चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राभु , मस्त पोस्ट.
लागूबंधू आणि कालनिर्णय Lol
माझेमन Rofl
फा, दानवीर-
उगाच लंबी रेस का घोडा बिडा होऊ नये म्हणून थेट त्याच्या हातात पैसे देतो
इथे हिचा नवरा बरोबर होता की काय अशी शंका मिथुनला येण्याआधीच सीन कट केला आहे. >>>> Rofl
पहिल्या ब्रेकपर्यंत तीन दानधर्म करून झाले आहेत.
दीवारमधे देवळात अनेक घंटा वाजल्यामुळे ते मोठे झाले. इथे कशाने झाले ते माझे हुकले.
सर्व रिक्षावाले रिक्षामालकही आहेत अशी मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या शहरात >>>>> Lol

दानवीर Rofl
उरलेला भाग लवकर येऊ दे.

ॲंकी, आप तो encyclopedia है ! Happy
लडकी है क्या रे बाSS बा - श्रीदेवी आणि अनिल कपूरच्या लाडलामधे होते, फक्त एका गाण्यात ही होती.

तुम्हाला तिघांनाही _/\_ कारण लडकी है क्या हे काय आहे हेच मला माहीत नव्हते Happy

अर्ली ९०ज मधले बरेच पिक्चर व गेल्या काही वर्षातले काही - याचा बराच बॅकलॉग आहे माझा.

ती मला आधी शिल्पा शिरोडकर वाटली. आणि मधे एक शांतिप्रिया आली होती - बहुधा भानूप्रियाचीच बहीण किंवा नात्यातली आणि बरीचशी तिच्यासारखीच दिसणारी - तिचाही भास वाटला.

आज मला तू पहिल्यांदा १/३ सामायिक का होईना दंडवत दिलेस तेही 'लडकी है क्या रे बाबा' वरून.. Proud Lol

'शक्तिमान' मधे पहिल्या एपिसोड मधे किटू गिडवानी होती, नंतरच्या सगळ्या एपिसोड मधे वैष्णवी होती.

Happy Long overdue Happy

आणि मला नंतर ते गाणे आपोआप आठवले - म्हणजे पहिल्या २-३ ओळीच पण निदान आठवले. आता पाहिले - काय कॉमिक डान्स आहे त्यातला. शक्तिमान मधे तिचे नाव गीता विश्वास आहे असे दिसते. तेथील कॉमेन्ट्सवरून.

दानवीर : रिक्षा ड्रायव्हर लोकं घरात डायनिग टेबल वर बसून खाना खातात हे पाहून गहिवरून आले.

जाता जाता : लहानपणी मला भाकरी भाजी अजिबात आवडायची नाही. मग कुठल्यातरी मिथुनच्या चित्रपटात मिथुनला २० भाकऱ्यांचा स्टॅक आणि भाजी खाताना पाहिले. आणि नेमकी त्याच वेळेस आज्जी जोंधळ्याच्या भाकऱ्या थापत होती. तिने मग पांढरीशुभ्र दुपदरी सुंदर भाकरी आणि गवारीची मस्त भाजी दिली तेव्हापासून भाजी भाकरी माझी लाडकी झाली.

पांढरीशुभ्र दुपदरी सुंदर भाकरी आणि गवारीची मस्त भाजी >>>> अहाहाहाहा.

लडकी है क्या - अनु मलिकच्या पांचट गाण्यांपैकी एक चिरकुट गाणं.

"प्यार भुकता नही" बघच अशी ऑफर मिथुनफॅन कडून आली म्हणून आधी सावधानीचा उपाय म्हणून त्यातलं गाणं ऐकलं / पाहिलं, तर शब्बीरकुमार!

तुमसे मिलक अ र अ अ, ना जानये क्युं , और भी कुच ..
या आ आ द आता हई, या आ आ अ द आता हई

या गाण्यात शब्द , चाल, गायकी , पिक्चरायझेशन यातलं काय आवडलं असेल पब्लिकला ? त्या वेळी नक्कीच यापेक्षा चांगली गाणी बनत होती.
बघायचाच झाला तर दर्जाची मिठी बसल्यावर बघेन.

तुमसे मिलक अ र अ अ, ना जानये क्युं , और भी कुच ..
या आ आ द आता हई, या आ आ अ द आता हई
>>>>
फेमस असावं, कारण उच्चारांसकट आठवतंय.

ते जाऊ दे. ‘घरटं’चे पुढचे भाग लवकर टाक पाहू.

राभु, माझा भाऊ या चित्रपटाची पेपरातली जाहिरात प्यार भुकता नही, कुत्ता भुकता है अशीच वाचायचा.. तो तर इतका ग्रेट होता की चंद्र आहे साक्षीलाची जाहिरात कायम चंद्र आहे राजदत्त साक्षीला अशी वाचायचा. चित्रपटाच्या नावाचे प्लेसिंग असे होते की चंद्र आहे हे दोन शब्द वर, आहे शब्दाखाली साक्षीला हा शब्द आणि चंद्र शब्दाखाली राजदत्त हे दिग्दर्शकाचे नाव.

प्या झु न प्रचंड गाजला. इतका की हे गाणे सर्वत्र ऐकायला यायचे, कुठलाही कार्यक्रम असो, गाणे हेच.

तेव्हा एक बातमीही वाचलेली. कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला न्यायाधिशांनी हा चित्रपट एकत्र पाहुन यायची सुचना केली, त्यांनी तो पाहिला व घटस्फोटाचा विचार सोडुन दिला Happy

मी अजुन पाहिला नाहीय. बघेन आता.

माम >> नवरात्र कमिटीत जबरदस्तीने नाव टाकलंय. त्यामुळे उशीर होत आहे.
साधना >>>>राजदत्त Lol धमाल आली.
असे मुद्रणदोष माहिती आहेत Lol
हिंदीत झ हे अक्षर भ ला फ सारखे लिहून बनवतात हे माहीतच नव्हतं. Happy

अगदीच बघयला काही सापडलं नाही , काहीतरी light पाहिजे होतं , एक In for murder नावाचा हलका फुलका whodunit पाहिला .
तसा काहीच दम नाहीये कथेत , पण हिरवीण साधी सरळ आहे ती आवडली , तिचा Vet बॉस जामच क्युट आहे. एक goodfornothing वाटणारा ईन्स्पेक्टर आहे , हलका फुलका विनोद आहे , निसर्गरम्य पोलंड आहे.
मिसलात तरी चालेल नाहीतर टाईमपास म्हणून बघा .

होमबाऊंड आणि जुगनुमा : द फेबल या दोन चित्रपटांबद्दल उत्सुकता आहे.
अंदाज आल्यावर पाहीन.

इन फॉर मर्डर मीही मागे पाहिला. ती हिरवीन म्हणजे आपल्या सुक्ष्मदर्शिनीचा पोलिश अवतार … मलाही चित्रपट आवडला.

"संतोष" - नावाचा एक हिंदी पिक्चर पाहिला. एखाद्या सर्विसवर उपलब्ध आहे का माहीत नाही. मी फ्लाइटमधे पाहिला. चांगला आहे. ऑल्मोस्ट शेवटपर्यंत ग्रिपिंग आहे. फक्त शेवट जरा अगम्य आहे - म्हणजे काय झाले ते कळते पण ते जसे दाखवले आहे ते अगम्य वाटले. शहाना गोस्वामी व तिची बॉस असलेली अभिनेत्री - दोघींची कामे चांगली आहेत. उत्तर प्रदेशातील जातीयवाद, दलितांवरचे अत्याचार हा एक भाग आहे, पण पोलिसांचे त्यावरचे वागणे हा खरा मुख्य भाग. शहानाचा कॉन्स्टेबल नवरा दंगलीत मारला जातो. त्यामुळे एका सरकारी नियमानुसार तिला त्याच्या जागी नोकरी मिळते. तिला येणारे अनुभव, तिची या सिस्टीममधे सरावलेली बॉस - तिचा या गोष्टींबद्द्लचा अ‍ॅप्रोच हे सगळे चांगले दाखवले आहे. बघण्यासारखा आहे.

ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट आणि सिस्टर मिडनाइट हे दोन्ही थोडा वेळ बघितले. दोन्हीची तारीफ ऐकली आहे. पण थोडा पेशन्स ठेवून बघावे लागतील असे दिसते. पहिल्याची सुरूवात खूप स्लो आहे. दुसरा जेमतेम दहा मिनिटे पाहिला. पण फ्लाइट मधे कंटाळा, झोप ई मधून एंगेज ठेवायला जरा वेगळे पिक्चर लागतात. त्यामुळे एरव्ही कधीतरी नीट बघायला हवेत.

संतोष" - नावाचा एक हिंदी पिक्चर पाहिला. एखाद्या सर्विसवर उपलब्ध आहे का माहीत नाही. मी फ्लाइटमधे पाहिला>> which flight Emirates?

संतोष" - नावाचा एक हिंदी पिक्चर पाहिला. एखाद्या सर्विसवर उपलब्ध आहे का माहीत नाही. मी फ्लाइटमधे पाहिला>>
>>
थिएट्रिकल रिलीज बॅन झाला होता याचा

होमबाउंड भारताची Official entry आहे ऑस्कर साठी. नीरज घईवानचं दिग्दर्शन आणि करन जोहर प्रोडक्शन. हा मेन स्ट्रीम सिनेमा असेल असं वाटत नाही. इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या परफॉर्मन्सेस बद्दल पॉजिटिव मत आहे. करन जोहर चा हा असा तिसरा सिनेमा आहे. अपयश येऊनही तो प्रोड्युस करतो है कौतुकास्पद आहे. पैशांचं सोंग आणता येत नाही.
थिएटरच्या धक्काबुक्कीत जाऊन बघण्याचा विचार नाही. ओटीटी वरच पहावा लागेल.
अनुपमा चोप्रांचा रिव्ह्यू छान आहे. पण दीक्षा शर्माचा रिव्ह्यू अस्मिताच्या पोस्ट सारखा वाटतो. पॉजिटिव्ह एनर्जी जाणवते. Happy
https://www.youtube.com/watch?v=yR6EncefFXQ

संतोष कुठे आहे ओटीटी वर? रेको घेतला आहे.

परदेशातही स्ट्रीमिंगवर कोठे आहे का माहीत नाही. मी लुफ्तांसामधे पाहिला.

सैराट, आर्टिकल १५ वगैरे असताना याला बॅन करण्याचे काही कारण नव्हते.

Pages