शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महीशासुर >> अजून एक बाब आज लक्षात आली. ईश आणि असुर यांच्यात संधी घडवून आणण्याची नामी संधी तुम्ही साधली आहे ह्यात. Happy

भिरंगत..

सुंदर, नादमय शब्द आहे हा. भिर भिर+ तरंगत ही कृती नजरेसमोर आणणारा. ❤

आहिताग्नी = अग्निहोत्री, होम करणारा. >>> धन्यवाद. पुण्यात एक आहिताग्नी राजवाडे कार्यालय आहे. त्यातील या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. आता ही जुनी कार्यालये कितपत वापरली जातात माहीत नाही पण पूर्वी हे खूप लोकप्रिय होते.

स्वानंदी हे नाव नाही , ते बिरुद/ उपाधी आहे.
अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे. नाव शंकर होतं

स्वानंदी हे नाव नाही.
इथे स्वानंदी नंतर कॉमा नसल्याने थोडा वेळ मला 'स्वानंदी' हीच एक उपाधी आहे असे वाटत राहीले होते Happy
नंतर लक्षात आले.
चूक काढण्याकरता लिहीलेले नाही. माझ्याही हातून अशा गंमती घडतात.

कुंठा
= निराशाजन्य अतृप्त भावना

हिंदीतला हा शब्द नेमाडेंच्या मराठी लेखनात वाचला :
“आणखी एकदा लिहिता लिहिता कुंठा आली ती आजच्या विसाव्या शतकाच्या सभ्यतेसंबंधी”.
. . .

कुंठ (मराठी) = गोणी
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

>>>> वरील दोन्ही शब्द पूर्णतः भिन्न दिसतात.

कुंठा हा शब्द हिंदीत सहज वापरतात. छान शब्द आहे तो.

पार्श्वभूमी शब्दाकरता हिंदीत पृष्ठभूमी असा शब्द आहे पण पार्श्वभूमी जास्त योग्य वाटतो.

पार्श्वभूमी = background
पृष्ठभूमी = surface

वरचे हिंग, वाटाणे, मूग, चवळी, तीळ ... मस्त.

अजून एक - डाळ शिजली नाही.

या यादीत 'ए रताळ्या' पण समाविष्ट करावं का? Wink

@ या यादीत 'ए रताळ्या… 😀

पार्श्वभागाला झोंबणारी मिर्ची पण घेऊया + अर्धे हळकुंड.

झालेच तर पुराण फेम वांगी, मेंदूचे replacement असलेले बटाटे आणि नाकाने सोलता येणारे कांदेही घेता येतील.

@अनिंद्य
मेंदूचे replacement असलेले बटाटे >>> मायबोलीवर आहोत तर बटाट्याच्या जागी पनीर चालेल का?

कागदखराब्या
हा अधिकृत शब्द नसला तरी हे विशेषण एका मान्यवर लेखकांना 60 वर्षांपूर्वी काही साहित्यिकांनी बहाल केलेले होते.

या लेखकाच्या 1965मध्ये प्रसिद्ध झालेल्या, लैंगिक व्यवहारातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या ‘त्या’ कादंबरीने साहित्यविश्वात प्रचंड खळबळ माजली आणि गदारोळही झाला होता. तिची ‘विष्ठावाङमय’ अशी अवहेलना देखील झाली होती.

ती कादंबरी म्हणजे . . .
. .
. .

वासूनाका आणि त्याचे लेखक भाऊ पाध्ये !
(दिनांक 16 नोव्हेंबरच्या मटा, पुणे मधून साभार).

‘विष्ठावाङमय’ 😀

वासूनाका टाईप लेखन ‘विष्ठावाङमय’ असेल तर “सोनखतवाङमय’ सुद्धा वाचलेय म्हणावं आम्ही

(सं) . असि = तलवार
लता = वेली

असिलता / असिल्लता = तलवार ( परजणे)
तलवारीचे वर्णन करण्यासाठी लतेचा का संयोग केला असावा ?
नीटसे समजले नाही.

* “सोनखतवाङमय’ >>>> Lol
असिलता / असिल्लता नव्याने कळले.
असिधारा व्रत माहीत होते.

Pages