चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हुलु'वर 'ओव्हरबोर्ड' हा जरा जुना मजेशीर चित्रपट पाहिला. रोमँटिक कॉमेडी. हीरोनी जास्त छान काम केलंय.
सध्या रोमँटिक कॉमेडी सिनेमा शोधुन शोधुन पहात आहे.

ती आणि इतर - गोविंद निहलाणींनी साफ निराशा केली.

गेम ओव्हर - नुसताच गोंधळ वाटला.

मिसिंग पाहिला. तब्बू आणि मनोज वाजपेयी. पण रहस्यमय बनवण्यासाठी जो काही गोंधळ घातला आहे तो आणि अन्नू कपूरला हुशार पोलिस अधिका-याच्या भूमिकेत बघून डोकं गरगरलं. शेवट चांगला आहे मात्र.

आज लेथ जोशी पाहिला झी मराठीवर. आवडला. मी शाळेत टर्निंग सेक्शनला (टर्नर) होतो त्यामुळे 8 वी ते 10 वी मॅन्युअल लेथ मशीन ऑपरेट केली आहे. आज कित्येक वर्षांनी लेथ बघितली. मशीन, बर, ते वातावरण एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. छान बनवलाय. नायक आणि लेथचे नाते, सी एन सी मशीन आल्यावर ऑटोमेशनमुळे लेथ स्क्रॅप झाल्यावर झालेली नायकाची घालमेल, घरची परिस्थिती, बायको, आई , मुलगा इ सगळं मस्त दाखवलंय. सर्वांनी छान अभिनय केलाय.

लेथ जोशीमध्ये नायकाला नविन काळाबरोबर, गती बरोबर जुळवून घेता येत नाहिये जे की त्याच्या बायकोने सहज साध्य केलय. म्हणून कदाचित शेवटच्या फ्रेम मध्ये त्याने तो काळा चष्मा घातला आहे .. अंधाराच, असहायतेच प्रतिक किंवा मला ह्या प्रगतीशी काही घेण देण नाही असा अ‍ॅटीट्युड . म्हणजे बाहेरच्या जगात काहीही होऊ देत, ते कितीही पुढे जाऊ दे, नायकासाठी ते बदल आत्मसात करण अवघड आहे किंबहुना त्याला ते जमणार देखील नाही आणि त्याला त्यात रसपण नाही.

इथे कुठेतरी Johnny Gaddar चा उल्लेख वाचला, काल पाहिला .
आवडला मला.नीनिमु चा पहिला चित्रपट आहे . तो दिसतो ही छान यात.

इरफानची आठवण आली म्हणून 'करीब करीब सिंगल' बघितला (पहिल्यांदा). आवडला. स्टोरी प्रेडीक्टेबल असली तरी ती ज्या ढंगाने पुढे सरकते ते छान वाटतं. इरफान नेहमीप्रमाणे हटके आणि सच्चा वाटतो इथेही. हिरोईन कोण आहे माहीत नाही पण तिने काही ठिकाणी फार बोर केले आहे. तिचे विशिष्ट प्रकारे कॅमेरात डोळे रोखून बघण्याचे शॉट्स आहेत ते अतिशय कृत्रिम वाटतात. आणि ते एकदा नव्हे तर 3-4 वेळा आल्याने गुफप असावे असे लक्षात राहतात. तिचा नशेत असल्याचा अभिनयही सोसो वाटला. मे बी इरफान समोर असल्याने असेल.

*स्पॉयलर*

१. तिला योगी ने बिनकपड्याचे पाहिल्यावर ती भयंकर चिडलेली असते. असं असूनही ती त्याच्याबरोबर पुढे दिल्लीला जायला का रेडी होते? दरवाजा तिच्याचकडून उघडा राहिल्याने हे सगळं झालं हे तर तिला विमानात बसल्यावर कळतं.

२. 'आपके जिंदगी में किसीं और के लिये जगह हैं?' या प्रश्नाने मोटिव्हेट होऊन ती सगळ्यांना प्रामाणिकवाले फोन का करते? म्हणजे या प्रश्नाचे उत्तर शोधताना 'सगळ्यांशी खरं बोलून मोकळं व्हावं' चा संबंध कुठे येतो?

३. त्या शर्मा शी झालेली मीटिंग तर खूपच छान दाखवली आहे (जेवढी दाखवली तेवढी). मग तिथे असं काय घडतं की तिला शर्मा आवडायच्या ऐवजी योगीला सेम कंपार्टमेंट मध्ये पाहून ती एकदम लाजायलाच लागते आणि मग पट्कन त्याला प्रतिकात्मक हो पण म्हणून टाकते?

४. योगी / वियोगी कोण असतो शेवटी? त्याला मनमौजी दाखवण्यात फुटेज गेल्याने त्याचं प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड काहीही दाखवलेलं नाहीये. आयुष्याच्या या स्टेजला आणि वयाच्या 34 व्या वर्षी एकटी राहणारी जया त्याला त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी अपफ्रंट विचारणार नाही.. त्याच्या 'रॉयल्टीमुळे श्रीमंत आहे' या कथेवर विश्वास ठेवून पुढे जाईल असं वाटत नाही.

५. तिला जंगल सफारीवर भेटलेला माणूस तिला आवडलेला असतो. तर मग दुसरीकडे इरफानला ती डेटिंग साईट वर अजून का आहेस म्हणून का बोलते? त्या सफारी वाल्या गोऱ्याशी नंबर वगैरे शेअर करत नाही का?

ऋषी कपूरचा शेवटचा म्हणून हौसेने द बॉडी पाहिला. बरा आहे पण प्रेडिक्टेबल आहे. ऋषी ने चांगला अभिनय केलाय पण इम्रानने ओकारी येईल असा टॉयलेट सीन केला आहे. याची खरंच गरज होती का असा प्रश्न पडला.

'पॅरासाइट' बघितला. जाम अंगावर येतो तो पिक्चर.

त्यात मला एक समजलं नाही, त्या ड्रायव्हरच्या अंगाला विशिष्ट वास येतो, शेवटी तो मालक नाक बंद करतो त्या अपमानाने तो ड्रायव्हर मारतो त्याला पण त्याआधी दोघे जवळ बसलेले असतात, रेड इंडियन अटायर घालून तेव्हा त्या मालकाला वास येत नाही, जवळ बसून गप्पा तर मारत असतात.

मला ती मुलगी आणि तो मालक गेल्याचे वाईट वाटलं. मला मालक family बद्दल सिम्पथी जास्त वाटली. ती जी गरीब कोरियन family रहात होती अगदी तशा नाही पण त्यासारख्या परिस्थितीत पूर्वी राहिल्याने थोडं रीलेट झालं.

नाहीरे ला आहेरे चं आकर्षण असणे चुकीचं काहीच नाही पण असं फसवणे पटलं नाही.

शेवटी त्या मुलाचा बदलेला attitude आवडला. मेहनतीने आणि कष्टाने पुढे जायचं ठरवतो.

त्या ड्रायव्हरच्या अंगाला विशिष्ट वास येतो, शेवटी तो मालक नाक बंद करतो त्या अपमानाने तो ड्रायव्हर मारतो त्याला पण त्याआधी दोघे जवळ बसलेले असतात, रेड इंडियन अटायर घालून तेव्हा त्या मालकाला वास येत नाही, जवळ बसून गप्पा तर मारत असतात.>>>>

माझ्या मते, आपल्या अंगाचा वास बॉसला आवडत नाही हे कळल्यावर बाप कपडे वेगळ्या साबणाने धुवून वास घालवतो. (बऱ्याच आधीच्या एका दृश्यात कुटुंब स्वतःच्या घरात असताना मुलीच्या तोंडी उल्लेख आहे की आता साबण बदलायला हवा)… जेव्हा बागेतली घटना घडते तेव्हा बॉसच्या मुलाची स्थिती गंभीर असते पण त्या आणीबाणीच्या परिस्थितीतही बॉसची वासाची संवेदना जात नाही आणि तो नाक दाबतो हे बघून बापाचा तोल जातो. अन्यथा त्याचे बॉस कुटुंबाबद्दल चांगले मत असते.

रातसासन - यु ट्यूब वर आहे नक्की बघा. खूप चांगला सस्पेन्स.

सर्चिंग - प्राईम किंवा नेटफ्लिक्स नक्की आठवत नाही. हरवलेल्या मुलीला बाबा तिच्या सोशल मीडियाच्या पाऊल खुणांवरून शोधून काढतो.

अननोन - नेटफ्लिक्स - एका मामुली अपघातानंतर एक माणूस स्वतःची आयडेंटिटी गमावतो ती का, पुढे काय होतं? नक्की बघा.

एक प्रेम कथा - दूरदर्शन ची सिरीज संपूर्ण उपलब्ध आहे यु ट्यूब वर.

किरदार - गुलजार ची सिरीज - यु ट्यूब वर अप्रतिम.

पण त्याआधी दोघे जवळ बसलेले असतात, रेड इंडियन अटायर घालून तेव्हा त्या मालकाला वास येत नाही, जवळ बसून गप्पा तर मारत असतात.>>>ड्रायव्हरचा नाही पण बेसमेंटमधे राहणारा माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा मालकाला त्याचा वास येतो आणि तो नाक बंद करतो. ते पाहून ड्रायव्हर चिडतो.

ड्रायव्हरचा नाही पण बेसमेंटमधे राहणारा माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा मालकाला त्याचा वास येतो आणि तो नाक बंद करतो. ते पाहून ड्रायव्हर चिडतो. >>> हो का. परत नीट बघायला हवा तो सीन पण खुनाखुनी असल्याने बघवणार नाही.

कुठल्याही कारणाने मालकाचे चुकलं असलं तरी असा जीव घेणं पटले नाही, हवं तर दोन ठेऊन द्यायच्या.

चित्रपट सांगा:
मोहन जोशी, मोहन आगाशे, माधुरी, शबाना आझमी बहुतेक...
शेवटी माधुरी गोळी झाडून व्हिलन (कदाचित मोजो किंवा मोआला ठार करते. माधुरीने पांढरी साडी.. यात दिल चाहता है मधला प्रियचा फीऑनसे पण आहे

रातसासन - यु ट्यूब वर आहे नक्की बघा. खूप चांगला सस्पेन्स.》》》》 Its good psycho thriller. पण नेहमीप्रमाणे, southy movie, शेवटचा अर्धा उगाच वाढवून psycho thriller चा इफेक्ट कमी केला आहे असे मला वाटले. साउथवाल्यांना मारा-मारी
With sp effect दाखवायला आवडत असावे. त्यामुळे मला शेवट फार अपेक्षित वाटला.

बेसमेंटमधे राहणारा माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा मालकाला त्याचा वास येतो आणि तो नाक बंद करतो. ते पाहून ड्रायव्हर चिडतो.>>>

हो, वास त्या दुसऱ्याचा येतो, मुलाला हॉस्पिटलात घेऊन जाण्यासाठी गाडी हवी, त्याची चावी बेसमेंटवाल्याच्या मृत शरीराखाली अडकते. मुलगा महत्वाचा असुनही वास आला म्हणजे बॉसच्या मनात त्या वर्गाबद्दल काय भावना होत्या हे लक्षात येऊन बापाचा तोल जातो. पण बॉस खरेच चांगला होता, वास येऊनही त्याने कामावरून कमी केलेले नसते..

अंगावर येतो हा चित्रपट. हे कुटुंब काहीतरी उचापती करून घरात प्रवेश मिळवते तोवर ठीक आहे. पण त्यांच्यामुळे ज्यांची रोजीरोटी बंद झाली त्यांच्याबद्दल थोडी तरी सहअनुभूती हवी. ते सुद्धा यांच्याच वर्गातले आहेत. तुम्हाला तुमच्या वर्गातील लोकांबद्दल काहीही वाटत नाही तर इतर वर्गातील लोकांनी तुमच्याबद्दल काही का वाटून घ्यावे? कुठेतरी विचारसरणीतील, आजूबाजूच्या समाजातील परिस्थितीतील फरक असावा असेही वाटले. कारण भारतात तरी एक गरीब सर्वसाधारणपणे दुसऱ्या गरिबाला मदत करतो. सार्वत्रिकीकरण अर्थातच करता येणार नाही पण रस्त्यावर भिकार्याला 1 रुपया टाकणारे श्रीमंत नसतात, एखादा गरीबच सहसा टाकताना दिसतो. कोरियातील लोक काय परिस्थितीत जगतात त्याचे हा चित्रपट एक द्योतक असावे.

ई, हो ना. डोळे बंद केले होते, जेव्हा काय घडणार त्याचा अंदाज आला तेव्हा. तरी कितीवेळ वाँक्क होत होते मनातुन.

पण त्यांच्यामुळे ज्यांची रोजीरोटी बंद झाली त्यांच्याबद्दल थोडी तरी सहअनुभूती हवी. ते सुद्धा यांच्याच वर्गातले आहेत. तुम्हाला तुमच्या वर्गातील लोकांबद्दल काहीही वाटत नाही तर इतर वर्गातील लोकांनी तुमच्याबद्दल काही का वाटून घ्यावे? कुठेतरी विचारसरणीतील, आजूबाजूच्या समाजातील परिस्थितीतील फरक असावा असेही वाटले. >>>+१

Pages