बोलला असेल तर माहिती नाही. पण मला प्रभू भेटला तर मी घट्ट जवळ घेईन त्याला. फार गोड मुलगा आहे. >>>>>>> तोही राकेश किव्वा तन्वीच जिन्केल अस बोलला. विशाल- सागर जायला हवेत अस त्याला वाटतय. तन्वीने त्याला टिव्ही गिफ्ट दिलाय.
जोगचा पहिला सिनेमा आला तेव्हा त्याच्या घरच्या शाळेच्या स्टाफला कंपल्सरी शंभर तिकिटे प्रत्येकी घ्यावी लागली होती.... संपूर्ण कुटुंब गोलमाल आहे म्हणे. >>>>>> मराठीतल कॉर्पोरेट बुकिन्ग हा हा हा
कॅमेर्याकडे बघत कॉन्वर्सेशन
कॅमेर्याकडे बघत कॉन्वर्सेशन
१००% पटले.
बिबॉ चे पैसे वसूल करून देण्यात काहीही कसर सोडत नाही. आज काय तर झोंबी गेट अप केला आहे. मिळाला बिबॉ ला प्रोमो शॉट.
तन्वी ला आता तिच्या १ ली ड छाप बालिश स्ट्रॅटेजीजला बिबॉने डोक्यावर घेतल्याने चांगलाच अॅटिट्यूड आलेला आहे. ग्राउंड ला फेर्या मारायची शिक्षा म्हणे . काहीही. कोण ऐकेल असले! तिचा आवाज ऐकवत नाही इतका इरिटेटिंग आहे.
राकेश तुफान हास्यास्पद झाला आहे. रेवाचे पोस्ट
राखी किती मेहनती आहे
प्राजक्ता त्या करण बरोबर बसून
प्राजक्ता त्या करण बरोबर बसून आपण इतरांपेक्षा कसे इंटलेक्चूअली सुपिरियर आहोत हे सिद्ध करायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे भयंकर वाईट दिसली. जेव्हा तो गेला तेव्हा ती बरी खेळली. ती सुरवातीपासून करणला लांब ठेवले असते तर दिपाली ऐवजी आज ती दिसली असती. तीचे कम्युनिकेशन खूप चांगले होते. ती लॉजिकल बोलू शकायची , बऱ्यापैकी डोके होते. पण फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन असे काही झाले तिच्या बाबतीत.
अनुश्रीचे उलटे झाले, इनिशियली ती विनर वाटली, नंतर इंडिव्हिजुअल खेळायच्या नादात स्वतः चा पण गेम डिस्टर्ब केला आणि टोळीचा पण. तीला वाटलं होतं की काटावाले टोळी सारखे प्रेमाने जवळ करतील. पण त्यांना ट्रस्ट इश्यू तर होतेच वर तन्वी साठी ती थ्रेट होती, त्यामुळे तिकडे डाळ शिजलीच नाही.
या दोघीजणी वेगळ्या पद्धतीने खेळल्या असत्या तर तन्वी साठी आज जो केक वॉक झालाय त्यापेक्षा खूप वेगळे चित्र दिसले असते
अनुश्रीपेक्षा मला वाटते
अनुश्रीपेक्षा मला वाटते रुचिता असती तर चांगलीच थ्रेट झाली असती तन्वीला. अनुश्रीचा मला आधी राग यायचा पण नंतर तिचा गेम लक्षात आला. तिचा प्रयत्न कायम गेम ची प्रेडिक्टेबिलिटी उलटवून वेगळे काहीतरी करायचा असतो . त्यातून तिच्या जवळच्या, ग्रुप बाहेरच्या कोणाचाही रोष ओढवून घ्यायला ती कचरत नाही. त्यामुळे एक प्रकारे कौतुक वाटते तिचे.
बाकी बाहेर गेलेल कोणीही काटागँग बद्दल चांगले बोलत नाहीत. जनरल सोशलाइज करायला सुद्धा लोकांना आवडत नाहीत ते कोणी.
त्यातून तिच्या जवळच्या, ग्रुप
त्यातून तिच्या जवळच्या, ग्रुप बाहेरच्या कोणाचाही रोष ओढवून घ्यायला ती कचरत नाही. त्यामुळे एक प्रकारे कौतुक वाटते तिचे-- येस यू सेड इट. गटस लागतात तिच्या सारखे वागायला. पण हे मराठी बिग बॉस होते त्यामुळे ती थोडी स्वार्थी कपटी वाटायची. हा गेम फक्त गेम म्हणून बघितला तर कौतुक, कदाचित म्हणूनच विशालने फार खळखळ नाही केली तीने सोडल्यावर. पण ओव्हरऑल पर्सनॅलिटी शो म्हणून बघितला तरमग रूथलेस असण्याचा फीलिंग येते.
रूचिताला नक्की का उडवले ते अजूनही नाही कळले. निकी तांबोळी जास्त निगेटिव्ह खेळली तरी पहिल्या तीन पर्यंत नेले. हिच्याशी काय पर्सनल दुश्मनी होती बिग बॉस ची? कारण ती जे शब्द वापरायची भांडताना, ग्रामीण भागात बऱ्यापैकी अशीच झणझणीत भांडणे होतात. रितेश देशमुख तर लातूर चा आहे त्याने त्यावर सदाशिव पेठी रीएक्शन का दिली मला तर अजूनही कळले नाही
त्यामुळे खेळाडूंपेक्षा तो देशमुखच जास्त वॉनॉ बी वाटतो.
उगाच आपण कसे सुसंस्कृत आहोत, आपली मराठी कशी शुध्द साजूक तुपातली आहे, आपण कसे सगळ्यांशी आदराने बोलतो अतिरेक होतो त्या सभ्य इमेज बिल्डिंगचा.
कदाचित पॉलिटिकल बॅकग्राउंड मुळे त्याची ती गरज असेल, पण ते खूप कृत्रिम वाटतं सगळे.
राबा ने टास्क केला बरं
राबा ने टास्क केला बरं
बिगबॉसचा हा सिझन कम्प्लिट
बिगबॉसचा हा सिझन कम्प्लिट गंडला आहे हे तर कळत आहे.पण निदान सिझन संपत आला असताना तरी किमान थोडा तरी कॉमनसेन्स अपेक्षित होता.सगळच नका ना ठरवू.
तेराव्या महत्वाच्या आठवड्यातील महत्वाचा कँप्टन करताना कँप्टनशीपची एक उमेदवारी देताना बहुमताचा टास्क,त्याचा निर्णय कोण करतार तर जे मुळात शिक्षेमुळे कँप्टन्सी उमेदवारीतून बाद झाले आहेत ,
त्यातला एक एका ग्रुपला तर दुसरा दुस्रर्या ग्रुपरला सपोर्ट करणार आणि तिसरी आयत्यावेळी कशीही निर्णय देणार.
यातून बिबॉसला अपेक्षित उमेदवार मिळाला की नाही ,माहित नाही.आता उरलेल्या चार जणींमधून एक उमेदवार बहुमताने नाही तर टास्क खेळून निवडणार,आता या वेळी कोण हवा आहे ते माहित नाही.
मग सागर आणि या टास्टचा विनर यात कँप्टन्सी टास्क.
तो कसा ,परत बहुमत की वेगळा टास्क.
जर बहुमत असेल तर परत हे बाद लोक असणार की नसणार.
यातून खरा डिझर्विंग कँप्टन मिळणार का माहित नाही.
निदान हा महत्वाचा कँप्टन्सी टास्क तरी.नीट डिझाईनकरा ना.यांची क्रिएटिव्ह डोकी जातात कुठे.
प्राईज मनी कमी करण्याचा टास्क एवढा चांगला ठेवला आणि कँप्टन्सीचा एक उमेदवार बहुमताने?आणि तोही बाद उमेदवारांच्या निर्णयावरून.
या वेळेस बिबॉस ने फक्त विनर ठरवलेला दिसत आहे.बाकी कुणाला न्यायच हे ठरत नसाव.
आता ऐका, रेवा झाली म्हणे
आता ऐका, रेवा झाली म्हणे कॅप्टन, म्हणजे डायरेक्ट फिनाले विकला कोण तर रेवा
म्हणजे डायरेक्ट फिनाले विकला
म्हणजे डायरेक्ट फिनाले विकला कोण तर रेवा ....
वाईल्ड कार्डमधला कोण फिनँलेमध्ये गेल तर रेवा.
मग संकेत काय वाईट होता?
नशीब रेवा, नाही तर दिपाली
नशीब रेवा, नाही तर दिपाली झाली असती. संकेत विनर होता. त्यामुळे त्याला उडवला. जो जो तन्वीला थ्रेट तो तो आऊट
पण रेवाला काढून कँप्टन्सी
पण रेवाला काढून कँप्टन्सी रद्द करून बिबॉसला यांना लढवायच असेल तर .
नसेल तर,मग सागर नक्की जाईल.
तस तर काय कुणालाही काढत आहेत.त्यामुळे विशालला काढल तर आश्चर्य वाटणार नाही.
राखीलाही काढायला हरकत नाही.
तिला विनर नाही करत तर मग ठेवूनही आता उपयोग नाही.
राखी बिग बॉस पेक्षा जास्त
राखी बिग बॉस पेक्षा जास्त चांगले खेळत आहे. आय मीन त्यांनी जे करायला हवा ते सगळे ती करत आहे. दोन्ही टिमने एक्सपोज करतीए,मोटीव्हेट करतीए
नो बायस्ड अटिटूड
काल राखी कित्ती फालतू खेळत
काल राखी कित्ती फालतू खेळत होती...जाणूनबुजून चुकवत होती..रेवा आणि अनुश्री मस्त खेळल्या..
राखीचा खेळ बघताना हहपुवा होत
राखीचा खेळ बघताना हहपुवा होत होती.
राकेश किती स्लो चालत होता होता.
सागर, रेवा, अनुश्री, तन्वी, विशाल छान खेळले. रेवा बरोब्बर पाऊले मोजून तन्वीकडे येत होती. इतरान्सारखी कुठेही तिने पळापळी केली नाही.
रेवा बरोब्बर पाऊले मोजून
रेवा बरोब्बर पाऊले मोजून तन्वीकडे येत होती. इतरान्सारखी कुठेही तिने पळापळी केली नाही.>>>हो ना..आणि मध्ये एकदा तन्वी आत मध्ये गेली असताना तिने सरळ पाइप्स आणि bending असलेले पाइप्स वेगळे करून ठेवले..ते फार आवडलं..
ट्विस्ट म्हणून बिग बॉस ने
ट्विस्ट म्हणून बिग बॉस ने तन्वी ऐवजी रेवा ला ट्रॉफी दिली पाहिजे. मस्त मज्जा येईल
ट्विस्ट म्हणून बिग बॉस ने
ट्विस्ट म्हणून बिग बॉस ने तन्वी ऐवजी रेवा ला ट्रॉफी दिली पाहिजे. मस्त मज्जा येईल
राखीचे कालच्या एपिसोड मधले
राखीचे कालच्या एपिसोड मधले स्वगत बघून वाटले कि तिलाही मिळु शकते ट्रॉफी
आज अनुश्रीचा जळफळाट बघायला
आज अनुश्रीचा जळफळाट बघायला मजा आली. सगळेच आपापल्या सोयीनुसार खेळले...अनुश्री म्हणाली की दिपालीने रेवाला सपोर्ट करून तन्वीला काढले ते तन्वीला कळलेच नाही..हे जरी खरं असलं तरी तन्वी कशीही finale ला जाणार आहेच तर दिपालीने रेवाला सपोर्ट केला तर कुठे बिघडलं? आणि खरंतर पाहिल्या फेरीत सागरने समर्थन देऊनही अनुश्रीला सपोर्ट नाही केला...खूप हळूहळू पोते टाकत होता तो..कदाचित competitor म्हणून अनुश्री पेक्षा दिपाली बरी असा विचार करून खेळला असेल तो..पण हे अनुश्रीला कळलेच नाही..तिने फक्त गेम खेळलाय अजिबात माणसं कामावली नाहीत. आज तर तिला समर्थन द्यायला पण कोणी तयार नव्हतं..
आणि अनुश्री किती घाणेरडी आहे एक दिवस खरकटी भांडी बेडरूम मध्ये आणून ठेवली राखी धुवत नव्हती म्हणून ,आज भांडी धुतल्यावर तुंबलेल्या सिंकमधलं पाणी काढायला तयार नव्हती.मागे पण एकदा अस्वच्छतेसाठी रूचिताची बाजू घेत होती...अगदी यक्क् वाटत ती अशी वागते तेव्हा..
राकेश च्या फक्त तोंडात दम
राकेश च्या फक्त तोंडात दम आहे. काही करायची वेळ आली की शेपूट घालून पळतो तरी किंवा टास्क रद्द तरी करतो. अर्धे tasks तर त्याने बाद होऊन खेळलेले नाहीत. किती रडीचा डाव. संचालकपद सुद्धा नीट निभावता आले नाही त्याला. मेंगळट माणूस.
खरतर अनूश्री सगळ्यात बेस्ट खेळली. तिला कॅप्टन शीप मिळायला हरकत नव्हती. राखिने दीपालीला मस्त चिडवले आज मला आवडलं.
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने एकटीने खेचून नेला सिझन.
क्रिएटिव्ह टिम चे काम तीने केलय.
दिपालीला राखीचे वागणे अजून ही गंभीरपणे घ्यावेसे वाटतं बघून भयंकर विनोदी वाटत . अरे राखी आहे ती. दिपाली शाळेतल्या मुलींपेक्षा जास्त मनावर घेऊन भांडत होती.
हि भांडते आणि तो राकेश नंतर सुमडीत राखीशी गुजगोष्टी सुरू करतो.
तन्वी ला जिंकायचे होते, सिझनची लास्ट कॅप्टन म्हणून माज करायचा होता, पण यावेळी चॅनेल ने तिझ्यासाठी कुठलाच ट्विस्ट नाही ठेवला. तीला अनुश्रीप्रमाणे चेहरा पाडून फिरायची सोय पण नाही कारण ती अजूनही काटातून बाहेर नाही पडू शकतय. खरं तर तिला काही गरज नाही गृपबीपची उगाच लचांड गळ्यात घालून घेतलय.
समोरच्या लोकांनी शस्त्रे टाकल्यात जमा आहेत. मग गृप बरोबर राहिले काय नाही राहिले काय फरक पडतो.
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने एकटीने खेचून नेला सिझन.
क्रिएटिव्ह टिम चे काम तीने केलय.
<<<
+1111
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने
राखी डिझर्व करते ट्रॉफी. तीने एकटीने खेचून नेला सिझन.
क्रिएटिव्ह टिम चे काम तीने केलय.>>>+111 पण तिला नाही जिंकवणार...तिला जिंकवले तर पुढच्या सीजनला आणता येणार नाही ना..
मला पण राखीचे स्वगत ऐकून काल
मला पण राखीचे स्वगत ऐकून काल वाटले की यावेळी देतात की काय ट्रॉफी हिला?! पण राखी ही राखी आहे शेवटी. कमाल आणि धमाल कन्टेस्टन्ट आहे!!
राखी काल कॅमेरात बघून म्हणे, "बिबॉ, टास्क मुळे आज झोप झालेली नाहीये. आज मी झोपणार मग तुम्ही कोंबडा वाजवणार , हा कोंबडा मी बाहेर आल्यावर शोधून कापणार आणि खाणार."
रेवा कॅप्टन झाली. पण बिबॉ स्पष्ट म्हणाले की जर तुम्ही या आठवड्यात वाचलात तर थेट फायनल मधे जाल. म्हणजे तो ट्विस्ट अ़जूनही येऊ शकतो.
रेवा कँप्टन झाली किंवा नाही
रेवा कँप्टन झाली किंवा नाही झाली ,काय फरक पडतो.ते त्यांना पाहिजे तस कोणालाही काढतात.
11आठवडे राहणार्या प्रभूला काढून रेवाला ठेवल,सागरला ठेवून संकेतला काढल.
रुचिताला फॉर नो रिझन काढल.प्राजक्ताला 9आठवडे ठेवल.
मग यवेळी रेवाला ठेवायचच असेल तर ठेवून विशाल,सागर ,अनूश्री कोणालाही काढतील.
गेमवाईज एलिमिनेशन असत तर बापट,रेवा ,दिपाली,सागर कधीच जायला पाहिजे होते.
फक्त रेवाची शक्यता थोडी वाटते कारण टॉप 5किंवा 6मध्ये दोन वाईल्ड कार्ड्स ना नेतील अस वाटत नाही आणि तन्वी असताना एक वाईल्ड कार्डला फिनँलेमध्ये जाण्याचा पहिला मान देतील असही वाटत नाही.पण सांगता येत नाहघ.या गंडलेल्या सिझनमध्ये काहीही होऊ शकत.
आठ लोक उरलेत कोणीतरी २ जातील,
आठ लोक उरलेत कोणीतरी २ जातील, बाकी सहा जातात फिनालेला !
रेवा आणि सागर जायला हवेत आयडिअली पण बिबॉ इज इन लव्ह विथ रेवा
राखीने आधी उगाच राकेश राकेश
राखीने आधी उगाच राकेश राकेश केलं..आत्ता जशी वागतेय ती राकेशशी तशी आधीच वागली असती तर राकेशचे अजून रंग दिसले असते आणि शो बघायला मजाही आली असती...राखी अॅक्टींग किती जबरदस्त करते पण..मला बरेचदा वाटायचं की ती राकेशच्या बाबतीत खूप serious आहे..पण आता तर चित्र वेगळंच दिसतंय...
राकेश आणि रेवा एव्हिक्ट
राकेश आणि रेवा एव्हिक्ट झाल्याची न्यूज येत आहे.
रेवाच खर असेल पण राकेशच खर वापत नाही आहे.
तन्वी ☺️
तन्वी ☺️
माझ्या मते फुल काटा गँग इज
माझ्या मते फुल काटा गँग इज अनडिझर्विंग इन द फिनाले. बिग बॉस मारे म्हणत असतो शो स्क्रिप्टेड नाहि, पण हा शो कोरिओग्राफ्ड नक्किच आहे. आत्तापर्यंत काटा गँगला फेवर केलं, आता त्यांना रियॅलिटी चेक देण्याची गरज आहे...
Pages