क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

*त्यांना इतिहासजमा धरण्यात...* - अमेरिकेतल्या बास्केट बॉलची वे. इंडिजच्या तरुण पिढीला आता भुरळ पडलीय म्हणून तिथलं क्रिकेट मागे पडलंय, असं मध्यंतरी वाचल्याचं आठवतं. कारण कांहिंही असो, त्यात क्रिकेटचं नुकसान आहे, हे निश्चित.

वेस्ट इंडिज, पाकिस्तान, झिबाब्वे ह्या एके काळच्या बलाढ्य / काँपोटिटिव्ह संघांची पीछेहाट क्रिकेटसाठी आणि क्रिकेटरसिकांसाठी दु:खाची बाब आहे. १९९२ च्या वर्ल्डकपच्या टीम्स पाहिल्या तर त्या नंतर असा वर्ल्डकप आठवत नाही ज्यात सगळे अगदी जेतेपदाचे दावेदार नसले तरी तुल्यबळ होते.

नंतर आलेल्या टीम्सपैकी अफगाणिस्तान वगळता कुणी फार पोटेन्शियल दाखवलं नाहीये. बांग्लादेश तर परपेच्युअली डेव्हलपिंग स्टेटमधेच आहेत.

“बास्केट बॉलची वे. इंडिजच्या तरुण पिढीला आता भुरळ पडलीय म्हणून तिथलं क्रिकेट मागे पडलंय” - त्याच बरोबरीनं, पैशाचा अभाव (लीग्जमधून मिळणारा पैसा आणि बोर्डाकडून मिळणारा पैसा ह्यातली तफावत), मुळातच एकसंध देश नसणं - सगळ्याच बेटांची अर्थव्यवस्था थोड्याफार फरकाने डळमळीत असणं अश्या अनेक गोष्टी त्या पीछेहाटीला कारणीभूत आहेत.

फेफ म्हणतो तसे बास्केट बॉल हे एक निमित्त होते. पैशाचा अभाव (लीग्जमधून मिळणारा पैसा आणि बोर्डाकडून मिळणारा पैसा ह्यातली तफावत), मुळातच एकसंध देश नसणं ह्या गोष्टींचा मुख्य प्रभाव आहे.

त्या बाद फेरींच्या आधीच लटकत आहेत भाऊ Sad
>>>>>

ऑस्ट्रेलिया सोबत सारेच हरतील असे पकडा.
एक आफ्रिकेसोबत हरल्याने बाहेर फेकले जाणार नाही.

SENA आणि आपण या पाच पैकीच चार येतील असा स्पर्धेसुरुवातीपासूनच अंदाज होता. आताही काही वेगळे नाही घडले तर हेच होईल. त्यामुळे मी उलटा विचार करत आहे. बाहेर कोण जाणार. किंवा कुठला तो एक संघ ज्याला आपल्याला बाहेर काढायचे आहे. आणि माझा न्यूझीलंडवर डोळा आहे.

आशावादी आणि सकारात्मक विचार करूया Happy

बांग्लादेश तर परपेच्युअली डेव्हलपिंग स्टेटमधेच आहेत. >> त्यांच्या होम विकेट्स एकाच प्रकारच्या - टोकाच्या आहेत त्यामूळॅ प्लेयर्स पण त्याच मुशीतले निघतात. मग बाहेर गेले कि बहुतांशी जण फेल जातात. सेनाच नाही तर उपखंडाच्या विकेट्स पण झेपत नाहित. पण अ‍ॅटीट्युड वर्ल्ड बीटर्सचा असतो. मला तरी फारशी आशा वाटत नाही.

काहि ठराविक देशांच्या पलीकडे टेस्टसाठी फ्रँचाआईजी मॉडॅल घ्यायला हवे नि सर्व देशांच्या खेळाडूंना ते ओपन करायला हवे. ईस्वरन सारख्या आपल्या खेळाडूंना पण संधी मिळेल.

एक आफ्रिकेसोबत हरल्याने बाहेर फेकले जाणार नाही. >> माझे पोस्ट फक्त हरण्याबद्दल नाही तर इतर सामन्यांमधल्या खेळाबद्दल पन आहे. ऑसी वगळता मिडल - मिडल लोअर ऑर्डरने वाचवले होते. एकंदर ढिसाळ खेळ होतोय.

मिडल लोअर ऑर्डरने वाचवले होते >>> तर गेल्याच सामन्यात टॉप ऑर्डर खेळली.. विश्वचषक मोठी स्पर्धा असते. जो संघ उत्तरार्धात आपला खेळ उंचावतो आणि फॉर्म मिळवतो तो सरस ठरतो.

चार मध्ये येऊ आपण
पण चौथे आलो आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळावे लागले तर ते भारी पडेल. म्हणून दुसरे तिसरे यावे असा विचार करत आहे.

चांगले खेळत आहेत. पुढचे सामने इंग्लंड आणि न्यूझीलंड सोबत आहेत. स्मृती शतक मारून एखादा जिंकवून देईल याची दाट शक्यता आहे आणि हा जुगारी अंदाज नाहीये.

न्यूझीलंड आणि लंका पावसाने एकेक गुण.
याचा फायदा भारताला मिळेल.
अर्थात लंकेने चांगला स्कोअर टाकला होता. जिंकू सुद्धा शकत होते.

पाकिस्तान आज इंग्लंडला हरवत आहे.
काल न्यूझीलंड लंका सामना अनिर्णित राहिला.
दोन्हीचा फायदा भारताला होईल.

मी यांना जे नव्वदीच्या दशकातील (धोनी युवी यांच्या आधीचा) संघ म्हणतो त्याचे आजचा सामना उत्तम उदाहरण होते.

पुढचे सामने इंग्लंड आणि न्यूझीलंड सोबत आहेत. स्मृती शतक मारून एखादा जिंकवून देईल याची दाट शक्यता आहे आणि हा जुगारी अंदाज नाहीये.

>>>>>

मागच्या सामन्यात थोडक्यात हुकले होते आणि सामना सुद्धा..
आज ८८ चेंडूत शतक मारले Happy

भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर बहिष्कार आहे का?
>>>>

नाही. दिवाळीमुळे सन्नाटा आहे. त्यात आपण हरलो.

हे दोन रेकॉर्ड आज घडले

१) Rohit Sharma becomes first Indian cricketer to score 1,000 ODI runs down under against Australia

२) Most runs for India in ODI cricket
Sachin Tendulkar - 18426
Virat Kohli - 14181
Rohit Sharma - 11249*
Sourav Ganguly - 11221
Rahul Dravid - 10768

भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर बहिष्कार आहे का? >> बोअर झालय फॉलो करायला. रात्री जागायचा उत्साह नाहिये. स्कोअर बघून पुढे सरकतोय. अशा दोन टीम्स मधल्या ठेवण्यापेक्षा तीन किंवा अधिक टीम्स मधल्या बघायला मजा येते. त्यात परत वुमन्स वर्ल्डकप आहे सुरू.

'अ' संघामधे सर्फराजची परत वर्णी लागली नाही. ईश्वरनचीही लागली नाही. काही दौर्‍यांपूर्वी असलेले खेळाडू न खेळता असे बाहेर ठेवले जातात हे झेपत नाही. बरं मुख्य टीमबरोबर असले कि ते डोमेस्टीक खेळू शकत नाही नि तेंव्हा डोमेस्टिक मधे खेळणारे उचलले जातात. साई नि पड्डिकल दोघेही गुणी खेळाडू आहेत पण लाँङ फॉर्‍मट मधे किती पाठी आहेत सर्फराज किंवा ईश्वरनपेक्षा ते बघता त्यांची निवड सातत्याने होते हे कुठेतरी खटकते. सर्फराजबाबत तर सिरीयसली गंभीरच्या कोच व्यतिरिक्त बाकीच्या भूमिकेचा भाग इथे आड येतोय का असा प्रश्न पडतो.

भारत जिंकला !
सेमीफायनल जागा पक्की !!
आणि स्मृती मंधाना शतक मारून सामनावीर !!!

सांड की आंख Happy

सांड की आंख Happy >>>>>>तुमचे कितीतरी अंदाज चुकले आहे आणि त्यात नवल नाही, क्रिकेट मध्ये असे होतच असते, पण एखादा अंदाज बरोबर आला की स्वतः त्याचे कौतुक करत रहायचे हा गुण छान आहे

माझे किती अंदाज चुकले आणि किती बरोबर आले हा हिशोब कोणी ठेवला असेल तर बघायला आवडेल.

पण ऋन्मेषचे सुद्धा अंदाज चुकतात म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात Happy

बाकी वरचा अंदाज जुगारी नाही हे मी आवर्जून यासाठी नमूद केले होते की स्मृतीचा खेळ गेले काही काळ फोलो करत आहे. तिचा या आधीचा या स्पर्धेतील आणि एकूणच वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड चांगला नसला तरी ती या स्पर्धेआधी चांगला फॉर्म घेऊन आलेली. स्पेशली भारतात खेळताना. तिला फक्त आत्मविश्वासासाठी एका खेळीची गरज होती जी ऑस्ट्रेलिया सोबतच्या सामन्यात आली. त्यामुळे इथून ती कोणाला ऐकणार नाही हा विश्वास होता. एवढे लहानपणापासून क्रिकेट बघतोय. आणि खेळाडूची मानसिकता ओळखणे हा त्यातील आवडीचा भाग आहे.

माझे किती अंदाज चुकले आणि किती बरोबर आले हा हिशोब कोणी ठेवला असेल तर बघायला आवडेल. >> तू हा हिशेब ठेवला असेल ह्याची दाट शक्यता आहे आणि हाही जुगारी अंदाज नाहीये. Lol

Sophie Levine काय मस्त बोलली काल वुमन'स क्रिकेट बद्दल !

मी आयुष्यात कधी पैशाचा हिशोब ठेवला नाही. किंबहुना कुठलाच हिशोब न ठेवता बेधडक जगणे ही माझी स्टाईल आहे. मोजून मापून जगण्यात काय मजा Happy

असो,
मालिका हरलो असलो तरी मला उद्याच्या सामन्याची सर्वाधिक उत्सुकता आहे. कारण मागच्या सामन्यात रोहीत शर्मा खेळला आहे.

रोहितची कप्तानी गेल्याने तो आणि कोहली दोघांना छुपा संदेश गेला आहे की आता तुमची संघातील जागा सुद्धा धोक्यात आहे. ते प्रेशर दोघांच्या खेळीत दिसत होते. कोहली लगेचच गेला पण शर्मा सुद्धा अप्रोच बदलून सावध खेळत होता. अर्थात दोन्ही सामन्यात नवीन चेंडूवर गोलंदाजांना मदत सुद्धा होती. नंतर मात्र थोड्या धावा जमताच शर्मा खुलायला लागला होता. पण दुर्दैवाने फलंदाजाला बाद व्हायला एक चेंडू पुरतो. अन्यथा मागच्या सामन्यात त्याचे मोठे शतक येते असे वाटले होते. उद्याच्या सामन्यात आले तर मजा येईल. किमान एक पुरेशी चांगली खेळी तरी यावी जो कॉन्फिडन्स घेऊन तो पुढच्या मालिकेत जाईल. शक्यता जास्त आहे कारण मागच्या खेळीने दडपण थोडेफार निवळले असावे. आजही मला हे दोघे वनडे क्रिकेटचे लिजेंड वाटतात. आणि ते आहेत. ते काहीतरी मोठे करून सन्मानानेच निवृत्त व्हावेत.

"माझे किती अंदाज चुकले आणि किती बरोबर आले हा हिशोब कोणी ठेवला असेल तर बघायला आवडेल" - 'पूरे पचास हजार' म्हणायला एखादा सांभा ठेव तू. Lol

रोहितची कप्तानी गेल्याने तो आणि कोहली दोघांना छुपा संदेश गेला आहे की आता तुमची संघातील जागा सुद्धा धोक्यात आहे. >> रोहितची कप्तानी गेल्यामूळे कोहलीला कसा संदेश गेला ? समजा कोहली खेळला नि शर्मा नाहि तर कोहलीला ठेवतील नि शर्माला काढतील. २-३ सामन्यांच्या जोरावर हे ठरू नये अशी आशा.

रोहितची कप्तानी गेल्यामूळे कोहलीला कसा संदेश गेला ?
>>>>>

छुपा संदेश असे म्हणा हवे तर जर उघड दिसत नसेल.
कारण दोघांची केस सेम आहे.
वाढते वय.

जर मॅनेजमेंट त्यांना बघून बघून उडवायचा प्रयत्नात असेल तर दोघांना एकाचवेळी बाहेरचा रस्ता दाखवणे त्यांना सोयीचे पडेल.
याआधी ट्वेंटी आणि टेस्ट मधून दोघेही एकत्र बाहेर पडलेले आपण बघितले आहेच.

दोघांमध्ये कोहलीबाबत फिटनेस त्याचा प्लस पॉईंट असला तरी गंभीरच्या निशाण्यावर तो आधी असल्याची कुजबुज खरी असण्याची शक्यता आहेच.

दोन्ही मॅचेसमधे उल्लेखनीय म्हणता येईल अशी कामगिरी फक्त अर्शदीपने केलीय. त्याला बसवून सुद्धा राणाला खेळवण्याचा अट्टहास करणार्या गंभीरच्या क्रिकेटिंग बुद्धीमत्तेविषयी शंका घ्यायला वाव आहे.

Pages