धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या गटगला हजार राहणाऱ्यांची संख्या हा आजपर्यंतचा record आहे का? आजपर्यंत सर्वात जास्त कोणत्या गटगला मबोकारांनी हाजेरी लावली? किती हजर होते?

मोजणी कारकुन समजलात का आम्हाला? पण आता बोलत नाही, मुलीची बाजू ना!!... आपलंं घरचं कार्य ना! Proud
मजा करा!

आधुनिक नारायण आता ब्लिन्किट, जीओ, स्वीगी तत्सम साईट्स वर ऑर्डर करतो, कॅंम्पात सायकल हाणत जावे लागणार नाही. Happy

मलाही आवडेल यायला पण "किल्ली" सोडून कुणाला मी ओळखत नाही.. जर कुणाला uncomfortable वाटणार नसेल तर येऊ शकतो..

@sharadg मी सध्या जयसिंगपूरलाच आहे. तुम्हाला वन वे कंपनी देऊ शकतो पण मी नंतर मुंबईला जाणार आहे..

सामो, खरेच पॉवरफुल कार्ड काढलेत.
वर्षू दी Happy
हा आजपर्यंतचा record आहे का?>>>>> माहीत नाही, पण आपण रेकॉर्ड बनवू शकतो.
जर कुणाला uncomfortable वाटणार नसेल तर येऊ शकतो..>>>>>> अजयजी नक्की या. माबो गटग ला ओळखीची गरज नसतेच मुळात.

गटग लगीन घाई सुरू झाली आहे.
आज काही वऱ्हाडी पुण्यात दाखल होतील तर बाकीचे उद्या.
लांबचा पल्ला... कसं हुईल ... काय हुईल

मोजणी कारकुन समजलात का आम्हाला? >> कॉम्पुटर वापरत असलास तर होयच म्हणायचे की Wink

अजय नक्की ये. इतक्या ओळखी होतील की परत असे कधीच म्हणावे नाही लागणार

किल्ली" सोडून कुणाला मी ओळखत नाही.. जर कुणाला uncomfortable वाटणार नसेल तर येऊ शकतो..
>>> तुम्ही निदान किल्लीला तरी ओळखता. मी ज्या गटगला गेलेले तेव्हा मी कुणालाच ओळखत नव्हते. काही फरक नाही पडत. मजाच येते. या तुम्ही.

मित्रहो,
मी उद्या येतोय.
गप्पाटप्पा, धमाल नक्की करू !

>>>>अश्विनी१ ते अश्विनी१० व अश्विनी१२ ते अश्विनी ९९८ यांच्यापैकी कोणीच येणार नाही असे दिसते ....
मी येणार आहे....

गटग साठी सर्वांना हार्दीक शुभेच्छा !
गटग लागले कि कळवा, इथून अक्षता टाकीन.

कावळा दिसला तर त्याला एक लेग पीस टाका. मला पोहोचेल.

आजपर्यंत सर्वात जास्त कोणत्या गटगला मबोकारांनी हाजेरी लावली
>>>
माझ्या आठवणीत अ‍ॅडमिन (समीर) गटग. धाग्यात लिहिलेले सारे खरंच आले, तर मग हे रेकॉर्डब्रेक गटग होईल, असं म्हणायला हरकत नाही. (वर्षाविहार म्हणजे गटग नव्हे. वविची सर्वात मोठी संख्या ११७ की १२७ आठवते.)
परदेशात अनेक मोठी गटग झालीत माझ्या माहितीप्रमाणे, पण इतके जण आलेले का, त्याचा अंदाज नाही. नसावेत.

एका गटगला एकाने जाहीर केलेलं- 'मी माझ्या तमाम डुआयडीज च्या वतीने इथं हजर आहे. ते सारे हजर आहेत असं समजा.' अशा प्रकारे तेही एक महागटग होतं, असं म्हणायला हरकत नाही.

अजय (वेबमास्तर) जीटीजीला म्हणालेला, 'मायबोलीवरचे अमुक हजार तमाम सदस्य म्हणजे माझे डुआयडीच आहेत.' असं मोजलं तर मग ते ब्रह्मांड गटग म्हणायला हरकत नाही.
---
उद्या एक सर्प्राईज आणतो. फक्त ते गाडीत बसलं पायजे.

ब्रह्मांड गटग > Lol
गटग आधीचा योग्य तो सस्पेन्स तयार झाला आहे.
आमचे डोळे वृत्तांताकडे.

अ‍ॅडमिन व वेमा पुण्यात आले होते तेव्हाची गटग संख्येने महागटग होती. त्यातल्या एकात मी होतो. वेमांचे एक गटग मल्टिस्पाईसमधे सुरू होऊन मग हार्वेस्ट क्लब आणि नंतर आणखी एका रेस्टॉ मधे मूव्ह झाले होते. कलिंग असेल. अर्थात ववि हे गटग धरले तर तीच सर्वात "महा" असतील.

अमेरिकेतील महागटग संख्येपेक्षा गटगच्या काळावर "महा" होतात. १५-२० च्या पुढे संख्या नसावी फारशी कधी. पण काही गटग २-३ दिवसांचीही होती. केवळ गटगकरता लोक ५००+ मैल जाणे हे ही एक. इथल्या उत्सवमुर्तींपैकी एकांनी २-३ वेळा केले आहे Happy

रविराजमधे मात्र आठवत नाही गटग. एकेकाळी ते भांडारकर रोडवर "एकदम सो हाय क्लास" टाइप वाटायचे. रस्त्याकडे तोंड करून असलेला त्यांचा डेकॉर भारी होता.

हो रविराजला वलय होतं एकेकाळी. एकेकाळी म्हणजे काय, अजूनही त्या सिनेमा नाटकांच्या कलाकारांच्या आणि प्रतिष्ठितांच्या मोठ्या लोकांच्या आठवणी लेवून ते उभं आहेच की. नव्वदीत ते एक महत्वाचं 'सांस्कृतिक स्टार' हॉटेल होतं. रेस्टॉरंटच्या चवीबद्दलही प्रसिद्ध आहेच अनेक वर्षं..

सुप्रभात लोकहो.
चला, ज्याची इतके दिवसांपासून उत्सुकता होती तो दिवस उजाडला आहे.
आपल्या सगळ्यांना भेटायला उत्सुक आहे.
अजयजी>>>>>>संपर्कातून link पाठवली आहे

हॉटेल रविराज
https://maps.app.goo.gl/sJbUD2iAn2Za1Mws5

Pages