चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेफ - हो माझ्याकडेही आहेत. सुरूवातीला सगळेच विनोदी वाटायचे. पण नंतर विनोदाची समज आल्यावर बरेच नावडू लागले त्यांचे. तरी काही वर्षांपूर्वी एकदा मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. विनोद तेच होते (तसेही त्यांचे विनोद व निरीक्षणे एका ठराविक काळात फ्रीझ झालेली आहेत - नंतर चित्रपट, क्रिकेट बरेच पुढे गेले पण त्यांचे विनोद व निरीक्षणे होती तेथेच राहिली) आणि अपेक्षाही त्यापेक्षा वेगळी नव्हती. पण सादर करण्याची आणि पब्लिकला सामील करून घेण्याची हातोटी त्यांची चांगली होती त्यामुळे मजा आली.

शम्मी- शाखा कनेक्शन - कधी विचार केला नव्हता. इंटरेस्टिंग आहे. असू शकेल.

कणेकर वैयक्तिक टीका आणि अपमान करायचे याची कल्पना नव्हती. म्हणजे मी त्यांचे फार वाचले नसेल. माझे वाचन वृत्तपत्रापुरते मर्यादित होते.

योनीच्या मनीच्या गुजगोष्टी अश्या काही नावाचे नाटक होते. ते बघायला कणेकर गेले होते. तिथे म्हणे योनी योनी असे प्रेक्षकांना ओरडायला लावतात हे बघून ते चिडून उठून आले होते आणि नंतर संतापून एक खरमरीत भाषेत खुले पत्र लिहिले होते. त्यावर पलटून नाटक ज्यांचे होते त्यांनी सुद्धा कडक उत्तर दिले होते. ती दोन्ही पत्रे तेव्हा वाचली होती. हा किस्सा वगळता फार काही तसल्या भाषेतील वाचले नाही कधी.

पण आताच्या कलाकारांवर लिहीत असते कणेकर तर हिट गेले असते. हल्ली ट्रोलिंग करणाऱ्यांना सुद्धा एक डिमांड एक फॅन क्लब असतो.

>>सुरूवातीला सगळेच विनोदी वाटायचे. पण नंतर विनोदाची समज आल्यावर बरेच नावडू लागले त्यांचे. <<
हे मत पुलंच्या बाबतीत लागु होतं माझ्याकरता. शाळेत असे पर्यंत पुलं आवडायचे, त्यांची सगळी पुस्तकं वाचुन झालेली आहेत. पण आता ते सगळे विनोद बाळबोध वाटतात. काहि विनोद/कोट्या तर अगदि "धन्यवाद" प्रकारात मोडणारे आहेत...

त्याला बहुधा मेजर कमिटमेन्ट फोबिया आहे. कदाचित इन्सिक्युरिटीही. (पोएट्स!!!) >>> स्वाती हे परवा विचारायचे विसरलो. हे लिहीताना तुझ्या डोक्यात साहिर होता का?

पियू - तुमच्या ५ पॉइन्ट्सपैकी पहिले तीन पटले. त्या तिच्या एक्सच्या भेटीत काय झाले, की ती तिच्या दृष्टीने फक्त एक कॅज्युअल भेट होती इरफान कसा रिअ‍ॅक्ट करतो बघायला - मला समजले नाही. ४ आणि ५ मला खटकले नाहीत. योगीबरोबर आता ती जास्त कम्फर्टेबल आहे व कदाचित जास्त कमिट करेल - इतकेच. त्यापेक्षा जास्त त्या सीनमधून मी काही अर्थ घेतला नाही. सफारीत भेटलेला माणूस व तो वेळ तिच्या दृष्टीने तेवढ्यापुरतेच असावे.

तिचे विशिष्ट प्रकारे कॅमेरात डोळे रोखून बघण्याचे शॉट्स आहेत ते अतिशय कृत्रिम वाटतात >>> शेवटी एक लांबलेला असा शॉट आहे, तो मलाही एडिटिंगची गडबड असलेला वाटला. बाकीचे खटकले नाहीत, विशेषतः सुरूवातीचे. ती त्या साइटवर प्रोफाइल तयार करताना वय आधी ३५ लिहून मग कमी करते तेव्हा स्क्रीनकडे/आपल्याकडे चोरून बघते ते फार मजेदार आहे.

ती बाथरूममधे की बाहेर येउन गाणे म्हणत असताना इरफान दाराशी जातो व नुसतेच लोटलेले ते दार उघडले जाउन तो आत जातो - त्या प्रसंगानंतर ती त्याला हाकलते व तो आपल्या रूम मधे परत येतो. तेव्हा स्वतःशीच पुटपुटताना तो "आश्रम मे दर्शन हो गये" म्हणतो. तो डॉयलॉग मजेदार असला तरी त्याचा अर्थ पाह्ता त्याच्या कॅरेक्टरच्या दृष्टीने ते uncharacteristic आहे. ते स्पेसिफिकली मला ऑड वाटले. पण एकूण दुसर्‍यांदा पाहताना आधी निसटलेले बरेच संवाद, बॅकग्राउण्डच्या गोष्टी जाणवल्या. त्यामुळे दुसर्‍यांदा पाहणे टोटली वर्थ होते Happy

दिलीपकुमारच्या आधी थिएट्रिकल अभिनयाची पद्धत होती. त्याने ती बदलून मॉडर्न (क्लासिकल + स्टाईल + नॅचरल) अशी अभिनयाची नवी पद्धत आणली. देवापुढचा अभिनय आणि दारू पिल्यानंतरचा त्याचा अभिनय याची छाप अमिताभच्या अभिनयात दिसते असे उल्लेख वाचनात येतात. शाहरूख खानची पद्धत तशीच आहे. हे तिघेही स्टायलिश अभिनेते आहेत.

इरफान , नवाजुद्दीन, के के रैना , पंकज त्रिपाठी इ. इ. हे मेथड अ‍ॅक्टींगसाठी (नव्या पिढीतले) ओळखले जातात.

मेथड अ‍ॅक्टींग ची सुरूवात बॉलीवूड मधे कुणी केली माहिती नाही. पण ओम पुरी, नासीर, कुलभूषण खरबंदा, डॉ. श्रीराम लागू यांना श्रेय देतात (त्याला बॉलीवूड म्हणतात का ? समांतर म्हणत होते कदाचित).

वरची माहिती पब्लिक डोमेन मधे आहे. ड्युआयडींचा वापर करून चिखलफेकीचे कष्ट घेऊ नयेत. Happy

>>दिलीपकुमारच्या आधी थिएट्रिकल अभिनयाची पद्धत होती. त्याने ती बदलून मॉडर्न (क्लासिकल + स्टाईल + नॅचरल) अशी अभिनयाची नवी पद्धत आणली.<<
त्यालाच हल्ली मेथड अ‍ॅक्टिंग म्हणतात. मुंबईच्या भाषेत कॅरेक्टरमे घुस जाना. देवदास सिनेमानंतर दिलिपसाबना श्रिंककडे थेरपी सेशन घ्यायला लागले.

मी मागेहि इथे माबोवर लिहिले आहे. इर्फान, नवाजुद्दिन, नासिर, ओम पुरी, पंकज त्रिपाठि हे सगळे एका ढाच्यातले कलाकार आहेत. त्यांची अभिनयाची रेंज आणि ऑरा सीमीत आहे. कॅन यु इमॅजिन दीज फोक्स इन ए टिपिकल बॉलिवुड मुवि, रनिंग आफ्टर हिरॉइन अँड सिंगिंग साँग्ज? वानगी दाखल नासिरचा जलवा, त्रिदेव बघा. अ‍ॅब्सोलुट डिझास्टर..

व्हेअरअ‍ॅज, दिलिपसाब, बच्चनसाब हि जबाबदारी लिलया निभावतात. दॅट इज कॉल्ड ए वर्सटाय्ल अ‍ॅक्टर. दिलिपसाब, एकिकडे "उडे जब जब झुल्फे तेरी.." ज्या दिमाखाने साकारतात त्याच ताकदिने "कौन कंबख्त बरदाश्त करने को पीता है.." पेश करतात. बच्चन हॅज टेकन धिस आर्ट टु द नेक्स्ट लेवल. सो हाय, सिंस देन नोबडि डेअर्ड टु टच इट विथ ग्रेस...

इर्फान, नवाजुद्दिन, नासिर, ओम पुरी, पंकज त्रिपाठि हे सगळे एका ढाच्यातले कलाकार आहेत. त्यांची अभिनयाची रेंज आणि ऑरा सीमीत आहे. कॅन यु इमॅजिन दीज फोक्स इन ए टिपिकल बॉलिवुड मुवि, रनिंग आफ्टर हिरॉइन अँड सिंगिंग साँग्ज?
>>>>>>>>

+७८६
मागे इथेही एकदा उल्लेख केला होता मी की एका अवॉर्ड शो मध्ये शाहरुख खान इरफानचे एक स्कीट होते त्यात शाहरुखने मोठ्या बखुबीने दाखवून दिले होते की जे मी किंवा आम्ही करतो ते इरफान किंवा त्याच्यासारखे नाही करू शकत.

राज सर, खूप छान पोस्ट.
( या धाग्यावर या अवांतरातली शेवटची पोस्ट. कुणी नवा धागा काढला तर बरं होईल )
Method acting, developed by Lee Strasberg, is an extension of Stanislavski's work that focuses on psychological realism and emotional authenticity. It often involves intense introspection, emotional recall (drawing on personal memories to connect with a character's emotions), and deep immersion into the character's circumstances.
This technique can be demanding and controversial due to its emotional intensity.

दिलीप कुमार चे बरेच सिनेमे पाहिलेले आहेत. दुर्दैवाने थेटरमधे जाऊन एकच पाहिला. मुघल ए आझम . कलर मधे आलेला तेव्हां. त्यातही फक्त पृथ्वीराज कपूर आणि मधुबालाच लक्षात राहिलेत. पृथ्वीराज हे थेट्रीकल अभिनयाचे उदाहरण असले तरी असल्या भरजरी कपडेपटात त्यांचा तो अभिनय खुलून दिसला.

पण दिलीपकुमार कुठल्याही रोल मधे दिलीपकुमारच राहतात. आपण पाहतो ते त्यांचे मॅनरिजम्स. त्यांचा अभिनय वास्तव नाही. मेथड अ‍ॅक्टींग कॅरेक्टर मधे घुसणं नक्कीच, पण खरं वाटणं हे गमक आहे. आपल्या जीवनातल्या प्रसंगांवरून, जाणिवांबरून कॅरेक्टरच्या जीवनातल्या भावभावना उभ्या करणे. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांचाही हाच प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात दिलीपसाब आणि अमिताभ यांचा अभिनय झपाटून टाकणारा पण प्रत्यक्षात असं कुणी रिअ‍ॅक्ट करत नाही.

राभु, तु आजची मुलगी आजच्या जगातले अनुभव घेऊन भुतकाळाकडे पाहते आहेस. आजच्या जगात त्या भुतकाळातल्या लोकांची काय किंमत आहे हे तुला माहित आहे. हे डोक्यात ठेऊन तु भुतकाळाचे परिक्षण करतेयस तर तुझ्या हाताला जे लागतेय ते त्या काळातल्या लोकांच्या हाताला जे लागले त्यापेक्षा वेगळे असणार.

आज दिलिपकुमारची जी इमेज आहे ती कुठेतरी डोक्यात घोळत असताना त्याचा मुसाफिर पाहिला तर त्यात दिलिपकुमारच दिसेल. मी ४० वर्षांपुर्वी पाहिला तेव्हा माझ्या डोक्यात ती इमेज नव्हती. मला तिथे पगला बाबुच दिसतो (चित्रपट त्याआधी २५-३० वर्षे बनलाय) आणि ती इमेज आजही तशीच राहिलीय.

हे मान्य आहे. कितीही संदर्भ हाताळले तरी त्या काळातील अनुभव घेता येत नाही. तो टच राहत नाही. अगदी परफेक्ट आहे.

>>"दिलीप कुमार चा नंतर च्या काळातील मशाल आणि शक्ती मधला अभिनय आवडला होता">>
+१
मशाल, शक्ती, कर्मा आणि सौदागर मध्ये चरित्र अभिनेता म्हणुन मी त्याला नक्कीच झेलु शकलो होतो, पण मुख्य नायक म्हणुन मला तो कधीच आवडला नाही ब्वॉ...

दिलीपकुमारची तीन रूपं लक्षात आहेत.
सुरुवातीचा कमालीचा देखणा. - मधुमती
नंतर थोडा सुटलेला.. बैरागी, सकीना गोपी दास्तान
आणि नंतरचा गुबगुबीत तरीही फ्रेश चेहरा असलेला चरित्र अभिनेता तरीही लीड हिरोच.

नया दौर १९५७
मधुमती १८५८
म्हणजे माझ्या जन्माच्या कैक दशके आधी आलेले हे चित्रपट.. त्यातल्या हिरोची स्टाईल तेव्हाच्या काळानुसार किती स्टायलिश असेल हे माझ्यासारख्याला समजणे अवघडच.

पण त्याच काळातील देवानंदचे चित्रपट आणि त्यातील देवानंद मात्र आवडायचा. त्याची स्टाईल आवडायची...
म्हणजे आता आवडत नाही असे नाही.. पण हे सारे चित्रपट लहानपणी पाहिले होते. गेले कित्येक वर्षे 50 60 च्या दशकातील चित्रपट बघणे झाले नाही. तेव्हा ते आईमुळे बघणे व्हायचे. देवानंद मला त्याकाळच्या सर्व हिरोईनपेक्षा देखणा वाटायचा म्हणून त्या काळातली कुठली हीरोइन आवडलीच नाही. त्यानंतर जुन्या हिरोईन मध्ये आशा पारेख माझी पहिलीवहिली क्रश होती. आणि जो मूवी बघताना याचा साक्षात्कार झाला तो म्हणजे कारवा. समकालीन हिरोईनींच्या आधी मला ती आवडू लागली कारण घरी जुन्या चित्रपटांचा धडाका होता Happy

@ ऋन्मेऽऽष
जवळपास संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे पण,
"जुन्या हिरोईन मध्ये आशा पारेख माझी पहिलीवहिली क्रश होती."
हे वाक्य वाचुन मात्र पार 'तीन ताड' - 'सहा माड' उडालो ब्वॉ 😀

>>>>>>>>>>>>दुसर्‍यांदा पाहणे टोटली वर्थ होते Happy
मी पहील्यांदा वाचले दुसर्‍यांदा पाहणे टोटली व्यर्थ होते Happy अगदी विरुद्ध झाले मग ते. म्हटलं फा असे का लिहीतायत?

मधुमती = वैजयंती माला हे जसे समीकरण आहे तसेच
'सुहान सफर' चा नुसता प्रिल्युड जरी ऐकला तरी दिलीप कुमारचे ते केअरफ्री मनमुक्त धावता धावता चालणे व निसर्ग डोळ्यासमोर येतो.

डोक्यात फिट्ट बसलेल्या इमेज वरुन आठवले - अमिताभ जयाचा ‘एक नजर’ पुढच्या रविवारी दाखवणार हे साप्ताहिकीत ऐकल्यावर कॉलेज गोइंग आम्ही सगळे हवेत तरंगायला लागलो. घरबसल्या अमिताभ व सोबत बोनस म्हणुन जया.. आहाहा असे होत होते आठवडाभर. तेव्हा आधीच कथा कळायचे काहीही मार्ग नव्हते. कोणी आधीच बघितला असेल तरच.. प्रचंड उत्सुकतेने चित्रपट पाहायला घेतला आणि हाय रे दैवा.. अमिताभ गंभीर चेहर्‍याने शाल गुंडाळुन कविता पाडतोय आणि समोर हिरोईन अत्याचार सहन करतेय. अरे उठ आणि मार दोन चार फाईटी असे ओरडुन ओरडुन मी थकले पण अमिताभ ढिम्म राहिला.

इथल्या चर्चेेमुळे ककसिं पाहिला

रिलीज झाला तेंव्हा ट्रेलर पाहून सोडला होता कारण इरफान मेट्रो मधल्या कॅरॅक्टर चं स्ट्रेच वाटला होता.
हिरविणीचा कॅरॅक्टर ग्राफ स्मूथ नाही वाटला. उदा. अचानक ती इरफानला त्याच्याच शैलीत गाडीतून उडी मारून गेली वगैरे मेसेज देते. मग फिरंग्या सोबत फ्रेंडली होते. पण तो फ्रेंडलीनेस / ओव्हर ऑल कॉन्फिडन्स, इरफान आल्यावर परत बासनात जातो. तिच्या एक्स ला तिला का भेटायचं होतं, काय अचीव्ह झालं, काय बिनसलं अन् इरफानच योग्य हा प्रवास काणेकरांच्या भाषेत चटावरलं श्रद्धा उरकल्यासारखा वाटला.
ठीक ठाक आहे सिनेमा. फार ग्रेट नाही वाटला.

तनुजा चंद्रा चा जिमी शेरगील अन् अमिषा पटेल वाला एक सिनेमा राहिलाय बघायचा. यात आधी गोविंदा अन् काजोल असणार होते. बघायला लागेल कुठे मिळतो ते...

दिलिप कुमार हा ॲक्टिंग मधे अंडर प्ले चा बादशहा समजला जायचा. मला ते लहानपणी मोनोटोनस वाटायचं. आता एखादा राम और श्याम परत बघायला हवा

तीन ताड' - 'सहा माड' उडालो ब्वॉ
>>>>>
का हो? तिच्या माझ्या वयातील फरकामुळे की आणखी काही कारण Happy

..

आशा पारेख फारच गोड आहे दिसायला
>>
डोळे चकणे आहेत तिचे थोडे...
>>>>>

हो, हे आमच्याकडे सुद्धा काही जण म्हणायचे...
एवढा राग यायचा!
असू जरा ईथे तिथे तरीही मला आवडते म्हणून ठणकवायचो त्यांना मनातल्या मनात .. कारण मोठ्याने ठणकवावे या वयात नव्हतो.

त्या वयात पोहोचलो तेव्हा मनिषा कोइराला आवडायला लागली. एकदा एका काकींनी तिच्याबद्दल उलटसुलट म्हटले असता त्यांना ठणकावले तसे त्यांनी लगेच पकडले अरे याला आवडते वाटते ही... मग काय गणपतीला सारे भेटले तेव्हा सगळे गावभर करून झाले हे.

पण मनिषा कोइरालाची क्रेझच वेगळी होती...
तुम मिले.. क्रिमिनल
तू ही रे.. बॉम्बे
इकरार करना मुश्किल है...अग्निसाक्षी
एक लडकी को.. नाईंटीन फोर्टी टू लव्ह स्टोरी
खामोशी द म्युझिकल..
टेलिफोन धून मे हसने वाली.. हिंदुस्तानी..
दिल से..
रांगेत एकेक पिक्चर यावे आणि तिने एकाच वेळी कमालीचे निरागस आणि मादक दिसावे असेच चालू होते.
आमचा पौगंडावस्थेतील सारा ग्रूप तिचा फॅन होता.
खरेखुरे क्रश!

इन्सानियत नावाचा एक पिक्चर तुकड्या तुकड्यात पाहिला होता. कुणाला विनोदी परीक्षण लिहायचं असेलतर फक्त याची स्टोरी डिटेल मधे लिहा. अजिबात पंच मारायची गरज पडणार नाही.
अमिताभ बच्चन आहे आणि यात.

त्यालाच हल्ली मेथड अ‍ॅक्टिंग म्हणतात. मुंबईच्या भाषेत कॅरेक्टरमे घुस जाना. देवदास सिनेमानंतर दिलिपसाबना श्रिंककडे थेरपी सेशन घ्यायला लागले. >> +१. राजने लिहिलेले मी पण वाचलेले मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकामधे. दिलिपकुमारने मेथड अ‍ॅक्टींग चा विशेष अभ्यास करून बॉलीवूडमधे मेनस्ट्रीम केली.

Pages