Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राकेश चे एकूण attitude बघता
राकेश चे एकूण attitude बघता असं वाटतं कि एक तर जो जिंकायला आलेलाच नसावा . मेहनत करून जे पैसे मिळतिल ते इथे घरात बसून मिळतील हा साधा विचार, शिवाय तेल फोडणी आणि पब्लिसिटी राखी फुकटात करून देते त्याची . अजून काय हवं आहे ? एक गेम राकेश सिरियसली खेळला नाहीये . एक तर उध्वस्त करायचा किंवा अगदी बिलो ऍव्हरेज सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीत .
इतक्या महत्त्वाच्या आठवड्यात
इतक्या महत्त्वाच्या आठवड्यात किती सोपा Captaincy Task होता तो ही काटाचाच Captain होईल असा Design केलेला. टोळीतील राखी पासून Chain सुरू केल्यावर साहजिकच शेवटी काटाचाच उरणार होता; त्यापेक्षा शेवटी उरलेल्या दोघांमध्ये म्हणजे तन्वी आणि संकेतमध्ये एक Task घ्यायला हरकत नव्हती. दिपालीच्या हाती Power दिल्यानंतर वेगळं काय अपेक्षित करणार? आता प्रभू आणि संकेत बाहेर पडले आहे अशी जी News आहे सोमि वर ती जर खरी असेल तर मात्र यंदा या सीझन ने Favouritism मध्ये हिंदीलाही मागे टाकले आहे असं म्हणायला हरकत नाही. काटा टीम अल्पमतात येऊ नये म्हणून केलेला खटाटोप असेल तो.
. इव्हन काल राखी विशाल ला
. इव्हन काल राखी विशाल ला ढकलत होती पण विशाल अशा वेळेला पेशन्स दाखवतो खूप . >>>>>> अगदी अगदी. त्याची मैत्रीण आहे ती, सो त्याला माहितीये कशी आहे ती. राखीच मात्र अति होत चाललय आता. रेवाला नको इतके टारगेट करतेय. आणि आता हे काय नवीन? मला हात लावू नका म्हणे. विशाललाही म्हणाली की मला हात लावू नकोस, कारण तु पुरुष आहेस म्हणे. एरवी मैत्रींण मैत्रीण म्हणून मिठ्या मारतेच त्याला, इतर पुरुष स्पर्धकान्च्या माण्डीवर त्याच्न्च्या Consent शिवाय बसते, त्यान्च्या पाप्या घेते.
दक्षिणा, प्रभु झाला एलिमिनेट
दक्षिणा,
प्रभु झाला एलिमिनेट
रितेश काय फेकुचंद आहे.काहीही
रितेश काय फेकुचंद आहे.काहीही सांगत होता,वोटिंगचा पँटर्न काय बदलला आहे.लोक ग्रुप्स बनवून एकाच्या बाजूने काय उभे राहतात.
कैच्या कै बोलत होता.
बाप रे प्रभू गेला बाहेर?
बाप रे
प्रभू गेला बाहेर?
आज मी फॅमिली फंक्शन साठी बाहेर होते म्हणून मी रिपिट बघतेय.
मी पण खूप रडले प्रभू गेला
मी पण खूप रडले प्रभू गेला बाहेर म्हणून. मला फार फार वाईट वाटलं.
खरच या सिझन मधे पहिल्यांदाच
खरच या सिझन मधे पहिल्यांदाच फार वाइट वाटलं एलिमिनेशन बघून !
प्रभु या सगळ्या सेलिब्रिटीजच्या गर्दीच एकच खरा नो फिल्टर , सर्वात एन्टरटेनिंग स्पर्धक होता.
रेवा, सागर, दीपाली , राखी या सगळ्यां आधी जाणे तो नक्कीच डिझर्व करत नव्हता.. किती खट्टु झालं होतं लेकरु.. आवंढा गळ्या पर्यन्तं आला तरी रडायचं नाही ठरवलं होतं त्यानी , सो स्वीट !
जाताना शिक्षणावर लक्ष देणार म्हंटला , प्रभुला खूप शुभेछा हेल्थ आणि पुढच्या प्रगतीसाठी !
>>Submitted by सचिन_१० on 28
>>Submitted by सचिन_१० on 28 March, 2026 - 05:05<< +१
संपूर्ण पोस्टशी सहमत. या स्टेजला कॅप्टंसीचा टास्क अटितटिचा करण्या ऐवजी कॅप्टंसी काटा ग्रुपला सिल्वर प्लॅटरवर देउ केली. विशालने पण मूर्खपणा केला. दिपालीला नॉमिनेट करुन त्याने तन्वीला थेट १३व्या (?) आठवड्यात पाठव्लं याचं आश्चर्य वाटतंय. तन्वी ऐवजी दिपालीशी कंपिट करणं त्याला एनी गिवन डे सोप्प गेलं असतं. आज त्याने दिलेलं स्पष्टिकरण हि लेम होतं. चॅनलचा दबाव नाकारता येत नाहि; उद्या ट्रॉफि तिला देउ केली तर तन्वीला मेधा धाडे २.० म्हणता येइल...
मला प्रभूच्या आधी सागर जावा
मला प्रभूच्या आधी सागर जावा असं मनापासून वाटत होतं..आता आज पण संकेतला काढणार आहेत म्हणे म्हणजे पुन्हा सागर safe...तन्वी आणि विशाल हे top 2 ठेवून तन्वीला जिंकवतील बहुतेक...पण सागर आणि दिपाली top 5 मध्ये अजिबात deserve करत नाहीत त्यापेक्षा प्रभूची journey पाहायला मजा आली असती...
अर्र. इतकं इन्व्हॉल्व्ह होऊ
अर्र. इतकं इन्व्हॉल्व्ह होऊ नका. हा सगळा पैशाचा खेळ आहे. हे फक्त करमणुकीसाठी आहे. आणि आपल्या जिवावर , आपल्या भाव नांना हात घालून आणि आपल्या पैशावर चालतं. त्यात भाग घेणार्यांना हे माहीत असतं. तशी तयारी करूनच ते तिथे येतात. आपण का त्रास करून घ्यायचा? आपापल्या आयुष्यात कमी का प्रश्न आहेत? आपल्या अवतीभवती जे चाललंय त्या वास्तवापेक्षा बिग बॉस अधिक अन्यायकारक आहे का? तो प्रभू आता रील्स बनवून पैसे कमवेल.
आयपी एल , सिंगिंग डान्सिंग रिअलिटी शोज बिग बॉस काही लोकांना गरिबीतून बाहेर पडायची संधी देत असतील, तर ते बरंच आहे. पण या सगळ्यांत त्यांच्या बॅकग्राउंडचा वापर केला जातो, हे लक्षात येतंय का?
सगळं माहित आहे भरत पण बिग बॉस
सगळं माहित आहे भरत, पण 'बिग बॉस मराठी' म्हटलं की पाहिल्याशिवाय आणि चर्चा केल्याशिवाय रहावत नाही... क्या करे, आदत से मजबूर
चर्चा करा. मीही काही सीझन
चर्चा करा. मीही काही सीझन पाहिलेत आणि इथे भाग घेतलाय. पण त्यांच्यासाठी रडूबिडू नका. हा करमणुकीचा कार्यक्रम आहे हे लक्षात ठेवा.
काल इथे वाचून मुद्दाम तो एव्हिक्शनचा भाग पाहिला. एक तरुणी कोणीतरी मेल्यासारखं रडत होती.
एक तरुणी कोणीतरी मेल्यासारखं
एक तरुणी कोणीतरी मेल्यासारखं रडत होती.>>>हे मात्र खरं आहे..किती विचित्र रडत होती तन्वी काल...इतकं अति का करतात हे लोकं? तन्वी मध्यंतरी खूप आवडायची पण सगळ्यांनी (मायबोलीवर आणि बिग बॉस मधून बाहेर आलेल्या सगळ्यांनी)
)
तिला फेक म्हटल्यामुळे की काय मला पण आता ती नाटकीच वाटत आहे..(किंवा माझे डोळे उशिरा उघडले असतील
पण तरीही इतर कोणापेक्षा तीच ट्रॉफी deserve करते
या सिझन मधे कोणीच मन नाही
या सिझन मधे कोणीच मन नाही जिंकलं, कोण्याच्याच जिंकण्याने आनंद होणार नाहीये.
तरीही ट्रॉफी साठी मला फक्तं विशाल डिझर्विंग वाटतो, पण मासेस ला तो माणुस म्हणून नाही आवडत, त्याची पर्सनॅलिटी, अॅटिट्युड नाही आवडत बर्याच लोकांना !
तो डे १ पासून फोकस्ड आहे , दुसर्यांचे गेम्स डिकोड करतो,स्वतःचा गेम तर टॉपनॉच आहेच.. प्रत्येक टास्क जीव लाऊन खेळतो, फिटनेस मधे नं १ आहे शिवाय डोकेबाज पण आहे, प्लॅनिंग प्लॉटिंग/ स्ट्रॅटजीज सगळ्यात अव्वल आहे.
त्याच्या बोलण्यात कधीच अपशब्दं/शिव्याही नसतात .
तो जिंकणे डिझर्व करतो पण तसेही नॉन मराठी व्यक्तीला नाही जिंकु देणार बिगबॉस, तन्वी फिक्स्ड विनर !
दिपांजली अगदी सहमत. विशाल
दिपांजली अगदी सहमत. विशाल मस्त focused आहे. सेकंड विनर करतील बहुधा त्याला.
सागर रेवा आणि दीपाली पैकी कोणी गेलं तर मी आनंदाने नाचेन. संकेत चिक्कार चांगला आहे या तिघांच्या तुलनेत.
संकेतही झाला एलिमिनेट, रविवरी
संकेतही झाला एलिमिनेट, रविवरी अजुन एक एलिमिनेशन आहे !
खरच या सिझन मधे पहिल्यांदाच
खरच या सिझन मधे पहिल्यांदाच फार वाइट वाटलं एलिमिनेशन बघून !
प्रभु या सगळ्या सेलिब्रिटीजच्या गर्दीच एकच खरा नो फिल्टर , सर्वात एन्टरटेनिंग स्पर्धक होता. >>>>> सहमत
प्रभू चांगला खेळत पण होता बर्
प्रभू चांगला खेळत पण होता बर्याच टास्क मध्ये त्याने त्याचे 100% efforts टाकले...(राकेश तर प्रयत्नही करत नाही)अजून चांगला खेळला असता पण सागरने त्याला खूप झापले..धक्क्यावरही त्याला समोरच्याचा आदर करावा असे सांगण्यात आले तेव्हापासून तो कोषात गेला ,सारखा तन्वीच्याच मागे मागे करायचा त्यामुळे त्याचा screen time सुद्धा कमी झाला...अजून खुलून खेळला असता तर खूप entertain केलं असतं प्रभूने...
प्रभूला कलर्स, स्टार प्रवाह
प्रभूला कलर्स, स्टार प्रवाह दोघेही काहीना काही प्रोजेक्टस देतीलच. इथे वाचून प्रभू शेवटपर्यंत हवा होता असं मात्र वाटलं.
इथे वाचून मलाही विशाल जिंकावा असं वाटतंय. मी पहिला विकेंड वार बघितला, नंतर अजिबातच काही बघितलं नाहीये. राखी तन्वीला ट्रॉफीबद्दल काही म्हणाली असेल तर ती विनर हे टीमने कधीच ठरवलं आहे कारण ती केळकरला असं म्हणालेली आणि तो जिंकलेला.
उगाच गुंतून, डोक्याला ताप होतो मग इथे येऊन अति लिहिते मी, थोडक्यात लिहिणं जमत नाही. यावर्षी बघण्यासाठी तेवढा वेळ देणंही मला शक्य नव्हतं, इथे वाचते आवर्जून. एकंदरीत वाचून न बघण्याचा योग्य निर्णय घेतला असं वाटतं.
जमलं तर फॅमिली बघेन प्रत्येकाची.
गंडलाय सिझन. जर पब्लिक ने
गंडलाय सिझन. जर पब्लिक ने संकेत ला नाही व्होट केले तर रेवा ला कसे काय केले. बघणारे बावळट आहे जणू.
यांनी एवढा प्रयत्न करूनही विशाल व्हिलन दिसलाच नाही. तन्वी ला हिरोईन करण्यासाठी रूचितासारखी फीट, एनर्जीएटिक पोरगी घालवली तेही ससा सारख्या मठ्ठ मुलीला वाचवून
तो किळसवाणा राकेश नक्की का टिकून आहे. जंटलमन कुठल्याही एंगलने वाटत नाही. याचे कोण व्होटर असतील. प्रभूच्या मागे सहानुभूती व ग्रामीण भागातील मते दणकट असतील. तरी तो बाहेर. हे मख्ख माकड आत
विशाल जिंकलेला बघायचे आहे पण नाही जिंकणार. सागर ला मी दिपाली व बापट च्या वर बघते. त्याचा गेम खूप नसला तरी यांच्या पेक्षा बराच बरा होतो
एवढा निराशाजनक सिझन आहे हा. निव्वळ सवयीमुळे बघितला जातो. पण कुणीही बघण्याच्या लायकीचा नाही
रेवा, दीपाली, सागर ( खरं तर
रेवा, दीपाली, सागर ( खरं तर राकेश पण)सोडून संकेत ला काढणे अनाकलनीय आहे! फारच ऑब्व्हियस फिक्सिंग आहे बिबॉ चे.
प्रभू चे अपेक्षित होते तसे. राखीला पाठवायचे होते आता घरी.
संकेत मधे पोटेन्शियल होते टॉप ५ मधे जाण्याचे. तन्वी, विशाल, अनुश्री, राकेश आणि राखी किंवा सागर हे टॉप ५ मधे असतील असे आता वाटते. गेम बघता विशाल, तन्वी, अनुश्री हे टॉप ३ असायला हवेत .
संकेत टिकला असता तर विनर पण
संकेत टिकला असता तर विनर पण झाला असता. जवळपास सगळ्याच प्रेक्षकांना तो लगेच आवडला. तन्वी ला जिंकवण्यासाठी सगळा आटापिटा सुरू आहे.
या वेळी चॅनेल ने सगळे स्क्रिप्ट आधीच लिहिले , प्रेक्षकांना सिरीयल बघितल्या सारखे बघा म्हणतात
तो नेहा शितोळे वाला सिझन बराच बरा होता मग. मी त्याला सर्वात खराब समजत होते, पण त्यावेळी चॅनेल जास्त प्रामाणिक होता
राकेश बापट एक नंबरचा मिळमिळित
राकेश बापट एक नंबरचा मिळमिळित. कोण जाईल असं विचारलं तर त्याचं पण उत्तर धड दिलं नाही. मेंगळट माणूस. बेसिकली त्याला आकळणशक्ती कमी आहे पण तो चतुराईने ती कमतरता झाकून टाकतो. (झाकली मूठ)
मलाही उरलेल्या लोकांमधे राकेश
मलाही उरलेल्या लोकांमधे राकेश सर्वात अनडिझर्विंग ,अत्यन्त पुचाट, स्पाइनलेस माणुस वाटतो !
ना त्याला बोलता येत ना काही फिजिकल टास्क्स, सर्वात ओव्हरहाइप्ड, वर्थलेस !
काल विशाल अहंकार या
काल विशाल अहंकार या शब्दाबद्दल व्यक्त झाला ते फार बरं झालं. कारण तो जितका मी मी करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक ती गोष्ट रंगवली गेली घरात. लाल बादशाह/ खुद की लाल बादशाह ही बिरुदं त्याला आवडली नव्हती पण त्याने ते हसण्यावारी नेलं.
स्ट्रॉंग आणि सेल्फ मेड लोक असतात त्यांना जनरल पब्लिक अहंकारी, आगाऊ म्हणतातच.
विशाल का जिंकला नाही यासाठी
विशाल का जिंकला नाही यासाठी आत्ताच नरेटिव सेट करत आहेत बिबी , तन्वी आणि अनुश्रीच्या कडून !
विशालचा किरण माने होणार.
विशालचा किरण माने होणार. म्हणजे व्होटिंग मिळाले तरी नाही च मिळाले म्हणून चॅनेल खोटे बोलणार.
तन्वी ने राकेश दिपालीला संपूर्ण इग्नोर केलय गेले दोन आठवडे. अनु श्री तन्वी स्टाईलने खेळायचा प्रयत्न करते पण त्यामुळे बावळट नाही तर कपटी दिसते.
त्याउलट सागर प्राजक्ता डोक्याने खेळत निव्वळ लॉयल्टिवर बरेच चांगले दिसले
काटाला मेघा धाडे टिम करण्यात बिग बॉस अयशस्वी ठरले कारण तेव्हा लोकूर, जोग फार हुशार होते. मठ्ठ दिपालीला, किळसवाणा राकेश ला घेऊन तन्वी मेघा कशी होईल. बरं समोरचे पण तयारीचे आहेत, कुणीही खलनायक व्हायला तयार नव्हते, अगदी रुचितापण भांडकुदळ असली तरी मनानं स्वच्छ वाटायची.
बिग बॉस ने गेम नॅचरल ठेवला असता तर जास्त चांगला झाला असता सिझन
दिपाली महामठ्ठ बाई गेलि
दिपाली महामठ्ठ बाई गेलि पाहिजे या आठवड्यात.
सोमीवर वाचल, विशाल- राकेश
सोमीवर वाचल, विशाल- राकेश मध्ये मारामारी झाली म्हणे.
Pages