धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कुतूहल - रविराज कसे ठरवले? रविराजला ह्यापूर्वीही गटग झाले आहे का? मला घरून चालत ५ मिनिटांच्या अंतरावर आहे पण माझ्या डोक्यात नसते आले

कृष्णा, तुमचे नाव नोंदवले.
मी आलो तर चालेल का>>>>>>> पळत आलात तर चालेल. या की. तुमचेच आहे पुणे Lol
अतुल, तुम्हाला पण धरलंय यादीत.
अगदी शेवटच्या क्षणी कन्फर्म केलं, तर चालेल ना?>>>> अनया, चालेल. येण्याचा प्रयत्न करा.
धनश्री, पॉवरफुल कार्ड काढल्याबद्दल धन्यवाद. मस्तच.
मी आहे मुंबईवरून.
प्रज्ञा, अश्विनी११ या नक्की वेळ काढून.
कविन, Bravo
मुंबईच्या याबायका गँग. पॉवर गर्ल्स Happy
रविराज कसे ठरवले?>>>>>
बऱ्यापैकी ऐसपैस जागा, जास्त वेळ बसून गप्पा मारायला मिळतील आणि जेवणाची उत्तम व्यवस्था हे पाहून ठरवले.

आता तरी जमेल असं वाटतंय. (फक्त जेवायला थांबता येणार नाही)

फार वर्षांपुर्वी रविराजला माबोगटग झाल्याचं आठवतंय. निळू दामलेही होते.

वा वा , बरेच जण भेटणार तर यावेळी. मज्जा येणारे.
अजून ज्यांना ज्यांना जमतंय त्यांनी याच असा प्रेमळ आग्रह आहे Happy

@साजिरा, आशूडीला पण सांगशील का? शिवाय तुझ्या संपर्कात अजून कोणी inactive पुणेकर आयडी असतील तर त्यांना पण सांग.

शिवाय तुझ्या संपर्कात अजून कोणी inactive पुणेकर आयडी असतील तर त्यांना पण सांग. >>>> सगळे इनॅक्टिव्ह आयडीज एखाद्या स्पाय सेलसारखे एकदम अ‍ॅक्टिव्ह झाले आणि गटगला आले असे डोळ्यासमोर आले. जेसन बॉर्नच्या मागे लागतात तसे.

"... रविवार दुपार व पुणेकरांच्या वामकुक्षीची वेळ असूनही भांडारकर रस्त्यावर भर दुपारी रविराज हॉटेलसमोर तुडुंब गर्दी जमली होती. अधिक माहिती काढता 'मायबोली' नावाच्या एका सोशल मिडिया साइटशी संबंधित एक कार्यक्रम होता असे समजते..." - दै. सकाळ दिनांक २ फेब्रुवारी २०२६ Happy

"... कोणत्यातरी सांकेतिक भाषेचा वापर तेथे जाणवत होता. रविराज चा परिसर भरून रस्त्यावर आलेली गर्दी कोणीतरी 'रच्याकने' म्हणताच लगेच पांगून फुटपाथवर गेली...." अशीही वर्णने येतील.

साजिरा - कोणत्यातरी गटग नंतर केवळ पान खायला आपण काही लोक रविराजजवळ गेलो होतो इतकेच आठवते. त्यावेळचे बहुतेक लोक आता इनॅक्टिव्ह आयडी आहेत Happy

कविन - यावेळेलाही "गाडी पकडताना प्री-गटग" करायचे असेल तर माझी तयारी आहे Happy

फा Rofl
तू असतास गटगला तर चार चाँद लागले असते अगदी. येतोयस का?

साजिरा आणि रुद्रसेन. तुमची नावे यादीत टाकली.

तू असतास गटगला तर चार चाँद लागले असते>>>>>> अगदी.

"... रविवार दुपार व पुणेकरांच्या वामकुक्षीची वेळ असूनही भांडारकर रस्त्यावर भर दुपारी रविराज हॉटेलसमोर तुडुंब गर्दी जमली होती. अधिक माहिती काढता 'मायबोली' नावाच्या एका सोशल मिडिया साइटशी संबंधित एक कार्यक्रम होता असे समजते..." - दै. सकाळ दिनांक २ फेब्रुवारी २०२६>>>>> Lol

येतोयस का?>>>>> अगदी. अजूनही जमवता येईल.

मी पहिल्यांदा अश्या मोठ्या गटग ला येतेय . हल्लीच एक माबो मैत्रिणींचे गटग अटेंड केले सो कॉन्फिडन्स जरा वाढलाय . खूप ID पहिल्यांदाच भेटतील

"... रविवार दुपार व पुणेकरांच्या वामकुक्षीची वेळ असूनही भांडारकर रस्त्यावर भर दुपारी रविराज हॉटेलसमोर तुडुंब गर्दी जमली होती. अधिक माहिती काढता 'मायबोली' नावाच्या एका सोशल मिडिया साइटशी संबंधित एक कार्यक्रम होता असे समजते..." - दै. सकाळ दिनांक २ फेब्रुवारी २०२६ Happy >>> Happy

सही आहे, आवडेल यायला.. पण इतकी लग्न आहेत पुढे मागे. पण मला एकातरी गटग ला यायचं आहे. बघते प्रयत्न करून.

रमड, फा चार चांद लावेल वा ना लावेल, तुम्ही मात्र निळ्या ड्रेस वर मॅचिंग स्कार्फ आणी पर्स असा 'हटके लूक' द्या म्हणजे लोक 'हैरान' होतील व तुमच्या या 'हरकती' वर व 'अलग अंदाज' वर नेटकरी कॉमेंट्स व लाईक्स चा पाऊस पाडतील.

फा, संध्याकाळनंतर गटग बुधवारमध्ये रुपांतरित होतं रे. Proud

हा तर तीच ती रविराजच्या शेजारी कुठेतरी पान खायला जाण्याची आठवण. ती अगदीच स्पष्ट आहे. मात्र मेंबर्स नीट आठवत नाहीत. अर्भाट होता हे नक्की. मास्तर, पग्या, आर्फी, टण्या, अरुण यांपैकी कोण कोण? आता हे सारे इथं उगवण्याची शक्यता फारच कमी दिसतेय Sad
---
येस र्म्ड Happy

Glens bakehouse,pune ला जे गटग झालं होतं त्याला मी गेले होते..मस्त झालं होत ते...दुर्गा टेकडी च मिस झालं माझं...या वेळेस प्रयत्न करणार यायचा..मुलीचा वाढदिवस आहे त्या दिवशी.. सो तिचा काय प्लॅन ठरतोय फ्रेंड्स बरोबर त्याप्रमाणे आम्ही घरचे प्लॅन करणार. सकाळी फ्री असेन तर नक्की येईन

संध्याकाळनंतर गटग बुधवारमध्ये रुपांतरित होतं रे >>> Lol

त्या दिवशी तू आणि मयुरेश होतात आणि बहुधा अरभाट आणि मास्तरही. पण इतरही काही होते. टण्या आणि पराग त्या स्पेसिफिक पोस्ट-गटग-पान च्या वेळेस होते का लक्षात नाही.

तुम्ही मात्र निळ्या ड्रेस वर मॅचिंग स्कार्फ आणी पर्स असा 'हटके लूक' द्या म्हणजे लोक 'हैरान' होतील व तुमच्या या 'हरकती' वर व 'अलग अंदाज' वर नेटकरी कॉमेंट्स व लाईक्स चा पाऊस पाडतील. >>>
नेटकरी झाले दंग, आहे "हे" कारण! >>> Lol

माझा काही प्लॅन नाही सध्या भारताच्या ट्रिप्सचा. पण मी चार चाँद लावीन तेव्हा लावीन. तोपर्यंत तुमचे ३.९९९९९९९९ चाँदही पुरेसे आहेत दंगा करायला. तेव्हा भरपूर दंगा करा Happy

धनुडी, नक्की जमवा.मुंबईवरून बरेच जण येणार आहेत.

खालील सर्वांना संपर्कातून व्हॉट्स अँप ग्रुपची लिंक पाठवली आहे.
@ अश्विनी ९९९
@रुद्रसेन
@साजिरा
@अश्विनी११
@तिता
@प्रज्ञा ९
@अवल
@अनया
@sharadg
@धनुडी
------------

@ सियोना ,
तुमच्या खात्यात संपर्क हा पर्याय दिसत नाही.
एकदा तपासून पाहणार का?

नुसते म्हणू नको, नक्की ये..
वर डिटेल्स आहेत सगळे.

स्वानुभव _ मायबोली गटगला जाण्यासाठी आधीची ओळख असण्याची अजिबात गरज नाही.. तिथे गेलो की आपोआप आणि पटापट ओळखी होतात. परकेपणा वाटत नाही, आपण लगेच मिसळून जातो सर्वांबरोबर.

अहो मला खरच कुणी तरी सोबत हवे आहे सांगलीहून येण्यासाठी. मी माझी गाडी घेईन.
ना खाणार ना पिणार, फक्त भेटणार.
नाहीतर बसने यावे लागेल.
बघतो कसे जमते ते.

मला WhatsApp ग्रुपची Link मिळालेली नाही. माझा कुठला मोबाईल दिला होता आठवत नाही. मला शोधून सापडला पण नाही. इथेच मोबाईल no. दिला तर चालेल का? FOMO होण्या आधी add करा

Pages