Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज बिबॉसला काहीही करून दीपाली
आज बिबॉसला काहीही करून दीपाली हवीच होती.म्हणून संकेतला पॉवर दिली आणि ती नॉमिनेट झाली.
जर बझर राऊंड घेतला असता तर राखी किंवा अनुश्रीपैकी एक कोणीतरी झाल असत.
राबाला फूटेज मिळवून देण्यासाठी राखी आणखी किती दिवस आणि कायकाय करणार?
कंटाळा आला.
हे कमी होत म्हणून की काय राबाच्या बहिणीने पण आता इंटर्वह्यू दिला आहे.राबाची बहीण छान आहे
पण फार सिंपथी घेत आहे अस वाटल.
राखीचा खूप कंटाळा आला आहे पण आज ती नसती तर काय दाखवल असत असही वाटत.
संकेत स्टार प्रवाहचा पण
संकेत स्टार प्रवाहचा पण रेग्युलर चेहरा आहे.तो तसही असेल टॉप 5 मध्ये. >>> ह्याला आधीच घ्यायला हवं होतं.
मलाही वाटतय कि बिबॉला प्रभुला
मलाही वाटतय कि बिबॉला प्रभुला काढायचय
खरं तर रेवा आणि ससा /ससा आणि सागर गेले पाहिजेत , काहीच गेम नाहीये त्यांचा !
राकेश आणि दीपाली ने काल
राकेश आणि दीपाली ने काल मुद्दाम ट्विनिंग केलं होतं . बाथरूम मध्ये दोघे डोळे मिचकावताना दाखवले .
राखी विनाकारण रेवाला सतत टार्गेट करत राहते त्या राकेशसाठी . मला वाटतंय राकेश ने राखीला स्पष्ट समजावलं असणार , फक्त आपल्याला जे फुटेज दाखवतात त्यात मात्र तो मुळूमुळू बोलतोय असं दाखवतात . राखी तरी इतक्या सोळा वर्षाच्या मुलीसारखं का वागतेय देव जाणे .
दीपाली आग लावण्यात एक नम्बर आहे , ती जिंकलेली अजिबात आवडणार नाही मला . राखीला भडकवते राकेश ला जाऊन विचार , रुचिताला पण भडकवायची कि तू बरोबर प्रश्न विचारलास म्हणून . आणि राखीला रेवावरून पण भडकवते.
पण काल राखीने जाम बोअर केलं . मी स्वयंपाक करताना इथे कोणी फिरकायचं नाही म्हणे , हि काय फालतुगिरी आहे ? ती रेवा बिचारी पोट दुखत होतं म्हणून कळवळत होती अगदी स्पष्ट कळत होतं . पण आपल्या drama पायी आपण कोणाशी तरी इंसेन्सिटिव्ह वागतोय हे कळू नये ? चहात वांगं टाकणं , अख्खी भाजी फेकणं किती इम्पल्सिव्ह .
राखी किती ऑबव्हियस्ली सगळं
राखी किती ऑबव्हियस्ली सगळं प्लॅन करून खोटं करतेय, पुन्हा एकदा ‘द राखी सावन्त शो‘ झाला आज !
२ दिवस फुटेज नाही मिळालं, स्क्रिप्टेड भांडणं नाही सांगितल्यामुळे तिने एकटीचीच स्क्रिप्ट लिहिली आणि परफॉर्म केलं, अख्खं घर डोक्यावर घेतलं, अख्खा एपिसोड खाल्ला !
बाकीचे लोक तरी कशाला तिला रिअॅक्शन्स देतात ? कशाला जाऊन समजावतात तिला.. इग्नोअर मारायचं कि..अजुनही माहित नाही का त्यांना ती कशी आहे !
Btw, रेवाला ती 'चिन्चपोकली टु चायना ; म्हंटली तेंव्हा हहपुवा झाली
काल दिपाली एक फुलपाखरु (
काल दिपाली एक फुलपाखरु ( रुचिता) बोक्याच्या प्रचण्ड प्रेमात होती म्हणाली तेव्हा विशाल अपसेट झालेला दिसला.
ससा एण्टरटेन्गिग होती टास्कमध्ये
सागर चहयेद्या चा कॉमेडी टू ईमोशनल परफॉमर्न्स टास्कमध्ये करत होता.
गेम संपत आला तरी कोणीच
गेम संपत आला तरी कोणीच जिंकावं असं वाटत नाहीये त्यातल्या त्यात तन्वी जिंकली तर बरं होईल.. ती पण फेकच वाटते पण काहीतरी खेळते तरी. राकेश बापट जर जिंकला, तर जीव तोडून टास्क खेळणाऱ्यांवर अन्यायाच होईल. अनुश्री हुशार आहे, गेम चांगला खेळते पण एक माणूस म्हणून ती कधीच अपील झाली नाही त्यामुळे ती जिंकलेली सुद्धा नाहीच आवडणार..सागर, दिपाली बद्दल तर काय बोलायलाच नको. यावेळी बहुतेक संस्कृती आणि सागर जाईल असं वाटलं होतं पण सागर काल चांगला खेळलाय तर काय माहिती कोणाला काढतात?
राखी सावंत आणि राकेश बापट खूपच बोअर करत आहेत राकेश बापटमध्ये असं कायच आहे जे की सगळ्या पोरींना तो आवडतो,विशाल मात्र खूपच मागे लागलाय रेवाच्या. रुचिता असती तर जरा वेगळा कंटेंट तरी भेटला असता.
मोक्षू अगदी अगदी. मला तर
मोक्षू अगदी अगदी. मला तर इतकं बोर झालं काल.
दीपाली डोक्यात जाते. राकेश बरा वाटायचा. या वेळेला एकही खेळाडू इंट्रेस्टिंग नाही.
कंटाळवाणे दिवस चालु आहेत...
कंटाळवाणे दिवस चालु आहेत... राखी आणि ससा जातील यावेळी असं वाटतंय...राखी नॉमिनेटेड नसली तरी काहीतरी कांड करुन जाईल...कारण तिचा अवतार समाप्त व्हायची वेळ आली आहे.. सागर जायचे पण चान्सेस आहेत असं वाटतंय...
संकेत ला मुद्दाम विशाल टीम सोबत खेळायचं असं सांगुन पाठवलं असावं. काटा टीम आणि तन्वी चांगले दिसावेत म्हणुन मेकर्स ची सेटिंग असेल.
कारण बाहेरुन जो माणुस विशाल चा गेम बघुन आलाय तो विशाल सोबत गेला हे पटत नाही. विशाल ला टीव्ही वर निगेटिव्ह दाखवत आहेत हे संकेत ला माहिती आहे. त्याला जिंकण्यासाठी नव्हे तर कोणालातरी जिंकवण्यासाठी च पाठ्वलं आहे.
बाकी काल संकेत आणि विशाल ने मुलींवर केलेले शक्तीप्रयोग सोमी वर लोकांना अजिबात आवडले नाहियेत. खुप शिव्या पडल्या आहेत दोघांना. संकेत आणि विशाल ला भिडवा की. मुली विरुद्ध हे दोघे दांडगट असले तर अशा टास्क मधे तेच जिंकणार. तन्वी,रेवा, दिपाली ने मस्त टफ फाईट दिली बाकी. राबा सारखं अवसान गाळुन बसल्या नाहीत.
तन्वी चं काही कळेनासं झालंय. कधी फेक वाटते कधी खरी वाटते. बघणारेच आता गोंधळलेत. मला ती कधी आवडते आणि कधी नाही.
प्रभु चं पण तेच. तो आवडतो जेव्हा मस्त उत्तर देतो समोरच्याला तेव्हा. पण तो जिंकावा असं अजिबात वाटत नाही.
राकेश काल रेवा बद्दल हळूच
राकेश काल रेवा बद्दल हळूच काहीतरी बोलला राखी जवळ. कोणाजवळ काय बोलावं ही गोष्ट त्याला कळू नये?
राखी आता घरभर करेल. ही घर कसं आहे त्याला माहिती असायला हरकत नाही कारण तो पूर्वी खेळून गेला आहे.
काल दीपाली साडी नेसून आल्यावर राखीने तिची जी काही टर उडवली, फार मजा आली मला. (चुकीचे आहे मला माहिती आहे.) पण दीपाली आवडत नाही त्यामुळे तिला तसच पाहिजे. छिद्रान्वेषी आहे एक नंबर.
राखीचा आता खरच कंटाळा येत आहे
राखीचा आता खरच कंटाळा येत आहे.अर्थात तिच्याकडे आता देण्यासारखा काही कंटेंटही नाही.
म्हणून मग राखी,राकेश आणि रेवा ,3आर ट्रँगल केला आहे आणि दीपाली व्हँम्प.ते ही बोअर होत आहे.
एवढा राडा करून ,फेकाफेकी करूनही राखीला काढत नाहीत म्हणजे अजून फँमिली वीक पर्यंत बिबॉसला राखी हवी आहे.
राकेश तसाही गेम खेळतच नव्हता .पण आता तर बघवतही नाही.
या आठवड्यात बिबॉसने कुणाला काढायच ठरवल आहे,त्याला काढतील पण संस्क्रुती आणि सागरचे चान्सेस जास्त वाटत आहेत.
आजचा धक्का फक्त जर संकेत आणि
आजचा धक्का फक्त जर संकेत आणि विशालवरच होता तर त्यांनाच बसवायच .बाकीच्यांच काही कामच नव्हत.
नंतर मग फिनँले करून तन्वी आणि राकेशला बोलावून ट्रॉफीपण देऊन टाकायची.कशाला पाहिजेत टॉप 10.
तसही आधीच सिझन गटांगळ्या खात आहे.
त्यात पुढच्या शनिवारपासून आयपीएल चालू होत आहे.म्हणजे धक्का पण बुडणार आणि शोही.
त्यापेक्षा सिझन सिक्स आहे आणि विनर फिक्स आहे .मग उद्याच फिनँले उरकून घ्यायची.
सध्या जसा गेम चालु आहे, मला
सध्या जसा गेम चालु आहे, मला खरच विशाल, सन्केत आणि अनुश्री टॉप ३ वाटतात !
उगीच टोळी फोडायचा अजुन एक प्रयत्नं केला आजही , त्यांचा गेम स्ट्राँग आहे म्हणून!
काटा इतकी फालतु टिम आहे, त्यात या सिझनची फिक्स्ड विनर आहे म्हणून त्यांना चढवतात.
त्या युसलेस राकेशला खरच बाहेर काढा, ना त्याला बोलता येत, ना स्ट्रॅटेजीज जमत, ना फिजिकल टास्क्स आणि सोअर लुजर बिहेविअर !
फार फार ऑब्व्हियसली बायस्ड
फार फार ऑब्व्हियसली बायस्ड झाला आहे सीझन. धक्क्यावर रितेश ला तन्वी चे कौतुक करायलाच पाठवतात की काय असे वाटते.. राकेश ला पण काय हिरो बनवतात सतत. फालतू प्लेयर.
विशालचा गेम आणि बाकीच्यांचा यात बालवाडी ते ग्रॅजुएट इतका फरक आहे, त्याचे फार कधी कौतुक होत नाही. काल तो म्हणाला पण कौतुकाची १० आठवडे वाट पाहिली म्हणुन. संकेतला सुद्धा निगेटिव दाखवण्याचा प्रयत्न करूनही तो स्ट्राँग प्लेयर दिसतो आहे. तरी सतत त्याला धक्क्यावर टार्गेट करतात. सुरुवातीपासून असता तर खुप चांगला गेम बघायला मिळाला असता . अजूनही बराच पुढे जाऊ शकतो.
****अवांतर
****अवांतर
मी एक पॉडकास्ट बघत होते, अमुकतमुकचे भावंड आहे. (गुन्हेगार कोण) त्यात मला राखी व्यक्ति म्हणून किती चांगली आहे ते समजलं. लैला खान नावाची एक बी ग्रेड actress होती. तिची संपूर्ण फॅमिली एके दिवशी इगतपुरी ला पार्टी करायला फार्म हाऊस वर गेली आणि गायब झाली. पण राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांनी पाठपुरावा करून पोलिसांकडून ही केस सॉल्व करून घेतली. अन्यथा कोणाला ते संपूर्ण कुटुंब गायब झालं आहे याबद्दल काहीही पडलेलं नव्हतं.
संस्कृती गेली मला फार आवडलं.
संस्कृती गेली मला फार आवडलं. येताना तिने जो काही आव आणला होता त्यापेक्षा पूर्ण फुसका बार निघाली. मूर्ख बावळट गाढव चाइल्ड कार्ड एंट्री.
सागर तंटा रूम मध्ये फारच ढासळला होता. अभिनय वाटला मला तो. उगीच इतका आव आणायचा इमोशनल ड्रामा सगळा. जिथल्या तिथे बोलता येत नाही त्याचा स्वत:चा दोष आहे, शिकलं पाहिजे त्याने आता वयाच्या या टप्प्यावर.
मला तन्वी, राकेश, प्रभू, आणि अनूश्री यापैकी कोणीही जिंकले तरी आवडेल.
मला तन्वी सोडून कोणीही जिंकले
मला तन्वी सोडून कोणीही जिंकले तरी आवडेल या पॉइन्टला , इतकी अनॉयिंग होतेय !
सागर तर ओव्हरअॅक्टिंगकी दुकान !
नक्की या सीनची तयारी करून आला होता, त्याला नक्की आधीपासून सांगितले असणार हा “परफॉर्मन्स” द्यायला..नाहीतर त्याला एकट्यालाच का हे टास्क दिले ?
संकेत चांगला स्मार्ट म्हणता म्हणता आज त्यानेही टास्क न करून वेडपटपणा केला !
भाऊ आणि संपूर्ण क्रिएटिव्ह
भाऊ आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीम ह्यांना पहिले काढून.दुसरे घ्या आणि जमत नसेल तर मग शो बंद करा.
क्रिएटिव्ह टीमच्या बुध्दीची कीव येते,सिरियल लिहिणार्यांना घेतात का हे लोक.
ज्या राखीने ऑलरेडी सांगितल आहे की तिला कँप्टन व्हायच नाही,त्या राखीला भाजी फेकली म्हणून शिक्षा काय दिली तर संपूर्ण सिझन ती कँप्टन होऊ शकणार नाही.
हसाव की रडाव हेच कळत नाही ह्या शिक्षेवर .
राखीपण मनातल्या मनात म्हणत असेल की कुठून आले मराठी बिबॉसमध्ये.
रविवारचा फन डे मी बघतच नाही.
पण संस्क्रुती एव्हिक्ट झाल्याच आधीच कळल होत आणि ती तशीही जाणारच होती.
गुडीपाडव्याच कारण देऊन मल्टीपल एव्हिक्शन कँन्सल केल बिबॉसने तेव्हा वाटल की राखी नॉमिनेट नसतानाही शिक्षा म्हणून तिला काढतील.पण फालतू शिक्षा देऊन राखीच्याच मनासारख तर केल.
मग नक्की बिबॉसला कोण हव होत संस्क्रुतीबरोबर,बाकी सगळेच तर नॉमिनेट होते की ते पण आता ठरवता येत नाही.
या वीकमध्ये आता विशाल सेफ असल्याने संकेत,रेवा,अनुश्री,दीपाली ,प्रभू किंवा सागर,राखी नॉमिनेट होतील.
राखीला काढायच ठरल तर मग राखी रेवा ,राखी सागर,राखी दीपाली यापैकी एक जोडी जाईल.
खरतर पहिले राकेशला काढल पाहिजे.उगाच ठेवल आहे.
सागरला वाटलं की तो जाण्याचे
सागरला वाटलं की तो जाण्याचे chances आहेत...मग काय चालू नाटक मला काढा म्हणून आणि ती acting तर जरा बरी करावी पण नाही over पेक्षा over अॅक्टींग....अज्जिबात आवडला नाही कालचा एपिसोड fast forward करून 15 मिनिटात संपवला..शनिवारी तर बघायची ईच्छाच होत नाही इतकं बोअर करतो रितेश...
मी सागरच्या acting बद्दल
मी सागरच्या acting बद्दल घाबरत लिहिलं. पण सगळ्यांनाच तो ड्रामा वाटला हे बघून हायसं वाटलं.
राकेश पण पार पिचका निघाला. सुरुवातीला विशाल त्याच्याबरोबर जे वागायचा ते मला आवडायचं नाही पण आता वाटतं बरोबर होतं ते कधी कधी. मी आता दमलोय मला काहीच बोलायचं नाही या मथळ्याखाली सारखं सगळीकडून अंग काढून घ्यायचं. ती प्राजक्ता पण सेम तशीच . आणि त्या दिव्याचा तर swag वेगळाच होता . मी वैचारिक ठेवा घेऊन इथे आले होते , तुम्हाला मी काय बोलते कळणार नाही अशा मखलाश्या करत शेवटी घराबाहेर गेली .
सागर बर्याच दिवसां पासुन
सागर बर्याच दिवसां पासुन आतल्याआत कुढत होता. म्हणुनच बिबॉ ने त्याला वेंट आउट होण्याची संधी दिली असावी. मला त्याचं फ्रस्ट्रेशन जेन्युइन वाटलं. त्याचा परिणाम तन्वी, दिपाली यांच्यावर झालेला दिसुन आला.
संकेत इज अॅन इडियट. चुगली ऐकल्यावर तो इतका का हलला हे अनाकलनिय आहे. आता विशालवर डुख धरुन तो कट्टा गँङकडे गेला तर त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी होणार आहे. वेळीच सावरला तर ठिक, नाहितर बाहे जाइल..
माझ्यामते विशाल, सागर आणि अनुश्री टॉप थ्री मधे जातील...
सुरुवातीला विशाल
सुरुवातीला विशाल त्याच्याबरोबर जे वागायचा ते मला आवडायचं नाही पण आता वाटतं बरोबर होतं ते कधी कधी. >>>exactly ,राकेशला मी बरेचदा नोटिस केलंय...मुलींना तो चुकीच्या पद्धतीने hug करतो...राखीला पण झुलवतो ,तन्वीच्या पायावर पाय पसरून बसतो यावरून तर राकेश बिलकूल gentleman वाटत नाहिये..आणि टास्क खेळण्यामध्येही बोंबच आहे...आणि लक्षात आल्यावर सुधारणा करायची सोडून स्वतःच्याच group ला नल्ला वगैरे म्हणतो...मला पण आवडत नाहीये राकेश...रेवा छान वाटते.बोलते पण मुद्देसूद..आज nomination टास्कमध्ये छान बोलली ती...तिचं nomination पण स्पोर्टिंगली घेते ती. विशाल किती विचित्रपणे flirt करतो रेवा बरोबर..
दिपालीच्या साड्या आणि दागिने खरंच मस्त असतात..पण अकराव्या आठवड्यात येऊनही तिला game कळला नाहिये फक्त personal grudges काढते आणि कोणी काही बोलले की डोळ्यातून पाणी काढते...आज तिने अनुश्रीला चक्क पोळ्यांच्या मुद्द्यावरून nominate केलं...उद्या फॅमिली येणार म्हणजे सागरचा over ड्रामा बघायला तयार रहा मंडळी...आता तर over acting सोबतच over confidence पण आलाय साहेबांना..
दीपाली महामूर्ख बाई . इतके
दीपाली महामूर्ख बाई . इतके आठवडे झाले , वयाने इतकी मोठी आहे तरी नॉमिनेशन टास्क मध्ये प्रत्येकाच्या तोंडी लागते , फालतू वाद घालते , आणि शेवटी रडते . अनुश्रीने मस्त मजा घेतली आज तिची .
शिरखुर्मा राखीने भरवायला हवा असा अट्टहास करण्याची राकेश ला काय गरज होती ? तो विनाकारण fueling करतो आणि नंतर राखी काही वागली कि फक्त तिच्याबद्दल कन्सर्न आहे असं म्हणून गप्प बसतो . अरे मग तू स्वतः तिच्यापासून २ हात लांब रहा ना . पण ते नाही . त्याला सुद्धा ते अटेन्शन आवडतंच .
तन्वी ला कोणीही नॉमिनेट केलं नाही (नाही ना केलं ? ) याची कमाल वाटली . पण ती चांगलं खेळतेय. गेले चार आठवडे तिच्यात खूप मृदुपणा आलाय . आणि तिची फिगर फार छान आहे मला फार आवडते .
राखीला कोणीही नॉमिनेट केल
राखीला कोणीही नॉमिनेट केल नाही.म्हणजे राखीला बिबॉसला टॉप मध्ये न्यायच आहे.तिला टॉप 6मध्ये नेल तर मग संकेत प्रभू ,दिपाली यांच्यापैकी एकारा जागा गमवावी लागेल.
या वीकमध्ये सागर जाईल आणि डबल असेल तर दिपाली किंवा प्रभू जातील.रेवाला ठेवतील अस वाटत आहे.
राखी कोणाची कठपुतली नाहीच आहे
राखी कोणाची कठपुतली नाहीच आहे, उलट तिचीच कठपुतली सगळेच जण आहेत !
तिच्या व्यतिरीक्तं बिबीला फक्तं विशाल आणि तन्वी हे गृपचे म्होरके सेफ हवे होते.
बिबीला प्रभु किंवा संकेतलाच काढायचय असा क्रायटेरिआ होता, खरं तर तो युसलेस सागर जायला हवा !
सागर किती अॅग्रेसिवली आरडाओरडा करतो मुलींवर ..अक्षर्शः सायको वाटतो .. विशाल वर आवाज चढवायची हिंमत नाही!
हा Season 6 इथं Winner फिक्स
हा Season सिक्स आहे, इथं Winner फिक्स आहे. जो स्पर्धक बाहेर पडतोय तो तन्वी किंवा राकेशच जिंकणार आहे असं म्हणत आहे. परवा राखी तन्वीच्या पारड्यात वजन टाकताना म्हणाली देखील की मला तू तिथे रितेशजवळ दिसत आहेस ट्रॉफी घेताना. हिंदी मध्ये जसा Favoritism असतो तो बहुतेक पहिल्यांदाच मराठीत दिसतोय. अगदीच वादंग नको असेल आणि पुढचा Season आणायचा असेल तर त्यातल्या त्यात कमी वादग्रस्त स्पर्धकाला जिंकून देतील शेवटी जसं तिथं गौरव खन्नाला जिंकवलं.
हा Season सिक्स आहे, इथं
हा Season सिक्स आहे, इथं Winner फिक्स आहे. >>>>
पर्फेक्ट बोललात! बोअर झाला आता हा सीझन. आता हा आठवडा फॅमिली ड्रामा असेल तर बघणारच नाही मी .
तन्वी ला कोणीही नॉमिनेट केलं नाही (नाही ना केलं ? ) याची कमाल वाटली >>> अग ती जाणार नाही प्रत्येकाला माहित आहे तिथे . मग नॉमिनेट करून उपयोग काय. आपण नॉमिनेटेड असलो तर लोकांना आपल्यापेक्षा वीक कन्टेस्टन्ट जो आपल्या आधी जाईल त्यालाच नॉमिनेट करायचे असते. तन्वी किंवा विशाल ला नॉमिनेट करून कुणाला फायदा नाही.
वोटिंग आज बंद ठेवल आहे.अशी
वोटिंग आज बंद ठेवल आहे.अशी सोमिवर बातमी आहे.
कदाचित उद्याही बंद असेल .म्हणजे या आठवड्यात नो एव्हिक्शन.
सागर दीपालीला आणखी एक आठवडा मिळाला.
फँमिली वीकमुळे कँप्टन्सी टास्क झाला नाही तर पुढच्या आठवड्यात कँप्टन नाही.
म्हणजे हेच लोक पुढच्या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये.
म्हणजे काय मिडवीकला एक आणि धक्यावर दोन असे तीन काढणार की काय बिबॉस?
जर असच असेल तर तन्वी विशाल आणि राखी सेफ केले बिबॉसने.
सर्वात फेक आठवडा सुरु झाला,
सर्वात फेक आठवडा सुरु झाला, फॅमिलीविक अनाउन्स झाल्या झाल्या रडायला सुरवात लोकांची


वाइल्डकार्ड तर आत्तच आलेत, तरी संकेत आणि रेवाची रडारड !
सागर तर भयंकर मेलोड्रामा करणार आहे, फॉर्व्वर्ड करणार मी त्याचा पार्ट !
रेवाच्या बहिणी रेवासारख्याच सुंदर चवळीच्या शेंगा होत्या
विशालचे वडिल क्युट होते.
सन्केतची बायको अशी हळदीकुंकवाला आल्या सारखी का आली होती आणि संकेतनी स्किन कलरची स्ट्रेचेबल बॉडी हगिंग ट्राउझर का घातली होती
पण बोलायला संकेतची बायको सॉल्लिड स्मार्ट, हुषार आणि टेलेन्टेड पण वाटली , संकेतला सल्लाही बरोबर दिला आणि विशालला मस्तं कन्फ्रन्ट केलं , पुढच्या वर्षी बिबॉ मधे येणार नक्की !
वर्षा उसगावकरची नक्कलही मस्तं केली , ती पण टी व्ही सिरीयल मधेच काम करते कि नाटकात ?
सुपर्णा श्याम खेडेकर हे तिच
सुपर्णा श्याम खेडेकर हे तिच नाव आहे.माझीया प्रियाला प्रीत कळेना मध्ये अभिजित खांडकेकरच्या मोठ्या बहिणीच काम केल होत.नंतर स्टार प्रवाहचा रेग्युलर चेहरा होती.
प्रवाहच्याच एका सिरियलमध्ये ती आणि संकेत मेन लीड होते.
सिझन 5मध्ये परफॉर्मर म्हणून आली होती तेव्हा सुध्दा वर्षा उसगावकरची अँक्टिंग मस्त केली होती.
Pages