धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेहरे /आयडी ओळखायचा game नाही खेळणार मी ->हर्पेन दा
.
आधीच मी कुणाला ओळखत नाही आणि घाबरते गटगला यायला

निघाली का मंडळी रविराज मध्ये जायला ? मजा करा हे माबो गटग ला सांगायला नकोच.. सविस्तर वृतांत आणि फोटो दोन्हीसाठी उत्सुक.

निघाली का मंडळी रविराज मध्ये जायला ? मजा करा हे माबो गटग ला सांगायला नकोच.. सविस्तर वृतांत आणि फोटो दोन्हीसाठी उत्सुक.>>>> +१

अतिशय सुंदर महा-गटग !!!
संयोजक मनापासून धन्यवाद !
लग्नाच्या रुखवतात नसतील एवढया खाऊनी भरलेले टेबल पाहून धन्य झालो.
लाडू, चकली, काजूकतली, चिक्की, अनेक प्रकारची चॉकलेटे . . . इ. चविष्ट-स्वादिष्ट आणणाऱ्या सर्व मंडळींनाही धन्यवाद !
अगदी संस्मरणीय
Happy

बरोबर अकरा वाजता सर्व गटगकरांच्या स्वागताची तयारी झालेली होती :
hotel entry.jpeg
आणि
वर पोचल्यावर. . .
hotel photo.jpeg

आता 'भरलेल्या' टेबल व खुर्च्यांचे फोटो दर्दी मंडळी यथावकाश चढवतीलच
वाट पाहतो . . .
. .
* रॉबिनहूड का? >>> होय. यांची आज प्रथमच ओळख झाली. मस्त !

मस्त झालं गटग
सुरेख संयोजन
विशेष आभार आणि कौतुक
.
मी जरा घाईत होते
लवकर पळाले
.
छान खाऊ आणि गिफ्ट्स होते.
कुणाचं गिफ्ट द्यायचं राहिलं असल्यास धन्वंती कडे द्या Lol

माझं पहिलंच गटग आणि ते पण एवढं दणक्यात होतं, मज्जा आली. पण मी खाली हात आले होते.गप्पा , खाऊ आणि जेवण याने पोट भरून आता परत मुंबईला रवाना होत आहे. प्रज्ञा ने तिच्या दुचाकी वरून सोडलं मला स्वारगेटला. बस मध्ये बसले.
ऋतुराज खूप सुंदर केलं व्यवस्थापन. १०० मार्क तुला.

अशा रीतीने हे अतिशय सुंदर, उत्साही, आनंदी गटग पार पडले आहे. संयोजकाचे आणि खूप खाऊ घेऊन येणाऱ्यांचे आभार..
धमाल आली... खूप जुन्या जाणत्या मायबोलीकरांनी हजेरी लावली.. आठवणीना उजाळा मिळाला..
छान गप्पा, छान खाऊ, छान भेटवस्तू...
आता वृतांत येऊ देत...

आज पहिल्यांदाच मायबोली गटग attend केले. अपेक्षेप्रमाणे अनुभव सुंदर होता. जागा फार छान निवडली होती. संपूर्ण टेरेसमध्ये दंगा घालायला पूर्ण मुभा.

जुने जाणते मायबोलीकर अर्थातच जुन्या आठवणींना उजाळा देण्यात उत्साही होते. आणि ते अनुभव ऐकायला मला खूप मजा आली.

ग्रूप मोठा होता त्यामुळे मोठे कार्य अनुभवायला मिळाले. पण वैयक्तिक ओळखी कमी झाल्या. बोलण्याच्या ओघात फोटो फारसे घेतले गेले नाहीत असे वाटले.

सुन्दर संयोजन. ऋतुराजचे कौतुक.

पुढील काही गटगमध्ये ओळखी वाढवायच्या असा विचार करून रजा घेतली.

ता. क. : दिनेशदांना कोणी दुखावले मला माहिती नाही. पण त्यातले आता कोणी मायबोलीवर दिसत नाहीत. आज सगळे दिनेशदांचे कौतुकच करत होते. त्यांना ही सांगून परत बोलावता येईल का?

एक गोष्ट जाणवत राहिली.
बऱ्याच लोकांनी स्वतःची ओळख करून देताना "मी मायबोली गेल्या काही वर्षात उघडलेले नाही" हे नमूद केले.
खरंतर या अनुषंगाने एक वेगळा धागा काढावासा वाटला पण सध्या इतर गोष्टींमध्ये व्यग्र असल्यामुळे परत कधीतरी लिहिन.

ग्रेट ४१ मायबोलीकर असेच दिसत आहे.. अजूनही कोणी असावे..
वविला सुद्धा सहकुटुंब इतकी नसतात..
गटग जोरदार झालेला दिसतोय..

आज जे पहिल्यांदाच गटगला आले होते किंवा जे शुद्ध वाचक आहेत त्यांनी या निमित्ताने चार ओळी जरूर लिहाव्यात अशी एक बारीकशी प्रेमळ सूचना.

मस्त झालेले आहे गटग.
जागा छान वाटतेय गटगसाठी.

आता वृतांत येऊ देत...>> हे गटगला न आलेल्यांनी म्हणायचे असते, गटगकरांनी वृत्तांत लिहायचा असतो.

>>>"हे गटगला न आलेल्यांनी म्हणायचे असते, गटगकरांनी वृत्तांत लिहायचा असतो.">>>
+१०००
मग काय तर, ह्या महागटगला येऊ न शकलेले आम्ही अभागी जीव सविस्तर वृत्तांत आणि भरपुर सार्‍या फोटोंच्या प्रतिक्षेत आहोत!

इतक्या मोठ्या संख्येने माबोकर कदाचित प्रथमच एकत्र आले असावेत. ऑल क्रेडिट गोज टू धनी आणि rmd, आणि ऋतुराजने केलेले उत्कृष्ट नियोजन.
mabo_gtg1.jpg

(प्रचि श्रेय: धनि)

क्या बात है!!! सुंदर ! सुंदर!! कोणी काढला फोटो मस्तच आलाय.
रमड हुजूरपागा बघुन आलीस का निदान दुरून , लक्ष्मी रोड, तुळशी बाग, पेठा. आय मिस ऑल.
अर्रे किल्लीच्या पिशवी वरती किल्ली लिहीलय Happy
धनुडीला ओळखलं Happy

मस्त झालं गटग.. जुन्या ओळखी असल्याप्रमाणे सर्वांशी गप्पा मारल्या. सगळ्यांनाच भेटायची इच्छा होती.
पुनःपुन्हा अशी गटग होत रहावीत...

<<<मायबोली गेल्या काही वर्षांत उघडलेले नाही तर गटग विषयी कसे कळले ?

नवीन Submitted by स्वानंदी१ on 1 February, 2026 - 16:54>>>
बरेचसे मायबोलीकर एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांच्या नेटवर्क मधून त्यांना माहिती आणि आमंत्रण पोहोचले

Pages