बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना, भाऊचा शेवटचा धक्का भयाण बोरिंग झाला. काहीही करमणूक नाही! राकेश ची शायरी ऐकवेना. सगळेच भयानक मेक अप आणि गॉडी कपड्यात दिसत पण अगदी बेक्कार होते.
राखी गेली त्यामुळे येता आठ्वडाही बोअर च असणार आहे. आता जर्नी दाखवतील सगळ्यांना. गुड लक टू बिबॉ टीम, राकेश, रेवा सारख्या स्पर्धकांची जर्नी कशी इन्टरेस्टीम्ग दाखवणार काय माहित. त्या तन्वीची फेक जर्नी बघण्याची इच्छाच नाहीये. पण विनर साठी दुसरा चॉइस ही नाहीये.

माझी खूप इच्छा आहे की तनवी जिंकू नये. तिचा भ्रमनिरास झालेला मला बघायला आवडेल. विशाल जिंकला तर या सगळ्यांची नाकं ठेचली जातील.

माझी खूप इच्छा आहे की तनवी जिंकू नये. तिचा भ्रमनिरास झालेला मला बघायला आवडेल. विशाल जिंकला तर या सगळ्यांची नाकं ठेचली जातील.
<< +11111

राकेश ने काल तन्वी ला काटा मध्ये पुन्हा अडकवला, स्वत नंतर न्युट्रल खेळला ती मात्र काटा चाटा करत भयंकर वाईट दिसली. जिथे मौज मजा करायची होती तिथे गृप गेम असल्यासारखे खुन्नस देत होती
दिपाली बरीच बरी दिसली तिच्या समोर. विशाल जर जिंकला तर बापटला धन्यवाद दिले पाहिजे. तन्वी बापट मुळे गेम गंडवत आहे
अनुश्री बेस्ट होती, तीला ट्रॉफी कन्फर्म मिळाल्या सारखी वागत आहे

अक्षरशः तन्वी बावळटा सारखं वागली काल. शिवाय काटा गॅंग मुद्दाम विशाल आणि अनूश्री ला टार्गेट करत होते. विशालचा राग व्हॅलीड होता. आता मला उलट विशाल आवडू लागलाय. तो जिंकला तर खूपच मजा येईल.

तन्वी जिंकूच नये, विशाल विनर, अनूश्री 2nd रनरअप, आणि तिसरं रनरप कोणीही होवो.

तन्वि खूप मर्यादा सोडून वागते आहे. सतत विशाल ला टार्गेट करणं आता डोक्यात जाऊ लागलं आहे. दोन तीन दिवसापर्यंत मला ती बरी वाटत होती. आता अगदी नावडत्या यादीत गेली आहे.
आता विनर विशाल, आणि पुढचे रनरअप म्हणून अनूश्री आणि दीपाली चालतील.
बापट रेवा आणि तन्वी ला हाकलून दया.

तन्वी ने २१ अपेक्षित ची शेवटची पाने पाठांतर करायचे राहुन गेले. आतापर्यंत तिचा सगळा गेम बरोबर रूलबुक नुसार खेळला होता. काल बापटने काय ते काटा चे भूत डोक्यात घातले बावळट मुलगी जाळ्यात अडकली. काटाचा सिगनिफीकंस केव्हाच संपलाय.आता फक्त इमेज मॅनेजमेंट चा खेळ उरलाय. ती तो हरत आहे. चॅनेल साठी तिला जिंकवणे म्हणजे शिव्या खायची तयारी ठेवूनच करावे लागेल.
दिपाली अनुश्री जास्त चांगल्या दिसतात.

दादा, दादा डोक्यात जात होत अगदी.
मला पण आवडेल विशालला विनर झालेला पहायला)))
खरय, त्या सगळ्याच खूपच दादा दादा करतात. त्या ठोंब्याला काही पडलेली नसते. तो गॅरंटी घेऊन आलाय, या बावळट मुलींना काय एवढा पुळका
विशाल ला फक्त चॅनेल हरवू शकतो

मी कधीच वोट वगैरे करत नाही पण आज खास, app डाउनलोड करून विशाल ला वोट केलं.
खरंच जिंकावा तो. सगळ्यांची तोंडं बंद होतील.

तन्वी किती गर्विष्ठ व मूर्ख आहे. आपली मैत्रीण जात असताना कोण अशी खुन्नस देते
संपूर्ण सिझन चांगले खेळून शेवटी माती खाल्ली. बापट चॅनेल बरोबर करार करून आलाय हे विशाल च्या पथ्यावर पडले. बापटने तन्वी ला तिच्यातले सर्वात वाईट गुण प्रदर्शित करायला मस्त पोक केले

मी कधीच वोट वगैरे करत नाही पण आज खास, app डाउनलोड करून विशाल ला वोट केलं.
खरंच जिंकावा तो. सगळ्यांची तोंडं बंद होतील.)) मी पण.
रोज व्होट करणार आता

जळकी तन्वी.आज शेवटी रेवाला निरोप देताना,जे काही बडबडली ,त्यामुळे पार उतरली मनातून.नाहीतर मला ती प्लेयर म्हणून आवडत होती.
आज अनुश्री छा गयी.
ही मुलगी खरच टॉप 2मध्ये असायला हवी.
विशाल विनर व्हावा अशी इच्छा आहे पण त्याला करणार नाहीत कारण बिबॉसच्या लाडक्या जावयावर हात उचलला आहे.
पण आज तन्वी शेवटच बरळून ट्रॉफीपासून किंचित दूर गेल्यासारखी का कुणास ठाऊक वाटत आहे.
माझे.टॉप 2
विशाल आणि अनुश्री.

ती माय एफ एम वाली टिया किती बोअर होती. आणि बिग बॉस मध्ये सगळे असेच गेम्स का असतात जिथे दोन्ही टिम्स मध्ये भांडणंच लागतील. विशाल बरोबर बोलला दिपालीला. की फन टास्क सुद्धा हे लोक खुन्नस ने खेळतात.
विशालला तर जाणून बुजून टार्गेट करतात.

बर्मुडा च्या वेळेला अनूश्री विशाल ला सांगत होती बरोबर. पण तन्वी मिसलीड करत होती. राकेश च्या वेळेला मात्र विशाल किंवा अनूश्री ने अजिबात मिसलीड केलेले नाही. पण तन्वी ने तोंड उचकटले नाही अजिबात.

आता मला उलट विशाल आवडू लागलाय. तो जिंकला तर खूपच मजा येईल. >>>>>>>> ++++++++११११११ मलाही हेच वाटतय. मी त्याच्याबद्दल ' वुमनायझर' वगैरे शब्द्द लिहिले ते मागे घेते.

काल बिबॉने मुद्दामच चौथ्या फायनलिस्टचे कार्ड तन्वीला वाचायला दिल अस वाटल. विशालच नाव बघितल्यावर तिच तोण्ड बघण्यासारख झाल होत. हा हा हा

दादा, दादा डोक्यात जात होत अगदी. >>>>>> माझ्याही. किती ते लाडे लाडे दादा दादा बोलण! मला तिच्यापेक्षा अनुश्री मॅच्युअर वाटते. तिचही विशालबरोबर बहिण भावाच बॉण्ड आहे. पण हे सारख सारख दादा दादा करुन त्याच्यामागे नाचत नाही तन्वीसारख

कालचा विशाल आणि अनुश्रीचा शेवटचा ईमोशनल मोमेण्ट आवडला. आई ग्ग झाल विशाल आता घराबाहेर जातो की काय तेव्हाचा हा मोमेण्ट होता.

दिपालीसुद्दा आता चान्गली वाटायला लागली आहे.

कालचा विशाल आणि अनुश्रीचा शेवटचा ईमोशनल मोमेण्ट आवडला. आई ग्ग झाल विशाल आता घराबाहेर जातो की काय तेव्हाचा हा मोमेण्ट होता.

दिपालीसुद्दा आता चान्गली वाटायला लागली आहे. >> मम !

तन्वि अतिशय खालच्या थराला जाऊन वागू लागली आहे. विशाल आणि अनूश्री मॅच्युरिटी दाखवताएत. पण राकेश आणि तन्वीला ते कळत नाहीये अजिबात. काट्याकडे अजिबात खिलाडू वृत्ती नाही.

अनुश्री थोडी डांबिस आहे आधीपासूनच, तीचे असे असते की विशालशी भांडा माझ्याशी नाही. तीने बापट बरोबर पण सायलेंट फ्रेंडशिप ठेवली. ना कधी त्याने तिला फार टारगेट केले ना तीने त्याला. म्हणून राखी जास्त आवडली, राकेश बरोबर ड्रामा करत तीने त्याला एक्जपोज करायची एकपण संधी सोडली नाही.
विशाल खऱ्या अर्थाने एकटा पडून खेळत होता.
राकेश गेमर आहे, मला विशाल मध्ये इंटरेस्ट नाही असे म्हणत त्याने सगळ्या काटा महिला मंडळाला विशाल च्या विरुद्ध कामाला लावले. त्या तिन्ही बावळट बायका त्यात अडकल्या. दिपालीला आता लक्षात आले असावे तीने विशाल बरोबर पॅच अप केलय तेही योग्य वेळी
तन्वी ने मात्र राकेश च्या नादाला लागून पूर्ण गेम गंडवला स्वतचा. आता चॅनेल तीला जिंकवणारच असेल तर गोष्ट वेगळी.

भयंकर डोक्यात जाते आहे तन्वी! गर्विष्ठ, एन्टायटल्ड, फेक, टॉक्सिक असे वागणे आहे तिचे. घरात आधी राखी मुळे आणि मग अनुश्री आणि विशाल मुळे तिचा मुखवटा इतक्यात चांगलाच एक्सपोज झाला हे आवडले मला. मलाही तिचा भ्रमनिरास झालेला बघायला आवडेल!
बिबॉ नी तिला विनर बनवायचे ठरवलेच असले तर ते आता ट्रोल होतील नक्की. बाहेर पडलेले कन्टेस्टन्ट्स ही तिच्याबद्दल कोणीच चांगले बोलत नाहीत.
विशाल आवडत नव्हता पण तो डर्टी गेम्स खेळला नाही कधी. मोस्टली फेअर खेळायचा. अनुश्री अनेकदा खोटे बोलली आहे, लॉयल्टी नाही हेही खरच आहे पण तन्वीपुढे ती जेन्युइअन आणि पॉजिटिव वाटायला लागली आहे आता.

मैत्रेयी संपूर्ण सहमत. माझं मलाच आश्चर्य वाटतंय, अगदी अलीकडे अलीकडे पर्यन्त मला तन्वी आवडत होती आता एकदम विरुद्ध, अतिशय आवडेनाशी झाली आहे.
विशाल बद्दल न्यूट्रल मत होते, आता तो आवडायला लागलाय.
अनूश्री आणि दीपाली सुद्धा आवडत नव्हत्या पण आता त्या दोघी सुद्धा बऱ्या वाटायला लागल्यात.

सतत विशाल ला टार्गेट करते तन्वी पण स्वत: पोपट बाळगून असते ते? हिने पहिल्यांदा प्रभूला आणि मग तो गेल्यावर रेवाला हाताशी धरलं. इतकं की या दोघानी फक्त तीचच गाणं गायलं.

तन्वीला मोठे करण्यात रितेश देशमुख कारणीभूत आहे. तीचे ते नसलेले आदर्शवादी वागणे त्याने उचलून धरले, कारण तो स्वतः मी कसा आदर्श इमेजसाठी प्रयत्न करत असतो.
तिथेच तीच ईगो फ्लेअर अप झाला आणि तीने तिच्या खेळाचा तोच पॅटर्न मेंटेन केला. राकेश ला पण त्याने डोक्यावर घेतले कातर वडील आर्मी त होते. अगेन इथे पण फॅमिली बॅकग्राऊंड वरुन रिस्पेक्ट करायची त्याची पर्सनल चॉईस होती कारण तो पण वडलांच्या नावावर पुढे गेला आहे.
त्या उलट रूचिता,प्रभू, विशाल या बऱ्यापैकी बिनधास्त, इमेज ची काळजी न करता खेळणाऱ्या लोकांना रितेश ने ट्रोल केले कारण नसताना
संकेत एवढा सभ्य खेळला त्याला पण टारगेट केले का तर तो काटा मध्ये नव्हता.
प्राजक्ता सागर बापट पेक्षा चांगले होते पण निव्वळ साधारण कुटुंबातील होते त्यामुळे फारसे कौतुक नाही झाले.
मला विचाराल तर देशमुख च्या पर्सनल इमेज मॅनेजमेंट मुळे अनेक चांगल्या प्लेयर्स वर अन्याय झाला आहे

कोलतेला पहिल्या विकेंडला झापलं होतंना, कोलते किती बोलते म्हणून, नंतर कौतुक करत बसले की काय देशमुख.

मी पहिलाच बघितला रितेशचा, मग नाहीच.

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये शेवटच्या आठवड्यात सगळेजण खूप छान मिळून मिसळून राहतात अगदी कट्टर शत्रू असलेले मेघा आणि रेशमसुद्धा शेवटच्या आठवड्यात छान राहिल्या होत्या. पण या सीजनमध्ये तर या लोकांचं उणीदुणी काढणंच संपत नाहीये.. तन्वी आणि राकेश खरंच अजिबात आवडत नाही आहेत...अनुश्रीची एव्ही तिच्या वागण्यासारखीच विस्कळीत वाटली दिपालीची छान होती पण ती deserving च वाटत नाही

तन्वि अतिशय खालच्या थराला जाऊन वागू लागली आहे. विशाल आणि अनूश्री मॅच्युरिटी दाखवताएत. पण राकेश आणि तन्वीला ते कळत नाहीये अजिबात. काट्याकडे अजिबात खिलाडू वृत्ती नाही. >>>>>> अगदी अगदी. कालसुद्दा अनुश्री जेव्हा एव्ही बघून आली तेव्हा कौतुकाने सगळ सान्गत होती सगळ्यान्ना, सगळे तिच्याशी बोलत होते, अगदी राकेशसुद्दा. फक्त तन्वीच तिच्याशी बोलत नव्हत्ती, मुद्दामहून इग्नोर करत होती तिला. जराही जागेवरुन ढिम्म हलली नाही!

दिपालीला आता लक्षात आले असावे तीने विशाल बरोबर पॅच अप केलय तेही योग्य वेळी >>>>>>> मम. जेव्हा राखी तिच्याबद्दल आणि राकेशबद्दल बोलत होती तेव्हा विशालनेच आधी दिपालीला सपोर्ट केल होत. सो, तिचा त्याच्याबद्दलचा गैरसमज दुर झाला आणि पॅच अप केल तिने. नाहीतर आधी ' ह्याने मला कोपर मारला, कोपर मारला' म्हणून आरडा ओरडा करत होती.

काल राकेश आणि अनुश्रीच पहिल भाण्डण ज्या कारणावरुन झाल होत ते अनुश्रीच्या एव्ही मध्ये दाखवल, त्यात राकेशच अनुश्रीची चादर खसकन ओढत होता हे स्पष्टपणे दिसत होत. सो , अनुश्री आणि रुचिता बरोबर बोलत होते तेव्हा.

अनुश्रीला शेरनी , दिपालीला रणरागिणी नावे दिलीय बिबॉने. आता तन्वीला काय नाव ठेवणार हे बघायला हव.

काल विशाल गप्प गप्प होता. बोलत नव्हता कोणाशी.

बघितल्याच सर्व जर्न्या शेवटी Happy तन्वीची जर्नी विनर म्हणूनच बनवली आहे असे वाटले. विशाल ची खूपच निगेटिव बनवली होती. राकेश ची उद्या दिसेल पण एकूण ओढून ताणूनच कौतुक सुरु होते.
आता ते ओंकार, रोशन, करण वगैरे कुणाच्या जर्नी मधे दिसले तर पार जुने विस्मरणात गेलेले गेल्या सीझन चे कन्टेस्टन्ट असावे असे वाटत होते! दिव्या ला राकेश च्या जर्नी मधे दाखवतील का?

तन्विला खूप जास्त उपाध्या मिळाल्यात बिग बॉस कडून. सोशल मीडिया क्वीन, तंटा क्वीन, अजून सगळं क्वीन क्वीनच आहे.

वोटिंग च्या बाबतीत अगदी रेवा आऊट होईपर्यंत जी तन्वी टॉप ला होती ती अचानक तिच्या त्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर नंबर तीन ला गेली आहे. अनूश्री एक नंबर, विशाल दोन, तन्वी 3, राकेश 4 आणि दिपली 5 नंबर.

insta वर काल मी मुद्दाम चक्कर मारली तर असंख्य पोस्ट आहेत. सगळे जण तन्वी वर भडकलेले आहेत आणि अनूश्री आणि विशाल ला प्रचंड सपोर्ट मिळतो आहे. भल्या भल्या सेलेबजनी सुद्धा विशाल ला सपोर्ट करणारे व्हिडिओ टाकलेत. तन्वी च्या आजीने आणि प्रभूने पण अपील करणारे विडियो केलेत तिथे लोकानी स्पष्ट तिला मत देणार नाही असं सांगितलं आहे.

आता खरंच चुरस होणार आहे या तिघात. आणि ती मजा बघण्यासारखी असणार आहे. तन्वी ने स्वत:च्या तोंडाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. नाहीतर इकवेशन अगदी सरळ होते की तन्वी जिंकणार.

विशाल एक अत्यंत चांगला माणूस आहे ही गोष्ट मला गेल्या 8 दिवसांत खूप जाणवली. मी त्याची फॅन झाले आहे.
तो सलमान च्या सिनेमाची तिकिटे ब्लॅक करून विकून शाळेची फि भरायचा.

काल मी विशाल चा अजून एक video बघितला. तो गाडीत आहे आणि बाहेर एक छोटा गजरे विकणारा मुलगा आला होत,, तो विशाल ला म्हटला बरेच दिवस दिसला नाहीत, तर विशाल म्हटला हो मी आता अजून थोडे दिवस नसणार आहे मराठी बिग बॉस मध्ये निघालोय. मी जिंकावा अशी प्रार्थना कर. लवकर बाहेर न येवो म्हणून प्रार्थना कर. आणि मी जिंकलो तर तू आणि मी पार्टी करू. असं म्हणून त्याने त्या मुलाकडे होते नव्हते तितके सगळे गजरे विकत घेतले ज्याची एकूण रक्कम 50 होती, पण विशाल म्हटला आता मी खूप दिवस नसणार तर मी 50 ऐवजी 100 गुगल पे करतो.
त्या मुलाने नंबर (जीपेसाठ)) व्यवस्थित सांगितलं म्हणून त्याचे कौतुक पण केलं विशाल ने, आणि जाताना त्या मुलाच्या हातचे प्रांजळ चुंबन घेतले. फार फार आवडला मला विशाल.

बिग बॉस च्या एडिट टिम मध्ये बिनडोक लोक बसलेत, विशाल गृपला पॉझिटिव्ह व बापट गृपला निगेटिव्ह दाखवणे जास्त सोपे झाले असते त्यांना. जसे विशाल पाटील च्या वेळी झाले. तशीही तन्वी व्हॅम्प सारखाच मेक अप करते. बापट कपटी शकुनी मामा च वाटतो.
फक्त विशाल चे फीजिक बघून त्यांनी त्याला निगेटिव्ह दाखवायचा निर्णय घेतला आहे अस वाटतय.

Pages