बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी बाहेर गेलेले आणि शेवटी बाहेर आलेला यात काहीच फरक वाटत नाही का स्पॉन्सर ना?
कदाचित दुसरे कुणी मेरीट वर गेले असते तर दिले पण असते जास्त पैसे, पण राकेश ला बिग बॉस च तिथपर्यंत घेऊन गेले म्हणून त्यांनी नसतील दिले.
मला तर वाटलं होतं की तन्वी ऐवजी देशमुख राकेश चेच नाव घेईल आता विनर म्हणून.
तन्वी शेवटच्या क्षणापर्यंत भयंकर नाटकी वागत होती. राकेश चे कॉन्ट्रॅक्ट होता त्यामुळे त्याला फार इमोशनस नव्हते. विशाल तन्वी मध्ये नर्व्हस नेस दिसत होता. मला विशाल च्या वडिलांचे फार वाईट वाटले. चेहरा एकदम उतरला त्यांचा.

यावेळी पहिल्यांदा हा सिझन बघितला नाही, याचं समाधान वाटलं कारण मी फार गुंतते आणि त्रास करून घेते.

अपेक्षेप्रमाणे तन्वी झाली बिगबॉस विनर अभिनंदन तन्वीच.. ८ वर्षानंतर एक मुलगी विनर झाली. खुप छान वाटलं काल पाहाताना. Happy

हा सिझन सिक्स आहे,इथे विनर आधीपासूनच फिक्स आहे ,त्यामुळे अपेक्षेप्रमाणे तन्वीच विनर झाली, यात धक्का किंवा आश्चर्य अजिबातच वाटले नाही.ये तो होना ही था.
पण सगळ्यात बोअर आणि बायस्ड सिझनपेक्षा फिनँले त्याहून बोअर,रटाळ,कंटाळवाणा झाला.
असो.संपला एकदाचा सिझन.

मला विशाल च्या वडिलांचे फार वाईट वाटले. चेहरा एकदम उतरला त्यांचा. >>>>>>> अगदी अगदी. त्याच एलिमिनेशन Unexpected होत. त्याच चेहरा बघवत नव्हता. जाताना घराशी तो अटॅच्ड झाल्यासारखा वाटला. त्याचे वडिल त्याला ओढून घेत जात होते अस वाटत होत. नावाची पाटी घ्यायला विसरला हा हा हा.

विशाल ला ३ रे ठेवले. टॉप २ तरी करायचे त्याला. >>>>> हो ना. तन्वी आणि विशाल लाईट बन्द करताना बघून मजा आली असती. तन्वीचा चेहरा पाहण्यासारखा झाला असता.

.अनुश्रीचं eviction भारी केलं पण..तेव्हा तर तन्वी जाम घाबरली होती... >>>>>> सहमत. eviction करण्याची पद्दत आवडली. अनुश्री गेली तेव्हा विशाल एकटा पडल्यासारखा वाटला.

अनुश्री चं एविक्शन नाही बघितलं. बघते नंतर. कसं केलं?>>वाचण्यापेक्षा बघण्यात मजा येईल धनुडी

Pages