चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुबालाने सर्वात सुंदर काम 'गेटवे ऑफ इंडिया' मधे केले आहे हे माझे वैयक्तिक मत. >> मला पण अ‍ॅड करा ह्यात.

माधुरिच्या ड्रेसिन्ग सेन्स बद्दल नाव ठेवली तरी अभिनय, स्र्किन प्रेझेन्स, खुप प्लेझन्ट वावर आणी डान्स याबाबत तीच स्थान वादातित...एक काळ पुर्ण तिने व्यापुन टाकावा इतका गाजवलाय. >> ह्यालाही अनुमोदन. सिनेमे तिच्या एकटीच्या नावावर नि जीवावर चालत. (सिनेमाची क्वालिटी हा मुद्दा बाजूला ठेवू)

मधुबाला नतर माधुरीच यालाही अनुमोदन. >> हे फक्त एका प्रकारच्या लुक्सबाबत म्हणता येईल. - प्रसन्न नि प्लेझन्ट चेहरा ! पण निरागसता, अल्लडता ह्यामधे मधुबालाच्या आसपास जुही चावला चा लुक वाटतो.

मैने प्यार किया मधली फ्रेंड्स ची कॅप कोणाला आठवली नाहि का ?

'प्रहार'मध्ये माधुरीने चांगलं काम केलं असं मला पर्सनली वाटत नाही. नानाला तिला अक्षरश: हाताला धरून डिरेक्ट करावं लागलं होतं - तेव्हाच्या त्यांच्या मुलाखतींत ते आलं होतं. मेकअप न करण्याचा आग्रहही नानाचाच होता.
अगेन - तिने ते मान्य केलं आणि सांगितल्याबरहुकुम काम केलं याचं श्रेय देता येईल, पण त्यात तिची प्रतिभा किती हा प्रश्न उरतोच. मला उलट त्यातलं डिम्पलचं काम अधिक सहजसुंदर वाटलं आणि आवडलं होतं. तिनेही मेकअप नव्हता केला - पण तो दुय्यम भाग झाला.

चांगला मेकप करणे आणि अजिबात मेकप न करणे याच्यात नक्की काय चांगलं किंवा वाईट आहे? किंवा प्रहार म्हटलं की नानाने माधुरीला मेकप करू दिला नाही हेच आपल्या सगळ्यांना आठवण्याइतकं त्यात सांगण्यासारखं नक्की काय आहे?

>>>>हेच आपल्या सगळ्यांना आठवण्याइतकं त्यात सांगण्यासारखं नक्की काय आहे?
Happy होय अभिनय उत्तम होता की नव्हता, या प्रश्नाशी इर्रिलेव्हंट आहे. हे लक्षात आलेले नव्हते.

लज्जाचा तिचा ओपनिंग सीन मस्त आहे. तिचे आणि टिनु आनंद चे सगळेच सीन मस्त आहेत. आणि तिच्या रोल चा लास्ट सीन पण बेस्ट आहे.
प्रहार मधली शर्ली पण बेस्ट आहे. ते मेकअपचे अलाहिदा, पण तिने काम छानच केले आहे. प्रहार आधी तिचे दिल, साजन, तेजाब, राम लखन, थानेदार, किशन कन्हैय्या, 100 डेज असे बरेच हिट सिनेमे येऊन गेले होते, असे असताना प्रहार मध्ये तिने अशी रिस्क घेणे आणि तेही 90 च्या दशकात हे नक्कीच वेगळे आहे.

मेकअप न करण्याचा आग्रहही नानाचाच होता.>>> हो त्याचाच होता, मुव्हिची व्हिजिनच नानाची होती त्यामुळे माधुरीने फक्त फॉलो केल...तसहि ती डायरेक्टर अ‍ॅक्टर वाटते आणी नाना तेव्हा दुराग्रही आणी अतिविक्षिप्त म्हणून (कु)प्रसिद्ध होता.
मेकपचा मुद्दा लपन म्हणतो तस अनेक हिट दिल्यावर एकदम वेगळ्या जॉनरचा मुव्हि करणे आणी कॅमेरासमोर तुमचे फ्लॉज दिसु देणे यासदर्भात आहे..खरतर तिला काळजीच कारण नव्हत ती जात्याच सुन्दर आहे.

पण अजून हेच चालू आहे याचे दुसरे कारण इतक्यात कोणी एखादा पिक्चर पाहिलेला नाही किंवा त्याबद्दल लिहीण्यासारखे कोणाला काही सुचलेले नाही. नाहीतर गाडी रूळावर येईलच की परत.
>>>
पूर्वीचा खरखर करणारा रेडिओ ट्यून करताना एका स्टेशनमध्ये वेगळ्या स्टेशनचा मध्येच जरा वेळ आवाज यायचा तसं माधुरी-मधुबाला चर्चेत मध्येच 'मॅन्चेस्टर बाय द सी' जरासा खरखरून गेला. पुन्हा आधीचा विषय कंटिन्यू झाला. Proud

महावतार नरसिंह : पहिली ५-१० मिनिटे स्पॉयलर अलर्ट :
(लहान मुलांना बघायला नेणाऱ्यांनी अवश्य वाचा)

सुरुवातच एक स्त्री जी शकुंतला टाईप वेषात असते ती खिडकीतून हात बाहेर काढते. पाऊस पडत असतो. तिच्या हातावर पाणी पडल्यावर ती अत्यंत कामुक हालचाल करते. मग ती घरात येते तिथे तिचा साधू पती तिन्हीसांजेची संध्या करत असतो. तिथे ही जाऊन त्याच्या अंगाला कामुकपणे अंग घासते आणि म्हणते मला कामदेवाने बाण मारला आहे. मग तो म्हणतो की ही वेळ संभोगासाठी (हो. हाच शब्द स्पष्टपणे वापरला आहे) योग्य नाही. पण ती म्हणते की तुम्ही माझ्या सगळ्या बहिणींची कुस उजवली. माझीच कुस का रिकामी ठेवता? Blah blah. मग तो म्हणतो.. स्त्री हट्टापुढे कोणाचं काही चाललं आहे का.. आणि मग ते दोघे एकमेकांच्या मिठीत आणि मग कॅमेरा संध्येसाठी पेटविलेल्या अग्निवर.

मग दुसऱ्या दिवशी ती उठून बसते आणि तो तिला म्हणतो की तुला म्हणालो होतो की संध्येच्या वेळी संभोग केल्याने असुरांना वाट मिळते.. तर आता तुझ्या गर्भात दोन विष्णू विरोधी असुरांनी प्रवेश केला आहे. तर आता भोग तुझ्या कर्माची फळे. आणि ती रडू लागते.

स्पॉयलर अलर्ट समाप्त

हे दोन असूर म्हणजे हिरण्यकश्यपू आणि त्याचा भाऊ. मग पुढे सगळी कथा सर्व वयोगटासाठी योग्य प्रकारे सुरेख रित्या पुढे जाते आणि शेवटी साऊथ मुव्हीजच्या वरताण ढाणढाण कर्कश्य संगीत वाजवत नरसिंह हे भगवान महाविष्णूचे महारौद्र रूप आणि खतरनाक फाईट दाखवत सिनेमा संपतो.

तर माझ्या सुदैवाने माझ्या लेकाने (वय वर्ष ७) मला यावर काही प्रश्न विचारले नाहीत म्हणून बरे. पण नाहीतर मला नीट उत्तरे देता आली असती असे सध्या तरी वाटत नाही. सुरुवातीची ही ५ मिनिटे वगळून कथा डायरेक्ट हिरण्यकश्यपू आणि त्याचा भाऊ हिरण्याक्ष यांच्या जन्मापासून सुरू झाली असती तरी काही बिघडलं नसतं हेमावैम. शिवाय पूर्ण सिनेमा कितीही लहान मुलांना दाखवण्यास अगदी योग्य झाला असता.

पहिली दहा मिनिटे दिग्दर्शकाला देवाच्या सिनेमात ही माती खाण्याची इच्छा का झाली माहित नाही. विशेषतः जेव्हा दिग्दर्शक प्रत्येक व्हिडिओ मध्ये "आपल्या मुलांना बॅटमॅन आणि स्पायडरमॅन हे fictional characters माहित आहेत.. तर मग आपल्या धर्मातील आपल्या देवाचे खरे सुपरहिरो अवतार त्यांना का माहित नाहीत / माहित असलेच पाहिजे" असे भावनिक आवाहन करत असताना.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट वाचला नाही. त्यामुळं पुढची पोस्ट समजली नाही. हा पिक्चर तुफान चालू आहे.
अलिकडे अ‍ॅव्हेंजर्स / सुपरहिरोज यांना टक्कर देण्यासाठी दैवी अवतारांना सुपरहिरो म्हणून प्रोजेक्ट करणारे बरेच सिनेमे येत आहेत.
माय फ्रेंड गणेशा हा पायोनिअर असेल कदाचित. बाहुबली होता कि सुपरहिरो.

तुतक तुतक तुतिया नावाचा पिक्चर बघायला सुरूवात केली.
जारण सारखा चांगला सिनेमा पाहिला कि लगेच असे सिनेमे पहावेत म्हणजे आपल्या अपेक्षा जमिनीवर राहण्यास मदत होते.
एखादे दिवशी जे डब्ल्यू मॅरीयटला जेवायला चान्स मिळाला तरी उद्यापासून रामभरोसे उडुपी हॉटेलच आपल्याला परवडणार आहे हे मनाला नीट बनावून ठेवता आलं पाहीजे. रोज रोज कोण पास देणार ?

प्रभू देवा आणि तमन्ना आहे. सुरूवातीची दहा मिनिटे साऊथ स्टाईल अ आणि अ सोडलं कि मग रब ने बना दी जोडी (रोल रिव्हर्सल) आणि झपाटलेला यांचं मिश्रण आहे. एंगेजिंग आहे. तमन्ना दोन्ही रूपात कसली दिसलीय. त्यातल्या त्यात तिला पूर्ण साडी, देशी लूक मधे पाहिल्याचं आठवतच नाही. तिला एकदा मुंबईत ओबेराय शेरेटनमधे भटकताना पाहिली. युरोपियन्स फिके पडतील एव्हढी गोरी आहे. प्रत्यक्षात ती खूप सुंदर आहे. पडद्यावर एव्हढी दिसत नाही.

ताटात पडेल ते खायचं असा दंडक असेल तर बघा. खाईन तुपाशी असेल तर श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा !

ता.क. : पुढे पहायला सुरूवात केली. तर चांगली हॉरर कॉमेडी आहे. हॉरर काहीच नाही. एक डाव भुताचा सारखं.

खूप अवांतर : माझी एक नणंद हुबेहूब तमन्ना सारखी दिसते. इतकी हुबेहूब की अनेक ठिकाणी तिला सेल्फी आणि ऑटोग्राफ मागतात. तर लेकाला पडद्यावर तमन्नाचे सीन बघताना आपली आत्याच हे सगळे करते आहे असं वाटतं. स्त्री २ मध्ये तमन्नाचा "आज की रात मजा हुस्न का" डान्स आणि कपडेपट बघितल्यापासून त्याने तिला "आत्या, तू अशी का नाचलीस" हे विचारून हैराण करून सोडले आहे.

हा सिनेमा पाहण्याची शक्यता नाही , पण रब ने बना दी जोडी आणि झपाटलेला यांचं मिश्रण म्हणजे नक्की कसं हे इमॅजिन च करता येत नाहीये Happy

तमन्ना घरात हाऊस वाईफ असते आणि बाहेर रॉकस्टार. फक्त रॉकस्टार असताना तिच्यात एक भूत असतं.
या तमन्नाचं त्या तमन्नाला काही माहिती नसतं. Happy
वडापाव आहे पिक्चर.

प्रत्यक्षात ती खूप सुंदर आहे. पडद्यावर एव्हढी दिसत नाही.>>> हे पहिलच आहे कारण मला वाटत कधितरी फराह खानची मुलाखत एकली होती तेव्हा तिने गमतित म्हटल की काही अ‍ॅक्ट्रेस मेकपशिवाय तुमच्या शेजारुन गेल्या तरी कळणार नाहीत इतक्या सामान्य दिसतात.
वडापाव आहे पिक्चर.>>>smiley36_0.gif

रिडले स्कॉट चा "Blade Runner"
‘masterpiece of modern cinema’
इथे बहुतेकांनी बघितला असेल, जर कुणी चुकून बघितला नसेल तर अवश्य बघा, जे कुठल्याही OTT चे सभासद नसतील त्यांच्या साठी. इंटरनेट अर्काईव्ह्ज उपलब्ध आहे, लोड व्हायला वेळ लागतो आणि आधी कुब्रिक च्या वॉर मुविचा ट्रेलर बघावा लागेल. थोडं सहन करावे लागेल.

तमन्ना मला आवडते. छान दिसते. खुप गोरी आहे हे स्क्रिनवरही कळते. अर्थात तो सौंदर्याचा मापदंड नाहीय. तिला फक्त बाहुबलीमध्येच पाहिलीय. काही वर्षांआधींच्या फोटोत अजुन छान दिसायची. आता चेहरा थोडा लांबट वाटतो आणि डोळ्याखाली बॅग्स आहेत. अपेयपान भरपुर करत असावी.

तर ओळखीच्या दोन हिंदुत्त्ववाद्यांनी नरसिंह चित्रपट स्पॉन्सर करून आणखी दोघांना दाखवला.

सगळ्या भारतात वैष्णवीकरणाची एक लाट आली आहे त्यातला हा अजून एक प्रयत्न. शैव परंपरांना देखील पूर्ण मॉडिफाय करायचे आणि वैष्णवी फ्रेमवर्क मधे बसवायचे हे भारतात सतत चालत आले आहे.

मग शैव लोकल देवांना मांसाहार चालत नाही वगैरे कंड्या पिकवायच्या आणि लोकल परंपरा मारून टाकायच्या.

मला आठवतं त्याप्रमाणे नरसिंह देवाची मंदिरे खूपच कमी आहेत. कोल्हापुरात एकच पहिले होते. (शनीचे होते की नरसिंह आठवत नाही)

जर हा सिंहाचा हाइब्रिड असेल तर त्याला बोकड शेळी यांचाच नैवैद्य पाहिजे. पण तिथे तसे काही नव्हते.

शिवाय आता १५ ऑगस्ट ला वगैरे मांसाहार नको अशी टूम निघाली आहे.

सांगायचे कारण म्हणजे त्या दोघांनी स्पांसरशिप देताना अंडी मटण खाऊन येऊ नये आणि चप्पल थिएटरच्या बाहेर काढावी असे सांगितले होते.

एकदंदरीत अवघड आहे सगळं

मला आठवतं त्याप्रमाणे नरसिंह देवाची मंदिरे खूपच कमी आहेत>>> निरा नरसिन्गपुरला आहे, माझ्या माहेरच कुलदैवत आहे, फार सुन्दर दगडि मन्दिर आहे.

हे मंदिर नाही, पण गेल्याच आठवड्यात इथे एक शिल्पकृतींचे उद्यान सापडलं. त्यात विवीध संस्कृती/ धर्म/ परंपरा यातील शिल्पे दगडात कोरलेली ठेवलेली आहेत. त्यात हिंदू संस्कृतीत दशावतारातील पहिले चार अवतार होते. त्यातील हा नरसिंह narsinha.jpg

न पाहता कुठल्या सिनेमाची हवा आहे यावर लिहायला नाही आवडत. पण हा व्लॉग भारीये.
यांची बोलायची पद्धत आवडते. जरासा गावरान बाज, रांगडा टोन.
अलिकडचा रजनीकांत हा काही औत्सुक्याचा विषय नाही, पण अजूनही तमिळ लोकांमधे त्याची तीच क्रेज आहे हे पचायला जड आहे.
एका मराठी प्रेक्षकाने चेन्नईत रजनीकांतचा पिक्चर पाहिला, रजनीकांतच्या एण्ट्रीला आख्खं थेटर उभं राहीलं.
शेजारचा तमिळ अण्णा याला म्हणाला "स्टॅण्ड अप ! थलाइवा इज ऑन स्क्रीन "
आपण राजेश खन्नाच्या स्टारडमचे अजूनही किस्से पुढच्या पिढीला ऐकवत असतो. हे नेक्स्टच्या नेक्स्ट लेवल आहे.
निमित्त त्याच्या कुलीने अ‍ॅडव्हान्स बुकींगला १०० कोटीचा धंदा केला. दुसर्‍याच दिवशी १८० कोटीचा धंदा झालाय.
( पहाटे पाचपासूनचे शोज आणि पाच हजार रूपये तिकीट)
https://www.youtube.com/watch?v=uzuailfisoA

अलिकडचा रजनीकांत हा काही औत्सुक्याचा विषय नाही
>>
त्याचे गेल्या काही वर्षांमधले सिनेमे हे मेजर टेम्प्लेटाइझ्ड आहेत
तमिळ अथवा इतर दोन तीन तरी इंडस्ट्री मधल्या सुपरस्टार चा पाहुणा रोल
रजनी एक तर गुंड, पोलीस, रिटायर्ड गुंड, रिटायर्ड पोलिस, अंडर कव्हर एजंट किंवा हे सगळं असणार
अतरंगी सतरंगी व्हिलन
एक कॉमेडी सबट्रॅक
एक आयटम साँग
शेवटी जय रजनी

थेटरमधे weapons पाहिला आणि मला खूप आवडला. ट्रेलरवरुन फार आवडेल वाटलं नव्हतं. Jordan Peele स्टाईलचा वाटला. त्याचे सिनेमे मला आवडतात.

रेड 2 नेटफ्लिक्स पाहिला
चांगला होता.

रिव्ह्यू संमिश्र वाचलेले. त्या रिव्ह्यूचा एव्हरेज काढला तर जो येईल त्यापेक्षा मला छान वाटला. लोकं उगाच पहिल्या भागाशी तुलना करत बसतात. स्वतंत्र पिक्चर म्हणून बघावे. देश स्वतंत्र होऊन काल 78 वर्षे झाली तरी बरेच लोकांना हे समजले नाही.

अजय देवगण आणि रितेश देशमुख अशी जुगलबंदी अजून रंगली असती तर जास्त मजा आली असती. तिथे कदाचित रितेश कमी पडला असावा बाकी काम त्यानेही चांगले केले. त्याला बघून नेहमी एक आपलेपणा वाटतो.

पहिल्या भागापेक्षा या भागातील नाट्यमय घडामोडी फिल्मी आहेत त्यामुळे ते डोक्यात ठेवून बघितले तर ओवरऑल आवडायला हरकत नाही. वन टाईम वॉच नक्कीच आहे.

Pages