धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिराचे चार आयडी म्हणजे सगळ्यात कमी असतील.

मदत समितीतल्या एकाचे ३५ माहितीतले आहेत. बाकीचे वेगळेच.
आणि भास्कराचार्यचं काय चाललंय ते तर जगजाहीर आहे. च्रप्स,कटाप्पा हे माहितीतले.
बदनाम बाकीचे होतात.

अरे काय मस्त मस्त वृत्तांत येत आहेत. वाचतेय सगळे. धनि आणि रमडचं लग्न होतं , बरीच घरची मंडळी उपस्थित होती, मजा करून गेली. आमचं घरचं कार्य हुकल्याचं फिलिंग आलं. Happy

सामी, सान्वी, ऋतुराज, अजय चव्हाण, माझेमन, कविन, दक्षिणा छान लिहिले आहे. Happy हर्पेन आणि साजिरा, मस्त.

<<<<< एकाचे ३५ माहितीतले आहेत. >>>>>

काही मंडळी तर एक्सेल फाईल मध्ये विविध डू-आय डीज् आणि त्या प्रत्येकाचा पासवर्ड असे टेबल तयार करतात असे ऐकले / वाचले आहे.

खरे खोटे ते नरपुंगव आणि अ‍ॅडमिन्स च जाणे !

इतक्या प्रतिक्रिया आणि इतके वृ - जबरी! कॅच अप करतोय. २-३ पाने मागे आहे. पण काही जुने आणि बरेच नवे लोक उत्साहाने लिहू लागलेले पाहून मस्त वाटले.

प्रत्येक डू आयडीला वेगळा पासवर्ड ही हाईट ऑफ सिक्युरिटी झाली >>> Lol

माझ्या सोबत सुरंगीची रोपे >>> मी जस्ट लिहीणारच होतो की इतका वेळ व बाफची १२ पाने ऋतुराजला वृक्षराजीबद्दल लिहायला माबोकरांनी चान्स दिला नाही ही सुद्धा एक अ‍ॅचिव्हमेण्ट आहे, तेवढ्यात हे वाचले. (आणि बर्‍याच दिवसांनंतर वाचलेला "सोबत" शब्दाचा बरोब्बर वापरही)

प्रत्येक डू आयडीला वेगळा पासवर्ड ही हाईट ऑफ सिक्युरिटी झाली >>>

असेल ब्बॉ ...

एका पेक्षा जास्त आयडी चा अनुभव नाही ना. Happy

प्रत्येक डू आयडीला वेगळा पासवर्ड ही हाईट ऑफ सिक्युरिटी झाली>> Lol

ऋतुराज भरभर लिही, मजा येतेय वाचायला

सिमरन, तुम्हाला वर्चुअल भेटून छान वाटले.
पुढचं गटग पिच्चरचे ठेवा तेही मुंबईत>>>>>आयडिया चांगली आहे.

सई, मस्त लिहिले आहे.
या ग्रुप फोटोत यक्ष दिसत नाहियेत का?>>>>> आहेत मागे.

माझेमन, भारीच वृत्तांत लिहिला आहे. तुम्ही अगदी वेळेत आलात आणि ग्रुप फोटोत capture झालात. त्यामुळे मुख्य धाग्यातील फोटोत अगदी सगळे आले.

कविन, भारी लिहिलंस. माझी ट्रेनमधली सगळी मज्जा हुकली.
रुद्रसेन, मस्तच लिहिला आहे वृत्तांत. मला वाटलं स्टाफचा सुपरवायझर असेल.>>>>> Lol

"ऋतुराज" नावाच तर नायच नाय..फार फार तर त्यातलं येक बेणं पक्कं "पितूराज" वाटतं व्हतं Rofl
धनि पण गोबर्या गालांचचं हाय त्यांस्नी "हबी" ह्ये आय डी घ्यायला पाहीजं व्हतं>>>>> Lol
अजय जी लय भारी वृत्तांत लिवला तुमी. आक्षी आवडला बघा.

आम्ही खरं म्हणजे बोट कशी काय पुण्याला आणता येईल याचा एक नकाशा करून दिला होता पण मुंबईकरांना तो पसंत पडला नाही आणि त्यांनी शेवटी त्यांच्या जिव्हाळ्याच्या ट्रेनला उदार आश्रय दिला.>> Lol मी कागदी बोट घेऊन आले होते बरोबर>>>>>> अशा प्रतिक्रिया वाचून चाट पडल्यामुळे चाट बोट चा शोध लागला असणार..

प्रज्ञा, मस्त खुसखुशीत वृतांत. गटग चे जमवलेत ते भारी केलं.

वर्षू दी, तुम्ही आलात खूप खूप बरं वाटलं. कुणी नसेल नोट केलं पण मी पाहिलं ते रंगीबेरंगी band-aid Happy

सामी, भारी लिहिलंस. बरं झालं आलीस

दक्षिणा, तुझी एन्ट्री आवडली. आल्या आल्या पियुबरोबर जो काही लुटुपुटू लपाछपीचा खेळ खेळला तो आवडला. पियू बरोबर चैतन्य आला नसतानाही एक चैतन्य निर्माण केलं

सान्वी, छान लिहिलं
आता नियमित येत जा गटग ला.

सॉरी गटग झालं आणि दुसऱ्याच दिवशी हैदराबादला कामानिमित्त आलो. आज वेळ मिळाला की लिहितो पुढच.

वृक्षवल्ली वरुन आठवलं
माझ्याकडे एक पंढरपुरी तुळस आहे (कापूर तुळस पण म्हणतात तिला. पानांना हात लावला तर हलका वास येतो कापरासारखा) तिला मंजिऱ्या छान लागलेल्या दिसल्यावर क्लिक झालं अरे रमडला देता येतील या (तुळशी वरुन आमचं ती भारतात येण्यापुर्वी सहज बोलणं झालं होतं त्यामुळे हे डोक्यात आले) याच्या बरोबर कृष्ण तुळशीच्या मंजिऱ्या आणि गोकर्ण बिया पण नेऊ. पण शंका आली मनात की हे तिला न्यायला परवानगी नसेल तर विमानतळावर अडवायचे. तिला विचारल्यावर म्हणे अटकच करतील Lol तुळशीला म्हंटल तुझा विसा रिजेक्ट झाला, तू काही परदेश बघत नाहीस Lol
परत तिचाच मेसेज आला "बाबांना आवडतील .. तुळस आणि गोकर्ण त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे" म्हंटल चला बियांनो परत ॲड व्हा सामानात माझ्या, कराडहून प्रवास सुरु झाला होता तुळशीचा त्याचा एक भाग मुंबईत वाढतोय एक पुण्यात वाढेल.
मग गोकर्णच्या अजून काही बिया एका झिपलॉक पिशवीत भरल्या, म्हंटल बघू या यावर कोणाच्या घरी जायचे लिहीलेय. मुंबईकरांनी ट्रेन प्रवासातच त्या त्यांच्या बॅगेत ठेवल्या आणि उरलेल्या ३ शेंगा मी जपून ठेवल्या होत्या त्यावर धनवंतीचे नाव लागले. तिच्या माऊंसाठी खाऊ घेऊन गेले होते पण तिच्यासाठी काही नेलेच नव्हते. या बिया तिला देता आल्या म्हणून छान वाटले. एक गोकर्ण असच पजोकडे वाढतय. एक गुलबक्षी अशीच माझ्याकडे गोव्यातल्या माबोकरणीकडून आलेय (इथे व्हॉट्स ॲप वरची डोळ्यात बदामवाली स्मायली इमॅजीन करा)

प्रवासी झाडे बघून मला फार छान वाटतय

कविन
वृक्षवल्ली - हे सगळं मी वाचतोय.
मला ह्यातलं काहीही मिळालं नाही.
नामुबा

ऋतुराजकडचा गोकर्ण आणि तेजो कडची अबोली कॅनडात वाढते आहे. Happy तुळस आणि गोकर्ण घरात न आणल्याने मारलेत मी. पण मंजिरी आणि बिया आहेत. जरा बरं झालं हवामान की परत लावेन.

चामुंडराय ड्युआयडीचा ड्युआयडी नसतो. ३५ आयडी काय उगीच काढून ठेवलेले असतात का ? Proud
ज्याने एव्हढे ड्युआयडी बनवलेत त्याच्या ड्युआयडीला राग येईल.

एक्सेल फाईल बनवलीय हे कसं कळतं ? >> इथे हॅकिंगचे क्लासेस पण घेतात एक गृहस्थ. त्यांना न आवडणार्‍या आयडींचे मोबाईल हॅक करतात आणि त्यांच्या शिष्यांना पण शिकवतात.

माझ्याकडचं नांदेड च्या गावरान आंब्याचं रोप अनया च्या शेतावर गेलंय
गटग दिवशी transfer केलं.
रोपाचा नांदेड ते तळेगाव via आळंदी असा प्रवास Happy
.
वृ वाचतेय लिहीत राहा धमाल आहेत सगळ्या posts

वाह मंडळी....
एकेकाचे वृत्तांत वाचून मजा येतेय. किती धमाल केली असेल हे ही जाणवत आहे. पण आमच्या सारख्या लोकांना जे गटग ला उपस्थित राहू शकले नाही त्यांना काही चेहरे ओळखू आले जे मागच्या गटग मध्ये होते. बाकीचे ओळखू येत नाहीये.
कृपया कुणीतरी ते सस्पेन्स उघडा...!

काय धमाल वृत्तांत आहेत सगळेच. साजिरा, कविन, अजय चव्हाण, ऋतुराज, किल्ली, माझेमन आणि इतर सगळेच फार धमाल आली वाचून.

Rmd आणि धनि, मला निरोप मिळाला होता पण घरातलाच एक कार्यक्रम असल्याने येता आले नाही. मी शेवटपर्यंत आशा सोडली नव्हती की हे लवकर संपले तर निदान भेटायला तरी येता येईल, पण नाहीच जमले. सॉरी.

मायबोलीचे गटग जमत असेल तर चुकवू नये असेच असते नेहमी. भेटणारी माणसं, भेटीची जागा, भेटून बोलायचे विषय, खायचे पदार्थ या सर्वांच्या पलीकडे एक आभासी पण तितकंच खरंखुरं असं एक फिलिंग असतं जे यासर्वाच्या वरचढ ठरतं. सूर्योदय किंवा सूर्यास्ताला जेव्हा आपण समुद्रकिनारी उभे असतो तेव्हा जसं ते एकूण समीकरणच परफेक्ट सेट झालेलं असतं त्यात काही कमी जास्त म्हणायला जागा नसते, तसं दरवेळी मला वाटतं. भरभरून मिळतच रहातं आपल्या गटग मधून. ती ऊर्जा हे बंध अधिकच घट्ट करते. आणि वृत्तांत इथे लिहिल्याने अंशतः का होईना, ती ऊर्जा इतरांना पास ऑन होते. इथे लिहिल्याने आपण भेटलो म्हणून त्याबद्दल पण पुन्हा इथेच येऊन लिहायचे असे ते वर्तुळ पूर्ण होते! त्यामुळे अजून न लिहीलेल्या लोकांनी पण दोन ओळी तरी लिहा. Happy

एक फार चांगली संधी हुकल्याची चुटपुट लागली आहे, पण ती गोड आहे कारण इथे धागा सुरू झाल्यावर आणि तिथेही माझी आठवण काढली इतकं मला पुरेसं आहे. भेटत राहू, लिहीत राहू!

पहिला भाग बरोबरे, पण दुसरा चुकीचा. दक्षी सिलेब्रिटी म्हणूनच जन्माला आलीय. पण ती भितीदायक नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. >> साजिऱ्या तूच रे तूच माझा तारणहार.

आशूडी, तुला भेटायची इच्छा होती. साजिऱ्या कडे तसा निरोप पण दिला होता. पण एकाच गटग मध्ये फार सेलिब्रिटी नकोत म्हणून तुझं येणं cancel झालं असावं.

असो. पुढच्या गटगला येणं जमव नक्की. इंतजार रहेगा Happy

दक्षिणा, तुझी एन्ट्री आवडली. आल्या आल्या पियुबरोबर जो काही लुटुपुटू लपाछपीचा खेळ खेळला तो आवडला. >>>

तुमचा खेळ झाला पण माझा जीव जाता जाता राहीला.
चित्र डोळ्यासमोर आणा, माझ्या आगे-मागे लपत होत्या ह्या दोघी !
मॅरॅथॉन नंतरचा रिकव्हरी मोड नुकताच सुरु झालाय, सगळा व्यायाम बंद आहे सध्या आणि मी इतक्यात इतका आडवा वाढलो की काय असं वाटून छातीत धस्स झालं ना माझ्या.
पण मग मलाही लक्षात आलं त्यांचं लुटुपुटू चाललंय म्हणून आणि जीव भांड्यात पडला.

रमड,खूप जास्तच सेलिब्रिटी होते की! प्रेक्षक म्हणून येऊन सेल्फी काढायला तरी यायला हवं होतं! नक्की जमवणार पुढच्या वेळी. किती दिवस आहेस अजून पुण्यात -एक मिनी गटग परत करता येईल Happy
हर्पेन Lol तुला फक्त वडाच्या झाडाचा जन्म घ्यायला लागेल आडवे वाढायला - इतर शक्यता शून्य!

आशूडी - मग गटण्याने पुलंना वटवृक्षाच्या सावलीत किती पांथस्थ येतात वगैरे म्हंटल्यावर त्यांना वाटले तसे त्याला वाटेल Happy

हर्पेन Lol तुला फक्त वडाच्या झाडाचा जन्म घ्यायला लागेल आडवे वाढायला - इतर शक्यता शून्य! <<
नको हर्पेनजी.. ह्या माबोकरणी परत तुम्हाला धागे बांधून गुंडाळतील..

आशुडी, फा, निरुदा
एक्दम डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं

वटवृक्ष, लपाछपी खेळणारे, दोरा गुंडाळणारे, पारंब्याना लोंबकळणारे
आणि ह्याला आता धावता येणार नाही म्हणून काय काय वाटणारे माबोकर

Pages