Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो मी पण बघितलं. विशाल
हो मी पण बघितलं. विशाल राकेशला डिव्होर्स वरून काहितरी बोलला.
आता प्रोमो मध्ये दाखवलं की विशाल राकेशवर ओरडतो आहे तु काहिहि झालं की पर्स्नल बोलतोस. माझ्या वयावर बोलतोस.
मी कधी तुझ्या डिव्होर्स बद्द्ल बोलतो का? आता राकेश तो मुद्दा पकडून बसणार. कारण विशाल ला फक्त इतकंच म्हणायचं होतं की पर्सनल मुद्दे नकोत.
किती आटापिटा सुरू आहे विशालला
किती आटापिटा सुरू आहे विशालला निगेटिव्ह दाखवण्यासाठी. तेही कुणासाठी तर त्या पिचक्यासाठी.
यक्स.
बिग बॉस ला मेणचट लोक हवेच होते तर जरा बरे दिसणारे तरी शोधायचे. बापट सारख्या बिलो ऍव्हरेज माणूस यांना काय टि आर पी देणारे. डोंबल. मुंबई लोकलमध्ये जास्त चांगली मुले सापडली असती यांना
ती तन्वी म्हणजे २१ अपेक्षित चे गाईड पाठ करून पहिला नंबर मिळवणारी पोरं असतात तशी वाटते. कुठेही नैसर्गिक भाव नाही, उत्स्फूर्तपणा नाही
सगळे मुव्हज वेलकॅलकयुलेटेड, विनर रूल बुक ला धरुन .
बरंच काही झालंय का.
बरंच काही झालंय का.
विशाल दीपालीशी चुकीचं वागला का, त्याला काढा म्हणतायेत लोकं. मी सर्फिंग करताना हेडलाईन दिसली, मी बातमी उघडून बघितली नाही. फेक पण असू शकते बातमी म्हणून इथे विचारलं.
बिग बॉस सगळ्यात मोठे फट्टू..
बिग बॉस सगळ्यात मोठे फट्टू.. काढा ना त्या विशालला सरळ.. किती फालतू माणूस..
त्याचे गुणगान करणारे लोक त्याचा गेम गेम म्हणत आहेत, पण बिग बॉस एक घर म्हणतात, तुमच्या घरात असा कुजकट माणूस असलेला तुम्हाला चालेल का? त्याचा स्वतःचा असा काहीही खेळ मुळात नाहीये. त्याने टोळीतील कुणाला नॉमीनेट केलं असेल तर calculated नॉमिनेशन आहे. रडून पडून नाटकं करून, गॉड बोलून धोका देणारा हा सरडा, ह्याला विनर म्हणणं म्हणजे बिगबॉस चा अपमान होईल.. एवढं अंगावर धावून गेलेला हा बैल तरी त्याला ठेवणं म्हणजे आपला स्तर हे बिगबॉस वलेच खाली तरुण घेत आहेत. काढा की सरळ
तो लाख म्हणतो की दिपालिला
तो लाख म्हणतो की दिपालिला त्याने मुद्दाम कोपर मारलं नाही, पण त्याने ते मुद्दामच केलं हे नक्की. बघताना स्पष्ट दिसतंय त्याने कोपर तिच्या छातीत अक्षरशः खुपसलंच होतं. अनुश्रीला बहीण म्हणतो, आणि तिची गा# फाटेल हेही बोलतो?? 25 वर्षं लहान मुलीला किस करायची इच्छा तिच्याशी घाण बोलणं नको ते स्पर्श करणं ह्या थेरड्याला शोभत होतं का? ज्यांना विशाल आवडतोय इथं त्यांचा भाऊ विशाल सारखा वागो, त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती सेम विशाळसारखीच होवो ही सदिच्छा!
विशालला निगेटिव्ह दाखवण्याचा
विशालला निगेटिव्ह दाखवण्याचा आटापिटा तर सुरूच आहे पण तो हि त्यांना तशी संधी देतो . बापट विशाल ला नॉमिनेट करताना पूर्ण गेम पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलत होता . विशाल ने पर्सनल गोष्टींचा विषय काढला . ज्याचा अर्था अर्थी नॉमिनेशनशी काहीही संबंध नव्हता . तो विषय त्याने बापट बरोबर नॉमिनेशन झाल्यावर बापट बरोबर स्वतंत्रपणे डिस्कस करायला हवा होता जो त्याने केला नाही आणि तिथेच त्याने मोठी चूक केली .
काल राकेश आणि विशालची फाईट
काल राकेश आणि विशालची फाईट बघून बिबॉस पण घाबरले.किती ओरडाव लागत होत.
सागरला विशाल अजिबात कंट्रोल होत नव्हता.
विशालने डिवोर्स बद्दल बोलायला नकोच होत पण राकेशला ट्रिगर करण्याचा प्लँन असावा अस वाटल.
काल संधी होती बिबॉस कडे,विशालला बाहेर काढण्याची,तसही विशाल गेम खेळत आहे,स्ट्रॉंग आहे,विनर होऊ शकतो,पण त्याला विनर करायचच नाही हे फिक्स आहे ,कारण विनर फिक्स आहे,म्हणून आता काय अहंकारी दाखवून निगेटिव्ह दाखवून तो कसा विनर नाही हे दाखवत आहे बिबॉस. पण एवढा खटाटोप करण्यापेक्षा काल संधी होती की पण मग बापटला पण काढाव लागल असत म्हणून मग दोघ घरात आहेत.
रेवाला कालही गेम कळत नव्हता,दिपालीला तर औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे तसा फक्त विशालच दिसतो ,म्हणछन विशालच नाव घेतल,तरी हिला गेम कळतो.
पण नॉमिनेशन मध्ये कसले फालतू टास्क देतात,कसले निकष?
जरा इंडिविज्युल टास्क द्या ना,माहित असत कोण कोणाला नॉमिनेट करणार.
बिबॉसला भांडणच हवी असतात,म्हणून हे असले टास्क ठेवतात.
आज विशालने फिनाले इतकी जवळ
आज विशालने फिनाले इतकी जवळ आली असताना राकेशला हिरो बनवले आणि सिंपथीही दिली !
इतक्या मुरलेल्या प्लेअर कडूनही चूक झालीच !
हिन्दी बिबॉ मधेही त्याच्या डिव्होर्स बद्दल बहुदा विशालच काहीतरी बोलला होता कि अजुन कोण ते आठवत नाही पण तेंव्हा राकेशची एक्स रिद्धी डोगराने स्वतः ट्विटर वर येऊन राकेशला डिफेन्ड करत त्याला सपोर्ट दाखवला होता.
इतके माहित असताना पुन्हा तेच रिपिट केलं विशालने !
हिन्दी बिबॉ सिझन १५ मधे राकेशची त्यावेळची गर्क्फ्रेन्ड शमिता शेट्टी ही विशालची सो कॉल्ड मानलेली बहिण होती, पण मग राकेश वाइल्ड कार्ड म्हणून आला आणि विशालने केलेलं बॅकबिचिंग शमिताला सांगितले, तेंव्हापासून विशालच्या गेमची वाट लागली आणि तो लवकर एलिमिनेट झाला, तेंव्हापासूनची दुश्मनी आहे विशालच्या साइडने !
विशाल राकेश शमिताच्या लेव्हलचा नाही, ‘लंगुर के हाथमे अंगुर’असे काहीतरी बोलला होता.
विशाल त्याच्या वयाबद्दल खोटच बोललाय, रुचीतापेक्षा १५ वर्षांनी मोठाय म्हणतहोता पण त्याचं वय ४८ आहे, तब्बल २६ वर्षांनी मोठा आहे तो तिच्यापेक्षा!
तन्वी च विनर आहे तर टास्क
तन्वी च विनर आहे तर टास्क ठेवणे म्हणजे निव्वळ
फॉरमॅलिटि आहे. संकेत असता तर कदाचित चित्र वेगळे असते
विशाल ला कळलय की तसेही तन्वीच जिंकणारे त्यामुळे त्याने काल एकदम लुझ शॉट खेळला. मे बी गेम पेक्षा पर्सनल स्कोर सेटल करण्यात जास्त इंटरस्टेट होता त्याला
या सगळ्यात अडव्हांटेज अनु श्री ला मिळू शकतो, म्हणजे विनर नाहीच पण सेकंड स्पॉट वर ती जाईल
मागच्या सिझन ला ७० दिवसांनी गुंडाळून योग्य केले होते. कुणी ड्रामा नव्हता केला पण रिस्पेक्ट फुल गेम झाला सगळा.
शंभर दिवस खेचून चॅनेलने स्वतचा दर्जा खालावून घेतलाय
मला विशाल पहिल्यापासुनच फारस
मला विशाल पहिल्यापासुनच फारस आवडत नाही. भले तो डोकं लावत असेल, ताकद लावुन खेळत असेल, लोकांचा गेम डीकोड करत असेल.
त्याची नजर कायम दुसर्याला तुच्छ लेखणारी वाटते. आपल्या शक्तीचा त्याला माज आहे असही वाटतं.
राबा सुरुवातीला आवडायचा पण मग त्याच्या तब्बेतीच्या तक्रारी, गेम न खेळणं या कारणांनी आवडेनासा झाला. पण तरी विशाल पेक्षा तो बरा.
विशाल रुचितासोबत जे वागत होता त्याला लंपटपणा म्हणतात. तिने भिक घातली नाही म्हणुन, नाहितर पहिल्या बिबॉ मधे रेशम आणि अजुन एक कोण होता तो नाव आठवत नाही त्यांनी जे काही चाळे सुरु केलेले तसे बघायला नक्की मिळाले असते.
उलट राखीने कितिही प्रयत्न केले तरी राकेश ने गेम साठी असला मुर्खपण केला नाही. आता त्याला डिग्निटी म्हणु किंवा अजुन काही.
शारीरीक टास्क मधे मुलिंसोबत विशाल जशी ताकद लावतो ती कधीच आवडली नाही.
काल वयाचा मुद्दा पकडुन विशाल ने थेट डिव्होर्स चा विषय काढला हे अतिशय चुकलं. रेवा आणि राकेश च्या वयाबद्दल विशाल स्वत: बोलला होता ती क्लिप कालपासुन सोमी वर फिरते आहे. राकेश नक्की विशालच्या वयाबद्दल काय बोलला होता ते नाही कळलं पण वय आणि डिव्होर्स यात नक्कीच फरक आहे. वरुन राकेश वर अॅटॅक करण चुकच.. या रविवारी विशाल ला वोटींग चं कारण देउन बाय बाय करणार असं नक्की वाटतंय.
बाकी सागर सारखा माणुस काल विशाल च्या चुकिवर बोलाय्चं सोडुन त्याच्यासोबतच अजुन आहे याचं नवल वाटलं.
राबा काही कारण नसताना काल अजुन २ पावलं पुढे गेला गेम मधे.
राबा खरच डिग्निटी ठेवुन
राबा खरच डिग्निटी ठेवुन खेळतोय.. कधीच तो कुणाला वाईट बोलत नाहि.. सागर विशाल च्या नादि लागुन त्याला कसा बोलत होता चिडवत होता..
विशाल पहिल्यापासुनच नाहि आवडला .. व्यक्तीगत बोलणं त्यानेच केलय राबा बाबत.. अगदि सुरवातीला राबा काय स्वतःला शाहरुख समजतो का? असहि म्हटला होता.. काल तर अगदि कहर.. त्याच्या डिव्होर्स च काय गरज होती बोलण्याचि? अनुश्री, सागर बिल्कुल आवडत नाहित..
रितेशने भाऊच्या धक्क्यावर
रितेशने भाऊच्या धक्क्यावर 'खुद की लाल बादशहा' म्हणून केलेला अपमान, सगळ्यांनी अहंकारी म्हणून डिवचल्यामुळे विशाल काल चांगलाच चिडला होता, त्यातच बोलता बोलता अडवून बिग बॉस पण त्याच्या विरोधात बोलला ते त्याला अजिबातच सहन झालं नाही आणि पुढचं कांड घडलं.. पण तो ज्या पद्धतीने राकेश अंगावर वारंवार धावून जात होता ते अतिशय वाईट दिसलं.. गेमसाठी असेल पण एक व्यक्ती म्हणून विशाल कधीच आवडला नाही. तो राकेशला जे म्हणत होता ,तो मागे पर्सनल बोलतो वगैरे ..खरं म्हणजे विशाल सगळ्यात जास्त चुगल्या करताना दिसतो काट्याबद्दल आणि अनुश्री ,विशाल, सागर तिघांनाही नॉमिनेशनबद्दल काय प्रॉब्लेम होता काय माहीत ,काटा वाल्यांना म्हणे तुम्ही तुमचे का नाही नॉमिनेट करत? अरे का करतील ते ,तुम्ही करता का तुमच्यातलेच नॉमिनेट.. निकष काहीही असोत तुम्ही त्यांना वीक दाखवून नॉमिनेट करून काढा ना बाहेर.. काटावाले नमले नाहीत ही एक चांगली गोष्ट झाली.
अनुश्री खरंतर आधीपासूनच कोणाची नव्हती. इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल गेम केलं.. ती पहिल्या पाच मध्ये जाईलही पण जिंकण्यासाठी एक व्यक्ती म्हणून पण पर्सनॅलिटी दाखवणं आवश्यक असतं ज्यात ती झिरो ठरली त्यामुळे तिला विनर म्हणून कोणीच बघत नाही...
रेवा मला खरंच खूप आवडते दिसायला तर सुंदर आहेच, तिचा स्वभावही छान आहे ती आणि संकेत खरंच पहिल्यापासून हवे होते समीकरणं खूप वेगळे असते. सुरुवातीला रोशन भजनकर आणि सचिन कुमावत सारख्या लोकांना इतके दिवस ठेवून वाइल्ड कार्ड्स उशिरा आणले आणि आता सागर दिपालीला म्हणतो की तू माझा ऐंशी दिवसाचा गेम बघितलं की तिचा (रेवाचा) तीस दिवसाचा? अरे ,आता तिला तीस दिवसच खेळायला भेटले ही काय तिची चूक आहे? ही तर बिग बॉसची चूक आहे. वाइल्ड कार्ड्स खरंतर एक तर लवकर आणायला हवे होते आणि त्या बकवास काँटेस्टन्सला आधी काढायला हवं होतं...
रेवाच्या आधी तरी सागरला काढायला हवं..80 दिवसात लोकांच्या भांडणात घुसून ठराविक लोकांवर आरडाओरडा करण्याशिवाय काहीच केलं नाहिये त्याने..
विशाल च्या चुगल्या , किंवा
विशाल च्या चुगल्या , किंवा ओव्हर ऑल नॉन काटा चे फक्त निगेटिव्ह शॉट्स ठरवून दाखवले जातात, एक गट हिरो तर एक व्हिलन दिसला तर नाट्य निर्मिती होते. तरीही ते लोक व्हिलन न दिसता ठरवून टारगेट झालेत असा फील येत आहे हे एडिटिंग टिम चे अपयश आहे.
चॅनेल ने गेम स्वतच्या ताब्यात नको तितका ठेवून सिझन गंडवला आहे. प्लेयर्स पैसे कमवतात, पण प्रेक्षकांना ठगवले गेलय.
मला विशालचा गेम आवडला कारण त्याने रोशन सारख्या विक प्लेयर्स ना बरेच खेचून नेले टिम बनवून. म्हणूनच सागर प्राजक्ता त्याला जॉइन झाले. कच्चे मराठी, त्याच्या बल्की फिजिकमुळे तो व्हिलनीश दिसणारच होता. तो डिस अडव्हांटेज होता
तरीही त्याने स्वत ला खूप सॉफ्ट प्रेझेंट केले.
तो माणूस म्हणून वाईट असता तर संकेत सारख्या सॉर्टेड माणसाने बायकोनं सांगूनही त्याला धरून नसते ठेवले. तन्वी पहिल्या पासून संकेत ला स्वतः कडे खेचायचा प्रयत्न करत होती, एका पॉझिटिव्ह दिसणाऱ्या गृप बरोबर जाणे सोडून संकेतला विशाल बरोबर जास्त कंफरटेबल वाटत होते म्हणजे
हि मस्ट बी गुड कंपनी.
बाकी प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.
मला पण विशाल आवडतो त्याचा गेम
मला पण विशाल आवडतो त्याचा गेम आवडतो. राकेश बापट पेक्षा तापट आहे पण तडफदार आहे. राबा म्हणजे अगदीच मिळमिळित. नुसता दिसायलाच चांगला आहे. बघेल तेव्हा लोळत असतो. आईने लाडावून बिघडलेली गोग्गोड मुलं असतात तसा आहे तो.
विशालच्या एकूण अॅटीट्यूड वरूनच समजते तो हार्डशीप करून आलाय ते.
हो, सीझन मधे विशाल ला निगेटिव
हो, सीझन मधे विशाल ला निगेटिव दाखवणार हे सुरुवातीपासून नक्की च होते पण खर तर बर्याचदा तो रीझनेबल वाटलेला आहे. भांडणात पण बहुधा लॉजिकली बोलतो. ऑपोझिट टीम सोबत पण प्रेमाने वगैरे नाही पण किमान ह्यूमन लेवल रिस्पेक्ट ने बोलतो. त्यामुळे तो जरी लाइकेबल नाही वाटला तरी त्याचा गेम चांगला आहे हे मान्य करावे लगते. काल मात्र त्याचा एकदम तोल गेलेला दिसला, त्याचे आश्चर्य वाटले. काहीच कारण नव्हते खरं तर. काहीहे कारण दिले तरी राकेश त्याला नॉमिनेट करणार हे प्रेडिक्टेबल होते. कदाचित अजून काही राकेश बोलला असेल आणि ते आपल्याला दाखवले नसेल असेही असू शकते. खूपदा भांडणे एडिट करून आपल्याला एकच साइड दाखवतात तसेही.
राकेश ला पॉजिटिव दाखवण्याचा बिबॉ चा इतका आटापिटा असून त्याला हिरो तर सोडाच साधी सिंपथी देणेही मला अवघड होते इतके लूजर बिहेवियर आहे त्याचे. दक्षिणाने बरोबर लिहिले आहे. लाडावलेला एन्टायटल्ड घोड मुलगा.
मला विशालचा गेम आवडला कारण
मला विशालचा गेम आवडला कारण त्याने रोशन सारख्या विक प्लेयर्स ना बरेच खेचून नेले टिम बनवून. म्हणूनच सागर प्राजक्ता त्याला जॉइन झाले. कच्चे मराठी, त्याच्या बल्की फिजिकमुळे तो व्हिलनीश दिसणारच होता. तो डिस अडव्हांटेज होता
तरीही त्याने स्वत ला खूप सॉफ्ट प्रेझेंट केले.
तो माणूस म्हणून वाईट असता तर संकेत सारख्या सॉर्टेड माणसाने बायकोनं सांगूनही त्याला धरून नसते ठेवले. तन्वी पहिल्या पासून संकेत ला स्वतः कडे खेचायचा प्रयत्न करत होती, एका पॉझिटिव्ह दिसणाऱ्या गृप बरोबर जाणे सोडून संकेतला विशाल बरोबर जास्त कंफरटेबल वाटत होते >>>>>> अगदी अगदी.
खर तर पहिली सुरुवात राकेशने केली होती. काय गरज होती त्याला पर्सनल मुद्दे काढायची नॉमिनेशन टास्कमध्ये? ' मला विशालचा गेम आवडत नाही, तो अहंकारी आहे, स्वतःचा विचार करतो ' एवढेच बोलून टिव्ही फोडून बाहेर यायचे होते. ' विशाल बाहेरच्या पर्सनल गोष्टी बोलतो' हे सान्गायची काय गरज होती. त्यानेच विशालला ट्रिगर केले. अर्थात विशालही चुकलाच.
विशाल रुचितासोबत जे वागत होता त्याला लंपटपणा म्हणतात. तिने भिक घातली नाही म्हणुन, >>>>> अस जर होत तर स्वतःच रुचिताने सुरुवातीपासून त्याला विरोध करायला हवा होता. फायटर होती ना ती? राकेश शी भाण्डली अनुश्री ला हात लावण्याच्या मुद्द्यावरुन. माझ विशालवर प्रेम आहे म्हणत तिच रडत होती, त्याच Attention एन्जॉय करत होती, तिच्याशी Flirt करायचा तेव्हा लाजून किव्वा हसून प्रतिसाद देत होती, त्याच्या बाजूला झोपली होती.तेव्हा तिला त्याचा काही प्रॉब्लेम वाटला नाही. प्रेक्षकान्नी हे बघितलय.
मला जर खरा व्हिलन कोण वाटतोय
मला जर खरा व्हिलन कोण वाटतोय तर तो रितेश देशमुख. स्वतः वडलांच्या वशिल्याने पुढे आला. उगाच सभ्य असण्याचा देखावा. काल चक्क बायस्ड होता. त्याने विशाल ला पर्सनली अटॅक केले. जणू काही हा पण काटाचा मेंबर आहे
चॅनेल चे समजू शकतो त्यांनी स्ट्रॅटेजी म्हणून काटाला झुकते माप दिले, याने पर्सनल व्हायची गरज नव्हती. तिकडे एखादी तिखट पोरगी असती तर राडा केला असता. विशाल इजी टारगेट होता
राबा चे कुटुंब आले तेव्हा च कळले, काही स्पोर्ट्स स्पिरिट नाही. कुटुंबातील लोक खुन्नस देत नाहीत खरे तर, हे टोळीला हरवा म्हणून सांगून गेले
आणि मूर्ख बहिण तर राखी खरच लग्नाची मागणी घेऊन ऊभी आहे असे बोलत होती. अरे तुमच्या बावळट मुलाला वाचवले त्या राखीने. नसलेल्या क्लासचा माज आहे बाकी काही नाही. ते प्रभूचे कुटुंब जास्त क्लासी वाटले यांच्या पुढे. किती आपुलकीने सगळ्यांना खाऊ आणला होता
राखी खरी हुशार, ती एकटी राबाला नॉमिनेट करते.
मूर्ख बहिण तर राखी खरच
मूर्ख बहिण तर राखी खरच लग्नाची मागणी घेऊन ऊभी आहे असे बोलत होती. अरे तुमच्या बावळट मुलाला वाचवले त्या राखीने. >> हो ना

नसलेल्या क्लासचा माज आहे बाकी काही नाही. ते प्रभूचे कुटुंब जास्त क्लासी वाटले यांच्या पुढे. >>> अगदी खरं आहे
आतापर्यंत जे जे बिग बॉस च्या
आतापर्यंत जे जे बिग बॉस च्या घरातून बाहेर पडलेत ते सगळे बाहेर जाऊन काही बाही बकलेत. (बरळलेत) पण प्रभू फार छान बोलला आहे. की मी इतके दिवस टिकलो, मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले मी समाधानी आहे.
आता अजून इतर काही video मध्ये वाईट बोलला असेल तर माहिती नाही. पण मला प्रभू भेटला तर मी घट्ट जवळ घेईन त्याला. फार गोड मुलगा आहे.
मला विशालचा गेम आवडला कारण
मला विशालचा गेम आवडला कारण त्याने रोशन सारख्या विक प्लेयर्स ना बरेच खेचून नेले टिम बनवून. >>रोशन भजनकर टिकला यात विशालचं credit नसून मेकर्सचा मूर्खपणा होता...विशाल मुळे जर contestants राहिले असते तर रुचिता एवढ्या लवकर बाहेर गेली नसती..
अस जर होत तर स्वतःच रुचिताने
अस जर होत तर स्वतःच रुचिताने सुरुवातीपासून त्याला विरोध करायला हवा होता. फायटर होती ना ती? राकेश शी भाण्डली अनुश्री ला हात लावण्याच्या मुद्द्यावरुन. माझ विशालवर प्रेम आहे म्हणत तिच रडत होती, त्याच Attention एन्जॉय करत होती, तिच्याशी Flirt करायचा तेव्हा लाजून किव्वा हसून प्रतिसाद देत होती, त्याच्या बाजूला झोपली होती.तेव्हा तिला त्याचा काही प्रॉब्लेम वाटला नाही. प्रेक्षकान्नी हे बघितलय.
<<<
+११११
रुचीता वयाने लहान असली तरी ती काही अजाण्/निरागस भोळी वगैरे नव्हती, रिअॅलिटी शोज चा अनुभव हिता तिला, विशालने काही तिचा फायदा वगैरे नाही घेतला, तिला माहित होतं ती एग्झॅक्ट्ली काय आणि का करतेय !
इन्फॅक्ट त्याच्या पेक्षा तिला विशालची जास्तं गरज होती, तो तिच्यापेक्षा फेमस आणि बेटर प्लेअर आहे/होता, तिला या एक्स्ट्रॉ अटेन्शन ची जास्तं गरज होती, त्याला इमेजची पर्वा नाही, तिला असणार म्हणून बाहेर पडताच (मी म्हंटलच होतं) सर्वात आधी तिने त्याला फ्रेन्डझोन केले !
प्राजक्तानेही तेच केलं , ती तर करणला भेटलीही नाही
उद्या प्राईज मनी कमी करण्याचा
उद्या प्राईज मनी कमी करण्याचा टास्क देऊन हा सिझन फ्लॉप आहे यावर बिबॉसने शिक्कामोर्तब केल.
आज बापट बोलला की मला रिअँलिटी शो करायचा नव्हता.मला कस आणल तुला माहित नाही अस राखीला सांगत होता.
जबरदस्तीने आणल हा शब्द अर्थात राखीचा होता.
पण राखीने अर्थात त्याचा मुद्दा बनवून बापटला टार्गेट केलच.
खरतर माझ्या मते या अशा गोष्टी घरात बोलायला परवानगी आहे का,नसेल तर बापटला आता विनर नाही करणार।
काल विशालला टार्गेट करून बापटने मिळवलेली सिंटथी आज घालवली.आज पहिल्यांदा सागरच बोलण पटल की बिबॉस का बापटला घरात ठेवत आहात ,जायच तर जाऊ देत.
याचा असाही अर्थ होतो की बापट खरच टॉप 2ची गँरेंटी घेऊन आला असावा.
आज तन्वी परत खोटी वाटली.
राखीला ओरडून नंतर तिच्याचबरोबर नाचत होती.
मला तर अजूनही टॉप 2विशाल आणि अनुश्री वाटत आहेत.होणार नाहीत हे वेगळ.
पण सगळेच पर्सनल लाईफबद्दल बोलत असतात.तन्वी पण अनुश्रीच्या बॉयफ्रेंड वरून बोलली आहे पण ते दाखवलेल नाही.
मेघा सुध्दा रेशमला असच काहीतरी बोलली होती. पुष्क्ररलाही त्याच्या डिग्रीवरून बोलली होती.
विशाल डिवोर्स बद्दल बोलला हे चुकिचे आहे,पण तिथे बरच काही बोलल गेल असेल जे दाखवल नसेल.
विशाल अंगावर धावून गेला हे चुकीच आहे,बापटनेही प्रतिकार केला नसता तर विशालला बाहेर काढल असत.
पण बिबॉसला जे हवे असतात त्यांना काढत नाहीत. ः
शिव आरोहला चावला होता,तरी त्याला काढल नव्हत.
कंटेस्टंटप्रमाणे नियम बदलतात.
मेघा सुध्दा रेशमला असच
मेघा सुध्दा रेशमला असच काहीतरी बोलली होती. पुष्क्ररलाही त्याच्या डिग्रीवरून बोलली होती.

<<<
ती टेक्निकली पर्सनल गेली असेल पण अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात जे होतं ती तेच्च बोलली, “बेड जवळ फोटो एकाचा लावते (बॉफ्रे) आणि झोपते दुसर्या बरोबर” , राजेश बरोबर आक्षेपार्ह रोमान्स चालु होतं त्यावर बोलली, विकेन्डला बोलणी खाल्ली पण पब्लिकने टाळ्या वाजवल्या होत्या त्या वाक्याला
पुष्करचाही पब्लिकला व्हिलन गॅन्ग पेक्षाही जास्तं राग यायचा एन्ड ला, टॉर्चर टास्क मधे त्याने मेघाला मोठ जग भरून दूध प्यायला लावलं, ती म्हंटली लॅक्टोस अॅलर्जी आहे, उलट्या होतात तेंव्हा म्हंटली त्याला कि हा कसला डॉक्टर, पैसे देऊन डिग्री घेतली असेल
तिचा सिझन एकमेव असा होता जिथे मेघा ही १००% एकतर्फी जिंकली होती, प्रेक्षकांची नस पकडली होती तिने , इतर कोणी आसपासही नव्हते !
मग माझ्या सदिच्छा तुमच्या
मग माझ्या सदिच्छा तुमच्या बाबतीत खऱ्या ठरो
राखी भारी हुशार आहे. तीने
राखी भारी हुशार आहे. तीने सगळ्या गरजू प्लेयर्स ना हिंट देत गेम अप करण्यासाठी मदत केली. संकेत सारख्या चांगल्या प्लेयर्स ना अनकंडिशनली सपोर्ट केले. दिपाली, राबा सारख्या लोकांना एक्सपोज करते. तीला चॅनेलच्या टिम वर घेतला पाहिजे, शी विल डु गुड जॉब.
तीचा वावर प्रचंड स्क्रीप्टेड असतो तरीही तीचा राग येत नाही.
कित्ती फेक आहेत राकेश आणि
कित्ती फेक आहेत राकेश आणि तन्वी !
बाथरुम लॉबी मधे कॉन्व्हर्सेशन करताना एकमेकांकडे बघून बोलण्या ऐवजी दोघही कॅमेराकडे तोंड करून बसले होते , एकता कपुर स्टाइल शून्यात बघत बोलत होते दोघं !
इतर दोघंजण एकमेकांचे शरसंधान
इतर दोघंजण एकमेकांचे शरसंधान करत असतात तेव्हा अनुश्री कशी छद्मी हसत असते. क्रूर आणि कपटी आहे ती.
राबाच्या फँमिलीने निवेदन केले
राबाच्या फँमिलीने निवेदन केले आहे की राकेश कसा गुणी आहे,त्याच्यावर अन्याय होत आहे.
रितेश आहे म्हणून सुसंस्कृत वातावरण असेल म्हणून तो आला वगैरे.
या वेळी बहुतेक विशालला काढू शकतील.
डॉक्टर, पैसे देऊन डिग्री
डॉक्टर, पैसे देऊन डिग्री घेतली असेल ----लोल
जोग ची डिग्री फेक असू शकते. एका कोथरूड माहेर असलेल्या जुन्या पुणेकर मैत्रीणीकडून जोग कुटुंबाचे भयंकर किस्से ऐकल्यावर मेघा बरोबर असावी
जोगचे आजोबा म्हणे शनिवार वाड्यासमोर गाडीवर उभे राहून भयंकर फालतू भाषेत भाषण करायचे तेव्हा पेठेतील लोक दगड मारून हाकलून देत
जोग च्या घरात कुणीतरी प्राध्यापक होते त्यांना पोरांनी चिखलाचे फुगे मारले होते
त्याची कुणीतरी काकू गायनॅक होती, सगळ्या डिलीवरी फक्त सी सेक्शन ने करतात अशी कुख्यात होती
कित्येक पेशंट पळून जातात
जोगचा पहिला सिनेमा आला तेव्हा त्याच्या घरच्या शाळेच्या स्टाफला कंपल्सरी शंभर तिकिटे प्रत्येकी घ्यावी लागली होती.... संपूर्ण कुटुंब गोलमाल आहे म्हणे.
काल राबा, दिपाली किती नर्व्हस झाले होते तन्वी गृप सोडेल म्हणून. अरे आता एक आठवडा आहे फक्त, कशाला पाहिजे तन्वी. दिपाली चे ठिक आहे पण राकेश तर दुसरीकडे खेळून आलाय ना. कशाला घाबरतो उगाच. तन्वी एकदम लेडी डॉन वाटत होती त्यामुळे
राबाच्या फँमिलीने निवेदन केले
राबाच्या फँमिलीने निवेदन केले आहे की राकेश कसा गुणी आहे,त्याच्यावर अन्याय होत आहे.
रितेश आहे म्हणून सुसंस्कृत वातावरण असेल म्हणून तो आला वगैरे~}~} मोठा जोक आहेत हे लोक. बिग बॉस हा काही फार सभ्य सुसंस्कृत लोकांचा कार्यक्रम नाही.
बिग बॉस मध्ये सुसंस्कृत लोक येत नसतात. एवढे बेसिक माहीत नाही यांना. एवढाच माज आहे सुसंस्कृत असण्याचा तर एखाद्या भजनी मंडळाच्या नाही तर मंगळागौरीच्या कार्यक्रमात पाठवा आपल्या कुकुल्या बाळाला.
हा २-२ पोरींबरोबर फ्लर्ट करतो तेव्हा चालते बरे यांना.
यातून अधोरेखित होते की संपूर्ण कुटुंबाला नसलेल्या क्लासचा माज आहे.
Pages