सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

खूप सुंदर झाले गटग ! मायबोली
खूप सुंदर झाले गटग ! मायबोली वरचे बरेच नवीन आणि जुने लोकं भेटले. खास करून धनी , RMD आणि ऋतुराज यांचे खूप आभार ! नेटके संयोजन !! जागेची निवड ही उत्तम होती . मुंबईकरांचे ही खूप कौतुक !! वेळेअभावी पूर्ण वेळ थांबता आले नाही. त्यामुळे वैयक्तिक सगळ्यांशी बोलणे झाले नाही. पण सगळ्यांना भेटून छान वाटले.
ऋतुराजने धाग्याच्या
ऋतुराजने धाग्याच्या हेडरमध्येच लिहिलेला 'महागटग' शब्द वाचला तेव्हा भुवया उंचावल्या होत्या. पण या नव्या दमाच्या कार्याध्यक्षाने ते करून दाखवलं. त्याच्यासोबत अनेकांनी बळ दिलं आहे, हे माहितीच आहे. खास करून मुंबईकर लोकांना सलाम केला पाहिजे. कट्टा हा पुणे-मुंबईकरांना एकत्र आणणारा एक बाफ होता एकेकाळी. त्याचं रुपांतर आता हे असं घट्ट मैत्र तयार होण्यात झालं आहे. गटग पुण्याचं असलं तरी मुंबईकर माबोकरांची संख्या लक्षणीय होती. माझ्या पहिल्या वविपासूनचे काही उत्साही चेहेरे आता बघून जरा उचंबळूनच आलं.
इतकी वर्षं गटगंना हजेरी लावतो आहे, पण यावेळी काही जुन्या, भेटायची इच्छा असलेल्या मायबोलीकरांना भेटलो. काही पहिल्यांदा, काही अनेकदा, काही भेटून फार वर्षं झाली, अशी ही माबोलेकरं एकमेकांना न्याहाळत, जवळ येऊन आपुलकीने आणि कौतुकाने हात हातात घेत, अनावर होऊन मिठ्या मारत असलेले हे लोक. हे बघणं आणि आणि अनुभवणं फार मोठं समाधान आणि आनंद असतो.
माईक हातात घेऊन सांगितलेली एक गोष्ट वाचकांसाठी, आणि खरं function at() { [native code] }र सार्याच मायबोलीकरांसाठी पुन्हा या निमित्ताने सांगतो. मायबोली हाही तसा सोशल मेडियाच. पण एकमेकांना बघण्याची भेटण्याची असोशी- याला एक नव्याकोर्या पहिल्या पावसाच्या गंधासारखं एक अप्रुपवालं फिलींग होतं. फेसबुक येईस्तोवरही सारं ठीक होतं, पण मग २०१२-१३ साली व्हाट्सप आलं. आणि या जीवाभावाच्या भेटींना ओहोटी लागल्यागत सुरू झालं. मायबोली या सुपरब्रँडच्या नावाने लोक एकत्र येत होते, ती जादू संपली की काय, लोकांना खेचून आणण्याची त्या 'मॅग्नेट'ची ताकद सरत चालली का- असं वाटावं अशी परिस्थिती. अजयच्या प्रत्येक भारतभेटीत यावर चर्चा व्हायच्या. वविच्या रोडावत चाललेल्या संख्येबद्दल हतबलता वगैरे. तेव्हा बोलता बोलता अजयला एकदा बोललेलो- हे फिरून पुन्हा पुर्वपदावर येईल. लंबक पुन्हा पहिल्या टोकाला येण्यासाठीच दुसर्या टोकाला जातो- हा तर नियमच आहे. याही परिस्थितीत कुठेकुठे गटग होतच होती, काही जाहीर, काही खाजगी. बाकी 'ऑनलाईन' आहोत, संपर्कात आहोत- इतना काफी है- असं वाटावं अशी स्थिती.
पण ही 'भेटण्याची' असोशी चिरंतन असते, हे पुण्याच्या गेल्या दोन गेटटुगेदर्समध्ये सिद्ध झालं. आणखीही कुठे कुठे होत असेल. आपला हा ब्रँड अजूनही पॉवरफुल आहे, ही जाणीव आश्वस्त करणारी आहे. वाचताय ना अॅडमिन / वेबमास्तर?
---
किती वाटा आपण चालतो. वाटा बदलून काहीकाळ सोबत चाललेले साथीदार केव्हा वेगळ्या वाटेने जातात तेही कळत नाही. नंतर, आणि मग खूप नंतर ती वाट, त्या व्यक्ती कधी होत्या की नाही, असं वाटावं अशी गत. अचानक पायवाटा बर्याच फिरून पुन्हा सामोर्या येतात आणि मिठ्या मारून 'कैसा है भिडू..' वगैरे होतं. नंतर लक्षात येतं, ते सारं गेलं , विसरलो, भूतकाळ झाला- हा आपला भ्रम होता. खरं तर हे सारं कायमच्यासाठी नेणीवेत आज, आणि भविष्यात अनेक वेळा, बाहेर येण्यासाठी साठून राहिलं होतं.
धन्यवाद सार्यांना. भेटू लवकरच.
अॅडमिन / वेबमास्तर, हा धागा
अॅडमिन / वेबमास्तर, हा धागा मुखपृष्ठावर टाका.
आणि यावेळी ववि संयोजनाचा धागा मे मध्येच काढा, अशा सूचना आल्या आहेत. संयोजनात नव्या दमाची कुमक आहे, आणि पर्फॉर्मंस बघतच आहात तुम्ही. बाकी जुनेजाणते आहेतच पाठीमागे.
साजिरा, खूप सुंदर लिहिलं आहे.
साजिरा, खूप सुंदर लिहिलं आहे.
वा रेकॉर्ड सख्येने उपस्थितित
वा रेकॉर्ड सख्येने उपस्थितित नियोजनबद्ध महागटग झालेल दिसतय...मस्त आलाय ग्रुप फोटो.
साजिराने छान लिहलय !
वा वा सहीच झालं गटग. सर्व
वा वा सहीच झालं गटग. सर्व फोटोही सुरेख. नियोजन उत्तम.
एकंदरीतच हेवा वाटावा असंच
एकंदरीतच हेवा वाटावा असंच दिसतंय हे गटग प्रकरण ! खूप बरं वाटलं वाचून, बघून !
खूप सुंदर वृत्तांत साजिरा .
खूप सुंदर वृत्तांत साजिरा .
अभिप्राय वहीची आयडिया आणि चित्रं दोन्ही छान आहेत. मस्त लिहिलेत अभिप्राय. त्याचे फोटो टाकणाऱ्या अतुल यांचे आभार.
विशेष आभार ऋतुराज यांचे अगदी शेवटच्या क्षणी मी ऑनलाइन व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून भेटून जाईन असा मेसेज केला आणि त्यांनी लगेच रिप्लाय दिला त्यामुळे सगळ्यांना hi बोलण्यापूरता तरी सहभाग नोंदवला आला , जितक्या जणी दिसल्या त्यांना पाहून आनंद झाला स्पेशली साता समुद्रापार आलेल्या rmd ला पाहून .
जास्त बोलता आलं नाही, मुळात मला काय बोलावं हेच सुचलंच नाही .मी जरा उशिराच कॉल केला(म्हटलं सगळ्यांना आधी पेटपूजा करुद्या) बरीच लोकं गेली होती पण त्यातल्यात्यात ज्या लोकांशी आपण माबो वर बोलतो त्यांना भेटायची बघायची उत्सुकता असतेच. पण संकोची स्वभावअसल्याने टाळण्याकडे कल असतो. पण या व्हिडीओ कॉल मुले थोडी भीड चेपलेय आणि त्यामुळे पुढच्या गटग यायला ओव्हर एक्साईटेड आहे . पुढचं गटग पिच्चरचे ठेवा तेही मुंबईत, मी नक्की येईन.
सिमरन, हा वृ थोडीच होता. तो
सिमरन, हा वृ थोडीच होता. तो बाकीच आहे माझा अजून
जोवर १) पहिलटकर माबोकर २) सीझन्ड, पण वृ न लिहाय्ला सोकावलेले माबोकर ३) वृ एक कर्तव्य म्हणोन लिहित आलेले माबोकर -
हे सारे लिहित नाहीत, तोवर मी लिहित नसतोय. दादाचा वादा समजा.
छान महागटग
छान महागटग
संयोजकांचे अभिनंदन आणि आलेल्या + virtual हजेरी लावलेल्या सर्वांच्या माबोस्पिरीट चे कौतुक
मी पोचले तेव्हा मला रॉबिन्हूड
मी पोचले तेव्हा मला रॉबिन्हूड आणि साजिरा दिसले खाली.
साजिरा ह्यांनी ओळखलं नाही मला, मी ओळख करून दिल्यावर म्हणाले मागच्या गटग ला वेगळीच दिसत होतीस, मी म्हटलं रूप बदलून आले.
मनात क्षणभर इच्छाधारी नागीण असल्यासारखं वाटलं
तात्पर्य : एकदा भेटलेले चेहरे विसरणं अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे
.
(पण लगेच त्यांनी माझी चांगल्या शब्दात ओळख करून दिली रॉबिन हूड ह्यांना, त्यामुळे ठीके )
मनात क्षणभर इच्छाधारी नागीण
मनात क्षणभर इच्छाधारी नागीण असल्यासारखं वाटलं >>>
हे इच्छाधारी नागिणे,
हे इच्छाधारी नागिणे, म्होरल्या टायमाला पुन्यांदा रूप पालटून ये. फिटंफाट व्हईन. येत्या वविची कर्ताधर्ती व्हशीन. हा घे भंडारा.
किल्ले
किल्ले


भारीच संयोजन ऋतुराज. सगळ्यांचा उत्साह सुद्धा मस्त.
सिमरन, मस्त!
अतुल, भारीच आयडिया. एकेक वाचायला मजा आली.
साजिरा, सुरेख लिहिलं आहे. अगदी मृद्गंधासारखंच!
हाहाहा किल्ली. आता थोडे दिवस
हाहाहा किल्ली. आता थोडे दिवस इच्छाधारी नागिण आयडी घे.
महागटग भारी झालेला दिसतो आहे.
महागटग भारी झालेला दिसतो आहे.
गटग मध्ये सहभागी झालेल्या माबोकारांचा हेवा वाटतो. त्याबरोबरीने गटग यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन आणि जाहीर कौतुक.
माबो सदस्यत्व घेण्याआधी वाचनमात्र होतो तेव्हापासूनच गटग, ववि इत्यादींबद्दल उत्सुकता होती परंतु अजून पर्यंत प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळालेली नाही त्यामुळे प्रत्येक वेळी गटग वृत्तांत वाचून पॅसिव्ह आनंद मानून घेतो
'गटग' ची तहान वृत्तांतावर !
ग्रुप फोटो छान आहे. लेखन आणि प्रतिक्रिया वाचून माबो आय डी बद्दल मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. त्या ग्रुप फोटो मध्ये "हुज हू (आय डी)?" कळलेतर मनातील प्रतिमेबरोबर पडताळून बघता येईल.
मस्त झालं गटग. तिथेही मजा
मस्त झालं गटग. तिथेही मजा केली असणार.
इथे प्रतिसादात सुद्धा मजा चालली आहे.
वहीची आयडिया मस्त वाटली. पुणे तिथे काय उणे !
धनश्री यांनी प्रतिसाद एडीट केला वाटतं. "सभ्य आणि सुसंस्कृत मायबोलीकर "
हे वाचून मला लग्नातली अनाउन्स मेंट आठवली "उपस्थितांपैकी सर्व प्रतिष्ठीत नागरिकांचा सत्कार संपला आहे. आता लग्नाला सुरूवात होईल "
चामुंडराय +१
साजिरा, फारच छान लिहिलं आहेस.
साजिरा, फारच छान लिहिलं आहेस. आपल्या प्रत्यक्ष भेटीचा योग या निमित्ताने आला याचा भरघोस आनंद झाला. शिवाय रॉबिनहूड च्या भेटीचा बोनस म्हणजे लै भारीच!
संयोजकांचे आभार मानताना मला हर्पेनचे विशेष आभार मानायचे आहेत. रविराज हे ठिकाण सुचवण्यापासून बुकिंग पर्यंत त्याने ही जबाबदारी पार पाडली त्यामुळे या निवांत भेटीगाठी शक्य झाल्या.
आम्ही दोघे अमेरिकेच्या उंटावरून या गटगच्या शेळ्या ऋतुराज आणि हर्पेनच्या जीवावर हाकत होतो. या दोघांचेही पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.
अरे वा! महागटग मस्त झालेलं
अरे वा! महागटग मस्त झालेलं दिसतंय! वहीची आयडिया भारी आहे. आता ती वही कुणाकडे आहे?
किल्ली
वहिमधली काही अक्षरे काय
वहिमधली काही अक्षरे काय सुन्दर आहेत.
मी मिस केलं गटग. दिवसभर गावातच होते तरी येता आलं नाही. पण ठिक आहे आता बाबांना भेटायला एकदा येइन तेन्व्हा भेटु परत.
हे गटग अगदी घरचं कार्य होतं म्हणुन लांबुन का होईना पण अनुभवायला मज्जा आली.
पुढच्या गट्गला मी नक्की येणार.
ऋतुराज , हार्पेन कुडोस!
वहिमधली काही अक्षरे काय
वहिमधली काही अक्षरे काय सुन्दर आहेत.
मी मिस केलं गटग. दिवसभर गावातच होते तरी येता आलं नाही. पण ठिक आहे आता बाबांना भेटायला एकदा येइन तेन्व्हा भेटु परत.
हे गटग अगदी घरचं कार्य होतं म्हणुन लांबुन का होईना पण अनुभवायला मज्जा आली.
पुढच्या गट्गला मी नक्की येणार.
ऋतुराज , हार्पेन कुडोस!
वहिमधली काही अक्षरे काय
वहिमधली काही अक्षरे काय सुन्दर आहेत.
मी मिस केलं गटग. दिवसभर गावातच होते तरी येता आलं नाही. पण ठिक आहे आता बाबांना भेटायला एकदा येइन तेन्व्हा भेटु परत.
हे गटग अगदी घरचं कार्य होतं म्हणुन लांबुन का होईना पण अनुभवायला मज्जा आली.
पुढच्या गट्गला मी नक्की येणार.
ऋतुराज , हार्पेन कुडोस!
जोरदार झालेलं दिसतंय गटग!
जोरदार झालेलं दिसतंय गटग! फोटो आणि अभिप्राय वही मस्त!
वृत्तांत लिहा जोरदार आता!
मायबोलीनं पहिल्यांदा सोशल
मायबोलीनं पहिल्यांदा सोशल मिडियाचं गेट उघडून दिलं. तिथं आत्मविश्वासानं वावरायला शिकवलं. आभासी जगातल्या खर्या माणसांचा एक गोतावळा जमा करून दिला. नंतर मनोगत, उपक्रम, मिपा, ऑर्कूट, फेसबुक अशी पुष्कळ भ्रमंती होऊनही आजही माबोनं धरलेलं बोट घट्ट आहे, हे कितव्यांदा तरी लक्षात येवून छान वाटलं.
हेमंतकुमार यांनी म्हणल्याप्रमाणं संगणकपूर्व जीवनशैलीचे वर्षात सुरुवातीलाच हे गटग झालं आणि हर्पेन, ऋतूराज या दोघांमुळं त्याला हजेरी लावता आली. सगळ्यांना थँक्यु
या ग्रुप फोटोत यक्ष दिसत नाहियेत का?
यक्षंनी आणलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि कल्पक अभिप्राय वही, कृष्णाजींनी आणलेले घरचे डबाभर रव्याचे लाडू, धनवन्तीनं आणलेले घरगुती ताजे कन्दी पेढे, ऋतूराजनं दिलेल्या रंगीत धूपकांड्या, साजिर्यानं दिलेली सुंदर पेंटिंग्ज, मध्यलोकचा माबो गणवेश, दक्षिणा आणि वर्षूची उपस्थिती, अनेकांनी आठवणीनं आणलेले खाऊ, शिवाय रॉबिनहूडांनी थोडक्यात सांगितलेल्या माबोच्या रंजक आठवणी, यामुळे हे गटग आणखी स्मरणीय झालं.
मायबोली जिंदाबाद!
‘संगणकपूर्व जीवनशैलीचे वर्ष’
‘संगणकपूर्व जीवनशैलीचे वर्ष’ (The Year Of Analogue and Offline)>>>>>>> सुंदर. खरोखर अनुकरणात आणावे असे.
साजिरा, काय बोलू? अगदी मनातील लिहिले. फार सुंदर. मायबोलीविषयीची आंतरिक ओढ सुंदर शब्द बद्ध केली.
गटग स्थळाचे सगळे श्रेय माबोचे मिसो यांनाच. त्यांच्याशिवाय हे युनिक लोकेशन मिळालेच नसते. युनिक का ते वृत्तांतात सांगतो.
rmd तुला आणि धनिला पण थॅन्क्स. तुमच्या भारत वारीमुळे ही गटग संपन्न झाले.
बाकी जास्त लिहित नाही कारण मी वृत्तांत लिहिणार आहे.
अरे वा साजिरा सुंदर लिहिलंय.
अरे वा साजिरा सुंदर लिहिलंय.
किल्ली
वहिमधली काही अक्षरे काय सुन्दर आहेत.>> +१ रिया, काल पाहिल्यावर ठळकपणे जाणवले होते, नमूद करायचे राहिले.
हे महागटग आयोजित करण्यासाठी
हे महागटग आयोजित करण्यासाठी विशाल शिंदे आणि हर्पेन चे विशेष आभार.
तुम्हा दोघांनी केलेल्या सर्व मेहनतीबद्दल तुमचे मनःपूर्वक कौतुक!!
माबोकरांनी इतक्या मोठ्या संख्येने हजेरी लावून हे गटग यशस्वी करायला हातभार लावला.
मी ही आतापर्यंत इतक्याजणांशी वर्चुअली कनेक्ट होऊन भरपूर गप्पा मारल्या, त्यांना प्रत्यक्ष भेटून झालेला आनंद अवर्णनीय आहे.
मायबोलीची ही खासियतच आहे, तिच्याजवळच्या जादूच्या कांडी ने ती, विश्वभरात मायग्रेट झालेल्या पक्ष्यांना एकत्रित आणण्याचे, त्यांना नेहमीकरता जोडून ठेवण्याचे काम उत्तम पणे करते.
त्याकरता मायबोलीचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
Birds of the same feather flock together ची काल प्रचितीच आली ना.
Last but not least,
It was a pleasure to meet Sajira.
साजिरा आणि राॅबिनहुड फक्त यांचे चटपटे किस्से ऐकायला एक सेपरेट गटग करावे लागेल.
पुढील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@ वर्षु - तु अर्ध वर्ष
@ वर्षु - तु अर्ध वर्ष भारतातून गायब असतेस. आणि म्हणे पुढच्या संमेलनाची वाट बघतेय.
साजीर्याला वॄ लिहायला पुरेसे
साजीर्याला वॄ लिहायला पुरेसे फुटेज/ लापि मिळाली का आता? की अजून भर घालायचेय पावशेर , १०० ग्रॅम वृत्तांताची?
हल्ली लेखन आळस भरलाय अंगात .. पुर्वीसारखं भसक्कन नळ सोडून दिला, अंगण चिंब झालं,असं जमत नाही .. पन्नाशी जवळ आल्याचा परिणाम बहुतेक (आता कोणीतरी लिहील "काहीही काय? तू आणि पन्नास? दूर दूर तक नही संतूर संतूर.." तर या कंसातल्या वाक्यासाठीच लिहीलय ते समजून घ्या
)
काल बरेच जण बर्याच वर्षांनी भेटले जसे वर्षूदी, साजीरा, दक्षी, मल्ली.. काही नुकतेच भेटलेले परत भेटले
काही पहिल्यांदा भेटले. रमड धनीच्या निमित्ताने "य" वर्षांनी सर्वसमावेशक माबो गटग अटेंड करायचा योग जमून आला. भरपूर खादाडी, गप्पा, ख्या ख्या खि खि, थोडे गॉसिप
बरेच फोटो आणि काही खास क्षण बॅगेत भरुन जड बॅगेने मी मुंबईत परतले. मेधाने माझी बॅग उचलली थोडावेळ तेव्हा तिनेही म्हंटले किती जड झालेय म्हणून .
एरव्ही मी तशी आळशी बाई झालेय (वय हो वय...) शनिवारी प्रवास एकवेळ चालतो पण रविवारचा प्रवास नको नको वाटतो. सोमवारचे ऑफीस, डबे यांची नुसती आठवण पण या नको वाटण्याला ठळक करत जाते. पण या सगळ्याहून वर ठळक करत जाणारी रेघ ओढली जाते माबोकर मित्र परिवाराला भेटायच्या ओढीची. रविवारी प्रवास करायचा कंटाळा अजूनही तसाच असतो, तो काही पुसला जात नाही पण ही बाजुला ओढली गेलेली रेघ त्याहून मोठी असल्याने मग आपसूकच आळस डोकं वर काढत नाही आणि टांगारुगिरी न करता गटगला हजेरी लावली जाते.
गटगचे ठिकाण मस्त, गटगतला खाऊ मस्त, मिळालेले सगळे गिफ्ट्स मस्त, माबोकरांची भेट मस्त, आयोजन मस्त, होस्ट मस्त, गटग झाल्यावर टाटाबायबाय न करता आम्हाला ठेशन पर्यंत सोडायला आलेले माबोकर्स पण मस्त, बोलेतो सबकुछ मस्त मस्त.
मजा आली या नेहमीच्या वाक्याने इतिश्री करते, आणि पावशेर २०० ग्रॅम वृ पुर्ण करते
कविन - काहीही काय? तू आणि
कविन - काहीही काय? तू आणि पन्नास? दूर दूर तक नही संतूर संतूर..
Pages