चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त पिक्चर आहे. हलकाफुलका नाही.
>>>>
बरोबर.. आणि हे मला अर्धाअधिक पिक्चर झाल्यावर जाणवले. डोक्यात वेगळा जॉनर ठेवून बघत होतो आणि वेगळा निघतोय असे झाले.

Happy राकु म्हणजे राजकुमार. तो नार्सिसिस्टिक भूमिका करायचा, सातत्याने करायचा. संवाद, अभिनय सगळं. ते नार्सिसिस्टिट नरेश श्री श्री श्री राकु आहेत.
उदाहरणार्थ

ही माहिती खरेतर वरच चिकटवावी. Happy

फारेण्ड - तो डेटींग साईटचा पासवर्ड असतो असं मला वाटलं. फेसबुक वर पासवर्ड नसेल तरी प्रोफाईलवर गेल्यास फ्रेंडलिस्ट दिसते (अनलॉक्ड असेल तर). फोन हातात नसेल तरी नंतर ही माहिती काढता आली असेल त्याला.

माझे मन >> Lol भारी.
या पिक्चरची पिसं काढली तरी वाचायला आवडेल, आणि माझ्यासारख्यांनी जरा जास्तच अर्थ कसे काढलेत यावर विनोदी लिहीलं तर अजून आवडेल. Lol मला विनोदी लिहीणं जमणारं नाहीन, नाहीतर मीच लिहीलं असतं यावर. Happy

अस्मिता, फारेण्ड, साधना धन्यवाद आवडल्याबद्दल. Happy

मनोज वाजपेयीचा इन्स्पेक्टर झेंडे नेफ्लिवर येतोय. भाऊ कदम आहे यात. मवा आवडता आहे, पण ओटीटी वर भैय्याजी आणि एक असाच वाईट सिनेमा पण केलाय. इथेच रिव्ह्यू वाचल्यावर मग बघेन. Happy

सर्व प्रतिसाद वाचून, भाऊ, मी तर दोन्ही हात टेकले असल्यामुळे टंकता येत नाहीये.
stiff upper lip.
हाताची घडी तोंडावर बोट!

ह्म्म.. वॉइस कमांड द्या व टायपायला लावा म्हणणार होते पण तुम्ही हाताची घडी तों बो केल्यावर आता काय…

तिकडे रंगीलावर तरी लिहा…

केशवकुल,
लिहा तुम्हाला पटेल ते.
आपली मते बहुतांश लोकांसोबत जुळतात की नाही हे बघूनच जर लिहायचे ठरवणार असाल तर मला मायबोली सन्यास घ्यावा लागेल Happy

राकु म्हणजे राजेंद्रकुमार पण.
शिरीष कणेकर म्हणतात कि "दिलीपकुमार जर नट झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठेतरी पाणीपुरी विकताना दिसला असता. " कणेकरांची राजेंद्रकुमारशी स्पेशल खुन्नस असावी कारण त्यांच्या मुलाखतीत पण ते आवर्जून राजेंद्रकुमारवर घसरायचे.

मी मागे "करीब करीब सिंगल" पाहून त्याचा चांगल्यापैकी निगेटिव्ह रिव्ह्यू इकडे मायबोलीवरच टाकला होता. पण आता तो सापडत नाहीये अजिबात. तो कसा शोधता येईल?

माबो शोध सुविधा वापरून नाही येते शोधता.

कणेकरांची राजेंद्रकुमारशी स्पेशल खुन्नस असावी..
>>>>

राजेंद्र कुमार ज्युबिलीस्टार म्हणून ओळखला जायचा. अभिनयात इतका ग्रेट नव्हता पण तरीही त्याला यश मिळायचे. यामुळे देखील जेलसी प्रॉब्लेम असेल बरेच जणांना.. हुमायून नेचर आहे ते Happy

अर्थात हे एक कारण असते म्हणून या केसमध्ये सुद्धा तेच असेल असे नाही. काही वाजले सुद्धा असेल त्यांच्यात..
त्यासाठी राजेंद्रकुमारने कणेकरांना कधी पलटून उत्तर दिले का हे बघायला हवे.

करीब करीब वर हे सांगायचं राहिलंय ते नाही सांगितलं तर बोटात दुखेल .

तिला झोप येण्यासाठी पिल्स घ्यावे लागतात, आणि याला लगेच झोप लागून घोरायची सवय असते. थोडक्यात बरंच काही.
शीर्षक कॅज्युअली दिलंय असं वाटतं, पण ते तर जिस्ट आहे. १००% सिंगल नाही. सिंगल होण्याकडचा प्रवास आहे.

Thank you so much श्रमाता. लब्यू.

तर.. २०२० मध्ये मी या सिनेमाचा लिहिलेला रिव्ह्यू..

इरफानची आठवण आली म्हणून 'करीब करीब सिंगल' बघितला (पहिल्यांदा). आवडला. स्टोरी प्रेडीक्टेबल असली तरी ती ज्या ढंगाने पुढे सरकते ते छान वाटतं. इरफान नेहमीप्रमाणे हटके आणि सच्चा वाटतो इथेही. हिरोईन कोण आहे माहीत नाही पण तिने काही ठिकाणी फार बोर केले आहे. तिचे विशिष्ट प्रकारे कॅमेरात डोळे रोखून बघण्याचे शॉट्स आहेत ते अतिशय कृत्रिम वाटतात. आणि ते एकदा नव्हे तर 3-4 वेळा आल्याने गुफप असावे असे लक्षात राहतात. तिचा नशेत असल्याचा अभिनयही सोसो वाटला. मे बी इरफान समोर असल्याने असेल.

*स्पॉयलर*

१. तिला योगी ने बिनकपड्याचे पाहिल्यावर ती भयंकर चिडलेली असते. असं असूनही ती त्याच्याबरोबर पुढे दिल्लीला जायला का रेडी होते? दरवाजा तिच्याचकडून उघडा राहिल्याने हे सगळं झालं हे तर तिला विमानात बसल्यावर कळतं.

२. 'आपके जिंदगी में किसीं और के लिये जगह हैं?' या प्रश्नाने मोटिव्हेट होऊन ती सगळ्यांना प्रामाणिकवाले फोन का करते? म्हणजे या प्रश्नाचे उत्तर शोधताना 'सगळ्यांशी खरं बोलून मोकळं व्हावं' चा संबंध कुठे येतो?

३. त्या शर्मा शी झालेली मीटिंग तर खूपच छान दाखवली आहे (जेवढी दाखवली तेवढी). मग तिथे असं काय घडतं की तिला शर्मा आवडायच्या ऐवजी योगीला सेम कंपार्टमेंट मध्ये पाहून ती एकदम लाजायलाच लागते आणि मग पट्कन त्याला प्रतिकात्मक हो पण म्हणून टाकते?

४. योगी / वियोगी कोण असतो शेवटी? त्याला मनमौजी दाखवण्यात फुटेज गेल्याने त्याचं प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड काहीही दाखवलेलं नाहीये. आयुष्याच्या या स्टेजला आणि वयाच्या 34 व्या वर्षी एकटी राहणारी जया त्याला त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी त्याला स्पष्टपणे न विचारता त्याच्या 'रॉयल्टीमुळे श्रीमंत आहे' या कथेवर विश्वास ठेवून पुढे जाईल असं वाटत नाही.

५. तिला जंगल सफारीवर भेटलेला माणूस तिला आवडलेला असतो. तर मग दुसरीकडे इरफानला ती डेटिंग साईट वर अजून का आहेस म्हणून का बोलते? त्या सफारी वाल्या गोऱ्याशी नंबर वगैरे शेअर करत नाही का?

टेक्नॉलॉजी एव्हढी प्रगत व्हायला पाहीजे कि व्हर्च्युअल थिएटर मधे सगळ्या मायबोलीकरांनी आपापल्या टाईमझोन मधे वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या वेळी सिनेमा पाहूनही त्यांना एकाच वेळी थिएटरमधे बसल्याचा फील आला पाहीजे . सिनेमा पाहताना अजिबात डिस्टर्ब न होता एकमेकांची मतं समजली पाहीजेत. स्क्रीनवरच आली तर मस्तच. ऐकू आली तरी छान, फक्त एका वेळी आलेल्या दोन ऑडीयो पोस्ट ऐकण्यासाठी कानाला वेगळं श्रवणयंत्र हवं. ते मायबोलीने बनवून विकावं. हवं तर शार्क टँक मधे जाऊन यावं.

या निमित्ताने शार्क्सना मायबोली माहिती होईल.

शिरीष कणेकर म्हणतात कि "दिलीपकुमार जर नट झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठेतरी पाणीपुरी विकताना दिसला असता. " >>>>>

लता व दिलिप ही कणेकरांची दैवते होती. राजेंद्र कुमार ज्युबिली स्टार झाला हे खरे असले तरी त्यामागे चित्रपटाचे संगीत व रफीचा खुप मोठा हात होता. उत्तम अभिनेता म्हणुन दिलिपकुमारचे नाव जसे घेतले जाई तसे राकुचे कधीही घेतले गेले नाही. राजेंद्र कुमारने दिलिप कुमारची नक्कल करत पुर्ण वाटचाल केली असे बरेच जणांचे व कणेकरांचेही मत होते. म्हणुन हे उद्गार.

दिलिप कुमार काय होता व त्याचा ऑरा काय होता हे आजच्या पिढीला सांगुन काय उपयोग? त्याचे लग्न झाले तेव्हा मोहम्मद अली रोडवर लोकांनी रस्तोरस्ती बिर्याण्या बनवुन आनंद साजरा केला इतकी त्याची क्रेझ होती असे कणेकरांनीच लिहिलेय.

आताच्या पिढीने दिलिपकुमारचे चित्रपट चुकुन पाहिलेच तर
तोंडातल्या तोंडात संवाद पुटपुटणारा नट अशी त्याची बोळवण करतील. पण त्याने किमान दोन पिढ्यांवर तरी राज्य केले, त्याचा भला मोठा फॅन वर्ग होता. हे प्रेम राजेंद्र कुमाराला लाभले नाही, तो कायम दिलिपकुमारची कॉपी म्हणुन ओळखला गेला.

अमिताभही दिलिपकुमारची नक्कल करतो असे दिलिपच्या फॅन्सचे मत होते. शाहरुखनेही तेच केले असे तेव्हा वाचले आहे. चालायचेच. लताही सुरवातीला नुरजहांसारखी गायची व मुकेश सैगलसारखा गायचा. ट्रांझिशनच्या काळात लोकांना नव्याची सवय होऊन जुन्याची धुंदी उतरेपर्यंत नव्यांनाही जुन्यांच्या वाटेवरुन थोडाकाळ चालावे लागते. यात कोणी चांगलेवाईट हा प्रश्न नसतो.

शिरिष कणेकरांनी लिहायची सुरवात केली तेव्हा ते फक्त लोकसत्तासाठी लिहायचे. विद्याधर गोखले लोकसत्ताचे संपादक होते तेव्हा रविवारचा लोकसत्ता हा एक सांस्कृतिक ठेवा होता. त्यांच्या काळातल्या रविवारच्या लोकसत्ताचा शब्दनशब्द मी वाचलेला आहे. कणेकरांचे एकुणएक लेख वाचलेत, एकही पुस्तक वाचलेले नाही. गोखल्यांच्या काळातल्या रविवारच्या लोकसत्ताचे अंक कुठे उपलब्ध असतील तर मी ते विकत घेऊन परत वाचेन.

ओह , कणेकरांनी लोकसत्तात पण लिहीलंय हे माहिती नव्हतं. घर सिनेमाचा किस्सा ऐकून ते इंग्लिश डेली मधे लिहायचे असाच समज झालेला.

राभु, ही लेट सेवेंटीज अर्ली एटीजमधली परिस्थिती आहे. तु आधीच्या जन्मात असणार तेव्हा Happy
कणेकरांनी लोकसत्तात साप्ताहिक सदरे चालवली. चित्रपटातील लोकांवर यादोंकी बारात हे सदर अनेक वर्षे चालले. त्याचे नंतर पुस्तक केले. त्यांनी कुठल्या अभिनेत्याच्या लेखाला काय शिर्षक दिले हेही मला आठवतेय इतक्या प्रेमाने मी त्यांचे सदर वाचायचे. शम्मी कपुरला पाहिले की आधी ‘जंगली जानवर बदतमिज’ हेच आठवते Happy

क्रिकेटमध्ये सुनिल गावसकर हे त्यांचे दैवत. सुनिल गावसकर आणि शालिमार चित्रपट एकत्र करुन खुपच दीर्घ दीर्घकथा लिहिली होती.

घर चित्रपट सदृष्य बातमी प्रकरणी त्यांना खुप मनस्ताप झाला. ते मराठी दैनिकात लेखक म्हणुन लिहित होते आणि वार्ताहर म्हणुन नोकरी इन्ग्रजी दैनिकात करत होते.

डॉगी असणार बहुतेक. म्हणूनच आता डॉगी आवडतात. Happy

घर चा किस्सा युट्यूबवर आहे. तो शोधताना एक इरसाल मुलाखत सापडली. Happy
मी कणेकर फॅन. अनेकांना आवडत नाहीत ते. Lol

त्या किस्श्यावर बर्‍याच वर्षांनी त्यांनी एक लेख लिहिलेला किंवा पुस्तक लिहिले होते. मी वाचलाय लेख पण कुठे ते आठवत नाही. यु ट्युबचे चित्रपट विषयक व्लॉग्स मी पाहात नाही. इकडुन तिकडुन गोळा केलेली अर्धवट माहिती असते बहुतांशी. फार थोडे ऑ थेंटिक माहिती देतात.

>>शिरीष कणेकर म्हणतात कि "दिलीपकुमार जर नट झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठेतरी पाणीपुरी विकताना दिसला असता. <<
लिस्ट मोठि आहे. त्यातला एक वान्नाबी शारुख आहे.. राजकुमारच्या लेवलचा...

मी कणेकर फॅन. अनेकांना आवडत नाहीत ते.
>>>>>>
हो, हे मी सुद्धा पाहिले आहे.
पण त्यात आश्चर्य नाही. जनरली अनपॉप्युलर ओपिनियन परखडपणे मांडणारी व्यक्ती बरेच जणांना आवडत नाही.
क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये याच कारणाने संजय मांजरेकर सुद्धा बरेच जणांना आवडत नाही.
ज्याचे त्याचे आपापले मत असते हे आपल्याकडे बरेच जणांना स्वीकारता येत नाही.

शाहरुख खान हा दिलीप कुमारची कॉपी करतो हे बरेच जण म्हणतात.
खरेही असेल. कल्पना नाही.
पण स्वतः शाहरुख खान ने मागे एका मुलाखतील याचा विचार केलेला आणि म्हटलेले माझ्यावर दिलीप कुमारचा बिलकुल प्रभाव नाही. माझ्यावर अमिताभचा प्रभाव होता, मी त्याची कॉपी करतो असे म्हणू शकतो.

अर्थात शाहरुख नंतर कित्येक जणांनी शाहरुखची कॉपी केली. प्रसिद्ध नावे घ्यायची झाल्यास शाहिद कपूर आणि माधवन..
पण हे कॉपी वगैरे म्हणून एखाद्या हिरोला कमी लेखण्यात काही अर्थ नसतो. ज्याचे त्याचे स्वतःचे टॅलेंट असते. आणि ज्याच्याकडे ते असते तोच इथे टिकतो.

बाकी दिलीप कुमारने जवान केला असता तर तो कसा वाटला असता याचा विचार करतोय Happy

शम्मी कपुरला पाहिले की आधी ‘जंगली जानवर बदतमिज’ हेच आठवते >>>
अगदी अगदी. पुस्तकात हेच शीर्षक होते. खरे तर कणेकरांची पुस्तक वाचून मीनाकुमारीच्या अभिनयाची महती समजली. कारण तोवर पाहिलेल्या चित्रपटातील मिकू सुजवट होती.

मी दिलीपकुमारच्या काळात जन्मलेलो नव्हतो पण वाचले आहे त्यावरून त्याच्या अभिनयाचा, मॅनरिझमचा इतका प्रचंड प्रभाव तेव्हा होता की नंतर आलेल्या अनेक लोकांच्या अभिनयात, सादरीकरणात वेळोवेळी त्याच्या खुणा दिसतात. अमिताभच्याही काही सीन्स मधे दिसतात ("शराबी" मधले काही सीन्स - मास्टर मयूरशी त्या नाटकी फाइटनंतर बोलताना). अमिताभने तो प्रभाव कधी नाकारला नाही. उलट तो त्याबद्दल आदरपूर्वक बोलत असे. पण त्याचे बहुतांश रोल दिलीपकुमारच्या रोल्सपेक्षा खूप वेगळे होते, त्याचे सादरीकरणही वेगळे होते.

शाहरूखच्याही आहे असे वाचले आहे. कदाचित देवदास ई मधे असेल. मी तो पाहिलेला नाही.

मला कणेकरांचे काही विनोद, संदर्भ आवडतात. पण न आवडलेलेही बरेच आहे. त्याचे कारण स्पष्टवक्तेपणा वगैरे नाही. कलाकारांवरची वैयक्तिक टीका जेथे आहे ते आवडत नाही.

“ मला कणेकरांचे काही विनोद, संदर्भ आवडतात. पण न आवडलेलेही बरेच आहे. त्याचे कारण स्पष्टवक्तेपणा वगैरे नाही. कलाकारांवरची वैयक्तिक टीका जेथे आहे ते आवडत नाही.” - +१ मला विनोदाचा ‘अपमान’ हा प्रकार आवडत नाही (म्हणूनच बरेचसे स्टँड-अप कॉमेडियन्स कंटाळवाणे होतात). कणेकरांचे काही विनोद, संदर्भ, त्यांनी दिलेली माहिती (माझ्याकडे त्यांची २-३ पुस्तकं सुद्धा आहेत), लता मंगेशकर, राजेश खन्ना, ओ. पी. नय्यर वरचं लिखाण आवडत असलं तरी वैय्यक्तिक टीका, अपमान नाही आवडत.

>>"शिरीष कणेकर म्हणतात कि "दिलीपकुमार जर नट झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठेतरी पाणीपुरी विकताना दिसला असता.">>
😂 😂 😂

मग ह्या न्यायाने "दिलीपकुमार जर नट झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठेतरी पाणीपुरी विकताना दिसला असता आणि शिरिष कणेकर त्याच्या हातगाडीच्या कडेला टांगलेल्या बादलीत ग्राहकांच्या बशा बुचकळुन त्या विसळताना दिसला असता" 😀
च्यामारी तो दिलीपकुमार काय आणि तो राजेंद्रकुमार काय, मला ते दोघेही कायम भंगार नटच वाटत आले आहेत. शिरिष कणेकर मलाही वरती फारएन्ड ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे ५०-५० वाटतात. पसंद अपनी अपनी और क्या...

च्यामारी तो दिलीपकुमार काय आणि तो राजेंद्रकुमार काय, मला ते दोघेही कायम भंगार नटच वाटत आले आहेत.
>>>

ऑन ए सिरीयस नोट, शाहरुखची जी एनर्जी आहे ती मला शमी कपूर जातकुळीतील वाटायची. दिलीप कुमारशी त्याचे नाव कसे जोडले जाते मला खरेच कळत नाही. कारण मला दिलीप कुमारमध्ये मी जेवढे काही त्याला पाहिले त्यावरून कधी तितका चार्म जाणवला नाही. बर कोणीतरी म्हटले तसे तोंडात पुटपुटल्यासारखे संवाद हे अगदी योग्य निरीक्षण आहे.

आणि हो, त्यालाच ट्रॅजेडी किंग म्हणायचे ना? शाहरुख ची स्टाईल कुठे ट्रॅजेडी चित्रपटवाली होती?

Pages