चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संतोष - It was also selected as the UK's entry for Best International Feature Film at the 97th Academy Awards, making the December shortlist.

भारताला बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत Angry

ओटीटीवर संतोष आहे पण त्यात शत्रुघ्न सिन्हा, मनोज कुमार, हेमा मालिनी आणि प्रेम चोप्रा दिसताहेत. Proud
क्रांतीचा दुसरा भाग आहे वाटतं.

भरत, मैने भी ऐसेईच बोला था इदर एकबार! उलट प्रदर्शन मांडतात. मुद्दाम अवहेलना होईल अशा गोष्टी निवडून पेट्रनाईझ करतात, हे त्यांचे स्वतः बद्दलचे 'फील गुड' असते. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पुरस्कारांमधे ही एकच गोष्ट सर्रास असणं हेच संशयास्पद आहे.

'संतोष' बद्द्ल काहीही माहिती नाही जनरली लिहिले आहे. संतोष लिहिले की जुवेकर दाखवू लागले ऑटोकरेक्ट. Happy

ओटीटीवर संतोष आहे पण त्यात शत्रुघ्न सिन्हा, मनोज कुमार, हेमा मालिनी आणि प्रेम चोप्रा दिसताहेत >>> Lol आठवला - पाहिलेला नाही पण नाव पाहिले होते कधीतरी. आता तो कोणत्या ओटीटीवर आहे ते सांगा.

संतोषची माहिती विकीवर आहे. त्यावरुन त्याला रिलिज लेटर का मिळू शकले नाही हे कळते. शक्य तितके सगळे इश्युज एकत्र कोंबण्याचा प्रयत्न आहे. बाहेरच्या मिडियाला इन्डिया जसा दिसतो तसा चित्रपटात आहे.

सन ऑफ सरदार 2 पाहिला काल... (पहिला नव्हता पाहिला)
सुरुवात पाहून नमस्ते लंडन 2 लागलाय का असं वाटलं, पण नंतर लाइन वर आला. विमल देवगण कधी भाबडा (read बावळट) कधी डॉशिंग् आहे. मृणाल ठाकूर आणि ग्रुप पाकिस्तानी असल्यानी काही खोट काढायला जागा मिळणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतलीये. स्टोरी वगैरेचा विचार ना त्यांनी केला आहे, ना आपण करायचा.

हे असले सिनेमे थिएटर ला चालतील असा विचार तरी कसा डोक्यात येत असेल देवगण जाणे...

मलाही बघायचाय. सिद्धांत चतुर्वेदी छान काम करतो. त्याला अजुन चित्रपट मिळायला हवेत.

विमल देवगण कोण ते आठवेना. मग कुजलेले दात आठवले. Happy
त्याचा मार्लबरो मॅन झाला नाही म्हणजे मिळवले Happy

संतोषचं दिग्दर्शन संध्या सुरी नामक ब्रिटिश नागरिकाने केले आहे. कामसूत्र, स्लमडॉग मिलिनेयर वाली मीरा नायर अमेरिकन. फायर , अर्थ , वॉटर वाली दीपा मेहता कॅनडी. यांच्या जोडीला आता लेखक अभिजात जोशी आला आहे. अमेरिकेत राहून संजूबाबा, पीके , मुन्नाभाई, देशद्रोही सोनम वांगचुकवर थ्री इडियट्स असले सिनेमे लिहितो. या लोकांकडे OCI कार्डस असतील , तर आतिश तासीरचं केलं तशी रद्द करायला हवीत.

त्याचवेळी इंग्लडं अमेरिकेतल्या ब्लॅक लाइव्ह मॅटर सारखा घटनांवर आपल्या विवेक अग्निहोती, सुदिप्तो सेन, कंगना, रणदीप यांच्यासारख्या नॅशनलिस्ट फिल्म मेकर्सनी फिल्म्स बनवायला हव्यात आणि आपण त्या ऑक्सरला पाठवयाला हव्यात.

झाला पाहून धडक २.
हा तोच करण जोहर आहे का असा प्रश्न पडावा ! इतका चांगला सिनेमा बनवून जर तो चालणार नसेल तर मग कजो जे करतोय ते योग्यच आहे असं वाटलं. तृप्ती डिमरीला बुलबुल मधे पाहिलेलं. नंतर ती वाहवत गेली, पण यात तिचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. ती उत्कुष्ट अभिनेत्री आहे. ग्लॅमरस भूमिका हा नाईलाज आहे हे दुर्दैव. अभिनव चतुर्वेदीने अभिनय केलाय असे वाटलेच नाही. तो ओटीटीचाच चेहरा आहे. कॉलेजवयीन वाटतो म्हणून त्याचं कास्टींग अचूक झालंय आणि त्याने न्याय पण दिला आहे.

आवडला असं नाही म्हणवत. अस्वस्थ केलं. शेवट सुखांत आहे हे बरं आहे. पण जर तसा नसता तर जास्त प्रभावी झाला असता.

धडक २ बघितला. खुप आवडला. समोर जे घडते ते आपल्याला निशब्द करते असे प्रसंग खुप आहेत. माणुस दुसर्‍याला माणसासारखा वागवत नाही हे जे हजारो वर्षे जगात चालत आलेय ते आजही जगभर तसेच सुरु आहे याचा कितीही विषाद वाटला तरी ही परिस्थिती आपण तसुभरही बदलू शकत नाही.

चित्रपट सुखांत केला ते बरे केले. निदान चित्रपटात तरी लोकांना दोन घटका सुखाच्या लाभुदे. दु:खांत केला असता तर यासारख्या अनेक चित्रपटांसारखा हा एक असे वाटले असते.

धडक नावच का रिपिट करावेसे वाटले कळले नाही. पहिला धडक चित्रपट म्हणुन बेकार होता. हा खुप छान बनलाय. सिद्धांत चांगले काम करतो. तृप्ती डिमरीनेही चांगले केलेय पण दात दाबुन बोलते. लिप जॉबमुळे बोलायला त्रास होतोय असे वाटले.

अनघा, बरोबर सिद्धांतच.

धडक नावच का रिपिट करावेसे वाटले कळले नाही. पहिला धडक चित्रपट म्हणुन बेकार होता. >> हा प्रश्न मलाही पडला. इथेच वाचून धडक १ न पाहण्याचा निर्णय घेतला होता. संगीताचे डिपार्टपेण्ट ढेपाळले आहे. कहाणीला साजेशी गाणी असली तरी एकही लक्षात न राहणारे आहे. याचा ओरिजिनल साऊथचा आहे कुठलातरी. तो बघायचा आहे.

होमबाऊंड चांगला आहे. पण त्यातही थोडा धडक २ आहेच. असे चित्रपट लागोपाठ बघणे शक्य नाही. अधून मधून आरसा दाखवलेला चांगला. रोज रोज दाखवला तर काही वाटेनासे होईल. मनोरंजन ही पण गरज आहेच.

धडक-२ दिसुनही बघितला न्हवता. कारण सैराटच्या तुलनेत धडक अगदीच बंडल वाटलेला. आता एक चालतंय तर त्याचीच फॅक्टरी म्हणून धडक-२ काढला असेल समजुन दुर्लक्ष केलेलं.
आता बघेन.

धडक 2 पाहिला नाही अजून, कारण सध्या नेटफ्लिक्स गंडले आहे. पण चांगला दर्जेदार आहे याची कल्पना होती. कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही वगैरे लोकप्रिय चित्रपटांवर जळणारे टिपिकल मेसेज फिरताना बघायचो. हे लोकं बघत स्वतःही नाहीत आणि अमुकतमुक चांगले चित्रपट चालत नाहीत म्हणून गळे काढत राहतात.

कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही वगैरे लोकप्रिय चित्रपटांवर जळणारे टिपिकल मेसेज फिरताना बघायचो. हे लोकं बघत स्वतःही नाहीत आणि अमुकतमुक चांगले चित्रपट चालत नाहीत म्हणून गळे काढत राहतात. >>> हे असे स्टेटमेण्ट स्किप करायला पाहीजे, पण सतत असा झेंडा पाहून राहवत नाही. सॉरी.

कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही >>> असं कुठलंही वाक्य मायबोलीवर नाही. मी पाहिलेलं नाही असं नाही, आताच ते दिसलं. अन्य ठिकाणीही नाही पाहिलेलं. धडक १ वर मायबोलीवर सडकून टीका झाली आणि सर्वत्र तेच मत पाहिले आहे. वर्तमानपत्रातही पाहिले आहे. तो जर सैराटचा रीमेक असेल तर वेगळा असूच शकत नाही. इन्स्पायर्ड असेल तर तसे म्हणायला पाहीजे. त्यामुळे असे मत मांडणारे व्हिलन असतात हा तुमचा शोध असेल.

हे लोकं बघत स्वतःही नाहीत आणि अमुकतमुक चांगले चित्रपट चालत नाहीत म्हणून गळे काढत राहतात >>> अशी आकडेवारी किंवा सर्व्हे आहे का ? जसं तुम्हाला काहीही मत मांडण्याचा अधिकार आहे तसा सर्वांनाच आहे.

अमूक एक चित्रपट चालतो तर चांगले का चालत नाही असे मत मांडणे म्हणजे देशविरोधी काम नाही. ते नक्षलवादी, दहशतवादी नसतात. हे पण मत असू शकतं. तुम्ही लोकप्रिय चित्रपटात आर्थिक/ बौद्धीक गुंतवणूक करत असाल तर मग तुमची तळमळ समजू शकते. जोपर्यंत असे चित्रपट बनवू नका म्हणून मोर्चे जात नाहीत तोपर्यंत असे मत मांडायचा अधिकार तुमच्यासहीत सर्वांना आहे.

सॉरी, हे स्किप करता आले असते. पण शेवटचं. पुन्हा असे मत दिसले तर दुर्लक्ष करणार.

मला सैयारा बंडल वाटलेला. म्हणजे वरच्या प्रतिक्रिये प्रमाणे धडक-२ आवडेल का? Lol अ->ब आणि ब-> क ---- अ-> क आवडलाच पाहिजे आता. Lol

मायबोलीवर इनमिन ५० ते ६० लोक सक्रीय असावेत असं मतदानावरून वाटतं. Lol
सर्वांची सर्व मतं तोंडपाठ असतात. मग एव्हढ्या कमी ट्राफिक मधे आपलं एखादं विचित्र बेअरिंग घेतलेलं मत सातत्याने मांडत राहणे यासारखा ध्यास नाही दुसरा. Happy

कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही >>> असं कुठलंही वाक्य मायबोलीवर नाही.

>>>>>>

मायबोलीवर असे मी लिहिले आहे का?
मायबोली पलीकडे फार मोठे जग आहे...
आणि हो, ऋन्मेऽऽष पलीकडे सुद्धा जग आहे Happy

धडक आताच पाहून संपवला.
चित्रपट उत्तम बनवला आहे. जे पोहोचवायचे आहे ते पोहोचवतो असे वाटले. स्पेशली काही दृश्ये आणि संवादातून.. कुठली ती नंतर लिहेन.

माझे सुद्धा इंटरकास्ट लग्न असल्याने बरेच गोष्टी रिलेट होणाऱ्या होत्या. त्यामुळे साहजिकच असे चित्रपट बघताना माझा दृष्टिकोन इतरांपेक्षा जरा वेगळा राहतो.
पण यावेळी लेकीला सुद्धा चित्रपट दाखवला. किंबहुना तिलाच झोप येत नसल्याने सोबत बघायचा होता. पण या निमित्ताने तिलाही चार गोष्टींचे ज्ञान मिळाले. तर थोडे मी दिले. आजपर्यंत या जगापासून ती अनभिज्ञ होती.

एकूण चित्रपट आणि या अनुभवावर नंतर सविस्तर आणि स्वतंत्र धाग्यात लिहेन.

धडक १ मी पाहिला नव्हता. कारण सैराट सारखाच आहे तर तो बघितला असताना हा पुन्हा का बघा असे वाटले आणि त्यातले कलाकार स्पेशली जान्हवी कपूर मध्ये त्या भूमिकेला न्याय द्यावे अशी अभिनय क्षमता नव्हती असे मत होते. पण ज्यांना धडक १ आवडला नसेल तरी ते विसरून हा पाहायला हरकत नाही.

मला सैयारा बंडल वाटलेला. म्हणजे वरच्या प्रतिक्रिये प्रमाणे धडक-२ आवडेल का?
>>>>

आपापल्या जॉनर मध्ये दोन्ही चांगलेच आहेत. मला दोन्ही जॉनर आवडतात. मला दोन्ही आवडले Happy

मायबोलीवर इनमिन ५० ते ६० लोक सक्रीय असावेत असं मतदानावरून वाटतं>>>>

लिखाणावरुन लोक ओळखता येतात, स्क्रोल करुन आयडी बघावी लागत नाही. पहिले वाक्य वाचले की पुढे वाचायचे की उडी मारायची हे कळते. ट्रोल्सना सहसा प्रतिसाद द्यायचेच नाहीत असे माझे धोरण आहे, तो मोह व्हावा असेच ते लिहित असतात. आपल्या संयमाची आपणच परिक्षा घ्यायची Happy

धडक २ चालला की पडला माहित नाही. मी सग़ए ओटिटि वर पाहते.

धडक २ बघा. आरक्षण, त्याची गरज आणि आरक्षित लोकांचे आयुष्य खुप संयतरित्या मांडलेय, आक्रस्ताळेपण न करता.

माझ्या नशिबाने मला कधी कसलीच झळ बसली नाही, त्यामुळे दुसर्‍यांच्या झळा त्यांना कशा जाळतात ते माझ्यापर्यंत फक्त दुसर्‍यांच्या अनुभवातुन पोचले. धडक २ हा अनुभव आपण तिथे त्यांच्यात बसुन घेतल्यासारखा वाटतो. मसानच्या वेळेसही असेच वाटले होते.

शेखरचे पात्र जरा ग्रे वाटले. असे लोकही असतील, मी कुठे काय जग पाहिलेय. त्याचा शेवट कळला नाही.

धडक १ बघितला नाही, धडक २ बघितला.

आवडला.

सिद्धांत गली बॅाय नंतर आता कुठे रोल या एका मधे छान वाटला. बाकी मधे आलेले त्याचे कोणतेही चित्रपट बरे वाटले नव्हते. अन्यना पांडे सोबत जो Netflix वर आलेला एक होता, तो त्यातला त्यात बरा वाटला होता.

धडक२ अधे मधे थोडा स्लो वाटला. पण तरी छान आहे. मुद्दा पोचतोच.

मी प्रवासात तुकड्या तुकड्यात बघितला तरी त्या चित्रपटाचा परिणाम जाणवला. परत बघेनच. मुले थोडीशी मोठी असती तर त्यांनाही आवर्जून दाखवला असता.

मागे एक चित्रपट(?) आला होता त्यात चार की पाच छोट्या छोट्या स्टोरीज होत्या. करण जोहर ने त्यात एक नाच आवडणाऱ्या छोट्या मुलाची गोष्टीचे दिग्दर्शन केले होते. त्या वेळेस तो “box office चे प्रेशर नसते तेव्हा खूप काही करता येते” या अर्थाचे काहीतरी म्हणाला होता. असे आठवते.

आता सहज गुगल केले तर धडक२ ला IMDb rating 6.8 दाखवत आहे.

धडक २ चे दिग्दर्शन शाझिया इकबाल हिने केले आहे.
करण जोहरचे नाव वर दोनतीन पोस्ट मध्ये वाचले. पण तो धडक २ चा दिग्दर्शक नसून निर्माता आहे. कुठल्या गैरसमजातून त्याला दिग्दर्शनाचे श्रेय नको जायला. आधीच Ba***ds of Bollywood चे आयते मिळत आहे ते पुरेसे आहे Happy

लिखाणावरुन लोक ओळखता येतात, स्क्रोल करुन आयडी बघावी लागत नाही. पहिले वाक्य वाचले की पुढे वाचायचे की उडी मारायची हे कळते. ट्रोल्सना सहसा प्रतिसाद द्यायचेच नाहीत असे माझे धोरण आहे, तो मोह व्हावा असेच ते लिहित असतात. आपल्या संयमाची आपणच परिक्षा घ्यायची >>> बरोबर आहे. हेच करतो आपण सगळे जण. पण त्यामुळं अशा लोकांना वाटतं आपल्या नादाला कुणी लागत नाही. यांना सपोर्ट करणारेही असतात. आपण काहीही मत मांडा यांचा तो झेंडा सुरूच होतो. एकदा तरी विरोध करणे गरजेचे आहे असे वाटले. यांचं जे काही मोठं जग असेल तिकडे का नाही मत मांडत असे लोक कळत नाही. उद्या लोक जेल मधे असे असे म्हणतात, मेंटल हॉस्पिटल मधे असे म्हणतात म्हणून इथे प्रतिक्रिया देत बसतील. ज्याचे त्याचे मोठे जग त्याला त्याला लखलाभ. Happy

Pages