शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे इंग्रजी आहे पण पाहायला सुटसुटीत वाटते म्हणून मी स्वतः साठी ठेवले होते. यात बऱ्याच भौगोलिक रचना दाखवल्या आहेत.
IMG-20250623-WA0004.jpg
Cove/ Bay - खाडी (Bay of Bengal)
Archipelago - द्वीपसमूह
Gulf/ cape - आखात (Gulf of Mexico, cape of good hope)
Lagoon - खारकच्छ किंवा समुद्राजवळील सरोवर
Peninsula - सुळका (मुंबईची रचना)
जेथे समुद्र जमीन दुभंगून जातो ती खाडी, जेथे जमिनीमुळे समुद्र दुभंगतो तो सुळका.‌ खाडीवर व्यवस्थित किनारा नसतो, असखल, खाचखळग्यांची असते सहसा.

प्रत्येक ठिकाणी - जेथे सागरा धरणी मिळते तेथे - beach नाही होऊ शकत. Happy सुळक्यावर मात्र छान किनारा असू शकतो. वसाहतीही असू शकतात. वरच्या चित्रातले 'स्ट्रेट'चे स्पेलिंग चुकलेय पण पनामा कनाल डोळ्यासमोर येईल, दोन्ही कडून जवळजवळ आलेल्या जमिनीमुळे तेथे जहाज अडकतात. ट्रॅफिक जाम होतो.

Happy चुभूद्याघ्या. काहींच्या बाबत खात्री नाही.

अस्मिता हाच चार्ट मी शोधत होते. फार आवडता आहे पण मी सेव्ह नव्हता केलेला. बरं झालं दिलास ते.
उप्स हा नाही असाच, क्रीक, स्ट्रीम, ब्रुक वगैरे चा.

वासुकी
= सर्पांचा राजा.

तसेच वासुकी हे अवाढव्यता, ताकद आणि सोशिकपणाचे प्रतीक मानले जाते. याच कारणास्तव भारतातील लांबीने सर्वात मोठ्या (3.5 किलोमीटर) मालगाडीला हे नाव देण्यात आले आहे.

https://www.news18.com/viral/indias-longest-train-counting-the-wagons-ta...

@ अस्मिता - चार्ट उपयोगी आहे.

@ वासुकी,

पौराणिक कथांमधे वासुकी देव-दानवांच्या अमृतमंथनातला हीरो, मंथनासाठीचा दोर झाला होता तो.

पुराणकथांमधे एकूण नऊ सर्प विशेष प्रसिद्ध आहेत. विष्णुचा Floating bed = शेषनाग, पद्मनाभ, कंबल, जनमेजयाच्या/ परिक्षिताच्या कथेतला तक्षक, कृष्णानी दमविलेला कालीया नाग वगैरे. बाकी नावे विसरलो.

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शड्खपालं धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मानाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत्।

हे नवनागस्तोत्र.
भीमाला विषबाधित खीर खाऊ घालून सर्पाच्या नदीत शकुनी व दुर्योधनाने ढकलून दिले तेव्हा वासुकी हा राजा होता तिथला, कुंतीला बहिण मानायचा. त्यामुळे भाच्याला प्रतिविष देऊन जिवंत करत अजून पावरफुल व्हायचं वरदान देऊन वर पाठवले. शेवटी मामा येई कामा ! ह्या गोष्टीत वासुकीच आहे बहुतेक.

परिक्षिताच्या गोष्टीत सफरचंदाच्या पोटातली अळी होऊन तक्षक आला व त्याला डसून मारले. कलियुगाची सुरवात करण्यासाठी कलीने सोन्यात आणि जेथे स्त्रियांचा अपमान होतो तेथे तरी मला राहू दे अशी विनवणी केली होती. त्यामुळे तो मुकुटात शिरून बुद्धी भ्रष्ट करू लागला. आधी त्याने परिक्षिताचीच केली. जनमेनजयाने 'तक्षकाय स्वाहा' म्हणून पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी यज्ञ केला तर हा स्वतः चा जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनाला वेटोळा घालून बसल्याने इंद्रासहित 'स्वाहा' व्हायची वेळ आली होती. युगांचा ट्रान्झिशन पिरियड होता. मोठी गोष्ट आहे, मी संक्षिप्त केली आहे.

शेष तर क्षीरसागरातली शेषशयनी विष्णू - आमच्या घरी मोठे चित्र होते याचे. कृष्णाला टोपलीत घातल्यावर यमुनेपार जाताना पावसापासून छत्री केलेला शेषच.

कालिया - कृष्णाने केलेले कालिया मर्दन. हा मला नदीत राहिल्याने अमेझॉनच्या ॲनाकोन्डासारखा वाटतो. यालाही वरदान मिळाल्याने श्लोकात स्थान मिळाले.

बाकीचे मी शोधून लिहेन.

श्लोकाच्या संदर्भासाठी धन्यावाद. Happy
त्यात 'धार्तराष्ट्रं' म्हटला आहे तो कोणता नाग असेल? नावाचा शब्दशः अर्थ धृतराष्ट्राचा/च्या कुळातला असा आहे ना?

धृतराष्ट्र टॉक्सिक होता म्हणून तर त्याचे नाव नंतर बदलले नसेल असे मनात आले. Happy
कर्कोटकाचा संदर्भ सुद्धा सापडला. हे सगळे महनीय नाग एकेका लोकाचे रक्षणकर्ते आहेत असं दिसतंय.

नागाचे नाव धृतराष्ट्रच होते.
विचित्रवीर्य - व्यासांचे नियोगी अंधपुत्र धृतराष्ट्र वेगळे.
दक्ष राजाची पुत्री किंवा पौत्री कद्रू.
तिचे कश्यप मुनींशी लग्न झाले आणि तिने शंभर नागांना जन्म दिला. हेच ते अष्ट की नव नाग त्यातील एक धृतराष्ट्र.

वा ! पुराणातली नागचर्चा >>> उत्तम व माहितीपूर्ण !
. . .
* समुद्र मंथनातून निघालेली चौदा रत्ने >>>> हा पण रोचक विषय आहे. ती 14 रत्ने एकत्र गुंफणारा श्लोक लहानपणी पाठ करून घ्यायचे ते आठवले.
(लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा . . . )

अच्छा.
म्हणजे हे सर्व नऊ नाग सख्खे भाऊच होते ?

बाकीचे एक्क्याण्णव नाग बंधू विशेष कर्तृत्ववान नाही निघाले वाटते?
मी तर पहिल्यांदाच ऐकते आहे.. नवनाग वगैरे. नवनाथ ऐकले होते.
Happy

भोक्तृत्व= The pleasure and pain appointed to be experienced in life, allotment of a good and evil of mortal existence मोल्सवर्थ
शांताबाई....
सर्व काही व्यर्थ आहे, जाणते मी
कायदे हट्टी मनाचे मानते मी
या प्रवाहासंगती पण वाहताना
भाबडे भोक्तृत्व माझे आणते मी

भोक्तृत्व
>>>> हा शब्द साहित्यात क्वचित आढळतो. या निमित्ताने ता आणि त्व या दोन प्रत्ययांबद्दल वाचन केले असता इथे रोचक माहिती मिळाली : https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5

". . . 'ता' प्रत्यय लागून झालेलीं नामें गुणवाचक असतात जसें: योग्यता, आर्द्रता, उष्णता इ॰ तर 'त्व' लागून, हुद्दा, कार्य, स्थिति, आयुष्यांतील निरनिराळें वयोमान इ॰चीं दर्शक भाववाचक नामें बनतात. उदा॰ राजत्व, प्रधानत्व, पंडितत्व, मित्रत्व, पितृत्व, बालत्व, वृद्धत्व, तरुणत्व इ॰ . . .
'ता' हा अधिक रूढ प्रत्यय आहे तर 'त्व' हा अधिक भारदस्त प्रत्यय वाटतो . . . "

नागांची माहिती उत्तम.

धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्र नाही - शब्दशः अर्थाने म्हणतो आहे मी. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा किंवा त्याच्या कुळातला. (गीतेच्या पहिल्या अध्यायात पांडवांच्या शंखांच्या आवाजाने कौरवांची ह्रदये विदारली हे सांगताना स घोषो धार्तराष्ट्राणाम् हृदयानि व्यदारयत् असं म्हटलं आहे. तिथे धृतराष्ट्राच्या हृदयाचा काही संबंध नव्हता)

भोक्तृत्व >> ता आणि त्व यातला भेद छान सांगितला आहे.

यावरून आठवलं. जे तृच प्रत्ययवाले मूळ शब्द आहेत, त्यांचं पुल्लिंगी रूप ---ता आणि स्त्रीलिंगी रूप ---त्री होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे भोक्ता पुल्लिंगी तर भोक्त्री स्त्रीलिंगी. आपल्याला अभिनेता - अभिनेत्री माहीत असतात, पण नेता आणि नेत्री अशी जोडी आपण वापरत नाही. स्त्रीलिंगी नेत्या असं वापरलं जातं, का ते माहीत नाही. कार्यकर्ता - कार्यकर्ती वापरतात, खरं तर स्त्रीलिंगी कार्यकर्त्री होतं. तसंच वक्ता - वक्त्री, जेता - जेत्री, दाता - दात्री (जन्मदात्री हा शब्द परिचयाचा आहेच) अशा जोड्या होतात.

धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्र नाही >>>
हो हपा, पण नागाचे नाव धृतराष्ट्र आहे.
श्लोकात धार्तराष्ट्र कसे आले माहीत नाही.

वक्ता - वक्त्री, जेता - जेत्री, दाता - दात्री जोड्या 👌

हिंदीत मात्र नेत्री चलनात आहे अजून, आपल्याकडे “महिला नेत्या“ असे होते अनेकदा

मराठीत पण नेत्री हा शब्द आहे !
नेत्री-स्त्री. नायिका; पुढारीण.
दाते शब्दकोश

* स्त्रीलिंगी नेत्या असं वापरलं जातं, का ते माहीत नाही >>>> +१ Happy
नेत्री = नयनी
हा दुसरा अर्थ सर्वांच्या डोक्यात बसल्यामुळे असेल !

Pages