शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुद्ध हवे, मोडतोड नको ह्या आग्रहात काय वाईट आहे? आणि जे शुद्ध आहे असे वाटतेय ते तरी कुठे शुद्ध आहे?

शब्द जशाच्या जसा स्विकारणे वेगळे आणि मोडतोड करुन वापरणे वेगळे. मराठीत फारसी उर्दु संस्कृत असे अनेक भाषेतले शब्द आहेत. विकांत, आवडेश वगैरे शब्द उगीचच घुसडलेत. विकेंड म्हटले तर कुणी ऑफेंड होणार आहे का Happy आशिर्वादनुमाच्या जागी समर्पक फारशी शब्द वापरला असता तरी फारसे बिघडले नसते.

एक शंका:

तयारी करुन ठेउया.
तयारी करून ठेऊया.

या आणि अश्या इतर ठिकाणी कोणते स्पेलिंग* बरोबर आहे?

ह्रस्व करुन ठेउया की दीर्घ करून ठेऊया?

अजून एक शंका:

* स्पेलिंगला मराठी शब्द?

For the unversed, “आशिर्वादपर” भाषण देणारे / दोन शब्द बोलणारे आहेत की आपल्याकडे.

आशिर्वादनुमाऐवजी ते चालावे.

"spelling" म्हणजे शब्दरचना किंवा वर्तनी, इति गुगल.
मराठीत आपण मुळात शुद्धलेखन पाहतो.

इडली सांबार मधले सांबार आणि सांभाळ म्हणजे Take Care ह्या अर्थी ह्या शब्दामध्ये एक समान सूत्र आहे ह्याची जाणीव नव्हती.
भृ धातूचे पोषण किंवा धारण करणे. असे दोन अर्थ आहेत. अनेक शब्दांची व्युत्पत्ति ह्या धातू पासून झालेली आहे.
उदाहरणार्थ हे शब्द भरणे भरीत भरीव भरती भर भारा भर्ता भार्या इत्यादि
सम ह्या उपसर्गाचे पण दोन अर्थ आहेत. एकत्र करणे किंवा चांगले करणे.
धाराणार्थ "भृ" धातूस एकीकरणार्थ "सम" उपसर्ग लावल्यावर संभरण शब्द झाला. वेगवेगळे पदार्थ एकत्र करून मग "सांभार / सांबार" तयार होते.
पोषणार्थ "भृ" धातूस चांगले करणे ह्या अर्थाचा "सम" उपसर्ग लावल्यावर "संभार" आणि त्यापासून पुढे "सांभाळ" हा शब्द तय्यार झाला.

संप्लवशनील ?

प्रस्फूर्त ?

वरील दोन शब्द अडले, यापूर्वी कधीही माझ्या अल्प वाचनात आलेले नाहीत. त्यांच्याबद्दल शब्दकोश मुके आहेत.

येथील जाणकार अर्थ आणि व्युत्पत्ती सांगू शकले तर आभारी राहीन. 🙏

संप्लवनशील असेल तर अर्थ लागु शकतो.
उदा: कापूर संप्लवनशील पदार्थ आहे.
अन्यथा लभा मटेरियल आहे.

प्रस्फूर्त शब्द उत्स्फूर्त या अर्थी वाचला आहे.

मानव, पहिला शब्दसंदर्भ आठवत नाही पण दुसरा शब्द:

“कथेचा यशस्वी पूर्वार्ध कॅ. बेलवलकरांची ही कादंबरी प्रस्फूर्त होण्यास कारणीभूत झाला” असे वाचले होते.

संप्लवन - मराठी विश्वकोश हा शब्द शाळेत विज्ञाच्या पाठ्यपुस्तकात वाचल्याचे आठवते.

प्रस्फूर्तचा आणखी एका ठिकाणी प्रयोग दिसला -.... उत्कट जिज्ञासा काही वाचकांच्या मनात प्रस्फूर्त झाल्यास...

स्फूर्ती मिळणे या क्रियापदाचे कर्मणी रूप ? असावे.

मानव, होय
अहो, मी सामान्य माणूस आहे. तुमच्याकडूनच शिकतो आहे.
Happy

करेक्ट शब्द संप्लवनशील आहे तर !

तरीही अर्थ समजला नसताच. सायन्सचे विषय इंग्रजीतून शिकलो, संप्लवनशील सुद्धा ऐकलेला नाही.

मी दहावीपर्यंत सगळे मराठी माध्यमातून शिकलेय, पण वापरात नसेल आणि फक्त पुस्तकातच असेल तर विसरून जातात शब्द. वैज्ञानिक परिभाषेतील मराठी शब्दांची तेथेच गोची होते.

कापूर हे उदाहरण पाठ्यपुस्तकात दिले असल्याने संप्लवन शब्द लक्षात राहिला असावा.
अन्यथा काही शब्द पक्के लक्षात रहाणे तर काही पार विस्मरणात जाणे सर्वांचेच होत असावे.

“कनककीट”

सरत्या आठवड्यात जुनी मराठी कागदपत्रे वाचत असतांना बरेच अनोळखी शब्द आले. हा त्यापैकी एक.

शब्दकोशातला अर्थ = काजवा

BTW1, हे काही तितकेसे योग्य वाटले नाही. रात्रीच्या अंधारात काजवा चमकतो तेव्हां तो सोनेरी (कनकसदृष्य) न दिसता रूपेरी जास्त दिसतो ना?

BTW2, रात्रीचे काजवे बघून खूप दिवस झाले.

“कनककीट”
>>> वा ! एकदम सोनेरी शब्द

मी गेल्याच आठवड्यात पेंचमध्ये पाहिले काजवे.
एक सोनपाखरू नावाचा किटक असतो भुंग्याच्या एवढा. तो फार दूर उडत नाही. त्याचे पंख जरा सोनेरी असतात. (आम्ही असे कीटक पाळायचो, ते विकणारे लोक यायचे खेड्यातून).
काजव्यापेक्षा सोनपाखरूच आठवले कनककीट वाचुन.
मला सुद्धा हा शब्द काजव्यांना योग्य नाही वाटला.

प्रस्फूर्त - प्र हा उपसर्ग लागतो तेव्हा प्रकर्षाने असा एक अर्थ त्याला लागतो. प्रकर्षाने स्फुरलेले प्रस्फूर्त - असा मी अर्थ लावला.

कनककीट, रौप्यकीट >> इंग्रजीच्या अतिवापरामुळे मी a kit of jewellery असा अर्थ लावला असता.

1. समुद्राचा किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेला जलभाग सामान्यपणे आखात या संज्ञेने ओळखला जातो. काही ठिकाणी मात्र अशा जलभागास उपसागर, समुद्र, बाइट, फर्थ, साउन्ड किंवा फ्योर्ड या संज्ञांनीही संबोधित केले आहे.
(https://marathivishwakosh.org/44702/)
..
2. दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी (किंवा खाडी ) म्हणतात. ती सामान्यतः दोन जमिनींच्या भागांदरम्यान असते.
https://marathivishwakosh.org/60146/

अच्छा. Happy
थँक्यू कुमारसर.
मोठे जलाशय..म्हणजे खरे तर दोन समुद्रच! राइट ?

Pages