बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या संपूर्ण फॅमिली drama मध्ये राखीला कोण भेटायला येईल याची मला उत्सुकता आहे . आणि ती जे करेल तो drama नसेल असं मला वाटतं .
सागर एक नंबर नाटक करणार फॅमिली आली की.

संपूर्ण फॅमिली drama मध्ये राखीला कोण भेटायला येईल याची मला उत्सुकता आहे . आणि ती जे करेल तो drama नसेल असं मला वाटतं .
<<<
तुला खरच असं वाटतं Happy ?
ती राखी आहे, तिचा बिबॉ मधला एक सेकन्दही खरा नाही, सगळे कॅमेरासाठी प्लॅन्ड असते Happy
तिची फॅमिली व्हिजिट ड्राम्याची स्क्रिप्ट तयार करून रिहर्स करून झाली असेल एव्हाना Wink
बहुतेक भाऊ येईल तिचा, त्याचेच लेटर आले होते ना तिला ?तिच्या फॅमिलीत आता कोणी उरलेही नाहीये, भाऊही काही क्लोझ नाहीये तिला.

फॅमिली वीक सुरु ..
विशाल चे बाबा आवडले... साधे सरळ आहेत..
रेवा च्या बहिणी पण गोड वाटल्या.. मस्त बाँड असेल त्यांचा एकमेकींशी..
संकेतची बायको भारी.. पुढच्या वर्षी स्पर्धक म्हणून येउदेत.. संकेत वाईल्ड कार्ड म्हणुन का आला त्याची कारणं फक्त आम्हालाच माहिती आहेत म्हणाली. संकेत खरंच पहिल्यापासुन यायला हवा होता.. बरीच कॅल्क्युलेशन्स बदलली असती.
आज दिपाली ची फॅमिली येणारे. ती बिबॉ च्या घरात आल्यावर तिच्या सासुबाईंचं निधन झालंय् ते आज तिला कळणार आहे म्हणे.. एखाद्याचं मरणही इतकं एन्कॅश करतात का ? इतकीच सासु जवळची होती तर दिपाली च्या घरच्यांनी तिला गेम सोडुन परत बोलवायचं ना. आपली प्रिय व्यक्ती जी यापुढे आयुष्यात कधीही दिसणार नाही तिचं अंतिम दर्शन घेणं महत्वाचं की बिबॉ चा गेम ? मला प्रोमो मधे पण हे अजिबात आवडलं नाहीये...

कदाचित तू म्हणतेस ते खरं असेल दिपांजली. मला राखी बद्दल सहानुभूती वाटते कधी कधी.

मला संकेत ची बायको फारशी आवडली नाही.

दीपालीची सासू गेलेली तिला माहितीच नाहीये? हे कसं असू शकतं? घरच्यांनी काळवलंच असेल ना तिला? बहुधा ती मध्येच जाऊन पण आली असेल घरी कोणाला ठाऊक?

मला संकेत ची बायको फारशी आवडली नाही.>>>+111 मला पण नाही आवडली सुपर्णा...contestant असल्यासारखीच बोलत होती सगळ्यांना...संकेतला चांगले सल्ले दिले तिने पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बहुतेक उलट 'ही काही जास्तीचं बोलेल का?'असं टेंशन आले असेल त्याला असंच वाटत होतं.
विशालचे बाबा छान वाटले.
रेवाच्या बहिणी खूपच positive vibes घेऊन आल्या..तिघींचा चिवचिवाट चालला होता नुसता..मस्त बाॅन्ड आहे तिघींचा...
आजच्या promo मध्ये तन्वी प्रभूच्या आईला साडी देतेय...अजिबात आवडलं नाही ते...खरंच नातं जपायचं तर तिने शो संपल्यावर त्याच्या घरी जाऊन त्यांना साडी द्यायला हवी होती..इथे national TV वर दिखाऊ पणा कशाला?उलट तिथे प्रभू आवडला, नको म्हणत होता आईला साडी घ्यायला...
यावेळी 10 पैकी तिघांना garden एरियात आणून खूप obvious करून टाकत आहेत कोण येणार ते...त्यापेक्षा आधी मजा यायची सगळे freeze असताना कोणाचे पण family members यायचे तर जास्त उत्सुकता रहायची...specially आत असलेल्यांना

अनुश्री कसली भावनाशून्य आहे..स्वःताच्या आईच्या भावनांची पण कदर नाही तिला.आईला सारखी खोटारडी म्हणत होती..त्यांच्या रडण्याची टर उडवत होती...तिची आई खूप छान आणि समजदार वाटली..राकेश आणि प्रभूची फॅमिली पण छान आहे...राकेश प्रत्येक वाक्य बोलल्यावर जीभ बाहेर काढतो,किती विचित्र दिसतं ते..

संकेतची बायको खूप वर्षांपूर्वी ई टीव्ही वर अक्षर कोठारी बरोबर लीड रोलमध्ये होती, ती सिरीयल खूप वर्ष चालली, मी नेहेमीप्रमाणे सुरुवातीला बघितली मग सोडली.

नंतर खूप वर्षांनी मी तिला दुहेरी मध्ये बघितलं, आधी तो रोल उर्मिला निंबाळकर करायची, मग ही आली. उत्तम काम करते, संकेतला सिनियर आहे या क्षेत्रात.

एपिसोड पाहिला नाही अजुन , (आय कान्ट बिलिव्ह आयॅम डिफेंडिंग तन्वी) पण साडी नवीकोरीच दिली आहे ना, मग ठिक आहे कि, तिने दिखावा म्हणून केलं कि खरच प्रेमाने यावर डिबेट होऊ शकेल पण प्रभुच्या आईला छान वाटलं ना , मग झालं तर , फॉर अ चेन्ज तन्वीचं हे जेश्चर चांगलं वाटलं !
प्रोमो मधे प्रभु आणि त्याचा भाऊ सूरज यांचं बॉन्डिंग पण खूप क्युट वाटलं ‘चल सूरज‘ म्हणत त्याला तो इकडे तिकडे नेत होता, खूप क्युट वाटला प्रोमो !

शेवटी पळवत पळवत पाहिला एपिसोड. संकेत आणि रेवाचे रडणे झेपलेच नाही. आत्ताच तर आलेत, इतके काय रडारड. रेवाच्या बहिणी क्यूट होत्या.
दीपालीच्या फॅमिलीने तिला सासूबाईंची बातमी सांगितल्यावर फार काही रीअ‍ॅक्ट केले नाही. कदाचित कल्पना असावी त्यांना आधीच. दीपलीने इतक्या मोठ्या तरुण मुलाच्या इतक्या पाप्या घेताना बघून विचित्र वाटले जरा.
प्रभूची फॅमिली छान होती. इतरांसारखे पॉलिश्ड दिसत नसले तरी किती हुषार होते सगळे , त्याला किती पर्फेक्ट सल्ले देत होते!

उलट 'ही काही जास्तीचं बोलेल का?'असं टेंशन आले असेल त्याला असंच वाटत होतं. >> मोक्षू मेरे दिल की बात बोलि. खास करून तो वाईल्ड कार्ड म्हणून का आला आहे याचं कारण फक्त आम्हाला दोघांनाच माहीती आहे हे वाक्य ती बोलल्यावर सन्केतने ज्या पद्धतिने तिच्याकडे बघितलं ते फार बोलकं होतं.

तन्वि ने साडी दिली ते जेश्चर मला सुद्धा खूप आवडलं. नंतर ती प्रभूकडे नक्किच जाईल, पण त्याच्या कुटुंबाला प्रथमच भेटत होती त्यामुळे तिथल्या तिथे करता येण्या जोगी गोष्ट तिने केली.

दिपालीने इतक्या मोठ्या मुलाला सतत मिठ्या मारून पाप्या घेणं मला सुद्धा थोडं ऑड वाटलं. प्रेम जिव्हाळा माया सगळं मान्य आहे, पण नॅशनल टिव्हीवर हे करणं टाळायला हवं होतं.

प्रभूची फॅमिली एकदम जेन्युईन. आई वडील, भाऊ सगळेच आवडले खूप.
का कोणजाणे पण राकेशची फॅमिली मला जरा तुसडी (स्वतःला वेगळं समजणारी वाटली.)

प्रभुची फॅमिली फार आवडली !
किती साधे, सुसंस्कारीत , प्रेमळ, जेन्युइन लोक !
प्रभु किती लाडका आहे, त्यांचा अभिमान, प्रेम झळकत होतं .. सल्ला पण छान दिला, कोणालाही अ‍ॅटिट्युड दिला नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळी प्रभु आई बाबांनी आणलेला क्रिमरोल चहात बुडवून खात होता , मस्तं वाटलं Happy

सुपर्णा ला मी आवडले नाही का ? माझ्याकडे बघतच नव्हती असं अनुश्री म्हणाली Happy
अनुश्री ची आई फार काही बोलली नाही. अनुश्री बर्‍यापैकी बिघडलेली पोरगी असावी घरात असं वाटलं. आई चं पत्रं फाडलं म्हणुन जितका राडा केला होता तेवढी काल फार काही अ‍ॅटॅच्ड वाटलीच नाही अनुश्री आईसोबत.
प्रोमो मधे दिपाली ची दाखवलेली रीअ‍ॅक्शन काल नव्हतीच. सासुबाई गेल्या ते ऐकुन बाई एकदम कूलच... नवर्‍याला म्हणाली इट्स ओके.
आई आल्यावर वेडपटासारखी करत होती. दिपाली च्या रीअ‍ॅक्शनस अजिबात आवडल्या नाहीत. मुलगा आणि नवरा जरा ऑकवर्ड झालेत की काय असं वाटलं तिचा पोरकटपणा बघुन.
प्रभु ची फॅमिली फार गोड. भाउ कसला भारी होता.. बाबा पण आवडले. ... तन्वी ने साडी दिली ते फार आवडलं मला तरी. दोन्ही नवीनच आहेत. हवी ती घ्या म्हणाली.
राबा ची आई गोड आहे...त्या शिक्षिका होत्या. मुलगा बिघडला अशी टिप्पणी केली त्यावर "संगतीचा परिणाम" असं काहीतरी म्हणाल्या Wink
बहिण पण राखी च्या बाबतीत" आमच्याकडे बहुमत लागतं" असं म्हणाली .. हा हा हा...
आज सागर ची ओव्हरअ‍ॅक्टींग आहे.. कालच्या प्रोमो मधे बायकोला बघुन भुत पाहिल्यासारखं का करत होता Wink

प्रभुची आई लिपस्टिक वगैरे लावून छान मेकअप करून आली होती. कधीतरी केव्हातरी असं काहीतरी केल्यावर जो एक अवघडलेपणा असतो तो तिच्यामध्ये जाणवत होता. फार गोड वाटली.

अनुश्री खूप कपटी आणि कावेबाज वाटते. समोरचा माणूस संकटात असेल किंवा दुःखात असेल तेव्हा तिचे अविर्भाव खूप विचित्र असतात. तिची आई त्या मनाने खूपच बरी वाटली.

सुपर्णानं दरवाज्यातून एकदम आशा काळे स्टाईलमध्ये मुसमुसत, हुंदकत, धावत येऊन संकेतला मिठी मारली ते फुल नाटकी होतं.

संकेत आणि विशाल नी छान गाणी म्हटली.

प्रभुची फॅमिली आवडली. सूरज त्याच्यापेक्षा मॅच्युअर वाटतोय. बिबॉच्या नेक्स्ट सिझनला ह्याला घ्यायला हव.

राबाची आई राखीबाबत त्याच्याशी बोलताना ' फक्त फ्रेण्डशिप म्हणून ठिक आहे' अस कायतरी बोलली ती, नक्की काय ते कळल नाही.

राखीचा राबाच्या आईला इम्प्रेस करण्याचा आटापिटा बघून हहपुवा झाली. विशाल तिला सुन्दर, सुशील बहू म्हणून चिडवत होता. हा हा हा

राखीचा राबाच्या आईला इम्प्रेस करण्याचा आटापिटा बघून हहपुवा झाली >> हो किती ते अती करायचं.

तन्वि ची आजी फार आवडली, राखीचे सिब्लिन्ग्स ठिक ठाक. सागरने अपेक्षेपेक्षा कमीच ड्रामा केला.

राखीचा राबाच्या आईला इम्प्रेस करण्याचा आटापिटा >> हो फनी होतं ते Happy आधी एकटीनेच पाया पडण्याची , रडण्याची वगैरे प्रॅक्टिस केली Lol
आधी मला आश्चर्य वाटायचे की लोक दीपालीला पोळ्या कच्च्या राहिल्या म्हणतात तेव्हा ती तुम्ही दाखवा कशा भाजायच्या असे म्हणते म्हणजे ते सारकॅस्टिक असावे.
दीपाली नवर्‍याला सांगत होती इथे मी पोहे करायला शिकले, खीर करायला शिकले , आता पोळी पण येते वगैरे. म्हणजे वय ५० वगैरे असून याआधी गरजेइतके ही काम येत नसावे तिला! Uhoh

दीपालीला कसे येईल करता, ती खूप श्रीम्न्त प्रिव्हिलेज्ड घरातली आहे जिथे सगळ्या कामांसाठी स्टाफ असतो Happy
तिच्या रहाणीमानावरून दिसते ती क्लास अपार्ट !
इतर लोक आत्ता सेलिब्रिटी असले तरी मुळात मध्यमवर्गीय बॅक्ग्राउन्ड मधून आलेले आहेत.

काही का असेना, तुम्ही कितीही प्रिव्हिलेज्ड असला तरी चहा पोहे बेसिक स्वच्छता या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत अजिबात.

जरा गॉसिप करते.
दीपाली सय्यद हे तिचं माहेरचं नाव आहे की सासरचं? आणि ती मुस्लिम आहे का? तिचा नवरा बॉबी खान म्हणजे सुनिधी चौहान चा एक्स husband आहे.

ती दीपाली भोसले आहे मुळात, लग्ना करण्यासाठी ऑफिशली ‘सोफिया जहांगीर’ झाली पण अजुनही काम करताना दीपालीच लावते.
तो बॉबी सुनिधीचा एक्स हे माहित नव्हतं !

केतन माडगावकर या इंडेमॉल च्या एका मेकरने अँक्ट राईडरवाल्या मंदारच नाव न घेता ,सिझन चे रिव्ह्यू करणार्या सगळ्यांवर सॉलिड बँशिंग केल आहे पण रोख मंदारवर आहे.बांडगुळ असा ही शब्द वापरला आहे.
याचा परिणाम म्हणून की काय मंदारने गेल्या
दोन दिवसापासून रिव्ह्यू करण बंद केल आहे.
मंदार सतत बिबॉसला बायस्ड वगैरे म्हणत होता.

राबा ची आई आवडलीच मला.. गाणं किती छान निवडलं आणि गायली पण...
तिच्यासोबत गाताना विशाल/सागर्/संकेत चा आवाज जास्त येत होता म्हणुन दिपाली ने त्यांना कमी आवाजात गायला सांगितलं तर ते चिडले तिच्यावर. खरं तर दिपाली चं काय चुकलं ? त्या बाकिच्यांना जॉईन व्हा म्हणाल्या पण तरी लीड व्हॉईस् त्यांचाच असायला हवा.

राखी चे भाऊ बहिण ठीक ठाक. पकडुन आणलेलं का त्यांना ? राखीचा भाऊ पण मजेशीर दिसतो. आता माझा मुलगा यायला लागेल राखीला भेटायला असं म्हणाला.

तन्वी ची आज्जी ९० ची वाटत नव्हती अजिबात. गोड होती. तिचं आणि तन्वी चं नातं मस्त वाटलं. बाकी सगळ्यांना विशाल-संकेत नी गाणी आणि नाच दाखवले पण तन्वी च्या आज्जी ला का नाही ?

सागर ने प्रोमो मधे दाखवली तेवढीच रीअ‍ॅक्शन दिली. बाकी कूल होता. हे प्रोमो फारच मिसलीडींग आहेत बुवा. त्याची बायको त्यालाच ओरडली की राग आवर म्हणुन. आणि चक्क विशाल अनुश्री सोबत रहा म्हणाली. ही कोणतं वेगळं बिबॉ बघते आहे का ? सागर ची मुलगी पण गोड आहे.

संपला एकदाचा फॅमिली वीक. आता जरा टोर्चर टास्क आणा म्हणावं. विशाल अनुश्री लगेच भांडले दुसर्‍या दिवशी.
या आठवड्यात एलिमिनेशन आणि कॅप्टन्सी टास्क नाही का ?

राखीचा राबाच्या आईला इम्प्रेस करण्याचा आटापिटा >> हो फनी होतं ते Happy आधी एकटीनेच पाया पडण्याची , रडण्याची वगैरे प्रॅक्टिस केली >>>> अगदी अगदी. साडी सुद्दा नेसणार होती म्हणे, पण नाही नेसली. साडी कोणी नेसली तर तिच्या सो़कॉल्ड सवतीने - रेवाने ! हा हा हा.

या आठवड्यात एलिमिनेशन आणि कॅप्टन्सी टास्क नाही का ? >>>>> कॅप्टन्सी टास्क आहे. भ्रमाचा फुगा फोडा असा काय तरी टास्क आहे.

up कोण मंदार....
Act riders हे त्याच चँनेल आहे.तो बरीच वर्ष हिंदी,मराठी बिबॉसचे रिव्ह्यु करतो.खूप फॉलोअर्स आहेत त्याचे.
दोन दिवसांपूर्वी रिव्ह्यु करताना त्याने याबद्दल सांगितले आणि म्हणाला की आता रिव्ह्यू करणार नाही.
तो तन्वी आणि राकेशच्या विरोधात होता.
https://youtu.be/wEhx7zLyKSs?si=NE-bSefIUnZlqwvP
केतनची पोस्ट.

डबल एव्हिक्शन मधे कै च्या कै च एलिमिनेशन्स न्युज येत आहेत !
प्रभु आणि संकेत गेले म्हणे ..समहऊ रेवा आणि सागर अजुनही आहेत आणि संकेत सारखा स्ट्राँग प्लेअर गेला असेल हे काही पटत नाहीये Uhoh

कसला बावळट आहे राकेश.आज त्याला साध लिंबू पण बाहेर.काढता आल नाही.तन्वीचा चेहरा असा झाला होता की ह्याला एक सणसणीत द्यायला पाहिजे.

राकेश अगदीच स्पॉईल स्पोर्ट आहे काल एक साधा लिंबू नाही शोधता आला त्याला . आणि त्याला त्याचा काही गिल्ट नाही वाटला , हसत होता . अनुश्री टास्क खेळताना एका वेगळ्याच एनर्जी ने खेळते .
रेवा मूर्ख बावळट गाढव बेअक्कल आहे , मला आवडेनाशी झालीये ती . संस्कृती पण तसाच नमुना होती , काय म्हणून या दोघीना वाईल्ड कार्ड एंट्री दिली देवाला माहिती . मेंगळट आहे एक नंबर, दोन नंबर राकेश बापट .

बाकी मुद्द्यांबदल बोलत राखीने राकेश ला नॉमिनेट केलं तेव्हा त्याचां बोलणं मला पटलं कि कुठे बोलायचं आणि कुठे नाही हे मी ठरवू शकतो , इ प्रत्येक गोष्टीत बोलणार नाही . प्रत्येक मुद्द्यात नाक खुपसून बिग बॉस च्या घरात दिसणं मला पटत नाही .

विशाल पण कित्येक वेळेला वेगळ्या maturity ने खेळतो . मागे तो राखीने स्विमिंग पूल मध्ये कप टाकला होता तो मी काढतो म्हटलं , कोणी भांडी टाकली इ घासतो , टॉयलेट दिपालीने नाही घासले इ घासतो . इव्हन काल राखी विशाल ला ढकलत होती पण विशाल अशा वेळेला पेशन्स दाखवतो खूप .

गेम मध्ये विशालचे कोपर चुकून लागले त्याचा किती प्रपोगंडा केलाय दिपालीने . विशाल ने किती वेळेला तिला सॉरी म्हटलं आहे आधीच . आणि तिचं दुखणं नेमकं कामाच्या वेळेला बरोबर वर येतं . एरवी भांडताना नाही येत . ती एक आवडत नाहीच मला अजिबात .

प्रभू कॅमेऱ्या समोर रडत होता मी वीक दिसतो एकदा पण कॅप्टन झालो नाही , पण जाऊ दे मी विनर ची ट्रॉफी घेऊन जातो असं म्हटला , डोळे पुसले आणि उठला . फार गोड़ वाटलं मला ते . आणि तोंड रंगवून आला आणि राखीला म्हटला मला काही बोलू नको , मी खूबसूरत आहे .

सागर संकेत ठीक ठाक वाटले काल. तन्वी बेस्ट . मला वाटते विशाल आणि तन्वी पैकी कोणीतरी जिंकणार ट्रॉफी.

प्रभू शेवट पर्यंत टिकावा .
शेवटी फक्त तन्वी राकेश आणि प्रभू उरले तरी चालतील , बाकी सगळे जावेत .

Pages