शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, आणि या व्यतिरिक्तही. वाक्य आठवत नाही, हे एक शोधून सापडले: "बहिर्जी नाईक म्हणोन मोठा शहाणा जासुदाचा नाईक तो बहुत हुशार चौकस ठेविला."

तसेच:
मागे बहुतांचे फेडीयले ऋण
राखावी बहुतांची अंतरे
दासबोधातही बहुत शब्द बहुत वेळा आहे.

बरोबर, मानव.
मला मोस्ट्ली असा अर्थ लावल्यावर पटकन अर्थ उमजला!! Uhoh
बव्हंशी असाही एक शब्द प्रचलित आहे ना?
Happy

मस्त चर्चा.
नवीन शब्द माहीत झाले.
आई रोज रात्री डब्यात चतकोर भाकरी/ चपाती किंवा छोटी वाटी भात ठेवते. रात्री लक्ष्मी आली जेवायला तर. पण त्याला हा लक्ष्मीराखण शब्द आहे हे आता माहित झाले.

@ मानव, तुम्ही बखरीतील मराठी भाषेचा विषय काढलाच आहे तर इतक्यात एका बखरीत वाचलेले दोन शब्द इथे देतो. ते छान rhyme सुद्धा होत आहेत.

१} अश्रणी = अशरीरीनी वाणी / आकाशवाणी

२} संचणी = जमाव, गर्दी

विजरई हा शब्द इथे सापडेल परंतु त्याची स्वतंत्र नोंद व अर्थ दिलेला नाही.

या शब्दाचा इंग्लिश प्रतिशब्द आपल्याला शालेय इतिहासापासून चांगला परिचित आहे !
पाहूया कोण लिहतंय ते . . .
Happy

विजरई म्हणजे पोर्तुगीजकालीन गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय (Viceroy) या पदाचा मराठी उच्चार. पोर्तुगीज साम्राज्यात, विजरई हे गव्हर्नर-जनरल किंवा व्हाईसरॉय यांच्यासाठी वापरले जाणारे पद होते. ते त्या भागाचे सर्वात मोठे अधिकारी असायचे.
नेट वरून.

व्हाईसरॉय
>>> बरोबर !! छान.
सन 1735मध्ये थोरल्या बाजीरावांनी देखील हा शब्द पत्रव्यवहारात वापरलेला आहे.

भरत, खजिना शोधुन काढलात.

त्यातून:
बहुत [ प्रभूत = पहूत = वहूत = बहूत, बहुत ] अस्य लक्ष्मी रपि प्रभूता जाता (धर्मदत्तचरितम्) = त्याला द्रव्य हि बहुत जालें. या बहुत शब्दाचा बहु या संस्कृत शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

संस्कृतमध्ये प्रभूत = पुष्कळ, भरपूर.

बहु-हू [सं. बहु < भू (= असणे )] पुष्कळ. {बहुगुणी,
बहुचक, बहुधा, बहुमत, बहुरंगी, बहुरूपी इ.}
अशी एक व्युत्पत्ति आहे. मागे प्र लावायची पण गरज बाही,

होय.
हा शब्द फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन आणि पोर्तुगीज असा सर्वत्र जवळपास सारखाच आणि त्यातून इंग्लिशमधला गार्ड तयार झाला

https://www.etymonline.com/word/guard

'छावा'च्या वेळी चिकवावर या शब्दाची चर्चा झाली होती - गारद, गारदीची.

विजरई- viceroy फार इंटरेस्टिंग वाटले.

मराठी भाषेतील समानार्थी शब्दांचा महाकोश बनवण्याचे कार्य ठाण्यातील सुहास रानडे यांनी हाती घेतलेले आहे. त्या प्रकल्पापैकी 968 पानांचा मराठी समानार्थी लघुकोश (पहिला खंड) प्रकाशित झालेला आहे. असे एकूण 16 खंड प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.
अभिनंदन !

रानडे यांच्या आजच्या मटातील मुलाखतीतून समजलेले काही रोचक समानार्थी शब्द असे :
अस्वल : दीर्घकेश, भीरुख (= भयावह), ॠच्क्ष (मूळचा उत्तरेकडचा म्हणून).
उंदीर : कर्व (कुरतडतो म्हणून), गुहाशय
कमळ : नीलपत्र, पुंडरिक

कमळाच्या नावावरून आठवलं. मागे आपण सूर्याची नावं पाहिली आणि त्यात वेगवेगळे प्रकारचे सूर्य आहेत अशीही चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे कमळाचे आहे. स्थूल मानाने सूर्यविकासी आणि चंद्रविकासी कमळ असे दोन प्रकार त्यात आहेत. त्यातही वेगवेगळ्या कमळाला वेगवेगळी नावं आहेत. त्यात पुष्कर, कुमुद, पुंडरिक वगैरे येतात. पण ती नावे सर्वसाधारण कमळाला समानार्थी म्हणून पण वापरतात.

>>>ॠच्क्ष
एखादा शब्द किती जगडव्याळ असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण.

ऋत या शब्दाचा अर्थ काय आहे?

नेटवर दोन अर्थ दिसले -
१. जग चालण्यामागची व्यवस्था - पण मग सामान्य माणसाला ती व्यवस्था ज्ञात नसणार. मग ऋतं वच्मि प्रत्येकाला लागू नाही होणर.
२. सत्य - मग एका पाठोपाठ ऋतं वच्मि| सत्यं वच्मि | असे दोनदा सांगायची काय गरज?

Pages