सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

अहो मला खरच कुणी तरी सोबत हवे
^^अहो मला खरच कुणी तरी सोबत हवे आहे सांगलीहून येण्यासाठी. मी माझी गाडी घेईन.
ना खाणार ना पिणार, फक्त भेटणार.
नाहीतर बसने यावे लागेल.
बघतो कसे जमते ते.^^
शरदजी, सांगलीवरून सकाळच्या शिवनेरीने या, आरामात याल. तुम्हाला भेटून सर्वांनाच आनंद होईल. ( शिवाय सांगलीचा भडंग आणि कृष्णा काठच्या वांगी
)
तुम्हाला हॉटेलचे खाणे चालत नसेल तर मी घरून काही खाऊ करून आणते तुमच्यासाठी.
मला गृप लिंक माझ्या स्पॅम
मला गृप लिंक माझ्या स्पॅम फोल्डर मधे मिळाली. स्पॅम का ते माहिती नाही. मायबोलीवर येणं हा आयुष्याचा अविभाज्य भाग वगैरे असून जीमेल की ये जुर्र्त की उसनें.. इत्यादी इत्यादी....
तर ज्यांना मिळाली नसेल लिंक त्यांनी स्पॅम फोल्डर तपासा. इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवते.
जय हिंद जय महाराष्ट्र.
@तिता, एकदा स्पॅम फोल्डर
@तिता, एकदा स्पॅम फोल्डर तपासा. अन्यथा वेमांना कळवा.
@ सान्वी, या नक्की.
परंतु .तुमच्या खात्यात संपर्क हा पर्याय दिसत नाही.
एकदा तपासून पाहणार का?
@स्वानंदी१, स्वागत आहे. या.
तुम्हाला संपर्कातून व्हॉट्स अँप ग्रुपची लिंक पाठवली आहे.
E-mail मिळाली junk folder
E-mail मिळाली junk folder मध्ये. WhatsApp group join केला. धन्यवाद
झकासरावकडे माझा नंबर आहे.
झकासरावकडे माझा नंबर आहे. मायबोलीवर कुठे टाकावा लागेल?
सियोना मी घेतो झकासरावांकडून
सियोना, इथे कुठे नका टाकू.
मी घेतो झकासरावांकडून
सियोना नंबर दिला आहे ऋतुराजला
सियोना
नंबर दिला आहे ऋतुराजला
धन्यवाद झकासराव आणि ऋतुराज.
धन्यवाद झकासराव आणि ऋतुराज.
परंतु .तुमच्या खात्यात संपर्क
परंतु .तुमच्या खात्यात संपर्क हा पर्याय दिसत नाही.
एकदा तपासून पाहणार का? >> @ऋतुराज - मला संपर्क add करता येत नाहीये आता. मी तुम्हाला माझा मेल आयडी पाठवला आहे
गटग ला येणाऱ्यांना आणि गटग ला
गटग ला येणाऱ्यांना आणि गटग ला जाऊ की नको या बाबत साशंक असणाऱ्यांना पुन्हा एकदा संस्मरण.........
आता भेटू लवकरच....
मध्यलोक येतो म्हणाले आहेत
मध्यलोक येतो म्हणाले आहेत
जेवायला थांबणार नाहीत
भेट आणि गप्पा मारण्यासाठी आहेत हे नक्की
<< गटग ला येणाऱ्यांना आणि गटग
<< गटग ला येणाऱ्यांना आणि गटग ला जाऊ की नको या बाबत साशंक असणाऱ्यांना पुन्हा एकदा संस्मरण.........
आता भेटू लवकरच....>>
निश्चित येणार.. सर्व मंडळींना भेटण्यासाठी.
( तिथे भोजन मात्र करणार नाही.)
टक.. टक.. कोई है?
टक.. टक.. कोई है?
मला यायचं आहे गटगला, नाव कुणाकडे नोंदवायचं?
हर्पेननं आठवणीनं गटगचा निरोप पोचवण्याचं पुण्यकर्म केलं आहे_/\_
मी सगळ्यांना भेटून जाईन.
मी सगळ्यांना भेटून जाईन. जेवायला थांबणार नाही.
अरेरे! माझं थोडक्यात मिस
अरेरे! माझं थोडक्यात मिस होणार...
सई, ऋतुराज कडे विपुत number
सई, ऋतुराज कडे विपुत number द्या. ते add करतील तुम्हाला.. भेटूया.
सई,
सई,
तुम्हाला संपर्कातून मेल केला आहे.
सान्वी,
सान्वी,
तुम्हाला संपर्कातून मेल केला आहे.
जवळ जवळ ३० -३५ जण (त्याहून
जवळ जवळ ३० -३५ जण (त्याहून अधिक) महा गटग साठी येणार आहेत. यादी संध्याकाळनंतर टाकतो.
ज्यांनी अजून नक्की सांगितले नाही त्यांनी लवकर सांगा.
पहिली यादी येऊद्या
पहिली यादी येऊद्या
गटग साठी येणाऱ्यांची यादी
गटग साठी येणाऱ्यांची यादी मुख्य धाग्यात टाकली आहे.
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे का?
दोन लिस्ट मधे काय फरक आहे?
दोन लिस्ट मधे काय फरक आहे? येणार म्हणजे येणारच हे "नक्की" वाल्यांपेक्षा जास्त नक्की आहेत का?
त्यात रमड आणि धनि आहेत हे एक चांगले आहे
अश्विनी१ ते अश्विनी१० व अश्विनी१२ ते अश्विनी ९९८ यांच्यापैकी कोणीच येणार नाही असे दिसते
येणार म्हणजे येणारच हे
येणार म्हणजे येणारच हे पूर्णवेळ असणार आहेत
"नक्की" वाले त्यांना वेळ मिळेल तसे भेटून जाणार.
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे का? >>≥>>> तसं काही ठरलं तर इथे कळवतो
महागटग दणक्यात होणार दिसतंय.
महागटग दणक्यात होणार दिसतंय.
अश्विनी१ ते अश्विनी१० व अश्विनी१२ ते अश्विनी ९९८ यांच्यापैकी>>
ऋतुराज, या सर्व संयोजनासाठी
ऋतुराज, या सर्व संयोजनासाठी आणि धागा चपळ ठेवण्यासाठी आभार..
गटग दणक्यात होणार तर, भरपुर
गटग दणक्यात होणार तर, भरपुर गप्पा मारा, खा,प्या त्याचे सगळळ्याचे फोटो काढा आणी तितकेच व्रुत्तात इथे लिहा..
आज पासूनच गटग चे वेध लागले
आज पासूनच गटग चे वेध लागले आहेत. जास्तीत जास्त माबोकरांनी यायचा जमवा .मी तर उद्याच पुण्याला जाणार आहे. परवा मी वाकड वरून निघेन डेक्कन ला जायला ...आसपास कुणी असेल तर सांगा . एकत्र जाऊ
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट
"गटग" चा लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे का? >>≥>>> फेसबुक लाईव्ह करूया
Pages