Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महारानी...ऊत्तम आहे
महारानी...ऊत्तम आहे
फॅमिली मॅन 3 संपवली.
फॅमिली मॅन 3 संपवली.
मला तर शेवट नीट समजलाच नाही
असा अर्धवट का ठेवला?
म्हणजे, मेन गोल च साध्य न करता?
खूपच उपकथानके आणि षडयंत्रे यांनी प्रेक्षक जेरीस येतो!
फॅमिली मॅन पहिला सीझन आणि
फॅमिली मॅन पहिला सीझन आणि दुसराही एन्टरटेनिंग होता तसा. म्हणजे विशेषतः इण्टरनॅशनल वैविध्यपूर्ण कन्टेण्ट खूप बघत असाल तर हे अजिबात ग्रेट नाही पण बर्यापैकी करमणू़क आणि चांगले अॅक्टर्स.
सीझन ३ बघायला घेतला आहे. सुरुवात ठीक आहे पण ती निमरत कौर चे कॅरेक्टर फारच चीजी आहे. उगीच सूट घातलेली गूढ बोलणारी बाई, ना आगा ना पिछा. त्या आयएसाय मेजर समीर ला पण तसाच अधांतरी रोल आहे या पूर्ण सीरीज मधे. त्याचे विनाकारण युरोप मधे लेदर जॅकेट घालून फिरताना, फोन वर बोलताना शॉट घेऊन ठेवलेत आणि ते कुठेही वापरतात असा फील आला मला. पहि;या सीझन ला वाटले होते आता काहीतरी मोठे करणार हा, पण तो कुठे जात नाही की येत नाही
कॉमिक सीन्स चांगले आहेत. जयदीप अहलावत आवडला. सुचि चा मला पहिल्या सीझन पासून फार राग येतो तो तसाच आहे. तिची मुलगी ही तशीच आगाऊ अन विनाकराण फणकारलेली आहे. नागालँड चे लँडस्केप फारच सुंदर आहेत!
आता इतकेच. बाकी बघेन पुढचे भाग तेव्हा अपडेट करेन.
वर फर्जी उल्लेख वाचल्यावर,
वर फर्जी उल्लेख वाचल्यावर, ह्याचा दुसरा सिझन यायला हवा आता असं वाटलं. दोन सिझन बास, पुढे नको.
The beast in me चालू केली आहे
The beast in me चालू केली आहे नेफ्लीवर आहे. पहिला भाग छान होता. मिनिसिरीज आहे.
परवा stranger things शेवटच्या सीजनचा पहिला भाग येत आहे. जाम उत्सुकता आहे. मिसिंग यू अमा.
सुचि चा मला पहिल्या सीझन
सुचि चा मला पहिल्या सीझन पासून फार राग येतो तो तसाच आहे. तिची मुलगी ही तशीच आगाऊ अन विनाकराण फणकारलेली आहे. >> थँक्यु. मलापण.
अँकी१, कमांडो बद्दल थँक्स.
नेटफ्लिक्सवर A Man on the Inside चा सिझन२ आला. गोड आहे.
The Girlfriend (प्राइम)
The Girlfriend (प्राइम)
मिनी सीरीज आहे. स्टोरीटेलिंगची जरा वेगळी पद्धत, त्यात सस्पेन्स यामुळे पहिले दोन भाग चांगले वाटले. मग टिपिकल सास-बहू वळणावर (परदेशी ट्रीटमेंटसहित) जायला लागली.
शेवटचे दोन भाग पुन्हा जरा उत्कंठावर्धक झाले.
रॉबिन राइट - सासूचं काम केलंय. ही मला 'सॅन्टा बार्बरा'पासून आवडते. तिच्यासाठीच मालिका बघायला सुरुवात केली खरंतर. (हाऊस ऑफ कार्ड्समधली केव्हिन स्पेसीची बायको)
गर्लफ्रेन्डचं काम करणारी कोणीतरी नवीन वाटली. ती सुद्धा मला आवडली. तिचं ब्रिटिश उच्चारांचं इंग्रजी ऐकायला छान वाटलं.
अशा मालिकांमध्ये पुरुष पात्रं दुय्यम ठेवावीत असा नियम आहे की काय असं वाटतं.
अगदी शेवटचा सीन वरवर नॉर्मल, पण कथानकाला कलाटणी देणारा आहे. त्यामुळे दुसरा सीझन येणार असं दिसतंय.
बाकी बघायला काही नसेल, तर ही बघा. पटकथा क्रिस्प आहे. सर्वांचं अॅक्टिंग चांगलं आहे.
पण पाहिली नाही तर फोमो वाटून घेण्याइतकी भारी नाही.
Pages