अस्मिता सोलमेटनी, सोय मेट लोल. यातली स्पर्धा परदेस मधल्या कबड्डी स्पर्धेसारखी वाटत आहे. सुभाष घई असता तर तेथे एक भारदस्त बाप, एक तिखट पण मायाळू आजी आणि दोन-चार अनावश्यक पडीक नातेवाईकही असले असते सतत घरात. यातले माहीत नाही.
केरळ टुरिझम व्हिडिओ आहे मधे मधे लव्ह स्टोरी. मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले >>>
चमचा लिंबू व थैला रेस यांचे फ्युजन निघाले >>>
अॅपला एकदम कोट्यावधी रूपये का लागतात कोणास ठाऊक. ते ही अॅप ऑलरेडी चालत असताना.
या सगळ्या "टू स्टेट" लव्हष्टोर्यांमधे हीरो उत्तरेकडचा व हिरॉइन दक्षिणेकडची असेच असते का? एक दुजे के लिये हा एक अपवाद दिसतो. हीरो साउथचा व हिरॉइन नॉर्थची (शक्यतो त्याच्यावर फिदा असलेल्या दोन हिरॉइन्स) हा प्रकार फक्त साउथ फिल्म्समधेच जास्त दिसतोय.
फा, सुभाष घई किंवा बरजात्या - मिलजुलके रहेनेवाले परिवार -घर भरवायला असणाऱ्या डम्बोज ऐवजी यांनी ताडी पिऊन हातात बाटल्या मिरवत झुंडीने हिंडणारे सुंदरीचे हितचिंतक दाखवले आहेत. उगाच मारामारी करत असतात चढली की, ती जी काही फिजिकल कॉमेडी होती, ती तर फारच वैताग आहे. एकदम शक्ती कपूर लेव्हल "विनोद".
परमसुंदरी या लोकांना घेऊन सिनेमे काढणार्यांचा मनी लाँडरिंग हा एकमेव उद्देश असतो यावर विश्वास ठेवण्यास भरपुर वाव आहे.
नेफ्लिवर द क्लायंट पाहायचा प्रयत्न केला. का?? का??? तर इन्ट्रोमध्ये मर्डर हा शब्द वाचला म्हणुन.. :कपाळबडवंती:
अतिशहाण्या पोराने सत्यवचन तोंडातुन काढले असते तर पहिल्या पाच मिनिटांत चित्रपटाचा ग्रंथ आटोपला असता. पण तसे होणे नव्हते. तरी मी अर्धा तास धीर धरला. मला जे हवे होते त्यात चित्रपटाला अजिबात इन्टरेस्ट नव्हता. मर्डर होता पण मिस्ट्री नव्हती. त्यामुळे सोडुन दिला. कृपया याच्या वाट्याला जाऊ नका.
वर चांगल्या मर्डर मिस्ट्रीजचा उल्लेख आलाय. इथे इतक्या
पोस्टी येतात त्यात हवे ते मिस्स होते. कोणीतरी वेगळा धागा काढा आणि लिस्टिण्ग करा.
या लोकांना घेऊन सिनेमे काढणार्यांचा मनी लाँडरिंग हा एकमेव उद्देश असतो यावर विश्वास ठेवण्यास भरपुर वाव आहे. >> काय योगायोग आहे. हे वाक्य लिहीलं जात असतानाच एक व्हिडीओ मी बघितला. लिंक खाली दिली आहे.
अस्मिताची धडक २ वरची पोस्ट सटीक आहे. मला पर्सनली वाटलं होतं कि शोकांत एंड हवा होता आणि क्लायमॅक्सला थोडं अधिक नाट्य हवं होतं, पण अस्मिताने अचूक बोट ठेवलंय. खरं तर रिअॅलिटीच्या जवळ दाखवायचं तर नाट्य असायला हवं असं नाही. सवय करून घ्यायला हवी. अॅट लिस्ट या सिनेमाला स्वतःची कथा होती. दिग्दर्शिका शाजिया आहे, पण करन जोहरने असा सिनेमा बनवायचं धाडस दाखवलं .
धन्यवाद सर्वांना.
राभु तो व्हिडिओ थोडा पाहिला मी, तशा आशयाचे इतरही थोडे वाचलेले आहे. गेल्या काही वर्षांत तसं वाटतंय खरं. काही बाबतीत अनुमोदन आहे. पण अधूनमधून तरी काही चांगले येत राहील आणि आपण जेन्युईनली नावं ठेवण्याऐवजी जेन्युईनली कौतुक करू अशी आशा मी धरून ठेवली आहे. कारण हिंदी चित्रपटांची जागा मनामधे दुसरी कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही. इतका आनंद, मजा, गप्पा ( येथे आणि प्रत्यक्षही) दुसऱ्या कुठल्याही विषयावरही शक्य नाही. कुणीही कुणाशीही कधीही 'कनेक्ट' होऊ शकेल असा विषय आहे. आयुष्याचा लहानपणापासूनचा अविभाज्य भाग आहे. दर्जा पाहून थोडं वाईटही वाटतं पण पाहिल्याशिवाय करमतही नाही. ही आपली संस्कृती होऊन बसली आहे. जगातील कुठल्याही भाषेतले चित्रपट पाहिले तरी शेवटी हिंदीने जी मजा येते तशी इतर कशानेही नाही. आणि असे आपल्या सगळ्यांचेच असेल साधारण !
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, उत्तम आरोग्याची आणि सुखासमाधानाची जावो. /\
आपण घरात नाही का आढावा घेत ? म्हणजे आपण घरावर प्रेम करत नाही असं नाही ना ? चांगलं व्हावं असं वाटत असेल तर चुकीच्या गोष्टींवर बसून चर्चा करतो आपण. तसा व्हिडीओ आहे हा. प्रेक्षक म्हणून आपणच दबाव आणावा एव्हढंच आपल्या हातात आहे, ते शक्य असेल तर.
सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा ! सुट्टीचा उपयोग करून जवळच्या ठिकाणी निसर्गात जायची संधी मिळो ! समृद्धी आणि आरोग्य यांची भरभराट होचो.
ओएमजी !! ध्रुव राठी?? देवा!! जर्मनित बसुन भारतावर( पैसे घेवुन) ग्यान वाटणारा...आता याचे व्हिडीओ माझ्या युट्युब फिडला आले नाही म्हणजे मिळवली...मी ही अस्मितासारखाच थोडावेळ पाहायचा प्रयत्न केला मग शेवट शेवटचा एकला
थोडफार पटल म्हणजे सगळ माहिती होतच..पण काही काही वर्शात गोष्टी त्याच्या त्याच्याच रिसेट होतात अस मला वाटत.
कितीही इफेक्ट वापरुन केले तरी जोवर स्टोरित दम नाही तोवर पिक्चर चालणार नाहीच
प्रेक्षक म्हणून आपणच दबाव आणावा एव्हढंच आपल्या हातात आहे, ते शक्य असेल तर.>>>
पिक्चर फ्लॉप होवुनही हिट दाखवायच कसब त्याच्याकडे आहे त्यात सामान्य प्रेक्षक काय करणार? फक्त रिव्ह्यु वाचुनच मुव्ही बघणे एवढच करु शकतात.
Submitted by प्राजक्ता on 18 October, 2025 - 11:52
वॉर २ पहिली काही मिनिटे बघताना चांगलीच करमणूक झाली.
काहीच्या काही चित्रपट असा धागा असायला पाहीजे.
दिवाळीच्या कामांमुळे आणि पुढे बघण्यात अर्थ नसल्याने पुढे पाहिला नाही. टीन एजर्सनी पाहिला, त्यांना आवडला.
बघण्यासारखी एकच गोष्ट. ग्रीक गॉड.
राभु , सेम पिंच.
मी पण काल पहायला सुरूवात केली होती.
नवर्याला म्हटलं , मला काय पिक्चरमध्ये interest नाहीयै , फक्त आपलं ..ह्रितीक रोशनसाठी बघायचा.
अर्धा बघितला.
मग आपले लाडू बनवायला निघून गेले.
MRs पाहिला.. Zee5
चांगला होता. आवडला. कसलाही घरगुती हिंसाचार आणि उघड उघड दडपशाही न दाखवता मुद्दा पोहोचवला. टेन्शन सुद्धा चांगले बिल्ट केले. मध्यंतरी दहा पंधरा मिनिटे मुद्दा समजला तरी पुन्हा पुन्हा तेच दाखवत आहेत असे वाटलेले. पण त्यामुळेच खरे तर हे आयुष्य किती एकसुरी आणि रटाळ असल्याचे जाणवले. ती जाणीव होणेच क्लायमॅक्ससाठी गरजेचे होते.
बायकोला आवर्जून बघायला सांगेन हा..
अरे हो, ज्यूस म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे. ती आठवली.
मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले. त्यात विकतची बुंदी होती.
<<<< Lol या तपशीलांमुळे एकदम परफेक्टच कळले ते किती फास्टात प्रेमात पडले ते! >>> हाहाहा.
उनाड बघितला jio hotstar वर. आवडला . कोकणातील निसर्ग सौंदर्य छान घेतले आहे. तिन्ही मुलांची केमिस्ट्री ही मस्त!! त्या त्या वयाचा परिणाम !!
ऋन्मेष, thanks for रेको !!
Submitted by अश्विनी११ on 19 October, 2025 - 06:00
काल मी 'वॉर 2' पाहायला घेतला. नेटफ्लिक्सचे पैसे भरते दरमहा ते फुकट नको जायला. तसा त्यातच तिकडे कोपऱ्यात 'सैयारा' पण आहे, पण 'चिनचिनाकी बबलाबू... जिंदगी मे सौ दुख..*' अशी सिचवेशन असताना जेन झी ची दुःखं कुठे पाहू? त्यातून 'सैयारा तू तो बदला नही है.. मौसम जरा सा रुठा हुआ है' चा अर्थ काय, या प्रश्नाचे अजून उत्तर सापडले नाहीये.
तर असो. वॉर 2.
कुठेतरी एका चिनी का जपानी माणसाची पंचाहत्तरी साजरी करणे चालू आहे. त्याचा एक पाळीव लांडगा का कुत्रा का डायरवुल्फ पण आहे. सगळे जेवत आहेत. तेवढ्यात त्याचा एक खबरी माणूस धावत धावत येऊन किंचाळतो की तुम्हांला मारायला विरोधी गटाने आर्मी पाठवली आहे. तर हा त्या लांडगा/कुत्रा/डायरवुल्फला इशारा करून बघून यायला सांगतो. आता याच्याकडे अनेक तलवारधारी सैनिक असताना आधी लांडगा पाठवतो. मग स्लो मो मध्ये मसलधारी ह्रिथिकची एन्ट्री. (1चित्र=1000शब्द तसे हे 1ह्रिथिक=मोठीआर्मी असावे!) लांडगा पण त्याला भेदरून बघत राहतो. त्याला बहुधा जाणीव झाली असावी की काही संकट सिचवेशन आली की हा माणूस आपल्याला पुढे पाठवणार. Just a disposible animal I am! त्यामुळे तो ह्रिथिकला पाहून 'भौsss(वा वुफ)'सुद्धा करत नाही.
ह्रिथिक एकदम फ्लूएंट जपानीमध्ये बोलायला लागतो त्याच्याशी. त्याची मौत बनून आलेलाय म्हणे! आता डायलॉगबाजी जपानीत असल्याने त्यात काही दम नाही. हिंदीत डायलॉग्ज जबरदस्त असतात. (आठवा, डुप्लिकेटमधला गुलशन ग्रोव्हर. 'मेरे हाथ मे मौत की रेखा ही नही है' वगैरे!) ह्रिथिक स्टाईलमध्ये दोन पिस्तुलं काढतो. तर व्हिलन म्हणतो, हे आमचं पवित्र स्थळ आहे, इथे बंदुका नाही वापरत आम्ही. आता ह्रिथिकला म्हणता आले असते की, 'तू नसशील वापरत, पण मी वापरेन.' तसंही कोण तिथून जगून वाचून बाहेर ह्रिथिकची चुगली करायला जाणार आहे? पण तसे केले तर त्याच्या मसलांचे शक्तिप्रदर्शन कसे होणार? मग अचाट मारामारी होऊन ह्रिथिक उडत्या हेलिकॉप्टरच्या पायलटला गोळी घालून (बर्थडे बॉयला गोळी खाण्यातून सवलत मिळते), ते त्या बर्थडेस्थळी क्रॅश करवून पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आणि वाचलेला लांडगा त्याच्या बाजूला येऊन बसतो.
एवढं पाहून मला फार शीण आला, मग तो सिनेमा थांबवला. आज थकवा गेला तर पुढे पाहीन.
*ही ओळ कुठल्या मालिकेच्या टायटल ट्रॅकमधली आहे हे तुम्हांला लगेच ओळखू नाही आले तर तुम्ही ट्रू 90स किड नव्हेच!
लांडगा पण त्याला भेदरून बघत राहतो. त्याला बहुधा जाणीव झाली असावी की काही संकट सिचवेशन आली की हा माणूस आपल्याला पुढे पाठवणार. Just a disposible animal I am! त्यामुळे तो ह्रिथिकला पाहून 'भौsss(वा वुफ)'सुद्धा करत नाही. >> धमाल लिहीलंय.
अगदी अगदी हेच मनात आलेलं. ते जपानी लोक नवशिके कुंगफूपटू असतात. ऋत्विक रोशन सूक्ष्म हालचाल करून तलवारीचे वार चुकवत असतो. ब्रुसलीच्या काळात हा असता तर त्याने शरणागती पत्करली असती. दक्षिणेच्या अचाटनायकांनी शिषत्व पत्करलं असतं आणि अम्ताभ बच्चन शराबी मधली कमेण्ट्री पडद्यामागून करत बसला असता.
"सामने से दो आयेंगे,लेकीन करेंगे कुछ नही. करेगा पीछे से आनेवाला " छाप मारामारी. मांडीत पाच बोटांचे धारदार आकडे रूतून बसल्यावरही "काही नाही काही नाही, बारीक मुंगी चावली" हे लहान इंजेक्शन करताना मुलांना सांगतात तसे भाव हृत्विक च्या चेहर्यावर होते.
मधे आमच्याकडे कुठला पिक्चर सुरु होता चायनीज होते सर्व, नाव विसरले. एका मुलाच्या वडलांना चिरतरुण रहायचं वरदान असतं, हातात सोन्याची कडी असतात, ते चुकीच्या मार्गाला जातात, त्यामुळे दुष्मन टोळी त्याच्या आईला मारते, ती माहेरची आदीवासी असते. तो पिक्चर इतका स्लो होता अर्थात नवरा थोडा थोडा करत असले पिक्चर्स बघतो, मी येताजाता. पहीला खूप वेळ बोअर आणि स्लो वाटला. नंतर एक छोटा क्युट पंखवाला प्राणी आला त्यात, तो प्राणी आल्यावर मला इंटरेस्टींग वाट्ला. तो प्राणी त्या मुलाला आजोळच्या एरीयात नेतो, तिथे आदीवासी समाज असतो, त्यात मावशी असते त्याची. तिथल्या काही आदिवासी बाया आपल्या सलवार कुडता सारखे ड्रेसेस घालतात, एकदम भारतीय वाटले ते कपडे.
1चित्र=1000शब्द तसे हे 1ह्रिथिक=मोठीआर्मी असावे! >>>
मसलधारी ह्रिथिकची एन्ट्री >>>
इतकी वर्षे होऊनही "हीरो स्लो मो मधे येणार आहे. आपल्याला स्लो मो ची सक्ती नाही. त्याची स्लो मो संपण्याआधीच उडवा त्याला" असे ज्ञान कोणाही व्हिलनला आलेले नाही.
ह्रिथिक एकदम फ्लूएंट जपानीमध्ये बोलायला लागतो त्याच्याशी >>> वादिवाल्याशी की लांडग्याशी? यातले काहीही शक्य आहे. पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत बोलतात तर लांडग्यांशी जपानीत का नाही?
पहिले वर्णन वाचून चिनी की जपानी गेम ऑफ थ्रोन्स करायला गेले व कंटाळून त्यांनी ते मधेच सोडले, आणि तेच फुटेज वॉर-२ मधे वापरू असे ठरले असावे - असे वाटले. साउथ मधल्या अचाटपणाला हिंदीत फार जवाब मिळाला नव्ह्ता आत्तापर्यंत, तेव्हा यातून मिळेल असे त्यांना वाटले असेल. पण साउथ रिमेम्बर्स! ते यापुढेही जातील नक्कीच.
एकूण फ्लुएण्ट जपानीत बोलणे हे हृतिकच्या कॅरेक्टर्सचे व्यवच्छेदक लक्षण दिसते. आठवा "मोशी मोशी"! इंग्लंड मधे राहणारा भारतीय स्पेन मधे ट्रिपवर असताना जपानी क्लायंटशी बोलतो ते.
बर्थडेस्थळी बंदूक चालत नाही पण हेलिकॉप्टर क्रॅश केलेले चालते असे दिसते यातील लॉजिकनुसार.
टायगर श्रॉफ यात नाहीच आहे की आला नाही अजून? वॉर -१ मधेही हॉस्टाइल परदेशात घुसून टेररिस्ट लोक पकडले की लगेच त्यांना तेथून उचलून देशात आणण्याऐवजी तेथेच फायटिंग करणारे कमांडोज असतात ना ते? उगाच "मसलधारी" झालोय का, असे म्हणत असतील
इतकी वर्षे होऊनही "हीरो स्लो मो मधे येणार आहे. आपल्याला स्लो मो ची सक्ती नाही. त्याची स्लो मो संपण्याआधीच उडवा त्याला"
<<<<< तसे करताना उसूल आडवे येतात. ह्रिथिकपण कुठे सुरुवातीलाच पिस्तुलं वापरतो? उसूल मोडणे म्हणजे महापाप! कारण हे उसूल अगदी राजा रतनसिंग (पद्मावत फेम)च्या काळापासून अस्तित्त्वात आहेत.
वादिवाल्याशी की लांडग्याशी? यातले काहीही शक्य आहे. पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत बोलतात तर लांडग्यांशी जपानीत का नाही?
<<<<<< लांडग्याचे नाव म्याकमिलन असते तर ह्रिथिक नक्की जपानीऐवजी इंग्रजीतून बोलला असता त्याच्याशी...
(यू आर कनी व्हेरी व्हेरी गुड वुल्फ बरं का म्याकमिलन...)
टायगर श्रॉफ यात नाहीच आहे की आला नाही अजून?
<<< वॉर1मध्येच टायगर श्रॉफचा रोल वॉरला होता. त्यामुळं नसावा तो.
(Yrf माने - अरे वा, म्हणजे काय? येणार ना टायगर.. वाट बघा!)
धमाल पोस्ट. कुत्री बायलिंग्वल असू शकतात- माझं आहे. त्याला कामापुरते मराठी व इंग्रजी दोन्ही कळते. कामापुरते - पोटापुरते. मेंदू पर्यंत कधी जात नाही. पहिला 'वॉर' असह्य झाला होता म्हणून दुसरे महायुद्ध पाहिले नाही पण तू नेटफ्लिक्स वसूल करत राहा. निॲन्डरथलांची मारामारी वाटते, असे सिनेमे म्हणजे.
अस्मिता सोलमेटनी, सोय मेट
अस्मिता
सोलमेटनी, सोय मेट लोल. यातली स्पर्धा परदेस मधल्या कबड्डी स्पर्धेसारखी वाटत आहे. सुभाष घई असता तर तेथे एक भारदस्त बाप, एक तिखट पण मायाळू आजी आणि दोन-चार अनावश्यक पडीक नातेवाईकही असले असते सतत घरात. यातले माहीत नाही.
केरळ टुरिझम व्हिडिओ आहे मधे मधे लव्ह स्टोरी. मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले >>>
चमचा लिंबू व थैला रेस यांचे फ्युजन निघाले >>>
अॅपला एकदम कोट्यावधी रूपये का लागतात कोणास ठाऊक. ते ही अॅप ऑलरेडी चालत असताना.
या सगळ्या "टू स्टेट" लव्हष्टोर्यांमधे हीरो उत्तरेकडचा व हिरॉइन दक्षिणेकडची असेच असते का? एक दुजे के लिये हा एक अपवाद दिसतो. हीरो साउथचा व हिरॉइन नॉर्थची (शक्यतो त्याच्यावर फिदा असलेल्या दोन हिरॉइन्स) हा प्रकार फक्त साउथ फिल्म्समधेच जास्त दिसतोय.
भारी रिव्ह्यू
भारी रिव्ह्यू
पण तरी मी बघेन हा असे वाटते...
>>> मध्यरात्रीची विचित्र वेळ
>>> मध्यरात्रीची विचित्र वेळ गाठून … पाकिट झेलतो. यांचं काही तरी वेगळंच चाललेलं असतं

(No subject)
काय ग..आज ch बघायचं ठरवलं
काय ग..आज ch बघायचं ठरवलं होतं...
ऋ आणि केया, बघा बघा. सोडू नका
ऋ आणि केया, बघा बघा. सोडू नका.
फा, सुभाष घई किंवा बरजात्या - मिलजुलके रहेनेवाले परिवार -घर भरवायला असणाऱ्या डम्बोज ऐवजी यांनी ताडी पिऊन हातात बाटल्या मिरवत झुंडीने हिंडणारे सुंदरीचे हितचिंतक दाखवले आहेत. उगाच मारामारी करत असतात चढली की, ती जी काही फिजिकल कॉमेडी होती, ती तर फारच वैताग आहे. एकदम शक्ती कपूर लेव्हल "विनोद".
अस्मिता धडक२ बद्दल खुप सुरेख
अस्मिता धडक२ बद्दल खुप सुरेख लिहिलेस.
परमसुंदरी
या लोकांना घेऊन सिनेमे काढणार्यांचा मनी लाँडरिंग हा एकमेव उद्देश असतो यावर विश्वास ठेवण्यास भरपुर वाव आहे.
नेफ्लिवर द क्लायंट पाहायचा प्रयत्न केला. का?? का??? तर इन्ट्रोमध्ये मर्डर हा शब्द वाचला म्हणुन.. :कपाळबडवंती:
अतिशहाण्या पोराने सत्यवचन तोंडातुन काढले असते तर पहिल्या पाच मिनिटांत चित्रपटाचा ग्रंथ आटोपला असता. पण तसे होणे नव्हते. तरी मी अर्धा तास धीर धरला. मला जे हवे होते त्यात चित्रपटाला अजिबात इन्टरेस्ट नव्हता. मर्डर होता पण मिस्ट्री नव्हती. त्यामुळे सोडुन दिला. कृपया याच्या वाट्याला जाऊ नका.
वर चांगल्या मर्डर मिस्ट्रीजचा उल्लेख आलाय. इथे इतक्या
पोस्टी येतात त्यात हवे ते मिस्स होते. कोणीतरी वेगळा धागा काढा आणि लिस्टिण्ग करा.
या लोकांना घेऊन सिनेमे
या लोकांना घेऊन सिनेमे काढणार्यांचा मनी लाँडरिंग हा एकमेव उद्देश असतो यावर विश्वास ठेवण्यास भरपुर वाव आहे. >> काय योगायोग आहे. हे वाक्य लिहीलं जात असतानाच एक व्हिडीओ मी बघितला. लिंक खाली दिली आहे.
अस्मिताची धडक २ वरची पोस्ट सटीक आहे. मला पर्सनली वाटलं होतं कि शोकांत एंड हवा होता आणि क्लायमॅक्सला थोडं अधिक नाट्य हवं होतं, पण अस्मिताने अचूक बोट ठेवलंय. खरं तर रिअॅलिटीच्या जवळ दाखवायचं तर नाट्य असायला हवं असं नाही. सवय करून घ्यायला हवी. अॅट लिस्ट या सिनेमाला स्वतःची कथा होती. दिग्दर्शिका शाजिया आहे, पण करन जोहरने असा सिनेमा बनवायचं धाडस दाखवलं .
परम सुंदरी वर पण मस्त लिहीलंय खुसखुशीत. सहमत असा किंवा नसा, हा व्हिडीओ बघितला नसेल तर नक्की बघा.
https://www.youtube.com/watch?v=5cL4yESclV0
अस्मिता, काय हे, मी कसला
अस्मिता, काय हे, मी कसला डेंजर हसत होतो.

धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
राभु तो व्हिडिओ थोडा पाहिला मी, तशा आशयाचे इतरही थोडे वाचलेले आहे. गेल्या काही वर्षांत तसं वाटतंय खरं. काही बाबतीत अनुमोदन आहे. पण अधूनमधून तरी काही चांगले येत राहील आणि आपण जेन्युईनली नावं ठेवण्याऐवजी जेन्युईनली कौतुक करू अशी आशा मी धरून ठेवली आहे. कारण हिंदी चित्रपटांची जागा मनामधे दुसरी कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही. इतका आनंद, मजा, गप्पा ( येथे आणि प्रत्यक्षही) दुसऱ्या कुठल्याही विषयावरही शक्य नाही. कुणीही कुणाशीही कधीही 'कनेक्ट' होऊ शकेल असा विषय आहे. आयुष्याचा लहानपणापासूनचा अविभाज्य भाग आहे. दर्जा पाहून थोडं वाईटही वाटतं पण पाहिल्याशिवाय करमतही नाही. ही आपली संस्कृती होऊन बसली आहे. जगातील कुठल्याही भाषेतले चित्रपट पाहिले तरी शेवटी हिंदीने जी मजा येते तशी इतर कशानेही नाही. आणि असे आपल्या सगळ्यांचेच असेल साधारण !
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, उत्तम आरोग्याची आणि सुखासमाधानाची जावो. /\
धन्यवाद अस्मिता
धन्यवाद अस्मिता
आपण घरात नाही का आढावा घेत ? म्हणजे आपण घरावर प्रेम करत नाही असं नाही ना ? चांगलं व्हावं असं वाटत असेल तर चुकीच्या गोष्टींवर बसून चर्चा करतो आपण. तसा व्हिडीओ आहे हा. प्रेक्षक म्हणून आपणच दबाव आणावा एव्हढंच आपल्या हातात आहे, ते शक्य असेल तर.
सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा ! सुट्टीचा उपयोग करून जवळच्या ठिकाणी निसर्गात जायची संधी मिळो ! समृद्धी आणि आरोग्य यांची भरभराट होचो.
ओएमजी !! ध्रुव राठी?? देवा!!
ओएमजी !! ध्रुव राठी?? देवा!! जर्मनित बसुन भारतावर( पैसे घेवुन) ग्यान वाटणारा...आता याचे व्हिडीओ माझ्या युट्युब फिडला आले नाही म्हणजे मिळवली...मी ही अस्मितासारखाच थोडावेळ पाहायचा प्रयत्न केला मग शेवट शेवटचा एकला
थोडफार पटल म्हणजे सगळ माहिती होतच..पण काही काही वर्शात गोष्टी त्याच्या त्याच्याच रिसेट होतात अस मला वाटत.
कितीही इफेक्ट वापरुन केले तरी जोवर स्टोरित दम नाही तोवर पिक्चर चालणार नाहीच
प्रेक्षक म्हणून आपणच दबाव आणावा एव्हढंच आपल्या हातात आहे, ते शक्य असेल तर.>>>
पिक्चर फ्लॉप होवुनही हिट दाखवायच कसब त्याच्याकडे आहे त्यात सामान्य प्रेक्षक काय करणार? फक्त रिव्ह्यु वाचुनच मुव्ही बघणे एवढच करु शकतात.
अस्मिता परमसुन्दरीचा रिव्ह्यु
अस्मिता परमसुन्दरीचा रिव्ह्यु धमाल लिहला आहेस.
वॉर २ पहिली काही मिनिटे
वॉर २ पहिली काही मिनिटे बघताना चांगलीच करमणूक झाली.
काहीच्या काही चित्रपट असा धागा असायला पाहीजे.
दिवाळीच्या कामांमुळे आणि पुढे बघण्यात अर्थ नसल्याने पुढे पाहिला नाही. टीन एजर्सनी पाहिला, त्यांना आवडला.
बघण्यासारखी एकच गोष्ट. ग्रीक गॉड.
राभु , सेम पिंच.
राभु , सेम पिंच.
मी पण काल पहायला सुरूवात केली होती.
नवर्याला म्हटलं , मला काय पिक्चरमध्ये interest नाहीयै , फक्त आपलं ..ह्रितीक रोशनसाठी बघायचा.
अर्धा बघितला.
मग आपले लाडू बनवायला निघून गेले.
मी बुंदी रायता करेपर्यंत हे
मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले. त्यात विकतची बुंदी होती
>>>
हे असं मला ‘मैं तुलसी…’ बघताना झालेलं.
एवढ्या वेळात ठरवून अफेअर पण नाही करता येणार. असो.
बाकी पूर्ण रिव्ह्यूच
बेसनाचे लाडू वळता वळता
बेसनाचे लाडू वळता वळता हेलिकॉप्टर आलं. लाडू आणि वॉर २ चं काही तरी नातं आहे.
MRs पाहिला.. Zee5
MRs पाहिला.. Zee5
चांगला होता. आवडला. कसलाही घरगुती हिंसाचार आणि उघड उघड दडपशाही न दाखवता मुद्दा पोहोचवला. टेन्शन सुद्धा चांगले बिल्ट केले. मध्यंतरी दहा पंधरा मिनिटे मुद्दा समजला तरी पुन्हा पुन्हा तेच दाखवत आहेत असे वाटलेले. पण त्यामुळेच खरे तर हे आयुष्य किती एकसुरी आणि रटाळ असल्याचे जाणवले. ती जाणीव होणेच क्लायमॅक्ससाठी गरजेचे होते.
बायकोला आवर्जून बघायला सांगेन हा..
अरे हो, ज्यूस म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे. ती आठवली.
मी बुंदी रायता करेपर्यंत हे
मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले. त्यात विकतची बुंदी होती.
या तपशीलांमुळे एकदम परफेक्टच कळले ते किती फास्टात प्रेमात पडले ते!
<<<<
वॉर २ पहिली काही मिनिटे बघताना चांगलीच करमणूक झाली.
<<<< अगदी!!! मी पण काही मिनिटेच पाहिला आहे, नंतर मलाच थकवा वाटायला लागला आणि पॉज केला सिनेमा.
मी बुंदी रायता करेपर्यंत हे
मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले. त्यात विकतची बुंदी होती.
<<<< Lol या तपशीलांमुळे एकदम परफेक्टच कळले ते किती फास्टात प्रेमात पडले ते! >>> हाहाहा.
उनाड बघितला jio hotstar वर.
उनाड बघितला jio hotstar वर. आवडला . कोकणातील निसर्ग सौंदर्य छान घेतले आहे. तिन्ही मुलांची केमिस्ट्री ही मस्त!! त्या त्या वयाचा परिणाम !!
ऋन्मेष, thanks for रेको !!
काल मी 'वॉर 2' पाहायला घेतला.
काल मी 'वॉर 2' पाहायला घेतला. नेटफ्लिक्सचे पैसे भरते दरमहा ते फुकट नको जायला. तसा त्यातच तिकडे कोपऱ्यात 'सैयारा' पण आहे, पण 'चिनचिनाकी बबलाबू... जिंदगी मे सौ दुख..*' अशी सिचवेशन असताना जेन झी ची दुःखं कुठे पाहू? त्यातून 'सैयारा तू तो बदला नही है.. मौसम जरा सा रुठा हुआ है' चा अर्थ काय, या प्रश्नाचे अजून उत्तर सापडले नाहीये.
तर असो. वॉर 2.
कुठेतरी एका चिनी का जपानी माणसाची पंचाहत्तरी साजरी करणे चालू आहे. त्याचा एक पाळीव लांडगा का कुत्रा का डायरवुल्फ पण आहे. सगळे जेवत आहेत. तेवढ्यात त्याचा एक खबरी माणूस धावत धावत येऊन किंचाळतो की तुम्हांला मारायला विरोधी गटाने आर्मी पाठवली आहे. तर हा त्या लांडगा/कुत्रा/डायरवुल्फला इशारा करून बघून यायला सांगतो. आता याच्याकडे अनेक तलवारधारी सैनिक असताना आधी लांडगा पाठवतो. मग स्लो मो मध्ये मसलधारी ह्रिथिकची एन्ट्री. (1चित्र=1000शब्द तसे हे 1ह्रिथिक=मोठीआर्मी असावे!) लांडगा पण त्याला भेदरून बघत राहतो. त्याला बहुधा जाणीव झाली असावी की काही संकट सिचवेशन आली की हा माणूस आपल्याला पुढे पाठवणार. Just a disposible animal I am! त्यामुळे तो ह्रिथिकला पाहून 'भौsss(वा वुफ)'सुद्धा करत नाही.
ह्रिथिक एकदम फ्लूएंट जपानीमध्ये बोलायला लागतो त्याच्याशी. त्याची मौत बनून आलेलाय म्हणे! आता डायलॉगबाजी जपानीत असल्याने त्यात काही दम नाही. हिंदीत डायलॉग्ज जबरदस्त असतात. (आठवा, डुप्लिकेटमधला गुलशन ग्रोव्हर. 'मेरे हाथ मे मौत की रेखा ही नही है' वगैरे!) ह्रिथिक स्टाईलमध्ये दोन पिस्तुलं काढतो. तर व्हिलन म्हणतो, हे आमचं पवित्र स्थळ आहे, इथे बंदुका नाही वापरत आम्ही. आता ह्रिथिकला म्हणता आले असते की, 'तू नसशील वापरत, पण मी वापरेन.' तसंही कोण तिथून जगून वाचून बाहेर ह्रिथिकची चुगली करायला जाणार आहे? पण तसे केले तर त्याच्या मसलांचे शक्तिप्रदर्शन कसे होणार? मग अचाट मारामारी होऊन ह्रिथिक उडत्या हेलिकॉप्टरच्या पायलटला गोळी घालून (बर्थडे बॉयला गोळी खाण्यातून सवलत मिळते), ते त्या बर्थडेस्थळी क्रॅश करवून पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आणि वाचलेला लांडगा त्याच्या बाजूला येऊन बसतो.
एवढं पाहून मला फार शीण आला, मग तो सिनेमा थांबवला. आज थकवा गेला तर पुढे पाहीन.
*ही ओळ कुठल्या मालिकेच्या टायटल ट्रॅकमधली आहे हे तुम्हांला लगेच ओळखू नाही आले तर तुम्ही ट्रू 90स किड नव्हेच!
लांडगा पण त्याला भेदरून बघत
लांडगा पण त्याला भेदरून बघत राहतो. त्याला बहुधा जाणीव झाली असावी की काही संकट सिचवेशन आली की हा माणूस आपल्याला पुढे पाठवणार. Just a disposible animal I am! त्यामुळे तो ह्रिथिकला पाहून 'भौsss(वा वुफ)'सुद्धा करत नाही. >>
धमाल लिहीलंय.
अगदी अगदी हेच मनात आलेलं. ते जपानी लोक नवशिके कुंगफूपटू असतात. ऋत्विक रोशन सूक्ष्म हालचाल करून तलवारीचे वार चुकवत असतो. ब्रुसलीच्या काळात हा असता तर त्याने शरणागती पत्करली असती. दक्षिणेच्या अचाटनायकांनी शिषत्व पत्करलं असतं आणि अम्ताभ बच्चन शराबी मधली कमेण्ट्री पडद्यामागून करत बसला असता.
"सामने से दो आयेंगे,लेकीन करेंगे कुछ नही. करेगा पीछे से आनेवाला " छाप मारामारी. मांडीत पाच बोटांचे धारदार आकडे रूतून बसल्यावरही "काही नाही काही नाही, बारीक मुंगी चावली" हे लहान इंजेक्शन करताना मुलांना सांगतात तसे भाव हृत्विक च्या चेहर्यावर होते.
मधे आमच्याकडे कुठला पिक्चर
मधे आमच्याकडे कुठला पिक्चर सुरु होता चायनीज होते सर्व, नाव विसरले. एका मुलाच्या वडलांना चिरतरुण रहायचं वरदान असतं, हातात सोन्याची कडी असतात, ते चुकीच्या मार्गाला जातात, त्यामुळे दुष्मन टोळी त्याच्या आईला मारते, ती माहेरची आदीवासी असते. तो पिक्चर इतका स्लो होता अर्थात नवरा थोडा थोडा करत असले पिक्चर्स बघतो, मी येताजाता. पहीला खूप वेळ बोअर आणि स्लो वाटला. नंतर एक छोटा क्युट पंखवाला प्राणी आला त्यात, तो प्राणी आल्यावर मला इंटरेस्टींग वाट्ला. तो प्राणी त्या मुलाला आजोळच्या एरीयात नेतो, तिथे आदीवासी समाज असतो, त्यात मावशी असते त्याची. तिथल्या काही आदिवासी बाया आपल्या सलवार कुडता सारखे ड्रेसेस घालतात, एकदम भारतीय वाटले ते कपडे.
श्रद्धा, ज्या पॉइंटला तुम्ही
श्रद्धा, ज्या पॉइंटला तुम्ही मूव्ही थांबवला, तिथेच मी सुद्धा थांबलो. ह्यापुढे जायचा पेशन्स नव्हता.
श्रद्धा
श्रद्धा
1चित्र=1000शब्द तसे हे 1ह्रिथिक=मोठीआर्मी असावे! >>>
मसलधारी ह्रिथिकची एन्ट्री >>>
इतकी वर्षे होऊनही "हीरो स्लो मो मधे येणार आहे. आपल्याला स्लो मो ची सक्ती नाही. त्याची स्लो मो संपण्याआधीच उडवा त्याला" असे ज्ञान कोणाही व्हिलनला आलेले नाही.
ह्रिथिक एकदम फ्लूएंट जपानीमध्ये बोलायला लागतो त्याच्याशी >>> वादिवाल्याशी की लांडग्याशी? यातले काहीही शक्य आहे. पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत बोलतात तर लांडग्यांशी जपानीत का नाही?
पहिले वर्णन वाचून चिनी की जपानी गेम ऑफ थ्रोन्स करायला गेले व कंटाळून त्यांनी ते मधेच सोडले, आणि तेच फुटेज वॉर-२ मधे वापरू असे ठरले असावे - असे वाटले. साउथ मधल्या अचाटपणाला हिंदीत फार जवाब मिळाला नव्ह्ता आत्तापर्यंत, तेव्हा यातून मिळेल असे त्यांना वाटले असेल. पण साउथ रिमेम्बर्स! ते यापुढेही जातील नक्कीच.
एकूण फ्लुएण्ट जपानीत बोलणे हे हृतिकच्या कॅरेक्टर्सचे व्यवच्छेदक लक्षण दिसते. आठवा "मोशी मोशी"! इंग्लंड मधे राहणारा भारतीय स्पेन मधे ट्रिपवर असताना जपानी क्लायंटशी बोलतो ते.
बर्थडेस्थळी बंदूक चालत नाही पण हेलिकॉप्टर क्रॅश केलेले चालते असे दिसते यातील लॉजिकनुसार.
टायगर श्रॉफ यात नाहीच आहे की आला नाही अजून? वॉर -१ मधेही हॉस्टाइल परदेशात घुसून टेररिस्ट लोक पकडले की लगेच त्यांना तेथून उचलून देशात आणण्याऐवजी तेथेच फायटिंग करणारे कमांडोज असतात ना ते? उगाच "मसलधारी" झालोय का, असे म्हणत असतील
इतकी वर्षे होऊनही "हीरो स्लो
इतकी वर्षे होऊनही "हीरो स्लो मो मधे येणार आहे. आपल्याला स्लो मो ची सक्ती नाही. त्याची स्लो मो संपण्याआधीच उडवा त्याला"
<<<<< तसे करताना उसूल आडवे येतात. ह्रिथिकपण कुठे सुरुवातीलाच पिस्तुलं वापरतो? उसूल मोडणे म्हणजे महापाप! कारण हे उसूल अगदी राजा रतनसिंग (पद्मावत फेम)च्या काळापासून अस्तित्त्वात आहेत.
वादिवाल्याशी की लांडग्याशी? यातले काहीही शक्य आहे. पाळीव कुत्र्यांशी इंग्रजीत बोलतात तर लांडग्यांशी जपानीत का नाही?
लांडग्याचे नाव म्याकमिलन असते तर ह्रिथिक नक्की जपानीऐवजी इंग्रजीतून बोलला असता त्याच्याशी...
<<<<<<
(यू आर कनी व्हेरी व्हेरी गुड वुल्फ बरं का म्याकमिलन...)
तसंही तो वादिवाल्याशी बोलतो म्हणा जपानीत.
टायगर श्रॉफ यात नाहीच आहे की
टायगर श्रॉफ यात नाहीच आहे की आला नाही अजून?
<<< वॉर1मध्येच टायगर श्रॉफचा रोल वॉरला होता. त्यामुळं नसावा तो.
(Yrf माने - अरे वा, म्हणजे काय? येणार ना टायगर.. वाट बघा!)
श्रद्धा *जस्ट मोहब्बत - मी
श्रद्धा
*जस्ट मोहब्बत - मी नाईन्टीजचीच किड आहे. 
धमाल पोस्ट. कुत्री बायलिंग्वल असू शकतात- माझं आहे. त्याला कामापुरते मराठी व इंग्रजी दोन्ही कळते. कामापुरते - पोटापुरते. मेंदू पर्यंत कधी जात नाही. पहिला 'वॉर' असह्य झाला होता म्हणून दुसरे महायुद्ध पाहिले नाही पण तू नेटफ्लिक्स वसूल करत राहा. निॲन्डरथलांची मारामारी वाटते, असे सिनेमे म्हणजे.
फा
एवढं पाहून मला फार शीण आला,
एवढं पाहून मला फार शीण आला, मग तो सिनेमा थांबवला

म्याकमिलन
>>>>
Pages