बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसल बोअर करत आहेत.कसला तो टास्क.त्या सशाला तर रडता पण येत नव्हत.आणि ती अनुश्री तर अशी काही रडत होती की काही वाईट बातमीच आली आहे.
एवढी स्मार्ट होती तर बझर वर हात ठेवून द्यायचा पहिल्यापासून.
राखीपण आता बोअर करत आहेपरत ठरवून.काय गोंधळ घालत आहेत.तेच तेच पीठ फेकण,पाणी फेकण बघून कंटाळा आला
.लवकर आटोपता घ्या सिझन.

राकेशने एक दोनदा दिलेल्या शिव्या म्युट झालेल्या दिसल्या आहेत, तो जेंव्हा कात्री घेऊन आला आणि बिबॉने त्याला टोकले तेंव्हा क्लिअरली भे**द शिवी दिली.
रुचीताच्या इंटरव्ह्यु नुसार आणि जे एपिसोड मधे क्लिअरली दिसलं , तिथे रुचीतावर खोटा आरोप लावला, यावर विकेन्डचे भाऊच्या धक्क्यावरचे एक्स्प्लेनेशन चक्क एडिट् केले बिबॉ टिमने.
‘माझे प्रायव्हेट पार्ट्स तिने स्क्विझ केले’ , हे त्याचे चालु होते , यावर रितेशने विचारले नक्की कुठला बॉडी पार्ट तर म्हणे चेस्ट ला धक्का लागला.. यावर रितेशला एक्स्प्लेन करावे लागले कि मुलांचे आणि मुलींचे प्रायव्हेट पार्ट्स वेगळे असतात.
इतका रड्या, खोटारडा आणि लुजर माणुस आहे राकेश !

ज्या एपिसोड मधे प्रभु आणि रुचीता भांडण झाले होते त्या रील कॉमेन्ट केली होती तिच्या आईने.
‘कुपोषित भाजलेलं वांगं ‘असं काहीतरी लिहिलं होतं प्रभुसाठी, नंतर ट्रोल झाल्यावर अकाउन्ट डिलिट केलं .

हो असच काही होतं. त्यामुळेच काढलं असावं असं वाटतंय पण पालकांनी काही लिहिलं म्हणून काढणं चुकीचं आहे. लोकं खूप चिडलेली यावर मात्र नक्की, काढा तिला म्हणत होती. खरोखर तिच्या आईने ही कमेंट केली असेल तर फार वाईट होती कमेंट. असं कोणाला कशाला बोलायचं.

ह्या बिग बॉस वाल्यांचे एकंदरीत कोणाला जिंकवायचे हे ठरलेले असतं असं वाटायला लागलं आहे.

बाप रे कालचा पत्राचा टास्क काय बालिश आणि मूर्ख होता. अनुश्री बरेच दिवस घराबाहेर आहे पण ती संस्कृती इतकी धाय मोकलून का रडत होती? तिला येऊन अजून दहा दिवस पण झाले नाहीयेत. उगीचच melodrama.
मी तर बंदच करून टाकला टीव्ही. आज सेल्फ टॉर्चर चा मूड झाला तर बघेन.

प्राजक्ता एव्हिक्ट झाल्याची न्यूज आहे.
फायनली गुडी बाई बाहेर गेल्या.
रुचिताला एक वीक एक्स्ट्रॉ दिला असता तरी चालल असत.
आज धक्क्यावर राखीला सुनावल आहे.
हे म्हणजे आम्हीच तुला बोलावल पण आता तू जा.
अस आहे.
राखीच काय जात आहे.ती म्हणेल ,माझे पैसे द्या ,मी जाते.
पुढचा सिझन आलाच आणि फ्लॉपच गेला तर मी परत येणारच आहे.
असो. वाईल्ड कार्डमध्ये आता सध्या संकेत आवडत आहे.बाहेरून येऊनही स्वतःचा छान गेम खेळत आहे.
राकेश ला काढा आता.
बाकी,विशाल आणि अनुश्रीच अजून बिबॉस गेम खेळत आहेत.पण सुरुवातीपासून निगेटिव्ह असल्याने आणि दाखवल्याने त्यांना टॉपमध्ये नेणार नाहीत.
तन्वी नक्की टॉप 2मध्ये असणार आणि विनरही होईल.
रुचिताच्या इंटरव्ह्यू मुळे कदाचित राकेशला आता विनर नाही करणार.
प्रभू,सागर,रेवा आता जातील.
दीपाली फार रडायला लागली आहे.
राखीला बहुतेक येणार्या वीकमध्ये काढतील.

संकेत छान खेळला, वेल डिझर्व्ड कॅप्टन !
तन्वीने टास्क खेळला चांगला पण रडारड करून तिचा फेक अ‍ॅटिट्युड दाखवलाच .. विशाल बरोब्बर बोलला होता काही आठवड्यापूर्वी.. तन्वी हात कापून देईल अटेन्शन साठी ! ती मुद्दाम अशी वागते ज्याने तिला लागलं पाहिजे/इन्ज्युरी झाली पाहिजे..म्हणजे समोरचा वाईट दिसेल आणि हिला सिंपथी मिळेल !
जे झालेच आहे , भाऊने तिला टास्क क्वीन म्हंटलय !
प्रचंड फेक आहे तन्वी, काही केल्या नाही आवडत..जरी प्रभु खूप आवडत असला तरी !

आजचा नक्की धक्का होता की तन्वीला ट्रॉफी द्यायची होती पण लक्षात आल की अरे,अजून पाच आठवडे आहेत.आताच कशी देऊन चालेल?
कसला तो रितेश. ममां पण त्यांना जे सांगितलं जायच तेच बोलायचे.पण एक कमांड होती.स्टाईल होती.याला काहीच जमत नाही.
अरे ,त्या संकेतने अख्खी काटा टीम बाहेर काढली ,त्याच कौतुक कर ना
तन्वी ,रुचिता टास्क जीव ओतून करतात यात प्रश्नच नाही,पण तन्वी नाटकही तेवढच करते ,ती टास्क खेळायला तयार झाली ते प्रभूसाठी.ती जर बाहेर आली असती तर प्रभू आणि संकेतमध्ये राऊंड झाली असती आणि संकेत जिंकला असता,हे तिला नक्की माहित होत.
संकेत बरोबर विशाल किंवा प्राजक्ता असते तर नाटक करून टास्क रद्दही करवला असता.
पण शेवटी संकतच जिंकला.
त्याला उगाच निगेटिव्ह दाखवत आहेत.
राकेशला रितेश जे काही बोलला ते म्हणजे मी मारतो ,तू रडल्यासारख कर,अस होत.
फक्त एकच चांगली गोष्ट बिबॉसने केली ते म्हणजे दिपाली,ससा,प्रभू,अनुश्री,प्राजक्ता ,सागर यांना रिअँलिटी चेक दिला.
राखीच बिबॉस काहीही करू शकणार नाही,तो राखी सावंत शोच होता.
एवढ राखीला बोलून राखीने धक्कयावर रितेशसमोर काढलेल्या उठाबशा म्हणजे राखी शोचा कळस होता।
हे फक्त राखीच करू शकते.
पण आता तिचा पण कंटाळा येत आहे.
रितेशने सांगितल्याप्रमाणे दहा फायनली स्ट मिळणार म्हणजे उद्या दोन.एलिमिनेशन होतील.प्राजक्ता गेल्याची न्यूज आहेच.अजून एक कोण ते नाही कळल.

संकेत पाठक चांगला अभिनेता आहे, तो आवडतो मला. त्याने wild card म्हणून येण्यापेक्षा, त्याला आधीपासून घ्यायला हवं होतं. इथे वाचून कळतंय की तो चांगला खेळतोय. वाईल्ड कार्ड ने आलेल्याना जिंकवत नाहीत ना.

भाऊचा धक्का खरच हस्यास्पद होत चाल्लाय.. कित्ती बायस्ड असावे मेकर्स आणि होस्टने !
तन्वीचा कौतुक सोहळा आता अनबिअरेबल झालाय. इतके प्रेडिक्टेबल चालु आहे सगळं.. तन्वी आणि राकेश सोडून मेकर्स साठी बाकी सगळे फिलर्स आहेत !
तन्वीच्या बाबतीत तर ऑबसेस्ड आहेत बिबॉ, आली तन्वी कि झूम करून कॅमेराने अ‍ॅन्गल मारलाच म्हणून समजायचा ..बिग बॉसचे बिग बट ऑब्सेशन इज क्रीपी !

हो ना, तन्वी वर कायम अगदी लक्षात यावं इतक्या विचित्र पद्धतीने कॅमेरा मारतात. काल तिचा कौतुक सोहळा ऐकवत नव्हता. टास्क चांगला खेळते ती पण रुचिता तिच्यापेक्षा चांगला खेळायची की. तिचे तर त्यवरून कधी कौतुक झाले नाही. तन्वी, राकेश, प्राजक्ता, सागर सगळे तद्दन ढोंगी, दुटप्पी दिसतात. दीपाली, काडी लावणे क्वीन असली तरी थोडी रियल वाटाते. प्रभू रियल वाटतो बस्स. बाकी सगळे फेक.
संकेत लापण उगीच निगेटिव दाखवत आहेत. त्याला स्क्रिप्टेड भांडणावरून बोलले तेवढे रेवाला का नाही बोलले! तीही होती त्यात.
आणि राखी कितीही अतरंगी खेळत असली तरी असल्या फेक प्रकारांना कमी करण्यासाठी तिला काढणे हा उपाय आहे. बास झाले आता नाटक. निदान कन्टेस्टन्ट्स खरे काय लायकीचे आहेत ते दिसेल.
या सीझन ला कुणीच आवडत नाहीये, कारण कुणाशीच रीलेट होता येत नाहीये.

वाईल्ड कार्ड्स फँमिली वीकपर्यंतची गँरेंटी घेऊन आलेले आहेत।
पण संकेत पुढे जाईल.प्रभू,सागर दीपाली,आता जातील.अस वाटत आहे.

संकेत आणि विशाल एकत्रं खूप स्ट्राँग जोडी आहेत , बिबॉने चिटिंग नाही केले तर सगळी टास्क्स तेच जिंकतील.
पण आता इतका प्रेडिक्टेबल गेम झालाय, त्या फाल्तु गाण्यांच्या राउंडलापण एकट्या तन्वी वर कॅमेरा सतत.. काय भयंकर लो बजेट मेकप करतात हे लोक विकेन्डला, थोबाडीत मारल्या सारखे ब्लश लावले होते तन्वीला !
त्या ससाचा आय मेकपही काय विचित्रं.. रेवाच्या गाउनला चेस्ट्स्वर किती ऑकवर्ड ठिकाणी २ गुलाबाची फुले लावली होती Uhoh रितेश तर चक्क फ्लर्ट करत होता तिच्याशी.. विकेन्डला येऊन ठुमके मारायचे एवढेच भाऊचे काम आहे, सर्वात पहिले त्या भावाला एलिमिनेट करा, तो आहे तोवर सगळे सिझन फ्लॉप होणार !

Lol शेवटच्या वाक्यासाठी.

मी विकेंड वार बघणार होते पण इथे वाचून नाही बघत, उगाच वेळ का घालवू भाऊच्या धक्यावर.

रुचिता चा बाहेर गेल्यावरचा इंटरव्ह्यू कोणी बघितला का ? तिने खूप भांडी फोडली आहेत .
राकेश शिव्या देतो , खरकटी शब्द कुठेतरी वेगळीकडेच जास्त वापरला गेला होता असं तिचं म्हणणं आहे . (जेव्हा तन्वी स्मोक करून येऊन तिच्या फार चेहऱ्याच्या जवळ येऊन येऊन जोरजोरात बोलत होती तेव्हा ती तिला खरकटी म्हटली होती म्हणे ) म्हणजे तन्वी स्मोक करते हे मुख्यतः अधोरेखित करणं हा तिचा अजेंडा होता असं निदान मला तरी वाटलं.
शिवाय राकेश आणि तन्वी ला खूप सपोर्ट दिला जातो आणि आमच्या छोट्या छोट्या गोष्टी धक्क्यावर उधळल्या जातात.

ती दिव्या शिंदे सुद्धा तिकडे बिग बॉस विरोधात कोर्टात जायची तयारी करते आहे .

हो, पाहिला होता रुचीताचा इन्टरव्ह्यु आणि नक्कीच तथ्य वाटले, जे बाहेर येतील त्या सगळ्य्यांना माहित आहे कि राकेश तन्वीला सपोर्ट होत आहे ते, खूप ऑबव्हियस झालय.
राकेश च्या म्युट केलेल्या शिव्या दिसल्या होत्या आणि तन्वी बरेचदा स्मोकिंग रुम मधे जाते हीही दाखवायचे पूर्वी, अनुश्रीही जाते.
आता दाखवणं बन्द केलय तन्वीला विनर ठरवल्यामुळे आणि रुचीताच्या इन्टर्॑व्ह्यु मुळे.
तन्वीची खरी अनॉयिंग साइड दिसायची रुचीता आसपास असताना , त्यामुळेच रुचीतालाही काढलय .
काहीतरी मेजर फिल्डिंग लावली आहे तन्वीने मेकर्स बरोबर.
राकेश तर सर्वात निकम्मा आहे , सोअर लुजर !

हायला मराठी बिग बॉस च्या घरात स्मोकिंग रूम आहे ? मला तर कळली नाही कुठे आहे Happy असो .
हिंदी बिग बॉस मध्ये हि राऊत जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा तिचे स्मोकिंग आउट झाले होते , आणि तिच्या घरच्यांना माहिती नव्हते , त्यामुळे ती घाबरली होती.

रुचिता गेल्यापासून तन्वी फारच शांत झाली आहे असं मला वाटलं .

पहिल्या सिझन पासून आहे स्मोकिंग रुम , सर्वात जास्तं स्मोकर्स पहिल्या सिझनलाच होते !
आस्ताद, रेशम, भूषण, नन्दकिशोर, त्यांची सगळीच गँग पडिक असायचे तिथे.. आस्ताद तर स्मोकिंग रुम मधे उभे राहून स्मोक करता करता भांडायचा , बिबॉला अनाउन्समेन्ट करायला लागली होती याची परवानगी नाही म्हणून!

काय भयंकर लो बजेट मेकप करतात हे लोक विकेन्डला, थोबाडीत मारल्या सारखे ब्लश लावले होते तन्वीला !
त्या ससाचा आय मेकपही काय विचित्रं.. रेवाच्या गाउनला चेस्ट्स्वर किती ऑकवर्ड ठिकाणी २ गुलाबाची फुले लावली होती >>>> अगदी अगदी!! Happy
प्राजक्ता गेली बरे झाले. आता यावेळि डबल एविक्शन आहे म्हणे. संपवा एकदा आणि द्या ती ट्रॉफी तन्वीला.
विशाल चे आणि राखी चे मराठी धन्यवाद आहे एकदम .काल एका क्लिप मधे विशाल म्हणत होता " जो एकदा जिभेवर फिरला त्याची काहीच रिस्पेक्ट नाही" Rofl जिभेवर फिरला काय, झुरळ वगैरे आहे का ते Lol

जिभेवरून फिरला म्हणजे ???? Rofl
जबान से मुकर गया / दिल्या शब्दाला जागला नाही असे म्हणायचे होते का ?

प्राजक्तानेही बाहेर येऊन सांगितले आहे की तन्वीला ज्या पध्दतीने दाखवल जात आहे,स्क्रीन टाईम मिळत आहे,सपोर्ट आहे.तर ती होऊ शकते.
सपोर्ट इंडेमॉल तर नाही करणार.
म्हणजे चँनेलचाच असेल.इन.शॉर्ट सतीश राजवाडे.
कारण या वेळेस चँनेल क्लस्टर हेड म्हणून राजवाडेच आला होता बिबॉसच्या लॉंच पार्टीला.

तन्वी झी मराठी वरून आलीय ना. सतीश राजवाडे तर स्टार प्रवाह हेड आहेत, ते संकेतला सपोर्ट करत असतील.

तन्वी होती का स्टार प्रवाह वर आधी कुठल्या सिरीयल मध्ये.

कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह आता एकत्र आहेत त्यामुळे राजवाडे महत्वाचे आहेतच आणि तिथून कलर्सवरून केदार शिंदे.

वोटिंगला आजकाल कुठल्याच रिअँलिटी शोमध्ये काहीच किंमत नसते.
सगळ चँनेलच ठरवत असाव.
राजवाडे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मराठी क्लस्टर जिओ स्टार आहेत.
या सिझनच्या लॉंच पार्टीला तेच होते आणि रिपोर्टर्सबरोबर घरात शोच्या आधी पण तेच आले होते.
संकेत त्यांचीच चॉईस असावा.पण वर्थ आहे.
संकेत स्टार प्रवाहचा पण रेग्युलर चेहरा आहे.तो तसही असेल टॉप 5 मध्ये.
तन्वी झीमराठीची लक्ष्मीनिवास मालिका करत होती ,ती सोडून इथे आली आहे.हे वाचल होत.
म्हणून राजवाडे मेहेरबान आहेत का?☺️

दीपाली नेहमीच नॉमिनेट केले म्हणून टॅन्ट्रम करते.
ससा खरंच इतकी डम्ब आहे का? . तिला काल कळतच नव्हते की आपण नॉमिनेट झालो असू तर आपल्यापेक्षा वीक लोकांना नॉमिनेशन मधे आणणे हीच स्ट्रॅटेजी आहे. तिला आणि / किंवा रेवाला आता घरी पाठवावे. बहुतेक प्रभूही जाऊ शकतो यावेळी.
पुढचा वीक फॅमिली वीक आहे का? बोअर होतात ते भयंकर.

Pages