शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकत्याच पुण्यात झालेल्या 'ग्लोबल पुलोत्सवात' सई परांजपे यांनी
आशीर्वादनुमा आणि शाबासकीनुमा
असा पुरस्कारांचा उल्लेख केला आहे.
. . .
-नुमा = समान, तुल्य.

वरील दोन भाषासंयोग शब्द छान वाटले.

अरे वा, नवीन धागा आला.

आशीर्वादनुमा आणि शाबासकीनुमा वेगळेच वाटत आहेत शब्द.

“नुमा” मराठीत किती आहेत माहित नाही पण उर्दू-पर्शियन मधे भरपूर आहेत.

ख़ुशनुमा
जहॉंनुमा
ज़ख़्मनुमा
इब्लीसनुमा
करमनुमा

तुम्हीं हैदराबादला “फ़लक नुमा” Falakanuma palace पाहिला असेलच. अर्थ = स्वर्गतुल्य

'रहनुमा'ही आठवला. 'समान'/'तुल्य'पेक्षा 'दर्शवणारा' असा अर्थ वाटतो 'नुमा'चा. 'नुमाइश' बहुधा त्यावरूनच?

नुमा= फारसी प्रत्यय = दाखवणारा.
रहनुमा/राहनुमा. = मार्गदर्शक. तुम्ही रहनुमा हो ...

आशीर्वादनुमा आणि शाबासकीनुमा वेगळेच वाटत आहेत शब्द. >>>> अनुमोदन. Happy
त्यात उर्दूचे काव्यसौंदर्यही राहिले नाही आणि मराठीचे खणखणीत तेजही राहिले नाही. बाकीचे रेग्युलर 'नुमा' आवडतात.

नवीन धाग्यासाठी धन्यवाद. जुन्याच घराला रंग दिल्यासारखे ताजेतवाने वाटते नव्या धाग्यावर. Happy

कुमारजी खूपच सुंदर धागा, अधून मधून चाळत असतो.

https://en.wiktionary.org/wiki/%D9%86%D9%85%D9%88%D8%AF%D9%86
‎نمودن - Wiktionary, the free dictionary

कारण हा फारसी शब्द आहे आणि अरेबिक नाही, ह्याला जोडून संस्कृत शब्द नक्कीच असला पाहिजे. वर दिलेल्या लिंक मध्ये चेक केले तर नुमा हा प्रोटो-इंडो-इराणियन *नि आणि प्रोटो-इंडो-युरोपियन *मेह जोडून बनला असावा. *नि चा अर्थ down, खाली असा होतो ज्यावरून संस्कृत आणि मराठी शब्द नीच आला असावा. *मेह चा अर्थ मोजणे ज्यावरून बऱ्याच शब्दांपैकी (https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE
मा - Wiktionary, the free dictionary) संस्कृत चा मिमीते आणि मराठीचा मोजणे आला असावा. *नि आणि *मेह चा मिळून नुमा चा अर्थ measure down, show असा झाला. संस्कृत/मराठीत असा *नि आणि *मेह दोन्ही जोडून काही शब्द झाला आहे का माहीत नाही. भाषांच्या उत्क्रांतीची प्रोसेस किती सुंदर आहे!

जुन्या घरातून नव्याने रंगवलेल्या घरात प्रवेश करणाऱ्या सर्वांचेच सहर्ष स्वागत!
चेराज या नव्या शब्दप्रेमी आणि नव्या मायबोलीकराचेही स्वागत आहे !

नुमावरील चर्चा उद्बोधक आणि माहितीपूर्ण.

छान चर्चा.

अस्मिता, अचूक निरीक्षण. आशीर्वादनुमा हा शब्द गरजवंत शब्दासारखा विचित्र वाटतो. पहिल्या शब्दात भटजीने मलमलचा रुमाल उडवल्याचा भास आहे तर दुसऱ्यात इराणी माणसाने मंत्रपुष्पांजली गायल्याचा भास आहे.

हरपा Lol
मी बोहल्यावर "तारबलं...." म्हंटल्यावर भटजींना हवेत रुमाल उडवताना इमॅजिन केले.

छान ! चला, आता पुढचा शब्द पौराणिक आहे . . .

मघवा
= इंद्र. [सं.]

यापूर्वी इंद्रासाठी वासव हा शब्द माहीत होता. आता कोड्यांतून मघवा समजला.
त्याच्या व्युत्पत्तीचा शोधही घेतला परंतु काही सापडले नाही.

या संदर्भानुसार ते एक विशेषनाम असून देवापासून दानवांपर्यंत विविध जणांसाठी वापरलेले दिसते.

अरे व्वा! असे पण धागे आहेत मायबोलीवर तर!
(मापटं ओलांडून दीड महिना झाला तरीही अजूनही नववधू प्रिया मी बावचळते!)

---

फलकनुमा व इतरही नुमाइश करणारी शब्द यादी आवडली.

बाई दवे, हैदराबाद येथे एक फलकनुमा पॅलेस आहे, आणि त्या भागाचं नावही फलकनुमा हेच आहे. तो पॅलेस एका टेकडीवर आहे आणि ती टेकडी जुन्या हैदराबाद शहरातील कदाचित सर्वात उंच ठिकाण असावे.‌ म्हणूनच फलकनुमा == गगनचुंबी असे त्या पॅलेसचे नाव ठेवले असावे.‌

पण त्या भागात राहणारे लोक, विशेषतः शेअर ऑटो रिक्षावाले त्या भागाला फलकनुमा म्हणत नाहीत तर फलकनामा म्हणतात!

*फलकनामा
>>> भारीच ! आवडले.
...
नववधू प्रिया>>> Happy

मघवा शब्दाची एक व्युत्पत्ति
मूळ धातू मह् म्हणजे पूजा करणे. पूजनीय महनीय.
मह् १प महति, १० उ महयति/ ते सन्मान करणे.
अवांतर
पण हा शब्द काही मराठी नोहे. त्यामुळे मराठी शब्दकोड्यात वापरणे उचित वाटत नाही.
संस्कृत शिकलेल्या सर्वांना हा शब्द माहित असणार. कारण पाणिनीने श्वा, युवा आणि मघवा ह्या तिघांनाही एका सूत्रात गोवले आहे.
कायद्या पुढे सगळे समान तद्वत व्याकरणाच्या समोर श्वा आणि मघवा एकाच पातळीवर.

https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.

महत् म्हणजे मोठा.
तर तम भावाने महत्तर म्हणजे मोठ्यापेक्षा मोठा.
त्यावरून मराठीत म्हातारा, म्हातारी हे शब्द आले असे एके ठिकाणी वाचले.

छान माहिती केकू. महत्तम संख्या, लघुत्तम संख्या आठवले.
'महोदय' ह्या शब्दाचा ह्याच्याशी संबंध असेल का ? कारण 'महा+ उदय' ची संधी केल्यास अर्थ लागत नाही.

महोदय महा+ उदय' असाच आहे. शब्दरत्नाकर मधेही असाच काहीसा अर्थ आहे. एक मोठे पर्व. मोल्सवर्थ ही असाच अर्थ सांगतो .
महोदय हे संबोधन sir ह्या अर्थाने जसे झाले? संशोधनाचा विषय आहे. कुणाला काही माहिती असल्यास इथे लिहा प्लीज.

महोदयचा मूळ अर्थ मोठे पर्व असताना त्याचा श्रीयुत हा अर्थ कसा झाला हे काही सापडले नाही.
बहुतेक कोश महोदय, महाशय श्रीयुत आणि जनाब हे सर्व समानार्थी देतात.

महोदय व महाशय जरी समानार्थी दिलेले असले तरी मराठी वापरात महाशय हे सहसा तिरकस बोलताना वापरलेले आढळते. महोदय मात्र औपचारिक लेखनात येते.

आभार.
बृहद कोशात मिळाला हा शब्द.

महोदय - कर्मधारय तत्पुरुष समास वाटतो. महान आहे ज्यांचा उदय, म्हणजे ज्यांचं आगमन किंवा अस्तित्व असा अर्थ असावा असं मला वाटतं.

Happy महान आहे... इथपर्यंत वाचताना मला ते उपरोधिक आहे असेच वाटत होते.
मराठी भाषा किती लवचिक आहे!

महोदय व्युत्पत्ती पटली.

मराठी वापरात “महाशय” तिरकसच वापरलेले आढळते हे अगदी खरे.

असेच “आढ्य” / “आढ्यता” या शब्दांना अशीच negativity चिकटली आहे.

वास्तविक आढ्य = धनिक किंवा श्रीमंत. त्यावरून मराठीत कितीतरी गुणदर्शक शब्द आहेत. उदा: बलाढ्य, गुणाढ्य, धनाढ्य

* “आढ्य” / आढ्यता या शब्दांना >>> +१११
तसेच शिष्टचे पण झालेय.

शिष्ट = (शब्दशः) शिस्तीचा; व्यवस्थित; नियमित; ऋजुमार्गी; नियमाप्रमाणें चालणारा; शिक्षित
(रूढ) विद्वान्; सभ्य; संभावित.

शिष्ट..

शिष्टसंमत व्यवहार, शिष्टाई कुठे आणि “शिष्टच आहेस” असा शेरा कुठे 😀

Pages