धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत लिही निवांत बसुन.>> बघ हा, वॉशर (मिलॉर्ड नोटेठोम सारखा जो काही खरा उच्चार असेल तो मनात करुन घे) गेल्याने ठिबकणाऱ्या नळासारखा ठिबकत राहील वृ आता माझा Wink

डिटेल वृ लिहायचा झाला तर कसं जायचं यावर मुंबईकरांच्या झडलेल्या गप्पांपासून सुरवात करावी लागेल. शिवनेरीचा ५०% डिस्काऊंट उचलायचा की उबेरला बिझिनेस द्यायचा की रेल्वेला आपलं म्हणायच यावर उलट सुलट चर्चा करुन शेवटी कोणीतरी पायी निघा/ बोटीने जा असे सुचवले व्हॉट्स ॲप गृपवर. पण पुण्याला समुद्र नसल्याने बोटीचा पर्याय रद्द झाला. शेवटी आपापल्या घरातून स्टेशन पर्यंत .. किमान ठेशनात शिरल्यावर ट्रेनच्या डब्यापर्यंत पदयात्रा करु आणि पुढे रेल्वेला बिझिनेस देऊ असा अर्थव्यवस्था बळकट करणारा निर्णय घेऊन इंटरसिटीची यायची जायची तिकीटे काढून गटगला जायच्या निर्णयाचा खुंटा बळकट केला. इंटरसिटी वाल्या बायांची वेगळी चूल पण मांडून झाली रेंटेड फ्लॅटवर. उद्देश तिकीटे शेअर करुन ठेवावीत म्हणजे शोधत बसायला नको आयत्यावेळी. पण तिकीटाची pdf इतकी मागे पडली की मेसेजेसच्या समुद्रात पोहत जाऊन शोधावी लागली reshare करायला तो भाग वेगळा.

मीच पहिला मेंबर होते csmt हून चढणारी, बाकी मेंब्र ठाण्यात चढली आणि मग गटगचा रंग चढायला सुरवात झाली. ॲडमीन्स, काल आणि आज जर तुम्हाला registrations approvals आली असतील तर नक्कीच ती intercity मधे आमच्या आसपास बसलेल्या पब्लिककडूनच असतील Proud

गप्पांच्या नादात कर्जत आलं (त्या आधीच बॅगेतून खाऊची पाकीटे बाहेर आली होतीच) मग दिवाडकरच्या बटाटवड्यांची भूक लागली. ते खायला घेई पर्यंत घारुला पोहे दिसले मग पोह्यांची पण भूक लागली. म्हणजे भूक त्याला लागली पण त्याला कंपनी द्यायला आम्ही पण डिश घेतली Wink
प्रवासातल्या खानपान सेवेची जबाबदारी घाऱ्याने त्याच्या खांद्यावर घेतल्याने बायांना "ऑर्डर सोडणे ... खाणे आणि गॉसीप करणे" या व्यतिरिक्त काहीच काम उरले नाही Wink

या खादाडी -गप्पा- गॉसीप - खादाडी -गप्पा- खादाडी चक्रात फिरत राहिल्याने आपली ट्रेन लेट धावतेय हे लोणावळा आल्यावरच लक्षात आलं. ९.४० ला आम्ही शिवाजी नगरला उतरणार होतो पण १० वाजले तरी आम्ही लोणावळ्यातच होतो. सगळ्यात आधी पोहोचायची स्वप्न बघितलेले मुंबईकर अशा रितीने सव्वा अकराच्याही पुढे रविराजला पोहोचले

क्रमश:

रूपाचं कंसेंट घेतलं आधी. एकतर गांधी, वरून हुसेन. डेंजर कॉम्बिनेशन. आजकाल विचारलेलं बरं >>> _/\_ साजिऱ्या, तू इतका आवर्जून कडकडून भेटायला आलास, आमच्यासोबत फोटो काढलास, वर पुन्हा प्रेमाने गिफ्ट्स आणलीस - अर्थातच ती चित्रं स्वीकारलीच असती, अगदी नावडत्या गोष्टींची असती तरीही Happy

पेंटिंग्स भेट दिली. मी फक्त आणली, पण ती सगळ्या मायबोलीकरांकडून भेट आहे >>> मग ते धन्यवाद या सगळ्यांसोबत वाटून घेशीलच Proud

माझेमन, कौतुक पोहोचलं. धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आलीस याबद्दल तुला खूप थँक्स. तुला भेटायची इच्छा होतीच. वृत्तान्त भारी झालाय.

आम्हाला धन्यवाद देणाऱ्यांना आम्हीच थँक्यू म्हणतो. तुम्ही सगळे आलात म्हणूनच केवळ गटग यशस्वी झालं. आम्ही फक्त निमित्त.

कवे, वृ पटकन पूर्ण कर Happy छान चाललाय

कविन जियो!!!
मस्त मज्जा येतेय तुझा वृत्तांत वाचायला
सर्व धमाल डोळ्यासमोर येतेय
बिच्चारे सहप्रवासी ही!!ही!! If you can't beat them, join them या तत्त्वाने वागले असतील तरच बचावले असतील !!
क्रमशः, wow म्हणजे अजून मज्जा बाकी आहे.
Looking forward

तीच ती आपली जुनीच मोडस ऑपरेंडी. पुणं भारी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालं की मग ते कार्ड पुढे करायचं- पुण्याला समुद्र कुठे आहे!?

काय करु मी या टॅलेंटचं Proud

पुण्याला समुद्र कुठे आहे>> आम्ही खरं म्हणजे बोट कशी काय पुण्याला आणता येईल याचा एक नकाशा करून दिला होता पण मुंबईकरांना तो पसंत पडला नाही आणि त्यांनी शेवटी त्यांच्या जिव्हाळ्याच्या ट्रेनला उदार आश्रय दिला.

बाकी सावकाश लिहितो Happy

पुण्यात समुद्र आहे, किनारा आहे झालंच तर हिमालय सुद्धा!
आजकाल मंडळी गूगल मॅप बघत नाहीत का?
.
आळंदीला इंद्रायणी आहे पण तिकडे ट्रेन नाही ती जोडून घ्यायचीये.
साजिरा जी नोंद घ्या ऍडमिन ना सांगा तेवढं ट्रेन च

पुण्यात समुद्र आहे, किनारा आहे झालंच तर हिमालय सुद्धा! >> हो हो! प्रति शिर्डी, प्रति बालाजी करत प्रति चौपाटी पर्यंत मजल गेली आहे ह्या पुणेकरांची.
पण शेवटी प्रतिच! असो. गोड मानुन घेताहेत हे काय कमी आहे पुणेकर!

@साजिरा
तिथे मला कोणीतरी माहिती पुरवली होती की ती चित्रं तुम्हीच काढलेली आहेत म्हणून, आता नाव आठवत नाही कोणी सांगितलं
(अर्थातच आठवत असतं तरी सांगितलं नसतं हां मी )
पण मला चित्रांकरता झालेली झुंबड ही दिसली नाही..sigh!!!
नैतो मै भी उस झुंबड में होती

काय करु मी या टॅलेंटचं Proud>> Excel मधे नोंद करुन ठेव Wink

वृ चा छोटा पार्ट या नोटवरच लिहीते आता (बरा सापडलास असं ऐकू आलं का पुढे? Wink )

गटगला ओळख परेड दरम्यान कोणालाही माबो वय किती?कधी जॉईन केलं? असले महत्वाचे प्रश्न पडलेच किंवा कोणता आयडी कधी उडाला वगैरे फुटकळ प्रश्न पडले तर सगळ्याची उत्तरं साजिरा मेमरीतल्या excel sheet मधून देत होता आणि आम्ही "काय व्यासंग काय व्यासंग" म्हणत दरवेळी काही अडलं की किंवा माबोवरच्या कुठल्याही गोष्टीच खापर फोडायच झालं की साजिऱ्याकडेच बघत होतो. माबोचा चित्रगुप्त असे नावही त्याला तिथे बहाल केले गेले.

त्याची ओळख सुरु झाल्यावर "एकाच आयडीची ओळख देणार आहेस का?" याचे उत्तर मात्र "दिलेही आणि नाहीही" अशा थाटात मिळाले Proud

आम्ही खरं म्हणजे बोट कशी काय पुण्याला आणता येईल याचा एक नकाशा करून दिला होता पण मुंबईकरांना तो पसंत पडला नाही आणि त्यांनी शेवटी त्यांच्या जिव्हाळ्याच्या ट्रेनला उदार आश्रय दिला.>> Lol मी कागदी बोट घेऊन आले होते बरोबर

अमितला पण चित्र दिलं होतं ना, नंतरच्या व्हिडिओ गटगला मी त्याला उठवून दाखवायला लावलं होतं. Happy

Happy वाचते एकेक वृत्तान्त. हा धागा धावतोय अगदी.

(अर्थातच आठवत असतं तरी सांगितलं नसतं हां मी ) >> अरे!! अस्सल माबोकरांनी नाव आठवतं असलं नसलं तरी सांगितलंच असतं. सांगुन टाक तू पण! Lol मी न्हवतो तरी सांगतो, हर्पेन का किल्ली म्हणत होते साजिरा हल्ली पेंटिंग करतो का काहीतरी. Wink

मी न्हवतो तरी सांगतो, हर्पेन का किल्ली म्हणत होते साजिरा हल्ली पेंटिंग करतो का काहीतरी. Wink>> त्यापेक्षा अस आठवत नसलं की "घारुअण्णाचं" नाव घ्यायचं, शास्त्रं असतं ते Lol

अमितव
No no ... not me
पूर्वीचा फार्फार पूर्वीचा "नळावरील भांडणं"" धागा शोधून वाच
.. होमवर्क समजून hahaha

सकाळी बरोबर 10:55 ला रविराजच्या सम्राट टेरेस वर हजर झालो आणि बघतो तर काय.. कोणीच नव्हतं... फक्त स्टाफ ची लगबग ती काय चालू होती... हळूच मान डोकावून पुढे पाहिलं तर एक गॉगलवाला माणूस खुर्चीत स्टाइलमधे ( एका पायावर दुसरा पाय ठेवून ) बसलेला होता. मला वाटलं स्टाफचा सुपरवायझर असेल. पण पुढे होऊन विचारावं म्हटलं...हाय हॅलो केल्यावर कळलं.. हा ऋतुराज आहे. मग काय पुढची 10 मिनिटे आम्ही मस्त गप्पा मारत बसलो. त्यानंतर तिता, पियू आणि पशुपत आले.
तिता मग मला आणि पशुपतांना उर्दू चा जन्म कसा झाला आणि उर्दू मुळातच कुठून आली यावर बरंच काही सांगितलं ते मला आणि पशुपतांना देखील नवीन होतं.
नंतर ओळख परेड मधे रॉबिनहूड आणि साजिरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत धमालच उडवून दिली. साजिरा यांचं प्रेसेंटेशन खूपच उत्तम होतं.
मध्यलोक यांनी परिधान केलेला मायबोलीचा टी शर्ट पाहून हेवा वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर त्या टी शर्ट वर आपण मायबोलीवर वापरतो ते शॉर्ट फॉर्मस लिहिलेले होते. बरेच मला नवीन होते पण धनुडीने सगळेच्या सगळे बरोबर फुल्ल फॉर्म सांगितले आणि इतके वर्ष मायबोली कमेंट मधे दिसणारे शॉर्ट फॉर्म काय असावेत याचा उलगडा झाला आणि गटगला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं.
साजिरा यांनी धनीला आणि रमडला दोघांना एक फ्रेम भेट म्हणून दिलं. धनीला 3 बायका असलेलं चित्र मिळाल्याच पाहून हर्पेन यांनी... वाह्ह धनीला तीन तीन बायका मिळाल्या... अशी हर्पेन यांनी कॉमेंट केल्यावर खेकाळत हसलो.
नंतर साजिरा यांनी सगळ्यांसाठी आणलेल्या चित्रात माझ्या वाट्याला 5 बायका असलेलं चित्र आल्याचं नंतर लक्षात आलं आणि चित्र गुपचूप खिशात टाकलं...
जेवणाचं ताट घेऊन अन्नपदार्थ घेत असताना मी चिकन आणि पनीर दोन्ही वाटीत सोबत का घेतलं असं वाटून वाढपी माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत होता. त्याच्या त्या तिरकस नजरेकडे साफ दुर्लक्ष करत... " वो लसूणकी भाजी देवो" असं हिंदी का बोललो याचा उलगडा मला अजूनही होत नाहीये..
मध्यलोक आमच्यासोबत स्कायडायविंगच्या गप्पा मारत असताना अजयला मधेच फ्रेश हवा खाण्याचा मूड झाला. मध्यलोक यांनी घारू अण्णांना सोबत घेऊन जा असा सल्ला दिला...
घारू अण्णा कुठे आहेत शोधत असताना ते एका टेबलावर धनी आणि रमड सोबत गप्पा मारत चिकन लेग पीसचे लचके तोडत बसलेले दिसले.
10-15 मिनिटे मी आणि अजय घारू अण्णा यांचं जेवण कधी संपतंय आणि कधी त्यांच्यासोबत फ्रेश हवा घ्यायला खाली जातोय याची आशाळभूत पणे वाट पाहत उभे होते. मी तर त्यांच्या ताटात किती लेग पीस बाकी आहेत हे पाहून अजून किती वेळ लागेल याचा अंदाज घेत होतो. माझा अशा नजर लावल्याने घारू अण्णांना रात्री पोटात नक्की दुखले असेल. ( कारण रात्री मला दोन उचक्या लागल्या होत्या)
नंतर अण्णा उठले आणि चला आता झालं अण्णांच जेवण असं वाटतं असतानाच दिसलं कि आता घारू अण्णां उभं राहून ताट हातात घेऊन इतरांशी गप्पा मारू लागले होते.
10 मिनिटे त्यात गेली. शेवटी तगमग असह्य होऊन अजयने चला हो अण्णा पटकन असं म्हणत त्यांना लवकर चालण्या विषयी सांगितलं.
मी, अजय, घारूअण्णा आणि इंद्रा खालच्या गेटवर मस्तपैकी ताजी हवा खाल्ली. दुपारचं भंडारकर रोड वर चिटपाखरू सुद्धा नव्हत. (अर्थात वेळ दुपारी 1-4 च्या मधेची होती) .
सगळे परत टेरेसवर गेलो तर सगळे निघण्याच्या तयारीत होते. ऋतुराजने सगळ्यासाठी सुवासिक धूप आणला होता.. अभिप्राय लिहून झाले आणि...
एका सुरेख दिवसाची सांगता होतं होती. दिवस छान आणि आनंददायी गेला होता. गटग गटग म्हणतात ते काय असतं हे एकदाच पाहिलं आणि धन्य झालो.
आभासी जगातील सगळे चेहरे प्रत्यक्ष दिसले आणि त्यांच्यासोबत दिवस घालवला यामुळे मनाला आनंद झाला.
ऋतुराजनी आयोजन एकदम मस्त केलेले होते. त्याचे खरंच आभार....

नंतर ओळख परेड मधे रॉबिनहूड आणि साजिरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत धमालच उडवून दिली.
>>>>

ते अफझुलखान गटगचे सांगितले की नाही?

माह्या कुणीबी आदी इचारलं आसतं की, तु मायबोलीच्या गटगला जाणार हाईस का? तर आपण "नाय बा" असं उत्तर दिलं असतं पर कुणासं ठाऊक देवाच्या मनात आलं आणि माह्या बी मनात आलं आन निघालो आपण बी.

तरऽ म्हटलं जाऊ येकदा आन बगू तरी ह्ये गटग का काय त्ये कसं आसतया? येवढ्या थोर मोठ्या लेखक/ लोकांच्या मंदी जायचां म्हणजी खायचं काम थोडीच हाय त्ये? दिलातं आसली धाकधूक व्हतं व्हती पर म्या काय तवा कमी हाय काय? दिलावर हिरवा रूमाल आणि थोबडावर पाऊडर लाऊन इरादा पक्का केलता बगा..

समद्यात आदी प्रोफेसर शरदजीचीं कमेंट वाचली म्हटलं आपण जाऊ ह्यांच्यासोबत नाय का? जमलीच जोडी तर "वांग भात" खात खात जाऊ..नायतर कढी वडा बी चालतया आम्हांस्नी..पर प्रोफेसर दुसरीकडे बिझी हाय म्हटले (आता कुठं त्ये बिझी व्हते? मला बी ठाव‌ नाय :))

तरऽ मंडळीऽ हाटील‌ रविराज रस्त्यावर पाय ठेविला आन् येक काळं मांजर फिस्कारून गेलं बगा.. मनातच म्हटलं

"काय ला फिंद्री उंडारतेय निस्ती?"

पर आपण अंधश्रद्धा, बींद श्रद्धा, कपूरांची श्रद्धा पाळत बिळात नाय.. आपण बिंनधास्त व्हतो..

आतमध्ये शिरल्या शिरल्या लाॅबिमंदी चार बाप्पे तंगड्या खुर्चीवर टाकून शिगारेट आन दारू पित व्हते..

माह्या वाटलं गटग ला कुणीच आलं नाय आन त्याच गममंदी जमलेली चार टाळकी पित असावी..पर म्या निट बगितलं त्यातलं कुणीबी लेखक वाटतं नव्हतं आन "ऋतुराज" नावाच तर नायच नाय..फार फार तर त्यातलं येक बेणं पक्कं "पितूराज" वाटतं व्हतं..

आपण लाॅबीमंदी ईचारपूस केली मग तिथं येक बाप्या व्हता. त्यानं माह्याकडं वरून खालून पाहीलं..

त्ये काय म्हटलं नसलं त्याचं डोळं सांगत व्हतं.

" ह्ये बेणं लेखक हाय? थोबाडावरून‌ तरी विडीच्या कारखान्याचा मजदूर वाटतया.."

पर आपल्याला सवय हाय त्याची आपण काय
फार‌ मनाला लाऊन घेत नाय..

मग त्यानं वर टेरेसवर बोट दाखवून बाहेरचा रस्ता दाखिविला‌‌ पर त्याचं डोळं सांगतं व्हतं..

"समंदी तुमच्यासारखी एलियन कार्टी छताड्यावर तडमडतायेत, जावा तुम्ही बी तडमडा"

आपण वर आलो‌ तवा मल्लीने आपल्याला खेचलंयं बगा अन् डायरेक्ट घारू अण्णा म्होरं उभारलं..आन कोण हायेत ह्ये..? म्हणून गेस कराया लावल्यानं..पर आपल्याला गेस करता आलं नाय मग नंतर‌‌ नाव सांगितल्यावर आपल्याला आपणं कच्चे मायबोलीकर हावोत आसं वाटलं.‌ निदान डोळं बगून तरी कळायला हवं व्हतं..

पर‌ नंतर गोबर्या गालाच्या माणसांनं आपल्याला नाव सांगितलं..त्यानं सांगितलं नसतं तरीबी आपण ओळखिल असतं ह्येच त्ये "ऋतूराज" हाय त्ये..

मग आपण बसलो.. आपल्या थोडं पुढचं भारीच्या लेमन ड्रेसमध्ये मॅडम बसल्या होत्या... माह्या वाटलं ह्या "शास्रज्ञ"
पुण्यामंदी "इस्रो" सारखी "पिस थ्रो" संस्थेच्या संस्थापक आसतीलं पर नाव (दक्षिणा) सांगितल्यावर आपल्याला बरं वाटलं..

ह्यो आयडी आपल्या ओळखिचा हाय..ह्यांच्याशी आपण कमेंटवर बोललो पण हाय..जॅम जॅम भारी वाटलं..
ह्ये मॅडमच्या कमेंट्स भारी असत्यात..

मग "आबा" भेटलं..आबा आपल्या चाहत्याच्या लिस्टमंदी हायेत..ह्ये आम्हांसी ठावं व्हतं.. त्यैस्नी बी भेटून बरं वाटलं बगा..

मग आम्हाला किल्ली सापडली..‌ह्या मॅडम फेबूला‌ एड हायेत.. फोटो पेक्षा प्रत्यक्षात य़ंग वाटत्यात बगा..‌आपण हाय केलं.. पुढं ईचारायचं‌ व्हतं आमची भाची "रमा" कशी हाय? पर मॅडम बिझी व्हत्या आन लगेच गेल्या..

खायला भरपूर काय काय व्हतं.. आपण चकली खाल्ली फकस्त..आपण फकस्त दोन वेळा जेवतूया आन‌ त्ये बी सकाळी अकरा आन रात्री आठ..बास..‌गोड खात नाय..
लई लोकांनी जेवणाचा आग्रह केलता..पर शिस्तीआड काय बी येता कामा नये..पुढच्या इळेला "शुगर फ्री" गोड आणा कुणीबी..‌आपण थोडं‌ खाऊ.. आपण तिथं जेवलो नाय त्याबद्दल "आय एम साॅरी बाबू.." Sad

मग नंतर शेलिब्रीटी अमेरिकन कपलं भेटलं बगा.. आयडी धनी आन आर एम डी सांगितलं बगा...धनि पण गोबर्या गालांचचं हाय त्यांस्नी "हबी" ह्ये आय डी घ्यायला पाहीजं व्हतं.. धनि म्हटलं की आमच्या म्होरं फेटेवालं, मिशीवालं येत बगा..

"हयो पचका काऊन ?"

आसं ईचारणारं व्हतो पर त्यांनी आयडीची स्टोरी सांगितल्यान म्हणून आपण काय तोंड उगडलं नायं ब्वा..

मंग आम्हाला भेटली मल्टीटेलेटेण्ड पर्सनालीटी आयडी "मध्यलोक" आसली तरी त्ये हवेत आसतात.. हवेत मंजी तसं नव्हं त्ये पेरा गाईडींघ, पैरा लाईडींग..

"त्येचं आयचं कार्ट"

आपल्याला लिव्हता बी येत नाय बगा.. इवढालं अवघड हाय बगा त्ये.. पर त्ये पेरोशूट घेऊन उडतात.. इथं आम्ही वाईच बांधावर चढलं तरी छातीत धडधडतायं आन ह्ये उडतात..त्यांचे अनुभव येकून आम्हांस्नीचं गरगगरलं बगा..आपण उडत नाय पर लोक आपल्यावर उगाचाचं उडत्यात त्ये काय कमी हाय? Happy

मग "धनूडी" आल्या, ह्या मॅडमला आपण कुठल्या टी.व्हीच्या सिरीयल किंवा जाहीरातींमंदी पाहीलयं का?
आसं‌ वाटलं..‌पर मॅडमचा ऑरा भारी हाय.. प्रेमळ हायेत.. आसं वाटलं आम्ही एकाच शाळेत शिकाया‌ व्हतो..
आन्‌ आता भेटतूया बगा..मग आम्ही "मध्यलोक" च्या टिशर्टवरची शब्दाची कोंडी सोडवली‌. "नामूबा" येवढं अवघडं धनुडी मॅडमने लगेच सांगितलं बगा अन्

"नाक मूरडणारी बाहुली" आमच्या डोस्क्यात फिट्ट बसलं बगा..‌मंग कुणीतरी अजून आलं..आता म्या त्यांचं नाव इसरलो.. क्षमा करा गरीबांस्नी मंग त्यांनी "लापि"
चा अर्थ सांगितला‌..

"लाडीक पिपाणी.."

ह्ये‌ बी डोक्यात फिट बसलं बगा...

मंग हर्पेन भेटले बगा.. आदी माहय वाटलं ह्ये मिलिटरी रिटायर आसतील पर मिश्कील स्वभावावरून त्ये नसतीलच ह्याची खात्री पटली..

डोन्ट बूक जज कवरं‌ बाय..नाय नाय डोन्ट कवर जज बाय बूक

"ह्याच्या आयचं विंग्रजीचं आन् उमर अकमलंचं कार्ट.." काय त्ये समजून घ्या गरीबास्नी..आम्ही अर्थ समजून घेतल्यान फकस्त..

मंग म्या रूद्रसेन गप्पा मारत उभारलो. आम्हांस्नी इंद्रधनुष जाॅईन झाले..

नंतर पीयू ताई भेटल्या ज्योतिषीविषयी गप्पा हाणल्या आन् आता

"आमच्या आविष्यात आणखी काय उजेड पडणार हाय?"

ह्ये एकदा त्यांस्नी इचारावं म्हणतो..

शेवटी जाताना "सई" भेटल्या..‌रोज पुरणपोळ्या खात असाव्यात..इतक्या गोड हायेत आणि बोलतात सुद्धा..
मॅडम म्या तुमचा फॅन झालो बगा..डोंबिवलीला या‌ येकदा आपण दोघं मिळून "अन्जू" मॅडमला भेटू..

बाकी प्रज्ञा मॅडम फुढच्या ईळेला भेटू.. तुमच्याशी बी बोलायचं‌ व्हतं..

हेमंतकुमार/ कुमार सरांनाही भेटायचं राहून गेलं बगा. हयांचे लेख आपण वाचतो.. पर त्या दिशी लय गडबड व्हती..‌

काही लोकांना भेटायचं/ बोलायचं राहीलं बगा..त्यासाठी

"आय एम साॅरी बाबू" Sad

फुढच्या ईळेला नक्की भेटतूया बगा..

^^"ऋतुराज" नावाच तर नायच नाय..फार फार तर त्यातलं येक बेणं पक्कं "पितूराज" वाटतं व्हतं..^^

हे भारीच...
अजय, वृतांत छान झालाय.
निळ्या ड्रेसच्या मॅडमनी असे स्वागत केले की जणू त्यांच्या घरचे कार्य आहे, हे लिहायचे राहिले की..

बाकी पण सारे वृतांत एका पेक्षा एक भारी..
कवे, तू तर आता भ्रमणमंडळ पार्ट २ लिहिणार.. लिही लिही...

अजय Lol

परवाच्या गटगला बराच वेळ तिता , रुद्रसेन, आणि पशुपत यांचं विद्रोही गटग चालू होतं. नंतर त्यात कुमार सर add झाले. हे चौघे नेमकं काय बोलत होते याची मला भयंकर उत्सुकता आहे.

बागडायला अख्खं टेरेस मिळाल्याने बऱ्याच लोकांनी वेगवेगळे स्पॉट्स शोधून सेल्फ्या, रिळे करून घेतली असा एक संशय आहे. आमचा अमुक ग्रुप तमुक कंपू असं सांगत ग्रुप फोटो पण काढून घेतले अनेक जणांनी. या सर्वांना पण विद्रोही म्हणावं का असा विचार डोक्यात चालू आहे.

त्याचप्रमाणे ओळख परेड चालू असताना मधेच खाऊ जवळ असलेली मंडळी एकदम दंगा करत खाऊ वर तुटून का पडली याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या कोणीतरी.

साजिरा सागर कारंडे सारखा दिसतो हे एक अजून नमूद करून ठेवते Proud

गटगला प्रत्येकाशी बोलणं झालं तरीही गप्पा झाल्या नाहीत. वेळ कमी पडला अशी माझी तक्रार आहे. पुढच्या वेळी रेस्टॉरंट हॉपिंग थीम ठेवून दिवसभर गटग करावं.

अजय दादा भारीच लिवलाव की. डोंबिवली गटग होऊनच जाऊदे कर्मभूमी सध्या तिथेच आमची >>>

हावं.. करूया की...

निळ्या ड्रेसच्या मॅडमनी असे स्वागत केले की जणू त्यांच्या घरचे कार्य आहे, हे लिहायचे राहिले की..>>>

हावं.. आय एम शाॅरी.. म्या इसरलोच बगा....डोस्क्यातच राहीलं नाय..पर खरी गोष्ट हाय.. फुढच्या ईळेला लक्षात ठेवीन..

अजय चव्हाण कसलं खुसखुशीत लिहिलंय. लय भारी. तुम्ही डोंबिवलीत राहता का. माझं नाव वाचून एकदम छान वाटलं. सईने आठवण काढली का, ती दोनदा येऊन गेलीय माझ्याकडे, आवाज फार गोड आहे तिचा. भेटूया आपण.

प्रीती तू डोंबिवलीत असतेस का.

अतिशय छान वृत्तांत लिहीत आहात सर्वजण !
विविध शैलींचे/बोलीचे वृत्तांत वाचून धमाल येत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रस्थापित आणि विद्रोही यांच्या चुली पूर्णपणे वेगवेगळ्या आणि वेगळ्या ठिकाणी असतात. पण आपल्या इथे एक बरे झाले . . . अशा सर्व चुली एकत्र मांडल्या गेल्याने याहून वेगळ्या गटसंमेलनाची गरज राहिलेली नाही. Happy

उपस्थितांपैकी सुमारे निम्म्या लोकांशी व्यक्तिगत बोलणे होऊ शकले याचा आनंद आहे; यातून वेळेवर उपस्थित राहण्याचा फायदा समजू शकेल ! Happy परंतु त्याचबरोबर मोठ्या संख्येमुळे आणि वेळेअभावी आलेल्या बंधनामुळे उरलेल्या निम्म्या लोकांशी व्यक्तिगत बोलणे होऊ शकले नाही याचीही रुखरुख आहेच.

माझी आतापर्यंत सुमारे 20 तरी गटग झाली असावीत. या अनुभवावरून काही लिहितो.
चार जणांच्या यथासांग गटगला एक-दीड तास वेळ असे गणित समर्पक वाटते. त्या हिशोबाने 40+ जणांसाठी तीन तास अतिशय अपुरे पडणारच यात नवल नाही. आता यावर उपाय एकच. जेव्हा मोठ्या संख्येने नोंदणी होईल तेव्हा एक दिवसाचे निवासी गटग करणे हा उत्तम पर्याय राहील. त्या दृष्टीने आपण सगळे विचार करू. निवासी गटगची मजा काय असते ती आम्ही ‘सप्तसुरांनी’ हैदराबादला भरपूर चाखलेली आहे.

एकवार पुन्हा सर्वांना धन्यवाद ! पु. ग. प्र.

गटगला प्रत्येकाशी बोलणं झालं तरीही गप्पा झाल्या नाहीत. वेळ कमी पडला अशी माझी तक्रार आहे.>> अगदी मनातले लिहीलेस

अजय मस्त खुसखुशीत वृ. हा मातीचा पाण्याचा गूण म्हणावा का डोंबिवलीच्या Wink

वृत्तांत वाचून हा कुणी लिहिला असेल याचा अंदाज बाधतोय. जे नियमित लिहित नाहीत त्यांचा प्रश्नच नाही. साजिरा यांचा पहिला प्रतिसाद चुकल्यावर पुढचे ओळखले. लेटेस्ट (वरचा) मात्र फारएण्ड ने लिहिलं आहे हा अंदाज साफ चुकला.

भारी वृत्तांत.
हां एविएठि चा वृ चं माझ्या मायबोलीकर होण्याला कारणीभूत आहे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..... मी आंतरजालावर कविता शोधत होते . शोधता शोधता मंतरलेल्या चैत्रबनात आले. ( अत्ता चर्चगेट आलं म्हणून थांबते)
क्रमशः:

Pages