चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> चाकोरीत न अडकणारे बच्चनसारखे
आँ?! बच्चनचीही चाकोरीच बनून गेली होती की आणि आता सेकन्ड इनिंगमध्येही तेच झालंय.

सेकन्ड इनिंगमध्ये चाकोरी आहे हे मान्य पण पहिल्या डावात नव्हती. भूमिका एकच असायची बहुतेक वेळा - अँग्री यंग मॅन. पण शोलेतला जय, अमर अकबर अँथनी मधला अँथनी, डॉनमधला विजय किंवा सत्ते पे सत्ता मधला तो घारे डोळेवाला या सादरीकरणात किती विविधता होती!

मला मेट्रो इन दिनों आवडला. त्यातले नक्की काय आवडले सांगता येणार नाही पण बघताना पूर्ण एंगेज झालो होतो हे नक्की. तो गच्चीवरचा बॅण्ड बोअर होता पण बाकी म्युझिकल सारखी धाटणी आवडली. ती गाणी सादरीकरणाला मारक वाटली नाहीत. आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खानचा ट्रॅक मजेदार होता. बाकी दोन्ही ट्रॅक काही खास आवडले नाहीत. पण तरीही ते दाखवले जात असताना कधीही बंद किंवा फॉरवर्ड करावासा वाटला नाही.

"गुड्डू!" कॉमेण्ट कॅच केलीत का बाय द वे? Happy

आख्ख्या पिक्चरमधे भारतातील ठिकाणांचे पूर्ण Affluent रूप दिसले. हे बहुधा पहिल्यांदाच असेल. गरिबीचा, सर्वसाधारण लाइफचा लवलेशही दिसत नाही कोठे. बंगलोर, दिल्ली, मुंबई - तिन्ही शहरांत फक्त पॉश भागांतच सगळे घडताना दाखवले आहे. हे चांगले किंवा वाईट अशा अर्थाने नाही - फक्त एक इंटरेस्टिंग वाटलेले निरीक्षण. पहिल्या मेट्रो मधे कसे होते आता लक्षात नाही. बघायला हवा परत.

केकू आणि कुणीही -
नेटफ्लिक्सवर जेम्स वेब टेलिस्कोपवर- Unknown cosmic time machine नावाचा माहितीपट आला आहे, आवड असणाऱ्यांनी पाहून बघा. येथे अतुल यांचा धागाही आहे यावरचा. मी थोडाच वेळ पाहिला आहे आणि 'इंटेलेक्च्युअली डिमान्डिग' विषयांवर लिहायचा कंटाळा आला आहे.

आभार.
बघतो. अतुल ह्यांच्या धाग्यावर मीही काही प्रतिसाद दिले होते. ते आठवले.

इन्स्पेक्टर झेंडे नेफ्लिवर आला आहे. पाहिला.
वै.इ - निर्माता ओम रऊत, लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आहेत. काटेकोर बजेट, काटेकोर कल्पनाशक्ती, काको एफर्टस.
ना धड कॉमेडी,ना थ्रिलर. चांगले कलाकार आणि चांगला प्लॉट वाया घालवला आहे.

उन दिनोंका मेट्रो मला फार आवडला होता. त्यातलं इन दिनों, सिंगर केकेचं ओ मेरी जान प्रचंड आवडतं. शिशे-शाआ- केकेची स्टोरी, केके-कंगना-शर्मन स्टोरी मस्तच होती. इरफानने तर धमाल केली होती.

हो, तो गाण्यांसहित चांगला होता.
हे कडबोळं काय खाऊन तयार केलंय काय माहीत! Proud

>>> "गुड्डू!" कॉमेण्ट कॅच केलीत का बाय द वे?
नाही. तितकं बारीक काय, वरवरदेखील लक्ष ठेवणं अशक्य होत होतं! Proud

>>> गरिबीचा, सर्वसाधारण लाइफचा लवलेशही दिसत नाही कोठे
अरे गुड्डू आणि त्याच्या गर्लफ्रेन्डचा स्ट्रगल पुरेसा नव्हता का? शेअर्ड रूममध्ये पार्टीशन टाकून राहिले की ते.
अनुपम खेरचं घरही तसं मध्यमवर्गीय दाखवायचा प्रयत्न वाटला. त्यात तिथले सीन्स बळंच सेपिया टोनमध्ये वगैरे!
ते घर आणि ते नाटक आणि तो अनुपम खेरचा मेकअप आणि ते रीयुनियनचं गाणं की गाणी हा एक निराळा उच्छाद होता!
प्रत्येकच स्टोरीट्रॅक हा निराळा उच्छाद होता म्हणा! Proud

त्यांना ते 'सर्वसाधारण' बिलीव्हेबल पद्धतीने दाखवता आलं नाही. अफ्लुअन्ट पात्रांनी गंमत म्हणून 'चला गरीब होऊन बघू' म्हटल्यागत फेक वाटत राहिलं - हा प्रॉब्लेम आहे.

पहिल्या मेट्रोत मध्यम ते उच्चमध्यमवर्गीय पात्रंच होती, आणि सगळी बिलीव्हेबल वाटली होती.

तितकं बारीक काय, वरवरदेखील लक्ष ठेवणं अशक्य होत होतं! >> +१. तो बँड खड्यासारखा बाजूला काढला तर अर्ध्या तासात सगळे गुंडाळता आले असते. आदित्य रॉय कपूरचा एकट्याचा भाग तो थोडा सुसह्य होता. बाकी फक्त उच्छाद होता. एव्हढी चांगली स्टारकास्ट वाया घालवायला पण काहितरी स्पेशल लागते ! ह्यापेक्षा कजोलचा मा बरा होता असे म्हणायची वेळ आली रे देवा ! Wink

काजोलच्या मा मधले पारंब्या सोडणारे CGI भूत सारापेक्षा चांगला अभिनय करते. मला अजिबातच आवडत नाही सारा अली खान. शून्य प्रतिभा आणि चेहरा वेडावाकडा करत राहते, अधूनमधून किंचाळते. तिला टाईमिंगच जमत नाही. सगळं रॅंडम वाटतं तिचं.

मला अक्षरशः असह्य वाटला मेट्रो ईन दिनो. पूर्ण पाहताच आला नाही. कशाचा पायपोस कशाला नाही वाटू लागले तेही सहन केले असते पण गाण्यांनी 'थर्ड डिग्री' होऊ लागले.

चला गरीब होऊ >>> Lol फॅंसी ड्रेस मधे भिकाऱ्याचा रोल करणारा श्रीमंत मुलगा कसा दिसेल तशीच पात्रं केजोचीही वाटतात. अनुराग बासू मला आवडतो पण हे काही जमले नाही.

फक्त वाईट एवढ्याचसाठी की संपूर्ण पाहिला असता तर दणदणीत नावं ठेवता आली असती असे सेमी- गप्प बसावे लागले नसते. Happy

अफ्लुअन्ट पात्रांनी गंमत म्हणून 'चला गरीब होऊन बघू' म्हटल्यागत फेक वाटत राहिलं - हा प्रॉब्लेम आहे. >>> Lol

काजोलच्या मा मधले पारंब्या सोडणारे CGI भूत सारापेक्षा चांगला अभिनय करते. >>>
फॅंसी ड्रेस मधे भिकाऱ्याचा रोल करणारा श्रीमंत मुलगा कसा दिसेल तशीच पात्रं केजोचीही वाटतात. >>> Lol

पंकज त्रिपाठी गाडी चालवत घाईने कोठेतरी निघालेला असतो त्याच्या गाडीसमोर अली फजल येतो. तेव्हा चिडून त्याला तो "गुड्डू" म्हणतो Happy

पंकज त्रिपाठीने काम वाईट केले असे नाही पण तो मिसकास्ट आहे. कोंकणाला ड्रंक असतानाचा अभिनय जमलेला नाही. तिची ताकद नात्यांमधली गुंतागुंत व्यक्त करण्यात आहे, तसा तिला एखादाच सीन आहे. फातिमा मला फारशी आवडत नाही. अली फजल गुड्डू म्हणून भारी होता पण इथे काही खास नाही. मात्र आदित्य रॉय कपूर व सारा चा सगळा भाग मला आवडला. सारा मला खटकली नाही. (ती पुण्याची असते म्हणून नव्हे. आधीच सांगतो Proud ) नीना गुप्ताचा रोल खूप आवडला. अनुपम खेर ओके.

ते दोन बंगाली कोण आहेत? नीना गुप्ताचा नवरा आणि अनुपम खेरची मुलगी? ओळखले नाहीत. एका सीनमधे तिचा जुना मित्र तिला बोलायला सांगत असताना ती ट्राम मधे चढते व तो खालीच थांबतो. आता तेथे तो तिच्या सतत मागे लागायचे नाही म्हणून थांबतो हे समजले. पण कलकत्त्याच्या ट्रामचा एकूण वेग पाहता माझ्या डोक्यात चॅण्डलर कोट आला त्यावेळेस - "Oh no! she got into a tram. What are you going to do now!" Happy (टोनकरता इथे शेवटी बघा)

पण न आवडण्यासारखे बरेच असले तरी पिक्चर पाहताना मला तो बंद करावासा वाटला नाही हे नक्की.

>>ना धड कॉमेडी,ना थ्रिलर. चांगले कलाकार आणि चांगला प्लॉट वाया घालवला आहे.

ह्म्म ट्रेलर बघून अगदी हेच मनात आले होते. तरीपण बघेन. कदाचित फॅमिली मॅनवाल्या राज अ‍ॅन्ड डिके ने हा करायला हवा होता.

मनोज वाजपेयी आणि ओरीजिनल झेंडे सर यांच्यातली छोटी बातचीत पाहिली. ते ८८ वर्षांचे आहेत हे माहिती नव्हतं. आता कुणाच्या पॉडकास्टवर इ. झेंडे आधी येतात बघायचं. (की येऊन गेलेत अगोदरच कुणास ठाऊक.) मला त्यांची मराठीतून सविस्तर मुलाखत असली तर ऐकायला आवडेल.

शोभराजला पकडल्यावर झेंड्यांना खुप प्रसिद्धी मिळाली होती, शोभराज इन्टरपोलला हवा होता पण त्याला प्रत्यक्ष पाहणारे आणि त्यामुळे पाहुन ओळखणारे फारच थोडे होते ज्यात झेंडे होते असे तेव्हा वाचल्याचे आठवतेय. त्याला पकडण्यात यश येतेय असे वाटण्याचे क्षण झेंड्यांच्या आयुष्यात त्याआधी आले होते पण शोभराज दरवेळी तुरी देण्यात यशस्वी झाला. शेवटी झेंडे विजयी झालेच. तेव्हा खुप मुलाखती छापुन आलेल्या. आता पॉडकास्ट येतील. Happy आठवतेय ते लिहिले, चित्रपटात काय आहे देव जाणे.

मेट्रो जुना खुपच आवडलेला. गाणी आजही परत परत ऐकते. अशी रिपिट वॅल्यु असलेली गाणी फारशी नसतात हल्ली, केकेच्या जादुचाही रिपीट वॅल्यु असण्यात खुप मोठा हात आहे. लगे हाथ जुनाच परत एकदा पाहिन.

मेट्रोवरचे प्रतिसाद Lol …. मला काय ती सारा कधीच कोणत्याच ट्रेलरमधेही आवडली नाही. या ट्रेलरमधे पण वाईट होती. त्यामुळे नाही पाहिला. अस्मिताला सेमीगप्प बसावे लागले, मला मिनीगप्प. ट्रेलरवरुन किती लिहिणार!

तेव्हा खुप मुलाखती छापुन आलेल्या. आता पॉडकास्ट येतील >> ऑलरेडी खूप माहिती आली आहे. बहुतेक वातावरण निर्मितीसाठी असेल. पण त्यामुळं प्रेडिक्टेबल झाला. कदाचित ज्यांना चार्ल्स शोभराज माहिती आहे त्यांच्यासाठी नॉस्टॅल्जिया असू शकेल.

भाऊ कदमला का घेतलंय हे चिन्मय मांडलेकरांनी सांगावं. हंशा वसूल करणे हा हेतू असेल तर भाऊचा विनोद ओळखीचा असणार्‍यांना सुद्धा हसू येत नाही. मग जे पहिल्यांदाच बघणार आहेत त्यांना काहीच समजणार नाही.

बायकोला घाबरणारा नवरा ही घासून रटाळ झालेली कॉमेडी इथंही आहे. पण किमान ते प्रसंग तरी फुलवायचे. ते फक्त संवादात आहे. म्हणजे मवा साहेबांना (सचिन खेडेकर) सांगतो कि तो बायकोला (गिरीजा ओक) कमिशनर म्हणतो. मग साहेब घरी येतो तेव्हां तो विचारतो "कमिशनर ?" बास.

मवाचं कॅरेक्टर बावळट आहे कि हुषार हे समजत नाही. कुणाचंच कॅरेक्टर नीट नाही. चार्ल्स शोभराजचं कॅरेक्टर तर एकदम उपरी उपस्कर डेपो आहे. ट्रीटमेंट एकदम बालीश आहे. हिंदीतले श्रीमंत बाप आपल्या लाडावलेल्या मुलाला त्याच्या अठराव्या वर्षी फॅक्टरी काढून देतात तसं चिमा बाळासाठी ओम राऊत ने हा सिनेमा दिलाय असं वाटतं. त्यातल्या त्यात प्रेक्षकांना समाधान हेच कि स्वतः ओम राऊतने दिग्दर्शन केलेलं नाही. नाहीतर झेंडेची टीम गोव्यात दोर्‍या बांधून वरून झडप घालते अशी दृश्यं बघावी लागली असती.

इन्स्पेक्टर झेडे नावाचा मराठी सिनेमा बनवायला घेतला, मधेच नेटफ्लिक्स ने तयारी दाखवली म्हणून हिंदी केला असा फील येतो. मराठी प्रेक्षकांना एव्हढं वाईट गृहीत धरतात कि जर हाच सिनेमा मराठीत असता तर कौतुकाची स्पर्धा सुरू झाली असती.

फॅमिली मॅन च्या लोकप्रियतेमुळे मवाला कुटुंबवत्सल दाखवलं असेल तर तो ही प्रयत्न फसलाच आहे. सिनेमा पाहून मूड ठीक होण्यासाठी कदाचित ही लिंक उपयोगी पडू शकेल.
https://www.youtube.com/watch?v=vZU_t8H4B5w&list=RDvZU_t8H4B5w&start_rad...

स्वातीच्या बच्चनच्या कमेंटवर माधव यांचा प्रतिसाद आला पण फारेण्डचा नाही. Lol

भूमिका एकच असायची बहुतेक वेळा - अँग्री यंग मॅन. पण शोलेतला जय, अमर अकबर अँथनी मधला अँथनी, डॉनमधला विजय किंवा सत्ते पे सत्ता मधला तो घारे डोळेवाला या सादरीकरणात किती विविधता होती!>>>
Chupke chupke, कभी कभी, सिलसिला हे पण वेगळे होते, पटकन एवढेच आठवले. अजून बरेच आहेत.

मेट्रो इन दिनो बोअर झाला.

मी आणि बायकोने काहीतरी बघायचे म्हणून लावला. मी अर्धा (कसातरी) बघितला.
नाही आवडला.

Inspector Zende पळवत पळवत पूर्ण बघितला.
ना धड कॉमेडी,ना थ्रिलर. चांगले कलाकार आणि चांगला प्लॉट वाया घालवला आहे.>>>>+१

Maareesan (त्यातल्या त्यात) बरा आहे.

द थर्स्डे मर्डर क्लब बघतेय. पिअर्स ब्रॉस्नन व बेन किंग्ज्ले हे ओळखीचे चेहरे आहेत, दोघी बायाही टॉप क्लास… i love murder mysteries. अजुन काही नेफ्ली व जिओवर असतील तर सुचवा.

काजोल चा मां जो कुणी पूर्ण पाहील त्याला एखादं बक्षीस ठेवा संयोजक .

या दिव्यपटाच्या रिव्ह्यूच्या प्रतिक्षेत. हृदय बाहेर काढून हातात घेतल्यावर ते चालू असणं हे पाहून आता काहीही बघायचं शिल्लक नाही, या जन्माचं कर्तव्य पूर्ण झालं, निर्वाणाचा क्षण आला. जे जे बघतील असे आपण सगळे भेटूयात तिथे !

काजोल माँ मी शेवटचा अर्धा तास पाहिला.
तेवढा पाहिला तरी पूर्ण चित्रपट कळतो.
मला आधी वाटलेले काहीतरी अंधश्रद्धा असेल गावकऱ्यांची. पण खरी भूते होती. ती सुद्धा इतिहास भूगोल भूतकाळ असलेली.
ती भुते झाडाच्या फांद्यांचा वापर करतात तेव्हा मुंज्या आठवला. पण मुंज्या मजेशीर होता. त्यातले भूत अंगावर आले नव्हते किंवा सैतान सारखे याने अंधश्रद्धा वाढीस लागेल असेही वाटले नव्हते. मला आवडलेला तो. त्यातही त्यांची लव्हस्टोरी आणि ते एक गाणे इतके मस्त आहे की रोमँटिक फिल येतो. आणि भूत चवीला वाटते.
माँ मध्ये कसलाच फिल आला नाही. जेवढा मी शेवटचा अर्धा तास पाहिला त्यानुसार असे वाटले की मुलांना झोपण्यापूर्वी काहीतरी कथा बनवून सांगतो त्यातला प्रकार वाटला.

>>काजोल चा मां जो कुणी पूर्ण पाहील त्याला एखादं बक्षीस ठेवा संयोजक .

हाहा मीही पूर्ण बघूच शकले नाही. काहीही आहे.

कॉन्ज्युरींग लास्ट राईट्स रिलीज झालाय, उत्कंठा आहे कसा असेल याची.

>> आख्ख्या पिक्चरमधे भारतातील ठिकाणांचे पूर्ण Affluent रूप दिसले. हे बहुधा पहिल्यांदाच असेल. गरिबीचा, सर्वसाधारण लाइफचा लवलेशही दिसत नाही कोठे. बंगलोर, दिल्ली, मुंबई - तिन्ही शहरांत फक्त पॉश भागांतच सगळे घडताना दाखवले आहे. हे चांगले किंवा वाईट अशा अर्थाने नाही - फक्त एक इंटरेस्टिंग वाटलेले निरीक्षण. पहिल्या मेट्रो मधे कसे होते आता लक्षात नाही. बघायला हवा परत. <<

ती झोया अख्तरची प्राईम किन नेफी वरती का कुठेतरी एक सिरीज होती, तिचे नाव आठवत नाही. खूप एंगेजिंग पण सगळा affluent क्लास.

मित्र मैत्रिणींनो, पार्क चॅन वूक चा एक जबरदस्त चित्रपट आला आहे : नो अदर चॉइस. हे काही कोरियन मास्टर बॉन जू हू , ली चांगडोंग वगैरे, हे लोक म्हणजे मानदंड होऊन बसले आहेत.

एकाहून एकाहून सरस चित्रपट काढताहेत स्व:तच स्व : तशी स्पर्धा असावी तसे क्वालिटी चे एकेक स्तर चढत जातात.

हॉररचेच उदा. पाहा.

दि वेलिंग. २०१६ असो वा एक्स्युमा २०२४. हॉरर हा जानरा कशा कशाशी मिक्स करता येऊ शकतो आणि त्यातून राजकीय सामाजिक सिम्बॉलिज्म बटबटीत ना करता आणि कथेवर त्याचा कानमात्रही प्रभाव ना ठेवता कसे हाताळत येतात याचे उत्तम उदाहरण. अवश्य पाहा.

पडद्यावर गरीबी बघायला आवडत सुद्धा नाही. लहानपणापासून बघत आलोय. तीच पैसे खर्च करून का बघायची? अगदीच नाईलाज असेल तरच म्हणजे कथेची गरज असेल आणि जे दाखवायचे आहे ते श्रीमंत माणसांचे उदाहरण घेऊन दाखवणे शक्य नसेल तरच, गरीबी दाखवावी अन्यथा चित्रपट लार्जर दॅन लाईफच बनवावेत.

पूर्वी मी खूप चित्रपट पाहायचो (दिवसाला एक किंवा दोन) पण आता ते पाहणे जवळ जवळ ६९ टक्क्यांनी कमी केले आहे.

त्यामुळे इथे इतके चित्रपट पाहणाऱ्या लोकांचे खूप कौतुक वाटते.

काश जिंदगी मधे तेवढी शांतता लाभेल. परंतु मला असे वाटते की जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा ही शांतता पुन्हा लाभेल तेव्हा स्टेबल डिफ्यूजन आणि त्याहून सरस अशा गोष्टींनी उच्छाद मांडला असेल. मला सध्याच chatgpt आणि तशा टूल्स ने तयार केलेल्या इमेजेसचा अशक्य कंटाळा आला आहे. त्याच वेळेस मार्किट मधे अत्यंत प्रगत टूल्स येत आहेत. टेक्नॉलॉजी तर अत्यंत वेगाने पुढे जात आहे. अर्थात शेवटी वापरणारे हे प्रचंड मंदबुद्धी लोक असल्याने आणि क्रिएटिव, एक्सपर्ट लोक झपाट्याने कमी होत असल्याने एकूण आउटपुट खूपच सुमार असणार आहे. त्याची मला आत्ताच भीती वाटत आहे.

त्यामुळे मी चित्रपट आवर्जून पाहायचे पूर्णपणे बंद करणार आहे. माझ्या मते ती समूहकला राहणारच नाही.

मी परवा ट्रेन मधे एका मित्रांच्या जोडीला पाहिले. मी त्यांच्यासमोर दोन अडीच तास बसलो असेन. दोन तास ते एकमेकांशी इतक्या मन मोकळेपनाणे डिस्ट्रॅक्शन फ्री गप्पा हाणत होते. होते ते मिलेनियल्सच. पण या दोन अडीच तासात एकानेही त्याचा फोन तपासला नाही. त्यांच्या गप्पा स्वैर आणि प्रचंड वेगवेगळ्या विषयांवर सुरू होत्या. दोघेही एकदम पट्टीचे संभाषक असावेत. त्यात एकजण दुसऱ्याला काही गोष्टी देखील सांगत होता. माझी मात्र दोन तास फोन बरोबर चुळबुळ चालली होती. मला त्यांच्या प्रचंड हेवा वाटला. इतका काळ संवाद सस्टेन ठेवणे फक्त फोनपूर्व काळातच शक्य होते.

तेव्हा मला कळले की जाळाभोवती कथा सांगायच्या लेव्हलवर आपण पुन्हा लवकरच यायला धडपडणार आहोत. इतके आपण कंटेंट या गोष्टीला कंटाळणार आहोत.

>> पडद्यावर गरीबी बघायला आवडत सुद्धा नाही <<

अगदी बरोबर.

मला पण पडद्यावर गरिबी पाहायला जाणाऱ्या लोकांची खूप चीड येते. काही लोक तोंडात जर्मनचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना तोंडात किमान प्लॅटिनमचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांविषयीच सांगितले पाहिजे. तोंडात तांब्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांनी (हे कॉपर टी मुळे कदाचित खरेही होत असावे) तोंडात पितळेचा किंवा स्टेन लेस स्टीलचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांचे चित्रपट सुद्धा पाहू नयेत. चांदीचा किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना मात्र तोंडात लाकडाचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांचे चित्रपट पाहायची आजकाल खूप ऑर्गनिक खाज लागली आहे.

पडद्यावर हिरो हिरोईन सुरेल आवाजात विथ म्युजिक गाणी गातात, कोरिओग्राफ केलेल्या स्टेप्स जोडीने नाचतात. प्रत्यक्ष आयुष्यात कुठल्याही प्रेमी युगुलाला हे शक्य नाही हे आपल्याला माहीत असते. पण तरीही आपण त्यात लॉजिक न शोधता ते एन्जॉय करतो. कारण आपल्याला चित्रपट म्हटले की समोरचे चित्र छान प्रेझेंटेबल लागते. हिरो हिरोईन सुंदर लागतात. ओवरऑल आपल्याला नेत्रसुखद अनुभव हवा असतो. जो गरीबीत नाही तर श्रीमंतीत दाखवणे सोयीचे पडते.

Pages