चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Stolen- अ‍ॅमेझॉन प्राइम - नाव इंग्रजीत असले तरी पिक्चर हिंदी आहे.

अगदी इण्टेन्स पिक्चर आहे. जराही हलकाफुलका नाही. स्लो सुरूवात आहे पण पुढे जातो तसा अगदी खिळवून ठेवतो. सुरूवातीला स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या आईच्या अगदी कुशीतून एका लहान बाळाचे (मुलगी) अपहरण होताना दाखवले आहे. तिची आई जागी झाल्यावर तिला शोधते - समोर दिसणार्‍या एकदोघांवर आळ घेते, पोलिस येतात आणि त्यात त्यावेळेस तेथे असलेले दोन भाऊ अडकत जातात. ती आई अगदी गरीब असते हे उघड आहे - प्लॅटफॉर्मवरच झोपलेली असते. ते दोन भाऊ उच्चभ्रू असतात - त्यातील एक तेथे रेल्वेने आलेला असतो तर दुसरा त्याला घ्यायला आलेला असतो. मग पोलिस तपास, त्या बाळाचा शोध, कथेत आलेले ट्विस्ट - अगदी शेवटपर्यंत उत्कंठा वाढत जाते.

अभिषेक बॅनर्जी ओळखीचा आहे - पाताल लोक मधला हाथोडा त्यागी आणि मिर्झापूरमधला मुन्नाचा कंपाउण्डर मित्र. यात त्याचा रोल एकदम वेगळा आहे. बाकी कोणी माहितीतले नाहीत.

बघा. माझ्याकडून रेको.

फा पाहीलाय हा सिनेमा. आवडलेला. त्या बाईचे पोपट नाक पक्के लक्षात राहीलेले व वाटलेले त्यात काय नाकावरुन लगेच सुगावा लागेल पण गोष्ट हळूह्ळू कॉम्प्लिकेट होत जाते.

Stolen- अ‍ॅमेझॉन प्राइम >> प्राईम व्हिडीओचं माझं सबस्क्रिप्शन गंडलंय. फक्त मोबाईलवर दिसतं.

तेहरान नावाच्या पिक्चरची केव्हढी जाहीरात केलेली. त्यातच १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला रिलीज असल्याने काही तरी देशप्रेम वगैरे असेल, खास असेल असं वाटलं. जॉन अब्राहमचे अलिकडे आलेले सगळे सिनेमे उगीचच फ्लॉप झालेले नाहीत. तरी म्हटलं थेट वेबसिनेमा , वर्ल्ड प्रिमीयर आहे तर रूमाली रोटी बनवतात त्या निगुतीने बनवलेला असेल. जॉनला पण गरज आहे. पण कसचं काय !

हा आडदांड दगडी देखणा माणूस असतो दिल्ली पोलीस मधे. पण दिल्लीत झालेल्या एका बाँबस्फोटात याचं मत वेगळं पडतं. याला लगेच चार परदेशी लोक आलेले आठवतात. अक्षरशः सहा ते सेकंदात त्याला ते चेहरे आठवतात आणि जडावलेल्या जिभेने तो चार वाक्यं बोलतो. पुढचा आख्खा पिक्चर हा असाच आहे. जिथे नीट समजलं पाहीजे, तिथे चार वाक्यात दोन ते तीन मिनिटाचा सिक्वेन्स आटपायचा आणि दाढी करणे, खाणे , हँगआउट याला जास्ती फूटेज देणे यामुळे " अरे करना क्या चाहते हो ?"

या तपासात रॉ येते. रॉ या आडदांड दगडी देखण्या पोलीसाला आपल्या तपासात घेते. दिल्ली पोलीसांना कशाला माहिती पाहीजे आंतरराष्ट्रीय क्रिमिनल्स ? हा मोजून बारा वाक्यात इस्त्राएल - इराण खुन्नस, त्यांनी इराणचे अमूक अमूक लोक अशा अशा ठिकाणी मारले म्हणुन इराणने इस्त्राएलचे लोक भारत, सिरीया आणि आणखी कुठे तरी मारले. मग याला सीआयडी देवी प्रसन्न होते आणि स्ट्रीट फूडप्रमाणे रस्त्यावरच फटाफट क्ल्युज मिळत जातात.

पण एकीकडे सतत इराण - इंडीया क्रूड ऑईल डीलचं घड्याळ येत असतं. बारा दिवस राहीले, अकरा दिवस राहीले.
मग एक कुणीतरी सेक्रेटरी किंवा मंत्री ( नावं बिवं काही समजत नाहीत, संसदेसारखी बिल्डींग दिसली आणि मोठं केबीन , गुब्बी चेअर दिसली कि समजायचं. तर हा सेक्रेटरी कम मंत्री म्हणतो कि " वो एक दूसरे को मार रहे है, हमे क्या ? हमे एक से टेक्नॉलॉजी मिल रही है, दूसरे से ऑयल , समझे ना ?"

मग रामनाथ काव सारखा गेट अप असलेला रॉ चा अधिकारी सांगतो तपास बंद करा
तर आता हा आडदांड माणूस म्हणतो कि " लेकीन हमारे जमीन पर उन्होंने कांड कर दिया, इतने लोग मरे, एक छह साल कि मासूम बच्ची मरी "
मग पोलीसांचा बॉस रॉ बॉसला म्हणतो " बोला था ना पागल है ? तुम्हीने मांग के लिया था "

आता हा माणूस डिपार्टमेंटची परवानगी न घेता तेहरानला निघतो. आधी अबुधाबी मग तिथे त्याला भारतातून री ची एक एजंट मदत करते. तिथून गडी तेहरान ला जात असतो.
अधे मधे खूप लोक बंदुका घेऊन फिरत असतात. कुणीही कुणावरही हल्ला करत असतं. आडदांड माणूस रोहित शेट्टीच्या हिरोसारखा ओपन स्पेस मधे बागेत पिरल्यासारखा फिरतो बाजूला लाखो कंटेनर्स असतात. त्या कंटेनर्सवरून शेकडो बंदूकधारी गोळ्या झाडतात. पण आडदांड्याला एकही गोळी लागत नाही. टेस्ला मधे फीचर आहे कोलिजन टाळण्याचं ? तसं याच्या अंगात बिल्ट इन फीचर असतं ते. तिघा भारतीय हिरोंनी पाठीला पाठ लावली आणि हातात बंदुका असतील तर ते बारा दिशांना नि:क्षत्रिय करू शकतात. आठवा सूर्यवंशी आणि सिंघम ३. यात एक हिरॉईन आहे.
तिला सुद्धा गोळी लागत नाही. ती बाँबने मरते. आणि तिला मरताना पाहून सहकारी वेडा होतो. मग हा एकटाच मोहीमेवर निघतो.

एक तर काय चाललंय हे संवादातून समजत नाही. त्यात अरेबिक आणि इराणी संवाद. भर म्हणुन इस्त्रायली लोक इस्त्रायली भाषेत बोलतात. याला सगळ्या भाषा येतात. हा दिल्ली पोलीसमधे आहे बरं का ? दिग्दर्शकाला वाटलं कि एका केस मधे संयुक्त तपास केला कि हा रॉ सारखा बहुभाषिक बनतच असेल. किंवा एका मिनिटात दहा मिनिटाचं चित्रण उरकत असल्याने तासभर झाल्यानंतर हा दिल्ली पोलीस मधे होता हे तो विसरला असेल.

एका माणसाला मारण्यासाठी हा जो खटाटोप करतो, तिथे त्याला अनोळखी लोक का मदत करतात, वाळवंटात कुठे तरी राहतात, अन्न , पाणी वगैरे गरजांचं काय होतं कळत नाही. शेवटी उगीचच तेहरानच्या गल्ल्यात पाठलाग. मग इराणी गुप्तचर संस्थेने हायर केलेल्या भाडोत्री खून्यांना हा ठार मारतो आणी भारत इराण डील रद्द होते कारण इराणला हे पसंत नसतं.

अन्य पिक्चरमधे जग न्युक्लीयर मिसाईल पासून वाचवलं जातं, किंवा घातकी टोळीला पकडून आणलं जातं, लार्ज स्केल किलिंगचा बदला घेतला जातो ..
मग याने नेमकी कसली देशसेवा केली हा प्रश्न मनाला पडत असताना स्क्रीनवर अक्षरं झळकतात कि इराण आणि इस्त्रालयच्या खुन्नस मधे विविध देशात एव्हढे एव्हढे लोक मेले, पण भारताच्या भूमीवर एकही नाही.

आणि रॉ बॉस आणि दिल्ली पोलीस बॉस शिळोप्याच्या गप्पा मारत असताना " वो क्रेझी है लेकीन क्या उसे ला सकते हो ?" मग रॉ बॉस म्हणतो " लेकीन हमे डिसओन ही करना है , ठीक है " असे तुटक संवाद होतात. एकमेकांशी जर सलग बारा संवाद एक्स्चेंज झाले तर या सिनेमाला ऑस्कर मिळणार नाही असं यांना सचिनजींनी सांगितलेलं असणार.

वैधानिक इशारा : पार्ट टू चा धोका संभवतो.

युट्युबवर मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आलाय, तो किती केविलवाणा आहे !
एडिटिंग करताना अ‍ॅवॉर्ड मिळालेल्या मराठी विजेत्यांना काहीच स्क्रीन टाइम नाही याउलट जे काही मोजके हिन्दी अ‍ॅक्टर्स आले होते त्यांना मात्रं आवर्जून बोलताना दाखवलय , किती लाचारी !
बर हिन्दीतले लोक सुद्धा काही फार मोठे स्टार्स वगैरे नव्हतेच.. राजकुमार राव, जयदीप अहलावत , तब्बु, नवहुद्दीन वगैरे, तरी लाचारी !
बाकी जाउद्या , उषा मंगेशकरला लाइफ टाइम अ‍ॅचिव्हमेन्ट अ‍ॅवॉर्ड दिले तर तिला बोलताना, तिच्या सुवर्णयुगाची गाण्यांची सफर, काही व्हिज्युअल्स तरी दाखवायचे !
कमाल आहे !

राभू Lol धमाल लिहीले आहे. वाक्यात जबरदस्तीने विनोद आणण्यापेक्षा असे निरीक्षणातून निर्माण होणारे विनोदी प्रश्न जास्त मजेदार वाटतात Happy

भारतातून री ची एक एजंट मदत करते >>> हा टायपो आहे हे माहीत आहे पण एक मिनिट वाटले की या क्षेत्रातही धार्मिक विचार बळावून स्त्रियांकरता एक वेगळी एजन्सी निर्माण केली गेली की काय Happy

स्क्रीनवर अक्षरं झळकतात कि इराण आणि इस्त्रालयच्या खुन्नस मधे विविध देशात एव्हढे एव्हढे लोक मेले, पण भारताच्या भूमीवर एकही नाही. >>> नंतर इस्त्रायल व इराणमधे हा पिक्चर पाहून त्यांचे युद्धनीतीवाले लोक म्हणत आहेत की यांनी काही केले नसते तरी भारताच्या भूमीवर काही करायचा आमचा मुळातच प्लॅन नव्हता - असेही दाखवायला हवे होते. हे म्हणजे मुंबई गँगवॉर मधे कलकत्त्याचा एक पोलिस येउन बरेच काय काय शोध घ्यायचा प्रयत्न करतो व नंतर परत जातो. व तेथे "कलकत्यातला एकही माणून मुंबई गँगवॉर मधे मेला नाही" - यावर आनंद व्यक्त करण्यासारखे आहे.

मराठी फिल्मफेअर बघायला पाहिजे. केविलवाणा आहे म्हंटल्यावर तर नक्कीच Happy

मराठी फिल्मफेअर शोधताना मी ६०व्या व ६१व्या (एकत्र) राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची क्लिप चुकून आधी पाहिली. त्यामुळे मला नंतर पाहिलेली फिल्मफेअरची क्लिप इतकी केविलवाणी वाटली नाही Happy उलट आटोपशीर वाटली.
https://www.youtube.com/watch?v=eLJMX2S5fgs

मात्र तेथे तबू, राजकुमार राव, जयदीप अहलावट वगैरे का बोलावलेत कोणास ठाउक.

उषा मंगेशकरला लाइफ टाइम अ‍ॅचिव्हमेन्ट अ‍ॅवॉर्ड दिले तर तिला बोलताना, तिच्या सुवर्णयुगाची गाण्यांची सफर, काही व्हिज्युअल्स तरी दाखवायचे ! >>> हो ना. ते दाखवणे काही फार अवघड नसावे.

फिल्मफेअरवाली मराठीचा आवाका पाहता ओके आहे. त्यातले रेड कार्पेट मात्र कायच्या काय होते. जुन्या अभिनेत्रीच जास्त ग्रेसफुल वाटल्या - रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, रेणुका शहाणे ई. तरूण अभिनेत्रींचे ड्रेसेस किती भारी होते वगैरे कळण्यातकी फॅशनची माहिती मला नाही. पण त्याला एक "गरिबांच्या ऑस्करची" कळा आहे. त्यापेक्षा मराठी/भारतीय वेषांत आलेल्या जुन्या अभिनेत्रीच जास्त चांगल्या वाटल्या. पुरूष हीरोंपैकी केजीफ चे हीरो वाटतील असे २-३ होते. ओळखले नाहीत. सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ चे अँकरिंग ठीक होते. भाषिक विनोद फार होते आणि समहाऊ त्याला आपल्याकडे फार भाव आहे. इतर कलाकारांना मारलेल्या कोपरखळ्याही होत्या पण खूप नाहीत - अजून पूर्ण क्लिप पाहिली नाही.

त्या तुलनेत राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे स्टेज जास्त ग्रॅण्ड होते. प्रचंड मोठे वाटले फिल्मफेअरपेक्षा. हॉल आहे की ओपन एअर, ते लक्षात नाही.
https://www.youtube.com/watch?v=CTV4TqGshQs

मात्र आयोजन रानोमाळ होते. इतक्या रूंद स्टेजवर कोणी कोठून यायचे हे अगम्य पद्धतीने चालले होते. प्रत्येकाला जास्तीत जास्त स्टेज कव्हर करावे लागेल अशा पद्धतीने त्यांचे प्रवेश होते. पारितोषिक देणारे, ते पारितोषिक त्यांच्या हातात आणून देणारे व पारितोषिक स्वीकारणारे - सर्वात लांबून त्यांच्या जागी येत होते असे वाटले.

आणि फलकांवरचे मराठी! पहिल्या दहा मिनिटांत ४-५ चुका दिसल्या "वेशभूषा", "उज्वल" , "उत्कृष्ट" ई. आणि एक नाव "प्रियषंकर घोष" असे दिसले. "या गोष्टीला नावच नाही" च्या एका पुरस्काराबद्दल. हिंदीत लोक विचित्र स्पेलिंग करतात तसे यांनी स्वतःचे नाव असे ठेवले असेल तर माहीत नाही पण वेबवर शोधल्यावर तरी तसे दिसले नाही. या वरच्या क्लिपमधे साडेपाच मिनिटांवर ते आहे.

याचे अ‍ॅंकर प्रसाद ओक व अमृता सुभाष. प्रसादने चित्रपटाला विठ्ठलाची उपमा दिली व चित्रपटसृष्टीला त्या वातावरणाची. तिकडे टाळ आहेत, तर इकडे टाळ्या" वगैरे. पण पब्लिकला काही ते झेपले नाही. कोणीच टाळ्या वाजवल्या नाहीत - शेवटी अमृतानेच वाजवून लोकांना भाग पाडले.

चुकून लस्ट स्टोरीज २ बघितला. इतका फालतु आहे की कोणत्या स्टोरीज कोणी दिग्दर्शित केल्या हे जाणण्याइतपत लस्ट राहिला नाही.

रच्याकने, सगळीकडे तेच ते एकसारखे इंटिमेट सिन बघुन आता कंटाळा आलाय. त्यात बायकांचे विव्हळणे इतक्या लगेच आणि इतक्या जोरात सुरु असते की घरात दुसरे कोणी वावरत असेल तर घाईघाईत आवाज शुन्य करावा लागतो. भारतातल्या निम्म्या तरी बायांना या फिल्डमध्ये प्रॉब्लेम्स आहेत असे मागे वाचले होते. ह्या विव्हळणार्‍या बायांमुळे त्यांना फोमो येऊन त्यांचे होत असलेले कामही बंद पडायचे.

अजुन एक साउथी मुवी हिंदीत डब केलेला पाहिला. सस्पेंड झालेला डिएस्पी आता सि आय (म्हणजे काय) बनुन पोलिस ठाण्यात अवतरतो आणि दिसेल त्याला मारत सुटतो. स्टोरीची भानगड काय कळेनाच. तरी पाहिलच, शेवट येईपर्यंत तरी कळेल हा आशावाद असावा, अजुन काय??

एक बहुधा इतालियन चित्रपट पाहिला. उच्चभ्रु समाजातील मुलगा साधारण मुलीशी लग्न करायचे ठरवतो. त्या दरम्यान त्याच्या आईला स्व चा शोध लागतो वगैरे वगैरे. दोन मिनिटांची रिल बनवण्याइतपतही जीव नसलेल्या गोष्टीवर दोन तासाचे चित्रपट बनवण्याची उज्ज्वल परंपरा जगभर सुरु आहे बघुन बरे वाटले.

नेकेड गन बघायचा प्रयत्न केला. स्लॅपस्टिक विनोद बघुन कोणे एके काळी जाम हसायला यायचे. आता वय झालेय बहुतेक.
नेकेड गन ३३.३३३ असाही काही चित्रपट दिसतोय.

एकंदरीत चित्रपट पाहणे तुर्तास स्थगित करावे असे वाटतेय.

अफगाण्याशी लग्न करुन पाकिस्तानात जाणार्‍या बाईचा चित्रपट बघितल्यावर जॉ अ च्या वाट्याला परत जायचे नाही असे ठरवले होते. चेहर्‍यावरची माशीही हलत नाही त्याच्या.

डिजे +१
मी पण पुढे करत करत मराठी फ्लिल्मफेअर बघितल पण सोहळाच इतका बोअरिन्ग होता की पुढे सरकवत सपुनच गेला.दोन्ही अ‍ॅकर प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते पण विनोद काही होत नव्हता.अजिबातच स्किल नाहियेत दोघामधे.
इतके कलाकार लोक भरलेत मधे काहि न्रुत्य,गायन, स्टॅन्डअप कॉमेडी स्किट काहिही ठेवता आल असत...स्वत;ला यशस्वी समजण्यार्याना करायच नव्हत तर नविन कितीतरी लोक उत्सुक असतात त्याना चान्स द्यायचा..कमी बजेट मधे झाल असत.
नाइलाजास्तव सोहळे करायला कॉन्डोम स्पोन्सर म्हणुन घेतले पण त्याच बजेटच नव्हत वाटत.. इतकी चिन्धीगिरी करायची तर अ‍ॅवॉर्ड करायचेच कशाला.
एवढ करुन एकहि मेन लिड अभिनेत्रीला अ‍ॅवॉर्ड दिला नाही हे एक अजबच!!
दोन दोन मिनिट ज्याना अ‍ॅवॉर्ड मिळाले त्यानाही द्यायचे की बोलायला...त्यातही मान्जरेकर ठ्गेगिरी करत बोलले.
हिन्दी वाल्याना कशाला बोलावल होत?
रेड कारपेट भयाण होते काही सिलेक्टिव्ह अपवाद सोडले तर.

६०-६१ वा मराठी अ‍ॅवॉर्डच फा च ऑब्झरवेशन करेक्ट आहे.त्यातहि राजकारणी स्टेजवर होते तेव्हा अर्धे पुरस्कार बरे चालले मग ते सगळे लोक स्टेजवररुन गायब झाल्यावर अर्धे पुरस्कार केवळ बेशिस्तीचा नमुना, घोषित पुरस्कार त्यातही अर्धे लोक उठुन जातायत, काहि जण जागेवर उभे आहेत, सगळा केयॉस.
शाळेत शिक्षक काही काळासाठी बाहेर गेले की वर्ग टिवल्या बावल्या करतोय अगदी सेम चित्र.
अम्रुता सुभाष रडक्या चेहर्‍याने अ‍ॅकरिन्ग करतेय..प्रसाद ओक लोकाना खाली बसायचि विनती करतोय...काय हे!!

अम्रुता सुभाष रडक्या चेहर्‍याने अ‍ॅकरिन्ग करतेय..>>>

उलट सुलट रिव्यु वाचुन जारण बघावासा वाटत होता पण अ सु मुळे हिंमत होत नाही.

हा टायपो आहे हे माहीत आहे पण एक मिनिट वाटले की या क्षेत्रातही धार्मिक विचार बळावून स्त्रियांकरता एक वेगळी एजन्सी निर्माण केली गेली की काय >>> Lol
"कलकत्यातला एकही माणून मुंबई गँगवॉर मधे मेला नाही" - यावर आनंद व्यक्त करण्यासारखे आहे. >>> Proud अगदी बरोबर आहे.

फारएण्ड मनापासून आभार Happy

याचे अ‍ॅंकर प्रसाद ओक व अमृता सुभाष. प्रसादने चित्रपटाला विठ्ठलाची उपमा दिली व चित्रपटसृष्टीला त्या वातावरणाची. तिकडे टाळ आहेत, तर इकडे टाळ्या" वगैरे. पण पब्लिकला काही ते झेपले नाही. कोणीच टाळ्या वाजवल्या नाहीत - शेवटी अमृतानेच वाजवून लोकांना भाग पाडले. >>> त्याला हास्यजत्रेतल्या जज्जची सवय झाली आहे. तिथे तो खोटा खोटा जज्ज असूनही पब्लीक एव्हढं सिरीयसली घेतं कि त्याला आता सगळीकडेच आपल्याला हा सन्मान मिळेल असं वाटत असेल. सचिन पण महागुरू झाल्यानंतरच बिथरले. ही खुर्ची इलेक्ट्रिक चेअरपेक्षाही धोक्याची दिसतेय.

अमृता सुभाषला एकदा आमीर खान पाहुणा होता त्या सोहळ्यात अँकरिंग करताना पाहिलं होतं. आमीर खान ला स्टेजवर बोलवताना ती एव्हढी चेकाळली होती आणि आपण काय बोलतोय याचं भान सुटल्यासारखी करत होती.. कसं तरीच झालं ते ऐकताना. एकदा सुभाष घईंना बोलावले होते. मान देणं वेगळं आणि लाचारी वेगळी. किमान सुभाष घईंनी दर वर्षी दहा मराठी सिनेमे बनवायची घोषणा केलेली म्हणून एकवेळ ठीक म्हणावं लागेल.

फारेन्डने लिहिलेला Stolen मी ही पाहिलाय आणि मला फारच आवडला होता. त्या बाईची निवड बरोब्बर जमली आहे. तिचं दिसणं, आवाज, कपडे, केवीलवाणी नजर… एकदम जमलंय. आवडली ती. अभिषेक बॅनर्जी तर चांगलंच काम करतो. छोट्या भावाने पण छान काम केलंय.

फारेंड, स्टोलन बद्दल बहुतेक मीच्/का कुणितरी मागे पानावर लिहिलं असावं. अगदी बघण्यासारखा आहे. अभिनयाची & कथेची बाजू जड आहे. +१ रेको माझाही लोकहो.

मराठी पुरस्कार सोहळा Lol कठीण आहे. प्रसाद ओकाचे कॉमेंट्स आधी आवडायचे हास्यजत्रेचे, पण मग पुढे पुढे अगदीच रटाळ अ‍ॅक्ट झाला असेल तर माफक चूक तरी दाखवायची...? कधितरी तर सुधारणेला वाव आहे असं म्हणा. कायम च मस्त, धमाल, १ नम्बर Sad

अमृता सुभाष मला अजिबात आवडत नाही, कायम च चेकाळलेली वाटते. लाऊड ही वाटते. गली बॉय मधे काम केल्या पासून स्वतः ला बॉलीवूड ची गॉड मदर समजायला लागली आहे असे भाव असतात.

The Amateur बघितला (हॉटस्टार)
टिपिकल हॉलिवूड थ्रिलर सूडकथा आहे.

हिरो सीआयएचा क्रिप्टोग्राफर असतो. त्याची बायको अतिरेकी हल्ल्यात ओलिस धरून मारली जाते. तो वेगवेगळ्या सीसीटीव्ही फूटेजेसची छाननी करून मारेकर्‍यांची ओळख शोधून काढतो. वरिष्ठांना दाखवतो. त्याची अपेक्षा असते की सीआयएने त्या हल्लेखोरांना शोधावं, पकडावं, मारावं. त्याचे वरिष्ठ त्याला जवळपास शेंडी लावतात; म्हणतात की एक-दोघांना नव्हे अख्ख्या नेटवर्कला शोधायला हवं.
शेवटी तो स्वत: हल्लेखोरांचा शोध घेण्याचं ठरवतो.
अशा सिनेमांमधली टिपिकल ठिकाणं - लंडन, पॅरीस, इस्तंबूल, पूर्व युरोप, रशिया - सगळी इथेही आहेत.
हिरोला अशा मोहिमांची सवय नसते. त्यामुळे तो काही चुका करतो. एखाद्यावर बंदूक रोखून गोळी झाडण्याचा सराव नसतो. त्यामुळे दोन-तीन वेळा ऐन वख्ताला माघार घेतो. हडबडतो. जीव खाऊन पळ काढतो.
पण केवळ बौद्धिक बळावर तो पुढे जात राहतो.

अचाट, अतर्क्य, कै-च्या-कै मारामार्‍या नाहीत. डॅशिंग वगैरे नसणारा हिरो आहे.
रविवार दुपार, बाहेर मस्त पाऊस, घरात अंधार करून एकटीने बघितला. त्यामुळे मजा आली.

राभु 'तेहरान'चा रिव्ह्यू आवडला. साधना म्हणतात तसं नुकताच पाकिस्तान्यांशी लग्न करून खैबर पख्तुनवात अडकलेल्या भारतीय मुलीला वाचवणारा जॉ अ चा पिक्चर बघितला होता. त्यामुळे हा बघणार नव्हतेच.
मिशी लावल्याने आपल्याला अभिनय करता येईल व गंभीर भूमिका करता येतील हा त्याचा समज कुणी करून दिलाय कोणास ठाऊक.

त्या निमित्ताने बाय द वे खैबर पख्तुनवामधल्या स्टोरीशी साधर्म्य दाखवणारा पाकिस्तानी 'खुदा के लिए' आठवला. त्यात आपला नसिरुद्दीन शाह आणि (त्यांचा) फवाद खान आहे. भारतात दिसेल की नाही माहित नाही पण रेको देतेय.

खालील धाग्यावरील पोस्ट इथेही टाकतो. चुकवू नये असा चित्रपट वाटला.

https://www.maayboli.com/node/87052

Court – state vs a nobody
Hindi dubbed
ओरिजिनल भाषा – तामीळ
वर्ष – २०२५
कुठे बघाल – नेटफ्लिक्स
जॉनर – नावाप्रमाणेच कोर्ट ड्रामा
IMDB रेटिंग - ७.९

Highly Recommended

न्यू रिलीज चित्रपट आहे. ४ ते ५ कोटी रुपयामध्ये बनवला आणि ५७ कोटी कमावले. एखाद्या चांगल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिस सक्सेस मिळालेले बघून बरे वाटले.

सुरुवात साधारण सैराट सारखी होते. वॉचमनचा मुलगा आणि श्रीमंत राजकारण्याची मुलगी. फक्त इथे सीन असा असतो की मुलगा असतो १९ वर्षांचा आणि मुलगी १७ वर्षांची. जेव्हा तिच्या घरी हे कळते तेव्हा मुलावर POCSO Act अंतर्गत केस टाकली जाते.

The POCSO Act, or the Protection of Children from Sexual Offences Act, is a comprehensive Indian law enacted in 2012 to protect children from sexual assault, sexual harassment, and pornography.

सुरुवातीचे अर्धा पाऊण तास साधा सुधा वाटणारा चित्रपट कोर्ट ड्रामा सुरू झाल्यावर जबरदस्त रंगत जातो.
केस लढणाऱ्या वकिलाची आपली एक कहाणी आहे. त्याची ही पहिलीच केस असते. त्याला स्वतःला सिद्ध करायचे असते. त्या मुलाच्या घरच्यांना आधी दुसऱ्या एका वकिलाने फसवल्यावर हा त्यांची केस घेतो. त्याचे काम जबरदस्त झाले आहे. आधी साधासुधा सपोर्टिंग कलाकार वाटणारा वकील नंतर हिरोच्या आवेशात केस लढू लागतो हा आत्मविश्वासातील बदल छान दाखवला आहे.

म्हटले तर केस मध्ये तितकाही दम नसतो. पण आपल्याकडे फार काही पारदर्शक कारभार चालत नाही. त्यामुळे जर कोणी आपले पद आणि पैशाच्या जीवावर या कायद्याचा गैरवापर करायचे ठरवले तर काय होऊ शकते याची झलक बघायला मिळते. शेवट त्याच नोटवर केला आहे. पण सत्याच्या बाजूने आहे. आवर्जून बघा.

खूप जुना पिक्चर आहे.
कोणी Blade runner पाहिला आहे का? नसेल तर अवश्य पहा.
काल Lady Vanishes बघितला. हिच्कॉक चा उमेदवारीच्या काळातील सिनेमा आहे. बरा आहे.

जमल्यास सविस्तर लिही.>> लिहिण नाही जमत गं.

पण खूप आवडला हा चित्रपट. एक लहानसं गाव. त्यातल्या एका दुधाचा व्यवसाय करणारा माणसाचं बायको आणि पाच मुलींचं कुटुंब. मुलींच्या लग्नाची काळजी करणारी बायको. अन देवावर श्रद्धा ठेवून मेहनत करून कुटुंबाचा गाडा ओढणारा साधा कुटुंब प्रमुख. कुठल्याही गावात देशात असू शकतील अशी ही लोकं.
फक्त फरक एवढाच की ते ज्यू आहेत. ते लहानसं गावच ज्यू लोकांचं आहे.
म्युझिकल चित्रपट आहे.

Pages