Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामला लीगल है पहिली फारच
मामला लीगल है पहिली फारच आवडली होती. अगदी मार्मिक विनोद होते. दुसरा सीजन तुलनेत कमी आवडला. शेवटचे दोन एपिसोड राहिलेच. रवी किशन यातही मस्तच वाटला..
ऋ +१
ऋ +१
दुसरा सिझन बघायचा आहे अजून.
ऋ +१
ऋ +१
पहिली भन्नाट होती...दुसरी ठिकठाकच वाटली.
रविकिशन यात, लापता लेडीज दोन्ही मधे एकदम जबरी सुर सापडलाय त्याला..
प्राइमवर "पिरॅमिड स्कीम" मस्त
प्राइमवर "पिरॅमिड स्कीम" मस्त आहे. एकाच वेळी हसूही येते आणि त्या लोकांच्या डेस्परेटनेस बद्दल वाईटही वाटते. अॅमवे टाइप लोकांचा ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना एकदम रिलेटेबल आहे. नक्कीच रेको. त्या स्कीम मधे एकदम वरती असलेल्या लोकांबद्दल या मिटिंग्ज मधे केलेला गाजावाजा, त्यांच्या श्रीमंतीचे एकदम टॅकी प्रदर्शन सगळे अगदी चपखल वाटते.
विमल खन्ना, आठ भाग बघितले आणि
विमल खन्ना, आठ भाग बघितले आणि कंटाळा आला. सहज होणारे खून बघून सगळी सिरीज अविश्वासननीय वाटायला लागली. नायकाचा चेहरा फारच ओबड धोबड आहे. गोष्ट पटपट पुढे सरकत नाही. इतके भाग बघून वेळ का वाया घालवला असं वाटायला लागलं.
पिरॅमिड स्कीम - नोटेड
पिरॅमिड स्कीम - नोटेड
>> लोकांच्या डेस्परेटनेस
>> लोकांच्या डेस्परेटनेस बद्दल वाईटही वाटते.>> डेस्परेटनेस नाही रे, डेस्परेशन.
पिरॅमिड स्कीम - मी सुरू केली.
पिरॅमिड स्कीम - मी सुरू केली. दोन एपिसोड पाहिले. अगदी ॲमवे प्रकरण. कॅलिफोर्नियात दांडगा अनुभव आला आहे. हे झॉम्बीज सारखे स्वतः ब्रेनवॉश्ड असतात शिवाय कॉस्को, वॉलमार्ट मधे - अरे व्वा, तुम्ही महाराष्ट्रीयन का म्हणून फ्रेंडली अप्रोचने गळ्यात पडून चावतात. माझ्या तर शेजारी होते. विचारू नका. त्यांचा बिझनेस मधे प्रॉडक्ट विशेष नसून इतरांना फसवून अजून झॉम्बीज तयार करणं हेच त्यांचं पैसा कमविण्याचे साधन आहे. हे अगदी तसेच वाटले.
डेस्परेटनेस नाही रे,
डेस्परेटनेस नाही रे, डेस्परेशन. >>>
हो डेस्परेशन बरोबर असेल. मला तेव्हा लिहीताना जाम मेन्टल ब्लॉ़क आला.
पूर्ण पाहिली सिरीज. खूप एंगेजिंग आहे.
वॉलमार्ट मधे - अरे व्वा, तुम्ही महाराष्ट्रीयन का म्हणून फ्रेंडली अप्रोचने गळ्यात पडून चावतात >>> सनीवेल मधले Fry's Electronics हे या लोकांचा अड्डा होता. तेथे आइल्स मधे कोणी घुटमळताना दिसला तर लोक टाळत
मला आयकिया मधे जवळच्या एका सर्वांना माहीत असलेल्या रस्त्याकडे कसे जायचे हे विचारायला एकजण आला होता (उदाहरण द्यायचे तर पुण्यात तुळशीबागेत एखाद्याला लक्ष्मी रोड कोठे आहे विचारल्यासारखे)
मात्र मला या सिरीज मधले एक समजले नाही. मल्टी लेव्हल मार्केटिंग आणि जेन्युइन फ्रॉड कंपन्या हे यात दाखवले इतके दोन्ही सेम नाही. मल्टी लेव्हल मार्केटिंग मधे तुमचे पैसे घेउन ते पळून जात नसावेत. एका लेव्हलनंतर लोक मिळणे बंद झाले की ती चेन ठप्प होते. तुम्ही भरलेले पैसे हे प्रॉडक्ट करता असतात. तुम्ही लोक जमवण्याचे टार्गेट मीट केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे लोकांना माहीत असते (म्हणूनच ते डेस्परेशन असावे). यापेक्षा जास्त लिहीत नाही. नाहीतर मीच त्यातला वाटायचो
भरपूर इंटरेस्ट देऊन परतावा देऊ वगैरे सांगून लोकांचे पैसे घेउन एक दिवस गाशा गुंडाळून गायब होणारे वेगळे.
राख : भयंकर डिस्टर्बिंग पण
राख : भयंकर डिस्टर्बिंग पण जबर्दस्तं बनवलेली सिरीज आहे !
कमकुवत मनाचे असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी नाही .
मला रंगाबिल्ला केस बद्दल काही माहित नव्हते, बघताना ते क्रौर्य जक्कल सुतार केस पेक्षा जास्तं अंगावर आले !
जर सिरीज पाहिली नसेल तर वाचु नका
रंगा (रज्जो)बिल्लाचे (बाबू)रोल करणारे अॅक्टर्स कमाल आहेत, त्या बाबूचा क्रुरपणा फक्तं हिंसे मधे नाही तर सतत त्याच्या डोळ्यातून, बोलण्यातून जाणवतो.. भीती वाटते !
कॅरॅक्टर मधे थोडे बदल केले आहेत, रिअॅलिटी मधे दोघेही पंजाबी होते, इथे बाबू मराठी दाखवला आहे, बाबूची लहानपणची हिंसा दाखवणारा सहावा एपिसोड मराठीतूनच सुरु होतो आणि बराच वेळ मराठीतच चालु रहातो, एक सेकन्द मला वाटले चुकीची सिरीज सुरु झाली का !
१९७८ चा काळ, वातावरण निर्मिती, कॉस्च्युम्सचे डिटेलिंग आणि सगळ्याच कॅरॅक्ट्॑र्सचा अभिनय उत्तम !
सोनाली बेन्द्रेने फार मस्तं अभिनय केलाय, खरीच ती व्हिक्टिम्स ची आई दिसते , तिचा दु:खा पलीकडचा शान्त भकासपणा , उतरलेला चेहरा बरच काही बोलून जातो !
दु:खाचा डोक्यावर परिणाम होणे, त्यातून सुटका म्हणून लगेच रुटिन फॉलो करत शाळेत शिकवायला जाणे सगळेच अंगावर येते !
आजवर मी गेम ऑफ थ्रोन्स, मिर्झापुर, धुरन्धर सगळीकडे इतकी हिंसा पाहिली आहे आणि सवय झाली आहे पण यात मात्रं आठव्या एपिसोडची हिंसा सहन होईना.. बघतानाच कसतरीच वाटत होतं, डोकं गरगरायला लागलं !
त्या मुलाने आणि मुलीने कसे फेस केलं असेल ? किती यातना झाल्या असतील.. त्या दिवशी मुलांचे वडिलच सोडायला गेले आसते तर ?? का त्यांनी मुलांना अपापले जाऊ दिले ?अशी हळहळ वाटत राहिली.. ती हळहळ दिग्दर्शकानेही शेवटी दाखवली आहे.. यूं होता तो क्या होता !
तरीही हॅट्स ऑफ , त्या दोघा बहिण भावांनी जे शौर्य दाखवले, मुलीने तर ‘तशा ‘प्रसंगातही दोघांना जखमी केले.. रंगा बिल्लाला त्या मुलीने केलेल्या प्रतिकाराच्या वारांमुळे हॉस्पिटलला जावे लागले आणि या एकमेव क्लु आधारे पुढची केस पोलिसांना सोडवता आली..शेवटी नेव्ही ऑफिसरची बहद्दुर मुले होती ती !
त्या प्रसंगानंतर गीता चोप्रा - संजय चोप्रा २ मुलांच्या स्मृति मधे मरणोत्तर किर्तीचक्र हे खास लहान मुलांच्या शौर्याचे अॅवॉर्ड इंट्रोड्युस केले गेले आणि अजुनही बहादुर लहान मुलांना हे अॅवॉर्ड दिले जाते !!
१९७८ नंतर इतकी वर्षे झाली पण अजुनही दिल्ली संध्याकाळी सेफ नाही
संजय चोप्रा, गीता चोप्रा
संजय चोप्रा, गीता चोप्रा हत्याकांडाच्या बातम्या तेव्हा पेपरमध्ये सविस्तर वाचल्याच्या आठवतात. त्या दोन मुलांचे फोटो, गुन्हेगारांचे फोटो, तेव्हाही वाचताना खूप थरकाप उडाला होता.
मी ही सिरीज आता नाही बघू शकणार.
१५-२० वर्षांपूर्वी भारतातल्या गाजलेल्या गुन्ह्यांवर आधारित एक हिंदी मालिका यायची. दूरदर्शनवर की वेगळ्या चॅनलवर, ते आठवत नाही. त्यातही या केसवर एक एपिसोड होता. तेव्हा तो पाहिला होता.
त्या मुलांच्या नावाने नंतर पुरस्कार सुरू झाला, त्याबद्दल दरवर्षीच्या विजेत्या मुलांच्या स्टोरीज किशोर अंकात यायच्या. त्या मी न चुकता वाचायचे.
मी ही सिरीज आता नाही बघू
मी ही सिरीज आता नाही बघू शकणार.
१५-२० वर्षांपूर्वी भारतातल्या गाजलेल्या गुन्ह्यांवर आधारित एक हिंदी मालिका यायची. दूरदर्शनवर की वेगळ्या चॅनलवर, ते आठवत नाही. त्यातही या केसवर एक एपिसोड होता. तेव्हा तो पाहिला होता.>>>>> सोनी टीव्ही वर भंवर नावाची सिरीयल होती.
>>> मी ही सिरीज आता नाही बघू
>>> मी ही सिरीज आता नाही बघू शकणार
हो, मलाही तसंच वाटलं. पुढेमागे धैर्य गोळा झालंच कधी तर बघेन.
मी बघायला सुरुवात केली आहे
मी बघायला सुरुवात केली आहे राख. भयंकर डिस्टर्बिंग आहे. आधी तर एक एपिसोड बघून रंगा बिल्ला केस वर आहे हे लक्षात येताच बघणे थांबवले होते. नंतर मग काल पुन्हा सुरु केली बघायाला. एरव्ही मला खुना बिनाचं काही वाटत नाही पण ही खरी स्टोरी आहे , तेही लहान मुलांसोबत चा व्हायलन्स आणि त्यामुळेच तो अंगावर येतो अक्षरशः.
अॅक्टर्स सगळे छान आहेत, कपडेपट , वातावरणनिर्मिती पण अगदी साजेशी आहे.
अॅग्री.. लहान मुलांसोबत असं
अॅग्री.. लहान मुलांसोबत असं काही झालंय हे नाही बघवत! आई वडिलांचे काय होत असेल या विचाराने गलबलतं.
येस्स, ऑर्किड, 'भंवर' मालिका.
येस्स, ऑर्किड, 'भंवर' मालिका.
राख बघितला... भयंकर आहे.
राख बघितला... भयंकर आहे..रात्री शांत झोप लागली नाही... शेवटचं "जर-तर" सीन मधलं गाणं आठवत राहिलं..
आज सकाळी मुलगी क्लास वरुन घरी पोचेपर्यंत अस्वस्थ वाटत राहिलं.. उगीचच तिला २-३ फोन करुन लोकेशन चेक करत होते..
देव असे लोक का बनवतो ?
राख पुढच्या वीकेंडला बघायचा
राख पुढच्या वीकेंडला बघायचा होता.
पण इथले प्रतिसाद वाचून आता नाही बघत वाटते.
माझी पण बघून झाली "राखः , फार
माझी पण बघून झाली "राख" , फार जबरदस्त बनवली आहे सीरीज. दोघांना पकडण्याच्या सीन पर्यन्त आपल्यालाच अॅन्क्झायटी येते फार. शेवटच्या भागात तर फार, भयंकर त्रास झाला बघताना. कथेतच व्हायलन्स आहे, पण कॅश करण्यासाठी म्हणून सवंग ग्राफिक असे व्हायलन्स किंवा सेक्शुअल सीन्स नाहीत. तरीही परिणामकारक.
सगळे अॅ़क्टर्स भारी काम करून गेलेत. सोनाली बेन्द्रेचे विशेष कौतुक. अगदी म्हणजे अगदी नॉन ग्लॅमरस रोल पण फार सुंदर काम केलेय तिने. तिचे दु:ख, वेदना अगदी पोचतात. अली फजल , राकेश बेदी सगळ्यांचेच रोल नेहमीपेक्षा वेगळे आहेत एकदम पण ते ते रोल ते जगलेत अक्षरशः.
शेवटच्या एपिसोड मधे गुन्ह्याचा तो प्रसंग तपशिलात येतो, म्हणजे जे घडले ते माहित आहे, डार्क आहे, डिस्टर्बिंग आहे पण शेवटी "जर त्या दिवशी मुलांनी लिफ्ट मागितलीच नसती तर...तो दिवस कसा असला असता" असा आल्टर्नेट सिनारिओ घेऊन त्या नोट वर एन्ड केला तो आवडला, म्हणजे प्रेक्षकाला त्या हृदयद्रावक सत्यापासून जरा दूर नेल्यासारखे, अस्वस्थतेपासून किंचित - किंचितच उतारा मिळाल्यासारखे वाटले.
एक कळले नाही, मुख्य आरोपीला मराठी बनवण्याचे काय कारण असावे, कुलजित सिंग ऐवजी कुमार भिडे ?!
.. कथेत व्हायलन्स आहे, पण कॅश
.. कथेत व्हायलन्स आहे, पण कॅश करण्यासाठी म्हणून सवंग ग्राफिक असे व्हायलन्स किंवा सेक्शुअल सीन्स नाहीत. तरीही परिणामकारक….
Exactly. फार छान हँडल केलेय. यापेक्षा कितीतरी gorier आणि explicit crime scenes सिनेमा आणि सिरीयलींमधे बघून झालेत. उलट क्रिमिनल्सची कथा असूनही restraint साठी या टीमचे कौतुक.
अदाकारी उत्तम, अगदी १-२ सीनसाठी असलेल्या कलाकारांचीही.
क्रिमिनल्सची कथा असूनही
राख बघतेय. त्रास होतो बघतांना.
क्रिमिनल्सची कथा असूनही restraint >> अगदी असेच 'India's daughter' ह्या डॉक्युमेंट्रीत केले होते. खूपच परिणामकारक होती ती. पण त्यावर बॅन आला. (बॅन होण्याआधी मुलाने डाउनलोड केली म्हणून मला बघायला मिळाली.
India's daughter निर्भया वर होती.
राख पळवतच पाहिली कारण ती केस
राख पळवतच पाहिली कारण ती केस माहिती असल्याने कोणताच सीन तपशीलात पहायची हिंमत नव्हती. फारफार दुर्दैवी घटना
कोणीतरी मला सांगा की राख
कोणीतरी मला सांगा की राख मध्ये जो सलीम दाखवला आहे त्याचं पोलिसांनी इन्वेस्टीगेशन केलेलं दाखवलेलं आहे की नाही...?
मला तरी तसं दिसलं नाही डायरेक्ट रिपोर्टरच त्याच्यापर्यंत पोहोचते असं दिसलं आणि नंतरही त्याचा त्या केसमध्ये काहीच उल्लेख दाखवलेला नाही.
Titan ...उत्तम आहे. सर्वांचे
Titan ...उत्तम आहे. सर्वांचे अभिनय भारी. थोडी भाबडी आहे. पण पकड घेते.
आय विल फाइंड यु - हार्लन
आय विल फाइंड यु - हार्लन कोबनच्या कादंबरीवर आधारीत आहे. अतिशय ग्रिपिंग, सस्पेंस, थ्रिलर आवडणार्यांकरता मस्ट सी..
#####स्पॉयलर अलर्ट#####
बर्याचदा काहि सीन्स्/प्रसंग कायच्याकाय वाटतात परंतु सिरीज जस-जशी पुढे सरकते, सगळ्यांची उत्तरं सापडत जातात. एक गोष्ट मात्र खटकली. ब्युरोत ब्लड रिलेशन असलेल्यांना नोकरी मिळते, पण ते एकाच केसवर काम करु शकत नाहि. इथे मात्र तसं दाखवलं आहे. कदाचित बाप-लेकिच्या इमोशनल ड्रामाचा तडका आवश्यक वाटला असेल (सिनमॅटिक लिबर्टी?)..
हि वेबसिरीज नेफिवर आहे...
मस्त आहे मालिका.
मस्त आहे मालिका.
आय विल फाइंड यु - हार्लन
आय विल फाइंड यु - हार्लन कोबनच्या कादंबरीवर आधारीत आहे. अतिशय ग्रिपिंग, सस्पेंस, थ्रिलर आवडणार्यांकरता मस्ट सी..
>>>
नोटेड.
राज , I will find you बघितली.
राज , I will find you बघितली. आवडली.
Halen Cobben च्या कथा बर्यापैकी अ आणि अ वळणावर जातात .
ते बाप लेक खरतर अजिबात आवडले नाहीत.
पण ते एकाच केसवर काम करु शकत नाहि. >>> तिची बॉस म्हणते ना " he pulled the strings to get his daugher on same case" .
हेडन , एडम आणि तो पेनचा उजवा हात , किती वेळा माझा तिघांमध्ये गोंधळ झाला
I will find you >>> पहिले २
I will find you >>> पहिले २ भाग पाहिले, ग्रीपिंग आहे अगदी!
I will find you पाहिली. चार
I will find you पाहिली. चार भागापर्यंत फारच आवडली. नंतर कायच्या काय चालू होते. सातव्या भागात परत रुळावर आली, आठवा भाग पण ठीक होता. आठव्या भागातल्या climax सीन मध्ये माय लेक संवाद आहे तो अगदीच सपक आणि ठोकळा acting, एकंदर हेडनची acting ठोकळा होती. एकूण ओके वाटली.
Pages