बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभुने घरात जिंकलेले मन आता घालवले, तन्वी स्मोक करत नाही असे धडधडीत खोटे ?
सुरवातीला कित्तेतरी वेळा दाखवायचे ती आणि अनुश्री सतत स्मोकिंग रुम मधे जाताना, रुचीताच्या अ‍ॅलिगेशन्स नंतर बिबीने त्यांच्या फिक्स्ड विनरची इमेज जपायला सुरवात केली.
रुचीताने जो किस्सा सांगितलाय त्यावेळी तर अगदी एग्झॅक्ट भांडणा आधी जाऊन आली होती स्मोकिंग रुम मधून.
तन्वीच्या फॅमिलीने टि.व्हीकाय दिला प्रभु विकला गेला !
स्मोक ऑर नॉट इज हर पर्स्नल चॉइस , पण एखद्या स्मोकिंग स्नेस्टिव व्यक्तिला मुद्दाम वासाने डिवचायचे हे डिसगस्टिंग आहे , वर ती स्मोक करत नाही म्हणणे म्हणजे स्वतःलाच एक्स्पोझ करत आहे प्रभुने तो कशाने विकला गेला हे !

विशाल ची बॉडी लँग्वेज बदलली आहे गेल्या आठवड्यापासून. एकदम डिफीटेड वाटत असावे त्याला असे वाटते. काल तो कॅमेर्‍याशी बोलला सुद्धा काहीतरी.
<<<
मला तर त्याचे राकेशला मारणेही याच फ्रस्ट्रेशन मधून आलेले वाटते आता !
काटा/तन्वीचे फेवरींग बघून त्याला वाटले असावे कि हरणारच आहे तर ज्याच्या बरोबर इतक्य वर्षांचे ग्रजेस आहेस त्याला बुकलून तरी जावे !

तन्वा आज मस्त खेळली.अनुश्रीचाही प्रयत्न छान होता.
बापटने टास्क पूर्ण केला हे ही नसे थोडके.
राखीने आज फारच खालची पातळी गाठली.
बहुतेक तिलाच एव्हिक्ट करतील.

राखी येताना सगळे प्लॅन करून येते, एखाद्या सिनेमा सारखी तिची जर्नी तिने लिहिलेली असते अनेक चॅप्टर्स मधे !
धमेकेदार एन्ट्री, कॉमेडी, ड्रामा, मुर्दाड लोकांना फुटेज देणे, लव्ह अ‍ॅन्गल, भांडाभांडी, जेलसी, आई गेल्याचे दु:ख, प्रेमभंग, धक्काबुक्की, चित्रविचित्र गेटप्स, नंतर बिबॉच्या फिक्स्ड विनरला टार्गेट करून तिला हिरो बनवणे, स्वतः व्हिलन बनून एव्हिक्ट होणे हा शेवटचा चॅप्टर चालु आहे आता तिच्या स्क्रिप्टचा.
पुन्हा काही वर्षांनी कुठल्या भाषेतला सिझन पडायला लागला कि पुन्हा सेम स्क्रिप्ट घेऊन सज्ज्ज !

राखी मला आज मुळीच व्हिलन वाटत नव्हती, तिने केलेल तन्वीचे ट्रोलींग मला आवडत होते Happy नंतर उगीच दीपालीला उचकवले.
तन्वी आता स्वतःचा उल्लेख थर्ड पर्सन ने करू लागली आहे ! "तन्वी कोलते योग्यच बोलते" "तन्वी कोलते ला अमक्याची गरजच नाही" वगैरे . टास्क भारी खेळली ती आज. पण असे वाटलेच की संकेत असता तर नक्कीच तिला भारी पडला असता या सगळ्यात. त्याने जिंकले ही असते टिकिट टु फिनाले.

संकेत फायनल पर्यंत गेला तर पक्का विनर होता. म्हणून उडवला.
दिपाली डोक्यात जाते. उगाच फालतू रडारड. तो बापट मग खांदा देणार, मग हि पुन्हा रडणार. अलका कुबल चा सिनेमा दाखवतात.
प्रभुला तन्वीने खेचून नेले पुढे पर्यंत म्हणून तो तिला सपोर्ट करत असणारे. तो ज्या बॅकग्राउंड मधून येतो, खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी.
राखी अशी खेळत आहे की दुसरा कुणी असता तर तातडीने समज दिली असती, पण तिला वात्रटपणा करण्यासाठी च आणले आहे त्यामुळे सगळे गुपचूप सहन करतात

च्यायला मी आंधळी आहे. बिबी हाऊस मध्ये स्मोकिंग रूम नेमकी आहे कुठे ?
मी एक पण एपिसोड चुकवलेला नाही, मला ही रूम एकदा पण दिसलेली नाही.

च्यायला मी आंधळी आहे. बिबी हाऊस मध्ये स्मोकिंग रूम नेमकी आहे कुठे ?>> वाडा माहितेय का तुम्हाला?टोळी नेहेमी बसायची ती जागा..त्याच्या मागे एक ग्रीन भिंत आहे...तिथेच स्मोकींग रूम आहे बाहेरून दार वेगळे दिसत नाही..पूर्ण भिंतच आहे असं वाटतं..

वाडा ? नाही माहिती. Sad
एक स्कूटर ठेवलेली जागा आहे ती माहिती आहे, दुसरी मागे खूप दरवाजे आहेत आणि दोन सोफे एक मेकांना काटकोनात ठेवलेत ते, एक छोटा सोफा आणि त्याच्या समोर गोल बेड ( हे सगळं गार्डन एरियात आहे. बाकी नाही माहिती. पण बघते लक्ष देऊन. सीझन संपण्या आधी बघून घेते नाही तर उगीच रुखरूख Proud Proud

बिबॉने इतके फेवर केलय तन्वीला कि आता ती खरोखर टास्क खेळून जिंकली असली तरी तिला आधीच प्रश्नोत्तरे सांगितली असे आरोप होत आहेत सोशल मिडियावर Proud
दीपालीने बरोबर फोडला होता तन्वीचा सुरवातीचा गेम काल, ठरवून भांडणे करुच शकतात सगळेच लोक.
राखीने पण बरोबर एक्स्पोझ केला होता तिचा ड्रामा मग उगीच राकेश दीपाली वर घसरून स्वतः च घसरली !
Btw काल पुन्हा एकदा अरबाझच्या लाडक्या ‘काकाकुव्वा ‘ची आठवण झाली टास्क मुळे Rofl
तन्वी सोडून कोणी मागचा सिझन पाहिला नाही का , पहिल्यांदाच ऐकल्या सारखे विचारत होते लोक ते उत्तर , किती लक्षात रहाण्या सारखा किस्सा होता काकाकुव्वाचा !

तिला आधीच प्रश्नोत्तरे सांगितली असे आरोप होत आहेत सोशल मिडियावर ......
हे जरा पटायला अवघड आहे.
म्हणजे फिनेव उमेदवार निवडण्याचा टास्क कोर्ट रुम ड्रामा आणि वोटिंग वर आणि प्रत्यक्ष फिनँले टिकीट देण्याचा टास्क फिजिकल हे बिबॉस सेटिंग असेल कारण बापट नक्कीच जिंकणार नव्हता आणि अनुश्री पण फिजिकल टास्कमध्ये कमीच आहे.
पण उत्तर सांगितली असतील अस नाही वाटत कारण पाच प्रश्न तर अगदीच सोपे होते,पहिले दोन.जरा थोडे कठीण होते जिथे बाकीचे दोघही गंडले.तिथेच गेम तन्वीकडे गेला.ःपण जिने गेम आणि घर व्यवस्थित फॉलो केल आहे तिला सगळेच प्रश्न सोपेच होते.त्यामुळे पेपर फुटला नसावा .
पण बापटला मराठीत वाचायला जरा प्रॉब्लेम आला अस काहीतरी तो म्हणत होता.
आता कळल तन्वीलाच पत्रक का वाचायला देत होते बिबॉस. पण मग सागर आणि दिपाली, संकेतच काय ,त्यांना काहीच प्रॉब्लेम नसावा.

यावेळी विशालला टास्क्स करायला मिळाले नाही आणि टॉर्चर टास्क झालं नाही म्हणून राखीने (मनातल्या मनात) नवीन स्क्रिप्ट लिहिली आहे असं दिसतय प्रोमो मधे ! खुर्चीवर बसलेल्या विशालला राखी टॉर्चर करतेय आणि विशाल फुटेज घेतोय Biggrin
राखीचा एलिमिनेट होण्याआधी मास्टरस्ट्रोक !

ते नव्हे पण आत्तापर्यंत घरात न आलेला पाहुणा हा जो शेवटचा प्रश्न होता त्याचं उत्तर काय होतं? काही केल्या मला दिसलं नाही.

आत्तापर्यंत घरात न आलेला पाहुणा हा जो शेवटचा प्रश्न होता त्याचं उत्तर काय होतं? काही केल्या मला दिसलं नाही.
<<<<
The famous काकाकुव्वा from seasons 4 Lol

तन्वी जीव तोडून खेळली. बापट खेळला हेच आश्चर्य होते.
मला तर वाटलं की सोडून देईल मधेच.
अनुश्री छान खेळली पण तन्वी पेक्षा वाईट.
तन्वी ने काल हाईट केली, बिग बॉस हा लग्नाला पर्याय कसा असू शकतो, एखादा मराठी सिनेमात लिड रोल असल्यासारखे बोलत होती. राशीची गोष्ट वेगळी आहे तिने निव्वळ बिग बॉस वर सगळे करीअर उभे केले आहे. ती दुबई ला होती म्हणजे बिग बॉस मध्ये तिला भरपूर पैसे मिळतात

सापशिडी टास्क हहपुवा होता.

हयान्नी कधी डिस्कव्हरी चॅनल पाहिला नाही का कधी? का कधी प्राणी पाहिले नाही कधी?

रेवाच समजू शकत एकवेळ, घोरपड किव्वा सरडा, पाल ह्यात सारखेपणा असू शकतो. पण अनुश्री आणि राखी धन्यवाद होत्या!

अनुश्रीने करकोचा म्हणून बगळा आणला. राखीने तर हाईटच केली, घुबड म्हणून तर काय आणला- किन्गफिशर! हा हा हा

खरच राखी १६ सिझन्स करुन आली म्हणते म्हणजे नक्की काय करत होती इतक्या सिझन्समध्ये असा प्रश्न पडलाय मला. एकही फिजीकल टास्क हिला जमत नाही.

तन्वीच कधीपासून विशाल माझा दुश्मन आहे,बाहेर पण दुश्मन राहणार आहे सारख चालल आहे.
एवढ काय विशालने हिच्याशी दुश्मनी केली आहे.
टोळी हिने सोडली,तंटा क्वीन ही होती.टोळी सोडून स्वतःचा गेम अप करून टोळी पूर्ण निगेटिव्ह झाली.म्हणजे विशालमुळे हिच काहीच नुकसान झालेल नाही.
आयुषबरोबर लव्ह अँगल ज्याला हिने मैत्री नाव दिल,हिने सुरू केल.पण आयुषने हिला भाव दिला नाही.नंतर आयुषवरून स्वतःच स्वतःला ट्रिगर करून घेत होती.
राखीनेही त्यावरून तिला उसकावल तेव्हा केवढी ट्रिगर झाली आणि आता राखीच्या गळ्यात गळे पण घालत आहे.राखी दुश्मन नाही.
तो बापट पण तसलाच.ती राखी एवढ वाटेल ते त्याला पर्सनल बोलली ते त्याच्या सो कॉल्ड कुठल्या स्ट्रेंथ ऑफ कँरँक्टरमध्ये बसते की तिला याने अनुश्रीच्या विरोधात फिनँलेची उमेदवारी दिली.
त्या तन्वीची रुचिता दुश्मन,विशाल दुश्मन,प्राजक्ताला सतत पाण्यात पाहिल अशी ही विनर.
मग त्यापेक्षा अनुश्री काय कमी आहे,गेम खेळली,इंडिविज्युल खेळली,कुणाच्याही अंगावर धावून गेली नाही.आळशी असो,चोर असो पण आज कोणीही तिचा दुश्मन.नाही की ती कोणाची दुश्मन नाही.
मग ती विनर का नाही.
ममां जेव्हा होस्ट होते तेव्हा सिझन संपत आला की नेहमी सांगायचे की पर्सनल ग्रजेस बाहेर घेऊन जाऊ नका,घरातच सगळ विसरा.तस रितेश कधीच सांगत नाही.काहीतरी मुद्द्यांवरून डायलॉग्ज मारत असतो।
तो विशाल म्हणे हिचा बाहेर पण दुश्मन असणार आहे .जस काय बाहेर विशाल हिलाच भेटायला जाणार आहे.
एकदा सुनावल पाहिजे हिला कोणीतरी.

आयुष बिग बॉस मटेरियल नव्हता. तन्वी ला कळले तेव्हा सोडले. तीने विशालला फीनाले मध्ये बघते म्हंटले म्हणून राबा रुसला होता. म्हणून मग नंतर तन्वी ने विशालला दुश्मन डिक्लेअर केलय, ते पण नाटकी आहे. शी इज थरो प्रोफेशनल.
हे दुश्मन बिश्मन झुठ असते
बापट ला अनुश्री ला हरवणे अवघड होते म्हणून त्याने राखी घेतली. तन्वी प्लेड बाय रूलबुक. अनुश्री पाठीत खंजीर खुपसते अंडर लाईन केले.
तो देशमुख काटाचा मेंबर म्हणून खेळतो. त्याच्या कडून काही अपेक्षा करू नका. त्या टास्कवर जे काही बोलतो ते म्हणजे आमच्या इतिहासाच्या बाई रीव्हिजन करून घ्यायच्या त्याची आठवण येते. दे शुड चेंज होस्ट नेक्स्ट टाईम
अनुश्री तन्वी बरोबर नाही तर विशाल बरोबर दुसऱ्या पोझिशन साठी स्पर्धा करतीए असे नाही वाटत का?
उगाच विशालला वाईट दाखवते.

फक्त आणि फक्त राखी मुळे मजा येतेय बघायला

कसले भिकारडे टास्क देतात,स्वतःच्याच वाढदिवसाला घरात भांडण लावून देतात आणि टास्क काय तर पार्टीला कोणाला बोलावणार नाही.
कोणाच्या डोक्यात (अनुश्रीच्या शब्दात,टाळक्यात)असले टास्क येतात.खरच गंज चढला आहे बुध्दीला.

" तो बोका, तो कपटी, ती साखर गोळी, ती आयुर्वेदिक, ती गर्विष्ठ, तीची भाषा घाणेरडी; मीच काय ती तत्वनिष्ठ, खेळ आणि नात्यांशी प्रामाणिक, सत्यवचनी वगैरे आणि वगैरे " - बिग बॉस मराठी 6 ची संभाव्य विजेती.

राखी बापट ला वाट्टेल ते बोलली आहे, त्याच्याशी वाट्टेल तसं वागली आहे पण बापट तिच्याशी बोलतो मोकळेपणाने. पण विशाल सापशिडी चा टास्क छान खेळला पण कौतुक मात्र राखीचे केले त्याने. थोडा मोठेपणा दाखवून विशालचे कौतुक करायला हरकत नव्हती.

कोर्टाचा जो तिकीट टू finale टास्क होता त्यात अनूश्री आणि राखी मध्ये कोणाला तिकीट मिळाले?

कोर्टाचा जो तिकीट टू finale टास्क होता त्यात अनूश्री आणि राखी मध्ये कोणाला तिकीट मिळाले?)))अनुश्री राखीविरोधात तिकीट जिंकली म्हणून तर टास्क मध्ये खेळली
बापटला राखी शिवाय पर्याय नाही म्हणून तो राखीशी बोलतो. नाही तर तन्वी सारख्या डॉमिनंट प्लेयरने कचरा केला असता त्याचा. आणि त्याच्या बहिणीला वाटतं की राखी त्याच्या मागे लागतो
बापट कडे शून्य स्पोर्ट्स स्पिरिट आहे. तो स्वतः कुठलेच टास्क नीट नाही खेळला त्यामुळे. काल साधे नाचता पण येत नव्हते.
त्याचा सगळा गेम मी कसा भारी, बाकी कसे तुच्छ. माझ्या साठी कुणी एक्झिस्ट करत नाही, मीच कसा ग्रेट या एटिट्यूडवर सुरू आहे. मिनिमम गॅरंटी असल्याने निवांत आहे तो.

बापरे ती तन्वी काय भयानक मेकप करते, त्या ब्लु कॉन्टॅक्ट लेन्सेस तिला फार वाईट दिसतात आणि इन्जेक्ट केलेले डकी लिप्स पण फार विचित्रं दिसतात डार्क कलर मधे!
आज तिला बघवत नव्हते राखी विशालला फुटेज देतेय हे, भयंकर जेलस , गर्विष्ठ, इन्सिक्युअर आहे तन्वी !
विशालने साधा सापशिडीचा टास्कही इन्टरेस्टिंग केला आणि राखी तर आहेच फन्नी..तरी मागच्या वर्षी जी हहपुवा अरबाझच्या काकाकुव्वाने आणली ती वेगळ्याच लेव्हलची होती Rofl

आज तिला बघवत नव्हते राखी विशालला फुटेज देतेय हे, भयंकर जेलस , गर्विष्ठ, इन्सिक्युअर आहे तन्वी))) रेवाने तिची चोरी व्यवस्थित पकडली, आपल्याला म्हणते तिकडे जाऊ नका आणि स्वत पुन्हा पुन्हा तिकडे जातीए Happy
मला खात्री आहे दिपाली रेवा तन्वी बद्दल बरेच वाईट बोलत असतील, टिपिकल गर्ल टॉक, हे चॅनल चे भामटे दाखवत नाहीत आपल्याला
दिपालीने शेवटी पर्सनल ग्रज म्हणून का होईना तन्वी शी खुन्नस घेतली. तन्वी ला अन एक्सपेकटेड असावे एकदम भडका उडाला त्यामुळे. तिला वाटत होते एज युजवल विशाल चे नाव घेईल. मग काय ते दादा दादा सुरू केले. त्या आळशी सेल्फसेंटर्ड बापटला या बावळट मुलींची काही पडली नाही, या सगळ्या जणी मात्र दादादादा विलापत असतात. त्याच्या साठी राखीचपुरेशी आहे फुटेज साठी

लिहून घ्या तो संस्कारी पुतळा देशमुख वीकेंडला कारण नसताना विशालला टारगेट करणारे टॉर्चर टास्क वरून. तन्वी चे बळेच कौतुक करेल तीने राखीला अडवले म्हणून

विशालने साधा सापशिडीचा टास्कही इन्टरेस्टिंग केला आणि राखी तर आहेच फन्नी.. >>>>>>> अगदी अगदी. नशीब ह्यावेळी तरी तिने प्राणी नीट उचलून आणले. कान्गारु म्हणून मोराला उचलून आणल नाही, हंस म्हणून कावळयाला उचलून आणले नाही. हा हा हा

राखी चे जे केस आहेत, ते खरे आहेत की खोटे
त्याचे स्ट्रक्चर सतत बदलते, लेंगथ बदलते. विग पण नाही वाटत. नक्की काय प्रकार आहे तो

Pages