सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

* अर्रे किल्लीच्या पिशवी वरती
* अर्रे किल्लीच्या पिशवी वरती किल्ली लिहीलय

>>>> त्याच 'कारखान्यातली' पिशवी माझ्याकडे पण आहे :
गटगला घेऊन यायची असते हे माहीत नव्हते !
मस्त झालं गटग..खूप लोक जी
मस्त झालं गटग..खूप लोक जी वाचनातून माहीत होती...त्यांना प्रत्यक्ष भेटणं झालं....घाई असल्यामुळे फार नाही थांबता आल..
पण छान वाटलं.
@ऋतुराज... गिफ्ट साठी धन्यवाद आणि छान संयोजन...
मस्त आलाय फोटो! खरंच महागटग
मस्त आलाय फोटो! खरंच महागटग झालंय!
सुंदर, आनंदी दिसणाऱ्या
सुंदर, आनंदी दिसणाऱ्या मायबोलीकरांचा फोटो पाहून खूप छान वाटले!
मस्तच फोटो सगळे. आता बरीच जण
मस्तच फोटो सगळे. आता बरीच जण ओळखू यायला लागली आहेत. पिशवीही सुंदर आहे.
ऋतुराज, यक्ष यांनी दिलेल्या
ऋतुराज, यक्ष यांनी दिलेल्या भेटवस्तू छान आहेत. दोघांचेही आभार __/\__
वृत्तांत लिहिणार आहे. सध्या रुमाल. उद्या नवीन पोस्ट लिहिते.
गटग साठी उपस्थित राहिलेल्या
गटग साठी उपस्थित राहिलेल्या सर्व नव्या आणि जुजा मायबोलीकरांचे खूप खूप आभार. एकूण ४२ मायबोलीकर या गटग साठी उपस्थित होते. अशीच गटग होत राहोत.
आता सर्व उपस्थितांनी वृत्तांत/ वृत्तान्त लिहावा अशी विनंती.
तुम्ही पुणेकर आम्हाला
तुम्ही पुणेकर आम्हाला कॉम्प्लेक्स देऊन राह्यले राव ! आता आपणही ईशान्य अमेरिका गटग करावे !
विकु, खरेच. करूच, मी येईन
विकु, खरेच. करूच, मी येईन टेक्सासहून.
मस्त गटग फोटोज..
मस्त गटग फोटोज..
छान झालं गटग.. मला नाही जमलं पण विडिओ कॉल वर अटेंड करून सगळ्यांना hi केलं... थँक्स रीना आठवणीने कॉल केल्याबद्दल..
किल्ली सारखीच मृणाली लिहिलेली पिशवी माझ्याकडे पण आहे..
अभिप्रायवहीची कल्पना कोणाची?
अभिप्रायवहीची कल्पना कोणाची? ऋतुराज, rmd, धनि कि अन्य कोणी? ज्या कोणाची असेल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. कारण, असे काही सुचणे हेच खूप काही सांगून जाते. हो, आणि आबाचे सुद्धा तितकेच धन्यवाद प्रत्येक पानाचे असे फोटो साठवून ठेवल्याबद्दल

(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आजच्या गटमध्ये . . .
आजच्या गटमध्ये . . .
माईक हातात आल्यानंतर . . .
काही बोलायाचे होते . . .
परंतु व्यक्तिगत वेळमर्यादेच्या सक्त बंधनामुळे
बोलायचे राहून गेले ते असे :
2026मधील हे सलामीचे गटग मला एका कारणासाठी विशेष महत्त्वाचे वाटते. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘संगणकपूर्व जीवनशैलीचे वर्ष’ (The Year Of Analogue and Offline) म्हणून जाहीर झालेले आहे.
गेल्या 25 वर्षात एकंदरीत आपणा सर्वांचाच ऑनलाईन वावर व्यसन होण्याइतका वाढून बसला. त्यामुळे हे डिजिटल विश्व अवतरण्यापूर्वी आपण रंजनासाठी काय काय करत होतो (Analogue जीवनशैली) हेच जणू आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून यंदाच्या वरील संकल्पनेनुसार,
आता पुन्हा एकदा आपण :
“काही प्रमाणात तरी जुने छंद जोपासूयात,
छापील वृत्तपत्रे व पुस्तके वाचूयात,
थोडे तरी हाताने कागदावर लिहूयात आणि
प्रत्यक्ष भेटीगाठींवर अधिकाधिक भर देऊयात”,
असा संदेश ध्वनित होतो.
आजचे पुणे महासंमेलन हे त्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे पाऊल समजायला हरकत नाही !
(No subject)
(No subject)
(No subject)
अतुल, ही ड्रॉइंग बुक वहीची
अतुल, ही ड्रॉइंग बुक वहीची आयडिया यक्ष या id ची. .
त्यांनी स्वतः बरीच छान चित्रे काढून आणली होती त्यात.
मस्त आलाय फोटो! खरंच महागटग
मस्त आलाय फोटो! खरंच महागटग झालंय!..... खरंच.
आनंदाने निथळणारे चेहरे पाहून छान वाटले. कुमारसर, धनुडी, किल्ली, ऋतुराज,अतुल ओळखता आले.
वा मस्त कल्पना आहे ही यक्ष.
वा मस्त कल्पना आहे ही यक्ष.
छान पोस्ट हेमंतकुमार.
मस्तच झालं गटग, फोटो ही छान
मस्तच झालं गटग, फोटो ही छान आलाय.
अभिप्राय कल्पना फारच छान. सगळे अभिप्राय वाचताना मजा आली.
कुमार सर सुरेख पिशवी!
कुमार सर सुरेख पिशवी!
सान्वी सुंदर अक्षर!
अतुल लफ्फेदार सही!
मस्त झालेले दिसते गटग! फोटोही
मस्त झालेले दिसते गटग! फोटोही मस्त. ४२ लोक म्हणजे ऋतुराजला व आणखी कोणी आयोजन केले असेल त्यांना विशेष क्रेडिट!
वहीची आयडिया फारच भारी आहे!
Pages