बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय त्या फालतु विशालचं एव्ह्ढं कौतुक करताय.. कश्याला ट्रॉफी एखाद्या कन्नड माणसाकडे जावी? मराठी बिग-बॉस आहे ना? मराठी माणुसच विजयी व्हायला हवा.. विशाल त्या प्रभुला किती हिडिसफिडिस करायचा? कॅमेरा समोर आला की बळेच गोड बोलायचा.. अन लंपट स्त्रीयांच्या बाबतीत. हिंदी बिबॉ मध्ये तेजु बरोबर कसा वागला होता ते पाहिलं होत ना? बिल्कुल वाटत नाहि तो विनर व्हावा..
विनर तन्वीच व्हावी काल तिची एवी किती छान दाखवली खरच क्वीन आहे ती.. करेक्ट अन मुद्देसुद्द बोलते. फक्त एक की आवाज जरा जास्त मोठा करुन बोलते.. . येवुदे ट्रोफी आमच्या कोकणात.. Happy

तन्वी काय छपरी दिसते !
असे भयानक ड्रेसप का करते ? विकेन्डला तर चीप होकसेल टाइप लाल ब्रायडल लेहन्गा , डोक्यात खोटे लाल फुल आणि डोक्यावर ओढणी Rofl
मेकप तर विचारुच नका.. फार रिप्लसिव प्रेझेन्स आहे तिचे, काय बोलते काय तिचा आवाज .. तन्वीचे पूर्ण एग्झिस्टन्सच असह्य आहे .. मिडविक एव्हिक्शन दिवशी तर बन्जारन सारखा मेकप.. सापासारख्या लेन्सेस..अज्जिबातच जमत नाही तिला मेकप, खूपच चीप !
या सिझनला दीपाली एकटी क्लासी दिसली शेवटपर्यन्तं ..तिच्या साड्या, मेकप हेअर सगळे क्लास असते !
प्रोमो मधे मेघा, पुष्कर आलेले दिसले , मेघाच्या ड्रेसिंग सेन्स्लाही काय झालय.. तिच्या ट्रिपल एक्सेल फिगरला अज्जिबात न शोभणारा पोटावरच्या आणि शरीरावरच्या वळ्या हायलाइट करणारा झिगमिग ड्रेस ..अरारा… अजिबात एउ अ‍ॅप्रोप्रिएट नाही !
शिव पण आला आहे दुसर्‍या प्रोमोत, तो मात्र खूप क्लासी दिसतोय , त्याचा कॉन्फिडन्स, फिट्स्नेस, त्याची लेव्हलच वेगळी आहे.. द फिफ्टी मधे त्यानी अनेक एक्स हिन्दी बिगबॉस विनर्सना हरवून ट्रॉफी घेतली आहे !

विशाल एक अत्यंत चांगला माणूस आहे ही गोष्ट मला गेल्या 8 दिवसांत खूप जाणवली. मी त्याची फॅन झाले आहे. >>>>> मी सुद्दा. त्याची जर्नी सुद्दा आवडली. काही पॉझिटिव्ह गोष्टीही दाखवल्या आहेत त्याच्या एव्ही मध्ये. अनुश्री आणि त्याच बॉण्डिन्ग दाखवायला हव होत. तो स्वतः त्याची जर्नी बघून ईमोशनल झाला होता.

हा, विशाल थोडा flirtatious आहे , काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यात , पण मनाने चान्गला माणूस आहे.

काल तन्वी किती ओव्हर एक्टिन्ग करत होती जर्नी बघताना. शेवटी बोरिन्ग भाषण ठोकल.

कित्ती ते चढवल तन्वी आणि राकेशला बिबॉने . राकेश म्हणे शान्त , संयमी माणूस हा हा हा

भावनाने विशाल बद्दल जे ही लिहिलंय ते अगदीच पटलं.. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मला सुद्धा विशाल चांगला वाटायला लागला होता.. पण काल त्याची जर्नी बघितली.. बिग बॉसने जरा जास्तच निगेटिव्ह बनवली होती त्याची जर्नी...पण विशाल जे काही वाईट वागला आहे त्याची परत एकदा उजळणी झाली आणि मग लक्षात आलं की विशालला जास्ती भाव देण्यात आला नाही किंवा त्याच्या सोबतची सगळी माणसे एक एक करून बाहेर गेली म्हणून विशाल आता शांत झाला आहे नाहीतर तो खरच खूप एरोगंट आहे.. प्रभू सोबत जसं वागायचा ते पाहून खूप राग यायचा.. त्याला कोणी काही बोललेलं अजिबातच चालत नव्हतं.. पण तन्वी त्याच्यावर भारी पडली असं म्हणावं लागेल.. अर्थात तन्वी आवडते असं पण नाही..अनुश्री तर अजिबात आवडत नाही..राकेश, दिपाली deserving वाटत नाहीत ...थोडक्यात बिग बॉस मध्ये यावेळी कोणीच आवडत नाहीये.. कोणीही जिंकलं तरी काहीच वाटणार नाही..राहून राहून पहिल्या season ची आठवण येते...मेघाला मनोमन विजेता मानलं होतं..आणि ती जिंकली सुद्धा..खूपच छान होता तो सीजन..
दक्षिणाने ज्या video बद्दल लिहिलं आहे तो video मी पाहिला नाही पण असे videos सोमि वर टाकणे म्हणजे दिखावाच नाही का?तेवढा pure नाही वाटत विशाल ...

राकेशची जर्नी नसूश राखीचीच जर्नी जास्त वाटत होती.
राखीने तर चक्क सांगितल आहे की वोटिंग काहीही होऊ देत.विनर तन्वीच होणार आहे.
पण हे रुचितानेसुध्दा सांगितल होत.
खरतर गेम बघता विशाल अनुश्री टॉप 2असायला हवेत.
पम बापट आणि तन्वीलाच करतील अस वाटत आहे.
अनुश्री आणि तन्वी पण असू शकतात.
वोटिंग जर पाहिल तर शेवटी दीपाली,चौथा बापट,तिसरा विशाल ,दुसरी तन्वी आणि पहिली अनुश्री आहे.

पाहिल्या विशाल आणि तन्वीच्या जर्नीज !
तन्वीला सगळ्या आघाडीवर क्वीन आणि इन जनरलच बिबॉ क्वीन (रीड बिट्वीन द लाइन्स, बिबॉ ६ ची विनर) घोषित करताना आपण किती बायस्ड दिसतोय याची मेकर्सना काहीही पर्वा नाही याचे नवल वाटले !
तरीही मला विशालच्याच जर्नी मधे जास्तं शेड्स दिसल्या, जास्तं ड्रामा, जास्तं चढ उतार दिसला जो तन्वीच्या जर्नीत नव्हता !
सर्व प्रथम विशालची टोळी ऑरगॅनिक होती, त्याचा ऑराच असा होता कि सगळ्यांना त्याच्या छत्रछायेत रहायचे होते .. अगदी तन्वीलाही ..तो त्या कि टोळीचा सरदार होता , तो त्या गृपचा किंग होता , मग त्याला बिबॉ ‘किंग’ टायटल देवो न देवोत ..तन्वी याउलट जबरदस्तीने फॉर्म केलेल्या गृपचा हिस्सा होती, तेही पहिल्या आठवड्यात तिला निगेटिव फिडबॅक मिळाल्यामुळे !
विशाल फ्लर्ट वाटला असेल, निगेटिव वाटला असेल पण तो कधीच फेक पर्सनॅलिटी नाही वाटला, त्याच्यात लोकांना मॅगनेट सारखे लोकांना इफ्लुअन्स करायची अक्कल होती, लोकांचा गेम डिकोड करून सोल्युशन आधीच काढायची आणि मॅनिप्युलेट करून त्यांना मागे खेचायची बुद्धीही होती. ताकद तर होतीच.... अगदी त्याच्या अर्ध्या वयाच्या बॉडी बिल्डर ओम्कारलाही तो सहज लोळवायचा , सहज लॉक करायचा आणि जिंकायचा.
तन्वी टास्क्स चांगली खेळली पण अजिबात बुद्धीमान वगैरे दिसली नाही, तिची अक्कल २१ अपेक्षित इतकी मर्यादीत आणि खूप खोटी परसनॅलिटी होती तिची.
कायम ‘मी व्हिक्टिम दिसले पाहिजे, मी वुमन कार्ड खेळत नाही, माझ्यावर ताकदीचा प्रयिग होतोय पण परीणाम होत नाही‘ हे कॅमेराला दाखवण्यासाठी खेळली, त्यामुळे विशाल असताना ती एकही टास्क जिंकु शकली नाही.
तिकिट टु फिनाले ती जिंकली कारण विशाल नव्हता.
विशालच्या जर्नीत तन्वीला कायम हवा असलेला लव्ह अ‍ॅन्गलही होता , तेही सर्वात बहुचर्चित निगेटिव मुली बरोबरोबर, अर्ध्या वयाच्या रुचीता बरोबर ..त्यामुळे भरपूर ड्रामा, कॉन्ट्रोव्हर्सीही होती !
तो कॅप्टन बनु नये म्हणून कित्येकदा बिबॉने टास्क्स मधे काहीतरी ट्विस्ट्स आणल्या,(जब पुरी दुनिया मिलके तुम्ही हरानेकी साजिश करती है, समझो तुम जीत गये Happy )
विशाल अनेकदा नॉमिनेट झाला, त्यामुळे तन्वीपेक्षा एलिमिनेशन ड्रामाही जास्तं फेस केला.
तन्वीला पहिल्या आठवड्ता नंतर थ्रु आउट नुसती स्तुति सुमने मिळाली , पण विशालने अनेकदा बोलणी खाल्ल्ली, तर कधी स्तुतिही झाली.
त्याचे जवळचे अनेक मित्रं बाहेर पडले , रुचीता बाहेर गेली त्यामुळे जास्तं इमोशन्स दिसल्या तन्वीच्या तुलनेत !
सर्वात ताकदवर असून बिबॉने विशालच्या पॉवर्सच काढून घेतल्या शेवटचे २ निर्णायक आठवडे तरी तो चर्चेत राहिला आणि लोकांची मने जिंकली !
त्याचे फिनाले कन्फर्मेशन बिबॉने तन्वीच्याच हाताने करवले आणि ति चौथा फायनलिस्ट झाला.
इथेही पॉवर्स नसताना पब्लिकचा सपोर्ट कसा घ्यायचा हा त्याचा एन्डगेम होता, माझ्या साठी ही जर्नी विनरची होती ..जरी बिबॉने ट्रॉफीवर तन्वीचे नाव कोरले असले तरी !

दिपान्जलीच्या पोस्टशी सहमत

सुरुवातीला मलाही विशाल निगेटिव्ह वाटायचा, पण आता वाटतय हा माणूस इतकाही काही वाईट नाहीये. त्याची जर्नी बघताना काही सीन्समध्ये त्याच्या डोळयात वेदना दिसली, वाटल ह्या मा़णसाने खुप कष्ट झेलले असतील जीवनात. अनुश्रीने त्याला विचारले होते, तुझे वडिल साधे सरळ आहेत मग तु असा कसा झाला, तो म्हणाला " मुझे भगवान ने ऐसा बनाया है" हा हा हा

त्याच आईबरोबरच फोनवरच बोलण टचिन्ग होत.

एकीकडे तो फ्लर्ट असतो, दुसरीकडे राधा- अनुश्री त्याला भाऊ मानतात! एकाच माणसाची दोन रुपे! बादवे, मी कुठेतरी वाचल होत की , फ्लर्ट पुरुषान्बरोबर बायका सेफ असत्तात. प्राजक्ताशी छान वागायचा तो. याउलट राकेश तिच्याशी फ्लर्ट करायचा.

विशालच्या जर्नीमध्ये त्याचा आणि रुचिताचा सेगमेण्ट दाखवताना कुठल गाण वाजत होत?

दक्षिणाने ज्या video बद्दल लिहिलं आहे तो video मी पाहिला नाही पण असे videos सोमि वर टाकणे म्हणजे दिखावाच नाही का? >>>>> वाईट गोष्टिन्चा ( पैसा, गाडी, शानदार घर ) दिखावा करण्यापेक्षा चान्गल्या गोष्टिन्चा दिखावा करण केव्हाही चान्गलच.

रुचिताचा एक व्हिडिओ बघितला काल, विशालला वोट करा अस सान्गत होती.

पुष्कर जराही बदलला नाही, अजूनही स्वतः हून तोण्ड उघडत नाही. कोणी सान्गितल्यावर बोलतो.

दीपांजली मस्त समराईज केलस. बिग बॉस टिमचा निर्णय आधी झाला असला तरीही कट्टर बिग बॉस फॅन्स पब्लिक च्या मनात विनर विशालच आहे.
जुने विनर लोक भयंकर बावळट दिसतात नवीन शो मध्ये. तसेही धाडे वगळता सगळे विनर म्हणून पण काही तरीच होते.

मला मेघा - पुष्कर फार बोअर झाले. शिव सर्वात आवडला. विशाल आणि उत्कर्ष चे बाँडिंग चांगले वाटले. विशाल खूपच माणसाळल्यासारखा - म्हणजे एकदम गृहस्थ कॅटेगरी वाटला त्याच्या सीझन च्या मानाने Happy तेव्हा एकदम अनप्रेडिक्टेबल, रॉ आणि फायर ब्रँड वाटायचा पण आता बराच मवाळ वाटला. बरेच काही बदलले आहे अर्थात, लग्न ही झालेय आता. सगळे जाऊन तन्वीचेच कौतुक करत होते, अनुश्रीला फार अटेन्शन मिळाले नाही, ती म्हणाली सुद्धा तसं. तन्वी दुसर्‍यांना म्हणते पण तिलाच आता भलताच अहंकार आलेला दिसतो आहे. परवा म्हणाली ओह वॉव मी किती सुंदर दिसत हिते स्क्रीन वर, कसली भारी दिसलीय मी! काल म्हणे हा सीझन माझ्या नावे लिहिला होता म्हणून मी इथे आले.

सगळे चॅनेलचे पोपट म्हणून आलेत. अक्षय केळकर जरा प्रेक्षकांच्या मनातले बोलला.
निक्की तर गेस्ट कमी आणि खेळाडू जास्त वाटली.

तन्वी टॉप ला होती ती अचानक तिच्या त्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर नंबर तीन ला गेली आहे.
>>>> काय बोलली ती.

किती बायस्ड आहेत मेकर्स, जे विशालच्या साइडने आहेत, (शिव, विशाल, उत्कर्षं )त्यांनी जाऊन त्याची स्तुति करु नये म्हणून पब्लिकला लगेच रिलिज केले.
जे तन्विची स्तुति करत आहेत , त्यावेळी फ्रिजच फ्रिज केले !
मेघा तर पूर्णपणे मनातून उतरली आता, डन इज डन !
अनुश्रीला तन्वीपेक्षा जास्तं सपोर्ट येतोय म्हणून तिने मनी बॅग उचलावी याचा प्रयत्नं केला गेला मेकर्सनी गेस्ट्स च्या मार्फत !

हो मलाही तसे वाटले. बिबॉला अनुश्रीला मेसेज द्यायचा असावा की ती जिंकणार नाही आहे म्हणजे ती आपसूक मनी बॅग उचलेल आणि आपण होऊन बाजूला होईल!

डर्टी टॉयलेट्स, एकमेकांचे टॉवेल टुथब्रश वापरणारे कॉन्टेस्टन्ट्स, फ्लश न करता येणारे कॉन्टेस्टन्ट्स, विकेन्डला बाहेरून येणार्‍या जेवणात झुरळं, घरात उंदीर घुशी , ग्रोसारी पॅक कुरतडून काढणारे उंदिर अणि अनेक गलिच्छ गोष्टी ..
सोनाली राउतने सांगितलेली रिअ‍ॅलिटी :
https://youtube.com/watch?v=1DiPyQQrSKc&si=tK6VYydDSi4kSJ-l

आई गं ! फार गलिच्छ ! अगदी तिने सांगितलं त्याच्या अर्धे किस्से खरे असले तरी भयांकर वाटते आहे!
मला नेहमीच वाटते, तिथे इतक्या लोकांसोबत कमीत कमी सुविधांसकट नुसते रहाणे हेच एक वेगळे चॅलेन्ज असणार. वेगवेगळ्या बॅकग्राउअंड मधून येणारे १५-१६ लोक , बर्‍याचदा १ च बाथरूम वापरायची शिक्षा मिळते, अगदी २ असले तरी किती खराब होत असतील. त्यात कुणाला ही कामाची सवय नसते.

नवीश प्रोमोनुसार बापट मनी बँग घेण्यासाठी बझर वाजवायला जाताना दाखवला आहज.
प्रोमो मिसलिडिंग असतात.बघू.
पण सोनालघ रुचिताच समजत त्या फिनँलेमध्ये नाहीत.पण करण,प्राजक्ता संकेत,का नाही आले.?

संकेत रुचिता राखी यांनी उघडपणे बहिष्कार टाकला पाहिजे, बिग बॉस मॅनेजमेंट ने ठरवून अन्याय केलाय त्यांच्या वर.
अशा नालायक लोकांना ते नालायक आहेत हे कळले पाहिजे

नाहीच आलेत फार कोणी फिनालेला !
फिनालेत जे आलेत ते विस्मृतित गेलेले लोक आहेत (राखी सोडून) .. ओन्कार, आयुष, राधा पाटिल, रोशन, ससा , प्रभु इतकेच लोक आहेत !
हा सिझन खरच तोंडावर आपटलाय !

सोनाली चा व्हिडिओ आताच पाहिला. सरळ दिसतय बिग बॉस बरेच महत्त्वाचे एडिट करत होते
याचा अर्थ रूचिता बरोबर होती.
राबा पण शिव्या देतो त्या दाखवत नाहीत असे एक यू ट्यूबर क्लेम करत होता

निकी पण मला अजिबात आवडली नाही. सरळ सरळ विशाल ला खाली दाखवत होती. >>>>>> नाहीतर काय. तो सुरज तर अख्खा वेळ स्वतःशीच बोलत होता, स्वतःच्या धुन्दित होता. तरी बर विशालने त्याला मिठि मारली.

निक्की बोलल्यानन्तर विशालचा मूडच निघून गेला , किती हळू खेळत होता!

आई गं ! फार गलिच्छ ! अगदी तिने सांगितलं त्याच्या अर्धे किस्से खरे असले तरी भयांकर वाटते आहे! >>>>>> अगदी अगदी. पण ती स्वतः सुद्दा तेवढीच अस्ताव्यस्त राहत होती.

विशाल ला ३ रे ठेवले. टॉप २ तरी करायचे त्याला. आता राकेश आणि तन्वी दिवे बंद करणार म्हणजे दादा दादा ऐकून कान किटणार.

जर विशाल २ रा असता तर चॅनेल ची थोडी इज्जत वाचली असती. बापट ला ठेवून त्यांनी मिनिमम गॅरंटी वर शिक्कामोर्तब केले आहे.
बापट चा एकही व्होटर नसेल प्रत्यक्षात.

हो ना, तन्वी झाली विनर.
विशाल ३ या रनर अप झाला तरी त्याला १ लाखाचाच चेक, म्हणजे गिफ्ट व्हाउचर रेवा डायमंड चं. ? जरा वाढवा की, आधी बाहेर गेलेले आणि शेवटी बाहेर आलेला यात काहीच फरक वाटत नाही का स्पॉन्सर ना?

धनुडी ,तुम्ही नंतर बाहेर आलेल्यांबद्दल बोलताय रनरअपला सुद्धा काहीच नाही देत हे लोक.. यावेळी टॉप टू मध्ये राकेश आणि तन्वी राहिल्यामुळे सगळ्यांनाच, अगदी त्या दोघांनाही माहिती होतं की विनर तन्वी होणार म्हणून.. म्हणून रनरअपचं तिथे तितकं वाईट वाटलं नाही, टफ कॉम्पिटिशन असेल तर रनर अपला रनरअप घोषित केल्यानंतर कुठे तोंड लपवू असं होतं...त्या एका भावनेने विशाल नाही झाला runner up ते बरंच झालं...पण खूप वाईट वाटलं विशालचं eviction झाल्यावर..आणि नंतरही तन्वीची टकळी चालूच होती, खूपच राग आला तेव्हा तिचा...अनुश्रीचं eviction भारी केलं पण..तेव्हा तर तन्वी जाम घाबरली होती...

Pages