>>>>>>>काल द लाईफ लिस्ट पाहिला.
मी काल बघत होते पण अति सुमार दिसणार्या, स्वतःचे लेम, पिळपिळीत केस सतत सावरणार्या त्या हिरॉइनमुळे पाहूच शकले नाही. अटर फ*** अग्ली हिरॉइन.
सोनू के टिटू की स्वीटी
मस्त पिक्चर आहे
आमच्याकडे दोन वेळा बघितला गेलाय
त्यातले "तेरा यार हू मे" गाणे आमच्याकडे रिपीट मोडवर लागते.
कार्तिक आर्यन फॅन क्लब आहे आमच्याकडे.
+७८६ स्वस्ति
फारच कमाल स्टोरी आहे.
आणि ते देखील आपला मराठी माणूस
मायबोलीवर धागा सुद्धा होता यावर. मी तो वाचूनच लागलीच बघितला होता. आणि तसेही कार्तिक आर्यन फॅन क्लब आहेच आमच्याकडे
आताच "मदहोशी" बघितला. बिपाशा बसू जॉन अब्राहम आणि प्रियांशु चटर्जी. मानसिक संतुलन हरवलेल्या तरुणीची कथा आहे. प्रियांशु चटर्जी आणि दिग्दर्शक तन्वीर खान माझ्यासाठी अनोळखी. स्टोरी पण तन्वीर खानने च लिहिलेली आहे. सायको थ्रिलर, आहे. स्टोरीलाईन चांगल्या प्रकारे हाताळली आहे, ज्याना असे विषय आवडतात त्यांनी अवश्य बघावा. स्मिता जयकर ची आईची भूमिका आहे. खूप दिवसांनी दिसली. स्टोरी नाही लिहिणार कारण मग...
'लायन्सगेट स्टुडिओज' कनेडिअन स्टुडिओ आहे. अजुनही ओनरशिप कनेडिअन आहे का कल्पना नाही.
जॉन विक, हंगरगेम्स, क्युब .... आणि आपला एपिक... सॉ .. हे चटकन आठवले. या सगळ्यांचे ३-४ भाग आलेले आहेत. सॉ चे तर असंख्य.
इथे वाचून धडक-२ पाहिला. 'आवडला' असं कसं म्हणू? डोक्यात रेंगाळणारा सिनेमा आहे. विषय नुसत्या शब्दिक सहानुभूतीपलिकडचा आहे. समजावून घ्यायचा आहे, अॅक्सेप्ट करायचा आहे. एक कलाकृती म्हणून छानच जमलाय. कथानक, पात्ररचना, अभिनय, दिग्दर्शन - सगळंच छान जमलंय.
हो मलाही चांगला वाटला धडक २. इन्टेन्स सिनेमा आहे. प्रेमकथेपेक्षा समाजातली दरी, जातीयवादाची दाहकता हा मूळ विषय वाटला. अॅक्टर्स सगळे चांगले आहेत. विशेषतः सिद्धार्थ चतुर्वेदीचे काम फार आवडले. बॉडी लॅन्ग्वेज वगैरे फार पर्फेक्ट दाखवली आहे.
कथन थोडे एकतर्फीही वाटते, म्हणजे सेकंड हाफ मधे जरा असंही वाटायला लागलं की अरे इतक्या सगळ्याच अट्रोसिटीज याच्या वाट्याला येतात, इतके जास्त प्रत्यक्षात होत असेल का वगैरे. पण माझा परीघ भारतात रहात होते तेव्हाही फार लहान होता , आताही आहे. आणि ज्या बातम्या ऐकू येत असतात त्यावरून असे /इतके नसेलच असेही म्हणायचे साहस नाही.
धडक-२ मध्ये प्रेमकथेवर जोर दिलेला नाही. त्यामुळे अन्यायाला कारण प्रेम आहे ह्या प्रमेयावर पुढची मांडणी होत नाही. सैराट ही प्रेमकथा आहे (धडक-१ चे नावही घेववत नाही). तिथे प्रेम केले म्हणुन पुढचे भोग वाट्याला आले अशा पलायनवादाचा आसरा घेता येतो.
धडक-२ मध्ये हिरो पहिल्यापासुनच तो कोण हे लपवायचा प्रयत्न करतो आणि समाज प्रत्येक वेळेस तो कोण आहे हे आधी विचारुन त्याला कसे वागवायचे हे ठरवतो. कॉलेजमध्ये आडनाव विचारतात. जे सांगितले तर इतर मुले हसणार हे त्याला ठाम माहित आहे. कुठे राहतो ह्या प्रश्नावर तो मोठ्या एरियाचे नाव सांगुन सुटका करुन घेऊ पाहतो, तर त्या मोठ्या एरियात कुठे हा प्रश्न पुढे येतोच. नेमका एरिया सांगताच त्याने विकत घेऊन दिलेला चहा गुपचुप बाजुला ठेवला जातो जे त्याला कळतेच.
धडक-२ मध्ये समाजात नव्याने आलेल्या व्यक्तीला कुठल्याही सर्कलमध्ये आधी नाव गाव जात विचारुन प्रवेश दिला जातो हे फार ठळकपणे दाखवलेय. तो जातीवरुन ज्या सर्कलचा भाग आहे तिथेच त्याने राहायला हवे, त्याबाहेर पडुन इतरांच्यात मिक्स व्हायची धडपड करु नये. तसे केले तर मार खाणार. सुरवातीला ह्यात पडायचे नाही असे निलेशला वाटते पण गावातुन जातीवरुन होत असलेल्या छळाला घाबरुन्/कंटाळुन पळुन जिथे आलो त्या शहरातही तेच वास्तव आहे हे समजल्यावर इथुन कुठे पळणार असा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो आणि लढल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला कळुन तो लढतो. तो त्यात विजयी होतो हे दाखवले हे खुप चांगले केले. हा अस्तित्वाचा लढा आज लाखो लढत असतील. आपणही विजयी होऊ ही आशा हा चित्रपट पाहुन वाटेल.
सोबत विधीचाही लढा आहेच. ती उच्चवर्णिय असली तरी स्त्री म्हणुन तिला लढावे लागतेयच. स्त्री आहेस त्यामुळे जेवढे शिकलीस तेवढे पुरे, मोठ्यांसमोर बोलु नकोस वगैरे ऐकुन घ्यावे लागतेच. त्या विरुद्ध लढुन स्वतःचे स्वातंत्र्य मिळवावे लागते.
निलेशच्या बाबानेही खुप काही सोसुनच जे आवडतेय ते करायचे स्वातंत्र्य मिळवलेय. एकुण काय, समाजात तुम्हाला हवे ते मिळवायचेय तर त्यासाठी संघर्ष चुकलेला नाही तो केला तरच पुढे मोकळा रस्ता सापडेल ह्या आशेवर चित्रपट संपतो. विधी व निलेश निर्धास्त, कुठल्याही हेटाळणीयुक्त नजरांशिवाय बसमधुन प्रवास करु शकतात ह्या आशावादी नोटवर चित्रपट संपतो. हा बदल समाजात होत असेलही. सगळेच कुठे आपल्या नजरेसमोर घडतेय.
चित्रपट पाहायला सुरवात केल्यावर वाटले प्रेमकथा आहे, पुढे काय वळण घेणार ह्याचा चाणाक्ष प्रेक्षकाचा अंदाज आला लगेच नेटवर सुखांत आहे का याचा अंदाज घेतला. दु:खांत असता तर पुढे बघितला नसता. सुदैवाने प्रेमकथा आहे हा चाणाक्ष प्रेक्षकी अंदाज चुकला
मैत्रेयी, आपण ज्या समाजात वावरलो/तोय तिथे आपली ओळख आधीपासुन आपल्या आईवडलांमुळे, आजुबाजुच्या प्रभावळीमुळे होती/आहे. त्यामुळे तु कोण ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रसंग कधी आला नाही, जिथे आला तिथे मिळालेले उत्तर समोरच्याला चालणारे होते. मी भीमनगरात राहते हे उत्तर दिले तर समोरच्याची वागणुक बदलु शकते भीमनगरात राहणारी व्यक्ती बाहेर पडुन इतरत्र गेली तर तिला पावलोपावली उघड किंवा सुक्ष्म अट्रॉसिटीचा सामना करावा लागणार. भारतात आजही हे होते. युरोप/अमेरिकेत काळा माणुस पाहिला की गोर्याच्या वागणुकीत बदल पडत असणारच. तो दुसर्या गोर्याला कळणार नाही पण काळ्याला लगेच कळणार.
भारतात समोरचा कोण ही चाचपणी सतत होत असते याचे एक उदाहरण आठवले. इथे गावात माझे मित्र कुटुंब आहे सिन्हा म्हणुन. तर अशाच गप्पा मारत असताना वर्षु सिन्हाने एक किस्सा सांगितला. तिला गोव्यातल्या उच्चभ्रु कुटुंबातल्या एका समारंभाचे आमंत्रण होते. ते कुटुंब यांना थेट ओळखत नव्हते पण व्यावसायिक कारणाने आमंत्रण होते. वर्षुच्या अवतारावरुन ती खुप उच्चभ्रु वगैरे वाटते. तिथे गेल्यावर वर्षु जेव्हा तिथल्या होस्टेसला भेटली तेव्हा तिने तु कोण हा प्रश्न खोदरुन खोदरुन विचारला. आडनाव सिन्हा आणि बोलते शुद्ध मराठीत. तु कोण हा प्रश्न विचारत विचारत शेवटी जेव्हा वर्षुचे आजी आजोबा ब्राम्हण हे त्या होस्टेसला कळले तेव्हा ती रिलॅक्स होऊन म्हणाली, म्हणजे तु आपल्यातलीच गं… तेव्हा वर्षुला कळले प्रश्नांचा रोख कशावर होता. तिन दिवसांचा समारंभ होता पण तिने होस्टला खोटे कारण सांगुन दुसर्याच दिवशी तिथुन पलटी मारली.
Submitted by साधना on 10 October, 2025 - 07:46 >>> साधना उत्तम पोस्ट, जर वर्णव्यवस्थेच्याच परिघात बोलायचं झालं, तर आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे.
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 10 October, 2025 - 09:11
"आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे." +१. ह्यातला सुजाणपणा हा एकंदरीतच संपूर्ण समाजाला वाढवायला हवा असं मला वाटतं.
निम्नवर्णियांनी सुशिक्षितपणाचा अनूशेष भरून काढला, तरी त्यांना समानतेची, सन्मानाची वागणूक मिळेल याची खात्री काय?
आताच हरयाणातल्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने जातीवरून हिणवले जाते , असे सांगून आत्महत्या केली.
कोणी उच्चशिक्षण घेतले तर ते आरक्षणामुळे . खरे मेरिटधारी आम्हीच, असं म्हटलं जातं.
अवांतर आहे, पण त्या वाक्याला आणखी अनुमोदने मिळत राहतील, म्हणून लिहिले.
आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे.>>>>>
सुजाणपणाचा व सुशिक्षित्पणाचा अनुशेष उच्च व निम्न दोन्ही वर्गात भरपुर आहे. त्यातला शिक्षितपणाचा अनुशेष भरुन काढता येईलही. पण त्यामागे ’सु’ लागेलच याची अजिबात खात्री देता येणार नाही.
पुर्ण सुजाणपणाचा मानवी प्राण्यात मुळातच अभाव आहे. काहीजण काही बाबतीत सुजाणपणा दाखवतात त्याचवेळी काही बाबतीत ते तितके लिबरल नसतात याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सुजाणपणाचा अनुशेष भरुन काढणे कठिण आहे.
जगात काय सुरु आहे याबद्दल साधारण ३०-३५ वर्षांपुर्वीपर्यंत माझ्याकडे खुपच मर्यादित माहिती होती. पेपरात जितके महत्वाचे तितकेच छापुन येई, तितकीच जगाची ओळख होती. हळुहळू इंटरनेटच्या माध्यमातुन जगाची ओळख होत गेली. बाहेरच्या जगाचे फर्स्ट हँड अनुभव वाचायला मिळू लागले. परदेशी बातम्या थेट वाचायला मिळायला लागल्या. आधी फक्त मोजकेच चित्रपट भारतात यायचे आणि माझ्यासाठी ते बघणे म्हणजे मुद्दाम तासाचा प्रवास करुन जाणे त्यामुळे ते पाहिले जात नव्हते. आता सरसकट सगळे घरबसल्या महिन्याची थोडी फी भरुन फुकट पाहता येतात. या वाढलेल्या परिघामुळे बाहेरची थोडीफार ओळख झाली. आणि कळले की उच्चनिचतेच्या कल्पना तिथेही आहेत. गुलामगिरी प्रथा कायद्याने नष्ट केली हा इतिहास शिकले होते त्यामुळे काळ्यांना आजही डिस्क्रिमिनेट करतात हे पहिल्यांदा कळले तेव्हा धक्का बसला. युरोप/अमेरिकेत हे होते हे कळले ते तिथल्या जगाशी लिमिटेड सेकंड हँड परिचय तिथल्या साहित्यातुन्/चित्रपटातुन झाला तेव्हा. ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर २०२४ मध्ये घडावे याचा खेद व आश्चर्य दोन्ही एका वेळेसच वाटले.
भारतात जातीव्यवस्था आहे आणि ही जन्मापासुन चिकटते याचा दोष धर्माला व ती व्यवस्था राबवणार्या एका जातीला दिला जातो. काळ्या वर्णाला गोर्यापेक्षा कमी लेखणे याचा दोष कोणाला देणार? चीन, जपान, कोरीया इत्यादी आशियायी देशात कुठल्या प्रकारचे डिस्क्रिमिनेशन होते याची मला माहिती नाही कारण त्या जगाशी माझा अद्याप परिचय नाही. पॅरॅसाईट हा एक कोरियन चित्रपट पाहिलाय जो तिथल्या समाजातल्या आर्थिक दरीबद्दल बोलतोच पण हातात पैसे असलेल्या लोकांच्या मनात असलेल्या निर्धनांबद्दलच्या तिरस्काराचे दर्शनही घडवतो. तिथे कदाचित जात्/वर्णावर आधारीत डिस्क्रिमिनेशन नसेल, आर्थिक डिस्क्रिमिनेशन असेल. मला तिकडच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही पण जेव्हा होईल तेव्हा तिथले डिस्क्रिमिनेशनही कळेल. तिथे कसलेही डिस्क्रिमिनेशन नसेल असे निदान आजतरी वाटत नाही.
कारण कळप करुन राहणे ही मानवी वृत्ती आहे आणि दुसर्याला काहीतरी कारण काढुन आपल्या कळपात न घेणे हा स्वभाव आहे.
भारतात जातीवरुन उच्चनिच लेखतात तसेच दिसण्यावरुनही उच्चनिच लेखतात. इशान्य राज्यातल्या लोकांना इतर भारतीय वेगळ्या प्रकारचा त्रास देतात.
काल प्रायमल फिअर नेफ्लिवर पाहिला. २४ ऑक्टोबरला नेफ्लिवरुन जातोय. आवडला. पाहायला सुरवात केली तेव्हा अजय-उर्मिला -अक्शयचा असाच चित्रपट पाहिलाय हे लक्षात आले. चित्रपट छान पकड घेतो. अॅरोन झालेल्या नटाने खुपच
छान काम केलेय.
चित्रपट पाहून आलेला समजूतदारपणा एस सी एस टी आरक्षणाचा, आपल्या मुलांच्या कॉलेज प्रवेशाचा प्रश्न आला की टिकणार आहे का?
एखाद्याला सन्मानाने वागवायला त्याची जात, आर्थिक स्तर, त्याचा व्यवसाय, शिक्षण या गोष्टींचा विचार करायची गरज भासू नये.
हे जातीचं झालं. शिक्षण हक्क कायद्याने गरीब वर्गातल्या मुलांना सगळ्या शाळांत काहीएक आरक्षण आहे. त्या मुलांबद्दल बाकीच्या मुलांच्या पालकांचे विचार काय असतात? गावांत अजूनही जातींवर आधारीत अनेक प्रथा उघडपणे पाळल्या जातत. त्या नुसत्या पाहतानाच नव्हे, तर त्यांबद्दल लिहितानाही आपल्याला वावगं वाटतं का?
काल सन ऑफ सरदार २ पाहिला.
पहिला अर्धा पाऊण तास परवा पाहिला होता. ते फारच वाईट प्रकरण होते. झोपेची तयारी करता करता म्हणून चालू होते. जेवढे या चित्रपटाबद्दल वाईट ऐकले होते अगदी तसाच होता.
काल रात्री पुन्हा झोपेची तयारी करता करता अजून पंधरावीस मिनिटे बघूया म्हटले आणि पुढे बरा वाटला आणि शेवटी एका सीनला डोळ्यातून चक्क पाणी वगैरे आले.
हाऊसफुल चित्रपटाचे वाईब येतात पण यात कॉमेडी ऐवजी मला इमोशनल सीन जास्त बरे वाटले. भारत पाकिस्तान अँगल मात्र काही ठिकाणी मजेशीर वाटला.
चित्रपट परदेशात घडतो. अजय देवगनची बायको त्याला घटस्फोट देते आणि नवीन बॉयफ्रेंड पकडते.
मृणाल ठाकूरचा नवरा चंकी पांडे तिला सोडून एका रशियन पोरीसोबत पळून जातो.
ते पाकिस्तानी दाखवले आहेत आणि त्यांची मुलगी एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडते. त्यामुळे मृणाल ठाकूर अजय देवगनला आपला नवरा आणि त्या मुलीचा बाप बनवते. एवढ्यावरच न थांबता तो आर्मीत आहे हे सांगते.
पण प्रत्यक्षात मृणाल आणि तिची फॅमिली नाचगाने करणारे असतात.
त्यांच्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या वडिलाना म्हणजे रवी किशनला नाच गाण्याचा तिटकारा असतो. कारण त्याच्याही बापाने एका ब्रिटिश पोलडान्सरवर प्रेम करून तिच्याशी लग्न केले असते. आणि हो सर्वात महत्वाचे, त्याला खोटे बोललेले बिलकुल आवडत नसते.
अजूनही बराच गुंता आहे. अजूनही काही विवाहबाह्य संबंध आहेत जे शेवटी उघड होतात. बास्टर्ड ऑफ बॉलीवूड प्रकरण आहे सगळे. पण तरी कोणाला बघायचा असल्यास सस्पेन्स फोडत नाही.
सुरुवातीचा अर्धा पाऊण तास बघून आणखी कोणी सोडला असेल तर फावल्या वेळात पूर्ण करायला हरकत नाही. जिथून सोडला तिथून पुढे चांगला वाटण्याची शक्यता आहे.
काल थिएट्रात, रुफमॅन पाहीला. फारच आवडला. खूपच मस्त स्टोरी आहे. आणि मुख्य म्हणजे खर्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेली कथा आहे. तो माणूस शेवटी दाखवतात. फारच आवडला.
काल जॉली ललब ३ पाहिला. ठीक ठाक चित्रपट आहे पण पहिल्या दोन सारखी मजा नाही आली. अक्षय व अर्शद बरोबर असून सुद्दा.
चित्रपटात कोर्ट सिन्स पहिल्या दोनच्या तुलनेत कमी आहेत त्यामुळे ड्रामा कमी वाटतो. त्यात सौरभ शुल्कासारख्या जजला उगाचच एका बाईच्या (शिल्पा शुक्ला) च्या मागे लागलेले दाखवले आहे ज्याची अजिबात गरज नव्हती. अक्षय व अर्शद शेवटपर्यंत एकमेकांच्या विरूद्ध लढतात असे दाखवले असते तर चित्रपट चांगला झाला असता. अर्ध्या चित्रपटानंतर लगेच ते एकमेकांबरोबर काम करायला सुरूवात करतात व त्यांच्या विरूद्ध असलेला वकील म्हणजे राम कपूरला टफ फाईट द्यायला लागतात. आधीच्या चित्रपटात अर्शद विरूद्ध बोमन इराणी, अक्षय विरूद्ध अनूकपूर हा जो सामना रंगला होता त्याची सर अक्षय+अर्शद विरूद्ध रामकपूर अशी अजिबात येत नाही. गजराजरावचा मेन व्हीलन मात्र मस्त आहे. अम्रुता रावला बर्याच दिवसांनी पाहून बरे वाटले. पण हुमा कुरेशी बोअर करते.
मटरू कि बिजली का मंडोला
मटरू कि बिजली का मंडोला नावाचा पिक्चर पाहिलाय तो ही रात्री जागून.
नाव आठवायलाच किती तरी तास गेले.
>>>>>>>काल द लाईफ लिस्ट
>>>>>>>काल द लाईफ लिस्ट पाहिला.
मी काल बघत होते पण अति सुमार दिसणार्या, स्वतःचे लेम, पिळपिळीत केस सतत सावरणार्या त्या हिरॉइनमुळे पाहूच शकले नाही. अटर फ*** अग्ली हिरॉइन.
मटरू कि बिजली का मंडोला
मटरू कि बिजली का मंडोला
>>> हो. त्यातलं खामखां गाणं छान आहे.
सोनू के टिटू की स्वीटी
सोनू के टिटू की स्वीटी
मस्त पिक्चर आहे
आमच्याकडे दोन वेळा बघितला गेलाय
त्यातले "तेरा यार हू मे" गाणे आमच्याकडे रिपीट मोडवर लागते.
कार्तिक आर्यन फॅन क्लब आहे आमच्याकडे.
त्यातलं खामखां गाणं छान आहे.
त्यातलं खामखां गाणं छान आहे. >> बघायला हवं. लक्षात नाही.
गुलाबी म्हैस तेव्हढी लक्षात आहे.
चंदू चँपियन चांगला आहे .
चंदू चँपियन चांगला आहे .
Inspiring story !
>>>>
+७८६ स्वस्ति
फारच कमाल स्टोरी आहे.
आणि ते देखील आपला मराठी माणूस
मायबोलीवर धागा सुद्धा होता यावर. मी तो वाचूनच लागलीच बघितला होता. आणि तसेही कार्तिक आर्यन फॅन क्लब आहेच आमच्याकडे
इथे वाचा..
https://www.maayboli.com/node/85467
आताच "मदहोशी" बघितला.
आताच "मदहोशी" बघितला. बिपाशा बसू जॉन अब्राहम आणि प्रियांशु चटर्जी. मानसिक संतुलन हरवलेल्या तरुणीची कथा आहे. प्रियांशु चटर्जी आणि दिग्दर्शक तन्वीर खान माझ्यासाठी अनोळखी. स्टोरी पण तन्वीर खानने च लिहिलेली आहे. सायको थ्रिलर, आहे. स्टोरीलाईन चांगल्या प्रकारे हाताळली आहे, ज्याना असे विषय आवडतात त्यांनी अवश्य बघावा. स्मिता जयकर ची आईची भूमिका आहे. खूप दिवसांनी दिसली. स्टोरी नाही लिहिणार कारण मग...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100053522222661/posts/pfbid02NC9bhjxJQAfan6AWQt...
संतोष चित्रपट ओटीटीवर येतो आहे.
Lionsgateplay या ओटीटीचं नावही ऐकलं नव्हतं
'लायन्सगेट स्टुडिओज' कनेडिअन
'लायन्सगेट स्टुडिओज' कनेडिअन स्टुडिओ आहे. अजुनही ओनरशिप कनेडिअन आहे का कल्पना नाही.
हे चटकन आठवले. या सगळ्यांचे ३-४ भाग आलेले आहेत. सॉ चे तर असंख्य.
जॉन विक, हंगरगेम्स, क्युब .... आणि आपला एपिक... सॉ ..
इथे वाचून धडक-२ पाहिला.
इथे वाचून धडक-२ पाहिला. 'आवडला' असं कसं म्हणू? डोक्यात रेंगाळणारा सिनेमा आहे. विषय नुसत्या शब्दिक सहानुभूतीपलिकडचा आहे. समजावून घ्यायचा आहे, अॅक्सेप्ट करायचा आहे. एक कलाकृती म्हणून छानच जमलाय. कथानक, पात्ररचना, अभिनय, दिग्दर्शन - सगळंच छान जमलंय.
हो मलाही चांगला वाटला धडक २.
हो मलाही चांगला वाटला धडक २. इन्टेन्स सिनेमा आहे. प्रेमकथेपेक्षा समाजातली दरी, जातीयवादाची दाहकता हा मूळ विषय वाटला. अॅक्टर्स सगळे चांगले आहेत. विशेषतः सिद्धार्थ चतुर्वेदीचे काम फार आवडले. बॉडी लॅन्ग्वेज वगैरे फार पर्फेक्ट दाखवली आहे.
कथन थोडे एकतर्फीही वाटते, म्हणजे सेकंड हाफ मधे जरा असंही वाटायला लागलं की अरे इतक्या सगळ्याच अट्रोसिटीज याच्या वाट्याला येतात, इतके जास्त प्रत्यक्षात होत असेल का वगैरे. पण माझा परीघ भारतात रहात होते तेव्हाही फार लहान होता , आताही आहे. आणि ज्या बातम्या ऐकू येत असतात त्यावरून असे /इतके नसेलच असेही म्हणायचे साहस नाही.
धडक-२ मध्ये प्रेमकथेवर जोर
धडक-२ मध्ये प्रेमकथेवर जोर दिलेला नाही. त्यामुळे अन्यायाला कारण प्रेम आहे ह्या प्रमेयावर पुढची मांडणी होत नाही. सैराट ही प्रेमकथा आहे (धडक-१ चे नावही घेववत नाही). तिथे प्रेम केले म्हणुन पुढचे भोग वाट्याला आले अशा पलायनवादाचा आसरा घेता येतो.
धडक-२ मध्ये हिरो पहिल्यापासुनच तो कोण हे लपवायचा प्रयत्न करतो आणि समाज प्रत्येक वेळेस तो कोण आहे हे आधी विचारुन त्याला कसे वागवायचे हे ठरवतो. कॉलेजमध्ये आडनाव विचारतात. जे सांगितले तर इतर मुले हसणार हे त्याला ठाम माहित आहे. कुठे राहतो ह्या प्रश्नावर तो मोठ्या एरियाचे नाव सांगुन सुटका करुन घेऊ पाहतो, तर त्या मोठ्या एरियात कुठे हा प्रश्न पुढे येतोच. नेमका एरिया सांगताच त्याने विकत घेऊन दिलेला चहा गुपचुप बाजुला ठेवला जातो जे त्याला कळतेच.
धडक-२ मध्ये समाजात नव्याने आलेल्या व्यक्तीला कुठल्याही सर्कलमध्ये आधी नाव गाव जात विचारुन प्रवेश दिला जातो हे फार ठळकपणे दाखवलेय. तो जातीवरुन ज्या सर्कलचा भाग आहे तिथेच त्याने राहायला हवे, त्याबाहेर पडुन इतरांच्यात मिक्स व्हायची धडपड करु नये. तसे केले तर मार खाणार. सुरवातीला ह्यात पडायचे नाही असे निलेशला वाटते पण गावातुन जातीवरुन होत असलेल्या छळाला घाबरुन्/कंटाळुन पळुन जिथे आलो त्या शहरातही तेच वास्तव आहे हे समजल्यावर इथुन कुठे पळणार असा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो आणि लढल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला कळुन तो लढतो. तो त्यात विजयी होतो हे दाखवले हे खुप चांगले केले. हा अस्तित्वाचा लढा आज लाखो लढत असतील. आपणही विजयी होऊ ही आशा हा चित्रपट पाहुन वाटेल.
सोबत विधीचाही लढा आहेच. ती उच्चवर्णिय असली तरी स्त्री म्हणुन तिला लढावे लागतेयच. स्त्री आहेस त्यामुळे जेवढे शिकलीस तेवढे पुरे, मोठ्यांसमोर बोलु नकोस वगैरे ऐकुन घ्यावे लागतेच. त्या विरुद्ध लढुन स्वतःचे स्वातंत्र्य मिळवावे लागते.
निलेशच्या बाबानेही खुप काही सोसुनच जे आवडतेय ते करायचे स्वातंत्र्य मिळवलेय. एकुण काय, समाजात तुम्हाला हवे ते मिळवायचेय तर त्यासाठी संघर्ष चुकलेला नाही
तो केला तरच पुढे मोकळा रस्ता सापडेल ह्या आशेवर चित्रपट संपतो. विधी व निलेश निर्धास्त, कुठल्याही हेटाळणीयुक्त नजरांशिवाय बसमधुन प्रवास करु शकतात ह्या आशावादी नोटवर चित्रपट संपतो. हा बदल समाजात होत असेलही. सगळेच कुठे आपल्या नजरेसमोर घडतेय.
चित्रपट पाहायला सुरवात केल्यावर वाटले प्रेमकथा आहे, पुढे काय वळण घेणार ह्याचा चाणाक्ष प्रेक्षकाचा अंदाज आला
लगेच नेटवर सुखांत आहे का याचा अंदाज घेतला. दु:खांत असता तर पुढे बघितला नसता. सुदैवाने प्रेमकथा आहे हा चाणाक्ष प्रेक्षकी अंदाज चुकला 
मैत्रेयी, आपण ज्या समाजात वावरलो/तोय तिथे आपली ओळख आधीपासुन आपल्या आईवडलांमुळे, आजुबाजुच्या प्रभावळीमुळे होती/आहे. त्यामुळे तु कोण ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रसंग कधी आला नाही, जिथे आला तिथे मिळालेले उत्तर समोरच्याला चालणारे होते. मी भीमनगरात राहते हे उत्तर दिले तर समोरच्याची वागणुक बदलु शकते
भीमनगरात राहणारी व्यक्ती बाहेर पडुन इतरत्र गेली तर तिला पावलोपावली उघड किंवा सुक्ष्म अट्रॉसिटीचा सामना करावा लागणार. भारतात आजही हे होते. युरोप/अमेरिकेत काळा माणुस पाहिला की गोर्याच्या वागणुकीत बदल पडत असणारच. तो दुसर्या गोर्याला कळणार नाही पण काळ्याला लगेच कळणार.
भारतात समोरचा कोण ही चाचपणी सतत होत असते याचे एक उदाहरण आठवले. इथे गावात माझे मित्र कुटुंब आहे सिन्हा म्हणुन. तर अशाच गप्पा मारत असताना वर्षु सिन्हाने एक किस्सा सांगितला. तिला गोव्यातल्या उच्चभ्रु कुटुंबातल्या एका समारंभाचे आमंत्रण होते. ते कुटुंब यांना थेट ओळखत नव्हते पण व्यावसायिक कारणाने आमंत्रण होते. वर्षुच्या अवतारावरुन ती खुप उच्चभ्रु वगैरे वाटते. तिथे गेल्यावर वर्षु जेव्हा तिथल्या होस्टेसला भेटली तेव्हा तिने तु कोण हा प्रश्न खोदरुन खोदरुन विचारला. आडनाव सिन्हा आणि बोलते शुद्ध मराठीत. तु कोण हा प्रश्न विचारत विचारत शेवटी जेव्हा वर्षुचे आजी आजोबा ब्राम्हण हे त्या होस्टेसला कळले तेव्हा ती रिलॅक्स होऊन म्हणाली, म्हणजे तु आपल्यातलीच गं… तेव्हा वर्षुला कळले प्रश्नांचा रोख कशावर होता. तिन दिवसांचा समारंभ होता पण तिने होस्टला खोटे कारण सांगुन दुसर्याच दिवशी तिथुन पलटी मारली.
परिचय आवडला साधना. मी तासभर
परिचय आवडला साधना. मी तासभर पाहिला धडक २, तेवढा भाग मलाही आवडला.
साधना परफेक्ट लिहीलंय.
साधना परफेक्ट लिहीलंय. सैराटच्या तुलनेत काय कमी पडलंय ते ही नेमकं लिहीलंय.
Submitted by साधना on 10
Submitted by साधना on 10 October, 2025 - 07:46 >>> साधना उत्तम पोस्ट, जर वर्णव्यवस्थेच्याच परिघात बोलायचं झालं, तर आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे.
साधनाताई, धडक-२ वरची पोस्ट
साधनाताई, धडक-२ वरची पोस्ट छान आहे.
"आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे." +१. ह्यातला सुजाणपणा हा एकंदरीतच संपूर्ण समाजाला वाढवायला हवा असं मला वाटतं.
धडक२ बराच आवडला. मुलाने छान
धडक२ बराच आवडला. मुलाने छान काम केलंय. काहीकाही सीन्स फार चांगले जमलेत.
बर्याच दिवसात मी-अनु नाही दिसली.
निम्नवर्णियांनी
निम्नवर्णियांनी सुशिक्षितपणाचा अनूशेष भरून काढला, तरी त्यांना समानतेची, सन्मानाची वागणूक मिळेल याची खात्री काय?
आताच हरयाणातल्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने जातीवरून हिणवले जाते , असे सांगून आत्महत्या केली.
कोणी उच्चशिक्षण घेतले तर ते आरक्षणामुळे . खरे मेरिटधारी आम्हीच, असं म्हटलं जातं.
अवांतर आहे, पण त्या वाक्याला आणखी अनुमोदने मिळत राहतील, म्हणून लिहिले.
+७८६
+७८६
पण म्हणूनच फेरफटका यांनी ते उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा असेही लिहिले आहे.
चर्चा चांगली आहे. पण
चर्चा चांगली आहे. पण चित्रपटाच्या निमित्ताने चालू असलेली ही चर्चा स्वतंत्र धाग्यावर असावी असं वाटतं. शोधायला पण सोपं.
आजही उच्चवर्णीयांना
आजही उच्चवर्णीयांना सुजाणपणाचा आणि निम्ह्नवर्णियांना सुशिक्षितपणाचा अनुशेष मुख्यत्वाने भरून काढणे खूप निकडीचे आहे.>>>>>
सुजाणपणाचा व सुशिक्षित्पणाचा अनुशेष उच्च व निम्न दोन्ही वर्गात भरपुर आहे. त्यातला शिक्षितपणाचा अनुशेष भरुन काढता येईलही. पण त्यामागे ’सु’ लागेलच याची अजिबात खात्री देता येणार नाही.
पुर्ण सुजाणपणाचा मानवी प्राण्यात मुळातच अभाव आहे. काहीजण काही बाबतीत सुजाणपणा दाखवतात त्याचवेळी काही बाबतीत ते तितके लिबरल नसतात याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सुजाणपणाचा अनुशेष भरुन काढणे कठिण आहे.
जगात काय सुरु आहे याबद्दल साधारण ३०-३५ वर्षांपुर्वीपर्यंत माझ्याकडे खुपच मर्यादित माहिती होती. पेपरात जितके महत्वाचे तितकेच छापुन येई, तितकीच जगाची ओळख होती. हळुहळू इंटरनेटच्या माध्यमातुन जगाची ओळख होत गेली. बाहेरच्या जगाचे फर्स्ट हँड अनुभव वाचायला मिळू लागले. परदेशी बातम्या थेट वाचायला मिळायला लागल्या. आधी फक्त मोजकेच चित्रपट भारतात यायचे आणि माझ्यासाठी ते बघणे म्हणजे मुद्दाम तासाचा प्रवास करुन जाणे त्यामुळे ते पाहिले जात नव्हते. आता सरसकट सगळे घरबसल्या महिन्याची थोडी फी भरुन फुकट पाहता येतात. या वाढलेल्या परिघामुळे बाहेरची थोडीफार ओळख झाली. आणि कळले की उच्चनिचतेच्या कल्पना तिथेही आहेत. गुलामगिरी प्रथा कायद्याने नष्ट केली हा इतिहास शिकले होते त्यामुळे काळ्यांना आजही डिस्क्रिमिनेट करतात हे पहिल्यांदा कळले तेव्हा धक्का बसला. युरोप/अमेरिकेत हे होते हे कळले ते तिथल्या जगाशी लिमिटेड सेकंड हँड परिचय तिथल्या साहित्यातुन्/चित्रपटातुन झाला तेव्हा. ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर २०२४ मध्ये घडावे याचा खेद व आश्चर्य दोन्ही एका वेळेसच वाटले.
भारतात जातीव्यवस्था आहे आणि ही जन्मापासुन चिकटते याचा दोष धर्माला व ती व्यवस्था राबवणार्या एका जातीला दिला जातो. काळ्या वर्णाला गोर्यापेक्षा कमी लेखणे याचा दोष कोणाला देणार? चीन, जपान, कोरीया इत्यादी आशियायी देशात कुठल्या प्रकारचे डिस्क्रिमिनेशन होते याची मला माहिती नाही कारण त्या जगाशी माझा अद्याप परिचय नाही. पॅरॅसाईट हा एक कोरियन चित्रपट पाहिलाय जो तिथल्या समाजातल्या आर्थिक दरीबद्दल बोलतोच पण हातात पैसे असलेल्या लोकांच्या मनात असलेल्या निर्धनांबद्दलच्या तिरस्काराचे दर्शनही घडवतो. तिथे कदाचित जात्/वर्णावर आधारीत डिस्क्रिमिनेशन नसेल, आर्थिक डिस्क्रिमिनेशन असेल. मला तिकडच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही पण जेव्हा होईल तेव्हा तिथले डिस्क्रिमिनेशनही कळेल. तिथे कसलेही डिस्क्रिमिनेशन नसेल असे निदान आजतरी वाटत नाही.
कारण कळप करुन राहणे ही मानवी वृत्ती आहे आणि दुसर्याला काहीतरी कारण काढुन आपल्या कळपात न घेणे हा स्वभाव आहे.
भारतात जातीवरुन उच्चनिच लेखतात तसेच दिसण्यावरुनही उच्चनिच लेखतात. इशान्य राज्यातल्या लोकांना इतर भारतीय वेगळ्या प्रकारचा त्रास देतात.
काल प्रायमल फिअर नेफ्लिवर
काल प्रायमल फिअर नेफ्लिवर पाहिला. २४ ऑक्टोबरला नेफ्लिवरुन जातोय. आवडला. पाहायला सुरवात केली तेव्हा अजय-उर्मिला -अक्शयचा असाच चित्रपट पाहिलाय हे लक्षात आले. चित्रपट छान पकड घेतो. अॅरोन झालेल्या नटाने खुपच
छान काम केलेय.
नवानवा नेटफ्लिक्सचा ‘ The
नवानवा नेटफ्लिक्सचा ‘ The Woman in Cabin 10’ मर्डर मिस्ट्री आहे आणि टाईमपास आहे. रहस्य चांगले आहे.
चित्रपट पाहून आलेला
चित्रपट पाहून आलेला समजूतदारपणा एस सी एस टी आरक्षणाचा, आपल्या मुलांच्या कॉलेज प्रवेशाचा प्रश्न आला की टिकणार आहे का?
एखाद्याला सन्मानाने वागवायला त्याची जात, आर्थिक स्तर, त्याचा व्यवसाय, शिक्षण या गोष्टींचा विचार करायची गरज भासू नये.
हे जातीचं झालं. शिक्षण हक्क कायद्याने गरीब वर्गातल्या मुलांना सगळ्या शाळांत काहीएक आरक्षण आहे. त्या मुलांबद्दल बाकीच्या मुलांच्या पालकांचे विचार काय असतात? गावांत अजूनही जातींवर आधारीत अनेक प्रथा उघडपणे पाळल्या जातत. त्या नुसत्या पाहतानाच नव्हे, तर त्यांबद्दल लिहितानाही आपल्याला वावगं वाटतं का?
अवांतर समाप्त.
चिकवावर गॉसिप, नटनट्यांच्या दिसण्याची, व्यसनांची चर्चा चालते तसंच एवढं अवांतर चालवून घेतल्याबद्दल आभार.
राजकारणाला ना नाही.
राजकारणाला ना नाही.
काल सन ऑफ सरदार २ पाहिला.
काल सन ऑफ सरदार २ पाहिला.
पहिला अर्धा पाऊण तास परवा पाहिला होता. ते फारच वाईट प्रकरण होते. झोपेची तयारी करता करता म्हणून चालू होते. जेवढे या चित्रपटाबद्दल वाईट ऐकले होते अगदी तसाच होता.
काल रात्री पुन्हा झोपेची तयारी करता करता अजून पंधरावीस मिनिटे बघूया म्हटले आणि पुढे बरा वाटला आणि शेवटी एका सीनला डोळ्यातून चक्क पाणी वगैरे आले.
हाऊसफुल चित्रपटाचे वाईब येतात पण यात कॉमेडी ऐवजी मला इमोशनल सीन जास्त बरे वाटले. भारत पाकिस्तान अँगल मात्र काही ठिकाणी मजेशीर वाटला.
चित्रपट परदेशात घडतो. अजय देवगनची बायको त्याला घटस्फोट देते आणि नवीन बॉयफ्रेंड पकडते.
मृणाल ठाकूरचा नवरा चंकी पांडे तिला सोडून एका रशियन पोरीसोबत पळून जातो.
ते पाकिस्तानी दाखवले आहेत आणि त्यांची मुलगी एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडते. त्यामुळे मृणाल ठाकूर अजय देवगनला आपला नवरा आणि त्या मुलीचा बाप बनवते. एवढ्यावरच न थांबता तो आर्मीत आहे हे सांगते.
पण प्रत्यक्षात मृणाल आणि तिची फॅमिली नाचगाने करणारे असतात.
त्यांच्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या वडिलाना म्हणजे रवी किशनला नाच गाण्याचा तिटकारा असतो. कारण त्याच्याही बापाने एका ब्रिटिश पोलडान्सरवर प्रेम करून तिच्याशी लग्न केले असते. आणि हो सर्वात महत्वाचे, त्याला खोटे बोललेले बिलकुल आवडत नसते.
अजूनही बराच गुंता आहे. अजूनही काही विवाहबाह्य संबंध आहेत जे शेवटी उघड होतात. बास्टर्ड ऑफ बॉलीवूड प्रकरण आहे सगळे. पण तरी कोणाला बघायचा असल्यास सस्पेन्स फोडत नाही.
सुरुवातीचा अर्धा पाऊण तास बघून आणखी कोणी सोडला असेल तर फावल्या वेळात पूर्ण करायला हरकत नाही. जिथून सोडला तिथून पुढे चांगला वाटण्याची शक्यता आहे.
काल थिएट्रात, रुफमॅन पाहीला.
काल थिएट्रात, रुफमॅन पाहीला. फारच आवडला. खूपच मस्त स्टोरी आहे. आणि मुख्य म्हणजे खर्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेली कथा आहे. तो माणूस शेवटी दाखवतात. फारच आवडला.
वानवा नेटफ्लिक्सचा ‘ The
वानवा नेटफ्लिक्सचा ‘ The Woman in Cabin 10’ मर्डर मिस्ट्री आहे आणि टाईमपास आहे. रहस्य चांगले आहे>>>>>>
छान आहे. आवडला.
साधना, छान.
साधना, छान.
रुफमॅन पहायचा आहे.
काल जॉली ललब ३ पाहिला. ठीक

Pages