चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मला वाटतं किरण गुरवांच्या 'राखीव सावल्यांचा खेळ' या कथासंग्रहात शेवटी शेवटी एक कथा अशी आहे की बुडणाऱ्या धाकट्या भावाला वाचवताना थोरला, कर्तबगार, सगळ्यांचा आवडता, विवाहित भाऊ मरतो. ती कथाही केवळ एका दिवसाची आहे, त्या भावाच्या बाराव्या/तेराव्याच्या दिवशीची. विविध लोकांचे विविध भाव. चांगली आहे कथा अर्थातच. <<

इंट्रेस्टिंग! गुरवांना मी येत्या जानेवारीत भेटणार आहे! बरं झालं हे सांगितलं.

>> @रॉय, बाय एनी चान्स तुम्ही बदामीच्या बनशंकरीबद्दल बोलताय का? <<

नाही बदामीच्या बनशंकरीच्या आसपास बनच नाही. सगळी शेती आहे. निदान नावापुरते तरी बन असायला हवे होते.

हे आमच्या बनाळी गावाजवळच्या बनशंकरीबद्दल बोलतोय. जिथे प्रचंड दुष्काळात सुद्धा लोकांनी एक वन जपून ठेवले आहे.
https://jungle-roads.blogspot.com/2008/01/banali.html

Happy वावे, इंटरेस्टिंग पोस्ट. खूपच साधर्म्य आहे. या सिनेमावर बेतलेला एक कौटुंबिक मराठी पिक्चर सहज होईल इतके ते वातावरण परिचयाचे वाटले होतेच.

अनया- हे खूप वर्षांपासूनचे निरीक्षण आहे, या निमित्ताने लिहून टाकले.

कुटुंबातला मोठा मुलगा एका मुलाला बुडताना वाचवत असताना स्वतःच बुडून मेलेला असतो. >>> याच्यावर एक सिरीज पण होती का? मी पहिला एपिसोड पाहिला होता पण खूप संथ वाटली म्हणून सोडून दिली. मालिकेत ती सून तेवढी एशियन आहे, बाकी मुलाची फॅमिली कॉकेशिअन दाखवली होती.

कल्पना नाही माधव. पण वर चर्चेत 'असुरा' चा उल्लेख वाचला.
-----

हे मेरिल स्ट्रिपचे गोल्डन ग्लोबचे क्लिप बघा. मला फार आवडलेय. About Hollywood, about Art , about people, about outsiders! डायव्हर्सिटी का आवश्यक आहे, कलेसाठी! कुठल्याही क्षेत्रात एकाच प्रकारच्या लोकांचे वर्चस्व वाढले की समाजाची सुद्धा वाढ खुंटते.
https://www.instagram.com/reel/DNdYzHHhyC8/?igsh=YzAyMDM1MGJkZA==

माधव - द निगोशिएटरवरची पोस्ट परवा वाचली होती पण लिहायचे राहिले. छान लिहीले आहे आणि पिक्चर जबरी आहे. पुन्हा बघायला हवा.

मुळात पोलिस निगोशिएटरच लोकांना हॉस्टेज ठेवतो ही कल्पनाच भारी आहे. तोच निगोशिएटरही असल्याने त्याच्याशी बोलायला आलेल्याचे पवित्रे त्याला ऑलरेडी माहीत असतात. त्याबद्दल त्या दोघांचे काही संवादही आहेत बहुतेक. बरीच वर्षे झाली पाहून.

या दोघांव्यतिरिक्त नंतर पुढे जास्त माहीत झालेले काही तगडे कलाकार यात आहेत. नंतर वेस्ट विंग मधे तुफान फेमस झालेला जॉन स्पेन्सर, ब्रेबॅ मधला हँक- डीन नॉरिस, आणि अनेक पिक्चर्स व सिरीज मधे दिसणारा पॉल जियामाटी.

मी पूर्वी सिरीजपेक्षा पिक्चर्स जात पाहात असल्याने नंतर मला आवडलेल्या अनेक टीव्ही कॅरेक्टर्स चे कलाकार मी आधी पिक्चर्स मधे पाहिले आहेत. यातला जॉन स्पेन्सर हे एक उदाहरण. मॅथ्यू पेरीला मी चॅण्डलर म्हणून ओळखायच्या आधी त्याचा "होल नाइन यार्ड्स" हा धमाल पिक्चर पाहिला. लिझा कुड्रो ("फीबी") ला रॉबर्ट डि नीरो आणि बिली क्रिस्टलच्या "अ‍ॅनॅलाइज धिस" मधे आधी पाहिले. जेनिफर अ‍ॅनिस्टनला "ऑफिस स्पेस" मधे. डीन नॉरिस मात्र यातला लक्षात नव्हता. त्याला ब्रेबॅ मधे पाहताना याला आधी कोठेतरी पाहिला आहे असे सारखे वाटायचे. त्याने कदाचित असे छोटे मोठे रोल्स आधी केले असावेत. बाय द वे इथे लिहीलेले तिन्ही पिक्चर्स फुल रेको आहेत.

मुंबई का डॉन कौन
>> किंग

खांडिलकर को कल्टी दिया
अमोद शुक्ला गया
गुरू नारायण तू भी ऊपर
इधर भाऊ को इलेक्शन जिताया कौन, भीकू म्हात्रे
मुंबई का किंग कौन, भीकू म्हात्रे...!!!

भरवशाच्या म्हशीला टोणगा या नावाच्या छीनेमाचा हिंदीतला रीमेक.
अमिताभ बच्चन , रेखा ,अमजद खान, फरिदा जलाल, प्राण अशी तगडी स्टारकास्ट.

यातल्या या एका गाण्यावरूनच ज्यांनी पाहिला नाही त्यांनी काय मिस केलं याचा अंदाज येईल.
संपूर्ण मास्टरपीस इथे आहे.

आत्ता वेळ नाही म्हणून शिवशिवणारे हात आवरले.

विकु, धन्यवाद आठवण काढल्याबद्दल. दोन तीन कथा लिहीण्याचे काम चालू असल्याने सध्या जमत नाही.
माधव, नक्की बघणार. तुम्ही दिलेले आधीचे रेको पण मस्तच होते. सॉरी इथे पाहिल्यावर कळवायचं राहून गेलं.

वर जे श्रीमंती वगैरेचे उल्लेख आले आहेत ती माहिती अनेकदा उगीचच वाद उकरून काढण्यासाठी पुरवली जाते कि काय असं वाटतं ! ( प्रत्येकाला आपलं मत असतं पण एकालाच मत असतं असं नाही Happy ) अशा आगंतुक मुद्द्यांना उत्तर न देण्याची हजार कारणे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचा अभाव. एकदा उत्तर दिलं कि मग प्रतिउत्तर आणि पुन्हा तेच. त्यामुळं न दिलेलं परवडतं Happy
आता एकदा यावरचं मत ( ) मांडून मोकळी होते.

व्हिडीओ पायरसी - कधी सुरूवात झाली हे कळत नाही. पण व्हिडीओ पायरसी मुळे अनेक चांगल्या चित्रपटांना फटका बसला. जे चालले ते सुद्धा कमी धंदा करू शकले. यावर मात करण्यासाठी मल्टीस्टारर सिनेम्यांची लाट आली. यामागचं गणित असं होतं. जेव्हढे जास्त हिरो तेव्हढे त्यांचे फॅन्स एकत्र सिनेमे बघण्याची शक्यता वाढणार. पायरसी मुळे या काळात कथा वगैरेंवर मेहनत घेण्याचे प्रमाण कमी झाले. गाण्यांवरही मेहनत घेतली जात नसे. कारण कॅसेट्स भरून देण्याची लाट होती. त्यामुळं हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दु:स्वप्नं होता.

गुलशनकुमार यांनी स्वस्तात कॅसेट्स बनवून जास्तीत जास्त कॅसेटस खपवण्याची नवीन स्ट्रॅटर्जी आखली. त्याला यश आल्याने टी सिरीजने या काळात म्युझिक इंडस्टॄवर वर्चस्व गाजवले. यामुळं सिनेमाचं संगीत खपू लागलं. निर्मात्याला संगीताच्या रॉयल्टीचे पैसे मिळत असल्याने त्याचं नुकसान भरून निघायला लागलं. तरी पण ब्लॉकबस्टर सिनेमे बनत नव्हते.

या काळात आमीर खान, सलमान खान, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, ऋषी कपूर , सनी देओल अशा सर्वच नटांना फटका बसत होता. तरीही जो जीता वही सिकंदर सारख्या सिनेमांना यश मिळत होतं. आता टी सिरीजने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. म्हणजे संगीताचे हक्क आणि निर्मिती दोन्ही त्यांचे. आशिकी सुपरहीट झाल्यावर मग मेलडीचा काळ अवतरला. मेलडी वर सिनेमे चालू लागले.

पण हम आपके है कौन मुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्याकडे खेचून आणण्यासाठी भव्य स्केल वर सगळं आलं पाहीजे असा समज दृढ होत गेला. हम आपके है कौन व्हिडीओ वर पाहूनही लोकांनी तो मोठ्या पडद्यावर पाहीला. कारण तो छोट्या पडद्यावर तितकं समाधान देत नव्हता. परदेशी चित्रपटातही ज्युरासिक पार्क सारखे फक्त मोठ्या पडद्यावर पाहण्याचे सिनेमे येऊ लागले.

या सिनेमांचं गणित खूप खर्चाचं असल्याने मल्टीप्लेक्सचा पर्याय होता. महाराष्ट्रात छगन भुजबळ यांनी मल्टीप्लेक्स उभारल्यास पाच वर्षे करमणूक कर माफ अशी घोषणा केली. आणि कर्जापासून अनेक सुविधा दिल्या. यामुळं मल्टीप्लेक्स भराभर वाढू लागले. दहा पंधरा रूपये वाले एकपडदा हॉल कसे बसे चालू लागले. मल्टीप्लेक्सचं तिकीट त्या वेळीही महागडं असल्याने इथे उच्च मध्यमवर्गीय (सुखवस्तू) प्रेक्षक येणार हे गृहीत धरून फक्त त्याच प्रेक्षकासाठी, एन आर आय प्रेक्षकासाठी सिनेमे बनू लागले.

मल्टीप्लेक्स मुळे पूर्वीचे विषय हद्दपार झाले असं म्हणणं function at() { [native code] }इशयोक्ती होणार नाही.

(माहितीचे संकलन अनेक सोर्सेस कडून केलेले आहे. यात माझ्या सिनेमावेड्या काकाचे योगदान जास्त आहे. )

लोकांची डिमांड ही खूप भ्रामक टर्म आहे.

लोक काहीही डिमांड करत नसतात. त्या त्या वेळी निर्माता दिग्दर्शक अदमास घेऊन ठरवतात. चालला तरी ती लोकांची आवड आहे असा नियम बनवता येत नाही. आणि नाही चालल तरी लोकांना आवडलं नाही असा शिक्का मारता येत नाही. निर्माते दिग्दर्शक काही घरोघरी जाऊन असा सिनेमा बनवू का, तुमची आवड काय असा सर्व्हे करत नाही. हे सगळं अनमानधपक्याने चालतं. इतर अनेक व्यवसायांप्रमाणे अंदाज चुकतात.

लोकांना श्रीमंती आवडते हे असंच एक ब्लँकेट स्टेटमेण्ट आहे. कुठे तरी ऐकलेलं किंवा वाचलेलं. ते चिकटवून द्यायचं.
ज्यावेळी मुघल ए आजम आला होता त्या वेळी या विषयावरचा सिनेमा चालेल अशी काही लाट नव्हती. पण तो आल्यावर तशी लाट आली. त्याला ऐतिहासिक सिनेमे असे नाव होते. ज्याचा इतिहासाशी फारच थोडा संबंध होता. त्या वेळी गुरूदत्तचा प्यासा आला. डिस्ट्रीब्युटर्स तो विकत घेईनात. शेवटी गुरूदत्तने जुगाड करून रिलीज केला आणि इतिहास घडला.

यानंतर अशा संवेदनशील सिनेमांचीही लाट आली.
लगान सारख्या क्रिकेटवरचा सिनेमा चालेल याची कुणालाही खात्री नव्हती. त्या आधी आलेले सगळे क्रिकेटवरचे सिनेमे आपटलेच होते. संदीप पाटील नायक असलेला कभी अजनबी थे डिजास्टर. आमीर खानचा अव्वल नंबर डिझास्टर. देव आनंदचा ऑल राऊंडर डिझास्टर.
तरी आमीर खानने रिस्क घेतली. सुरूवातीला चार आठवडे सिनेमा फ्लॉप होता. पण नंतर वर्ड टू माऊथ पब्लिसिटीने तो तुफान चालला. इतका किक्ल्ट सिनेमा बनला.

आता पंचवीस आठवडे, पन्नास आठवडे इतिहासजमा झाल्याने सुरूवातीला पडलेला पण नंतर माऊथ पब्लिसिटीने चाललेला ही कॅटेगरी इतिहासजमा झाली आहे. आता पहिल्या आठवड्यात सिनेमा कसा आहे हे समजायच्या आत कमावून घेण्याचा ट्रेण्ड आहे. यातले कित्येक सिनेमे पीअर प्रेशरने चालतात.

भन्साळीच्या अलिकडच्या सिनेमात काहीही दम नसतो. तो चालतो मार्केटिंगवर.
तो चालला म्हणून लोकांना हेच आवडतं असं स्टेटमेण्ट खरं नसतं.

नेटफ्लिक्सवर Liam Neeson चा नवा Ice Road: Vengeance मला तरी आवडला बुवा.. त्याचे थ्रिलर्स साधे पण चांगले बनवतात म्हणुन आवडतात. ती मुख्य मुलगी आहे जी नेपाळी दाखवली आहे ती आवडली म्हणुन शोधली तर प्रसिद्ध चायनीज नटी आहे.

तो "मेरी जंग" पिक्चर मधला सीन सिडने शेल्डन च्या एका कादंबरी तुन उचललेला आहे. नाव आठवत नाही पण त्याच्या काही कादंबऱ्यांमध्ये एक नेपोलियन चोटाज म्हणुन हुशार वकिलाचे पात्र आहे. तो एकदा त्याच्या एका क्लायंट ला वाचवायला दुसरा काहीच उपाय नसल्याने असे कोर्टात विष पितो (ते पिल्यानंतर माणुस मरत नाही हे सिद्ध करायला). जज ने निकाल दिल्यानंतर तो प्रेस ला शांत पणे उत्तरे देऊन आधी व्यवस्था करुन ठेवलेल्या एका रिकाम्या रेस्टरुम मध्ये जाऊन तो स्वतः वर उपचार करवुन घेतो.

तो किती निष्णात आणि थंड डोक्याने काम करणारा वकील आहे हे सांगण्यासाठी तो प्रसंग आहे. अमेरिकन कोर्ट ज्या पद्धतीने काम करतात ते सगळे तपशील वापरुन. आपल्या कडच्या सिस्टिम मध्ये तो एकदमच अतर्क्य वाटतो.

लोकांची डिमांड ही खूप भ्रामक टर्म आहे.>>>>>

सहमत. लोकांना पडद्यावर छान पैकी सांगितलेली कथा आवडते. मग ती कुठलीही असो. एकाच वेळी प्रेमकथा आणि युद्धकथा असे दोन विरुद्ध चित्रपट यशस्वी झालेले दिसतात

जे निर्माते/दिग्दर्शक सातत्याने यश कमवत होते, म्हणजे यश चोप्रासारखे, ते एखादी साधी गोष्ट पडद्यावर रंजकतेने कशी सांगावी यात कसबी होते. त्यामुळे प्रेमकथा ह्या एका विषयावर अनेक चित्रपट काढुनही ते लोकप्रिय झाले, नाहीतर प्रेमकथेत काय नाविन्य असते? त्याच प्रॉडक्शन हाऊसची पुढची पिढी हे स्किल नसेल तर फेल जाते. सक्सेसचा फॉर्मुला असता तर पिढ्यानपिढ्या तो हस्तांतरीत नसता का करता आला असता?

लोकांना अमुक बघायला आवडते आणि तमुक हेही तसेच, काहीही आगापिछा नसलेले. नुसती श्रीमंती मांडली आणि कथा शुन्य असे कित्येक चित्रपट येऊन फ्लॉप झालेत.

साधना होय. छान मांडलेस. ही इंडस्ट्रीच बेभरवशाची आहे त्यामुळे मग ज्योतिष, अंगठ्या, बाबा वगैरेंकडे या इंडस्ट्रीतिल लोकांचा कल आहे - ऐकिव माहीती. म्हणजे पैसा व प्रसिद्धी तर हवीये पण खात्रीशीर हवी. जे की मिळणं कधीच शक्य नाही. आयुष्यात कशाचीच गॅरंटी नसते.

सक्सेसचा फॉर्मुला असता तर पिढ्यानपिढ्या तो हस्तांतरीत नसता का करता आला असता? >> सौ बातों की एक बात !
खूपच छान.

आज माबोला सुटी आहे का ?

स्वयंवर नावाचा चांदोबा पिक्चर काल पाहिला. बघताना मायबोलीवर कुणी कुणी पाहिला असेल हा प्रश्न डोक्यात आलाच.
चांदोबा नावाचं मुलांचं मासिक होतं त्याच्या मालकाने बनवलेल्या सिनेमात कुटुंब, पती पत्नी संबंध असा मेसेज असायचा पण कॉमेडी अंगाने असायचा. त्यातल्या त्या काळच्या व्हॅल्युज डोक्यात जाणार्‍या असतात. काळाच्या फ्रेम मधे बघायचा असं ठरवूनही.
यांच्या पिक्चर मधे संजीव कुमार परमनंट आहे बहुतेक. स्वर्ग नरक, इतनी सी बात, यही है जिंदगी आणि अजून एक कुठलातरी आहे पण विकीवर नाही नाव.
मौसमी चटर्जी ही फटाकडी मुलगी नंतर पश्चात्ताप होऊन नॉर्मल होणार हे दोन तीन पिक्चरमधे आहे. ती आधी फटाकडी असते ती नॉर्मल होती असं वाटतं.

नादिराचं एक भलं मोटं घर आहे. विद्या सिन्हा ही तिची सावत्र मुलगी एव्हढंच पुरेसं आहे. तरीही उपचार म्हणून नादिरा तिचा छळ करते हे दाखवावं लागतं. हाच फरक आहे आपल्यात आणि सामान्य माणसात. नादिरा म्हणजे काय हे प्रेक्षकांना माहिती असलं तरीही पिक्चरवाले कधीच आळस करत नाहीत.

नादिराचा सावत्र भाऊ मदनपुरी आहे. हा गावभर फिरून नादिराच्या सख्ख्या मुलीला स्थळ शोधत फिरत होतो पण जमत नाही असं सांगतो. कारण म्हणे लोक म्हणतात कि तू तुझ्या नवर्‍याला विष घालून मारलं. इथेच मदनपुरीचे इरादे स्पष्ट होतात. नादिरा सांगते आता तू स्थळ बघू नकोस ,मी पुरोहिताला सांगितले आहे.

पुढच्याच प्रसंगात मदनपुरीच्या घरात त्याची बायको शशिकला नादिराच्या मुलीशी त्यांच्या दिवट्याच्या लग्नाचं काय झालं हा खडा सवाल डोळे फिरवून विचारते. भिंतीवर एका इसमाचा फोटो टांगलेला आहे. तो रणजीत आहे या दृश्याला जमिनीवरच लोळण घेतली. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघून कुठलीही बाई धास्तीच घेईल. हे आदर्श कुटुंब पिक्चर पुढे सरकवण्याची किंवा बाधा आणण्याची जबाबदारी घेतलेलं आहे.

श्रीराम लागू हे नेहमीप्रमाणेच सभ्य आहेत. नादिरा, मदनपुरी, शशिकला, रणजीत यांच्यानंतर त्यांचे दर्शन म्हणजे भूत पाहिल्यावर अचानक देऊळ दिसावे तसेच. पुरोहित त्यांना नादिराच्या मुलीचा फोटो दाखवतो. तीच मौशुमी चटर्जी.

आता श्रीराम लागू नादिराच्या घरी दाखल होऊन सांगतात कि मी तुमच्या पतीकडे साधा नोकर होतो. त्यांनी केलेल्या मदतीमुळे परदेशात जाऊन लाखो म्हणजे आताचे अब्जावधी रूपये कमावले. माझी दोन मुलं आहेत . त्यांच्यासाठी स्थळ बघत असताना तुमच्या मुलीची माहिती मिळाली.
मदनपुरीचा डोळा नादिराच्या संपत्तीवर आहे आणि मौशुमीचं लग्न ठरेल या भीतीने तो लॉजिक सांगतो ते ही लागूंसमोरच. कि जर मुलीचं लग्न यांच्या मुलीशी केलं तर जग म्हणेल की नोकराच्या मुलीशी लग्न केलं तर छी:थू: होईल. हलक्या कानाची नादिरा नकार देते .

श्रीराम लागूंना दोन मुलं. शशी कपूर आणि संजीव कुमार. लागू आपली स्टोरी या दोन लागूबंधूंना सांगत असतात कि अशा थोर महामनावची मुलगी नोकरासारखं राबतेय. दुसरी पण वाईट नाही. आईचा प्रभाव आहे. या दोघींना मला आपल्या घरची बहू बनवायचंय.

तर शशी कपूर त्याच्या नेहमीच्या स्टाईल मधे ( आली ना डोळ्यासमोर ) " डॅडी .... ( डी विलंबित ) , आप कोई चिंता मत करो, हम है ना, सब ठीक कर देंगे.

एखाद्या तरूण मुलाला एखादी मुलगी आवडलीय आणि त्याला ती मिळत नाहीये तेव्हां त्याचा सर्वगुणसंपन्न मित्र जसा धीर देईल तसा शशी बापालाच धीर देत असतो.

पुढे संजीवकुमार नोकर म्हणुन घरात दा़खल होतो तर शशीकपूर त्याच्या मित्राच्या म्हणजे असरानीच्या हॉटेलमधे फाईव्ह स्टार स्युईट मधे राजकुमार असल्याचं नाटक करत मौशुमीला पटवतो.

यांचं नाटक चालूचा राहीलं तर पिक्चर संपणार कसा म्हणून आपण व्हिलनचा धावा करू लागतो. व्हिलन शेवटच्या वीस मिनिटात येतो. पण आल्याबरोबर सगळी कसर भरून काढतो. नायिकेवर वाईट नजर, संपत्तीवर डोळा, इंपेशंट डोंकी, खाकी डोकं असे सगळे गुण लगेच उधळतो. गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूरच्या घरात रणजीतचा एक मोठा फोटो देवघरात ठेवलेला असावा अशी शंका खूप दिवसांची आहे. कधी तरी कपिल शर्मा हा प्रश्न विचारले त्यांना.

तर शेवटी रणजीत कृपेने नाटक संपतं. सगळे गैस दूर होतात. नादिरा वितळते. मौशुमीचं मन परिवर्तन होतं.
पिक्चरमधे पाहण्यासारखं काय आहे ? शशिकला आणि नादिरा यांची मारामारी. हा सीन पाहिल्यानंतर निर्वाणाला पोहोचल्याचा फील येतो.
मोठ्या अपेक्षा न ठेवता पाहिला तर एंगेजिंग आहे. मौशुमी दिसलीय मस्त, नेहमीप्रमाणेच.

या सगळ्यात स्वयंवर कोणाचे झाले??

बाकी नादिरा, तिचा भाऊ मदनपुरी, त्याची बायको शशिकला आणि भिंतीवर रणजीत हे वाचुन सगळे पापग्रह एका कुंडलीत गोळा झाल्यासारखे वाटले. ती कुंडली मौशमीची?

हा स्वयंवर सिनेमा मे किंवा दिवाळीच्या सुटीत मामेबहिणींबरोबर थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता असं आठवतंय. विद्या सिन्हा आणि मौशुमी दोघीही आवडल्या होत्या. गाणीही छान कॅची आहेत ' मुझे छू रही है तेरी गर्म सांसे' तर उत्कृष्टच आहे. अर्थात गाणं पडद्यावर पाहणं त्रासदायक आहे. दोघेही ऑकवर्ड दिसतात आणि जपून जपून अलिंगनं देतात. बाकी सिनेमा काहीही आठवत नव्हता त्यामु़ळे स्टोरीबद्दल धन्यवाद रानभुली.

लागू आपली स्टोरी या दोन लागूबंधूंना सांगत असतात >>>>>. Lol

श्रीराम लागूंना दोन मुलं. शशी कपूर आणि संजीव कुमार. लागू आपली स्टोरी या दोन लागूबंधूंना सांगत असतात
>>>>>> Rofl बाकीचं भारी पण हा सगळ्यांत कहर आहे.

रानभुली, तू ही रत्नं कुठून शोधून आणतेयस?

Btw भिंतीवर रणजीतचा फोटो* ऐकून आधी अंमळ वाईट वाटले की करतब दाखवण्याआधीच रणजित फोटोत जाऊन बसला. पण नुसताच फोटो आहे आणि ठरवलेल्या कारवायांना अंजाम द्यायला तो उपस्थित आहे सिनेमात म्हटल्यावर 'हुश्श!' वाटले. Proud

*म्हणून कालनिर्णयवाले म्हणतात 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' म्हणजे असे व्हिलन लोकांचे फोटो लावायला जागा उरत नाही.

नादिरा म्हणजे काय हे प्रेक्षकांना माहिती असलं तरीही पिक्चरवाले कधीच आळस करत नाहीत.
लागूबंधू
शशिकला आणि नादिरा यांची मारामारी. हा सीन पाहिल्यानंतर निर्वाणाला पोहोचल्याचा फील येतो.
>>> Lol

बाकी नादिरा, शशिकला, मदन पुरी आणि रणजित यांनी कुणालाही स्वयंवर करू द्यावे याची शक्यता म्हणजे Friday the thirteenth ला अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र असताना घरातल्या आज्जीबाईंनी सत्यनारायण घालण्याचे फर्मान सोडावे किंवा सीरिया, कतार, नॉर्थ कोरिया, हुथींनी एकत्र येऊन जागतिक शांततेसाठी प्रयत्न करावेत एवढी प्रचंड.

या पिक्चरचे नाव कुठेतरी वाचले होतं. मग आठवलं की 'मुझे छू रही है तेरी गर्म सांसें' यातलेच. रफीने तब्येतीत गायलं आहे. शशी येन्जॉय करतोय. मौशुमी मात्र अवघडली आहे.

याची शक्यता म्हणजे Friday the thirteenth ला अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र असताना घरातल्या आज्जीबाईंनी सत्यनारायण घालण्याचे फर्मान सोडावे किंवा सीरिया, कतार, नॉर्थ कोरिया, हुथींनी एकत्र येऊन जागतिक शांततेसाठी प्रयत्न करावेत एवढी प्रचंड. >> Rofl

मामी धन्यवाद
अर्थात गाणं पडद्यावर पाहणं त्रासदायक आहे. दोघेही ऑकवर्ड दिसतात आणि जपून जपून अलिंगनं देतात. >> मौशुमी बद्दल कुठल्या तरी डायरेक्टरने किंवा सरोज खान असेल, सांगितलं होतं कि ती आधीपासूनच विवाहिता असल्याने अंगाशी जास्त लगट करू द्यायची नाही, त्यातून फटाकडी. फिरोज खान आणि मनोज कुमार दोघांनाही सेट वरच सुनावलं होतं, त्यामुळं हिरो तिला टरकूनच असायचे. अलिकडेच तिने पण हे कन्फर्म केले Lol
तरीही तिला कामं मिळत गेली हे विशेष !

*म्हणून कालनिर्णयवाले म्हणतात 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' म्हणजे असे व्हिलन लोकांचे फोटो लावायला जागा उरत नाही. >> कालनिर्णय वाल्यांनी हे वाचलं तर म्हणतील आपल्या हे आधी डोक्यात कसं नाही आलं ! Lol

हाच तो सीन
Picture1_7.png

Friday the thirteenth ला अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र असताना घरातल्या आज्जीबाईंनी सत्यनारायण घालण्याचे फर्मान सोडावे किंवा सीरिया, कतार, नॉर्थ कोरिया, हुथींनी एकत्र येऊन जागतिक शांततेसाठी प्रयत्न करावेत एवढी प्रचंड. Rofl

मुझे छू रही है गाण्याला अनुमोदन. स्वर्गीय आवाज लागलाय.

रानभुली, तू ही रत्नं कुठून शोधून आणतेयस? >>> श्रद्धा , ही धाकट्या काकाची कृपा. तो आला कि त्याच्या पसंतीचे पिक्चर लावतो आणि बघायलाही लावतो. Lol शिवाय रनिंग कमेण्ट्री. जितेंद्र श्रीदेवी सिरीज त्याची आवडती होती. त्याला पातालभैरवीची लिंक पाठवली होती. लाल स्मायल्या पाठवल्या होत्या. आता तुझा फॅन आहे तो.

रणजीत स्वतःच कपिल शर्मा शो मधे येऊन गेलेला. धमाल एपिसोड आहे. प्रेम चोप्रा आणि रझा मुदार पण आहेत.
https://www.youtube.com/watch?v=7V585E5UJ64ac

गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूरच्या घरात रणजीतचा एक मोठा फोटो देवघरात ठेवलेला असावा अशी शंका खूप दिवसांची आहे. कधी तरी कपिल शर्मा हा प्रश्न विचारले त्यांना.>>> 🏴 ३५० Biggrin

लागू बंधू >>> Lol

Friday the thirteenth ला अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र असताना घरातल्या आज्जीबाईंनी सत्यनारायण घालण्याचे फर्मान सोडावे किंवा सीरिया, कतार, नॉर्थ कोरिया, हुथींनी एकत्र येऊन जागतिक शांततेसाठी प्रयत्न करावेत एवढी प्रचंड. >>> Lol

"दानवीर" पाहतोय. मिथुनने मोठा होण्याआधीच दानधर्म सुरू केलाय. एका "ऑपरेशन किया तो बच जायेगा" सिच्युएशन मधल्या मुलाकरता स्वतःचे लॉकेट काढून देतो. तो बूटपॉलिश पासून इतर बरीच काय काय कामे करतो. बूट पॉलिश वाल्या व्यक्तीने दीवार पाहिलेला दिसतोय. तो हा उगाच लंबी रेस का घोडा बिडा होऊ नये म्हणून थेट त्याच्या हातात पैसे देतो. पण एकूणच मिथुनच्या लहानपणावर दीवार व खुद्दारची छाप आहे.

इथे हा लहान भाऊ (रोनित रॉय असावा - पुढे चॅप्टर निघणार असे वाटणारा भाऊ असतो तसाच उगाचच वाटतोय) व बहीण (शिल्पा शिरोडकर वाटली पण ही कोणी वैष्णवी महंत दिसत आहे) यांना शाळेत शिकवून बाहेर चकाट्या पिटत बसतो. मग स्वतःही शाळेत जायचे. पण दीवार मधे नव्हत्या तश्या इथेही मनपाच्या शाळा आस्तित्वात नसाव्यात. आणि फी वाल्या शाळेत एकाच्या कमाईवर दोघांना शिकवायची यातली मिथुनची ट्रिक निरूपा रॉयला वेळीच शिकवली असती तर रवी व विजय दोघेही पोलिस झाले असते.

दीवारमधे देवळात अनेक घंटा वाजल्यामुळे ते मोठे झाले. इथे कशाने झाले ते माझे हुकले. शिल्पा एक हिंदू व एक मुस्लिम व्यक्तीला भावाबद्दल विचारून सर्वधर्मसमभावाची चेकबॉक्स चेक करते. मिथुन त्याच्या रिक्शातून एका गरोदर महिलेला हॉस्पिटलमधे घेउन गेलेला असतो. तेथे ती खाली उतरते, तर तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर शंका घेउन तिच्या पोटात सुरा खुपसायचा प्रयत्न करतो, तर तेथे काला पत्थरप्रमाणे मिथुन सुर्‍याचे पाते पकडून नंतर त्याची धुलाई करतो. तोपर्यंत त्या स्त्रीला नर्स भेटलेली असते, तरी ती अजुनही मिथुनच्याच गळ्यात पडते. इथे हिचा नवरा बरोबर होता की काय अशी शंका मिथुनला येण्याआधीच सीन कट केला आहे.

पुढच्या सीनमधे एक ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याने वेगात येत असतो. तेथे एक लहान मुलगा त्याचा फुटबॉल घेउन बसलेला असतो. तो ट्रक तेथे पोहोचायच्या आधीच रिक्षाने मिथुन तेथे येउन रिक्षा चालवता चालवता पोलो खेळणार्‍यांच्या वरताण सहजतेने त्या मुलाला उचलून वाचवतो. सध्या मिथुन व रंभा टिपिकल ९०ज कवायत डान्स करत आहेत. मधे एका ओळखीत लग्नात भावी सासरा हुंड्यावर अडल्यावर मिथुनने शिल्पाच्या लग्नाकरता जमवत आणलेले लाखभर रूपये तेथे देऊन टाकतो. पहिल्या ब्रेकपर्यंत तीन दानधर्म करून झाले आहेत.

आता त्याची बहीण व तिचा भावी नवरा कवायत डान्स करत आहेत. आपल्या मुलाला लाँच करताना निर्माते त्याला जसा रोल देतात तसा तो हीरो दिसतोय. मिथुनला पैशांची गरज पडते तेव्हा शहरातील सर्व रिक्षावाले आपल्या रिक्षा गहाण ठेवायला तयार होतात. सर्व रिक्षावाले रिक्षामालकही आहेत अशी मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या शहरात हीरोला उठसूठ दानधर्म करायची का गरज पडते हे बघायला उर्वरित भाग बघायला हवा.

Pages