शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टरेस्टिंग! हे माहीत नव्हतं, धन्यवाद. Happy

बरेचदा स्त्रीलिंगी रूप 'कवियत्री' असंही चुकीचं लिहिलेलं पाहिलं आहे.

इन्टरेस्टिंग! +१
हे मला 'सवितृ'(सूर्य) शब्द जो मुळात पुल्लिंगी आहे पण तृतियेचे एकवचन 'सविता' होते, ते आपण स्त्रीलिंगी करून टाकले आहे तसेच वाटले.

पुल्लिंगी रूप ---ता आणि स्त्रीलिंगी रूप ---त्री होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे भोक्ता पुल्लिंगी तर भोक्त्री स्त्रीलिंगी>>
काय एकेक क्लिष्ट नियम बनवून ठेवले आहेत भोक्त्रीच्यांनी.

सविता हे सवितृचे प्रथमा एक वचन आहे.
तृतीया सवित्रा.

हा शब्द सु या धातु पासून बनला आहे त्याचा अर्थ जन्म देणे, निर्माण करणे.
त्याचे स्त्रीलिंगी सवित्री. अर्थ आई/निर्माण करणारी.

सावित्री सूर्या पासुन बनलेली - सूर्याची मुलगी. सूर्य किरण(स्त्रीलिंगी) असा पण अर्थ दिलाय.
इतर अर्थ पण आहेत पण इतर संदर्भात असावेत.

कालच्या जडभारी शब्दानंतर आता थोडा विरंगुळा :
मुलामुलींची नावे ही तर खरी विशेषनामे. ती ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी पालकांचा आहे. पण या बाबतीतही सरकार लडबुड करू लागलं तर ? गहजब होणारच ना !

हे पहा जपानमध्ये काय चाललंय . . .
खबरदार, मुलांची नावे अवघड ठेवाल तर !

https://www.lokmat.com/international/japan-introduces-rules-to-put-outla...

… जापान सरकारनं “रोक” आणली आहे ?? …

पूर्ण बातमी लिहितांना व्याकरण / शुद्धलेखनावर रोक आणली आहे लोकमत ने 😀

ही लिंक लष्करात शोभेल

बातमी वाचली. उगीच पाणी घालून वाढवली आहे. डेन्मार्क मध्ये ही नाव म्युनिसिपल्ट कडून मान्य करून घ्याव लागत. आमच्या तमिळ मित्राने गेल्या वर्षी स्वतःच्या मुलीसाठी भारतीय नावाच्या यादीतील नाव न आवडल्याने व नवीन नाव मंजूर करून घेण्याचा खटाटोप टाळण्यासाठी सरळ french यादीतील नाव ठेवले.

BTW मला अशा लिंक दिसतात मायबोली मजकुरात. ( उदा. वरील प्रतिसादातलं मराठी व्याकरणच पुस्तकं ही लिंक देखील ल.भा. मध्ये शोभेल) हे काय आहे? कसं टाळायचं?IMG-20250627-WA0000.jpg

*डेन्मार्क मध्ये ही नाव म्युनिसिपल्ट कडून मान्य करून घ्याव लागतात
>>> अच्छा. हे नव्याने समजले

ओलीसुकी
1970च्या दशकात लहानपणीचे खेळ खेळताना हा नित्याचा शब्द होता. आता कालौघात तो लुप्त झालेला असावा ! एखाद्या खेळाच्या प्रारंभी केलेली मुलांची ही वैशिष्ट्यपूर्ण ‘नाणेफेक’ अर्थात ‘टॉस’ आहे. रस्त्यावर सापडलेला एखादा चपटा दगड घेऊन त्याची एक बाजू थुंकीने ओली करणे हे तेव्हा सर्रास चालायचे. दगड हवेत उडवल्यानंतर समोरच्याने ओली का सुकी ते पटकन सांगायचे.

खास बोलीभाषेतले असे शब्द प्रमाण कोशांत सापडणे कठीण.

पाठराखण माहित होता.

इतक्यात “लक्ष्मीराखण” शब्द डोळ्याखालून गेला. याआधी कधीही न ऐकलेला.

लक्ष्मीराखण = लक्ष्मीने कुटुंबात नित्य रहावे म्हणून लक्ष्मीकरिता निराळा काढून ठेवलेला रोजच्या जेवणाचा भाग / नैवेद्य

Happy
लक्ष्मीराखण छान आहे.
देव राखण म्हटले तरी चालेल. ( पण ते देवाने केलेली राखण असे होऊ नये!)

आत्ता मी कॅच हा शब्द क्याच असा लिहिलेला वाचला.
त्यावरून वाटले,की मूळ मराठीत डोक्यावर अर्धचंद्र देण्याचा प्रघात नसावाच. ( ती गरज अक्षर अर्धे करून य ला जोडून पूर्ण होते) .
तसेच ऑर्डर, पॉश, बॉल,मॅन, ग्रॅम.....हे सगळे इंग्लिश शब्द आहेत.
अर्धचंद्र देऊन लिहावा (च) लागेल, असा मराठीत शब्दच नाही.

पुलंच्या लिखाणात असे जुन्या पद्धतीने लिहिलेले दिसते. मी विकत घेतलेल्या आवृत्या १९९० व नंतरच्या आहेत. त्यातही असेच असल्यामुळे पुलं तसे लिहित असावेत असे मला वाटले होते. मराठीत अर्धचंद्र द्यावा (म्हणजे अ‍ॅ हा, डच्चु नव्हे) असे शब्द नसावेत बहुधा.

जाताजाता, बहुधा व बहुतेक यात काय फरक?

Happy
बहुतेक मी वविला येणार नाही
म्हणजे, बहुत एक, ( अगदी नगण्य!) अशी शक्यता आहे, की मी वविला येणार नाही.
तशी, बहुधा ची फोड काय आहे?

बहुतात एक असे नव्हे ते.
एकच नव्हे तर बहुत एक , किती(तरी) एक असे म्हणजे पुष्कळ.
आज बहुतेक पाऊस पडणार म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता पुष्कळ आहे.

बहुधा संस्कृत शब्द. "धा" हा प्रकारवाचक तद्धित प्रत्यय.
बहु + धा = विविध /पुष्कळ प्रकारे.
हा शब्द सुद्धा बहुतकरून या अर्थी वापरतात.

धन्यवाद, मानव.

>>> हा शब्द सुद्धा बहुतकरून या अर्थी वापरतात.
आणि बहुतकरून बहुतेक लोक हल्ली 'बहुदा' असा लिहितात. Proud

मानव, Happy
बहुत एक...ही व्युत्पत्ती पटली नाही.
बहुत हा तर हिंदी शब्द आहे!!

संस्कृतोत्भव 'बहु' (उदा. बहुवचन ) पासून झालेला असावा. झाले बहु, आहेत बहु, होतील बहु परंतु या सम हा. क्यूंकी मराठीतभी कभी बहुत था. Happy "बहु" वरून सासबहू पिजे.

बहुत+ एक अशी संधी नाही त्याची. ती बहुतैक होईल. ( अ + ए वृद्धी होऊन ऐ)
बहुतर एक चे बहुतेक झाले असे दिसते.

बहुत शब्द मराठीत शिवाजी महाराज्यांच्या काळातील काही पत्रात किंवा बखरीत वाचल्याचे आठवते.

बहुतांश बहुत + अंश संधी (कदाचित हा पूर्ण शब्द मराठीत जसाच्या तसा घेतला असेल.)

>>> ती बहुतैक होईल
हो.
'कैक'ची फोड कशी होते? की तो एकैकचा अपभ्रंश आहे?

हो.

Pages