श्रद्धा Lol *जस्ट मोहब्बत - मी नाईन्टीजचीच किड आहे.
<<<< एकदम क्रेक्ट!
पहिले वर्णन वाचून चिनी की जपानी गेम ऑफ थ्रोन्स करायला गेले व कंटाळून त्यांनी ते मधेच सोडले,
<<<< हो, त्यातही वेस डोथ्राकच्या आत शस्त्रे वापरायची नाहीत असे आहे.
मी आधी वॉर २ बघून बंद केला होता. त्यात पण कुत्रा वाचला याचे जेन्युइअनली बरे वाटून तिथे अर्धा स्टार माझ्यातर्फे पटकावला सिनेमाने. नंतर कळले रामचरण पण आहे यात. मग पुन्हा मुद्दाम (वेगळ्या करमणुकीसाठी) लावला. हॅम सीन्स चे नुस्ती लयलूट आहे सिनेमात. त्या जगात फिजिक्स चा शोध लागलेला नाही , त्यामुळे हाय स्पीड कार ने फ्रीवे वरून थेट खालून जाणार्या ट्रेन च्या टपावर उडी मारणे अन ती तिथे चालवणे , त्यातून लोक कुठूनही आत बाहेर करणे, कारला ट्रेन ने समोर ( रुळावर) ढकलत नेणे, त्यात ही प्यासेन्जर केव्हाही चढणे उतरणे, उडत्या विमानावर उभे राहून लीलया स्टाइल मधे चालत फिरणे, डायलॉग बोलणे , टपावरून विमानाच्या आत बाहेर करणे, या विमानातून त्या विमानात सहज उडी मारून उतरणे असे काहीही जमते. राम चरण आणि हृतिक ची जास्त अचाट अतर्क्य कोण यात स्पर्धा असल्यासारखे एक से एक सीन्स आहेत. बघा बघा
Submitted by maitreyee on 20 October, 2025 - 11:33
रामचरण नाही मैत्रेयी - ज्यु एनटीआर. त्याचे "ज्यु" या पिक्चर मधे काढलेले दिसते. नावात नुसतेच एनटीआर आहे.
मीही पाहिला थोडा. अजून रेल्वेपर्यंत पोहोचलो नाही. सखाराम गटणे याचे वर्णन कसे लिहील असा विचार केला. कथा कोणकोणत्या शहरांत घडते वगैरे. कारण पहिल्या वीस मिनिटांत ५-६ वेगवेगळे देश व शहरे दाखवली आहेत. हा हिंदी पिक्चर आहे म्हणण्यापेक्षा ज्यात अधूनमधून हिंदी बोलतात असा पिक्चर आहे हे म्हणणे जास्त बरोबर होईल. कारण पहिला हिंदी संवाद सुमारे बाराव्या मिनिटाला आहे. तोपर्यंत जपानी व इंग्रजी चालते.
काय एकेकाच्या एण्ट्र्या! मैत्रेयीने वरती हॅम लिहीले आहे तसे एण्ट्रीलाही आता हॅमिंग म्हणायला पाहिजे. जणू काळ थांबल्यासारखे सगळे स्लो डाउन होते प्रत्येकाच्या एण्ट्रीला. हृतिकच्या वेळी तर प्रत्येक अवयवाला स्वतंत्र फुटेज आहे. एण्टीआर ची पर्सनॅलिटी कमी पडते म्हणून किंवा टॉलीवूड प्रेक्षकांना चुचकारायला त्याच्या एण्ट्रीला सिंहाच्या डरकाळ्या आहेत. त्यामानाने कारचे दार उघडून स्लो मो मधे बाहेर आलेल्या अनिल कपूरची एण्ट्री यांच्या तुलनेत लो प्रोफाइल म्हणायला हवी.
रॉ मधल्या जगात भारी एजंट व तज्ञाचे लॉजिक - अनमॅन्ड एअरक्राफ्ट का काय ते मिसाईल असते त्याची वजन वाहून न्यायची एक क्षमता असते. त्यानुसार आधी एण्टीआरचे वजन धरून मुळात तो जाऊ शकेल का, ते मिसाईल माणूस नेऊ शकते का याचा विचार आधी न करता याने मार्व्हल हीरोसारखे सगळे गॅजेट्स अंगावर घालून वजन करायचे आणि मग एकेक गॅजेट्स फेकत शेवटी उघडाबंब जायचे.
जपान मधे हृतिक व सोमालियामधे एण्टीआर प्रत्येकी शंभर एक लोकांना सहज मारतात. कारण क्रिकेटमधे आधीचा आउट झाल्याशिवाय पुढचा येऊ शकत नाही तसे आधी पाठवलेली ३-४ लोकांची फळी मारल्याशिवाय पुढची यांना मारायला येत नाही. एण्टीआर तर सैनिक व कॅडेट्सना सोडवायला गेलेला असतो. त्यांना मोकळे केल्यावरही ते सैनिक आहेत हे त्याला, त्या सर्वांना व दिग्दर्शकाला आठवत नाही. ते या मारामारीत काही भाग घेत नाहीत. हीरो चे आई, बहीण वगैरे जसे जपून नेले जातात तसेच त्या सैनिकांनाही नेले जाते.
ते डायल-अप इंटरनेटवर व्हिडीओ दिसत तसे दिसणारे लाल खिडक्यांमधले लोक पुन्हा येतात का नंतर?
आणखी काही:
- सगळ्या फाइटस बघितल्या तर हिंदीचेही टॉलीवुडीफिकेशन झाले आहे. फिजिक्स चा शोध लागलेला नाही हे अगदी बरोबर आहे.
- रॉ एजंट कितीही भारी असला तरी त्याला जपानमधला लांडगा कशाला घाबरेल?
- कियारा अडवाणी मेडल स्वीकारायला येत तेव्हा एआय ने बनवेलेली तिची इमेज वाटते
- रॉ च्या प्रमुखाच्या फ्युनरलला त्याला बंदुकींची मानवंदना दिली जात असताना त्या फॉर्मेशनच्या मधूनच रॉ चा नवीन प्रमुख सहज फिरत आल्यासारखा चालत येतो? हा कोणता प्रोटोकॉल?
- मारामारीत काचा फुटतात हे आपण नेहमीच बघतो. पण स्वतःच्याच पवित्र महालाच्या काचा फोडून हीरोला मारायला येणारे लोक पहिल्यांदाच दिसले यात.
आज लेकाने जबरदस्तीने उरलेला war2 बघायला लावला. सकाळी अभ्यंग स्नानासाठी लवकर उठले होते , जेवणानंतर दुपारी डोळ्यावर झापडं येतं होती. मी झोपायला जाऊ दे रे म्हणून गयावया करत होते . तो मात्र , अरे मम्मा बघ तर म्हणून अडून बसला. त्याने अगोदरच बघितला होता , आता पिसं काढायला त्याला कंपनी हवी होती.
अतिशय अतर्क्य , अचाट , अविश्वसनीय, अतिलांबलचक , अतिकंटाळवाणा आहे रे!
संपता संपत नाही.
काव्या आणि कबिरची love story 15 वर्षांपूरवीची दाखवली आहे. काव्या 20 वर्षांची वगैरे होती की काय ??
बाकी वरच्या पोस्टींना अनुमोदन. मी पण रामचरणच म्हणत होते. घरातल्या ज्ञानी लोकांनी तो NTR असल्याचे सांगत चूक दाखवून दिली. बाकी लिहायचा कंटाळा आला.
कश्मकश (२०११) सालचा चित्रपट झी ५ वर आहे. नौकाबुडी या बंगाली सिनेमाचं हिंदी डब्ड वर्शन आहे. रविंद्रनाथ टागोरांच्या एका लघुकथेवर दिग्दर्शक ऋतुपर्ण सेन यांनी संपूर्ण लांबीचा सिनेमा रचला आहे. १९२१ सालच्य काळात घेऊन जातो सिनेमा. एक तासभर पाहिला. अत्यंत सशक्त कथानक आहे.
जीशू सेनगुप्ता, प्रसेनजीत चटर्जी, राईमा सेन, रिया सेन , ध्रितमन चटर्जी या सर्वांचा अभिनय सुंदर.
हिंदीत सुभाष घई यांनी आणला आहे. रविंद्रनाथ टागोर फॅन्स साठी दिवाळी फराळ आहे.
नौकाबुडी हे नाव सुद्धा समर्पक आहे आणि कश्मकश हे ही.
हो, चीकू. आताच वाचलं. बंगालीत तीन येऊन गेले आहेत.
पण ऋतुपर्ण खूप चांगला दिग्दर्शक आहे. शेवट ओपन एण्डेड असता तर आणखी वेगळ्या उंचीवर गेला असता. अर्थात १९२१ चा काळ बघता, केलेला शेवट योग्यच. कथेबद्दल काहीही लिहून रसभंग करावासा वाटत नाही.
खरंच इतका बेक्कार दिसतो तो, पर्सनॅलिटी नाही की बॉडी, फिटनेस , काहीच दिसत नाही. अॅक्टींग च्या नावानेही दगड वाटला मला. एक ते रागावलेला, रोखून बघणे लूक वगळता कसलेच भाव दाखवायला असमर्थ.
Submitted by maitreyee on 21 October, 2025 - 10:55
काल द पेल ब्लु आईज पाहिला. (नेफ्लि). १८३० च्या काळातला आहे. वातावरण निर्मिती उत्तम आहे. विषेशतः रात्रीची दृष्ये उत्तम घेतलीत. तेव्हा विजेचा शोध लागला नसल्याने रात्री मेणबत्ती वापरत असत. त्या प्रकाशातली दृष्ये उगीच काळोखी केलेली नाहीत किंवा जास्त प्रकाशही वापरला नाहीय. मर्डर मिस्टरी चांगली आहे. डिटेक्टिवचा असिस्टंट जास्त हुशार निघतो.
(आपल्या शशी कपुरच्या उत्सवमध्येही दिग्दर्शकाने रात्रीच्या दृश्यांमध्ये नैसर्गिक प्रकाश वापरला. पण त्यामुळे पडद्यावर काळोख जास्त वाटला. प्रयत्न फसला आणि चित्रपटही फसला.)
रामचरण आणि NTR दोघांनाही मारावेच वाटते मलाही. महामूर्ख आणि मंद भाव आहेत चेहऱ्यावर. नेपो किड मधेही सगळ्यात बेकार. रामचरण तर पुठ्ठ्याच्या डब्या सारखा भावनाशून्य दिसतो, हसतो असा की एक्स्ट्रा चार्ज पडेल अशा मंद हसण्याचा. NTR डालडा तुपाच्या पिवळ्या डब्यासारखा ओशट आहे. त्यांच्या त्या वेड्यावाकड्या AI नाचाला ऑस्कर मिळाल्याचा अपमानच वाटला होता, पायात पाय घालून पाडावे वाटले होते.
जय हिंद, जय महाराष्ट्र
तो RRR मधला डान्स मला काही खास वाटला नव्हता. आणि परदेशातील लोक अगदी चाट पडावेत इतके काही नव्हते त्यात. पूर्वी पंजाबी हीरोंवर परदेशी आणि मुख्य म्हणजे गोर्या मुली फिदा होत त्याचीच कालबाह्य आवृत्ती.
यातही हृतिकचा आणि एण्टीआरचा एक डान्स आहे. तिथपर्यंत आलोय. ज्या टुरिस्ट चौकात हृतिकच्या मागे रॉ चे लोक आलेत हे व्हिलन ऑर्गनायझेशन ("कली") ला समजते, तेथेच हे दोघे भेटून वाईन घेतायत, डान्स करतायत हे त्यांना समजते की नाही ते पुढच्या भागात कळेल बहुधा. हृतिकचा जिंदामिदो मधला नॉर्मल डान्स चांगला होता. इथे तो ही आपण साउथवाल्यांसारखा डान्स करू शकतो असे दाखवतोय असे वाटले - आणि त्याने तो कहो ना प्यार है स्टाइल डान्स केला आहे. एकूणच या डान्सेस मधे जो जास्तीत जास्त अवयव जोरात हलवेल तो डान्समधे भारी असे लॉजिक दिसते.
त्या रेल्वेच्या सीन मधे मैत्रेयीने लिहीले तसे फिजिक्सचा शोध लागलेला नाही. पुलाखालून वेगात जाणारी ५-६ डब्यांची गाडी किती वेळ तशी "जातच राहते" याचे गणित - म्हणजे हृतिक व रुहीची कार त्यावर पडते, पुढे जाउन अडकते. मग पुलाच्या काठावरही न जाता एनटीआरला ते कळते व तो उडी मारतो - तो पर्यंत ती गाडी येउ द्या अजून कोणी पुलावरून यायचे असेल ते म्हणत अजून पुलाखालूनच जात असते. आपली बारा डब्यांची स्लो लोकलसुद्धा तोपर्यंत पुलाखालून पुढे निघून गेली असती.
रेल्वे फाटकातून कोणी पुढे गेले की पाठलाग वाले पोहोचायच्या आधी तेथे फाटक बंद झाले पाहिजे हा जसा नियम आहे तसे रेल्वेच्या टपावर कोणी आले की समोर बोगदा आला पाहिजे हा ही नियम अजून लोक पाळत अहेत. मग समोर बोगदा दिसत असताना याने मागे पळत जाउन डब्यांचे कपलिंग काढेपर्यंत आणि त्यानंतर हे दोघेही उडी मारेपर्यंत ही वेगवान गाडी समोर दिसलेल्या बोगद्यात पोहोचत नाही. मधे कन्व्हिनियंटली एक पाण्यावरचा पूलही येतो.
वास्तविक तेलुगू पिक्चर्समधले हीरोज ९०ज मधेच एका हाताने चालती गाडी थांबवत किंवा परत पाठवत. एनटीआर कडे त्या पॉवर्स दिसत नाहीत.
नेफ्लिवर द क्लायंट पाहायचा प्रयत्न केला. कृपया याच्या वाट्याला जाऊ नका. >>> अरे सुंदर सिनेमा आहे तो. सिनेमात खून दाखवला की त्यामागे रहस्य असलेच पाहिजे असे नाही.
अतिशहाण्या पोराने सत्यवचन तोंडातुन काढले असते तर पहिल्या पाच मिनिटांत चित्रपटाचा ग्रंथ आटोपला असता. >>> जी गोष्ट माहीत असल्यामुळे एका माणसाचा खून होताना त्याने पाहिलय. आता तीच गोष्ट आपल्याला माहीत आहे तर आपलाही खून होऊ शकतो ह्याच भीतीभोवती सिनेमा फिरतो. ती वकील त्याची भिती कशी कमी करते आणि त्यांच्यात फुलणारे नाते हे खूप सुंदर दाखवले आहे.
"I am not going to see you again. Am I?" हे वाक्य अजून लक्षात आहे इतका आवडला होता तो लहान मुलगा.
तो RRR मधला डान्स मला काही खास वाटला नव्हता. आणि परदेशातील लोक अगदी चाट पडावेत इतके काही नव्हते त्यात. पूर्वी पंजाबी हीरोंवर परदेशी आणि मुख्य म्हणजे गोर्या मुली फिदा होत त्याचीच कालबाह्य आवृत्ती >> +१. ते गाणेही अगदीच फडतूस होते करीमच्या तुलनेने.
आरारा डान्स आवडानावडायला मेला दोन सेकंद निट दिसेल तर कळेल ना.. इतक्या फास्ट मुव्स की केवळ कॉम्प्युटरच करु शकेल. त्यांनी हॉलिवुडमध्ये सेम डान्स करुन दाखवायला नकार दिला तेव्हाच मला शंका आली जे पडद्यावर केले होते ते यांनीच केले असणार असे नसणार.
RRR dance व्हिडिओ स्पीड थोडासा वाढवला तरी तो इफेक्ट येऊन जातो. मी मुलांच्या एका नाचाच्या व्हिडिओचे तसे केलेले फनी वाटायला. आणि त्यावर हेच गाणे टाकलेले.
फक्त या गाण्यात त्याचवेळी बाकीच्या नाचणाऱ्यानी आपल्या स्टेप्स थोड्या स्लो मोशन केल्या असतील जेणे करून स्पीड वाढवल्यावर त्या नॉर्मल भासल्या असतील. आणि यांच्याच तेवढ्या फास्ट..
बाकी गाण्याच्या बिट्स, स्टेप्स आणि ती सिच्युएशन इंटरेस्टिंग होती. जेव्हा गाजत होते तेव्हा ते गाणे आमच्या घरात हिट होते.
त्या रेल्वेच्या सीन मधे मैत्रेयीने लिहीले तसे फिजिक्सचा शोध लागलेला नाही. पुलाखालून वेगात जाणारी ५-६ डब्यांची गाडी किती वेळ तशी "जातच राहते" याचे गणित <<<<<<
रेल्वेच्या टपावर कोणी आले की समोर बोगदा आला पाहिजे हा ही नियम अजून लोक पाळत अहेत<<<<<<<<
मी पण पाहिला वॉर 2 पुढे. (हाती घ्याल ते तडीस न्या!) Jr NTR, ह्रिथिक ही लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं जी काही अचाट साहसं करून दाखवतात पुढे.... 'पंछी, नदिया, पवन के झोंके...' यासोबतच yrf स्पायवर्समधल्या स्पायांना देखील कुणीच/काहीच अडवू शकत नसावे. वाटेल तिथे, वाटेल तेव्हा, वाटेल तसे प्रकट होतात आणि वाटेल तितकी अचाट मारामारी करतात.
कली ग्रुपवाले लोक सदैव तोंड लपवून असल्यामुळे त्यांना 'छिपकली' म्हणता आले असते, असा विचार मनात येऊन गेला. बाकी कली पीपल चेहऱ्याने माहीत नाहीत एवढा एकच सूक्ष्म प्रॉब्लेम सर्वशक्तिमान ह्रिथिकला होता, हे आपल्याला शेवटी कळतं. साधारण दीड दोन मिनिटांत फास्ट फॉरवर्डमध्ये साऱ्या कलींचा सफाया होतो. (त्यात एक ती परदेसमधली नीताभाभी ('भाईसाब इंडिया से गोबर उठा लाये'फेम) सुद्धा आहे.)
येणार ना टायगर. >>> सिरीयल
येणार ना टायगर. >>> सिरीयल वाल्यांना विचारले तर टायगर मेलाच नव्हता याच्या 101 रेसिपीज देतील.
श्रद्धा Lol *जस्ट मोहब्बत -
श्रद्धा Lol *जस्ट मोहब्बत - मी नाईन्टीजचीच किड आहे.
<<<< एकदम क्रेक्ट!
पहिले वर्णन वाचून चिनी की जपानी गेम ऑफ थ्रोन्स करायला गेले व कंटाळून त्यांनी ते मधेच सोडले,
<<<< हो, त्यातही वेस डोथ्राकच्या आत शस्त्रे वापरायची नाहीत असे आहे.
“ पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत
“ पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत बोलतात तर लांडग्यांशी जपानीत का नाही?” - एक नंबर लॉजिक आहे हे फा
श्रद्धा, वरील सर्वच प्रतिसाद
श्रद्धा, वरील सर्वच प्रतिसाद
मी आधी वॉर २ बघून बंद केला
मी आधी वॉर २ बघून बंद केला होता. त्यात पण कुत्रा वाचला याचे जेन्युइअनली बरे वाटून तिथे अर्धा स्टार माझ्यातर्फे पटकावला सिनेमाने.
नंतर कळले रामचरण पण आहे यात. मग पुन्हा मुद्दाम (वेगळ्या करमणुकीसाठी) लावला. हॅम सीन्स चे नुस्ती लयलूट आहे सिनेमात. त्या जगात फिजिक्स चा शोध लागलेला नाही , त्यामुळे हाय स्पीड कार ने फ्रीवे वरून थेट खालून जाणार्या ट्रेन च्या टपावर उडी मारणे अन ती तिथे चालवणे , त्यातून लोक कुठूनही आत बाहेर करणे, कारला ट्रेन ने समोर ( रुळावर) ढकलत नेणे, त्यात ही प्यासेन्जर केव्हाही चढणे उतरणे, उडत्या विमानावर उभे राहून लीलया स्टाइल मधे चालत फिरणे, डायलॉग बोलणे , टपावरून विमानाच्या आत बाहेर करणे, या विमानातून त्या विमानात सहज उडी मारून उतरणे असे काहीही जमते. राम चरण आणि हृतिक ची जास्त अचाट अतर्क्य कोण यात स्पर्धा असल्यासारखे एक से एक सीन्स आहेत. बघा बघा 
रामचरण नाही मैत्रेयी - ज्यु
रामचरण नाही मैत्रेयी - ज्यु एनटीआर. त्याचे "ज्यु" या पिक्चर मधे काढलेले दिसते. नावात नुसतेच एनटीआर आहे.
मीही पाहिला थोडा. अजून रेल्वेपर्यंत पोहोचलो नाही. सखाराम गटणे याचे वर्णन कसे लिहील असा विचार केला. कथा कोणकोणत्या शहरांत घडते वगैरे. कारण पहिल्या वीस मिनिटांत ५-६ वेगवेगळे देश व शहरे दाखवली आहेत. हा हिंदी पिक्चर आहे म्हणण्यापेक्षा ज्यात अधूनमधून हिंदी बोलतात असा पिक्चर आहे हे म्हणणे जास्त बरोबर होईल. कारण पहिला हिंदी संवाद सुमारे बाराव्या मिनिटाला आहे. तोपर्यंत जपानी व इंग्रजी चालते.
काय एकेकाच्या एण्ट्र्या! मैत्रेयीने वरती हॅम लिहीले आहे तसे एण्ट्रीलाही आता हॅमिंग म्हणायला पाहिजे. जणू काळ थांबल्यासारखे सगळे स्लो डाउन होते प्रत्येकाच्या एण्ट्रीला. हृतिकच्या वेळी तर प्रत्येक अवयवाला स्वतंत्र फुटेज आहे. एण्टीआर ची पर्सनॅलिटी कमी पडते म्हणून किंवा टॉलीवूड प्रेक्षकांना चुचकारायला त्याच्या एण्ट्रीला सिंहाच्या डरकाळ्या आहेत. त्यामानाने कारचे दार उघडून स्लो मो मधे बाहेर आलेल्या अनिल कपूरची एण्ट्री यांच्या तुलनेत लो प्रोफाइल म्हणायला हवी.
रॉ मधल्या जगात भारी एजंट व तज्ञाचे लॉजिक - अनमॅन्ड एअरक्राफ्ट का काय ते मिसाईल असते त्याची वजन वाहून न्यायची एक क्षमता असते. त्यानुसार आधी एण्टीआरचे वजन धरून मुळात तो जाऊ शकेल का, ते मिसाईल माणूस नेऊ शकते का याचा विचार आधी न करता याने मार्व्हल हीरोसारखे सगळे गॅजेट्स अंगावर घालून वजन करायचे आणि मग एकेक गॅजेट्स फेकत शेवटी उघडाबंब जायचे.
जपान मधे हृतिक व सोमालियामधे एण्टीआर प्रत्येकी शंभर एक लोकांना सहज मारतात. कारण क्रिकेटमधे आधीचा आउट झाल्याशिवाय पुढचा येऊ शकत नाही तसे आधी पाठवलेली ३-४ लोकांची फळी मारल्याशिवाय पुढची यांना मारायला येत नाही. एण्टीआर तर सैनिक व कॅडेट्सना सोडवायला गेलेला असतो. त्यांना मोकळे केल्यावरही ते सैनिक आहेत हे त्याला, त्या सर्वांना व दिग्दर्शकाला आठवत नाही. ते या मारामारीत काही भाग घेत नाहीत. हीरो चे आई, बहीण वगैरे जसे जपून नेले जातात तसेच त्या सैनिकांनाही नेले जाते.
ते डायल-अप इंटरनेटवर व्हिडीओ दिसत तसे दिसणारे लाल खिडक्यांमधले लोक पुन्हा येतात का नंतर?
आणखी काही:
- सगळ्या फाइटस बघितल्या तर हिंदीचेही टॉलीवुडीफिकेशन झाले आहे. फिजिक्स चा शोध लागलेला नाही हे अगदी बरोबर आहे.
- रॉ एजंट कितीही भारी असला तरी त्याला जपानमधला लांडगा कशाला घाबरेल?
- कियारा अडवाणी मेडल स्वीकारायला येत तेव्हा एआय ने बनवेलेली तिची इमेज वाटते
- रॉ च्या प्रमुखाच्या फ्युनरलला त्याला बंदुकींची मानवंदना दिली जात असताना त्या फॉर्मेशनच्या मधूनच रॉ चा नवीन प्रमुख सहज फिरत आल्यासारखा चालत येतो? हा कोणता प्रोटोकॉल?
- मारामारीत काचा फुटतात हे आपण नेहमीच बघतो. पण स्वतःच्याच पवित्र महालाच्या काचा फोडून हीरोला मारायला येणारे लोक पहिल्यांदाच दिसले यात.
आणि हे सगळे सुमारे पहिल्या तीस मिनिटांत झाले आहे.
अरे हो, राम चरण नव्हे, ज्यु.
अरे हो, राम चरण नव्हे, ज्यु. एन्टिआर! माझे कन्फ्युजन होते नेहमी!
आज लेकाने जबरदस्तीने उरलेला
आज लेकाने जबरदस्तीने उरलेला war2 बघायला लावला. सकाळी अभ्यंग स्नानासाठी लवकर उठले होते , जेवणानंतर दुपारी डोळ्यावर झापडं येतं होती. मी झोपायला जाऊ दे रे म्हणून गयावया करत होते . तो मात्र , अरे मम्मा बघ तर म्हणून अडून बसला. त्याने अगोदरच बघितला होता , आता पिसं काढायला त्याला कंपनी हवी होती.
अतिशय अतर्क्य , अचाट , अविश्वसनीय, अतिलांबलचक , अतिकंटाळवाणा आहे रे!
संपता संपत नाही.
काव्या आणि कबिरची love story 15 वर्षांपूरवीची दाखवली आहे. काव्या 20 वर्षांची वगैरे होती की काय ??
बाकी वरच्या पोस्टींना अनुमोदन. मी पण रामचरणच म्हणत होते. घरातल्या ज्ञानी लोकांनी तो NTR असल्याचे सांगत चूक दाखवून दिली. बाकी लिहायचा कंटाळा आला.
कश्मकश (२०११) सालचा चित्रपट
कश्मकश (२०११) सालचा चित्रपट झी ५ वर आहे. नौकाबुडी या बंगाली सिनेमाचं हिंदी डब्ड वर्शन आहे. रविंद्रनाथ टागोरांच्या एका लघुकथेवर दिग्दर्शक ऋतुपर्ण सेन यांनी संपूर्ण लांबीचा सिनेमा रचला आहे. १९२१ सालच्य काळात घेऊन जातो सिनेमा. एक तासभर पाहिला. अत्यंत सशक्त कथानक आहे.
जीशू सेनगुप्ता, प्रसेनजीत चटर्जी, राईमा सेन, रिया सेन , ध्रितमन चटर्जी या सर्वांचा अभिनय सुंदर.
हिंदीत सुभाष घई यांनी आणला आहे. रविंद्रनाथ टागोर फॅन्स साठी दिवाळी फराळ आहे.
नौकाबुडी हे नाव सुद्धा समर्पक आहे आणि कश्मकश हे ही.
नौकाडूबी चांगला चित्रपट आहे.
नौकाडूबी चांगला चित्रपट आहे.
याच कथेवर घुंघटही आहे. बीना राय, प्रदीप कुमार, भारत भूषण, आशा पारेख यांचा. नावांवरून जाऊ नका. चक्क चांगला आहे
NTR हृतिक समोर एकदम कचरा
NTR हृतिक समोर एकदम कचरा वाटतो. शुन्य personality.
हो, चीकू. आताच वाचलं.
हो, चीकू. आताच वाचलं. बंगालीत तीन येऊन गेले आहेत.
पण ऋतुपर्ण खूप चांगला दिग्दर्शक आहे. शेवट ओपन एण्डेड असता तर आणखी वेगळ्या उंचीवर गेला असता. अर्थात १९२१ चा काळ बघता, केलेला शेवट योग्यच. कथेबद्दल काहीही लिहून रसभंग करावासा वाटत नाही.
>NTR हृतिक समोर एकदम कचरा
>NTR हृतिक समोर एकदम कचरा वाटतो. शुन्य personality.
हे हैदराबाद मध्ये म्हणून दाखवा, हाडे मऊ होतील.
NTR हृतिक समोर एकदम कचरा
NTR हृतिक समोर एकदम कचरा वाटतो. शुन्य personality.>>> +१ फुल्ल नेपो किड!
खरंच इतका बेक्कार दिसतो तो,
खरंच इतका बेक्कार दिसतो तो, पर्सनॅलिटी नाही की बॉडी, फिटनेस , काहीच दिसत नाही. अॅक्टींग च्या नावानेही दगड वाटला मला. एक ते रागावलेला, रोखून बघणे लूक वगळता कसलेच भाव दाखवायला असमर्थ.
बापाच्या नावावर खपतोय.
बापाच्या नावावर खपतोय. नाहीतर काही खास नाहीय.
काल द पेल ब्लु आईज पाहिला. (नेफ्लि). १८३० च्या काळातला आहे. वातावरण निर्मिती उत्तम आहे. विषेशतः रात्रीची दृष्ये उत्तम घेतलीत. तेव्हा विजेचा शोध लागला नसल्याने रात्री मेणबत्ती वापरत असत. त्या प्रकाशातली दृष्ये उगीच काळोखी केलेली नाहीत किंवा जास्त प्रकाशही वापरला नाहीय. मर्डर मिस्टरी चांगली आहे. डिटेक्टिवचा असिस्टंट जास्त हुशार निघतो.
(आपल्या शशी कपुरच्या उत्सवमध्येही दिग्दर्शकाने रात्रीच्या दृश्यांमध्ये नैसर्गिक प्रकाश वापरला. पण त्यामुळे पडद्यावर काळोख जास्त वाटला. प्रयत्न फसला आणि चित्रपटही फसला.)
रामचरण आणि NTR दोघांनाही
रामचरण आणि NTR दोघांनाही मारावेच वाटते मलाही. महामूर्ख आणि मंद भाव आहेत चेहऱ्यावर. नेपो किड मधेही सगळ्यात बेकार. रामचरण तर पुठ्ठ्याच्या डब्या सारखा भावनाशून्य दिसतो, हसतो असा की एक्स्ट्रा चार्ज पडेल अशा मंद हसण्याचा. NTR डालडा तुपाच्या पिवळ्या डब्यासारखा ओशट आहे. त्यांच्या त्या वेड्यावाकड्या AI नाचाला ऑस्कर मिळाल्याचा अपमानच वाटला होता, पायात पाय घालून पाडावे वाटले होते.
जय हिंद, जय महाराष्ट्र
ह्या दोघांपेक्षा मुच्छड साऊथी
ह्या दोघांपेक्षा मुच्छड साऊथी हिरो परवडले. हे हमाल वाटतात.
एनटीआर चा फुल फॉर्म?
एनटीआर चा फुल फॉर्म?
तो RRR मधला डान्स मला काही
तो RRR मधला डान्स मला काही खास वाटला नव्हता. आणि परदेशातील लोक अगदी चाट पडावेत इतके काही नव्हते त्यात. पूर्वी पंजाबी हीरोंवर परदेशी आणि मुख्य म्हणजे गोर्या मुली फिदा होत त्याचीच कालबाह्य आवृत्ती.
यातही हृतिकचा आणि एण्टीआरचा एक डान्स आहे. तिथपर्यंत आलोय. ज्या टुरिस्ट चौकात हृतिकच्या मागे रॉ चे लोक आलेत हे व्हिलन ऑर्गनायझेशन ("कली") ला समजते, तेथेच हे दोघे भेटून वाईन घेतायत, डान्स करतायत हे त्यांना समजते की नाही ते पुढच्या भागात कळेल बहुधा. हृतिकचा जिंदामिदो मधला नॉर्मल डान्स चांगला होता. इथे तो ही आपण साउथवाल्यांसारखा डान्स करू शकतो असे दाखवतोय असे वाटले - आणि त्याने तो कहो ना प्यार है स्टाइल डान्स केला आहे. एकूणच या डान्सेस मधे जो जास्तीत जास्त अवयव जोरात हलवेल तो डान्समधे भारी असे लॉजिक दिसते.
त्या रेल्वेच्या सीन मधे मैत्रेयीने लिहीले तसे फिजिक्सचा शोध लागलेला नाही. पुलाखालून वेगात जाणारी ५-६ डब्यांची गाडी किती वेळ तशी "जातच राहते" याचे गणित - म्हणजे हृतिक व रुहीची कार त्यावर पडते, पुढे जाउन अडकते. मग पुलाच्या काठावरही न जाता एनटीआरला ते कळते व तो उडी मारतो - तो पर्यंत ती गाडी येउ द्या अजून कोणी पुलावरून यायचे असेल ते म्हणत अजून पुलाखालूनच जात असते. आपली बारा डब्यांची स्लो लोकलसुद्धा तोपर्यंत पुलाखालून पुढे निघून गेली असती.
रेल्वे फाटकातून कोणी पुढे गेले की पाठलाग वाले पोहोचायच्या आधी तेथे फाटक बंद झाले पाहिजे हा जसा नियम आहे तसे रेल्वेच्या टपावर कोणी आले की समोर बोगदा आला पाहिजे हा ही नियम अजून लोक पाळत अहेत. मग समोर बोगदा दिसत असताना याने मागे पळत जाउन डब्यांचे कपलिंग काढेपर्यंत आणि त्यानंतर हे दोघेही उडी मारेपर्यंत ही वेगवान गाडी समोर दिसलेल्या बोगद्यात पोहोचत नाही. मधे कन्व्हिनियंटली एक पाण्यावरचा पूलही येतो.
वास्तविक तेलुगू पिक्चर्समधले हीरोज ९०ज मधेच एका हाताने चालती गाडी थांबवत किंवा परत पाठवत. एनटीआर कडे त्या पॉवर्स दिसत नाहीत.
> तो RRR मधला डान्स मला काही
> तो RRR मधला डान्स मला काही खास वाटला नव्हता.
+११११
नेफ्लिवर द क्लायंट पाहायचा
नेफ्लिवर द क्लायंट पाहायचा प्रयत्न केला. कृपया याच्या वाट्याला जाऊ नका. >>> अरे सुंदर सिनेमा आहे तो. सिनेमात खून दाखवला की त्यामागे रहस्य असलेच पाहिजे असे नाही.
अतिशहाण्या पोराने सत्यवचन तोंडातुन काढले असते तर पहिल्या पाच मिनिटांत चित्रपटाचा ग्रंथ आटोपला असता. >>> जी गोष्ट माहीत असल्यामुळे एका माणसाचा खून होताना त्याने पाहिलय. आता तीच गोष्ट आपल्याला माहीत आहे तर आपलाही खून होऊ शकतो ह्याच भीतीभोवती सिनेमा फिरतो. ती वकील त्याची भिती कशी कमी करते आणि त्यांच्यात फुलणारे नाते हे खूप सुंदर दाखवले आहे.
"I am not going to see you again. Am I?" हे वाक्य अजून लक्षात आहे इतका आवडला होता तो लहान मुलगा.
तो RRR मधला डान्स मला काही
तो RRR मधला डान्स मला काही खास वाटला नव्हता. आणि परदेशातील लोक अगदी चाट पडावेत इतके काही नव्हते त्यात. पूर्वी पंजाबी हीरोंवर परदेशी आणि मुख्य म्हणजे गोर्या मुली फिदा होत त्याचीच कालबाह्य आवृत्ती >> +१. ते गाणेही अगदीच फडतूस होते करीमच्या तुलनेने.
पायात पाय घालून पाडावे वाटले
पायात पाय घालून पाडावे वाटले होते >>

माधव धन्यवाद. प्रयत्न करेन
माधव धन्यवाद. प्रयत्न करेन पाहण्याचा. जेवढा पाहिला तेवढा अगदीच प्रेडिक्टेबल होता. त्यामुळे उत्साह मावळला.
आरारा डान्स आवडानावडायला मेला
आरारा डान्स आवडानावडायला मेला दोन सेकंद निट दिसेल तर कळेल ना.. इतक्या फास्ट मुव्स की केवळ कॉम्प्युटरच करु शकेल. त्यांनी हॉलिवुडमध्ये सेम डान्स करुन दाखवायला नकार दिला तेव्हाच मला शंका आली जे पडद्यावर केले होते ते यांनीच केले असणार असे नसणार.
ह्या दोघांपेक्षा मुच्छड साऊथी
ह्या दोघांपेक्षा मुच्छड साऊथी हिरो परवडले. हे हमाल वाटतात.
NTR डालडा तुपाच्या पिवळ्या डब्यासारखा ओशट आहे.
निॲन्डरथलांची मारामारी वाटते, असे सिनेमे म्हणजे.
<<

RRR dance व्हिडिओ स्पीड
RRR dance व्हिडिओ स्पीड थोडासा वाढवला तरी तो इफेक्ट येऊन जातो. मी मुलांच्या एका नाचाच्या व्हिडिओचे तसे केलेले फनी वाटायला. आणि त्यावर हेच गाणे टाकलेले.
फक्त या गाण्यात त्याचवेळी बाकीच्या नाचणाऱ्यानी आपल्या स्टेप्स थोड्या स्लो मोशन केल्या असतील जेणे करून स्पीड वाढवल्यावर त्या नॉर्मल भासल्या असतील. आणि यांच्याच तेवढ्या फास्ट..
बाकी गाण्याच्या बिट्स, स्टेप्स आणि ती सिच्युएशन इंटरेस्टिंग होती. जेव्हा गाजत होते तेव्हा ते गाणे आमच्या घरात हिट होते.
त्या रेल्वेच्या सीन मधे

छिपकली
छिपकली
Pages