सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

हर्पेन तुमासमि
हर्पेन तुमासमि
माझा सर्व्हर किंवा
माझा सर्व्हर किंवा माबोसर्व्हर पण सद्गदीत झाला. मला आज सकाळपासून दोन तीन वेळा लॉगीन एरर आला. इतक्या वर्षात कधी पासवर्ड बदलला नव्हता तो आज सकाळपासून दोन वेळा रिसेट केला
कविन, छान वृत्तांत!
कविन, छान वृत्तांत!
सगळ्यांचे वृत्तांत वाचतोय,
सगळ्यांचे वृत्तांत वाचतोय, ते आणि फोटोज आवडलेही आहेत!
अभिप्राय वही एकदम भारी 👍
>>>"बाकी जास्त लिहित नाही कारण मी वृत्तांत लिहिणार आहे.">>>
ऋतुराजा तुझ्या आणि हर्पेन ह्यांच्या 'संयोजकांच्या नजरेतून' वृत्तांतांची आणि 'धनी आणि rmd' ह्या उत्सव मुर्तिंच्या' नजरेतून लिहिलेल्या वृत्तांतांची विशेष प्रतीक्षा आहे...
वाह! फार छान वाटलं सर्वांचे
वाह! फार छान वाटलं सर्वांचे प्रसन्न आनंदी चेहरे बघून! वहीमधल्या नोंदी/अभिप्राय सुरेख!
सर्वांचे वृत्तांत वाचायला उत्सुक आहे.
उत्सवमुर्तींसोबत माझा फोटो
उत्सवमुर्तींसोबत माझा फोटो टाकून मिरवून घेतो.
रमड आणि धनि, तुमचे विशेष आभार
रमड आणि धनि, तुमचे विशेष आभार मानायचे राहिलेच! अनेक वर्षांनी माबोच्या अघोषित स्वागत समितीची आठवणही जागी झाली तुमच्यामुळं.
येत रहा, भेटत राहू.
सगळ्यांच्या वृत्तांतांच्या प्रतिक्षेत.
मस्त मस्त मस्त ! वहीची
मस्त मस्त मस्त ! वहीची आयडीया भारी आणि काहीजणांची अक्षरं किती सुरेख आहेत अजूनही! सगळ्यांचेच खूप कौतुक देश परदेशातून आलेले हजर मेंबर्स आणि उत्कृष्ट संयोजकांचे !
>>>""उत्सवमुर्तींसोबत माझा
>>>""उत्सवमुर्तींसोबत माझा फोटो टाकून मिरवून घेतो."
एक नंबर साजिराजी... 👍
माझे नाव पण नसल्याचा निषेध.
माझे नाव पण नसल्याचा निषेध.
अर्रे दक्षी.. मी इथे
अर्रे दक्षी.. मी इथे असलेल्या तीन वेळा ' सहा महिन्यात ' तू गटग अरेंज कर, बघ मी येते की नाही ते
काय भारी झालंय गटग
काय भारी झालंय गटग
माझं मिस झालं थोडक्यात
असो
परत असेनच मी
वृत्तांत आणि फोटोतून जाणवतय मी खूप सारी मजा आणि आनंद मिस केलाय ते
आबा gtg वरून रिटर्न येताना भेटला
त्याचा चेहराच सांगून गेला मी काय काय मिस केलंय ते.
लिहीत राहा वृत्तांत
त्या रूपाने ( rmd नव्हे ) तरी gtg ला होतो असा आनंद घेतो.
मुंबई गँगचे विशेष कौतुक
उत्साही आहात सगळे. दंडवत.
तुम्हाला भेटण्याची संधी गेली माझी.
Harpen ऋतुराज ह्यांनी प्रचंड मेहनत घेतलीय
किती भारी हे काम !!!!!!
यक्ष ह्यांनी तयार केलेले slambook तर नेत्रदीपक आहे
देखणी अक्षरं, चित्रं आणि मेसेज.
अनेक जुने जाणते माबोकर देखील आलेले दिसले.
शरद g देखील आलेले होते ना? मला फोन आला होता त्यांचा.
मी ऋतुराज सोबत connect करून दिले होते.
फोटोत दिसले नाहीत.
ते ही फार उत्साही आहेत.
250 किमी gtg साठी drive करत येतात.
पण गटग 'महागटग' होणार ह्याचा
गटग 'महागटग' होणार ह्याचा अंदाज आल्याने मी हॉटेल रविराजचे नाव सुचवले आणि ते मान्य झाले इत़कंच काय ते माझे योगदान.
खरा संयोजक ऋतुराजच
आते हुए लक्ष्मी को ना नही
आते हुए लक्ष्मी को ना नही कहते म्हणतात तसं आती हुई प्रशंसा को ना नही कहते हर्पेन.
ऋतुराज मुंबईला असतात ना, हे आता आठवले, आणि तिथुन एवढे छान आयोजन यासाठी अजुन एकदा कौतुक.
कविनचा वृत्तांतही छान खुसखुशीत आहे.
मी म्हणणारच होतो शरद दिसत
मी म्हणणारच होतो शरद दिसत नाहीयेत फोटोत. ते एकदम उत्साही आहेत, येणार नाही असं होणारच नाही.
कविनने लिहिलेला टिकमार्क वृत्तांत असेल पण तो काही वृतांत नाही. पावशेर वगैरे म्हणायचं तर म्हणू दे तिला, पण मुंबईवरुन येऊन गटक करुन परत मुंबई गाठली तो वृतांत नळ गळल्यासारखाच वाचायचा आहे. परत लिही निवांत बसुन.
शरदजींचे नाव add करुन वरची
शरदजींचे नाव add करुन वरची लिस्ट अपडेट करा
माबो गटग वृत्तांत
माबो गटग वृत्तांत
तर या ठिकाणी काही अदृश्य परंतु महत्वाच्या घटकांचे आभार मानणे विशेष गरजेचे आहे.
यांत सर्वप्रथम मी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांना धन्यवाद देईन. नागरिकांच्या सेवेसी सदैव तत्पर असलेल्या या मनपांनी संयुक्त विद्यमाने किंवा वैयक्तिकरित्या मेट्रो, बस/रेल्वे स्थानक ते फूटपाथ अश्या कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाचे भूमिपूजन, उदघाटन किंवा राष्ट्रार्पण असे सोहळे रविवारी घेतले नाहीत. आदल्याच दिवशी मुंबई मनपाने मुलीच्या शाळेकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर अचानक विकासकामे सुरु करून मुलीला शाळेतून आणणे व बस डेपोकडे जाणे या अनुक्रमे दुचाकीवरून ५ मिनिटे, चालत १० मिनिटे इतकाच वेळ लागणाऱ्या कार्यक्रमांना दुचाकीवरून ३५ मिनिटे आणि चालत १५ मिनिटे असा वेळ लावून बुडबुडा आणला होता.
त्यामुळे पुणे व pcmc ने ‘रंग माझा वेगळा’चा सूर लावल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे जाहीर आभार.
त्यानंतर अमुक टेकडी, तमुक नदी ते लोकशाही यांपैकी काहीही वाचवू इच्छिणाऱ्या जागरूक नागरिकांचे मी आभार मानते. त्यांनीही रविवारी वर्क फ्रॉम होम करणे पसंत केले असावे. कारण रस्त्यावर त्यांची उपस्थिती नव्हती.
यानंतर नंबर येतो तो वॉर्डावॉर्डातील तमाम फ्लेक्सकार्यसम्राटांचा, भावी नगरसेवक-आमदारांचा आणि त्यांच्या शुभेच्छुकांचा. त्यांनी वाढदिवस, हळद, लग्न, वरात, हळदीकुंकू, तीळगूळ समारंभ असे कुठलेही कार्यक्रम त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर घेतले नाहीत. यामागे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील खर्च, यशापयश याचा संबंध असावा अशी एक शक्यता वाटते.
तिकडे मध्यपूर्वेतही एकमेकांवर बॉम्बहल्ले करणे, टेहळणी विमाने, जहाजे किंवा ड्रोन पाठवणे असे उद्योग वीकडेजसाठी राखून ठेवलेले दिसले.
उबर पार्टनर्सनी राईड स्वीकारून, दिलेल्या वेळेत येऊन आणि दाखवलेल्या भाड्यातच प्रवास घडवून आणून मोलाचे सहकार्य दिले. नाही म्हणायला परत जाताना मीटरप्रमाणे भाडे द्यावे लागेल असे सांगून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला पण चर्चेअंती राईड कॅन्सल करून आमचा (हे आदरार्थी बहुवचन नाहीये) मार्ग मोकळा केला.
यामुळे गटगोत्सुक माबोकरांना त्यांच्या कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या निवासस्थानापासून गंतव्यस्थानी जाण्यास व परतण्यास कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही.
तर एवढे सगळे ग्रह जुळून आल्यावर काय बिशाद होती गटगला न जाण्याची.
पण वैयक्तिक कार्यबाहुल्यामुळे (शुद्ध मराठीत पर्सनल कामांमुळे) मी गटग संपता संपता जाणार होते. त्याप्रमाणे दीड वाजता पोहोचले. समोरच्याच शोरूममधल्या सिल्क साडीकडे दुर्लक्ष करून गटगकडे कूच करण्याचा उत्साह केवळ मायबोलीच देते बरं. टेरेसवर पोहोचले तर काय एक भला मोठा ग्रुप फोटो काढून घेण्यात आणि रविराजचे २-३ गणवेशधारी फोटो काढून देण्यात मग्न. आता काय करावं बरं अश्या विचारात असताना ग्रुपने काहीतरी चुकीची घोषणा दिली पण त्यात मायबोलीचा उल्लेख होता. त्यामुळे सगळी भीडभाड सोडून फोटोत घुसलेच. जवळच उभ्या असलेल्या श्री व सौ मल्ली यांनी ही कोण बया मधेच आली असे विचार मनात न आणता तत्परतेने जागा अड्जस्ट करून दिली.
तेवढ्यात एक साधी घोषणा तुम्हाला देता येत नाही, काय तुम्ही गटग करणार असे विचार करून एक माबोकरीण (मी विसरले नेमकी कोण होती, बहुतेक रीना अभि असावी) पुढे आली व तिने काय घोषणा द्यायची व काय ऍक्शन करायची ही नीट सांगितले. समस्त माबोकरांनी तिच्या सूचनेप्रमाणे नीट ग्रूप फोटो काढून घेतले. तेच तुम्ही काही वृत्तांतामध्ये पाहिले असाल. फोटो आटपता आटपता ऋतुराज यांची भेट झाल्यामुळे ओळखीचा चेहरा दिसून हुश्श झालं.
मनासारखे फोटो आल्यावर साजिरा यांनी गटगस कारणीभूत ठरलेल्या रमड व तिच्या धन्याला एम एफ हुसेन (आणि अजून कुणीतरी काढलेल्या) चित्राच्या प्रतिकृती सादर भेट दिल्या. त्यावेळी त्यांनी तुम्ही कुणी हुसैनवर रागावलेला नाहीत ना असे विचारून बारीक खसखस पिकवली.
पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सर्व गटगकरांसाठी (बहुतेक मधुबनी शैलीत साकारलेली) पेंटिंग्स आणली होती. त्यातले आपल्या आवडणारे चित्र घेण्यासाठी माबोकरांनी झुंबड उडवली. सर्वच चित्रे सुंदर असल्यामुळे चॉईस करायला वेळ लागत होता.
त्या प्रतिकृती व चित्रे साजिरा यांनी स्वतः काढल्या आहेत का हे विचारायचे आणि चित्रांबद्दल आभार मानायचे राहून गेले.
फोटो काढण्याआधी उपस्थित माबोकरांची ओळख परेड झाली असल्यामुळे आता स्वतःच ओळख करून घेणे/देणे क्रमप्राप्त होते. आजकाल कुठलीही गोष्ट स्वतः करणे (म्हणजे उपस्थित राहणे, गाडी चालवून अमुक ठिकाणी जाणे) वगैरेला महाराष्ट्रात फार प्रसिद्धी मिळायचे दिवस आहेत. त्यामुळे मागे हटण्याचा सवाल नव्हता. तर मी दिसला माणूस की सांग/विचार माबो आयडी करत सुटले. त्यात मी किल्लीला "तू किल्ली आहेस का? तू फोटोपेक्षा वेगळी दिसतेस. पण तुझे केस फोटोसारखे दिसतात" असं सांगितलं. ती नक्कीच बुचकळ्यात पडली असणार. पण जायच्या गडबडीत होती त्यामुळे फारसं बोलणं नाही झालं.
रमड व धनीशी ओळख झाली. रमडला तिचं लिखाण आवडते हे सांगितलं का नाही ते आठवत नाही. सांगितलं नसेल तर रमड इथेच गोड मानून घे.
प्रज्ञाशी वाड्यावर बोलणं होतंच पण भेट पहिल्यांदाच पुण्यात झाली. तिच्याशी गप्पा मारत असताना रविराजच्या कर्मचाऱ्यांनी व संयोजकांनी जेवायला सुरुवात करायची सूचना केली कारण २ वाजत आले असावे. दोघी रत्नागिरीच्या माहेरवाशिणी. त्यामुळे तिने आग्रहाने व्यवस्थित जेव असं सांगितलं. साखर कमी करावी अश्या बेतात असताना समोर गाजराचा हलवा होता. मग थंडीच्या दिवसात गाजर हलवा खाल्ला नाही तर कसं चालेल हे आम्ही एकमेकीला पटवून दिलं.
जेवण चालू असताना हर्पेनची ओळख झाली. हर्पेनचे फोटो पाहिले असल्याने ओळखायला वेळ लागला नाही.
कृष्णा घरचे रव्याचे लाडू सगळ्यांना वाढत होते. त्यामुळे पंगतीत बसल्याचा फील आला. लाडू फारच सुरेख होते. आता रव्याचे लाडू खाल्लेच आहेत तर एवढ्याश्या गाजर हलव्याने काय होणार आहे म्हणून (२ टीस्पूनच बरं) हलवा खाल्ला.
जेवण संपता धनुडी यांच्याशी ओळख झाली. त्यांची आता संतूर मॉम वरून संतूर सासू अशी पदोन्नती करण्यात येत आहे.
हे सर्व चालू असताना अभिप्राय लिहा अशी सूचना आली. त्या वहीवरची चित्रं बघत अभिप्राय लिहिला. त्यावेळी कुणाचा तरी व्हिडीओ कॉल मृणालीबरोबर सुरु होता पण बोलायचं राहून गेलं. अतरंगी यांच्याशी कॉलवर बोलले नाही पण कुणीतरी ‘हे अतरंगी’ अशी ओळख करून दिली.
यक्ष यांनी भाचेसूनेने बनवलेले फुलांच्या आकाराचे डेकोरेटिव्ह पॅच दिले. ऋतुराज यांनी सुगंधी धूप कोन दिले. एका टेबलवर काजूकतली, मैसूर पाक, कंदी पेढे असा जंगी ऐवज मांडला होता. आत्ताच तर जेवलो आहे, आता नको म्हटल्यावर थोडंसं तरी रिकाम्या बॉक्समध्ये भरून घरी घेऊन जा असा प्रेमळ आग्रह झाला. कधीही न भेटलेल्या लोकांसाठी एवढ्या विचारपूर्वक गिफ्ट व खाऊ आणणाऱ्या लोकांचे विशेष कौतुक आणि शाऊट आऊट टू द पर्सन ज्यांनी चिंचेच्या गोळ्या आणून माबोकरांचे आंबट शौक राजरोस पुरवले. मी त्यातल्या २-३ गोळ्या ढापून घरी आणल्या. त्यामुळे मुलीने पुढच्या समस्त गटगना कितीही वेळ जायची परमिशन दिली आहे.
मग उपस्थित वाडेकरांचा, उपस्थित मुंबईकरांचा असेही फोटो काढले गेले. त्याविरुद्ध गटबाजी कंपूशाही असे नारे दिले गेले. काही माबोकरणींनी वाड्यावर नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांना ‘बाई वाड्यावर या’ असे जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे आणि त्यांनी ते सहर्ष स्वीकारले आहे.
घरचे कार्य असल्याप्रमाणे समस्त माबोकरणी तश्याच तयारीत आल्या होत्या. त्यातही वर्षू यांचा all black ensemble आणि गळ्यात रंगीत (सिल्कचा?) नेकपीस लक्ष वेधून घेत होता. त्यावेळी त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायची राहून गेली ती आत्ता देते.
फोटो काढेपर्यंत कुमार होते पण जेवल्यानंतर दिसले नाहीत. त्यांच्याशी बोलणे राहून गेले. फोटो काढण्यापूर्वी रॉबिनहूड यांनी माबोच्या आठवणी सांगितल्या असाव्यात. कारण त्या मी मिस केल्या.
मुंबईला जायचे असल्याने ३ वाजता परत जायचे वेध लागले. सामी आणि मी वाकडमध्ये जाणार असल्याने एकत्र जायचे ठरवले पण उबर काही आम्हाला नीट रस्ता प्लान करू देईना. मग जिथे ओळखीचे वाटेल तिथे उतरून आपला मार्ग धरायचा असे ठरवून एकत्र गेलो. गाडीतही गप्पा झाल्या. त्यात आम्ही दोघी काही वर्षांपूर्वी एकाच कंपनीत आणि काही काळ एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो याचा शोध लागला.
खूप जणांना भेटले. काहींशी गप्पा झाल्या तर काहींशी नुसती ओळख. काही जण आधी गेल्यामुळे भेट झाली नसावी. पण एकंदरीत फार मज्जा आली.
एवढ्या सगळ्यांना एकत्र आणणाऱ्या आणि मोकळेपणे वावरून दंगा करायला वाव दिल्याबद्दल संयोजकांचे, गटग घडवून आणल्याबद्दल रमड व धनी यांचे खास आभार मानून आणि विस्तारभयास्तव काही माबोकरांचे उल्लेख राहून गेले आहेत त्याबद्दल ते मला माफ करतील अशी अपेक्षा बाळगून मी आपले चार (बरं हजारेक शब्द) आटोपते घेते.
ज्जे बात! असा वृतांत पायजेले!
ज्जे बात! असा वृतांत पायजेले! मस्त माम
विस्तारभयास्तव काही
विस्तारभयास्तव काही माबोकरांचे उल्लेख राहून गेले आहेत त्याबद्दल ते मला माफ करतील अशी अपेक्षा बाळगून मी आपले चार (बरं हजारेक शब्द) आटोपते घेते.>> इतका मस्त वृ लिहीलास म्हणून केवळ माफ करतेय
हे अतरंगी असे म्हणणारा प्राणी
हे अतरंगी असे म्हणणारा प्राणी कोण?
कालच्या तिथे उपस्थित लोकांपैकी काणी मला अहो जाहो करत नाही.
आता तर अतरंगी वरून मन्या हे प्रमोशन झाले आहे.
साक्षात रॉहू आले होते. अलभ्य
साक्षात रॉहू आले होते. अलभ्य लाभ!
आता 'हे अतरंगी ' म्हणायला
आता 'हे अतरंगी ' म्हणायला लागू की! हाकानाका!
उत्सवमुर्तींसोबत माझा फोटो
उत्सवमुर्तींसोबत माझा फोटो टाकून मिरवून घेतो.... .. भारीच.
माझेमन, सुरेख वृत्तांत!❤️
अरे वा! मस्त वृत्तांत. काय
अरे वा! मस्त वृत्तांत. काय मेमोरेबल गटग झालेले आहे हे लक्षात येतेय.
@माझेमन
@माझेमन
मस्त गं फाॅर the डीटेल्ड वृत्तांत
हाहा thanks for mentioning me..
श्या , नेकलेस शी Matching bandaid राहिलं ना..
Just kidding ya
Honestly loved meeting you नाजुक साजूक माझेमन
@माझेमन
Sorry I have no idea why my response was reposted
@माझेमन
Oops , I dunno wy my post was saved thrice
ती माबो सर्व्हरची खोडी आहे,
ती माबो सर्व्हरची खोडी आहे, बर्याच वेळा होते असे.
माम, मस्त वृतांत, चोवीस
माम, मस्त वृतांत, चोवीस पेक्षा अधिक तास उलटून गेले तरी वृत्तांताची नुसती अर्घ्यच पडत होती धाग्यावर. असा डिटेलवार वृ कोणी लिहिला नव्हता. मस्त लिहिलं आहेस मज्जा आली वाचताना.
माझेमन, ती चित्रं मी काढलेली
माझेमन, ती चित्रं मी काढलेली नाहीत. थोर लोकांच्या मूळ चित्रांच्या डिजिटल रिप्रिंट्स आहेत त्या.
rmd आणि धनि यांना हुसेनची “महात्मा” आणि “थ्री वुमेन” ही फ्रेम्ड पेंटिंग्स भेट दिली. मी फक्त आणली, पण ती सगळ्या मायबोलीकरांकडून भेट आहे
बाकी गटगकरांना जामीनी रॉय यांच्या बंगाली फोक आर्ट शैलीतल्या पेंटिंग्सच्या छोट्या आकारातल्या कॅनवास प्रिंट्स दिल्या. मला वाटतं मी २०-२५ च आणल्या होत्या. लोक आले तब्बल ४२-४३! अंदाज चुकला. कुणाला पाठवायचे आणि कसे ते सांगा, पाठवतो.
रूपाचं कंसेंट घेतलं आधी. एकतर गांधी, वरून हुसेन. डेंजर कॉम्बिनेशन. आजकाल विचारलेलं बरं
Pages