चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवस पेंडिंग असलेला पॅडिंग्टन इन पेरू हा चित्रपट नेटफ्लिक्स वर पाहिला. मी दर महिन्याला एका एका OTT चे सब्सक्रिप्शन एकाच महिन्यासाठी घेतो. त्यामुळे पेंडिंग होता.

इथे कुणी पॅडिंग्टन चित्रपटांचे फॅन नाहीत का?

मला तिन्ही पार्ट खूप आवडतात. ज्यांना कुणाला फील गुड मस्त चित्रपट पहायचा आहे, टेन्शन वगैरे घालवायचे आहे त्यांनी पॅडिंग्टन चा कोणताही चित्रपट पहावा.

सनी संस्कारी की तुलसी कुमारी >> पाहिला. लवकरच नेटफ्लिक्सवर येईल/यावा ही सदिच्छा. फा, अस्मिता, rmd वगैरेंनी त्यानंतर नक्की पहावा.

मी त्यातले 'तुझे लागे ना नजरिया, ओढले चुनरिया' - सोनू निगमच्या 'बिजुरिया'चे रिमिक्स कालच पाहिले. मला हे नाव 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' दोन वेळा वाचूनही कळाले नव्हते. तुझी पोस्ट वाचून खरेच नाव असल्याची खात्री पटली. येऊ द्या नेटफ्लिक्सवर, पाहून बघेनच. Happy

हल्ली काहीही नीट पाहणे होत नाहीये. चिकवा- मौनव्रत झाले आहे आपोआपच. त्यामुळे जमले तर सगळा राग काढेन मौनव्रताचा. धन्यवाद, निमित्त दिल्याबद्दल. Proud

काल द लाईफ लिस्ट पाहिला.

आयुष्याशी सामना न करता पळ काढु पाहणार्‍या मुलीला तिने वयाच्या १३ व्या वर्षी बनवलेली लाईफ लिस्ट उर्फ बकेट लिस्ट वर्षभरात पुर्ण केली तरच वारसा हक्क मिळणार असे आई मृत्युपत्रात लिहुन ठेवते. ती ही लिस्ट कशी पुर्ण करते हा चित्रपटाचा विषय.

ठिकठाक वाटला. काहीच नाट्यमय घडत नाही.

काल आप जैसा कोई पाहिला. ठीकठाक आहे, न बघितल्यास नुसकान काही नाही. मी माधवन प्रेमापोटी पाहिला. तो ५५ चा असून ४२ चा सांगितलाय चित्रपटात. फातिमा शेख खूप गोड, कोवळी दिसते. अभिनय पण बरा, सारा अली/झान्वी पेक्शा लाख चांगला.
१-२ ठिकाणी हसवण्याचा प्रयत्न फसला नाही. शेवट टिपिकल आहे.

रेणुका शहाणे आणि जान्हवी कपूर या दोघींच्या चेहरेपट्टीत साम्य आहे ना?
काल कितव्यांदा तरी हम आपके है कौन बघताना जाणवलं. माधुरी खूप सुंदर दिसलीये.

काल "दरार" नावाचा चित्रपट बघितला. सायको थ्रिलर आहे. ऋषि कपूर अरबाझ खान जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. ह्या सिनेमा बद्दल कुणी जास्त काही बोलत नाहीत. इतका काही टाकावू नाही. मला आवडला. मत्र एकही गाणे आठवण्या सारखे नाही. स्लीपिंग with the एनिमी नावाच्या -चू भु मा- हॉलीवूड चित्र पटाची कॉपी आहे असे म्हणतात.

केशवकूल,
Sleeping with the enemy या चित्रपटाचे तेव्हा जवळपास एकाच वेळी याराना, दरार आणि अग्निसाक्षी असे तीन रिमेक आलेले. त्यात अग्निसाक्षी मध्ये नाना असल्याने त्याने इतर दोघांना खाऊन टाकले. त्यामुळे इतरांची चर्चा नाही.

अशीच घटना पुढे भगतसिंग चित्रपटावेळी घडली होती. एकाच वेळी तीन आले होते. त्यात अजय देवगनने इतर दोघांना खाऊन टाकले होते.

गंमत म्हणजे मी सुद्धा अग्निसाक्षी आणि अजय देवगणचा भगतसिंग हे दोन्ही थिएटरमध्ये बघितले होते. आणि इतर सारे आजवर पाहिले नाहीत.

तरी अरबाज खानचा दरार अर्धा पाहिला होता. त्याच्या भूमिकेचे तेव्हा थोडेफार कौतुक झाले होते.

अरे हो,
अग्निसाक्षीचे श्रेय केवळ नानाला नको. तेव्हा मनीषा कोइराला सुद्धा फॉर्ममध्ये होती.
किंबहुना अग्निसाक्षी चित्रपटामुळेच ती माझे पहिले वहिले क्रश झाली होती. याचा उल्लेख या धाग्यात सुद्धा केला आहे.

तुमचे एखादे क्रश आहे का हो?
https://www.maayboli.com/node/58022

सर
ग्रेट. ते तीन सिनिमे आले होते हे माहित आहे. केवळ अरबाझ खान साठी म्हणून हा दरार बघितला. त्याने जास्त सिनेमे करायला पाहिजे होते असे वाटले.
विद्या सिन्हा एकेकाळी आवडली होती. विशेषतः छोटीसी बात मध्ये. म्हणून शनिवारी रविवारी तो आणि रजनीगंधा दोनीही बघितले. मजा आली.

अरबाज खानला निगेटिव रोलच सूट व्हायचे. हॅलो ब्रदर चित्रपटात हिरोच्या भूमिकेत फार अवघडून गेला होता. सलमान सोबत होता म्हणून चालून गेले.
तेच प्यार किया तो डरना क्या मध्ये काजोलचा तापट भाऊ दाखवलेला ते त्याला सूट झालेले.
बाकी अभिनयाची बोंब होती.

प्यार किया तो डरना क्या मध्ये अतिरेकी व्यक्तिरेखा आहे, पण दरार मध्ये चांगला अभिनय केला आहे. मला वाटत अब्बास मस्तान ह्या द्वयीच्य्या दिग्दर्शनामुळे असेल. BTW मी अब्बास मस्तान चा फॅन आहे.

दरारमध्ये त्याच्या पात्राला एकच निगेटिव्ह शेड होती. तीच छान जमते असे म्हणत आहे. प्यार किया तो मध्ये बरेच शेड आहेत. किंवा दाखवू शकत होता. पण त्यातील नकारात्मक तेवढी चांगली जमली.

सर
चला दखल घेतल्या बद्दल आभार.

दरार ने पुर्णच कॉपी मारलीये, बाकिचे इन्सायर्ड आहेत..त्यानी कथानकाला देशी ट्च दिलाय.
मुळ सिनेमा क्लास आहे..

दरार मूळ चित्रपटाची सहीसही कॉपी आहे पण अरबाज आणि जुहीने चांगलं काम केलंय. इतका वाईट नव्हता. माधुरीचा याराना महाभयंकर होता. तिन्हीमधे अग्निसाक्षी नानामुळे भाव खाऊन गेला पण मनिषानेही चांगलं काम केलं आहे. गाणी मस्त होती त्यातली.

जमूरे
असं गाणं आहे. हे गाणं कार्तिक आर्यनच्या चंदू चँपियन मधे आहे.
कुणी पाहिलाय का ? कधी आला ते माहीतीच नाही.

Sleeping with the enemy च्या अजून 2 झेरॉक्स कॉपीज आठवतायत
ईशा देओल, आफताब अन् संजय कपूर चा कोई मेरे दिल से पूछे
आणि ऐश्वर्या, अभिषेक अन् (परत एकदा) अरबाज चा कुछ ना कहो

कु ना क जरा तरी वेगळा होता
को मे दि से पू फुल कॉपी

इतक्या कॉपीज एकाच काळात? त्यावर्षी स्लीपिंग विथ नॉन-एनिमी (म्हणजे प्रेमात असलेल्या किंवा ज्यांच्याशी लग्न झाले त्या व्यक्ती) यावरच तुलनेने कमी पिक्चर आले असावेत Happy

नाही. बराच फरक आहे. मुख्य थीम असा पाहिजे की ओब्सेसीव पझेसिव व्यक्तिमत्व. मग त्याला कॉपी म्हणता येईल. तो आपल्या बायकोला स्वतःची property समजत असतो. वर OCD पण आहे.

हे घ्या अजून
सलीम लंगडे़ पे मत रो
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है

ऐश्वर्या, अभिषेक अन् (परत एकदा) अरबाज चा कुछ ना कहो
>>> कुछ ना कहो पाहिल्यासारखं वाटतंय पण टायटल ट्रॅक सोडल्यास काहीच आठवत नाही.

'सोनू के टिटू की स्वीटी' पण आहे बरं...एका गाण्यासाठी पाहिलाय मी.

सोनू के टिटू की स्वीटी >>>>> ह्या चित्रपटाची गाणी लागायची जिम मध्ये . ती गाणी ऐकून अश्या नावाचा चित्रपट आहे हे कळले .

सनी संस्कारी की तुलसी कुमारी काही सिनेमे नाव बघूनच बोर असतील असं वाटतं. >>>>>>>>

मटा मध्ये पॉझिटिव रिव्ह्यू आलेला.

बर! कंतारा चा सिक्वेल (?) आला आहे तो कोणी बघितला की नाही ?

Pages